Friday, July 24, 2026
Home Blog Page 406

शिक्षकांसाठी आनंदवार्ता… शाळा स्तरावरील समित्यांचे विलिनीकरण!

0
शिक्षकांसाठी आनंदवार्ता… शाळा स्तरावरील समित्यांचे विलिनीकरण!



लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : राज्यातील शालेय स्तरावरील समित्यांची संख्या कमी करण्यात आली आहे. शाळांमध्ये आता शालेय व्यवस्थापन समिती, विद्यार्थी सुविधा आणि भौतिक विकसन समिती, सखी सावित्री समिती, महिला तक्रार निवारण समिती या चार समित्या राहणार आहेत. शाळास्तरावरील १२ समित्यांचे शालेय व्यवस्थापन समिती, विद्यार्थी सुविधा आणि भौतिक विकसन समितीमध्ये विलीनीकरण करण्यात आले असून, शाळा स्तरावरील समित्यांची संख्या कमी केल्यामुळे शिक्षकांचा या कामकाजात जाणारा वेळ वाचणार आहे.

शालेय शिक्षण विभागाने या बाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. अशैक्षणिक कामांतून सुटका करण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून राज्यभरातील शिक्षकांकडून सातत्याने करण्यात येत होती. त्यानुसार शैक्षणिक आणि अशैक्षणिक कामांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. त्याशिवाय आता शाळास्तरावरील समित्यांचे विलीनीकरण करून त्यांची संख्याही कमी करण्यात आली आहे. त्यानुसार माता पालक संघ, शालेय पोषण आहार योजना समिती, शिक्षक पालक संघ, नवभारत साक्षरता समिती, तंबाखू नियंत्रण समिती, स्क्वॉफ स्वयं मूल्यांकन समिती या समित्यांचा समावेश शाळा व्यवस्थापन समितीमध्ये, तर विद्यार्थी सुरक्षा समिती, तक्रार पेटी समिती, शाळा बांधकाम समिती, परिवहन समिती, शाळा व्यवस्थापन आणि विकास समिती, शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी गावस्तर समितीचे विलीनीकरण विद्यार्थी सुविधा आणि भौतिक विकसन समितीमध्ये करण्यात आले आहे.

शाळा व्यवस्थापन समितीमध्ये १२ ते १६ सदस्यांचा समावेश असेल. त्यातील ७५ टक्के सदस्य पालकांमधून निवडण्यात येतील. पालकांमध्ये उपेक्षित, दुर्बल घटकांतील पालक, सर्व इयत्तांतील पालकांना प्रतिनिधित्त्व मिळणे आवश्यक आहे. एकूण सदस्यांपैकी ५० टक्के सदस्य महिला असतील. समितीची दर महिन्याला बैठक होईल, तसेच दर दोन वर्षांनी समिती नव्याने निवडण्यात येईल. शाळेच्या कामकाजाचे नियंत्रण, विद्यार्थ्यांची १०० टक्के उपस्थिती, निधीच्या विनियोगावर नियंत्रण, शिक्षकांच्या कर्तव्याचा पाठपुरवठा आणि समस्यांचे निराकरण, प्रधानमंत्री पोषण निर्माण शक्ती योजनेची अंमलबजावणी, शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न अशी विविध कामे या समितीला करावी लागणार आहेत.

तर विद्यार्थी सुविधा आणि भौतिक विकसन समितीमध्ये सरपंच, नगरसेवक, स्थानिक प्राधिकरणाचे निवडून आलेले प्रतिनिधी, शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ, बालविकास तज्ज्ञ, समुदेशक, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, पोलिस पाटील, डॉक्टर, माजी विद्यार्थी, पालक, व्यावसायिक क्षेत्रातील व्यक्ती, मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी, पोलिस निरीक्षक, बस कंत्राटदार प्रतिनिधी अशा एकूण १२ ते १६ सदस्यांचा समावेश असेल.

या समितीची दर महिन्याला बैठक होईल. समितीची दर दोन वर्षांनी नव्याने निवड करण्यात येईल. सीएसआरच्या माध्यमातून शाळेसाठी भौतिक, शैक्षणिक सुविधांची उपलब्धता, शाळेसाठी मदत मिळवणे, शाळा स्वच्छता, स्वच्छतागृहांची स्वच्छता याबाबत उपाययोजना अशी विविध कामे या समितीच्या कार्यकक्षेत निश्चित करण्यात आली आहेत. या पुढे राज्यात नवीन उपक्रम, योजना सुरू झाल्यास त्यासाठी शाळा स्तरावर नवीन समिती नियुक्त करण्यात येऊ नये. त्याबाबते काम शाळा व्यवस्थापन समिती किंवा विद्यार्थी सुविधा आणि भौतिक विकसन समितीच्या माध्यमातून करण्याबाबत नमूद करण्यात आले आहे.



