Friday, July 24, 2026
Home Blog Page 404

donald trump policy affected rural india ग्रामीण भागालाही ट्रम्प धोरणांच्या झळा

0
donald trump policy affected rural india ग्रामीण भागालाही ट्रम्प धोरणांच्या झळा


डोनाल्ड ट्रम्प यांनी २ एप्रिल २०२५ रोजी त्यांचे प्रशुल्कविषयक धोरण जाहीर केल्यापासून जगाच्या अर्थकारणात आणि आर्थिक सिद्धांतांत मोठे बदल होऊन जागतिक संघर्षाचे नवे युग सुरू होते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. भौगोलिक दृष्टिकोनातून पाहता, अमेरिका सुरुवातीपासूनच एक श्रीमंत देश आहे. तेथील जंगल, शेतजमीन व इतर संसाधनांचा उपयोग कशा प्रकारे करावा, हा प्रश्न अमेरिकेच्या स्थापनेपासूनच उपस्थित झाला होता. या पार्श्वभूमीवर त्यांनी शेतजमिनींचा पूर्ण उपयोग व्हावा यासाठी ७०० एकर इतका किमान विक्री घटक ठेवला आणि त्याची किंमत एक डॉलर प्रति एकर निश्चित केली. युरोपातून आलेल्या आणि ज्यांच्याकडे भांडवल आहे, अशा लोकांनी हजारो एकर जमिनी खरेदी केल्या. आजही, भारतात अल्पभूधारकांची संख्या मोठी आहे, तर अमेरिकेत शेकडो एकरांची व्यक्तिगत मालकी असलेले शेतकरी आहेत. स्थानिक पुरवठा मोठ्या प्रमाणात असूनही मागणी कमी असल्यामुळे, अमेरिका सुरुवातीपासूनच कृषी निर्यातदार देश आहे. कृषी निर्यातीतून नफा मिळवणे हे त्यांचे धोरण आजही कायम आहे. अमेरिकेच्या प्रचंड अनुदानित व्यवस्थेमुळे तेथे उत्पादित होणारा कृषिमाल जागतिक बाजारात यशस्वीपणे स्पर्धा करू शकतो. परिणामी, लहान शेती असलेल्या आणि मर्यादित अनुदान देणाऱ्या देशांची जागतिक बाजारात गळचेपी होते.

अमेरिकेच्या स्वस्त कृषी उत्पादनांमुळे स्वत:ची शेती उद्ध्वस्त होऊ नये म्हणून अनेक लहान देशांनी त्यांच्या देशांत उच्च दरांचे संरक्षक आयात शुल्क लावले आहे. याला उत्तर म्हणून ट्रम्प यांनी ‘आम्हीदेखील तितक्याच प्रमाणात प्रशुल्क लावू’ असे जाहीर केले. याच अडथळ्यांमुळे जागतिक व्यापार संघटनेत (डब्ल्यूटीओ) कोणतेही नवे कृषी करार झालेले नाहीत आणि डब्ल्यूटीओचे महासंचालकही काकुळतीला येऊन म्हणत आहेत की, काही तरी करार करा आणि ही संस्था जिवंत ठेवा. अमेरिकेत आतापर्यंत इतक्या प्रकारची वाढती अनुदाने शेतकऱ्यांना दिली गेली आहेत, की शेतकऱ्यांचे सरासरी उत्पन्न मध्यमवर्गीयांच्या सरासरी उत्पन्नापेक्षा जास्त आहे व त्या बाबतीत शहरी मध्यमवर्ग विरोध नोंदवत आहे. भारत व इतर लहान देश इतक्या मोठ्या प्रमाणावर अनुदाने देऊ शकत नाहीत, त्यामुळे अमेरिकेशी त्या बाबतीत स्पर्धाही करू शकत नाहीत. साहजिकच ट्रम्प शेती व्यापाराच्या करारांबाबत नक्की काय धोरणे स्वीकारतात व त्यांचे इतर देशांवर काय परिणाम होतील हा ज्वलंत मुद्दा आहे. जगातील शे-सव्वाशे लहान राष्ट्रांतील अन्नसुरक्षेचा प्रश्न त्यावरील प्रशुल्क वाढविल्याने सुटणार आहे की घटविल्याने हा प्रश्न ट्रम्प यांनी जगापुढे उभा केला आहे.

जागतिक व्यापार संघटनेच्या स्थापनेनंतर खुल्या व्यापारामुळे जी स्पर्धा सुरू झाली त्यामुळे अमेरिकेला बऱ्याच मोठ्या प्रमाणात शह बसला व अमेरिकेचा बाजार लहान देश काबीज करू लागले. त्यामुळे अमेरिकेने जागतिक व्यापार संघटनातील बहुपक्षीय मुक्त व्यापाराचे सूत्र बाजूला सारून, पॅसिफिक व अटलांटिक महासागर किनाऱ्यावरील राष्ट्रांसोबत द्विपक्षीय करार करणे पसंत केले. या करारांत ‘आम्ही तुम्हाला हवी तशी मदत करू, पण आमच्या कृषी अनुदानांकडे बोट दाखवू नका,’ असे धोरण ठेवले गेले. या सर्व घडामोडींचा विचार करता, जागतिक तसेच भारताच्या शेती व्यापाराचे भवितव्य काय असेल, याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा

