Monday, August 17, 2026
Homeक्रीडावानखेडे स्टेडियममधील स्टॅंडला रोहित शर्माचे नाव

वानखेडे स्टेडियममधील स्टॅंडला रोहित शर्माचे नाव

वानखेडे स्टेडियममधील स्टॅंडला रोहित शर्माचे नाव

[ad_1]

मुंबई क्रिकेट असोसिएशनने (Mumbai cricket association) वानखेडे स्टेडियममधील एका स्टँडला रोहित शर्माचे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. 15 एप्रिल रोजी मुंबई (mumbai) क्रिकेट असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला. हे स्टँड माजी भारतीय कर्णधार अजित वाडेकर आणि माजी एमसीए अध्यक्ष शरद पवार यांनाही समर्पित केले जातील.

“वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूर झालेला आणखी एक महत्त्वाचा ठराव म्हणजे वानखेडे स्टेडियममधील स्टँडला रोहित शर्माचे नाव देण्याचा प्रस्ताव सुरुवातीला मिलिंद नार्वेकर यांनी मांडला आणि जितेंद्र आव्हाड यांनी त्याला पाठपुरावा दिला,” असे एमसीएच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

प्रसिद्धीपत्रकानुसार पॅव्हेलियन लेव्हल 3 ला रोहित शर्माचे नाव देण्यात येईल. ग्रँड स्टँड लेव्हल 3 आता शरद पवार स्टँड म्हणून ओळखले जाईल. तर लेव्हल 4 चे नाव अजित वाडेकर स्टँड असे ठेवले जाईल.

असोसिएशनचे माजी अध्यक्ष अमोल काळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ श्रद्धांजली वाहताना मुंबई क्रिकेट असोसिएशनने असेही जाहीर केले की एमसीए पॅव्हेलियनमधील मॅच-डे ऑफिसला आता एमसीए ऑफिस लाउंज असे नाव देण्यात येणार आहे.

असोसिएशनचे माजी अध्यक्ष अमोल काळे यांचे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष पदावर असताना निधन झाले.

या नामांतराच्या निर्णयामुळे रोहित शर्माच्या (rohit sharma) चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तसेच आता सचिन तेंडुलकर, दिलीप वेंगसरकर अशा मोठ्या दिग्गज खेळाडूंच्या स्टॅंडनंतर रोहित शर्मा स्टॅंडचा यादीत समावेश होणार आहे.


हेही वाचा

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments