Friday, July 24, 2026
Home Blog Page 387

व्यापक आशयाच्या कथा

0
व्यापक आशयाच्या कथा



स्नेहा अवसरीकर

गणेश मतकरी हे आजच्या काळात सातत्यपूर्ण लेखन करणाऱ्या लेखकांमधील महत्त्वाचं नाव. अलीकडेच प्रकाशित झालेला ‘तडा’ हा त्यांचा सहावा कथासंग्रह. या संग्रहात सुरुवातीला एक कोट दिलाय, त्याकडे लक्ष वेधलं जातं. ‘देअर इज अ क्रॅक, अ क्रॅक इन एव्हरीथिंग. दॅट्स हाऊ द लाइट गेट्स इन’ (लेनर्ड कोएन, अँथम). या पुस्तकातल्या कथेत असा क्रॅक आहे, तडा आहे, तो लेखकाला दिसला आहे आणि त्यातून त्याची कथा थेट समोर आलीय. ‘तडा’, ‘थाप’, ‘जॉब’, ‘ओळख’, ‘हद्द’, ‘सीक्रेट’, ‘फ्रेश स्टार्ट’, ‘नाउ यू सी मी’ या पुस्तकातल्या आठ कथा अशा रोजच्या जगण्यात नकळत तडा गेलेल्या घटनांच्या आहेत. या सगळ्याच कथा लेखकाचे या अगोदरचे लेखन विशेष अधोरेखित करणाऱ्या आहेतच, शिवाय या कथांमधून त्याची शैली, भाषा आणि लेखन विषय, कथन अधिक सराईत, उत्तम रीतीने समोर आले आहे. एकाच वेळी समकालीन भासणाऱ्या या कथा लिहीत असताना लेखक भूतकाळातल्या अनेक घटना, गोष्टी ज्या पद्धतीने लिहितो, मांडतो आहे, त्यावरून त्याचे कथालेखनावरचे प्रभुत्व जाणवते आहे.

‘तडा’ ही या संग्रहातली पहिली कथा. या कथेला हल्ली आपल्या आसपास नेहमी होत जाणाऱ्या रियुनियनची पार्श्वभूमी आहे. रियुनियनसाठी भेटणारे मित्र गावात पोचत असतानाच एका मित्राचा अपघात होतो. अर्थातच ठरलेला कार्यक्रम होतच नाही. कथेचा नायक अन् त्या सोबतचा मित्र, मित्राच्या अपघाताच्या निमित्ताने गावातल्या जुन्या ठिकाणी पोचतात. ओघाओघानेच गावातल्या कब्रस्तानातल्या अफवा आणि घटनांभोवती गप्पा सुरू असताना नायकाच्या आयुष्यातल्या जुन्या घटनेचा संदर्भ लागतो. काळ निघून गेल्यावर हाती लागलेल्या या नव्या सत्यानेच नायकाच्या जगण्याला तडा गेलेला दिसतो, अशी ही कथा. पण वाचकांना मात्र कथेतल्या घटितांचा शेवटपर्यंत थांग लागत नाही. सर्व काही सामसूम, शांततेत आणि सुरळीत घडत असताना नकळत त्या शांत वातावरणाला तडा जाणारी ही घटना नुसती समजते आणि आपल्या समोर लेखकाने न लिहिलेलं वेगळं नाट्य उभं राहतं. या नाट्यात लेखक फार सामील होताना दिसत नाहीच. केवळ काही दृश्यं वाचकांच्या कल्पनेतून साकार होतात. अन् एका वेगळ्या कथेचा अनुभव घेता येतो.

भूतकाळातल्या जुन्या घटना वर्तमानकाळात आणण्यासाठी लेखकाची लिहिण्याची जी रीत आहे ती फार रोचक आहे. कारण पात्र, भाषा, परिसर, वातावरण यात कुठलाही बदल न करता लेखक केवळ मानसिक आंदोलनातून या नव्या-जुन्या काळात सहज वावरतो. हे लेखकाचे विशेष कौशल्य म्हणावे लागेल. हीच नव्हे इतरही कथा समकालीन वातावरणात घडत असल्या तरी त्याला जुन्या स्मरणातल्या काळाचे, घटनांचे, पात्रांचे संदर्भ आणि सहभाग लेखक कुशलतेने रेखाटतो. लेखकाचे अनुभव, त्या अनुभवाला असणारा काळाचा बांध, स्मृती आणि आठवणी, भूतकाळात साठलेल्या गोष्टी वर्तमानात अचानक आठवणीत येत असताना त्याच वर्तमानात असणारं कनेक्शन… या सगळ्यांचा लेखक म्हणून केलेला विचार अत्यंत कुशलतेने केलेला दिसतो.

अत्यंत तटस्थतेने परिस्थिती चित्रित करणारी लेखकाची वृत्ती जेव्हा कथा विषयाच्या गरजेनुसार संवेदनशील, हळव्या जागा निर्माण करते तेव्हा फार प्रभावी ठरते. गणेश एकूणच कथा लेखनात अचूक कथा विषय मांडताना मधूनच एखाद्या वाक्यातून, पात्राच्या कृतीतून अशी वाचकांच्या मनाला स्पर्शून जाणारी जागा तयार करतात. आणि त्यातून कथेचा परिणाम साधला जातो.

याच संग्रहातली ‘फ्रेश स्टार्ट’ ही कथाही उल्लेखनीय. कथा विषय, आशय हा विषय काही वेळा बाजूला ठेवत कथेची हाताळणी लेखक किती प्रगल्भतेने करतो, याचं उदाहरण म्हणून या कथेकडे पाहता येईल. शिवाजी पार्कवर फिरणारा नायक त्याच्या आयुष्याकडे बघत असतो. शिक्षण, कॉलेज, आर्थिक परिस्थिती, स्वप्न, भविष्य, मित्र, घरातली ज्येष्ठ माणसं आणि या सगळ्यासह जगत असताना येणारे यश, अपयश याकडे नायक पाहत असतो. आपलीच जवळची मैत्रीण जवळच्या यशस्वी मित्राबरोबर लग्न करते, त्यामुळे तडा तर येतोच, पण नायक म्हणतो, सगळंच संपलं की नवी सुरुवात करता येते. फ्रेश स्टार्ट. तडा पडला की नवा प्रकाशही दिसतो.

गणेश चित्रपटांचे समीक्षक, अभ्यासक असल्याने असावे, त्यांची कथा अतिशय धिमेपणाने समोर येते- तीही अतिशय सिनेमॅटिक पद्धतीने. कथेच्या फ्रेम सलग समोर येतात, काहीही घडत नसताना एकदम नायकासह वाचकही एखाद्या गोष्टीला, घटनेला सामोरे जातात. अन् मग सगळी कथा प्रभावीपणे एकत्रित समोर येते. हे विशेष सांगावेसे वाटते.