आंतरराष्ट्रीय संस्था खिळखिळ्या

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जागतिक व्यापाराचे संबंध दुरावले आणि तुटतही गेले. म्हणून युद्ध संपल्यानंतर शांतता प्रस्थापित व्हावी या उद्देशाने संयुक्त राष्ट्र संघ स्थापन करण्यात आला आणि हळूहळू देशादेशांमधील व्यापार कमी प्रशुल्क आकारून अधिक मुक्त करण्याचे प्रयत्न सुरू झाले. याच प्रक्रियेत ‘प्रशुल्क आणि व्यापारासंबंधी सामान्य करार’ ( GATT) अस्तित्वात आला आणि १९९४ मध्ये त्याचे रूपांतर जागतिक व्यापार संघटनेत (डब्ल्यूटीओ) करण्यात आले. परंतु ट्रम्प यांच्या वर्तमान धोरणांवरून असे दिसते की, एकत्र बांधलेले जग आता सुटे-सुटे होईल आणि आपापल्या आर्थिक अस्तित्वासाठी प्रत्येक देश, नीती-अनीतीचा विचार सोडून स्पर्धा करेल. जागतिक व्यापाराला दिलेली एक सैद्धांतिक चौकट (परिपूर्ण नसली तरी) धोक्यात आली आहे. आणि त्याचे पुढील स्वरूप निश्चित होण्यासाठी बराच काळ लागू शकतो. हा नव्या युगाचा उदय आहे असे वाटते.

ट्रम्प यांनी बाकीचे सदस्य देश वर्गणी भरत नाहीत आणि तो भार अमेरिकेवरच पडतो म्हणून ‘नेटो’मधून अंग काढून घेतले आहे. विविध कारणे देऊन जागतिक आरोग्य संघटनेतूनही बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी नव्याने विकसित होणाऱ्या देशांना मिळणारी आरोग्यविषयक आंतरराष्ट्रीय मदत अचानक थांबली आहे.

हवामान बदलांच्या प्रश्नासंदर्भात विकसित राष्ट्रे जास्त प्रदूषण करतात हे अमेरिकेतील ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाने कधीच मान्य केले नाही. त्यामुळे हवामान बदलाचे जे अतितीव्र परिणाम जगावर होत आहेत, त्याविरुद्ध उपाययोजना करू शकणारे सर्वात श्रीमंत राष्ट्रच या प्रयत्नांतून बाहेर पडले आहे. परिणामी सर्व विकसनशील राष्ट्रांना हवामान बदलांना एकट्याने सामोरे जावे लागेल. युरोपीय देशांनी मदतीस होकार दिला असला, तरी आपले आर्थिक योगदान कबूल केल्याप्रमाणे दिलेले नाही.

हेही वाचा

ट्रम्प यांच्या नव्या धोरणांमुळे आयएमएफ आणि डब्ल्यूटीओ या आंतरराष्ट्रीय संस्थांनी चिंता व्यक्त केली आहे. फेडरल रिझर्व्हच्या (अमेरिकेची केंद्रीय बँक) अध्यक्षांनी ट्रम्प यांचे व्यापार प्रशुल्क जास्त आहे आणि परिणामी अमेरिकेतसुद्धा भाववाढ होईल, मंदी येईल असे मत व्यक्त केले आहे. त्यामुळे ट्रम्प यांच्या कारकीर्दीत आंतरराष्ट्रीय संघटना, त्यांच्या देशातील संवैधानिक मौद्रिक संघटना इत्यादींचे कार्य व भूमिका यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हे अमेरिकी जनतेसाठीही धोक्याचे संकेत आहेत. सुमारे पाचशे कायदेविषयक काम करणाऱ्या कंपन्यांनी ट्रम्प यांच्या नव्या धोरणांविरुद्ध न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेतील ५० राज्यांत ट्रम्प यांच्या धोरणांविरुद्ध निदर्शने सुरू आहेत.

साम्राज्यवादी प्रवृत्ती

अमेरिका हा मुक्त व्यापारी, लोकशाहीनिष्ठ, साम्राज्यवादविरोधक व स्वातंत्र्यप्रेमी देश म्हणून ओळखला जात होता; परंतु ट्रम्प यांनी कॅनडा व ग्रीनलँड हे देश अमेरिकेची राज्ये व्हावीत, असे जाहीर विधान केले. त्यात ग्रीनलँडमधील खनिजे व त्या प्रदेशाचा युरोप आणि रशियावर नजर ठेवण्यासाठी उपयोग हा मुद्दा आहे; त्याचप्रमाणे पॅलेस्टिनमधील गाझा पट्टी अमेरिकेला हवी आहे व तिथे अमेरिका हॉलिडे रिसॉर्ट (पर्यटन स्थळ) करेल असेही म्हटले आहे. मधल्या काही काळात भारताने रशियाकडून स्वस्त खनिज तेल आयात केले. आता ट्रम्प भारताला म्हणत आहेत की तुम्ही आमच्याकडून घ्या. म्हणजे भारताला व्यापार स्वातंत्र्य नाही? अमेरिकेची ही धोरणे त्याची साम्राज्यवादी प्रवृत्ती दर्शवीत नाहीत का? आजच्या जगात, सार्वभौम देशाच्या जमिनीचा एक इंचसुद्धा दुसऱ्या देशाने घेणे योग्य नाही.

