


Karnataka Governor on Muslim Reservation Bill : कर्नाटकमधील सरकारी कंत्राटांमध्ये मुस्लिमांना आरक्षण मिळणार की नाही हे आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ठरवतील. राज्य सरकारने हे विधेयक पारित करून राज्यपालांकडे पाठवलं होतं. मात्र या विधेयकाचा चेंडू राज्यपालांनी राष्ट्रपतींच्या कोर्टात टाकला आहे. नुकत्याच झालेल्या कर्नाटकच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यातील सिद्धरामय्या सरकारने हे विधेयक पारित केलं होतं.
या विधेयकात कर्नाटक सरकारने विविध सरकारी विभाग, संस्था आणि संस्थांतर्गत येणाऱ्या सर्व सार्वजनिक कामांच्या कंत्राटांपैकी चार टक्के आरक्षण श्रेणी-२ ब अंतर्गत मुस्लीम समुदायासाठी दिलं आहे. २ कोटींपर्यंतचे सरकारी कंत्राट आणि १ कोटीपर्यंतच्या वस्तू व सेवा खरेदी कंत्राटांमध्ये हे आरक्षण असणार आहे.
कर्नाटक सरकारने दिलेल्या या आरक्षणाला विरोधी पक्ष भाजपाने जोरदार विरोध केला आहे. तसेच यावर राज्यपालदेखील कर्नाटक सरकारशी असहमत आहेत. म्हणूनच त्यांनी याबाबतचा निर्णय घेण्यासाठी विधेयक राष्ट्रपतींकडे पाठवलं आहे.
कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गहलोत म्हणाले, “आपलं संविधान धर्माच्या आधारावर आरक्षण देण्यास परवानगी देत नाही.” यापूर्वी कर्नाटकमधील विरोधी पक्षांनी, म्हणजेच भारतीय जनता पार्टी व जनता दलाने (सेक्युलर) राज्यपालांना याप्रकरणी निवेदन देऊन त्यांचा विरोध स्पष्ट केला होता. तसेच हे विधेयक असंवैधानिक असल्याचं म्हटलं होतं. या विधेयकामुळे समाजाचे ध्रुवीकरण होईल, अशी भितीदेखील भाजपा व जेडीएसने व्यक्त केली होती. आता या प्रकरणी राष्ट्रपती निर्णय घेतील.
कर्नाटकच्या विधानसभेने गेल्या महिन्यात हे विधेयक मंजूर केलं. दुसऱ्या बाजूला कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी त्यांच्या सरकारने पारित केलेल्या विधेयकाचं समर्थन केलं आहे. “आम्ही अशा प्रकारचं आरक्षण का देऊ नये असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे. आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागे राहिलेल्या लोकांना सरकारने सक्षम का करू नये? आमच्या पक्षाचं तेच धोरण आहे. त्यांना सक्षम करण्यास आम्ही वचनबद्ध आहोत. ज्यांना नेहमीच संधीपासून वंचित ठेवलंय, ज्यांना न्याय मिळालेला नाही त्यांच्या पाठिशी आम्ही उभे आहोत.”
“एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर आरोप केला आहे की त्यांनी मुस्लिमांसाठी आजवर काहीच केलं नाही. त्याचवेळी भाजपा काँग्रेसच्या या प्रयत्नांना विरोध करत आहे”, अशा शब्दांत कर्नाटक काँग्रेसने भाजपावर टीका केली आहे.


Pune News Today: कुटुंबियांपासून लपवून केलेली थायलंड ट्रीप 51 वर्षीय पुणेकराला भलतीच महाग पडली आहे.