बाकी गणेश यांची कथा वाचणं म्हणजे खरं तर ड्रायव्हरशेजारी बसून त्याचं सफाईदार ड्रायव्हिंग अनुभवत राहणं. ते फार सरप्राइज देत नाहीत. पण तरी शेवट कुठे घेऊन जातील, याचा अगोदर अंदाज लागत नाही. ते आडवळणाने कथा पुढे नेत गुंते तयार करत नाहीत. तरीही अतिशय उत्सुकतेने आपण त्यांच्या कथेमागे जात राहतो.

लेखक म्हणून अगदी सहज नोंदी करायच्या तर त्यांच्या लेखनात स्त्री पात्र फार उठून दिसत नाहीत. ती असतात, जाणवतात, त्यांचा रोलही महत्त्वाचा; पण गणेश ती फार नेटकेपणाने पुढे आणतात. त्यांच्या सगळ्या कथा प्रथम पुरुषी निवेदनात येतात, त्यामुळे त्यांना कथानायक नेमकेपणाने, नेटकेपणाने रेखाटता येतात. नायक अतिशय बुद्धिमान, संयमी, तटस्थ वृत्तीचे; आणि ते अतिशय संवेदनशील वृत्तीने समोर येतात. त्यांच्या कथांमधून कधीही फार आक्रस्ताळी, भडक वर्णने येत नाहीत. त्यांनी रेखाटलेली पात्रंही भाषेचा वापर फार नेमका करतात. त्यांच्या अलीकडच्या कथांत मधून मधून गूढ एलिमेंट असतो, पण तो तितकाच. त्यात कुठल्या अमानवी, अदृश्य किंवा अतार्किक घटना, दृश्य असत नाहीत. त्यांनी तार्किकतेचा नीट वापर जवळपास सगळ्या कथासूत्रात केलेला आहेच. अमुक एक विषय हाताळायचा म्हणून त्यांची कथा लिहिली जात नाही.

नवीन प्रयोग, वेगळे विषय अशा कशाचा आवेश, अभिनिवेश त्यांच्या कथेत असत नाही. ती अतिशय सहज, स्वाभाविकपणे समोर येते. रंजक आणि अचूक, वाचनीय कथा लिहिण्याच्या तंत्रावर लेखक म्हणून त्यांची मजबूत पकड असल्याने वाचकांनाही कथा वाचताना ती कायम गुंतवून ठेवते.

कमीत कमी पात्रं, कमीत कमी शब्दांत पात्रांची व्यक्तिमत्त्वं, फारशी गुंतागुंत नसतानाही नात्यातला वाढता ताण दाखवणारी दृश्यात्मकता आणि कुठल्याही जात धर्माची पार्श्वभूमी नसलेली निखळ पात्ररचना, आशय, कथेचा अवकाश अशा आणखीही काही नोंदी त्यांच्या कथेविषयी करता येतील. सहज सोपी साधी आणि अत्यंत आटोपशीर वाटणारी त्यांची कथा तितकी सोपी नाही हेही आवर्जून सांगायला हवं. दिवसेंदिवस गणेश मतकरी यांचं लेखन हे कथा साहित्यातले नवे आयाम शोधत रचना आणि आशयाच्या बाजूने आधिक व्यापक होत असलेलं दिसत आहेत.

‘तडा’ हा त्यांचा कथासंग्रह ही सगळी बलस्थानं अधोरेखित करणारा, मराठी कथा साहित्यात महत्त्वाचा ठरणारा आहे.

‘तडा’- गणेश मतकरी, रोहन प्रकाशन,

पाने-१८४, किंमत- ३७० रुपये.



Source link

Chaitra gauri kairi panha purple color balmaifal article loksatta बालमैफल : जांभळं पन्हं

0
Chaitra gauri kairi panha purple color balmaifal article loksatta बालमैफल : जांभळं पन्हं


‘‘आई, ए आई, कुठे आहेस तू!’’ मिताली आईला शोधत होती.

‘‘अगं मिनू, इथे स्वयंपाकघरात आहे. काय हवंय तुला?’’

‘‘आई, मिनू नाही हं… मि…ता…ली! तू चैत्रगौरीचं हळदीकुंकू कधी करणार आहेस? येत्या शुक्रवारी का?’’ मिताली विचारू लागली. ‘‘शुक्रवारी नाही बाळा… मी शनिवारी करणार आहे. दुपारी जरा तयारी करता येईल. शुक्रवारी करायचं म्हणजे ऑफिसला निदान अर्धा दिवस सुट्टी घ्यावी लागेल ना!’’ आई थोडीशी वैतागूनच म्हणाली.

‘‘चालेल… मलाही वेळ मिळेल.’’ मिताली हसत म्हणाली.

‘‘तुला गं काय करायचं आहे विशेष?’’ आईनं आश्चर्यानं विचारलं.

‘‘एक गंमत आहे… या वेळी तुझ्या आणि माझ्या मैत्रिणींसाठी मी फिक्या जांभळ्या रंगाचं पन्हं बनविणार आहे!’’

‘‘काहीतरी प्रयोग करू नकोस हं माझ्या मैत्रिणींवर!’’ लटक्या रागानं आई म्हणाली.

‘‘कोणतेही रंग घालायचे नाहीत पन्ह्यामध्ये, आधी सांगून ठेवते.’’ आईनं तंबी दिली.

मिताली म्हणाली, ‘‘आई… मी असं करेन का? अगदी नैसर्गिक रंग वापरणार आहे. मी तसं जांभळ्या रंगाचं पन्हं बनवेन. मी स्वत: तुला पिऊन दाखवेन, मग तू पी. खात्री कर आणि मगच मैत्रिणींना दे. चालेल ना?’’

आई गालातल्या गालात हसत म्हणाली. ‘‘जसा हुकूम मिताली मॅडम!’’

हेही वाचा

दोन – तीन दिवस रोजच्या गडबडीत गेले. शेवटी शनिवार उजाडला. अर्थात मितालीच्या आईची तयारी त्याआधी दोन दिवस चालू होती. हरभरे भिजत घातले, ओटी भरण्याकरिता हवे होते ना! आदल्या दिवशी चण्याची डाळ भिजत घातली. आदल्या दिवशीच तिनं पन्हं तयार करून ठेवलं. अर्थात दाटसा गर तयार ठेवला. आयत्या वेळी हवं तेवढं बनवायचं. शनिवारी सकाळपासून मितालीच्या आईची धांदल उडाली. रोजचा स्वयंपाक आणि मग हळदी- कुंकवाची तयारी. थोड्या वेळानं मितालीची ही गडबड चालू झाली. तिनं आईच्या नकळत निळ्या रंगाचं पाणी बनवलं. आईला म्हणाली, ‘‘तुझं पन्हं तयार आहे ना, दे मला.’’

थोडंसं पन्हं ग्लासमध्ये घेऊन त्यात हे निळं पाणी घातलं. चमच्यानं चांगलं ढवळलं. एवढं सुंदर फिकट जांभळ्या रंगाचं पन्हं तयार झालं. तिनं थोडं छोट्या ग्लासमध्ये घेतलं आणि प्यायलं. आईला म्हणाली, ‘‘आता हे तू पी.’’