हेही वाचा

चीन विरुद्ध अमेरिका

ट्रम्प यांनी जगाला चिंतेत टाकले आहे. युरोपीय राष्ट्रांनी भविष्यात अमेरिकेवर अवलंबून न राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. चीनने अमेरिकेपुढे कोणतीही आर्थिक शरणागती न पत्करण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक व्यापारातील नफ्यावर आपला अंतर्गत विकास अवलंबून ठेवता येत नाही, हे चीनने आधीच ओळखले होते आणि देशांतर्गत मागणी वाढवून त्याद्वारे प्रगतीचे प्रारूप विकसित केले होते. त्यामुळे अमेरिका व चीनमध्ये जगावरच्या अधिकारासाठी संघर्ष झालाच, तर तो जगातील सर्वच देशांना व्यापून टाकेल व कित्येक पिढ्यांवर त्याचे प्रतिकूल परिणाम होतील. आधीच जगातील सर्वांत श्रीमंत असलेल्या राष्ट्राने; आम्हाला पुन्हा तेवढेच मोठे व्हायचे आहे (मेक अमेरिका ग्रेट अगेन – मागा), असे म्हणणे कितपत समंजसपणाचे? त्यात भर म्हणजे भारत सरकारने ‘मेकिंग इंडिया ग्रेट अगेन’- ‘मिगा’ म्हणजेच ‘मेगा’ असे म्हणणे हे संकटातही विनोद करू पाहण्यासारखे आहे.

या सर्वांवर उपाय एकच आहे की, अमेरिका, चीनसहित जगातील सर्व राष्ट्रांनी पुन्हा एकदा नव्या प्रकारचा संयुक्त राष्ट्रसंघ आणि नवी जागतिक व्यापार संघटना स्थापन करावी. शांतता, सौहार्द, प्रगल्भतेच्या व साम्राज्यवादमुक्त वातावरणात सर्वांचाच आर्थिक विकास होईल, असे प्रारूप निर्माण करावे.
shreenivaskhandewale12@gmail.com





Source link

अमेरिकन विनोदकारांची परंपरा…

0
अमेरिकन विनोदकारांची परंपरा…



सलील जोशी
भारतात एकपात्री किंवा स्टॅण्डअप कॉमेडी हा प्रकार प्रचारात येऊन आता दशकभर तरी झाले असेल. परंतु इंटरनेटवरील विनोदी स्टॅण्डअप म्हणून जे कार्यक्रम बघायला मिळतात ते आठवडी किंवा दररोज केले जात नाहीत. त्यांची पोहोचसुद्धा एका विशिष्ट वर्गापर्यंत किंवा वयोगटापर्यंत असावी. तसेच हे कार्यक्रम बहुतांशी सत्ताधारी नेत्यांवर किंवा अतिशय प्रख्यात व्यक्तींवर ‘गमतीत’ टीका करणारे असल्याने कदाचित त्याला फारसा भाव मिळत नसावा. अशा कार्यक्रमातून वापरलेली भाषा ही असभ्यतेकडे झुकणारी अशी असल्याने त्याला तरुण वर्गाशिवाय प्रेक्षक मिळत नसावा. किंबहुना थोडी असभ्य भाषा वापरली नाही तर विनोदच करता येत नाहीत असाही समज या विनोदकारांचा झाला असावा. कारण काहीही असो पण हा विनोदाचा प्रकार, त्यातून होणारे विडंबन व बातमीचे वा माहितीचे सत्य-दर्शन किंवा एकंदरीत ‘टवाळकी’ला कुठल्याही लोकशाहीत भरपूर वाव आहे.

अमेरिकी दूरचित्रवाणी तसेच केबल वाहिन्यांना अशा कित्येक ‘टवाळांनी’ समृद्ध केले आहे. या वाहिन्यांवर ‘लेट नाइट शोज’ची परंपरा जुनी आहे. प्रख्यात नेते, अभिनेते, खेळाडू किंवा व्यावसायिकांची मुलाखत; पण त्याआधी अशा कार्यक्रमाच्या सूत्रधारांनी खुमासदार शैलीत राजकीय वा सामाजिक सद्या:स्थितीवर केलेली व्यंगात्मक टिप्पणी, असे या कार्यक्रमांचे स्वरूप. अशा कार्यक्रमांचे जनक म्हणून जॉनी कार्सन (१९२५-२००५) यांना ओळखले जाते. मुलाखत घेण्याची कार्सन यांची शैली, नर्मविनोदी स्वभाव, लाघवी हास्य तसेच त्यांचे स्त्रीदाक्षिण्य ही त्यांची वैशिष्ट्ये असल्याची साक्ष देणाऱ्या अनेक मुलाखती यू-ट्यूबवर आजही बघावयास मिळतात. त्यांच्या ‘शो’साठी निमंत्रण मिळणे हाही सन्मानाचा भाग असे. ‘एनबीसी’ वाहिनीवरील या कार्यक्रमाची धुरा त्यांच्यानंतर ज्ये लेनो यांनी सांभाळली. तोवर अमेरिकी भांडवलशाहीच्या नियमाला अनुसरून इतरही वाहिन्यांनी आपापले ‘लेट नाइट शो’ सुरू केले होते, त्यांतून ‘सीबीएस’ वाहिनीवरील डेव्हिड लेटरमन यांचा प्रभाव टिकला.

ही सारीच मंडळी मुरब्बी विनोदकार. त्यामुळे कार्यक्रमाच्या सुरुवातीची ५-१० मिनिटे ते काय बोलतात याकडे साऱ्यांकडे लक्ष असे. तरीसुद्धा अगदी हल्लीपर्यंत चार घटका करमणूक तसेच मूळ मुलाखत सुरू होण्याआधीची एक धमाल यांव्यतिरिक्त त्याचा फारसा अर्थ कोणी घेत नव्हते. यात एखाद्या नेत्याची, अभिनेत्याची वा घटनेची फिरकी घेतली गेली तरी, ही मंडळी राजकीय विचारसरणीने प्रेरित कधीच वाटली नाहीत. राजकीय बाजू घेतली म्हणजे ते चार लोकांना आवडणार तर दहांना नाही- म्हणजे त्यात प्रेक्षकांना दुखावणे आलेच जे चॅनेल्सना परवडण्यासारखे नसायचे, हेही कारण यामागे असावे.