Source link

समाजशास्त्र हा वैकल्पिक विषय असेल तर काय प्रश्न विचारले जाऊ शकतात ते पाहूया. समाजशास्त्र म्हणजे नक्की काय? किंवा समाजशास्त्र या विषयात कोणता अभ्यास केला जातो हे सोप्या शब्दात सांगा. या प्रश्नाच उत्तर नेमकं आणि खरोखरच सोप्या पद्धतीने देता आलं पाहिजे. यालाच जोडून, मानसशास्त्र आणि समाजशास्त्र किंवा सामाजिक मानसशास्त्र आणि समाजशात्र यात काय फरक आहे? समाजशास्त्र आणि मानववंशशास्त्र यात काय फरक आहे? उमेदवाराचं ग्रॅज्युएशन समजा इंजिनीअरिंग असेल तर प्रश्न विचारू शकतात की तुम्ही इंजिनीअर आहात मग समाजशास्त्र हा वैकल्पिक विषय का घेतला? बरेच उमेदवार घेतात म्हणून तुम्ही पण हा विषय घेतला का? समाजशास्त्र या विषयाचा तुम्ही प्रशासनात कसा उपयोग कराल? महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या समाजशास्त्रज्ञांबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? तुम्हाला कुठच्या समाजशास्त्रज्ञांचे विचार सध्याच्या काळात योग्य वाटतात? समाजशास्त्रज्ञ डकहाइम, मार्गारेट मिड, एम. इन. श्रीनिवास, जी. एस. घुर्य्ये, इरावती कर्वे, डी. एन. धनागरे यांच्या कार्याविषयी तुम्हाला काय माहिती आहे? भारतीय समाजापुढे सध्या कोणते महत्त्वाचे प्रश्न आहेत? तुमच्या राज्यातील/ जिल्ह्यातले महत्त्वाचे तीन सामाजिक प्रश्न/समस्या काय आहेत? महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणा चळवळीत सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतीबा फुले, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराज यांचे कोणते योगदान आहे? पूर्वांचल मधल्या राज्यांमध्ये महिलांचे सामाजिक स्थान वेगळे आणि महत्त्वाचे का आहे? देशाच्या इतर भागांशी याची तुलना कशी करता येईल? कास्ट आणि क्लॅन यात काय फरक आहे? ट्रान्सजेंडर्स ना समाजाच्या मुख्य धारेत कसे आणता येईल? भारतीय संविधानाच्या कलम २१ अन्वये प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा हक्क हा शैक्षणिक हक्कही आहे तर मग बालकामगारांची सुटका करून त्यांना शिक्षित करण्यासाठी काय प्रयत्न कराल? दुर्गम भागात जिल्हाधिकारी म्हणून काम करत असताना तुमच्या समाजशास्त्र विषयाच्या ज्ञानाचा कसा वापर कराल?
या प्रश्नांकडे पाहता लक्षात येईल की यात थिअरीवरचे प्रश्न फारसे नाहीत. बहुतेक प्रश्न हे उपयोजित स्वरूपाचे आहेत. या प्रश्नांचा संबंध प्रशासनाशी आहे, चालू घडामोडींशी आहे, सामाजिक समस्यांशी पण आहे. त्यामुळे तयारी करताना या सर्व बाजूंचे भान ठेवून केली पाहिजे.