प्यायल्यावर आई म्हणाली, ‘‘हे तर पन्ह्यासारखंच लागतंय. म्हणजे चवीत बदल झालेला नाही. हे कसलं आहे निळ्या रंगाचं पाणी मिताली?’’

मिताली म्हणाली, ‘‘सर्व मैत्रिणी आल्या की सांगेन तेवढ्या वेळ हे गुपित मी असंच ठेवते. तुझी हरकत नाही ना?’’

‘‘काही हरकत नाही बाळा!’’ असं म्हणत आई कामाला लागली.

संध्याकाळी सगळ्या मैत्रिणी आल्या. सगळ्याजणी मितालीच्या आईला म्हणाल्या, ‘‘अगं केतकी, तू चैत्रगौरीच्या हळदीकुंकवाला पन्ह्यावर फुली मारलीस? हे कोणतं सरबत बनवलंस?’’

केतकी म्हणाली, ‘‘अगं, आधी पिऊन तर बघा. आमच्या मितालीनं बनवलं आहे.’’

सगळ्याजणी आश्चर्यचकित झाल्या. ‘‘केतकी, हे तर पन्हंच आहे. मग हा जांभळा रंग कुठून आला? रंग घातलास की काय? अगं, हे खायचे रंग वापरायचे नसतात. आरोग्याला हानीकारक असतात.’’

हेही वाचा

एक ना दोन… सगळ्यांच्या टीका-टिप्पण्या चालू झाल्या. त्यावर केतकी म्हणाली ‘‘अगं मलाही तुम्हा सर्वांच्या आरोग्याची काळजी आहे. मिताली, सांग तू आता, काय केलंस ते?’’

मिताली सर्वांना उद्देशून म्हणाली, ‘‘मावशी, घाबरू नका. हा नैसर्गिक रंग आहे. गोकर्णच्या फुलांपासून निळा रंग मिळवला. आमच्याकडे गोकर्णाचा वेल आहे. मी त्याची बरीच फुलं साठवली. उन्हात वाळवली. आता पाणी उकळवून त्यात गरजेप्रमाणे थोडी फुलं टाकली. त्यांचा निळा रंग पाण्यात उतरला. पन्ह्यामध्ये साधं पाणी घालण्याऐवजी हे निळं पाणी घातलं. कैरी आंबट असते ना… त्यामुळे रंग बदलला.’’

सगळ्यांना मितालीचं एवढं कौतुक वाटलं. मिताली खूप चतुर होती. तिनं फुलांप्रमाणेच गोकर्णाच्या बियाही साठवून ठेवलेल्या होत्या. त्या तिनं आईला सर्वांना द्यायला सांगितल्या.

मितालीची आई खूप खूश झाली. ती मितालीला म्हणाली, ‘‘मिताली, या वर्षीचं हळदीकुंकू चांगलंच लक्षात राहील. नैसर्गिक रंग आणि बीजप्रसार… शाब्बास!

nandaharam2012@gmail.com



Source link

शब्दांच्या हत्येला संमती?

0
शब्दांच्या हत्येला संमती?



श्याम पाखरे
काही दिवसांपूर्वी ‘न्यू यॉर्क टाइम्स’मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनाधारित लेखामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या अध्यक्षीय कार्यकाळाच्या सुरुवातीलाच फेडरल प्रशासकीय व्यवहारातून जाणीवपूर्वक अदृश्य होऊ घातलेल्या दोनशेच्या वर शब्दांची लांबलचक यादी देण्यात आली होती. ती यादी केवळ प्राथमिक सर्वेक्षणावर आधारित आहे, त्यामुळे गाळण्यात येणाऱ्या शब्दांची संख्या वास्तवात यापेक्षा फार मोठी असू शकते. हे शब्द मुख्यत: सामाजिक आणि वांशिक न्यायाशी संबंधित आहेत. उदा. Activism, activists, advocacy, affirming care, all- inclusive, anti- racist, bias, barriers, clean energy, climate crisis, community diversity, disparity, discrimination, equality, gender identity, gender diversity, identity, injustice, inequality, immigrants, inclusive, indigenous community, intersectional, LGBTQ, marginalized, multicultural, race, racial diversity, racial ethnicity, sex, sexual preferences, socioeconomic, sociocultural, social justice, transgender, transsexual, tribal, vulnerable populations, women underrepresented.

फेडरल शासन आणि शासकीय तसेच अशासकीय एजन्सीजच्या वेबसाइट्समधील मजकुरातून हे शब्द गाळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तसेच शासननिर्णयासंबंधी कागदपत्रांमध्ये या शब्दांचा समावेश करताना काळजी घेण्याची सूचना उच्चस्तरावरून देण्यात आली आहे. शालेय अभ्यासक्रमामध्येदेखील ते टाळावेत, अशी सूचना करण्यात आली आहे. ट्रम्प यांच्या धोरणांचे प्रतिबिंब शासकीय स्तरावरील या शब्दांच्या अदृश्यतेवर पडलेले दिसते. ट्रम्प यांची मनोवृत्ती आणि चरित्र काय आहे, याची पूर्ण कल्पना असतानादेखील अमेरिकन जनतेने त्यांना अध्यक्षपदी पुन्हा निवडून दिले. त्यावरून तेथील बहुसंख्य लोकांनादेखील शब्दांच्या या हत्येला मूक संमती असावी का, असा प्रश्न पडतो. त्यामुळे अमेरिकन जनमानसाची आजची स्थिती लक्षात येते.