पण नव्वदीच्या दशकात अमेरिकी पत्रकारितेला केबल न्यूज नावाच्या रोगाची लागण होऊ लागली. याची सुरुवात चॅनेल्सनी एका विशिष्ट विचारधारेच्या बातम्या देण्यापासून; तर परिणती त्या विचारधारेच्या जवळील राजकीय पक्षाशी संलग्नच असण्यात होऊ लागली. बातमी काय आहे यापेक्षा ती कशाची तयार व प्रदर्शित करायची याची चढाओढ सुरू झाली. याच सुमारास ‘कॉमेडी सेंट्रल’ या २४ तास विनोदाला वाहिलेल्या वाहिनीवरील ‘द डेली शो’चे सूत्रसंचालन तेव्हा फार प्रसिद्ध नसलेले जॉन स्टेव्हर्ट करू लागले. ही वाहिनी व हा कार्यक्रम याआधी उथळ पाण्याच्या खळखळाटाप्रमाणेच होता; पण जॉन स्टेव्हर्ट या अवलियाने काही वर्षांतच या कार्यक्रमाची रूपरेषा बदलण्यास सुरुवात केली. महत्त्वाचा बदल म्हणजे जॉन स्टेव्हर्ट यांचे खुमासदार राजकीय भाष्य. मग मात्र कार्यक्रमाने काही वर्षांत चांगलाच जोर धरला. बिल क्लिंटन यांच्या विरुद्धचा महाभियोग तसेच सन २००० मधील बुश वि. गोर यांची गाजलेली निवडणूक अशा अनेक घटना जॉन स्टेव्हर्टने आपल्या कार्यक्रमात बातमीसदृश दाखवून, त्यावर भाष्य करायला सुरुवात केली. हे करत असताना त्याने कधीच एका पक्षाची किंवा एका विचारसरणीची बाजू घेतली नाही. अर्थात त्याची लिबरल विचारशैली ही काही लपून राहण्यासारखी गोष्ट नव्हती.

मग हळूहळू इतर वाहिन्यांवरही, विनोदाची पेरणी केलेल्या अशाच बातम्यांचे कार्यक्रम लोकांना आवडू लागले. त्यात सन २००० पासूनची जॉर्ज बुश यांची कारकीर्द तर अशा अनेक कार्यक्रमांसाठी पर्वणीच ठरली. रोज रात्री समोर असलेल्या प्रेक्षकांपुढे येऊन सरकार वा सरकारी धोरणांवर घणाघाणी टीका करायची, तीही विनोदातून- हे खायचे काम नव्हे. दररोजच्या घडामोडींवर सातत्याने मजेशीर टीका करत त्या घटनेची उकल करायची- तेही कुणाच्या भावना ‘फार न दुखावता’ – अशी ही कसरत होती. हा जमाना इंटरनेटपूर्वीचा. अमेरिकेतील दूरचित्रवाणीवर अगदी तोपर्यंत काही निष्पक्षतेचे मापदंड (फेअरनेस डॉक्ट्रीन्स) पाळले जात. त्यानुसार जॉन स्टेव्हर्ट आपल्या कार्यक्रमात दोन्ही बाजूंची चांगली खरडपट्टी काढत. पाश्चिमात्य संस्कृतीत शिव्यांचे सोवळे आधीच कमी. त्यामुळे एखाद्या विनोदाच्या समेवर यायला एखादी हासडावीच लागली तरी चालत असे. अर्थात याचा कधी अतिरेक होत नव्हता.

‘सप्टेंबर ११’च्या अतिरेकी हल्ल्यानंतर झालेले कार्यक्रम अजरामर असेच म्हणावे लागतील. कोणी तरी म्हटले आहे की, शोकांतिकेत थोडा काळ मुरला की विनोद निर्मिती होऊ शकते. सप्टेंबर ११ नंतरच्या शोजना दु:खाची एक किनार होती, पण स्टेव्हर्ट आणि अन्य अनेकांनी साश्रू नयनांनी सादर केलेले स्वगत व तशात केलेली हळुवार विनोद निर्मिती हे कार्यक्रमांची उंची तर वाढवून गेलेच, पण या कार्यक्रमांना एक प्रकारची मान्यताही देऊन गेले.

खऱ्या व्यावसायिक कलाकाराचे यश हे त्याच्या प्रसिद्धी किंवा कमाईपेक्षा, त्याने आपल्यासारखे किती कलाकार तयार केले यावरून मोजावयास हवे. कार्सन, लेनो, लेटरमन वा स्टेव्हर्ट ही मंडळी आता पडद्याआड गेली आहेत. (कार्सन तर काळाच्यासुद्धा). पण त्यांचे कार्यक्रम त्यांच्यानंतरही अगदी जोमात सुरू आहेत. अर्थात याचे श्रेय फक्त व्यक्तिगत नसून त्यामागल्या लेखकांचेही आहे. पण स्टेव्हर्टच्या कार्यक्रमात सहकलाकार असलेले स्टीफन कोलबेर्ट, हसन मिन्हाज, जॉन ऑलिव्हर, ट्रेव्हर नोआ ही ‘टवाळांची’ टोळी आता आपापल्या शोंमधून मनोरंजनातून बातम्या देत असते, धुमाकूळ घालत असते. आज इंटरनेटमार्फत ही मंडळी जगभर प्रसिद्ध झाली आहे. एवढेच नव्हे तर अमेरिकेतील गेल्या दशकांतील राजकीय परिवर्तन हे जॉन स्टेव्हर्ट यांना पुन्हा तोच कार्यक्रम सुरू करायला भाग पाडते, विनोदवीर म्हणजे नुसता थिल्लर या समजाला फाटा देत स्टेव्हर्ट एक संघटना स्थापन करतात आणि सप्टेंबर ११ मधील हल्ल्यानंतर त्या जागेची सफाई करणाऱ्या लोकांच्या हक्कासाठी थेट अमेरिकी काँग्रेसपुढे जातात, हे कौतुकास्पदच होते.

