Friday, July 24, 2026
Home Blog Page 386

छत्रपती राजाराम महाराजांच्या पहिल्या युरोप दौऱ्याची दैनंदिनी…

0
छत्रपती राजाराम महाराजांच्या पहिल्या युरोप दौऱ्याची दैनंदिनी…


यशवंत थोरात
मी काही इतिहासकार नाही आणि माझा तसा भ्रमदेखील नाही. मला ऐतिहासिक पुरावे तपासण्याचं औपचारिक शिक्षण मिळालेलं नाही. म्हणून, मी जे मांडतोय, त्यावर काही प्रमाणात संशयाचं धुकं असणं साहजिक आहे. माझा युक्तिवाद तर्क आणि सामान्यज्ञान यावर प्रामुख्यानं आधारित आहे. त्यामुळेच, कोल्हापूरचे छत्रपती राजाराम महाराज (द्वितीय) यांनी केलेल्या युरोप-प्रवासाबद्दल आणि त्या प्रवासात त्यांनी लिहिलेली दैनंदिनी आता पुस्तकरूपानं पुन्हा उपलब्ध झाली असल्यामुळे मला दोन प्रश्न पडतात.

पहिला प्रश्न म्हणजे, या अवघ्या २० वर्षांच्या राजकुमाराने – धार्मिक बंदी असताना – स्वेच्छेनं समुद्र ओलांडून – पश्चिमेचा असामान्य प्रवास करण्याची परवानगी ब्रिटिशांकडे का मागितली असेल? त्यानं हा दौरा करण्याचा उद्देश नेमका काय होता? परंपरावादी ब्रिटिश सरकारने ही विनंती का मान्य केली असेल? कारण काहीही असो, पण त्यामुळे असा औपचारिक दौरा करणारे राजाराम महाराज, हे पहिले भारतीय राजे बनले. अर्थात या प्रश्नांची उत्तरं सहजासहजी मिळणारी नाहीत.

भविष्यातील संशोधन यावर अधिक प्रकाश टाकेल, पण आजच्या घडीला, तीन गोष्टींचा शोध घेणं आवश्यक आहे एक – राजाराम महाराज यांचा जीवनकाळ, दुसरं – त्यांच्यावर कोणत्या गोष्टींचा प्रभाव पडला आणि तिसरं – त्यांनी परदेश प्रवासामध्ये लिहिलेली डायरी. राजाराम महाराज हे १९ व्या शतकाचं अपत्य होतं – त्यांचा जन्म १८५० ला झाला आणि त्यानंतर, बरोबर २० वर्षांनी (१८७० मध्ये) त्यांचं निधन झालं. आपण १९ व्या शतकाबद्दल बोलतो, तेव्हा आपण हे ध्यानात घेतलं पाहिजे, की या शतकात इंग्लंड आणि युरोपला आकार देणारे विचार आणि शक्ती, या तत्कालीन भारताला आकार देणाऱ्या कल्पना आणि शक्तींपेक्षा फार वेगळ्या होत्या. त्या काळात इंग्लंड जागतिक सत्ता बनण्याच्या मार्गावर होता; तर भारत हा परकीयांच्या ताब्यात असलेला एक देश होता.

पाश्चात्त्य जगात, १९ वं शतक हा फक्त एक ऐतिहासिक कालखंड नव्हता, तर एका नव्या युगाचा उदय होता- नवे शोध, नवे विचार, आणि नव्या बदलांनी भरलेला. डार्विनचा उत्क्रांतीवाद, लुई पाश्चरचे जिवाणू- विषाणूंच्या परिणामांबद्दलचे आडाखे, मारी क्युरी यांचं किरणोत्सारी रेडियम. तारायंत्र आणि दूरध्वनीमुळे शक्य झालेला संवाद, वाफेचं इंजिन आणि लोहमार्ग, वीज हे सगळं याचं शतकामधलं.

हेही वाचा

दुसरीकडे सामाजिक पातळीवर अॅडॅम स्मिथ, रिकार्डो आणि जॉन स्टुअर्ट मिल यांनी मुक्त बाजारपेठेचं समर्थन केलं, तर दुसरीकडे भांडवलशाहीवर जहाल टीका करत कामगारांच्या शोषणाचं, असमानतेचं आणि कामाच्या अमानवी परिस्थितीचं भान समाजाला दिलं. त्यामुळे १८२० ते १८४८ या कालखंडात, युरोपमध्ये विविध ठिकाणी राजेशाहीला हादरे बसले. लोकशाही, समता आणि सामाजिक सुधारणांसाठी चळवळी उभ्या राहिल्या. या साऱ्या बदलांनी इंग्लंड आणि युरोपमध्ये एक नवं आणि गतिशील युग निर्माण केलं.

पण खरा प्रश्न असा आहे की, राजाराम महाराजांना या सर्व घटनांची कितपत कल्पना होती? त्यांचं शिक्षण ब्रिटिशांच्या देखरेखीखाली झालं. पोलिटिकल एजंट कर्नल अॅण्डरसन हे चीफ अॅडमिनिस्ट्रेटर, तर कॅप्टन वेस्ट हे गार्डियन- कम्पॅनियन आणि प्रत्यक्ष शिक्षक म्हणून जमशेटजी ऊनावाला हे बुद्धिमान पारसी गृहस्थ अशांच्या सहवासात आणि या शिक्षणपद्धतीतून राजाराम महाराज इंग्रजी साहित्य आणि भाषा यामध्ये पारंगत झाले, इतिहासाची त्यांना आवड होती आणि मराठ्यांच्या इतिहासाची पुरेशी जाणीव होती. प्रशासन आणि न्यायदान व्यवस्थेत त्यांना रस होता, आणि कॅप्टन वेस्ट यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी या गोष्टी चांगल्या रीतीने समजून घेतल्या होत्या. एकंदरीत, या तिघाही मार्गदर्शकाच्या मनात राजाराम महाराजांच्या विषयी सकारात्मक भावना होती, अशीही नोंद आहे.

त्यामुळे असा तर्क करता येईल की, महाराजांना इंग्लंडमधील घडामोडींची थोडीफार कल्पना असावी. परंतु, ती किती परिपूर्ण, खरी किंवा पारदर्शक होती, हा वेगळा मुद्दा. कदाचित त्यांच्या शिक्षकांनी त्यांना औद्याोगिकीकरणाचे फायदे सांगितले असतील; पण कामगारांची दैन्यवस्था, शोषण, आणि अमानवी परिस्थिती, याविषयी मौन बाळगलं असेल. भांडवलशाहीचं कौतुक केलं असेल; पण श्रीमंत आणि गरीब यांच्यातल्या वाढणाऱ्या दरीकडे दुर्लक्ष केलं असेल. उत्पादन आणि मालकी ही संपूर्ण समाजाची असते, यासारख्या विचारांपासून त्यांना नक्कीच लांब ठेवलं गेलं असेल.

लंडनच्या ‘इंडिया ऑफिस लायब्ररी’नं २०२२-२३ मध्ये खुली केलेली गोपनीय कागदपत्रं दाखवतात की भारतीय राजपुत्रांच्या शिक्षणासंदर्भात ब्रिटिशांचं धोरण स्पष्ट होतं – ते म्हणजे असे राजे घडवणे जे ‘ब्रिटिश साम्राज्य महान आणि चांगले आहे’ यावर पूर्ण विश्वास ठेवतील आणि आपापल्या संस्थानाचे राज्य, ब्रिटिश विचारसरणीनुसारच चालवतील. त्यामुळे शिक्षणाद्वारे राजाराम महाराजांना साम्राज्याच्या व्यवस्थेतील ‘कनिष्ठ भागीदार’ म्हणून घडवण्याचा प्रयत्न इंग्रजांनी नक्कीच केला असावा.

पण मग, महाराजांच्या मार्गदर्शकांनी त्यांना भारताविषयी आणि भारतीय इतिहासाविषयी काय सांगितलं असेल? त्यांनी नक्कीच ब्रिटिश सत्तेचं आणि त्यामुळे भारताला झालेल्या फायद्याचं सुंदर चित्र उभं केलं असणार. ते कितपत खरं असेल माहीत नाही. या लोकांनी त्यांना सांगितलं असणार की, तिसऱ्या पानिपत युद्धातल्या पराभवानंतरसुद्धा, मराठ्यांनी लाल किल्ल्यावर भगवा फडकवण्यात जवळपास यश मिळवलं होतं. त्यांनी हेदेखील सांगितलं असणार की, १८१८ मध्ये तिसऱ्या इंग्रज-मराठा युद्धात ब्रिटिशांनी विजय मिळवल्यामुळे मराठा युगाचा अंत झाला होता. १९ व्या शतकाच्या मध्यावर ईस्ट इंडिया कंपनीनं प्रथम आपले युरोपीय प्रतिस्पर्धी दूर केले, व्यापारी मक्तेदारी निर्माण केली आणि नंतर थेट किंवा संस्थानांशी करार करून साम्राज्य उभं केलं, या कंपनीनं स्वत: निर्माण केलेल्या परिस्थितीमुळेच व्यापक परंतु अयशस्वी असा १८५७ चा उठाव झाला होता. हा उठाव राजाराम महाराजांचे वय सात वर्षं असताना मेरठमध्ये सुरू झाला आणि १३ महिन्यांनी ग्वाल्हेर इथं संपला.

हेही वाचा

त्यांना या कथेची दुसरी बाजूही कळली असेल की ही काही मूठभर सैनिकांनी केलेली बंडखोरी नव्हती, तर भारतीय स्वातंत्र्याचं पहिलं युद्ध होतं. बंडखोरांचा आवाज केवळ उत्तर भारतातच नाही, तर कोल्हापूरच्या राजवाड्यापर्यंत घुमला होता ज्यामध्ये पूर्वीच्या छत्रपतींचे भाऊ – चिमासाहेब महाराजांचा – नानासाहेब आणि इतर नेत्यांशी संबंध असण्याच्या अफवांचा समावेश होता. राजाराम महाराजांना असंही कळवण्यात आलं असेल की त्या वेळी राज्याची अधिकृत भूमिका ब्रिटिशांसोबत असली, तरी चिमासाहेबांवर ‘२७ नेटिव्ह इन्फन्ट्री’नं केलेल्या उठावाच्या संशयावरून, ब्रिटिशविरोधी कारवाईचा ठपका ठेवून त्यांना कराचीला पाठवलं गेलं. उठावानंतर ब्रिटिशांनी कोल्हापूरच्या लोकांवरही क्रूर आणि अमानुष बळाचा वापर केला, संदेश स्पष्ट होता झ्र सहमत व्हा, अन्यथा परिणाम भोगा, जुळवून घ्या नाहीतर…

चिमासाहेबांच्या बाबत स्थानिक स्तरावर फारशी कागदपत्रं उपलब्ध नाहीत. मात्र, याचा अर्थ असा नाही की, ती अस्तित्वातच नाहीत. १८५७ च्या उठावासंबंधीची कागदपत्रं आज इंडिया ऑफिस तसंच ब्रिटिश लायब्ररीत उपलब्ध आहेत. ती गोळा करण्याची गरज आहे, ज्यामुळे चिमासाहेब महाराजांची गोष्ट आपल्याला पूर्णपणे आणि नीटपणे सांगता येईल आणि आपल्या खऱ्या इतिहासाचा वारसा भावी पिढीला देता येईल. कोल्हापूरचं, या नगरीच्या इतिहासाचं एवढं देणं आपण नक्कीच लागतो.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे, राजाराम महाराजांना माहीत असेल की उठावानंतर ब्रिटिशांनी ‘संस्थानिकांबाबतच्या धोरणा’त मूलभूत बदल केला होता. त्यापूर्वी त्यांची धोरणं प्रादेशिक विस्तारासाठी आणि संस्थानं ब्रिटिश भारतात सामावून घेण्यासाठी होती. व्हिक्टोरिया राणीनं एक नोव्हेंबर १८५८ च्या जाहीरनाम्यात ‘‘संस्थानिकांनी ब्रिटिश राजसत्तेच्या निष्ठेची शपथ घेतली, तर त्यांच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप न करण्याची’’ घोषणा केली. यामुळेच संस्थानिकांसाठी खालसा धोरणाऐवजी आमिष दाखवणारे धोरण आणि सामान्य लोकांसाठी – जे प्रामुख्याने हिंदू आणि मुसलमान होते – ‘फोडा आणि राज्य करा’ हे धोरण अमलात आलं, ज्यामुळे पुढल्या काळात देशाचं विभाजन झालं.