भारताच्या संदर्भातदेखील वरील प्रकारचे संशोधन व्हायला हवे. आपण येथे भारताच्या संदर्भात गहाळ झालेल्या मूल्यात्मक शब्दांवर लक्ष केंद्रित करू या. गेल्या दहा वर्षांचा विचार केला तर काही शब्द गहाळ झाले आहेत, तर काही शब्द अस्तित्वात असूनही आपला अर्थ गमावून बसले आहेत. किंवा समाजासाठी अर्थहीन झाले आहेत. अशा शब्दांचा शोध घेण्यास सुरुवात केली तर प्राथमिकदृष्ट्या पुढील यादी तयार होते. आणखी खोलात जाऊन विचार केला तर ही यादी बरीच मोठी होऊ शकते- अध्यात्मिकता, अहिंसा, आत्मसन्मान, आत्मचिंतन, आत्मचैतन्य, आत्मनिर्भरता, अनाक्रमकता, अभिव्यक्तिस्वातंत्र्य, अक्रोध, आदर, औदार्य, दिलदारपणा, आत्मशुद्धी, औचित्य, आदर्शवाद, बांधिलकी, बुद्धिनिष्ठा, करुणा, कर्तव्यपरायणता, खिलाडूवृत्ती, दया, धर्मनिरपेक्षता, धार्मिक स्वातंत्र्य, धैर्य, वैज्ञानिकता, जागरूकता, विवेक, तर्कनिष्ठा, व्यासंग, नि:स्वार्थता, निर्भयता, निर्वैरता, नि:पक्षपातीपणा, नीतिमत्ता, नम्रता, न्याय, निष्ठा, निरागसता, त्याग, प्रेम, पावित्र्य, प्रामाणिकता, परोपकरिता, मानवता, मार्दवता, मैत्रीभाव, मोकळेपणा, ऋजुता, जबाबदारपणा, उत्कृष्टता, चारित्र्य, विनयशीलता, विविधता, स्पष्टता, स्वातंत्र्य, स्वराज्य, सहिष्णुता, संवेदना, सहवेदना, समजूतदारपणा, संयम, समानता, सजगता, सहनशीलता, सत्यनिष्ठा, सर्वधर्मसमभाव, सम्यकता, समग्रता, सर्जनशीलता, संशोधकता, सभ्यता, सद्भाव, स्थितप्रज्ञता, सहजता, सहकार्य, समाधान, स्वाध्याय, सेवाभाव, साधेपणा, सर्वसमावेशकता, शालीनता, शांती, शुद्धता, शिष्टाचार आणि क्षमा. या शब्दांमध्ये काही वैयक्तिक, सामाजिक, नागरिक नीतिमूल्ये आणि सद्गुणांचा समावेश होतो.

एकंदरीतच नैतिक मूल्यांचा हा ऱ्हास अमेरिका किंवा भारतापर्यंत मर्यादित नसून जागतिक पातळीवर सर्वत्र होताना दिसतो. भारताच्या संदर्भात पुरोगामी पक्षांचा त्यांच्या नैतिक दिवाळखोरीमुळे झालेला ऱ्हास, विकृत स्वरूपातील जागतिकीकरणामुळे नातेसंबंध आणि सामाजिक संबंधांची उसवलेली वीण आणि माणसाला आलेली अगतिकता आणि स्वकेंद्रितता अशी काही कारणे सांगता येतील.

भारतीय इतिहासातील ‘सहा सोनेरी पाने’ या पुस्तकात वि. दा. सावरकरांनी मुसलमानांच्या हाती पराभूत होण्यास हिंदूंच्या सद्गुणांना कारणीभूत ठरवले. परोपकार, दया, अहिंसा, परधर्मसहिष्णुता, शरणागताला अभय देणे, शत्रूवर उपकार करणे, परस्त्री-अपहार न करणे, शत्रूस्त्री-दाक्षिण्य या सद्गुणांना त्यांनी ‘सद्गुण विकृती’ म्हटले आहे. एखादा गुण सद्गुण की दुर्गुण हे ठरविण्यासाठी ते त्यास देशकाळपात्र ही कसोटी लावतात. तसे करणे अगदी चुकीचेही नाही. परंतु राक्षसाला मारण्यासाठी प्रतिराक्षस व्हावे लागते, हा सावरकरांचा सिद्धांत. त्यास नैतिक मूल्य म्हणून स्वीकारणे शक्य आहे काय? आणि सावरकर काहीही म्हणाले तरी चिरंतन अशी नैतिक मूल्येही असतातच. भाजपचे सर्वेसर्वा पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा सावरकरांना गुरुस्थानी मानतात. त्यामुळे हिंदूंमधील ‘सद्गुण विकृती’ दूर करण्याचा कार्यक्रम सर्वोच्च पातळीवरून पुरस्कृत केला जात आहे, असे दिसून येते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सावरकरांचे विचार आणि त्यांचा स्पष्टवक्तेपणा कधीही पूर्णत: पटला नाही. परंतु संघाची ही भूमिका म्हणजे ताकाला जाताना भांडे लपवण्यासारखी आहे. आजपर्यंतचा संघाचा इतिहास पाहिल्यास वरकरणी सुसंस्कृतपणाचा आव आणायचा आणि कृती मात्र त्याच्या अगदी विरुद्ध करायची, हे त्यांचे तंत्र लक्षात येते. संघाने गेली शंभर वर्षे समाजात हळूहळू जे पेरले आहे, तेदेखील वरील शब्द हरवत जाण्यास कारणीभूत ठरले आहे. त्यामुळे आपण कोणत्या दिशेने चाललो आहोत आणि त्याची परिणती अंतत: कशात होऊ शकते, हे सांगण्यासाठी कोणा ज्योतिषाची आवश्यकता नाही.

व्हिक्टर क्लेम्पेरर (१८८१-१९६०) हे एक जर्मन ज्यू होते. ते जर्मनीतील सॅक्सनी प्रांताची राजधानी ड्रेस्डेनमध्ये राहत. ते नाझी जर्मनीमध्ये छळछावणीत जाण्यापासून वाचले कारण त्यांची पत्नी ‘आर्यवंशीय’ जर्मन होती. तिने त्यांना कसेबसे वाचवले. १९३३ मध्ये हिटलर सत्तेवर येण्यापूर्वी क्लेम्पेरर ड्रेस्डेनमधील एका विद्यापीठात रोमान्स भाषांचे प्राध्यापक होते. (रोमान्स भाषा म्हणजे ऐतिहासिक काळात सामान्य माणसे बोलायची त्या असंस्कृत लॅटिन भाषेमधून निर्माण झालेल्या इंडो-युरोपियन भाषासमूहातील इटालिक भाषेचा एक उपसमूह.) त्यामुळे ते शब्दांचा वापर, त्यांचे बारकावे आणि शब्दांच्या विविध संदर्भातील अर्थांशी विशेषत: परिचित होते. हिटलरच्या पराभवानंतर काही वर्षांनी, क्लेम्पेररने द लँग्वेज ऑफ द थर्ड राईश (१९५७) नावाचे एक पुस्तक लिहिले. पुस्तकात क्लेम्पेरर यांनी असा युक्तिवाद केला आहे की, हिटलरच्या जर्मनीतील जवळजवळ प्रत्येकजण नाझी झाला होता – मग तो स्वत:ला नाझी मानत असो वा नसो. ते नाझी राजवटीला बळी पडलेल्या जर्मन ज्यूंचादेखील त्यात समावेश करतात. कारण त्या सर्वांनी त्यांच्या विचारांमध्ये आणि श्रद्धांमध्ये त्यांच्या नाझी सत्ताधीशांनी प्रसारित केलेल्या वंशवादी कल्पना आणि विचारसरणी कळत नकळत स्वीकारल्या होत्या. क्लेम्पेरर सुचवतात की, ती माणसे आपले वैयक्तिक स्वातंत्र्य गमावून बसली होती. ते त्या राजवटीचे गुलाम झाले होते, कारण ते हिटलरच्या नाझी पक्षाच्या शब्दकोश आणि तर्कशास्त्राच्या दृष्टीने विचार आणि कृती करू लागले होते.