मानववंशशास्त्र हा आणखी एक उमेदवारांमध्ये लोकप्रिय असणारा वैकल्पिक विषय आहे. यातही मानववंशशास्त्र म्हणजे नक्की काय हा हमखास विचारला जाणारा प्रश्न आहे. मानववंशशास्त्र आणि समाजशास्त्र यात नेमका कोणता फरक आहे? मानववंशशास्त्राच्या महत्वाच्या शाखा कोणत्या आहेत? मानववंशशास्त्रात वापरल्या जाणाऱ्या संशोधन पद्धती कोणत्या आहेत? त्यातली तुमच्या मते सर्वात योग्य पद्धत कुठची? तुम्ही प्रशासकीय कामात मानववंशशास्त्राच्या अभ्यासाचा कसा उपयोग कराल? कल्चरल रिलेटिव्हिझम ही संकल्पना तुम्हाला माहिती आहे का? या संकल्पनेबद्दल सोप्या शब्दात तुम्ही काय सांगू शकाल? किनशिप म्हणजे काय? वेगवेगळ्या संस्कृतीत ती वेगळी कशी असते? सध्याच्या ज्वलंत समस्यांपैकी कुठच्या समस्या मानववंशशास्त्राच्या आधारे सोडवणे शक्य आहे? हवामान बदलाशी सामना करण्यासाठी मानववंशशास्त्राचा उपयोग कसा होऊ शकतो? भारतातल्या आदिवासी समाजापुढे सध्या कुठचे प्रश्न आहेत? आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणणं योग्य आहे का? त्यांना जर आपण पूर्णत: मुख्य प्रवाहात आणले तर त्यांची मूळ संस्कृती नष्ट होण्याची भीती नाही का? डार्विनच्या उत्क्रांती वादाच्या सिद्धान्ताविषयी आपल्याला काय माहिती आहे? युवल नोहा हारारी यांचे सेपियन्स हे पुस्तक वाचले आहे का? भारतातील वेगवेगळ्या राज्यात कोणत्या वंशाचे लोक आहेत? अंदमान निकोबार बेटांवर असलेल्या जरावा आणि सेंटीनेल या आदिम आदिवासी समूहावर कोणत्या मानववंश शास्त्रज्ञाने काम केले आहे? गुजरात आणि कर्नाटक राज्यात असलेल्या सिद्दी आदिवासी समूहाविषयी आपणास काय माहिती आहे? तुमच्या राज्यात कोणते आदिम आदिवासी आहेत आणि त्यांची संस्कृती, चालीरीती याची आपणास प्रत्यक्ष माहिती आहे का? आदिम आदिवासी प्रवण राज्यात काम करताना आपल्या मानववंशशास्त्र या विषयाच्या ज्ञानाचा प्रत्यक्ष त्या समूहाच्या भल्यासाठी कसा वापर कराल?
हे सगळेच प्रश्न हे नमुना म्हणून दिलेले आहेत. प्रत्यक्ष मुलाखतीत हेच प्रश्न विचारले जातील असा आमचा मुळीच दावा नाही. काही महत्वाच्या वैकल्पिक विषयांचे प्रश्न सविस्तर लिहिण्याचे एक कारण हे आहे की वरील समाजशास्त्र आणि मानववंशशास्त्र हे वैकल्पिक विषय सातत्याने त्यात चांगले गुण मिळत असल्याने बरेच विद्यार्थी घेतात आणि त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्त्व चाचणीच्या तयारीसाठी याचा उपयोग होऊ शकतो.
या पुढच्या लेखात आपण इतर काही वैकल्पिक विषयांवरचे प्रश्न बघू. त्यानंतर आपण वेगवेगळे छंद, आवडीनिवडी याबद्दलचे प्रश्न बघू. २०२४ च्या नागरी सेवा परीक्षेच्या व्यक्तिमत्त्व चाचण्या आज १७ एप्रिल २०२५ रोजी संपणार आहेत. यावर्षी विचारल्या गेलेल्या प्रश्नांचा बराचसा अंदाज आला आहे.
या आधारे या सदरात आम्ही मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत आहोत. २०२४ च्या नागरी सेवा परीक्षेच्या अंतिम निकालासाठी उमेदवारांना मन:पूर्वक शुभेच्छा
mmbips@gmail. com
supsdk@gmail. com

महाराष्ट्र राज्य विद्याुत पारेषण कंपनी मर्यादित ( MAHATRANSCO) (महाराष्ट्र सरकारची संपूर्ण मालकीची संस्था). असिस्टंट इंजिनीअर (सिव्हील)च्या एकूण १३४ पदांची भरती. ( Employment Advertisement No. १८/२०२४, dt. ०४.०३.२०२५) पदाचे नाव – असिस्टंट इंजिनीअर (सिव्हील) – १३४ पदे (अजा – २०, अज – ७, विजा-अ – २, भज-ब – ३, भज-क – ५, भज-ड – ३, विमाप्र – २, इमाव – २८, एसईबीबी – १४, ईडब्ल्यूएस – १४, खुला – ३६) (५ पदे दिव्यांग साठी राखीव) (२ पदे अनाथ उमेदवारांसाठी राखीव) (महिलांसाठी ४१ पदे राखीव, खेळाडूंसाठी ६ पदे राखीव).