Source link

व्हेटिंलेटरवर असलेल्या महिलेवर लैंगिक अत्याचार; नामांकित रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

0
व्हेटिंलेटरवर असलेल्या महिलेवर लैंगिक अत्याचार; नामांकित रुग्णालयातील धक्कादायक प्रकार


Gurugram Crime News : व्हेटिंलेटरवर असलेल्या महिलेवर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. गुरुग्राम मधील एका नामांकित रुग्णालयात हा  धक्कादायक प्रकार घडला आहे. ही घटना जेव्हा घडली तेव्हा दोन परिचारिका देखील अति दक्षता विभागात उपस्थित होत्या. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडितेच्या जबाबावरून सदर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध लैंगिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडीत महिला ही एअर हॉस्टेस म्हणून काम करते.  मूळची पश्चिम बंगालची राहणारी ही महिला एका कंपनीत एअर होस्टेस आहे. ती कंपनीच्या वतीने प्रशिक्षणासाठी गुरुग्रामला आली होती

दरबारीपूरजवळ त्याचे एक महिन्याचे प्रशिक्षण चालू होते. पीडिता गुरुग्राममधील सेक्टर-15 येथील एका हॉटेलमध्ये थांबली होती. पीडित महिला हॉटेलमधील स्वीमिंगपुल मध्ये पोहण्यासाठी गेली होती. मात्र, तिला अचानक अस्वस्थ वाटल्याने ती नजीकच्या रुग्णालयात दाखल झाली. मात्र, तिची प्रकृती आणखी बिघडल्याने तिला दुसऱ्या मोठ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

6 एप्रिल रोजी रात्री ९ वाजता ही महिला व्हेंटिलेटरवर होती. यावेळी अज्ञात व्यक्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.  रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर, ही महिला घरी परतली, तेव्हा तिने तिच्या पतीला या घटेनबाबत सांगितले.  14 एप्रिल रोजी  पतीने 112 क्रमांक डायल करुन पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी सदर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला.

गुरुग्राम पोलिसांनी सांगितले की, रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात आहे. पोलिस पथक लवकरच या प्रकरणातील आरोपीची ओळख पटवून त्याला अटक करेल. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.  दरम्यान, ज्या रुग्णालायात ही घटना घडली त्या रुग्णालयाने निवेदन जारी केले आहे. रुग्णाच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे.  संबंधित अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासात आम्ही पूर्ण सहकार्य करत आहोत असे रुग्णालयाने निवेदनात म्हटले आहे.. 

 





Source link

Dinanath Mangeshkar Hospital case Sushrut Ghaisas Tanisha families to be heard by MMC next week Mumbai print news

0
Dinanath Mangeshkar Hospital case Sushrut Ghaisas Tanisha families to be heard by MMC next week Mumbai print news



Dinanath Mangeshkar Hospital case Sushrut Ghaisas Tanisha families to be heard by MMC next week Mumbai print news | दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरण; डॉ. घैसास, तनिषांच्या कुटुंबियांची पुढील आठवड्यात एमएमसीकडे सुनावणी





Source link

Irani Chai History in Marathi : A Journey Through Time, Tradition, and Taste in Marathi

0
Irani Chai History in Marathi : A Journey Through Time, Tradition, and Taste in Marathi



Irani Chai History in Marathi : A Journey Through Time, Tradition, and Taste in Marathi | इराणी चहा भारतात कसा आला माहीत आहे का? काय सांगतो ‘पानी-कम’चा ‘मलईदार’ इतिहास?





Source link

शास्त्रीनगर रुग्णालयात वैद्यकीय सुविधांअभावी रुग्णांचे हाल; मनसेचा रुग्णालयाला टाळे ठोकण्याचा इशारा

0
शास्त्रीनगर रुग्णालयात वैद्यकीय सुविधांअभावी रुग्णांचे हाल; मनसेचा रुग्णालयाला टाळे ठोकण्याचा इशारा



शास्त्रीनगर रुग्णालयात वैद्यकीय सुविधांअभावी रुग्णांचे हाल; मनसेचा रुग्णालयाला टाळे ठोकण्याचा इशारा | Patients suffer due to lack of medical facilities at Shastri Nagar Hospital amy 95





Source link

कोण आहेत भारतीय रेल्वेचे जनक? 172 वर्षांनंतरही गाडी सुस्साट…. ही कोणाची कृपा?

0
कोण आहेत भारतीय रेल्वेचे जनक? 172 वर्षांनंतरही गाडी सुस्साट…. ही कोणाची कृपा?