क्लेम्पेरर लिहितात, ‘‘एकेक शब्द, वाक्प्रचार आणि वाक्यरचना लाखो पुनरावृत्तींद्वारे लोकांवर लादले गेल्यामुळे नाझीवाद जर्मन लोकांच्या शरीरात भिनला आणि यांत्रिक व अजाणतेपणे स्वीकारला गेला.’’

ते पुढे लिहितात, ‘‘भाषा माझ्यासाठी फक्त लिहिण्याचे आणि विचार करण्याचे काम करत नाही, तर ती माझ्या भावनांवर आणि माझ्या संपूर्ण आध्यात्मिक अस्तित्वावर नियंत्रण ठेवत असते आणि मी कोणतेही प्रश्न उपस्थित न करता आणि अजाणतेपणे स्वत:ला तिच्या स्वाधीन करत असतो… शब्द आर्सेनिकच्या लहान मात्रेसारखे असू शकतात; ते लक्ष न देता गिळले जातात, सुरुवातीला त्यांचा कोणताही परिणाम होत नाहीये असा भास होतो आणि नंतर काही काळाने त्याची विषारी प्रतिक्रिया निर्माण होते.’’

क्लेम्पेरर म्हणतात की, नाझींनी खूप नवीन शब्द निर्माण केले नाहीत. त्यांनी हेतुपूर्वक नियोजनबद्धपणे काही ठरावीक शब्द विकसित केले. परंतु त्यांनी धूर्तपणे जर्मन भाषेतील अनेक शब्दांचे अर्थ प्रचारतंत्राद्वारे आपल्या सोयीनुसार वाकवले. शब्दांच्या अनेक अर्थांना काट मारून त्यांना हवा तो एकच अर्थ रूढ केला. त्यांनी शब्द आणि भाषेची सर्जनशीलता संपवून टाकली. त्यांनी जे शब्द आणि भाषेसोबत केले तेच जर्मन नागरिकांसोबतदेखील केले. त्यांचे स्वतंत्र व्यक्तित्व संपवून टाकून राष्ट्राचा एक घटक इतकेच त्यांचे अस्तित्व ठेवले. जे नाझींनी केले तेच लेनिन, स्टॅलीन आणि बोल्शेव्हिक पक्षाने सोविएत रशियामध्ये केले. भारतातदेखील एक काळ असा होता जेव्हा डावे पक्ष आणि संघटना ‘बुर्ज्वा’ शब्दाचा उपयोग आपल्या विरोधकांसाठी शिवीसारखा करत.

आता गेल्या दहा वर्षांत हिंदुत्ववाद्यांनी कोणते नवीन शब्द रूढ केले किंवा जुन्याच शब्दांना नवीन धार चढवली ते पाहू या – हिंदुत्व, हिंदुराष्ट्र, लव्ह जिहाद, वोट जिहाद, लँड जिहाद, अर्बन नक्सल, देशद्रोही, औरंगझेबकी औलाद, खान मार्केट गँग, घुसखोर, बांग्लादेशी, रोहिंग्या, जय श्रीराम (सियाराम आता इतिहासजमा करण्यात आले आहे), रामराज्य, सनातन धर्म, बुलडोझर न्याय, गोरक्षक. विशेष म्हणजे यापैकी एकही शब्द प्रेम सौहार्द या भावना व्यक्त करत नाही. त्यातून केवळ द्वेष, तिरस्कार आणि शत्रुत्व व्यक्त होते. त्यामध्ये सत्य, शिव आणि सुंदर नाही. रामाचे नावदेखील रणभेरीसारखे उच्चारले जाते. गांधींनी सनातन धर्म, रामराज्य आणि इतर अनेक शब्दांना परंपरा आणि नवतेच्या संगमातून प्रवाही अर्थ दिला होता, तो खोडून त्याला पुन्हा मध्ययुगीन साज चढविण्यात आला आहे. येथेदेखील शब्दांच्या विविध छटा पुसून त्यांना एकरंगी करण्याचा प्रयत्न चालू आहे. शब्दांची तरलता संपवून त्यांच्यात काठिण्य आणले जात आहे. कारण शब्दाच्या अर्थाच्या विविध छटा अभिव्यक्तीला ‘सेन्सॉर’ करण्यामध्ये अडचणीच्या ठरतात. येथेही हे विषारी शब्द लोकांच्या मानसिकतेत झिरपत जाऊन त्यांच्या अंतर्मनाला व्यापून टाकत आहेत. सतत मुसलमानविरोधी प्रचारतंत्र राबवून मुसलमानांच्या मनात न्यूनगंड आणि अपराधीपणाची भावना निर्माण करण्याचा कार्यक्रम राबवला जात आहे. शब्द, भाषा हे संवाद, संभाषण, आत्मचिंतन, प्रार्थना, विनवणी, आज्ञा किंवा आवाहन करण्याचे माध्यम बनू शकतात. ते तर्काची तसेच भावनेची देखील अभिव्यक्ती करू शकतात. परंतु हिंदुत्ववाद्यांचे शब्द, भाषा हे केवळ भावनिक आवाहन करणारे असतात. स्वत:च्या बुद्धीला, तर्काला तिलांजली देऊन, स्वत:चे व्यक्तित्व विसरून केवळ अंधभक्तीने आदेश पालन करण्याचे आवाहन करणारे.

आपल्या देशात निवडणुकीच्या काळात द्वेषपूर्ण शब्द, भाषणांना उधाण येते. २०२४ हे लोकसभा निवडणुकांचे वर्ष होते. ‘इंडिया हेट लॅब’ या वॉशिंग्टन स्थित संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार, भारतात २०२३ साली ६६८ द्वेषपूर्ण भाषणांच्या घटना घडल्या, तर २०२४ साली त्यात ७४.४ इतकी वाढ होऊन ११६५ घटना घडल्या. अशी भाषणे देण्यामध्ये भाजपचे नेते, तथाकथित धर्मगुरू, विश्वहिंदू परिषद आणि बजरंग दलशी संबंधित व्यक्ती आघाडीवर होत्या. फेसबुक, व्हाट्सअॅप, इन्स्टाग्राम, यू-ट्यूब आणि एक्स या समाजमाध्यमांचा प्रभावीपणे उपयोग करून द्वेषाचे विष सर्वत्र पसरवले गेले.

आज वैयक्तिक आणि सामाजिक जीवनाच्या प्रत्येक आघाडीवर होत असलेले नैतिक अध:पतन सहज लक्षात येते. परंतु या प्रक्रियेत आपण आपले सांस्कृतिक संचित गमावून बसत आहोत. शब्दांना भूगोल असतो तसाच इतिहासही असतो. शब्द, त्यांचे अर्थ, त्यातून सूचित होणारी मूल्ये ही आपली ओळख असतात. आज आपण स्वत:ला ओळखू शकणार नाही, इतका आपला चेहरा विकृत झाला आहे. ‘पिक्चर ऑफ डोरियन ग्रे’ या ऑस्कर वाईल्डच्या कादंबरीतील डोरियन ग्रेच्या भेसूर झालेल्या व्यक्तिचित्राप्रमाणे!