वेतन श्रेणी – रु. ५८,५६० ते १,४२,०५०, अंदाजे दरमहा वेतन रु. १,०७,५९६/-.
पात्रता – (दि. ३ एप्रिल २०२५ रोजी) बी.ई./बी.टेक. (सिव्हील इंजिनीअरिंग).
वयोमर्यादा – (दि. ३ एप्रिल २०२५ रोजी) १८ ते ३८ वर्षे;
निवड पद्धती – अर्ज यशस्वीरित्या सादर केलेल्या सर्व उमेदवारांना वस्तुनिष्ठ स्वरूपाची (ऑब्जेक्टिव्ह टाईप) ऑनलाइन परीक्षा द्यावी लागेल.
यात पदासाठी आवश्यक असलेल्या शैक्षणिक अर्हता व सामान्य अभियोग्यता चाचणी ( General Aptitude) घेतली जाईल.
(१) प्रोफेशनल नॉलेज टेस्ट – ५० प्रश्न, ११० गुण.
(२) सामान्य अभियोग्यता – (अ) तर्कशास्त्र (रिझनिंग) ४० प्रश्न, २० गुण.
(ब) संख्यात्मक अभियोग्यता (क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड) २० प्रश्न, १० गुण.
(क) मराठी भाषा – २० प्रश्न, १० गुण. एकूण १३० प्रश्न आणि एकूण गुण १५०, एकत्रित कालावधी – १२० मिनिटे. चुकीच्या उत्तरासाठी प्रश्नास असलेल्या गुणांच्या १/४ गुण वजा केले जातील. अंतिम गुणवत्ता यादी तयार करण्याकरिता ऑनलाइन परीक्षेतील १५० गुणांपैकी मिळालेल्या गुणांचे १०० गुणांत रूपांतरण केले जाईल.
ऑनलाइन अर्जात उमेदवारास ज्या परिमंडळा अंतर्गत पदस्थापना हवी आहे, त्या परिमंडळाची निवड करावी.
ऑनलाइन परीक्षा अंदाजे मे/जून २०२५ मध्ये घेतली जाईल.
परीक्षा केंद्र – अहिल्या नगर, अमरावती, छ. संभाजी नगर, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सांगली, सातारा व सोलापूर. उमेदवारांनी प्राधान्यक्रमाने ३ परीक्षा केंद्रांची नावे ऑनलाइन अर्जात नमूद करावीत. ऑनलाइन अर्ज भरण्याविषयी सूचना MAHTRANSCO च्या वेबसाईटवर दि. १२ एप्रिल २०२५ रोजी जाहीर झालेल्या नोटिफिकेशनमध्ये दिलेल्या आहेत. ऑनलाइन अर्ज https:// ibpsonline. ibps. in/ msetclmarsv/ या लिंकमधून दि. १२ एप्रिल २०२५ ते २ मे २०२५ पर्यंत करावेत.

राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन निगम लिमिटेड ( NCRTC) ऑपरेशन्स आणि मेंटेनन्स स्टाफची थेट भरती. एकूण रिक्त पदे – ७२.
(१) ज्यु. इंजिनीअर (इलेक्ट्रिकल) १६ (अजा – २, अज – १, इमाव – ४, ईडब्ल्यूएस – १, खुला – ८).
(२) ज्यु. इंजिनीअर (इलेक्ट्रॉनिक्स) १६ (अजा – २, अज – १, इमाव – ४, ईडब्ल्यूएस – १, खुला – ८).
(३) ज्यु. इंजिनीअर (मेकॅनिकल) ३ (खुला).
(४) ज्यु. इंजिनीअर (सिव्हील) १ (खुला).