राजाराम महाराजांचा हा दौरा करण्यामागील हेतू काय होता आणि ब्रिटिश सरकारला त्यांची विनंती मान्य करायला कोणत्या गोष्टीने भाग पाडले ज्यामुळे असा औपचारिक दौरा करणारे ते पहिले भारतीय राजे बनले, हे माझे दोन प्रश्न होते. या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी १९व्या शतकाचा ऐतिहासिक संदर्भ आपण थोडक्यात पाहिला, पण त्या काळात महाराजांनी लिहिलेल्या डायरीचं आकलन गरजेचं आहे. त्यातही दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर त्यातल्या त्यात सोपं आहे कारण राजाराम महाराजांकडून दौऱ्याची विनंती नवीन धोरण लागू झाल्यानंतर करण्यात आली होती. या धोरणाअंतर्गत, संस्थानिकांना आमिष दाखवून खूश ठेवलं जाणार होतं. मग परवानगीला ब्रिटिशांनी इतका वेळ का लावला? कदाचित ब्रिटिशांच्या मनात चिमासाहेबांच्या हद्दपारीची आठवण असावी आणि दुसरे साधेच कारण म्हणजे सरकारचे काम सावकाश चालते ज्याला ब्रिटिश सरकार अपवाद नव्हते.

पण राजाराम महाराजांचा हा दौरा करण्यामागचा हेतू काय होता, यासाठी त्यांची दैनंदिनीच पाहावी लागेल. या दैनंदिनीची (पुस्तकरूप) प्रत जेव्हा माझ्या हाती आली तेव्हा सुरुवातीला वाटलं की, ती एका मर्यादित राजेशाही दृष्टिकोनातून लिहिलेली, औपचारिक निरीक्षणांची नोंद असेल. पण जसजसं वाचत गेलो, तसतशी त्यांच्या विचारांमधली प्रगल्भता जाणवली. डायरीचं गांभीर्य लक्षात यायला थोडा वेळ लागला पण हळूहळू मला जाणवू लागलं की, ही डायरी दोन स्तरांवर लिहिली गेली आहे. एका स्तरावर ही डायरी, राजाराम महाराजांनी सार्वजनिक वाचकांसाठी लिहिलेली ‘पोलिटिकली करेक्ट’ अशी नोंद आहे. आणि दुसऱ्या स्तरावर ती महाराजांच्या मनातल्या आकांक्षांची ‘ब्लू प्रटिं’आहे झ्र असा आराखडा ज्याची जाणीव, त्यांना आपल्या सहकाऱ्यांना किंवा ब्रिटिश ‘पोलिटिकल ऑफिसरां’ना करून द्यायची नव्हती.

परंतु का? याचा उलगडा करण्यासाठी मी तर्क आणि हाताशी असणाऱ्या माहितीच्या आधारे, ज्या ज्या व्यक्तींना व संस्थांना महाराजांनी भेटी दिल्या त्यांचं उद्देशानुसार वर्गीकरण केलं. त्यानंतर जे समोर आलं, ते लक्षवेधी होतं.

राजाराम महाराज ब्रिटिश संसदेच्या दोन्ही सभागृहांमधल्या चर्चांना उपस्थित होते; ‘हाउस ऑफ कॉमन्स’मध्ये ते शिक्षण धोरणासंबंधीची चर्चा ऐकण्यासाठी बसले; त्यांनी व्हिक्टोरिया राणीची पहिल्यांदा विंडसर पॅलेस आणि नंतर बकिंगहॅम पॅलेसमध्ये भेट घेतली; ते ब्रिटिश सरकारच्या सदस्यांना भेटले आणि तत्कालीन पंतप्रधान विल्यम ग्लॅडस्टन यांच्या साधेपणाने प्रभावित झाले; त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठाला भेट देऊन कुलगुरू आणि प्राध्यापकांशी संवाद साधला; ‘इंडिया ऑफिस’ला भेट दिली ; भारताला जोडणाऱ्या तार-सेवेच्या उद्घाटनावेळी ते हजर होते ; त्यांनी ‘ईस्ट इंडिया असोसिएशन’सारख्या संस्थेला भेट दिली जी त्या काळी भारतीय नेत्यांच्या व लोकांच्या तक्रारी सरकारपर्यंत पोहोचवणारा दुवा ठरली होती ; त्यांनी ही संस्था स्थापन करणारे आणि भारतीय राष्ट्रवादाचे जनक असलेल्या दादाभाई नौरोजींची भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली ; ‘बँक ऑफ इंग्लंड’ आणि मुख्य टपाल कार्यालयात त्यांनी आपला संपूर्ण दिवस घालवला ; आणि काउंटी कोर्टामध्ये फौजदारी खटल्यांची सुनावणी ऐकण्यासाठी ते गेले. या सर्व गोष्टी आश्चर्य करण्यासारख्याच आहेत. अवघ्या २० वर्षांच्या एका तरुण राजकुमारानं हे सारं केलं आहे. कुठं जायचं हे ठरवण्यातून त्यांच्या विचक्षण बुद्धीची कल्पना आज करता येतेच; वयाच्या मानानं ते प्रगल्भ होते हेही कळतं, पण या साऱ्या भेटीगाठींचा उद्देश काहीतरी नक्कीच असेल ना? तो काय होता?

हेही वाचा

या भेटींचं विश्लेषण केल्यावर लक्षात आलं की, जरी या प्रवासाचा आराखडा सरकारने मंजूर केला असला, तरी कोणत्या संस्था आणि व्यक्तींना भेटायचं, हे स्वत: महाराजांनी ठरवलं असावं कारण त्यांच्या या भेटी आणि बैठकांमधून एक सूत्र दिसून येतं. या दौऱ्यामागची ‘किल्ली’ ही आहे की, महाराजांनी जाणीवपूर्वक अशा संस्थांची निवड केली ज्या त्यांना आपल्या कोल्हापूर संस्थानात उभ्या करायच्या होत्या. ते जाणीवपूर्वक अशा सक्षम व्यक्तींना भेटले जे त्यांच्या मनातल्या आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी त्यांना मार्गदर्शन करू शकले असते. म्हणून, ही डायरी केवळ त्या काळच्या वास्तवाची नोंद नाही, तर कोल्हापूरला १९ व्या शतकाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा त्यांचा उद्देश आणि दूरदृष्टीचं प्रतिबिंबदेखील आहे, याचा पक्का अंदाज बांधता येतो.

दूरदृष्टी, हेतू आणि आकांक्षा यांच्या संगमामुळेच राजाराम महाराज – राजा म्हणून आणि एक व्यक्ती म्हणून – वेगळे ठरतात. या दृष्टिकोनातून पाहिलं, तर असं म्हणता येईल की जर शाहू महाराज प्रत्यक्ष साकारलेल्या कार्यांमुळे वंदनीय असतील, तर राजाराम महाराज त्यांच्यामध्ये असणाऱ्या क्षमता आणि संभाव्यतेसाठी आठवणीत ठेवले पाहिजेत. शाहू महाराज जसं भव्य साकारलेलं चित्र आहेत, तसं राजाराम महाराज एक भव्य स्वप्न आहेत जे साकार झालं असतं तर स्वातंत्र्यापूर्वीच कोल्हापूर हे मनानं, आत्म्यानं आणि मूलभूत सुविधांनी आधुनिक शहर बनलं असतं आणि शाहू महाराजांनी नंतरच्या काळात घडवून आणलेले सामाजिक बदल अधिक खोलवर रुजून मोठ्या प्रमाणात यशस्वी झाले असते.

लेखक ‘नाबार्ड’चे निवृत्त अध्यक्ष आहेत

ythorat@gmail.com



Source link

माझ्या हिश्श्याचे किस्से: नापास होण्याच्या भीतीने बनले अभिनेता; रघुवीर यादव यांनी घरातून पळून जाऊन गाठली होती नाटक कंपनी

0
माझ्या हिश्श्याचे किस्से:  नापास होण्याच्या भीतीने बनले अभिनेता; रघुवीर यादव यांनी घरातून पळून जाऊन गाठली होती नाटक कंपनी


रूमी जाफरी, लेखक-दिग्दर्शक5 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

प्रसिद्ध अभिनेते रघुवीर यादवजी आणि माझ्यामध्ये एका बाबतीत साम्य आहे. मुंबईत आल्यावर मी अन्नुभाई अर्थात अन्नू कपूर यांच्यासोबत नाटकांतून करिअरची सुरूवात केली आणि रघुवीरजींनीही अन्नूभाईंचे वडील मदनलाल कपूर यांच्या नाटक कंपनीतूनच कामाचा प्रारंभ केला. काही दिवसांपूर्वी अन्नूभाईंची बहीण सीमा कपूर यांच्या आत्मकथेचे प्रकाशन झाले. त्यावेळी रघुवीर भैयांनी काही किस्से ऐकवले. तेच आज मी तुम्हाला सांगणार आहे.

रघुवीरजींना ॲक्टिंगची फारशी आवड नव्हती. त्यांनी अभिनयाच्या क्षेत्रात यावे, हा नियतीचा फैसला असावा. या देशाला आणि जगाला एक अद्भुत कलाकार मिळावा, असे कदाचित तिला वाटत असावे. रघुवीरजींनी सांगितले की, आपल्या आजोबांनी त्यांच्या गावात मुलाच्या (म्हणजे रघुवीरजींच्या मामाच्या) स्मृती प्रीत्यर्थ लक्ष्मीनारायण यादव विद्यालय नावाची शाळा बांधली होती. रघुजीही तिथेच शिकत होते. त्यांना सायन्स शाखेत घातले होते, पण या विषयात त्यांना अजिबात रुचि नव्हती. बारावीचा निकाल यायच्या आदल्या दिवशी ते खूप तणावात होते. कारण आपण नक्की नापास होणार, हे त्यांना माहीत होते. मामाच्या नावाची शाळा असूनही भाचा नापास झाला, म्हणून घरी मारही बसणार होता.