नव्या पिढीतील कॉनन ओब्रायन, जिमी किमेल, जिमी फलॉन आणि ‘सॅटरडे नाइट लाइव्ह’ या कार्यक्रमातील अनेक मंडळी नित्यनेमाने विनोदी कार्यक्रम करताहेत. अमेरिकी लोकशाहीला सद्या परिस्थितीत असलेल्या चुकीच्या माहितीच्या धोक्यापासून हे विनोदवीर वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. करोना महामारीत ही सगळी मंडळी त्यांचे शोज् स्वत:च्या घरातून, कमीत कमी साधनांत, तरीही गुणवत्तेशी कुठेही तडजोड न करता पार पाडत.

अशा कार्यक्रमांना बातमीचा स्राोत समजायचे की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न. पण एखाद्या घटनेचा अर्थ लावायचा तर या कार्यक्रमांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. अशा कार्यक्रमांच्या यशामागे समाजाची प्रगल्भ राजकीय विनोदबुद्धी व राजकारण्यांची प्रसंगी वाईट विनोदालासुद्धा हसून दाद देण्याची मानसिकता, यांचेही श्रेय आहेच. एवढ्या-तेवढ्याने भावना दुखावल्या जात नाहीत, राजकीय नेत्यांना देवघरात बसवण्याऐवजी त्यांचे मूल्यमापन करण्याकडे जनतेचा कल असतो, ही परिस्थिती अमेरिकेतही झपाट्याने बदलत चालली आहे. काहींना व्यवस्थेचा त्रास झाला, त्यापैकी काहींनी वाहिन्यांऐवजी ओटीटीवर कार्यक्रम सुरू केला.

महाराष्ट्रात जेव्हा विनोदाने वातावरण तंग होते तेव्हा वॉशिंग्टनमध्ये, जॉन. एफ. केनेडी सेंटरतर्फे देण्यात येणाऱ्या ‘मार्क ट्वेन विनोद- पुरस्कारा’चा सोहळा रंगत होता. याच सेंटरच्या कार्यकारिणीच्या काही सदस्यांना अति-डाव्या विचारसरणीचे म्हणून नुकताच सत्ताधाऱ्यांकडून नारळ दिला गेला असून राष्ट्राध्यक्ष हेच त्या कार्यकारिणीचे अध्यक्ष असणार आहेत. या सावटाखाली झालेल्या यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात प्रत्येक विनोदवीराने अमेरिकेच्या अध्यक्षांवर भरपूर तोंडसुख घेतले. डेव्हिड लेटरमन यांनी या कार्यक्रमाला ‘प्रतिकाराचा आतापर्यंतचा सगळ्यात मनोरंजक मेळावा’ असे म्हटले; कारण कार्यक्रमातील प्रत्येक विनोद सभ्य नसेलही, पण बोचणारा होता. याच सोहळ्यातल्या एका प्रहसनात स्टीफन कोलबेर्ट चिकन-विंग्स खात स्टेजवर आला. कॅमेऱ्याकडे पाहत म्हणाला, ‘मित्रहो, जॉन एफ केनेडी सेंटरच्या नवीन अध्यक्षांना मी सांगू इच्छितो की मी खात असलेल्या सगळ्या विंग्स या ‘राइट विंग्स’ असून त्यातील दोन-तीन अतिशय जहाल आहेत!’
सलील जोशी

बॉस्टनस्थित महाराष्ट्रीय

salilsudhirjoshi@gmail.com



Source link

महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनात अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांचा ऐतिहासिक सहभाग

0
महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनात अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांचा ऐतिहासिक सहभाग

बोधगया | प्रतिनिधी –बोधगया येथे सुरू असलेल्या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनात आता एक नवा ऐतिहासिक टप्पा गाठला गेला आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आंदोलनात प्रत्यक्ष सहभाग घेत स्वतः दिलेले वचन पाळले आहे.

१२ फेब्रुवारी २०२५ पासून सुरू असलेले हे आंदोलन महाबोधी महाविहाराचे सर्वस्वी नियंत्रण बौद्ध समाजाकडे सोपवावे, तसेच बोधगया मंदिर कायदा १९४९ रद्द करण्यात यावा, या दोन मुख्य मागण्यांसाठी सुरू आहे. बौद्ध भिक्षूंच्या नेतृत्वाखालील हे बेमुदत उपोषण सध्या देशभरात चर्चेचा विषय बनले आहे.

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीमुळे आंदोलनाला नवसंजीवनी मिळाली आहे. याआधी त्यांनी आंदोलनात सहभागी होण्याचे वचन दिले होते, जे त्यांनी आज पाळले. आंदोलनस्थळी त्यांचे आगमन होताच उपोषणकर्त्यांमध्ये उत्साहाची लाट उसळली.