पद क्र. १ ते ४ साठी पात्रता – संबंधित विषयाजील किंवा अलाईड इंजिनीअरिंग डिप्लोमा.
(५) प्रोग्रामिंग असोसिएट – ४ (इमाव – १, खुला – ३).
पात्रता – कॉम्प्युटर सायन्स/आयटी इंजिनीअरिंग डिप्लोमा किंवा बीसीए किंवा बी.एससी. (कॉम्प्युटर सायन्स/आयटी).
(६) असिस्टंट (एचआर) – ३ (खुला) (१ पद दिव्यांग कॅटेगरी B/ LV साठी राखीव).
पात्रता – बीबीए/बीबीएम पदवी.
(७) असिस्टंट (कॉर्पोरेट हॉस्पिटॅलिटी) १ (खुला).
पात्रता – हॉटेल मॅनेजमेंट पदवी.
(८) ज्यु. मेंटेनर (इलेक्ट्रिकल) १८ (अजा – २, अज – १, इमाव – ४, ईडब्ल्यूएस – १, खुला – १०).
पात्रता – इलेक्ट्रिशियन ट्रेड किंवा समतूल्य आयटीआय ( NCVT/ SCVT) सर्टिफिकेट.
(९) ज्यु. मेंटेनर (मेकॅनिकल) १० (अजा – १, इमाव – २, ईडब्ल्यूएस – १, खुला – ६).
पात्रता – फिटर ट्रेड किंवा समतूल्य आयटीआय ( NCVT/ SCVT) सर्टिफिकेट.
वयोमर्यादा – सर्व पदांसाठी २५ वर्षे (इमाव – २८ वर्षे, अजा/अज – ३० वर्षे, दिव्यांग – ३५/३८/४० वर्षे).
वेतन श्रेणी – पद क्र. १ ते ५ – NE५ (रु. २२,८००/-); पद क्र. ६ व ७ – NE४ (रु. २०,२५०/-); पद क्र. ८ व ९ – NE३ (रु. १८,२५०/-). याव्यतिरिक्त व्हेरिएबल डीए, एचआरए आणि इतर भत्ते दिले जातील.
निवड पद्धती – कॉम्प्युटर बेस्ड् टेस्ट ( CBT) आणि इंडियन रेल्वे मेडिकल मॅन्युअलप्रमाणे मेडिकल फिटनेस टेस्ट.
CBT चा अभ्यासक्रम NCRTC च्या वेबसाईटवर प्रसिद्ध केला जाईल.
CBT हिंदी किंवा इंग्रजी भाषेतून देता येईल. उइळ मध्ये १०० प्रश्न, प्रत्येकी १ गुण, एकूण १०० गुण, वेळ ९० मिनिटे. चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केले जाणार नाहीत.
परीक्षा केंद्र – मुंबई, अहमदाबाद, भोपाळ, हैद्राबाद, बेंगलुरू, एनसीआर दिल्ली इ.
प्रोबेशन कालावधी – २ वर्षे
ट्रेनिंग – निवड झालेल्या उमेदवारांना ऑन जॉब ट्रेनिंग दिले जाईल.
अर्जाचे शुल्क – रु. १,०००/- जीएसटी. (अजा/अज/दिव्यांग उमेदवारांना फी माफ आहे.)
यशस्वीरित्या ऑनलाइन फी भरल्यावर फी भरल्याची पावती जनरेट होईल, जी उमेदवारांनी डाऊनलोड करून जपून ठेवावी. (यात अर्जाचा अनुक्रमांक, ट्रान्झॅक्शन आयडी, अर्जदाराचे नाव, कॅटेगरी, अर्जाचे शुल्क आणि कोणत्या पदासाठी अर्ज केला ही माहिती असेल.)
शंकासमाधानासाठी ई-मेल आयडी – recruitmentsqsv @ncrtc. in.
ऑनलाइन अर्ज www. ncrtc. in या संकेतस्थळावर दि. २४ एप्रिल २०२५ (२३.५९ वाजे)पर्यंत करावेत.
suhaspatil237 @gmail. com