Indian Railway First Train: 16 एप्रिल 1853… हा तोच दिवस, जेव्हा भारतात पहिल्यांदाच रेल्वे रुळावरून रेल्वेचा प्रवास सुरू झाला होता. दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी 14 डब्यांची ही रेल्वे 400 प्रवाशांसह पहिल्या प्रवासासाठी रवाना झाली. ही ट्रेन रुळांवरून पुढे जातानाचं दृश्य त्या काळात इतकं भारावणारं होतं की, त्या काळात जे काही घडत होतं ते पाहण्यासाठी नागरिकांनीही रेल्वेच्या दोन्ही बाजूंनी पळायला सुरुवात केली. 

हे असं काहीतरी तेव्हाच्या काळात पहिल्यांदाच घडत होतं, जिथं सापाच्या शेपटीसारखी लांबलचक ट्रेन इंजिनातून धूर सोडत मोठ्या वेगानं पुढे चालली होती. काहींना तर या ट्रेनची इतकी भीती वाटली की तिची तुलना चक्क चालणाऱ्या राक्षसाशी करण्यात आली. मुंबईच्या बोरिबंदर इथून या ट्रेनचा प्रवास सुरू झाला होता. ज्यानंतर ती साधारण 1 तास 15 मिनिटांच्या प्रवासानंतर 34 किमीचं अंतर ओलांडून सायंकाळी 4 वाजून 45 मिनिटांनी ठाण्याला पोहोचली. 

14 डब्यांची ही ट्रेन तीन डब्यांच्या इंजिनामुळं पुढं गेली. या ट्रेननं प्रवास करणाऱ्यांची जितकी गर्दी होती, तितकीच गर्दी ट्रेन पाहणाऱ्यांचीसुद्धा होती. डेक्कन क्वीन असं या ट्रेनचं नाव. नामांकित व्यक्ती या पहिल्यावहिल्या ट्रेनमध्ये प्रवासी होते. या क्षणाचं इतकं अप्रूप, की या ट्रेनला चक्क 21 तोफांची सलामीसुद्धा देण्यात आली होती. 

या ट्रेनच्या इंजिनासाठी आणल्या गेलेल्या खास ब्रिटनहून मागवण्यात आलेल्या डब्यांना सुल्तान, सिंधु आणि साहिब असं नाव देण्यात आलं होतं. सुरुवातीला या ट्रेनची सुरुवातच मुळात ब्रिटीश राजवटीनं नफ्याच्या हेतूनं केली होती. मात्र खऱ्या अर्थानं भारतालाही पहिली ट्रेन मिळाली होती. 

ईस्ट इंडिया कंपनी भारतात आल्यानंतर जवळपास 200 वर्षांनंतर 1825 मध्ये ब्रिटनमध्ये पहिली रेल्वे धावली आणि 1832 मध्ये ब्रिटनच्याच धर्तीवर भारतात रेल्वे सुरु करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. पण, तेव्हा हा प्रस्ताव फारसा पुढे गेला नाही. 1848 मध्ये लॉर्ड डलहौजी जेव्हा भारताच्या गव्हर्नरपदी आले तेव्हा त्यांनी भारतात रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि म्हणूनच त्यांना भारतातील रेल्वेचं जनक म्हटलं जातं. 

पहिल्या रेल्वेची सुरुवात होणं हे भारताच्या दृष्टीनं एक क्रांतिकारी पाऊल होतं. ज्यानंतर हळुहळू देशात रेल्वेचा विस्तार झाला आणि नॅरोगेज, मीटरगेज, ब्रॉडगेज मार्गांवर रेल्वे धावू लागली. 1 मार्च 1969 मध्ये भारतातील पहिली सुपरफास्ट ट्रेन सुरू झाली, दिल्ली ते हावडादरम्यानच्या अंतरात या रेल्वेनं प्रवास केला होता. तेव्हापासून सुरू असणारा हा रेल्वेचा प्रवास तब्बल 172 वर्षांनंतरही सुस्साट सुरू आहे. 





Source link

Eknath Shinde one More Statement About Chief Ministry said pilot seat changed in Mahayuti Govt

0
Eknath Shinde one More Statement About Chief Ministry said pilot seat changed in Mahayuti Govt


Eknath Shinde Amravati Airport Inauguration : “आधीच्या सरकारमध्ये मी मुख्यमंत्री होतो, अजित पवार व देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होते. आता फडणवीस मुख्यमंत्री, तर मी व अजित पवार उपमुख्यमंत्री आहोत. आमच्यात केवळ खुर्च्यांची अदलाबदल झाली आहे”, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेकवेळा केलं आहे. यावरून “एकनाथ शिंदेंच्या मनातून मुख्यमंत्रिपद काही जात नाही”, अशा शब्दांत अजित पवार यांनी शिंदे यांची अनेकदा फिरकी घेतल्याचं देखील आपण पाहिलं आहे. अशातच आज पुन्हा एकदा शिंदे यांनी खुर्च्यांची अदलाबदल झाल्याचं वक्तव्य केलं आहे.