वर उल्लेख केलेली नैतिक मूल्ये ही एकमेकांशी जोडलेली आहेत. ती जगातील सर्व धर्म आणि संस्कृतींमध्ये अभिव्यक्त झालेली आहेत. त्यांच्यातील काही निवडायची आणि काही वगळायची असे आपण करू शकत नाही. उदा., आता सावरकरांनी ज्या सद्गुणांना विकृती समजले त्यांची वजाबाकी केली तर त्यांना प्रिय असलेल्या विज्ञानवाद आणि तर्कवादाचादेखील बळी जातो. सत्ताधाऱ्यांच्या प्रचारतंत्राला बळी पडून आपण आपला नैतिक आणि सांस्कृतिक वारसा गमावू शकत नाही. याबाबतीत आज प्रत्येक व्यक्तीला फार गांभीर्याने आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे. ‘भाषा ही आपले विचार लपवण्याचे माध्यम असते’ हे फ्रेंच मुत्सद्दी टॅलेरँडचे प्रसिद्ध वाक्य आहे. परंतु क्लेम्पेरर या विधानाशी सहमत नव्हते. त्यांच्या मते, लोक स्वत:पासून किंवा इतरांपासून जे काही लपवण्याचा प्रयत्न करतात ते त्यांच्या शब्दांमधून नकळत व्यक्त होतेच. त्यामुळे आपल्यावर लादल्या जाणाऱ्या शब्दांवर, आपल्या संग्रहातून गाळल्या जाणाऱ्या शब्दांवर जागृत राहून चौकसपणे लक्ष ठेवणे आणि त्यामागचा अजेंडा समजून घेणे आवश्यक आहे.

(लेखक इतिहास विषयाचे अभ्यासक आहेत.)

shyam.pakhare111@google.com



Source link

ते काय असतं? : न्यूटनचा गती नियम

0
ते काय असतं? : न्यूटनचा गती नियम



डॉ. राधिका विंझे

शाळेचा शेवटचा दिवस संपवून ईशा बाबाबरोबर गाडीतून घरी येत होती. मधेच एका स्पीडब्रेकरवरून बाबानं गाडी हळू नेली. पुढच्या सीटवर बसलेल्या ईशाचं गाडीच्या स्पीडमीटरकडे लक्ष होतं. ३०-४० वर असलेला काटा एकदम १० वर आलेला पाहून ईशा बाबाला म्हणाली, ‘‘बाबा, बघ ब्रेक दाबला की गाडीचा वेग मंदावतो.’’

बाबा म्हणाला, ‘‘बरोबर! ब्रेकनं विरुद्ध दिशेनं बल लावून गाडीचा वेग कमी केला.’’

ईशानं विचारलं, ‘‘गाडीचा वेग पुन्हा वाढवायचा असेल तर तू काय करतोस?’’

बाबा म्हणाला, ‘‘अॅक्सेलेटर वाढवतो. जेवढा वेग वाढवायचा त्यानुसार गिअर बदलतो म्हणजे जास्त बल लावतो.’’ ईशा विचार करू लागली.

बाबानं सांगितलं, ‘‘तू बॅडमिंटन खेळताना कॉक उंच किंवा लांब जावं म्हणून जास्त जोरात मारतेस म्हणजे काय?’’

ईशा म्हणाली, ‘‘जास्त बल लावते.’’

बाबा म्हणाला, ‘‘बरोबर! आपल्याकडे इलेक्ट्रीक कार आहे. ती जर आपल्याला सुरू करायची असेल तर आपण काय करतो?’’

ईशा म्हणाली, ‘‘रिमोटनं त्यावर हव्या त्या दिशेनं इलेक्ट्रिक बल लावतो.’’

बाबा म्हणाला, ‘‘बरोबर! म्हणजेच कोणत्याही वस्तूला गती देण्यासाठी किंवा असलेली गती वाढवण्यासाठी बल लावावं लागतं. तसंच गतिमान वस्तूची गती कमी करायची असेल तरी विरुद्ध दिशेनं बल लावावं लागतं. याला न्यूटनचा गतीचा पहिला नियम म्हणतात.’’

घरी आल्यावर हा नियम आणखी आजमावता येईल हा विचार करत ईशा सायकल चालवायला गेली.



Source link

इचलकरंजीत कापडाच्या गोदामास आग

0
इचलकरंजीत कापडाच्या गोदामास आग



कोल्हापूर : इचलकरंजीत एका टाकाऊ कापडाच्या गोदामाला शनिवारी आग लागली. या ठिकाणी कोणतीही अग्निशामक यंत्रणा नसल्यामुळे आग पसरत गेली. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. दोन वर्षांपूर्वी याच ठिकाणी आग लागली होती. कलानगर परिसरात शिवसागर केसरवाणी यांचे टाकाऊ कापडाचे गोदाम आहे. आज सकाळी दहाच्या सुमारास त्यास आग लागली.

आजूबाजूला कापड असल्याने आग भडकत गेली. त्याची झळ आजूबाजूच्या घरांना बसली. यामध्ये त्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. आगीचे लोट मोठ्या प्रमाणात येत होते. आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले असले, तरी नेमका आकडा अधिकृतपणे समजू शकला नाही. अग्निशामक दलाच्या तीन गाड्यांच्या साहाय्याने सुमारे एक तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. घटनास्थळी बघ्यांनी मोठी प्रमाणात मोठी गर्दी केली होती.

हलगर्जीपणा टाळावा

भर वस्तीमध्ये कापडाची गोदामे दिसून येतात. गोदामाला आग लागण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. या ठिकाणी आग आटोक्यात आणण्यासाठी कोणतेही साहित्य, यंत्रणा उपलब्ध नसते. त्यामुळे या प्रकारांना आवर घालण्याची मागणी होत आहे.



Source link

एकतेची मशाल तेवत ठेवणे हाच युगधर्म, हर्षवर्धन सपकाळ यांचे मत

0
एकतेची मशाल तेवत ठेवणे हाच युगधर्म, हर्षवर्धन सपकाळ यांचे मत


पुणे : ‘बहुसंख्याकांनी अल्पसंख्याकांकडे लक्ष द्यावे ही आपली संस्कृती आहे. त्याचे पालन करत एकता आणि अखंडतेची मशाल अबाधित तेवत ठेवणे हाच युगधर्म आहे,’ असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शनिवारी व्यक्त केले.

‘अल्पसंख्य समाजाने घाबरू नये’ हाच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेचा संदेश होता, याकडे त्यांनी लक्ष वेधले. गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित ‘युवा अल्पसंख्याक संसदे’मध्ये सपकाळ बोलत होते. बिशप डाॅ. थाॅमस डाबरे, माजी आमदार मोहन जोशी, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, अभय छाजेड, विवेक चव्हाण, संसदेचे संयोजक लुकास केदारी, सत्यवान गायकवाड, हाजी झुबेर मेमन, हाजी फरीद खान, फिरोज मसुलदार, सुलतान शाह या वेळी उपस्थित होते.