रघुवीर भैयांनी सांगत होते.. मी झाडाखाली बसून निकालाचा विचार करत होतो, तेवढ्यात नरेशकुमार सूरी नावाचा गावातील एक मुलगा तिथे आला. तो प्रोफेशनल पळपुटा होता. दर दोन-चार महिन्यांनी घरातून पळून जायचा. तो माझ्याजवळ आला आणि ‘कसला विचार करतो आहेस?’ असे विचारले. मी सांगितले की, उद्या निकाल आहे आणि मी नापास होणार, हे मला माहीत आहे. त्यामुळे काय करावे, काही कळत नाहीय. तो म्हणाला, घरातून पळून जाऊ.. आणि मग आम्ही दोघे पळून गेलो. तेव्हा मी आयुष्यात पहिल्यांदा रेल्वे बघितली होती. मी रेल्वेत बसलो. आम्ही ललितपूरला पोहोचलो.

तिथे भटकत असताना भोपाळ नाटक कंपनीचा बोर्ड दिसला. तिथे कपूर साहब (मदनलाल कपूर) यांच्या कंपनीचे नाटक सुरू होते. नाटकाचे नाव होते- ‘नागिन’. दोघे जण आतमध्ये गेलो. आम्ही पाहिले की एक टकला माणूस हीरोची भूमिका करतो आहे आणि त्याच्या सोबत नागिणीची भूमिका करणारी एक सुंदर मुलगी नाचतेय. एका अजागळ, टकल्या माणसाबरोबर देखणी मुलगी नाचत असल्याचे पाहून मला खूप विचित्र वाटले. त्याचाच विचार करत करत आम्ही बस स्टँडवर आलो आणि तिथेच झोपलो.

सकाळी सूरी त्याच्या आत्याच्या घरी घेऊन गेला. खाण्याचा कात विकण्याचा त्यांचा व्यवसाय होता. आम्ही त्यांच्याकडे दोन-तीन दिवस राहिलो. मी एकेदिवशी छतावर झोपलो असताना मला तिथेच सोडून सूरी पुन्हा पळून गेला. मी पुन्हा भोपाळला नाटक कंपनीच्या ठिकाणी पोहोचलो. तिथे किशन नावाचा एक मुलगा होता. या नाटक कंपनीच्या मालकाची भेट घालून दे, असे मी त्याला म्हणालो. तो मला आत घेऊन गेला. तिथे बाबूजी अर्थात कपूर साहेब बसले होते. त्यांच्या आजूबाजूला काही जण बसले होते. किशन बाबूजींच्या जवळ गेला आणि ‘याला तुम्हाला भेटायचे आहे,’ असे सांगितले. मी त्यांना म्हणालो की, मला तुमच्या कंपनीत ठेऊन घ्या.. ‘तुला काय येते?’ असे त्यांनी विचारले. मी म्हणालो, गाणी गातो.. त्यांनी मला काही गायला सांगितले. मग मी गझल ऐकवली.. बदली तेरी नजर तो नजारे बदल गए, ये चांदनी ये चांद सितारे बदल गए। लहरों से पूछ लीजिए साहिल भी है गवाह, कश्ती मेरी डुबोकर धारे बदल गए.. माझे गायन ऐकून बाबूजींना हसू आले. म्हणाले, तुम सुरीले तो हो, मगर तुम्हारा ‘तलफ़्फ़ुज’ बहुत खराब है..

मला ‘तलफ़्फ़ुज’चा अर्थ माहीत नव्हता. ते कुठल्या तरी तालाविषयी म्हणत असावेत, असे मला वाटले. मी म्हणालो, तबल्यासोबत गायलो, तर येईल व्यवस्थित.. त्यावर बाबूजी पुन्हा हसले आणि म्हणाले की, तबल्याने तलफ़्फ़ुज नीट होत नाही. तलफ़्फ़ुज म्हणजे उच्चार. तुझे उच्चार अशुद्ध आहेत. मी म्हणालो, तुम्ही मला भरती तर करुन घ्या, मी तलफ़्फ़ुज आणि उच्चार दोन्ही चांगले करतो. त्यांनी मला अडीच रुपये महिना पगारावर कंपनीत ठेऊन घेतले. त्यानंतर मला बाबूजींनी सोबत बसवून उर्दू बोलायला, वाचायला आणि लिहायला शिकवले. त्यातून माझे ‘तलफ़्फ़ुज’ सुधारले. तिथूनच माझी ॲक्टिंगची सुरूवात झाली. बाबूजींनी तिथे मला इतके चांगले ट्रेनिंग दिले की, ॲक्टिंगमध्ये मी जे काही शिकलो आणि बनलो आहे, त्यात त्यांचा खूप मोठा हातभार आहे. या गोष्टीवरुन मला अल्ताफ हुसैन हाली यांचा एक शेर आठवतोय…

फरिश्ते से बढ़ कर है

इंसान बनना

मगर इस में लगती है

मेहनत जियादा।

रघुजींचे आणखी एक टँलेन्ट इथे सांगितले पाहिजे. मी स्वत: त्याचा साक्षीदार आहे. माझ्या ‘चेहरे’ या सिनेमातील त्यांचे पात्र बासरी वाजवणारे होते. मी कथावाचनासाठी त्यांना ऑफिसमध्ये बोलावले, तेव्हा ते दोन-तीन बासऱ्या घेऊन आले. त्यांनी त्या वाजवून दाखवल्यावर मी म्हणालो, ‘ही तर कमाल झाली! या बासऱ्या तुम्हाला कुठे मिळाल्या? बाजारात तर त्या मिळत नाहीत..’ त्यावर त्यांनी सांगितले की, मी स्वत:च त्या बनवल्या आहेत. माझा विश्वासच बसला नाही. दुसऱ्या दिवशी ते एक छोटा बांबू घेऊन आले, माझ्यासमोर बासरी बनवली आणि वाजवून दाखवली. रघुजींच्या बासरीचा आवाज ऐकल्यावर आमचे रेकॉर्डिस्ट ऑस्कर विजेते रसूल पूकुट्टी म्हणाले की, बॅकग्राउंड म्युझिकच्या वेळी वादकाला बासरी वाजवायला सांगू नका, रघुवीरजींच्या बासरीचा आवाजच ठेवा. तो खूप वेगळा आणि अनोखा आहे. या सिनेमात जो बासरीचा आवाज आहे, तो रघुवीरजींनी वाजवलेल्या बासरीचाच आहे. आज रघुवीरजींसाठी त्यांच्या ‘पीपली लाइव्ह’ सिनेमातील हे गाणे ऐका…

सखी सैया तो खूब ही कमात है,

महंगाई डायन खाए जात है…

स्वत:ची काळजी घ्या, आनंदी राहा.