अमरावती विमानतळाच्या उद्घाटनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात एकनाथ शिंदे म्हणाले, “आमच्या आधीच्या सरकारच्या काळात अनेक प्रकल्प व योजना बंद होत्या. मात्र आम्ही (महायुती) सत्तेत आलो आणि राज्याच्या विकासाचं, कल्याणकारी योजनांचं टेकऑफ झालं. मी त्या विमानाचा पायलट (वैमानिक) होतो. त्यावेळी देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे माझे को-पायलट (सह-वैमानिक) होते. आता देवेंद्र फडणवीस आमचे पायलट आहेत. मी व अजित पवार को-पायलट आहोत. केवळ आमची खुर्ची बदलली आहे. मात्र, विकासाचं विमान तेच आहे, इंजिनही तेच आहे. आता ते अधिक गतीने धावताना दिसतंय.”

हेही वाचा

आधीच्या सरकारचे स्पीड ब्रेकर्स आम्ही हटवले : शिंदे

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी आधीच्या महाविकास आघाडी सरकारवरही यावेळी टीका केली. ते म्हणाले, “आमच्या आधी सत्तेत असणाऱ्या लोकांना केवळ अडचणींचा पाढा तोंडपाठ होता. त्यांच्या काळात अनेक प्रकल्प रखडले होते. त्यांनी प्रत्येक ठिकाणी स्पीड ब्रेकर्स लावले होते. मात्र, आम्ही सत्तेत आल्यावर सगळे स्पीड ब्रेकर्स हटवले. आता आपल्याला बुलेट ट्रेनच्या वेगाने पुढे जायचं आहे. राज्यात आता अनेक प्रकल्प निर्माण होत आहेत. विमानतळामुळे अमरावतीचा विकास होतोय. या विमानतळामुळे नागरिक व शेतकऱ्यांचा मोठा फायदा होणार आहे.”

हेही वाचा

विमानतळ अमरावतीकरांसाठी गेमचेंजर ठरेल, एकनाथ शिंदेंना विश्वास

“ज्या भागात चांगली वाहतूक व्यवस्था असते, जिथे रेल्वे व विमानसेवा उपलब्ध असते तिथला विकास जलदगतीने होतो, असं म्हणत शिंदे यांनी कोल्हापूर विमानतळाचं उदाहरण दिलं. ते म्हणाले, “राजाराम महाराजांनी स्थापन केलेल्या कोल्हापूर विमानतळाचा विस्तार आपण केला आहे. ते आता आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ होत आहे.

शिंदे म्हणाले, “अमरावती विदर्भातील शिक्षणाचं माहेरघर आहे. येथे विमानसेवा सुरू व्हावी अशी अमरावतीकरांची मागणी होती. ती मागणी आपण पूर्ण केली आहे. सध्या मर्यादित विमानफेऱ्या असल्या तरी जसजशी मागणी वाढेल तसतशी या विमानतळाची क्षमता व विमानफेऱ्या वाढवल्या जातील. हे विमानतळ अमरावतीकरांसाठी गेमचेंजर ठरणार आहे.





Source link

These four zodiac signs are dear to Shani He gives immense wealth and success to hard working people

0
These four zodiac signs are dear to Shani He gives immense wealth and success to hard working people



These four zodiac signs are dear to Shani He gives immense wealth and success to hard working people | Shani Dev: शनिला प्रिय आहेत ‘या’ चार राशी! मेहनती लोकांना देतो अपार संपत्ती अन् यश





Source link

MSRTC Bus Catches Fire on Akkalkot Road: Passengers Lucky to Escape, video viral

0
MSRTC Bus Catches Fire on Akkalkot Road: Passengers Lucky to Escape, video viral



MSRTC Bus Catches Fire on Akkalkot Road: Passengers Lucky to Escape, video viral | Video : “सर्व बस भंगार झाल्या आहेत..” चालत्या एसटी बसला लागली आग, प्रवाशांचा जीव थोडक्यात वाचला; बसची दुरव्यस्था पाहून नेटकऱ्यांचा संताप





Source link

Bhawara cemetery in poor condition due to neglect of Uran Municipal Council

0
Bhawara cemetery in poor condition due to neglect of Uran Municipal Council



Bhawara cemetery in poor condition due to neglect of Uran Municipal Council | सरणावरही मरणयातना; उरण नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे स्मशानभूमींत अंधार





Source link