सपकाळ म्हणाले, ‘विविधतेमध्ये एकता हे भारताचे वैशिष्ट्य आहे. पण, काहींना ही एकता नको आहे. आम्ही सर्वांना जोडत आहोत. पण, समाजांना तोडणाऱ्या शक्ती प्रबळपणे काम करत आहेत. आमच्या हातामध्ये सुई-दोरा आहे. पण, दुसऱ्याच्या हातामध्ये कात्री असेल, तर काय करणार? बहुसंख्याकांनी अल्पसंख्याकांकडे लक्ष द्यावे, त्यांचे संरक्षण करावे, ही आपली संस्कृती आहे. एकता आणि अखंडतेची मशाल अबाधित तेवत ठेवणे हाच युगधर्म आहे.’

हेही वाचा
हेही वाचा

डाॅ. थॉमस डाबरे म्हणाले, ‘जीवन स्वार्थासाठी नाही तर दुसऱ्यांच्या भल्यासाठी आहे हे आपल्याला येशूने शिकविले आहे. तरुणांना कमी लेखू नका. त्यांना प्रोत्साहन द्या. तरुणांच्या प्रगतीमध्ये देशाचा विकास निश्चित आहे.’



Source link

…तर ‘कराड दक्षिण’चा निकाल वेगळा असता; अजित पवार, ॲड. उदयसिंह उंडाळकरांचा कार्यकर्त्यांसह ‘राष्ट्रवादी’त प्रवेश

0
…तर ‘कराड दक्षिण’चा निकाल वेगळा असता; अजित पवार, ॲड. उदयसिंह उंडाळकरांचा कार्यकर्त्यांसह ‘राष्ट्रवादी’त प्रवेश



vilas kaka undalkars son uday singh joined ncp ajit pawar faction along with his colleagues || …तर ‘कराड दक्षिण’चा निकाल वेगळा असता; अजित पवार, ॲड. उदयसिंह उंडाळकरांचा कार्यकर्त्यांसह ‘राष्ट्रवादी’त प्रवेश



Source link

हॉस्पिटल ऑन व्हील्स… रेल्वेकडून शेगाव स्थानकात सुविधा

0
हॉस्पिटल ऑन व्हील्स… रेल्वेकडून शेगाव स्थानकात सुविधा


बुलढाणा : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाचे डीआरएम पांडे यांच्या संकल्पनेतून साकारलेली ‘रुद्र-हॉस्पिटल ऑन व्हिल्स’ आज, शनिवारी शेगाव रेल्वे स्थानकात दाखल झाली. ‘रुद्र’मध्ये विविध वैद्यकीय सुविधा उपलब्ध असून आज रेल्वे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांची आरोग्य तपासणी व उपचार करण्यात आले.

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात नऊ जिल्ह्यांचा समावेश असून १ हजार ५३ किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचा हा विभाग आहे. विविध रेल्वेस्थानकावर कार्यरत कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना वैद्यकीय सेवा, विशेषतः तज्ज्ञांच्या सल्ला मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागतो. जवळपासच्या शहरांमध्ये पॅनेलमध्ये समाविष्ट रुग्णालये उपलब्ध आहेत. मात्र, अनेकांसाठी कामाच्या थकवणाऱ्या वेळापत्रकानंतर लांबचा प्रवास करणे हे एक कठीण काम आहे. ही गंभीर समस्या ओळखून, भुसावळ विभागाने एका जुन्या ‘थ्री-एसी कोच’चे पूर्णपणे कार्यरत रुग्णालयात रूपांतर केले. ही आरोग्य रेल्वे आज, शनिवारी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव स्थानकावर पोहचली.

कोचमध्ये, तज्ज्ञांची एक टीम, गर्भवती मातांसाठी स्त्रीरोग सेवा, नेत्ररोग समस्यांचे निदान आणि उपचार, ईसीजी मशीन आणि रक्त तपासणी, आदी सुविधा उपलब्ध आहेत. यावेळी शेकडो कर्मचारी रुग्णांवर तपासणी आणि उपचार करण्यात आले. भुसावळ विभागाचे डीआरएम पांडे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू करण्यात आला. आजच्या शिबिरात सीएमएस भुसावळच्या डॉ. मंगला नारायणे, सीनियर डीएमओ भुसावळ डॉ. पवन खंडेलवाल, डॉ. दत्ता जाधव, डॉ. गोरख, डॉ. जितेश ठाकरे, एडीएमओ डॉ. अखिलेश कश्यप, डॉ. अखिलेश कलावटे, स्वास्थ निरीक्षक लाभिणी पाटील, परिवहन निरीक्षक पी.एम. पुंडकर, रेल्वे स्थानक प्रबंधक मोहन देशपांडे, तिकीट निरीक्षक एन.आर. कारळे, मुख्य बुकिंग पर्यवेक्षक हर्षल महाजन यांनी सेवा दिली.

हेही वाचा
हेही वाचा

काय ‘रुद्र’ आहे?

‘रुद्र’ हा भुसावळ रेल्वे विभागाने सुरू केलेला एक उपक्रम आहे, जो एका थ्री-एसी डब्यात फिरणाऱ्या रुग्णालयासारखा आहे. दुर्गम भागातील रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी वेळेवर आरोग्य सेवा, तसेच आजारांचे लवकर निदान करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. ‘रुद्र’द्वारे १६ हजार ५०० हून अधिक रेल्वे कर्मचारी आणि ३० हजार पेन्शनधारकांना मदत मिळते. ‘रुद्र’मुळे, रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य सेवा अधिक सोयीची झाली आहे. याचे कारण म्हणजे त्यांना आता त्यांच्या कामाच्या ठिकाणी वैद्यकीय सुविधा मिळवता येतात.



Source link

बहीण आणि नवऱ्याचं प्रेम प्रकरण, पत्नीचंही ‘अफेयर’; असं समोर आलं कुटुंबाचं डार्क सिक्रेट!

0
बहीण आणि नवऱ्याचं प्रेम प्रकरण, पत्नीचंही ‘अफेयर’; असं समोर आलं कुटुंबाचं डार्क सिक्रेट!


Extramarital Affair Murder Case : लग्न हे विश्वास आणि प्रेमावर उभं असतं. पती पत्नीमधील दोघांपैकी कोणीही या विश्वासाला तोडून विवाहबाह्य संबंध ठेवल्यास संसारात वादळ येतं. अशीच एक विवाहबाह्य संबंधाची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे या घटनेत विचित्र प्रकरण समोर आलं आहे. नवऱ्याचं बहिणीसोबत प्रेम प्रकरण होतं, एवढंच नाही तर पत्नीचंही बाहेर अफेयर होतं. काय आहे नेमकं प्रकरण पाहूयात. 