Source link

डायरीची पाने: रोजगारी बाया

0
डायरीची पाने:  रोजगारी बाया




शेतीत काम करणं ही लाज वाटण्याची गोष्ट नाही. त्याचा अभिमान वाटायला पाहिजे. पण, तसं कुणाला आज वाटत नाही. त्यामुळं शेतीत मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत. परवा आमच्या जवळच्या नांदेड जिल्ह्यात रोजगारी बायांना शेतात घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत पडला आणि सात जणींचा जागीच मृत्यू झाला. मालेगावजवळच्या शेतात सकाळी सात वाजता हा अपघात झाला. म्हणजे या बायकांना त्यांच्या गावावरून सकाळी किती वाजता निघावे लागले असेल? रोजगारासाठी त्यांना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात का जावे लागले? त्यांच्या गावात रोजगार उपलब्ध नव्हता काय? त्या जात असलेल्या गावात रोजगारी बाया उपलब्ध नव्हत्या काय, या प्रश्नांसोबतच, माणसाचा जीव किती स्वस्त आणि शेती करणं किती महाग झालंय, असा परस्परविरोधी प्रश्नही या घटनेतून निर्माण झालाय. रोजगारी बायांना असे ट्रॅक्टर किंवा ऑटोरिक्षाने शेतात न्यावे आणि घरी नेऊन सोडावे लागते. जवळपास रोजगारी बाया मिळत नाहीत आणि दूरच्या बायांचा वेळ वाचवायचा असेल, तर असे वाहनाने आणण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. रोजंदारीने काम करणारे बहुतांश लोक आता गावं सोडून शहरातल्या झोपडपट्ट्यांतून स्थायिक झाले आहेत. तिथं शहरी जीवन जगायला मिळतं, झोपडपट्टीत अनेक सवलती मिळतात, समूहाने एकत्रित राहता येतं, गावातल्या इतकी जातीयवादाची झळ इथं पोहोचत नाही.. अशा अनेक कारणांमुळं गावोगावच्या कष्टकऱ्यांनी शहरात स्थलांतर केलं आणि त्यातून त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली. ठीक आहे. शेतमजूर शेतीतून बाहेर पडला आहे. पण, शेतकरी तर शेतीतच आहे ना? तो तरी कुठं शेतीत काम करतो आहे? मजुरांना शेतीत काम करायचा कंटाळा येतोय, तसाच तो शेतमालकांनाही येतो आहे. स्वतःच्या शेतात काम करण्याची लाज वाटत असल्याने हा प्रश्न जास्त गंभीर झाला आहे. शेतकऱ्याच्या घरातली सगळी माणसं शेतात राबू लागली, तर कदाचित त्यांना शेतमजुराची गरज पडत नाही. आमच्या लहानपणी घरातली सगळी माणसं शेतात राबायची. शाळा संपल्यावर सकाळ-संध्याकाळ आम्हीही शेतात कामं करायचो. तुम्ही शेतात गेलात की शेत तुम्हाला आपोआपच काम सांगतं, असं जुने लोक म्हणायचे. पण, आजकाल कुणी शेतात जायलाच राजी नाही. त्यामुळं त्यांना शेतातली काम काय माहीत असणार? मग निव्वळ शेतमजुरांना दोष देण्यात काय अर्थ आहे? पूर्वी ज्यांच्या घरी शेती आहे, त्यांच्या शेतातली काम संपली की, त्या घरच्या बाया आणि माणसं दुसऱ्या शेतकऱ्याच्या शेतात कामाला जायची. अर्थात, रोजगार म्हणूनच ते कामाला जायचे. कधी सावड म्हणून एकमेकांच्या शेतात मदत करू लागायला जायचे. काडीकाडी अन् पैसापैसा जमवावा, असं तेव्हा प्रत्येकालाच वाटायचं. घरातल्या सगळ्या माणसांनी असं केलं तर सगळ्या घराला आधार मिळतो, घर पुढं येतं, असं मानलं जायचं. काही घरातली माणसं अर्धपोटी राबताना मी पाहिली आहेत. त्या माणसांनी राबराबून थोडाफार पैसा मागं टाकून पुष्कळ शेती घेतल्याचंही मी पाहिलं आहे. आणि शेतीचा एक एक तुकडा विकून, ऐशआरामात जगणारी आणि एक दिवस आत्महत्या करणारी माणसंही पाहिली आहेत. शेतीत काम करणं ही खरं तर लाज वाटण्याची गोष्ट नाही. त्याचा अभिमान वाटायला पाहिजे. पण, तसं कुणाला आज वाटत नाही. त्यामुळं शेतीत मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत. केवळ मजुरांनाच नव्हे, तर शेतकऱ्यालाही शेतीतून बाहेर पडायचं आहे. शेती कुणालाच नकोशी झाली आहे. पण, ते एक-दुसऱ्यावर निमित्त लोटत आहेत. शेती स्वत:च्या मालकीची नसल्यामुळं मजुरांना ती कधीही सोडून देता येते. पण, शेतकऱ्याला तशी ती चटकन् सोडून दुसरा पर्याय शोधता येत नाही. याबाबतीत मजूर आता भाग्यवान आहेत. पूर्वी बिचारे काहीच पर्याय नसल्यामुळं गुलामासारखे राबायचे, आता त्यांना त्याची गरज उरलेली नाही. लहानपणी मी पाहिलं आहे की, आमच्या गावात, शेतात रोजानं काम करणाऱ्या बायांचे जत्थे असायचे. त्यातली एक जण त्यांची प्रमुख असायची. ती सगळा व्यवहार ठरवायची. गुत्तं घ्यायचं असेल, तर ते कसं घ्यायचं, ते तीच ठरवायची. रोजानं जायचं असेल, तर किती बाया हव्यात, कामाचं स्वरूप काय, तेही तीच ठरवायची. तिच्यावर इतर सगळ्या बाया विश्वास टाकायच्या. शेतमालकालाही प्रत्येक बाईला भेटायची, बोलायची गरज पडत नसे. ती प्रमुख असलेली बाई भेटली आणि तिला बोललं, तिनं शब्द दिला की काम मार्गी लागायचं. यामध्ये सर्व जाती-जमातीच्या बाया असत. त्यांचा जत्था एकदा शेतात शिरला की शेतकरी बिनघोर होत असे. कारण तिथल्या कामाची सगळी जबाबदारी त्या घेत असत आणि अंगमेहनतीनं काम पूर्ण करत. अलीकडे समाजमाध्यमांवर मनीषा हजारे यांच्या रील खूप लोक पाहतात. त्या ऊसतोड कामगार आहेत. तोडणीचा हंगाम संपला की, आपल्या गावाकडं येऊन त्या शेतात मजुरी करतात. तिथले व्हिडिओ टाकतात. त्यांचे पती, दोन मुलं, एक मुलगीही शेतात काम करते. दोन मुलांनी शिक्षण सोडून आई-वडिलांना मदत म्हणून शेतात काम करायला सुरूवात केली. त्यांना शिक्षणाची इच्छाही नव्हती. मुलगी शिकते आहे. तरीही सगळे शेतात काम करू लागतात. त्यांनी दोन बैलजोड्या घेतल्या आहेत. ज्या शेतकऱ्याला शेतात ट्रॅक्टर लावणं परवडत नाही, ते या बैलजोडीने मशागत करून घेतात. त्या बैलांचा रोजगारही त्यांना मिळतो. ही माणसं कुणाविषयी तक्रार करत नाहीत. खूप मेहनत करतात अन् चांगलंचुंगलं खाऊन आनंदानं जगतात. त्या सगळ्या चित्रफिती समाजमाध्यमावर टाकतात. जगण्याची खरी कला त्यांना समजली आहे. लोकांना ते आवडतं. त्याचा हेवा वाटतो. पण, तसं वागायला, जगायला जमत नाही. खरं तर सगळ्यांनी तशी अंगमेहनत करायला सुरूवात केली, तर शेतीतले प्रश्न मजुरांपुरते तरी नक्कीच संपतील. बाकी समाज आणि सरकारकडून शेतमालाला किफायतशीर भावाची अपेक्षा करता येत नाही. कारण शेतमाल ही जीवनावश्यक गोष्ट आहे, त्यामुळं ती स्वस्तच राहिली पाहिजे, असं सर्व सरकारांना, समाजसेवकांना आणि लोकांनाही वाटतं. शेतीसाठी लागणाऱ्या सर्व वस्तू स्वस्तात मिळाव्यात, असं मात्र कुणालाही वाटत नाही.
शेतात रोजगारानं काम करणाऱ्या बायकांचे चित्रण करणाऱ्या कितीतरी कविता, कथा, कादंबऱ्या मागच्या पिढीतल्या ग्रामीण साहित्यिकांनी लिहिल्या आहेत. आता कुणी असं काही लिहू म्हटलं, तर त्यांना विषयच मिळणार नाही. कारण रोजगारी बाया मिळणे हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कथा लिहायची असेल, तर रोजगारी बायांवर नव्हे, तर रोजगारी बाया मिळत नाहीत, या प्रश्नावर लिहावी लागेल. अशा बिकट परिस्थितीत, ट्रॅक्टर विहिरीत कोसळून सात बायांचा जागीच मृत्यू होण्याच्या घटनेवरही कथा-कविता लिहिल्या जातील. खरं तर आता शेतीचाच विहिरीत पडून मृत्यू व्हायची वेळ आली आहे… (संपर्कः inbhalerao@gmail.com)



Source link

‘एआय’च्या विश्वात…: प्रॉम्प्ट ‘एआय’कडून नेमकं काम करून घेण्याचा मंत्र

0
‘एआय’च्या विश्वात…:  प्रॉम्प्ट ‘एआय’कडून नेमकं काम करून घेण्याचा मंत्र


डॉ. अमेय पांगारकर9 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

आपण एखादं काम सांगितलं आणि ते तसंच झालं की कसलं भारी वाटतं ना? आता काळ नव्या तंत्रज्ञानाचा आहे. आपल्याला हवं ते फक्त व्यक्त करायचं, तंत्रज्ञान ती गोष्ट पूर्ण करणारंच! मी काही काल्पनिक, जादूई किंवा अतिरंजित गोष्ट अजिबात सांगत नाहीय. आज जनरेटिव्ह ‘एआय’मुळं आणि विशेषत: त्याला दिल्या जाणाऱ्या ‘प्रॉम्प्ट’मुळं हे सहजशक्य झालं आहे.

प्रॉम्प्ट म्हणजे आपण जे एआय टूल वापरतो, त्याला उद्युक्त करून आपल्याला अभिप्रेत अशा गोष्टी बनवून घेणे. एआय टूल वापरताना हे प्रॉम्प्ट फार महत्त्वाचे ठरतात. मजकुराच्या अथांग सागरातून आपल्याला काय हवे, ते निवडणे / बनवून घेण्याच्या या प्रक्रियेत आपल्याला काय हवे, ते एआयला स्पष्टपणे सांगणे म्हणजे प्रॉम्प्ट. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे जनरेटिव्ह एआयमुळे तुम्ही जे मागाल ते मिळेल अन् जेवढं मागाल तेवढंच मिळेल!

जशी प्रॉम्प्ट, तसे काम

ही गोष्ट एका उदाहरणाने समजून घेऊ… समजा विद्यार्थ्यांना ‘जी – २० परिषदेमुळे भारताच्या अर्थकारणावर झालेला परिणाम’ या विषयावर निबंध लिहायला सांगितला आहे. मग एक विद्यार्थी चॅट जीपीटीला प्रॉम्प्ट देतो.. ‘राइट आर्टिकल ऑन जी- २० इन इंडिया.’ आता त्याला भारतात झालेल्या ‘जी – २०’ परिषदेबद्दल सविस्तर माहिती मिळेल. ती कधी, कुठे झाली? त्यात कशावर चर्चा झाली? वगैरे.. पण, या परिषदेचा अर्थकारणावर काय परिणाम झाला, ही माहिती त्याने मागितलीच नाही, म्हणून त्याला ती मिळणार नाही. दुसरा विद्यार्थी प्रॉम्प्ट देतो.. ‘जनरेट आर्टिकल ऑन कन्क्लूजन ऑफ “जी – २०’ इन इंडिया विथ इकॉनॉमी.’ या प्रॉम्प्टमुळे त्याला परिषदेचे प्रमुख निष्कर्ष दिसतील, अर्थकारणावर काय परिणाम झाला, याबद्दलही माहिती मिळेल. या विद्यार्थ्याने आपल्या प्रॉम्प्टमध्ये, तो कोण आहे? त्याला कशासाठी ही माहिती हवी आहे? अशा गोष्टी घेतल्या असत्या, तर त्याला अधिक नेमकी, समर्पक माहिती मिळेल. आपण एखाद्याला काही काम सांगतो, तेव्हा त्याची एकूण बौद्धिक पातळी बघून हे काम कसं सांगायचं, हे ठरवतो. हीच गत ‘एआय’ची देखील आहे.

प्रॉम्प्ट हे उद्याचे कौशल्य

‘गुगल’सारखे सर्च इंजिन तुम्ही अनेक वर्ष वापरत आला आहात. दिवसभरात सामान्य माणूस १३ – १४ वेळा विविध कारणांसाठी गुगल वापरतो. त्यामुळं आपल्याला काय आवडतं किंवा आपण एखादी गोष्ट विचारतो, तेव्हा त्यामागचा मथितार्थ काय असतो, हे ‘गुगल’ला आता लगेच कळतं. पण, ‘एआय’ साधनांबद्दल असं घडायला काही वेळ लागेल. काही काळाने आपल्याला नेमकं काय हवं आहे, हे ‘एआय’लाही कळू लागेल. अशा पद्धतीने ‘एआय’ला काम सांगणं, ही कला बनली आहे. उद्याच्या काळात या कलेचे एका कौशल्यात रुपांतर होईल आणि ते फार मोलाचे ठरेल. आपण एखाद्या लहान मुलाला काही काम सांगतो, तेव्हा ते अनेक छोट्या कामांमध्ये विभागतो. सुरूवातीला सराव म्हणून प्रॉम्प्टसाठी ही पद्धत वापरून बघायला काहीच हरकत नाही.

नॅचरल लँग्वेज अंडरस्टँडिंग

वरील दोन मुद्द्यांवरून कदाचित हा अंदाज आला असेल की, जनरेटिव्ह एआयला काहीबाही सांगणं अन् अर्थपूर्ण प्रॉम्प्ट देणं यात जमीन-अस्मानचा फरक आहे. नव्या युगात जसे नोकऱ्यांचे रूप बदलणार आहे, तसेच प्रत्येकाला लागणारी कौशल्येही बदलणार आहेत. प्रॉम्प्ट देण्याचे कौशल्य ही त्यातलेच एक. त्यातच आता नॅचरल लॅँग्वेज प्रोसेसिंगमुळे (NLP) बऱ्याच गोष्टी सोप्या झाल्या आहेत. एखादी गोष्ट अभिव्यक्त करताना, त्यातील आशय तसाच टिकवून ठेवून ती सांगणं काहींना अवघड जातं. ‘एनएलपी’मुळं घडलेली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, नॅचरल लँग्वेज अंडरस्टँडिंगची (NLU) सुरूवात! यामुळे येत्या काळात एका भाषेतून प्रॉम्प्ट देऊन दुसऱ्या भाषेत मजकूर अथवा अभिप्रेषित गोष्ट घडू शकेल.