या आंदोलनाला देशभरातूनच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरूनही मोठा पाठिंबा मिळत आहे. वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने देशभरात स्वाक्षरी मोहिमा सुरू आहेत. हजारो नागरिकांनी या मोहिमांमध्ये सहभाग घेत आंदोलनाला समर्थन दिले आहे.

बोधगया हे बुद्धांच्या ज्ञानप्राप्तीचे पवित्र स्थळ असून देखील, महाबोधी महाविहाराचे नियंत्रण बौद्ध नसलेल्या व्यक्तींच्या हातात असल्याचा आरोप आंदोलनकर्ते करीत आहेत. त्यामुळे, “धम्म भूमीवर बौद्धांचेच अधिपत्य हवे,” असा जोरदार आवाज आता देशभरातून उठू लागला आहे.


मुख्य मुद्दे:

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचा आंदोलनस्थळी थेट सहभाग

बोधगया मंदिर कायदा १९४९ रद्द करण्याची मागणी

आंदोलनाला देश-विदेशातून मोठा पाठिंबा

वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभा यांच्या स्वाक्षरी मोहिमा

तंत्रज्ञानाच्या युगात दक्षता हवीच! — डॉ. बाबासाहेब आंबेडकर IIT फलटणकडून 24 वर्षांपासून विद्यार्थ्यांसाठी प्रमाणित प्रशिक्षण”

0
तंत्रज्ञानाच्या युगात दक्षता हवीच! — डॉ. बाबासाहेब आंबेडकर IIT फलटणकडून 24 वर्षांपासून विद्यार्थ्यांसाठी प्रमाणित प्रशिक्षण”

फलटण :- आजच्या डिजिटल युगात तंत्रज्ञान आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. त्यामुळेच तरुण पिढीने आणि पालकांनीही या तंत्रज्ञानाचा वापर योग्य दिशेने – म्हणजे ज्ञान आणि करिअर घडवण्यासाठी – करणे आवश्यक आहे. यासाठी जेव्हा आपण संगणक कोर्सेस जसे की MS-CIT किंवा Tally सारखे कोर्स करत असतो, तेव्हा त्या कोर्ससाठीची संस्था शासनमान्य आहे की नाही हे तपासणे खूपच गरजेचे ठरते.

MS-CIT च्या अधिकृत सेंटरची माहिती आपण MKCL च्या www.mkcl.org/mscit या वेबसाईटवर ‘Find Center’ मध्ये जाऊन तपासू शकतो. तिथे महाराष्ट्रातील सर्व अधिकृत ALC (Authorised Learning Center) ची यादी मिळते. मात्र अनेक पालक व विद्यार्थी याबाबत अनभिज्ञ असतात, याचा गैरफायदा काही अनधिकृत संस्था घेतात व फसवणूक करतात.

तसेच Tally कोर्ससाठी देखील www.tallyeducation.com या वेबसाईटवर जाऊन ‘Learning Centers’ मध्ये मान्यताप्राप्त संस्थांची यादी पाहता येते.

फलटणमध्ये गेली २४ वर्षे कार्यरत असलेली ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर IIT’ ही संस्था MS-CIT आणि Tally साठी शासनमान्य व प्रमाणित प्रशिक्षण केंद्र आहे. संस्थेच्या संचालिका सौ. मनीषा शेखर कांबळे (MBA, M.Com) यांच्या नेतृत्वाखाली या संस्थेने आजपर्यंत २५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करून नोकरी आणि व्यवसायासाठी तयार केलं आहे.

केवळ शिकवणच नव्हे तर सामाजिक भान आणि राष्ट्रीय मूल्ये निर्माण करण्यासाठी संस्थेने १० एप्रिलपासून १५०० हून अधिक विद्यार्थ्यांसाठी महापुरुषांवर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धा घेतली. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम राबवले गेले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर IIT ही संस्था इच्छुकांना नवी मान्यता घेण्यासाठी देखील मार्गदर्शन करते. आपल्या पाल्याच्या भविष्यासाठी योग्य, अधिकृत आणि गुणवत्ता असलेली संस्था निवडणं ही काळाची गरज आहे.


Contact for Admission/Information:
डॉ. बाबासाहेब आंबेडकर IIT, फलटण
संचालिका – सौ. मनीषा शेखर कांबळे (MBA, M.Com)

दुष्काळी वाखरीच्या सुपुत्रीचा जागतिक झळाळीत डंका! आंतरराष्ट्रीय हॉकीपटू अक्षता ढेकळे यांना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार

0
दुष्काळी वाखरीच्या सुपुत्रीचा जागतिक झळाळीत डंका! आंतरराष्ट्रीय हॉकीपटू अक्षता ढेकळे यांना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार

फलटण (प्रतिनिधी): दुष्काळी पट्ट्यातील वाखरी (ता. फलटण) या छोट्याशा गावात शेतकरी कुटुंबात जन्मलेली आणि अल्पावधीतच आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय महिला हॉकीमध्ये ठसा उमटवणारी कु. अक्षता आबासाहेब ढेकळे हिला महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून राज्यातील सर्वोच्च शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर झाला आहे.

या पुरस्काराचे वितरण शुक्रवार, दिनांक 18 एप्रिल 2025 रोजी पुण्यातील बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे सोहळ्याद्वारे होणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप 3 लाख रुपये रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ असे आहे.

30 वर्षांनंतर हॉकी खेळाला मिळालेला सन्मान!
सुमारे 30 वर्षांनंतर हॉकीसारख्या खेळाला हा बहुमान मिळाला असून, अक्षता ढेकळे ही अशा प्रकारे शिवछत्रपती पुरस्कार मिळवणारी गुणी खेळाडू ठरली आहे.