बिहारमधील खगरिया जिल्ह्यातील मोरकाही पोलीस स्टेशन परिसरात एका तरुणाचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीचे नाव दीनदयाळ असून तो बेगुसरायचा रहिवासी होता. ज्याचा मृतदेह बछौता-अलौलिया रस्त्यावर एका वाहनात आढळला. ही आत्महत्या आहे की खून याचा तपास पोलीस करत असताना मेहुणीच्या कबुलीमुळे हत्येला एक वेगळंच वळण लागलंय. 

खगरियातील मोरकाही पोलीस स्टेशन परिसरात घडलेली एक घटना सध्या खूप चर्चेत आली आहे. भाऊजी आणि मेहुणे यांचं प्रेमप्रकरण होतं. तर भाऊजीच्या पत्नीचं बाहेर दुसऱ्यासोबत अफेयर होतं. या त्रिकोण प्रेमप्रकरणातून दीन दयाल म्हणजे भाऊजीची हत्येमुळे हे प्रकरण समोर आलं आहे. दीनदयाळच्या मृत्यूबाबत आतापर्यंत पोलीस आत्महत्या आणि खून यात गोंधळलेले आहेत. दीनदयाल हे बेगुसराय जिल्ह्यातील बडी संखचे रहिवासी होते. तीन दिवसांपूर्वी, त्याचा मृतदेह बछोटा-अलौलिया रस्त्यावर एका वाहनात पोलिसांना आढळला.

या संदर्भात, मृताचा भाऊ संजीव कुमार यांनी केलेल्या लेखी तक्रारीच्या आधारे, दीन दयाल यांच्या पत्नी साजो देवी, सासू अनिता देवी, सासरे टुनटुन साह, दीन दयाल यांच्या पत्नीचा प्रियकर असल्याचे सांगितले जाणारे रमन कुमार राणा यांच्यासह अर्धा डझन लोकांवर आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांचं म्हणणं आहे की, ज्या मेहुणीशी दीनदयाळचे प्रेमसंबंध होते असे म्हटलं जातं, ती या प्रकरणात साक्षीदार बनली आहे.

 

मृत दीनदयाळच्या मेहुणीने इंटरनेट व्हिडीओवर कबूल केले आहे की ती दीनदयाळशी प्रेम संबंध होते. ती म्हणते की तिची बहीण साजो देवी (दिनदयाळची पत्नी) दुसऱ्या कोणाशी तरी बोलत असे. यावरून दोघांमध्ये वाद झाला.  तिने आरोप केला की तिच्या बहिणीने आणि तिच्या प्रियकराने मिळून कट रचून त्याच्या भाऊजी दीनदयाळची हत्या केली. 

 

14 एप्रिल रोजी दुपारी 12.17 वाजता मोरकाही पोलिसांना फोनवरून माहिती मिळाली की, एका तरुणाचा मृतदेह खड्ड्यात पडला आहे. या प्रकरणाचे तपास अधिकारी राजू कुमार म्हणतात की, जेव्हा ते तिथे पोहोचले तेव्हा मृतदेह खड्ड्यात नव्हे तर वाहनात आढळला. हे वाहन मृताच्या बेगुसराय इथल्या मामाचे असल्याचे सांगण्यात आलंय. 

तरुणाच्या शरीरावर कोणत्याही जखमा आढळल्या नाहीत. शवविच्छेदनासाठी मृतदेह राखीव ठेवण्यात आला आहे. अशा परिस्थितीत भेसराची फॉरेन्सिक तपासणी, पोस्टमॉर्टम रिपोर्ट, मोबाईलचा सीडीआर आणि इतर गोष्टींची तपासणी केल्याशिवाय निर्णय घेणे कठीण आहे. 





Source link

पृथ्वीराज चव्हाणांना विचारुनच अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश, उदयसिंग उंडाळकरांचं वक्तव्य  

0


Udaysinh Undalkar : काँग्रेस सरचिटणीस उदयसिंह पाटील उंडाळकर (Udaysinh Undalkar) यांनी हजारो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत उंडाळकरांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला. हा राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मोठा धक्का मानला जात आहे. याबाबत बोलताना  उदयसिंग उंडाळकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. पृथ्वीराज चव्हाण यांना विचारुनच अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याचं मोठं वक्तव्य उदयसिंग उंडाळकर यांनी केलं आहे. 

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सांगून दीड महिन्यापूर्वीच राजीनामा दिला होता

काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे जुने सहकारी स्वर्गीय विलासकाका उंडाळकर यांचे पुत्र उदयसिंह उंडाळकर यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे.  माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सांगून दीड महिन्यापूर्वीच राजीनामा दिला होता. त्यानंतर आद उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये मी प्रवेश केला आहे असे उंडाळकर म्हणाले. पृथ्वीराज चव्हाण आणि कार्यकर्त्यांना सांगून हा निर्णय घेतला आहे. 

उदयसिंह उंडाळकरांचा राष्ट्रवादीत प्रवेश म्हणजे दोन यशवंत विचारांचा प्रीतिसंगम : अजित पवार 

यशवंतराव चव्हाण यांच्या कर्मभूमीमध्ये रयत संघटनेचे प्रमुख उदयसिंह उंडाळकर यांच्या पक्ष प्रवेशासाठी मी आलो आहे. 35 वर्षाच्या राजकीय जीवनाचा अनुभव आहे, मी विलास काकांसोबत राज्य सहकारी बँक, जिल्हा बँक, मंत्री मंडळात काम केलं आहे. उदयसिंह उंडाळकर यांचा पक्ष प्रवेश म्हणजे, दोन यशवंत विचारांचा प्रीतिसंगम होत आहे याचा मला आनंद आहे असे अजित पवार म्हणाले. पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात अपक्ष विलास काका उंडाळकर लढले, विलास काका 2014 ला घडाळाच्या चिन्हावर निवडणूक लढले असते तर  त्यावेळीच निकाल वेगळा असता असे अजित पवार म्हणाले. भारतातील सर्वात जास्त नफा कमावून देणारी बँक विलास काकांच्या नेतृत्वाखालची सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक आहे. सहकारासह राजकारण करत त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन उदयसिंह दादा राजकारण करत आहेत. उदयसिंह उंडाळकर यांची आगीतून उठून फुफुटामध्ये आलोय अशी अवस्था होणार नाही. संपूर्ण महाराष्ट्राची ताकद उदयसिंह उंडाळकर यांच्या मागे उभी करणार आहे. विलास काकांचं पाण्याचे स्वप्न उदयसिंह उंडाळकरांच्या माध्यमांतून आपण पूर्ण करणार असल्याचे अजित पवार म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना धक्का, उदयसिंह उंडाळकरांचा राष्ट्रवादीत प्रवेश, दोन यशवंत विचारांचा प्रीतिसंगम झाला, अजित पवारांची प्रतिक्रिया 

अधिक पाहा..



Source link