(संपर्कः ameyp7@gmail.com)



Source link

बुकमार्क: जेव्हा एक डॉक्टरच ‘इच्छामरण’ मागतात…

0
बुकमार्क:  जेव्हा एक डॉक्टरच ‘इच्छामरण’ मागतात…


स्वप्नील जोशी11 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

आयुष्यात कोणत्याही क्षणी बसलेली घडी विस्कटू शकते, तरीही काही प्रसंग निभावून न्यावे लागतात. आजाराच्या नेमक्या निदानाचा अभाव आणि परिणामी चुकीच्या उपचारांमुळे प्राण गमावावे लागलेल्या आपल्या डॉक्टर पतीच्या संघर्षाचा असाच कालपट संगीता भरत लोटे यांनी ‘इच्छामरण – एक सत्यकथा’ या आत्मकथनातून समोर आणला आहे. रुग्णसेवा ही ईश्वरसेवा मानली जाते. मात्र, स्वत: निष्णात डॉक्टर असलेल्या (स्व.) भारत लोटे यांच्याच वाट्याला याच्या अगदी विपरीत अनुभव आला. या कुटुंबातील सदस्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही जे असामान्य धैर्य, अदम्य साहस दाखवले त्याला खरोखरच तोड नाही.

सर्वसामान्य कुटुंबाच्या बाबतीत घडलेली ही एक सत्यकथा आहे. विवाहानंतर कोकणातील ओणी या लहानशा गावात डॉ. भारत यांच्यासोबत लेखिकेचा संसार सुरू होतो. स्वत:च्या आयुष्याबद्दल दोघेही अत्यंत उद्दात्त आणि समंजस दृष्टिकोन बाळगून असतात. वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करताना कित्येकदा अपुऱ्या संसाधानांमुळे डॉ. भारत यांना आहे त्या परिस्थितीत उपचार करावे लागत. मात्र तरीही रुग्णाला जीवनदान देण्याचा एकमेव ध्यास उराशी बाळगत ते सेवा देत राहतात. पावसाळ्यात वाट निसरडी होते, रुग्णाला डोंगरावरून खाली उतरवणे अशक्य होते, अशा परिस्थितीतही ते स्वत: रुग्णाच्या घरी जाऊन उपचार करत. एव्हाना या दाम्पत्याच्या संसारवेलीवर जय आणि प्रतीक ही गोंडस फुले उमलतात.

काही वर्षांपूर्वी दुरवस्थेत असलेल्या या गावातील आरोग्य केंद्राला डॉ. भारत लोटे यांच्यामुळे नवसंजीवनी मिळते. रुग्ण मोठ्या विश्वासाने तिथे येत आणि उपचार घेऊन जात. डॉक्टरांचे काम इतके चोख की, रुग्णालयातील औषधे, स्वच्छता, आर्थिक व्यवहार नेटकेपणे पाहतानाच, लसीकरणासह सरकारच्या आरोग्य योजना ते समरसून लोकांपर्यंत पोहोचवतात. त्यांच्या या समर्पित सेवाकार्याची दखल पंचायत राज समिती घेते आणि राज्य शासनाचा २००५-०६ चा ‘डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्कार’ त्यांना जाहीर होतो. त्या अगोदर त्यांना रत्नागिरी जिल्हा परिषदेचा डॉ. र. धों. कर्वे पुरस्कारही मिळालेला असतो. अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या डॉ. भारत यांनी मोठ्या कष्टाने ‘एमबीबीएस’चे शिक्षण पूर्ण केलेले असते. त्यामुळे समाजव्यवस्थेत माणसाला माणूस म्हणून महत्त्वाचे स्थान आहे, याची त्यांना पूर्ण जाणीव असते. ‘निष्काम कर्मयोग’ हीच खरे तर त्यांच्या जगण्याची प्रेरणा!

दिवसामागून दिवस जात असतात. लेखिका वर्णन करते त्याप्रमाणे… कधी सुखाचे पांघरूण, तर कधी दु:खाची झालर घेऊन संसाराची २५ वर्षे पूर्ण होतात. अशातच अचानक वीज कोसळावी त्याप्रमाणे एक दिवस पोटदुखीचं निमित्त होतं आणि डॉ. भारत यांना स्वादुपिंडाच्या आजाराने ग्रासल्याचे निदान होते. पुण्यातील एका नामांकित रुग्णालयात त्यांच्यावर अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया पार पडते. लेखिका पतीच्या उपचारांसाठी पैशांची कशीबशी सोय करते. पण, कोणतेही संकट एकटे येत नाही. शस्त्रक्रिया पार पडते खरी, पण डॉक्टरांच्या प्रकृतीत म्हणावे तसे सकारात्मक बदल दिसत नाहीत. नक्की काय झाले असावे, याचा अंदाज घराच्या मंडळींनाही येत नाही.

डॉक्टरांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चाललेली. संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात ‘गरिबांचा डॉक्टर’ म्हणून ज्यांनी शेकडो रुग्णांना आजारातून बाहेर काढले, त्या डॉक्टरांच्याच आजाराचे नेमके निदान होत नव्हते. पुढच्या ऑपरेशननंतर ते बरे होतील, अशी शाश्वती रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर देत असतात.

कोणताही रुग्ण एखाद्या मोठ्या रुग्णालयात खूप विश्वासाने भरती होत असतो. “आपण निश्चित बरे होऊ” ही आशा त्यांना तिथे घेऊन येते आणि ती त्याला जगवतही असते. इथे तर एक डॉक्टरच रुग्णशय्येवर होते. तरीही हे असे काय झाले? तीन ऑपरेशन होऊनही ते बरे का होऊ शकले नाहीत? नेमके कुठे आणि काय चुकले? अत्यवस्थ, असहाय अवस्थेतील या डॉक्टरांनाच दोन-अडीच महिन्यांनंतर ‘इच्छामरण’ का मागावे लागले? रुग्णसेवेसाठी गौरवलेल्या डॉक्टरांची ही स्थिती असेल, तर सामान्यांचे काय? अशा अनेक प्रश्नांचा कल्लोळ उठलेला असतानाच डॉ. भारत जगाचा निरोप घेतात…

संगीता आणि दोन्ही मुलांसाठी हा काळ प्रचंड जिकीरीचा होता. त्यांनी हा धक्का कसा सहन केला असेल, याची कल्पनाही करवत नाही. वेळेत आणि योग्य उपचार किती महत्त्वाचे असतात, हे या पुस्तकातून स्पष्ट होतेच; पण ते न मिळाल्याने इच्छामरण मागावे लागणे, यापेक्षा मोठी शोकांतिका नाही. पती निधनाच्या मोठ्या धक्क्यातून सावरत लेखिकेने खूप धैर्याने ही वास्तवकथा वाचकांसमोर उभी केली आहे. मदतीबाबत सरकारने दाखवलेली अनास्था.. संकटकाळी विरुद्ध दिशेने फिरणारे जवळच्या माणसांचे खरे चेहरे.. वैद्यकीय खर्चाचा न पेलवणारा भार आणि त्या बदल्यात अनुभवलेली उपचारातील हलगर्जी… परिस्थितीपुढे हतबद्ध होऊन आकाशाकडे खिन्नपणे पाहणाऱ्या लेखिकेच्या डोळ्यांत यापैकी नक्की काय असेल..? कदाचित या सगळ्याच गोष्टींचा एक अक्राळविक्राळ कोलाज असावा.. कधीही धूसर न होणारा…

पुस्तकाचे नाव : इच्छामरण – एक सत्यकथा लेखिका : संगीता भारत लोटे प्रकाशक : न्यू इरा पब्लिशिंग हाउस पाने : २८६, किंमत : रु. ३५०

(संपर्कः swapnilkashi566@gmail.com)



Source link

निफ्टी २४,००० अंशांची पातळी ओलंडणार का?

0
निफ्टी २४,००० अंशांची पातळी ओलंडणार का?


सरलेल्या दोन महिन्यांत गुंतवणूकदारांना मंदीने जे दाहक चटके दिले त्यात गुंतवणूकदारांचे आर्थिक, मानसिक स्वास्थ्य बिघडले आहे. ९ एप्रिलच्या संध्याकाळी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय जनक्षोभांपुढे अमेरिकेच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अतिरिक्त व्यापार शुल्क आकारणीचा निर्णय तीन महिन्यांनी पुढे ढकलण्याची घोषणा करताच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील भांडवली बाजारात तेजीचा फेर तर धरला. पण आपल्याकडे सरलेल्या सप्ताहातील तेजीच्या आतषबाजीने दाहक मंदीच्या ज्वाळांनी होरपळलेल्या गुंतवणूकदारांच्या मनात आता चालू असलेल्या तेजीबद्दल जीवनात ही घडी अशीच राहू दे, ही भावना निर्माण होणे साहजिकच आहे.

आता चालू असलेल्या तेजीत निफ्टी निर्देशांकाला २३,९०० ते २४,३०० अंशांचा अवघड टप्पा असून या पातळीवरून एक हलकीफुलकी घसरण अपेक्षित असून त्या घसरणीच प्रथम खालचे लक्ष्य २३,५०० ते २३,३०० हे द्वितीय खालचे लक्ष्य २३,००० असेल.या पातळीचा आधार घेत निफ्टी निर्देशांकांचे वरचे लक्ष्य २४,५०० ते २४,८०० असेल.

लोकसभेच्या निवडणुकीनंतर निर्देशांक नीचांकापासून दुप्पट होतो हे गृहीतक काळाच्या कसोटीवर तपासून पाहूया. दि. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या कारकीर्दीच्या उत्तरार्धात ३० ऑगस्ट २०१३ मध्ये सेन्सेक्स १७,४४८ व निफ्टी निर्देशांक ५,११८ पातळीवर होता. विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रथम कालखंडाचा आढावा घेताना, संपूर्ण अर्थव्यवस्थेला हादरा देणारी घटना ८ नोव्हेंबर २०१६ च्या रात्री घडली. आपल्या हातातील पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटेचे निश्चलनीकरण करण्यात आले, तो दिवस.आजही आठवून पहा.. मूलभूत, जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी पैशाची चणचण, चलनातून बाद झालेल्या नोटा बदलताना झालेले अतोनात हाल, लघुउद्योगांना खेळत्या भांडवलाची चणचण अशा वेळेला भांडवली बाजारातील गुंतवणूक वगैरे फार दूरची गोष्ट. या धक्क्यात देखील डिसेंबर २०१६ च्या अखेरीस सेन्सेक्स २५,७५३ तर निफ्टी निर्देशांक ७,८९३ स्थिरावला. या पातळीचा आधार घेत २३ फेब्रुवारी २०१८ ला सेन्सेक्स ३६,४४३ व निफ्टी निर्देशांक ११,१७१ च्या उच्चांकावर झेपावला,जो वर्ष २०१३ च्या नीचांकापासून दुप्पट झाला. (क्रमशः)

हेही वाचा

‘बातमीतील समभाग’

एखादी कंपनी तिच्या कामगिरीवर, कर्तृत्वावर त्या क्षेत्रात मापदंड निर्माण करत असते. अशा प्रथितयश कंपन्यांचा शब्द, संचालक मंडळाचे भविष्यकालीन मार्गदर्शन हा त्या क्षेत्रासाठी मार्गदर्शक ठरत असतो. अशा कंपन्यांना तावूनसुलाखून आपलं श्रेष्ठत्व पुन्हा सिद्ध करण्याची संधी म्हणजे कंपन्यांचे तिमाही आर्थिक निकाल. ज्या कंपन्यांचे तिमाही आर्थिक निकाल उत्कृष्ट असतील ते समभाग बातमीत झळकणार. ‘तिमाही निकालांच्या पूर्वसंध्येला’ या प्रथितयश कंपन्यांचा- त्यांच्या समभागांचा ‘बाजार तंत्रकलाच्या’अंगाने घेतलेला आढावा.