अंतरराष्ट्रीय चमक:
अक्षता हिने साउथ अमेरिका, नेदरलँड्स, बेल्जियम, इंग्लंड, स्पेन, ओमान, दक्षिण आफ्रिका आणि फ्रान्स यासारख्या देशांत झालेल्या 9 आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. ती एशिया कप सुवर्ण पदक विजेता, वर्ल्ड कप रजत पदक विजेता, राष्ट्रीय सुवर्ण पदक विजेता असून, तिने आतापर्यंत 9 आंतरराष्ट्रीय, 24 राष्ट्रीय व 13 राज्यस्तरीय पदके पटकावली आहेत.

एकाच वर्षी सीनियर व जूनियर वर्ल्ड कप खेळणारी पहिली महिला!
अक्षता ही एकाच वर्षी सीनियर व जूनियर वर्ल्ड कपमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारी पहिली महिला हॉकीपटू ठरली आहे. तिने सर्वात कमी वयात भारतीय सीनियर महिला संघातून वर्ल्ड कप खेळण्याचा मान मिळवला आहे.

या पुरस्काराबद्दल अक्षता हिचे सर्वत्र अभिनंदन होत असून, तिच्या यशामुळे फलटण वाखरीसह संपूर्ण महाराष्ट्राचे नाव उज्वल झाले आहे.

साहस टाइम्सकडून अक्षता ढेकळे हिला मनःपूर्वक शुभेच्छा आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!

फलटण-कोरेगावसह पाच तालुक्यांच्या पाणीप्रश्नांवर मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक — तातडीने निर्णय घेण्याचे आदेश

0
फलटण-कोरेगावसह पाच तालुक्यांच्या पाणीप्रश्नांवर मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक — तातडीने निर्णय घेण्याचे आदेश

मुंबई | १६ एप्रिल २०२५.  :-  आज मंत्रालय, मुंबई येथे जलसंपदा मंत्री मा. ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली फलटण-कोरेगाव मतदारसंघातील दीर्घकाळ प्रलंबित पाणी प्रश्नावर महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मागणीनुसार ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत फलटण, कोरेगाव, माळशिरस, सांगोला आणि माण या पाच तालुक्यांतील विविध जलप्रकल्प आणि जलवाटप संदर्भात निर्णय घेण्यात आले.

बैठकीतील महत्त्वाचे निर्णय :

  1. कोरेगाव तालुक्यातील २६ गावांच्या पाणीप्रश्नी तोडगा – ५२ टीएमसी फेर जलनियोजनातून लाभ मिळवण्यासाठी आराखडा तयार करून मंजुरीसाठी सादर करण्याचे आदेश.
  2. नीरा देवघर उजव्या कालव्याद्वारे धोम बलकवडीला पाणीपुरवठा – उपसा सिंचन योजना वाघोशी येथे सुरू करण्याचे आदेश.
  3. माळशिरसच्या १६ नवसमाविष्ट गावांना पाणीपुरवठा – चार महिन्यात प्रक्रिया पूर्ण करून निविदा काढण्याचे आश्वासन.
  4. सांगोला तालुक्यास मंजूर पाणी वाटपाचा मार्ग मोकळा.
  5. सोळशी प्रकल्पाचा DPR दोन महिन्यांत मंत्रिमंडळ मंजुरीसाठी.
  6. धोम बलकवडी कालव्याच्या १२८-१४७ किमी भागातील वितरण नलिकांसाठी निधी लवकर उपलब्ध.
  7. कृष्णा नदीचे पुराचे पाणी वळवण्यासाठी आशियाई बँकेच्या सहकार्याने प्रस्तावित योजनेचा DPR सादर करण्याचे आदेश.
  8. शिवथर घळ येथून वाया जाणारे पाणी नीरा खोऱ्यात वळवण्यासाठी आराखडा तयार.

या बैठकीला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार सचिन पाटील, आमदार बाबासाहेब देशमुख, माजी आमदार शहाजीबापू पाटील, डॉ. दिलीपराव येळगावकर, राम सातपुते यांच्यासह विविध पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

सुवर्ण रोख्यांमधून आठ वर्षांत २११ टक्के परतावा

0
सुवर्ण रोख्यांमधून आठ वर्षांत २११ टक्के परतावा


मुंबई : केंद्र सरकारच्या सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेत १६ ऑक्टोबर २०१७ मध्ये गुंतविलेल्या रोख्यांचे मुदतपूर्व विमोचन (रिडम्प्शन) करायचे झाल्यास, रिझर्व्ह बँकेने ९,२२१ रुपये प्रतिग्रॅम असा दर निश्चित केल्याचे रविवारी जाहीर केले. आठ वर्षांपूर्वी रोख्यांच्या खरेदी किमतीच्या तुलनेत हा दर २११.१ टक्के अधिक आहे.