१) एसीसी लिमिटेड

१७ एप्रिलचा बंद भाव- २,०६१.७०रु.

तिमाही वित्तीय निकाल:- गुरुवार, २४ एप्रिल

महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर:-२,२०० रु.

निकाल उत्कृष्ट असल्यास – त्या सकारात्मक वृत्ताच्या जोरावर समभागाकडून २,२०० रुपयांचा स्तर पार करत, प्रथम वरचे लक्ष्य २,३०० रुपये, द्वितीय लक्ष्य २,४०० रुपये.

निराशादायक निकाल असल्यास – २,२०० रुपयांच्या केंद्रबिंदू स्तराखालीच राहत १,९०० रुपयांपर्यंत घसरण

२) अँक्सिस बँक लिमिटेड

१७ एप्रिलचा बंद भाव -१,१९०.८०रु.

तिमाही वित्तीय निकाल:-गुरुवार,२४ एप्रिल

महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर:-१,२०० रु.

निकाल उत्कृष्ट असल्यास – त्या सकारात्मक बातमीच्या जोरावर समभागाकडून १,२०० रुपयांचा स्तर पार करत, प्रथम वरचे लक्ष्य १,२८० रुपये, द्वितीय लक्ष्य १.३३५ रुपये.

निराशादायक निकाल – १,२०० रुपयांच्या केंद्रबिंदू स्तराखाली राहत १,०५० रुपयांपर्यंत घसरण

हेही वाचा

३)हिंदुस्थान युनिलिवर लिमिटेड

१७ एप्रिलचा बंद भाव-२,३७५ रु.

तिमाही वित्तीय निकाल – गुरुवार,२४ एप्रिल

महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर:-२,३३० रु.

निकाल उत्कृष्ट असल्यास – समभागाकडून २,३३० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य २,५०० रुपये, द्वितीय लक्ष्य २,६०० रुपये.

निराशादायक निकाल असल्यास – २,३३० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत २,२५० रुपयांपर्यंत घसरण

आशीष ठाकूर

लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत.

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती:-शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी‘स्टाॅप लाॅस’आणी इच्छित लक्ष्य या संकल्पनांचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.



Source link

सत्य, पारदर्शकता आणि तंत्रज्ञान यांची सांगड घालणारी पत्रकारिता ही काळाची गरज – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
सत्य, पारदर्शकता आणि तंत्रज्ञान यांची सांगड घालणारी पत्रकारिता ही काळाची गरज – उपमुख्यमंत्री अजित पवार

सातारा | साहस Times | 19 एप्रिल 2025
पत्रकारिता ही केवळ बातमी पोहोचवण्याचे माध्यम नसून ती समाजप्रबोधनाचे प्रभावी साधन आहे. तुमची लेखणी सत्याला साथ देणारी, समाजाला दिशा देणारी असली पाहिजे आणि त्यात पारदर्शकतेबरोबरच नैतिकताही असावी, असे स्पष्ट प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकीहाळ यांच्या गौरव समारंभात ते बोलत होते. मावळा फौंडेशन आणि जिल्ह्यातील साहित्यिक-प्रवृत्त पत्रकारांच्या वतीने हा समारंभ आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार होते.

यावेळी मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील, आमदार सचिन पाटील, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, अधिस्वीकृतीचे अध्यक्ष हरीश पाटणे, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, पत्रकारांनी बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेत नवीन तंत्र आत्मसात करावे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आता पत्रकारितेतही वापरली जात आहे, त्यामुळे ती अवगत करणे आवश्यक आहे. पत्रकारितेतील मूल्ये केवळ पत्रकारच जपू शकतात. पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यांना आळा बसावा यासाठी सरकारकडून कायदेशीर संरक्षणाचे प्रयत्न केले जात आहेत, असेही त्यांनी सांगितले.

पत्रकार सन्मान निधी दुप्पट
“आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेअंतर्गत दिला जाणारा मासिक निधी 11 हजार रुपये होता. आता तो वाढवून 20 हजार रुपये करण्यात आला आहे,” अशी महत्त्वपूर्ण घोषणा उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी केली. तसेच, शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सव पत्रकार कल्याण निधीच्या माध्यमातून पत्रकार कुटुंबीयांना मदतीचे हात पुढे करण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

रवींद्र बेडकीहाळ यांचे कार्य प्रेरणादायी
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्यात रवींद्र बेडकीहाळ यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे पवार म्हणाले. पत्रकारितेला समाजप्रबोधनाचे साधन मानून त्यांनी लेखणीच्या माध्यमातून शिक्षण, संस्कृती आणि सामाजिक प्रश्नांवर प्रकाशझोत टाकला. मर्दे येथील बा. सी. मर्डेकर यांच्या स्मारकासाठी त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे स्मारक पूर्ण झाले असून लवकरच त्याचे लोकार्पण होणार आहे.

पत्रकारांचा विचारस्वातंत्र्यावर विश्वास – मकरंद पाटील
मकरंद पाटील यांनी पत्रकार व साहित्यिक कोणत्याही एका विचारसरणीशी बांधील नसतात, असे नमूद करताना बेडकीहाळ यांनी नेहमीच निर्भीडपणे सत्य मांडले, असे गौरवोद्गार काढले.

सत्काराला उत्तर देताना बेडकीहाळ म्हणाले…
“सन्मान निधी वाढवण्याचा निर्णय माझ्या मागणीनंतर घेण्यात आला. बा. सी. मळेकर स्मारकासाठी साडेबत्तीस लाख रुपयांचा निधी मिळवून देण्यात आला आहे,” असे सांगताना त्यांनी या पुढील लोकार्पणासाठी सरकारच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी केले. अनेक साहित्यिक, पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“दहा वर्षांनंतर छत्रपती साखर कारखान्याची निवडणूक रंगतदार; उमेदवारांच्या मुलाखतीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः मैदानात”

0
“दहा वर्षांनंतर छत्रपती साखर कारखान्याची निवडणूक रंगतदार; उमेदवारांच्या मुलाखतीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः मैदानात”

बारामती : छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीस आता खऱ्या अर्थाने रंग चढू लागला आहे. तब्बल दहा वर्षांनंतर होणाऱ्या या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनलची मोर्चेबांधणी वेग घेत आहे. उमेदवारीस इच्छुक असलेल्या व्यक्तींच्या मुलाखती घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः पुढाकार घेत असून, गुरुवार, दि. २४ एप्रिल रोजी बारामती येथे या मुलाखती होणार आहेत. क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे हेही यावेळी उपस्थित राहणार असून, यासंदर्भात माहिती राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक व माजी नगरसेवक किरण गुजर यांनी दिली.

कारखान्याची नव्याने उर्जितावस्था साधण्यासाठी अजित पवार यांनी ही निवडणूक बिनविरोध करण्याचे संकेत दिले आहेत. विशेष म्हणजे पुढील पाच वर्षांसाठी कारखान्याची जबाबदारी पृथ्वीराज जाचक यांच्याकडे सोपवली जाणार असल्याचेही अजितदादांनी स्पष्ट केले आहे. या भूमिकेला खासदार सुप्रिया सुळे यांचा पाठिंबा मिळाल्यामुळे ही निवडणूक एकतर्फी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, अनेक इच्छुकांनी राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलकडून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मुलाखतीचे ठिकाण बारामती शहरात निश्चित करण्यात येणार असून लवकरच त्याबाबतची अधिकृत घोषणा होणार आहे.

‘आर्यभट्ट’ची पन्नाशी; पुढे?

0
‘आर्यभट्ट’ची पन्नाशी; पुढे?


डॉ. वरुण भालेराव

गेल्या काही दिवसांत आपण अंतराळवीरांबाबत तीन वेगवेगळ्या बातम्या ऐकल्या असतील. त्यातली पहिली आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात या वर्षी पहिला भारतीय भेट देईल त्याविषयीची. ‘अॅक्झिअम मिशन-४’ अंतर्गत त्याचा अंतराळात अभ्यास चालेल. दुसरी बातमी ‘गगनयान मिशन’मध्ये पुढील वर्षी भारत स्वत:च्या रॉकेटच्या साह्याने आपला अंतराळवीर अवकाशात पाठवेल, त्याबाबतची. तिसरी म्हणजे तब्बल नऊ महिने अंतराळात अडकल्यानंतर मार्च महिन्यात सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर अखेर पृथ्वीवर परत आले, त्याबाबत जगभरातील माध्यमांतून आनंद साजरा करण्यात आला त्याची.

अंतराळ हे आपल्या सगळ्यांना लांबच लांब असल्याचे वाटत असले, तरी सर्वांसाठी त्याबाबतचे कुतूहल आणि जिव्हाळा सारख्याच प्रमाणात दिसतो. आकड्यांच्या भाषेत शोधले तर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक हे पृथ्वीपासून साधारणत: चार-पाचशे किमी इतक्या अंतरावर आहे. म्हणजे साधारणत: मुंबई-नागपूूर इतक्या अंतराएवढीच ही उंची. त्यापेक्षा कमी अंतरावर जेव्हा सुनीता विल्यम्स होत्या, तेव्हासुद्धा अमेरिकेसारखा देश- जो साठच्या दशकापासून मानवासह अंतराळ कार्यक्रम राबवतोय त्यांना विल्यम्स यांच्या उतरण्यातील अडचणी सोडविण्यासाठी नऊ महिने लागले. हे इतके अवघड नेमके कशामुळे बनले होते? तर अंतराळ ही मनुष्याला ज्ञात वातावरणापेक्षा सर्वाधिक कठीण वातावरण असलेली बाब. तिथे बाहेर निर्वात अवस्था. सूर्याकडून येणाऱ्या किरणांचा जाचदेखील. पण सर्वात कठीण गोष्ट म्हणजे वेग जमवून ठेवणे आणि त्या वेगाने अंतराळातील इतर कोणत्या घटकांशी टक्कर होण्यापासून स्वत:ला वाचवणे. हे सगळे इतके किचकट असतानादेखील आपण असे म्हणत आहोत की, पुढील वर्षी भारताच्या स्वत:च्या अंतराळ मोहिमेचा आरंभ होईल. अन् त्यात भारतीय अंतराळवीराला आपण अवकाशात पाठवू. हे आपण नक्की कसे करू शकणार? तर त्यासाठी आपल्या अवकाश मोहिमेच्या विकासाच्या विविध टप्प्यांकडे पाहावे लागेल.

साठच्या दशकात आपण अंतराळ संशोधनात पाऊल ठेवले. १९६२ मध्ये ‘इन्कोस्पार’ म्हणजे भारतीय राष्ट्रीय अवकाश संशोधन समितीची स्थापना झाली. विक्रम साराभाई यांच्या नेतृत्वाखाली या समितीने काम केले. पुढे त्याचे (१९६९) ‘इस्राो’मध्ये रूपांतर झाले. साठचे दशक हे देशासाठी कठीण होते. चीन आणि पाकिस्तानशी याच काळात युद्ध झाले. अन्न-धान्य टंचाई निर्माण झाली. त्यानंतर ‘जय जवान जय किसान’ ही घोषणा लोकप्रिय बनली. याच वेळी काही शास्त्रज्ञांचे म्हणणे होते की, देशाची प्रगती करायची असेल तर भारताला स्वत:चा ‘अंतराळ कार्यक्रम’ ठरविणे गरजेचे आहे. जगाच्या दृष्टीने भारताची बुद्धिमत्ता सिद्ध करण्याचा तो मार्ग ठरेल. या दृष्टीने विचार करून त्यांनी भारतात पहिले अवकाश संशोधन सुरू केले. त्यात कालांतराने प्रगती होत राहिली. त्यानंतर काही अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. आपल्याला कृत्रिम उपग्रह, अंतराळयान बनवायचे आहेत हे तर ठरले होतेच, पण या सर्व संशोधनाचे ध्येय हे १०० टक्के नागरी उपयोगाकरिता ठेवण्यात आले. जगातील अनेक राष्ट्रांमध्ये संरक्षण आणि नागरी उपयोजन या दोन्ही बाबी अंतराळ संशोधन केंद्रात राबविल्या जातात. भारताने मात्र या दोन्ही गोष्टी परस्परांपासून वेगळ्या केल्या. हौस किंवा संशोधनचूष म्हणून अवकाश अभ्यास आपण स्वीकारला नाही, तर त्यातून देशाचे काही तरी भले व्हायला हवे, हा दृष्टिकोन या संशोधनाबाबत कायम ठेवला. त्या सगळ्याची चांगली फळे आपल्याला आज मिळत आहेत.

आपल्या अवकाश संशोधनाचे उपयोजन हे युद्धासाठी होणार नव्हते. जनसामान्यांसाठी त्याचा वापर होणार होता, त्यामुळे सुरुवातीला आपल्याला अनेक बाजूंनी आंतरराष्ट्रीय सहकार्य मिळाले. बऱ्याच देशांनी आपल्याला मदत केली. त्यांच्या संशोधकांनी आपल्याला तंत्रज्ञानाची माहिती पुरवली. रॉकेट्स आणि उपग्रह तयार करण्याचे ज्ञान आपल्याला या मित्रराष्ट्रांकडून विकसित करता आले. त्यामुळे १९ एप्रिल १९७५ रोजी पहिला भारतीय कृत्रिम उपग्रह ‘आर्यभट्ट-१’ भारताने रशियाच्या मदतीने अवकाशात सोडला. सोव्हियत संघराज्यातील आणि आताच्या रशियामधील ‘कापुस्टीन यार’ या अवकाश केंद्रावरून १९ एप्रिल १९७५ रोजी त्याचे उड्डाण झाले. हा भारताकडून एक खगोलशास्त्रीय प्रयोग होता. ‘क्ष’ किरणे सोडणाऱ्या विविध स्राोतांसह सूर्याचा अभ्यास त्यातून होणार होता. त्या काळात आर्यभट्टवर जे काम केले गेले, त्यातून आपल्या संशोधकांना विविध प्रकारचे उपग्रह कसे बनविण्यात येतात, त्याच्या आतील प्रणाली काय असतात, त्या कशा चालवाव्यात, अंतराळातून माहितीचा तपशील (विदा) पृथ्वीवर कसा आणावा याबद्दलचा उलगडा झाला. त्यातून आपण ‘आयआरएस’ (इंडियन रिमोट सेन्सिंग) आणि ‘इन्सॅट’ (इंडियन नॅशनल सॅटेलाइट सिस्टीम) मालिकेतील उपग्रह आणि इतर अनेक उपग्रहांची निर्मिती केली. ‘रॉकेट तंत्रज्ञान’ आपण परदेशातून आयात केले, त्यातून शिकत शिकत पुढे उपग्रह प्रक्षेपक (सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल, पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल, जिओसिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल) आपण स्वत: तयार केले. ‘जीएसएलव्ही’साठी (भू-समकालिक उपग्रह प्रक्षेपक) आपल्याला क्रायोजनिक तंत्रज्ञानाची गरज होती. ते आपल्याला जगातून कुणीच द्यायला तयार नव्हते; तेव्हा आपल्या संशोधकांनी स्वत: त्याबाबतचे पूर्ण तंत्रज्ञान भारतातच विकसित केले. आता त्याआधारे भारताचे भरपूर उपग्रह आणि रॉकेट्स वापरात आहेत.

या अंतराळ कार्यक्रमांचा फायदा नागरी उपयोजनाच्या आपल्या भूमिकेमुळे आपल्या प्रत्येकाला होतोय. तो कसा? तर साधारणत: २५ वर्षांपूर्वी दरसाली चक्रीवादळाच्या तडाख्यांची बातमी हमखास वाचायला मिळत असे. चक्रीवादळामुळे जीवितहानी, किनाऱ्यालगतच्या घरांचे नुकसान, गावांची धूळधाण, मच्छीमारांसह बुडणाऱ्या होड्या या दुर्घटना आपल्याला रोखता येणे अशक्य होते. कारण त्यांचे अचूक भाकीत आपल्याला करता येत नव्हते. आता आपल्याला या बातम्या वाचायला मिळत नाहीत. कारण आपल्या उपग्रहांनी पाठविलेल्या माहितीद्वारे चक्रीवादळ तसेच हवामानाचा अचूक अंदाज काढता येतो. सध्या हवामान विचित्र अवतार धारण करतेय. चक्रीवादळे वाढत चालली आहेत. पण हवामान मापन करणारे आपले उपग्रह आपल्याला सजग ठेवतात, त्यामुळे नैसर्गिक आपत्तीकाळात बचावकार्य आधीपासून सक्रिय झालेले असते. त्यांतून प्राण आणि वित्तहानीचे संरक्षण करता येणे शक्य झाले आहे. दैनंदिन वापराच्या क्षेत्रातही उपग्रह वाहिन्या आपण टीव्हीवरून रोज पाहतो. त्यादेखील आपण स्वत: बनवून अवकाशात सोडलेल्या आहेत. अनेकांना कदाचित माहिती नसेल की, ‘इस्राो’चे ‘भुवन’ नावाचे एक संकेतस्थळ आहे. त्यात इस्राोच्या कार्यप्रणालीचा विदा (तपशील) डाऊनलोड करून आपल्याला वापरता येते. आपला अंतराळ कार्यक्रम नागरी उपयोगासाठी नसता तर हे केवळ अशक्य होते. आपल्या सगळ्यांच्या मोबाइलमध्ये ‘जीपीएस’ (ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम) असते, ती पूर्णत: परदेशी प्रणाली आहे. त्याऐवजी भारताने ‘नाविक’ आणि ‘आयआरएनएसएस’ (इंडियन रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम) काही वर्षांपूर्वी विकसित केली आहे. त्यामुळे भारताचे आता यासाठी इतर देशांवरील अवलंबित्व बिलकूलच नाही. आपली स्वत:ची ‘जीपीएस’ यंत्रणादेखील आपण उभारलेली आहे.

चंद्रयान, मंगळयान या मोहिमांबद्दल आपण माध्यमांतून बरेच ऐकलेले आहे. ‘आदित्य एल-१’, ‘अॅस्ट्रोसॅट’ यांसारख्या खगोलीय उपग्रहांचीदेखील अनेकांना माहिती असते. त्यांतून येणाऱ्या माहितीचा, होणाऱ्या अभ्यासाचा विषय शास्त्रज्ञांच्या मंथनापर्यंत सीमित असला तरी त्यामुळेदेखील आपल्या शास्त्रज्ञांची आणि आपल्या खगोल विज्ञानातील जाणिवांची महत्ता जागतिक पातळीवर वाढली. उदा. चंद्रयान-३ जेव्हा चंद्रावर उतरले तेव्हा तंत्रज्ञानाच्या दृष्टीने आपल्यासाठी हा महत्त्वाचा टप्पा होता. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या जवळ उतरणारी ही पहिलीच यशस्वी मोहीम होती. तिथे जाऊन चंद्रयानाच्या विविध उपकरणांनी जे मापन केले, त्यातून चंद्र कसा निर्माण झाला, त्याचा भौगोलिक इतिहास काय, याबाबतची संपूर्ण जगाची समज बदलणारी विदा-माहिती (डेटा) आपल्याला प्राप्त झाली. आपल्या सगळ्या उपग्रहांतून वैज्ञानिकदृष्ट्या महत्त्वाचे शोध लागतायत.

आता भारतीय अंतराळ कार्यक्रम हा जगाच्या खांद्याला खांदा भिडवत पुढे चाललेला आहे. आज परिस्थिती अशी आहे की, विविध देशांतील संशोधकांना भारतीय अंतराळ संशोधकांबरोबर काम करण्याची इच्छा आहे. कारण आपल्याकडेदेखील त्यांच्याच तोडीचे विज्ञान, तंत्रज्ञान, तंत्रज्ञ उपलब्ध आहेत. पूर्वी आपल्याला अंतराळ विज्ञानात तितके महत्त्व दिले जात नव्हते. आता आपल्याकडे जगाकडून संशोधन साहाय्यक (पार्टनर्स) म्हणून पाहिले जाते. या विज्ञान-तंत्रज्ञान सहकार्यामध्ये आपण सगळ्यांबरोबर काम करीत आहोतच, पण आपल्याला जगाच्या पुढे जायची इच्छा आहे. अंतराळ तंत्रज्ञानात आपल्याकडे गेल्या काही पिढ्यांमधील शास्त्रज्ञांनी जे काम करून ठेवलेले आहे, त्या पायावर आजची पिढी आणखी पुढे जायची स्वप्ने बघत आहे.

याचे सर्वात ताजे उदाहरण घ्यायचे झाले, तर ‘दक्ष’ नावाची खगोल दुर्बीण (स्पेस टेलिस्कोप) बनवायचा प्रस्ताव काही शास्त्रज्ञांनी एकत्र येऊन सादर केला. त्यावर ‘इस्राो’ सध्या विचार करीत आहे. खगोल दुर्बीण म्हणजे काय, तर साध्या दुर्बिणीचा आपण विचार करतो, तेव्हा सहसा दृश्य प्रकाशात (ऑप्टिकल लाइट) काम करणारी हा तिचा साधारण अर्थ. त्या बहुतांश जमिनीवरच्याच अभिप्रेत असतात. मात्र खगोलीय स्राोतांचा विचार करताना दृश्य प्रकारांबरोबरच अवरक्त किरण (इन्फ्रारेड रेज), अतिनील किरण (अल्ट्राव्हायोलेट) रेडिओ, एक्स-रे, गॅमा रेच्या विविध तरंगलांबीच्या प्रकाशाचे उत्सर्जन होते. यातील एक्स-रे, गॅमा रे प्रकाश हा पृथ्वीच्या वातावरणात पूर्णपणे शोषला जातो. जमिनीपर्यंत पूर्ण पोहोचत नाही. त्यामुळे त्या तरंगलांबींमध्ये स्राोतांचा अभ्यास करायचा असेल तर आपल्याला अंतराळात जाणे अनिवार्य असते. त्यासाठी वेगवेगळ्या देशांनी विविध प्रकारच्या खगोल दुर्बिणी अंतराळात सोडल्या आहेत. साधारण दहा वर्षांपूर्वी भारताकडून सोडण्यात आलेली ‘अॅस्ट्रोसॅट’ ही दुर्बीण याच प्रकारातील. त्यातून अनेक महत्त्वपूर्ण शोध लागले आहेत. आता, आयआयटी मुंबई, पीआरएल अहमदाबाद, आयुका पुणे आणि बेंगळूरुचे रमण रिसर्च इन्स्टिट्यूट या चार संस्थांनी इस्राोच्या साह्याने ‘दक्ष’ नावाच्या एक्स-रे आणि गॅमा रे यांच्यावर काम करणाऱ्या दोन खगोल दुर्बिणी या अंतराळात प्रक्षेपित करण्याचे प्रस्तावित आहे. जगात कुठल्याही देशाने बनविलेल्या दुर्बिणींपेक्षा या दुर्बिणींचे तंत्रज्ञान हे दहा पटींनी सक्षम असेल. ‘इस्राो’ने इतकी दशके जे कष्ट केले आणि भारतीय अंतराळ कार्यक्रमाला जगात ज्या उंचीवर नेले, त्यामुळे आपण जगाच्या बरोबरीनेच नाही, तर पुढेच जायचे स्वप्न पाहत आहोत.