सुवर्ण रोख्यांचा विमोचन दर हा सरलेल्या ९ एप्रिल ते १५ एप्रिल २०२५ या दिवसाअंती बंद झालेल्या सोन्याच्या किमतीच्या सरासरीच्या आधारावर निश्चित केला गेला आहे. भारतीयांमधील धातूरूपी सोन्याचे आकर्षण पाहता त्याला पर्याय या रूपाने आणि सोन्याच्या आयातीवर खर्च होणाऱ्या परदेशी चलनात कपात व्हावी, या उद्देशाने १४ जानेवारी २०१६ रोजी सार्वभौम सुवर्ण रोखे योजना सुरू करण्यात आली होती. आठ वर्षांपूर्वी २,९६४ रुपये प्रतिग्रॅमप्रमाणे सुवर्ण रोख्यांची विक्री झाली होती. त्या तुलनेत विमोचनासाठी निर्धारित ९,२२१ रुपये प्रतिग्रॅम हा दर २११.१ टक्के परतावा मिळवून देणारा आहे. या रोख्यांचा मुदत कालावधी हा आठ वर्षांचा आहे. सध्या जागतिक पातळीवर वाढलेले सोन्याचे दर आणि वाढत्या अस्थिरतेमुळे केंद्र सरकारने सार्वभौम सुवर्ण रोखे योजना थांबवली आहे.

२०१७ मधील खरेदी किंमत – २,९६४ रुपये प्रतिग्रॅम

विमोचन किंमत (एप्रिल २०२५) ९,२२१ रुपये प्रतिग्रॅम

प्रतिग्रॅम नफा – ६,२५७ रुपये

एकूण परतावा (%) – २११.१





Source link

अस्थिरतेच्या छायेत ‘सेन्सेक्स’ची ३०० अंशांची कमाई

0
अस्थिरतेच्या छायेत ‘सेन्सेक्स’ची ३०० अंशांची कमाई


मुंबई : परदेशी निधीचे पुनरागमन आणि बँकांच्या समभागांमधील तेजीने प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी बुधवारी सलग तिसऱ्या सत्रात वधारले. किरकोळ किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ महागाई दर सहा वर्षांच्या नीचांकी पातळीवर पोहोचल्याने रेपोदरात आणखी कपात होण्याची आशा निर्माण झाली.

जागतिक बाजारातील कमकुवत कलाकडे दुर्लक्षून देशांतर्गत आघाडीवर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ३०९.४० अंशांनी वधारून ७७,०४४.२९ या दोन आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर स्थिरावला. कमकुवत सुरुवातीनंतर, सेन्सेक्सने ७७,११०.२३ अंशांची उच्चांकी, तर ७६,५४३.७७ ही सत्रातील नीचांकी पातळीला स्पर्श केला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये १०८.६५ अंशांची भर पडली आणि तो २३,४३७.२० पातळीवर बंद झाला.

अर्थव्यवस्थेविषयक सकारात्मक आकडेवारी आणि सामान्य मान्सूनच्या अंदाजामुळे गुंतवणूकदारांमध्ये आगामी काळाबद्दल आशावाद दिसून आला, असे विश्लेषकांनी सांगितले.

जागतिक स्तरावर, अतिरिक्त व्यापार शुल्काच्या दबावामुळे तणाव वाढला आहे. अमेरिका आणि चीनमधील तीव्र होत चाललेले व्यापार युद्ध भारताला नुकसान पोहोचवेल असे नाही तर त्याचा फायदा होईल. परिणामी, बुधवारच्या सत्रात भारतीय भांडवली बाजारात सौम्य सकारात्मक भावना दिसून आली. शिवाय मार्चमध्ये किरकोळ महागाई दर ६ वर्षांच्या नीचांकी पातळीवर पोहोचल्याने नजीकच्या काळात आणखी दर कपातीचे संकेत मिळत आहेत, असे निरीक्षण जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.

सेन्सेक्समध्ये इंडसइंड बँकेचा समभाग ७.१२ टक्क्यांनी वधारला. त्यापाठोपाठ ॲक्सिस बँक, अदानी पोर्ट्स, एशियन पेंट्स, एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, स्टेट बँक आणि आयटीसी यांचे समभाग सर्वाधिक तेजीत होते. तर मारुती, इन्फोसिस, टाटा मोटर्स, लार्सन अँड टुब्रो, एनटीपीसी आणि बजाज फायनान्सच्या समभागात सर्वाधिक घसरण झाली.

सेन्सेक्स ७७,०४४.२९ ३०९.४० ( ०.४०%)

निफ्टी २३,४३७.२० १०८.६५ ( ०.४७%)

तेल ६५.२२ ०.९१

डॉलर ८५.६८ -१२ पैसे



Source link

कल्याणमधील संत सावळा माळी भाजी मंडईत लग्नाचा हाॅल, ३०१ भाजी ओट्यांचे व्यापारी गाळ्यांमध्ये रुपांतर

0
कल्याणमधील संत सावळा माळी भाजी मंडईत लग्नाचा हाॅल, ३०१ भाजी ओट्यांचे व्यापारी गाळ्यांमध्ये रुपांतर



Wedding hall at Sant savala mali vegetable market in Kalyan 301 vegetable stalls converted into trading stalls || कल्याणमधील संत सावळा माळी भाजी मंडईत लग्नाचा हाॅल, ३०१ भाजी ओट्यांचे व्यापारी गाळ्यांमध्ये रुपांतर





Source link

चीनसोबतची व्यापारी तूट ९९.२ अब्ज डॉलरवर, केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाची आकडेवारी; अमेरिका सर्वांत मोठा व्यापारी भागीदार

0
चीनसोबतची व्यापारी तूट ९९.२ अब्ज डॉलरवर, केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाची आकडेवारी; अमेरिका सर्वांत मोठा व्यापारी भागीदार



india s Trade deficit with China at 99 2 billion dollars America is largest trading partner of india चीनसोबतची व्यापारी तूट ९९.२ अब्ज डॉलरवर, केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाची आकडेवारी; अमेरिका सर्वांत मोठा व्यापारी भागीदार





Source link