हे सारे झाले इस्राोचे कार्य. आता यापुढे काय असेल?

तर जगभरात अंतराळ विज्ञान हा झपाट्याने वाढणारा आणि प्रगतीचा विषय ठरतोय. ‘स्पेस एक्स’ कंपनीच्या ‘स्टारलिंक’ उपग्रहाबद्दलची चर्चा गेल्या काही वर्षांत जोरात सुरू आहे. गेल्या पन्नास वर्षांत काही देशांनी मिळून जिथे आजपर्यंत काही हजार उपग्रह सोडले, तिथेच आता खासगी कंपन्या हजारो उपग्रह सोडण्याची स्वप्ने बघत आहेत. उपग्रह आणि रॉकेट बनविण्याची जबाबदारी पूर्वी देशाची आणि सरकारी यंत्रणांची असे, त्या क्षेत्रात आज खासगी कंपन्यांची गुंतवणूक घडत आहे. याच गोष्टीचा भारतीय खासगी कंपन्यांना लाभ घेता यावा म्हणून सरकारने ‘इनस्पेस’ म्हणजेच इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अॅण्ड ऑथरायझेशन सेंटर’ अशी नवी संस्था उभारली. ज्याद्वारे भारतातील वेगवेगळ्या कंपन्या आणि नवउद्यामी (स्टार्टअप्स) यांना उपग्रह, रॉकेट्स यांच्यासाठी काम करण्यास प्रोत्साहन देण्यात येत आहे. सध्या भारतात चारशेहून अधिक स्टार्टअप्स कंपन्या अंतराळ आणि त्यासंबंधित तंत्रज्ञानावर काम करीत आहेत. रॉकेट बनविण्यापासून ते उपग्रहांपासून मिळणाऱ्या विदांचा अभ्यास करणे, पर्यावरण भाकितांवर काम करण्यापासून भूमापनासंबंधित बाबींचा तपशील एकत्र करणे असे त्यांच्या कामाचे स्वरूप आहे. बिघाड झालेल्या उपग्रहांना अवकाशातच दुरुस्त करता येईल का, जे उपग्रह बंद पडलेत त्यांना बाजूला करता येईल का, यावरही ही स्टार्टअप्स काम करीत आहेत. हे सगळे मिळूनच आपल्या भारतीय अंतराळ तंत्रज्ञानाला आणखी पुढे पोहोचवतील यात जराही शंका नाही.

अवकाश विज्ञान विकासाचे टप्पे…

– ‘इस्रो’ची निर्मिती

‘इन्कोस्पार’ म्हणजे भारतीय राष्ट्रीय अवकाश संशोधन समितीची १९६२ मध्ये स्थापना झाली. तिचे १५ ऑगस्ट १९६९ रोजी ‘इस्रो’मध्ये म्हणजेच ‘इंडियान स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन’मध्ये रुपांतर झाले. विविध राष्ट्रीय गरजांसाठी अंतराळ तंत्रज्ञानाचा विकास तसेच उपयोग हे ‘इस्रो’चे मुख्य ध्येय

– उपग्रह कार्यक्रम

भारताच्या उपग्रह कार्यक्रमाची सुरुवात ही खऱ्या अर्थाने १९ एप्रिल १९७५ रोजी झाली. रशियाच्या मदतीने आपण इतिहासात पहिल्यांदा ‘आर्यभट्ट’ हा उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केला. उपग्रह निर्मिती तसेच प्रक्षेपण क्षमता दाखवून देण्यासाठी भारताने केलेला हा प्रयोग. ‘क्ष’ किरणे उत्सर्जित करणाऱ्या विविध स्रोतांसह सूर्याचा अभ्यास या उपग्रहाद्वारे झाला. भारतीय शास्त्रज्ञांचा आत्मविश्वास यातून दुणावला आणि अंतराळ कार्यक्रमाच्या प्रगतीची दारे उघडली गेली.

– आयआरएस आणि इन्सॅट

‘इंडियन रिमोट सेन्सिंग’ उपग्रह किंवा ‘आयआरएस’ ही इस्रोद्वारे अवकाशात सोडण्यात आलेली उपग्रहांची मालिका. त्यांचा आरंभ १९८८ पासून झाला आणि २०१९ पर्यंत भारतातील नैसर्गिक संपदेचे निरीक्षण या उपग्रहांमार्फत झाले. जल व्यवस्थापन, शहरी विकास, पर्यावरण संरक्षण, आपत्ती व्यवस्थापनाकरिता त्याचा वापर झाला. ‘इन्सॅट’ म्हणजे ‘इंडियन नॅशनल सॅटेलाईट सिस्टिम’ त्यांचे प्रक्षेपण १९८३ पासून सुरू झाले. दूरसंचार सेवा सक्षम करण्यासाठी, हवामानशास्त्रात अधिक प्रगती करण्यासाठी आणि आपत्तींमधील बचावकार्यात या उपग्रहांचा उपयोग झाला.

– ‘पीएसएलव्ही’ प्रक्षेपक…

‘ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन’ म्हणजेच ‘पीएसएलव्ही’ हे ‘लिक्विड स्टेज’ (तरल टप्पे) असलेले पहिले भारतीय उपग्रह प्रक्षेपक मानले जाते. १९९४ पासून त्याचा आरंभ झाला. पीएसएलव्हीद्वारे भारतीय तसेच परदेशी उपग्रह यशस्वीरीत्या प्रक्षेपित करण्यात आले. चंद्रयान – १ आणि ‘मार्स ऑर्बिटर’ हे त्याद्वारेच अवकाशात सोडले गेले.

– ‘जीएसएलव्ही’ प्रक्षेपक

‘जीएसएलव्ही’ म्हणजे भू-समकालिक उपग्रह प्रक्षेपक. इस्रोने केलेले हे स्वदेशी तंत्रक्षान. उपग्रहांना पृथ्वीच्या बाह्य कक्षेत (geosynchronous orbit) पोहोचवण्यासाठी ते मदत करते. दूरदर्शन, संचार आणि हवामान अंदाज यांसारख्या कामांसाठी सोडल्या जाणाऱ्या उपग्रहांना हे उपयुक्त ठरले. १८ एप्रिल २००१ रोजी त्याची पहिल्यांदा यशस्वी चाचणी झाली.

– क्रायोजेनिक तंत्रज्ञान

क्रायोजेनिक तंत्रज्ञान म्हणजे कमी तापमान. हा शब्द स्वत: शून्यापेक्षा कमी तापमानाच्या तंत्रज्ञानाबाबत वापरला जातो. अंतराळ कार्यक्रमाच्या प्रगतीसाठी याची आपल्याला आवश्यकता होती. फक्त अमेरिका, जपान, फ्रान्स, रशिया आणि चीनकडेच हे तंत्रज्ञान होते. आपल्याला या तंत्रज्ञानाची मदत नाकारण्यात आली. भारतीय शास्त्रज्ञांनी २००३ मध्ये पहिली यशस्वी क्रायोजेनिक इंजिन चाचणी करून हे तंत्रज्ञान स्वत:च विकसित केले.

– चंद्रयान – ३ चे यश

ऑगस्ट २०२३ मध्ये चंद्रयान -३ मोहीम यशस्वी झाली. या मोहिमेमुळे भारत चंद्राच्या दक्षिणी ध्रुवीय भागात यशस्वीरीत्या उतरणारा पहिला देश बनला. या मोहिमेत ‘विक्रम लॅण्डर’ आणि ‘प्रज्ञान रोवर’ चंद्रावर उतरले आणि त्यांनी चंद्राच्या पृष्ठभागावरील माहिती गोळा केली. चंद्र कसा निर्माण झाला, त्याचा भौगोलिक इतिहास याबाबतची संपूर्ण जगाची समज बदलणारी माहिती या मोहिमेतून मिळाली.

– आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात….

या वर्षी शुभांशू शुक्ला ‘अॅक्झिअम मिशन – ४’ अंतर्गत आंतराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहोचतील. आतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाणारे भारताचे ते पहिले अंतराळवीर ठरतील, इस्रोच्या गगनयान मोहिमेसाठी निवडलेल्या चार अंतराळवीरांपैकी एक म्हणून ते भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ उड्डाण प्रयत्नाचा भाग असणार आहेत.

– प्रस्तावित ‘दक्ष’ दुर्बीण…

आयआयटी मुंबई, पीआरएल अहमदाबाद, आयुका पुणे आणि बेंगळुरुचे रमण रिसर्च इन्स्टिट्यूट या चार संस्थांकडून इस्रोच्या साह्याने ‘दक्ष’ नावाच्या एक्स-रे आणि गॅमा रे यांच्यावर काम करणाऱ्या दोन खगोल दुर्बिणी या अंतराळात प्रक्षेपित करण्याचे प्रस्तावित आहे. जगातील परमोच्च शक्तीची ही दुर्बीण ठरेल.

– महत्त्वाचे दुवे….

‘इस्रो’चे ‘भुवन’ नावाचे संकेतस्थळ. त्याला भेट दिल्यास आपण अंतराळ विज्ञानात किती सक्षम झालो आहोत, याचा दाखला मिळू शकेल. दुसरा दुवा जगातील परमोच्च क्षमतेच्या भारतीय बनावटीच्या (प्रस्तावित असलेल्या) ‘दक्ष’ दुर्बिणीबाबतचा. त्याविषयीचा अधिक तपशील तेथे पाहता येईल –

https://bhuvan.nrsc.gov.in/home/index.php
https://www.dakshasat.in/

(लेखक ‘आयआयटी बॉम्बे’ येथील खगोलभौतिकशास्त्रज्ञ आहेत.)

varunb@iitb.ac.in



Source link

“जा रांझन रांझन तू भी क्या याद रखेगा…”, मायलेकीने गोड आवाजात गायलं गाणं, VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट

0
“जा रांझन रांझन तू भी क्या याद रखेगा…”, मायलेकीने गोड आवाजात गायलं गाणं, VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट



Viral Video mother and daughter singing Ja Ranjhan Ranjhan Tu Bhi Kya Yaad rakhega songs l “जा रांझन रांझन तू भी क्या याद रखेगा…”, मायलेकीने गोड आवाजात गायलं गाणं, VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट



Source link