Thursday, July 23, 2026
Home Blog Page 385

Check today’s viral videos, photos updates in marathi

0
Check today’s viral videos, photos updates in marathi


Trending News Updates, 20 April 2025 : व्हायरल व्हिडीओपासून व्हायरल फोटोपर्यंत, वाचा सोशल मीडियावर काय होत आहे ट्रेंड

Today's Trending News Live Updates in Marathi

ट्रेडिंग न्यूज लाईव्ह अपडेट टुडे (सौजन्य -Freepik)

Trending News Live Updates : सोशल मिडियावर दरदिवशी नवनवीन गोष्टी व्हायरल होत असते. कधी डान्स व्हिडिओ चर्चेत येतात तर कधी स्टंटबाजीचे व्हिडिओ चर्चेत येतात. कधी मजेशीर व्हिडिओ चर्चेत येतात आणि कधी संतापजनक व्हिडिओ चर्चेत येतात. काही व्हिडीओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरतात तर काही व्हिडीओंवर नेटकरी टीका करतात. अशा प्रत्येक घडामोडी जाणून घ्या फक्त एका क्लिकवर.





Source link

अमेरिका-चीन काहीच नाही! भारतात इथे लपलाय सोन्याचा सर्वाधिक साठा, अहवालातून धक्कादायक खुलासा

0
अमेरिका-चीन काहीच नाही! भारतात इथे लपलाय सोन्याचा सर्वाधिक साठा, अहवालातून धक्कादायक खुलासा


Gold Investment: पूर्वी भारताला सोने की चिडिया असं म्हटलं जातं. राजा-महाराजांपासून अनेक मोठ्या उद्योगपतींकडे सोन्याचा साठा असायचा. आजही भारतात मोठ्या प्रमाणात सोन्याची मागणी आहे. भारतात सोनं खरेदी करणे हे एक परंपरेचे लक्षण मानले जाते. पू्र्वीच्या काळात सोनं फक्त धन-संपत्ती नव्हे तर सत्तेचेदेखील प्रतीक मानले जायचे. आता काळ बदलला पण सोन्याची चमक काही कमी झाली नाही. त्याचे महत्त्व आधिकच वाढत गेले. आज भारतात सर्वाधीक सोनं कुठेय याचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. 

जागतिक मंदी आणि आर्थिक अनिश्चितत्तेच्या काळात सोन्याकडे सुरक्षित गुंतवणुक म्हणून पाहिले जाते. आज जगभरात सोनं म्हणजे फक्त दागिनेच नव्हे तर गुंतवणुकीचे एक साधनदेखील आहे.सेंट्रल बँक असो किंवा उद्योगपती असो किंवा सर्वसामान्य व्यक्ती प्रत्येकाकडे सोनं कोणत्या ना कोणत्या रुपात असतेच. 

फायनेंशियल एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार, सरकारी खजिन्यांचा विचार केल्यास अमेरिकेकडे सगळ्यात जास्त सोन्याचा साठा आहे. डिसेंबर २०२४ पर्यंत अमेरिकेत ८,१३४ टन सोनं होतं. जगात सर्वाधिक सोन्याचा साठा अमेरिकेकडेच आहे. त्यानंतर जर्मनी, चीन आणि नंतर भारताचा नंबर येतो. भारताकडे ८७६ टन सोनं आहे. राष्ट्रीय रिझर्वमध्ये हा सोन्याचा साठा आहे. मात्र खरी आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे सर्वसामान्य जनतेकडे सरकारी खजिन्यापेक्षा अधिक सोनं आहे. 

भारतातील कुटंबाकडे जवळपास २४,००० टन सोनं असून जे संपूर्ण जगातील सेंट्रल बँकेच्या एकूण स्टॉकच्या बरोबर आहे. चीनचे नागरिक या क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. चीनमध्ये २०,००० टन सोनं आहे. 

सोन्यात गुंतवणुक करणे योग्य की अयोग्य?

भारतात सध्या सोन्याची किंमत ९५,२४० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. लवकरच सोनं १ लाखांचा आकडा पार करु शकते. तर, आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं ३,३३३ डॉलर प्रति औंसवर ट्रेड करत आहे. मागील एक वर्षात सोन्याने ४० टक्क्यांचा परतावा दिला आहे.अशात तज्ज्ञांच्या सल्लानुसार, तुमच्या कमाईचा १० टक्के हिस्सा सोन्यात गुंतवणूक करणे योग्य आहे. त्यामुळं यापुढं जर तुम्ही सोन्याची अंगठी किंवा शिक्का खरेदी करणे म्हणजे फक्त दागिना समजू नये तुमची आर्थिक सुरक्षा म्हणून त्याच्याकडे पाहा. 





Source link

Uddhav Thackeray Shivsena Posts Raj Thackeray and Uddhav Thackeray Emotional Photo And Said This thing in Post

0
Uddhav Thackeray Shivsena Posts Raj Thackeray and Uddhav Thackeray Emotional Photo And Said This thing in Post



Uddhav Thackeray Shivsena Posts Raj Thackeray and Uddhav Thackeray Emotional Photo And Said This thing in Post | उद्धव आणि राज ठाकरेंचे हातात हात आणि ओठांवर हसू, युतीच्या चर्चेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेने पोस्ट केला ‘तो’ फोटो



Source link

तीर्थयात्रेचे बुकिंग ऑनलाइन करताय? आत्ताच सावध व्हा! सायबर विभागाने जारी केलाय अलर्ट, कारण…

0
तीर्थयात्रेचे बुकिंग ऑनलाइन करताय? आत्ताच सावध व्हा! सायबर विभागाने जारी केलाय अलर्ट, कारण…


Indian Cyber Crime: तुम्हीदेखील ऑनलाइन जाहिरीती बघून इंटरनेटवरच तीर्थयात्रेचे पॅकेज बुकिंग करण्याच्या विचारात असाल तर आत्ताच सावध व्हा. कारण यामुळं तुमची लाखो रुपयांची फसवणूक होऊ शकते. गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राने शनिवारी देशभरातील नागरिकांसाठी धोक्याचा इशारा जारी केला आहे. धार्मिक यात्रेकरुंना लक्ष्य करुन काही सायबर भामटे नागरिकांनी फसवणूक करत असल्याचे समोर आले आहे. सायबर विभागाने देशातील नागरिकांना या ऑनलाइन होणाऱ्या फसवणुकीबाबत अलर्ट जारी केला आहे. 

गृह मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रकानुसार, अधिकृत सरकारी पोर्टल किंवा विश्वासार्ह ट्रॅव्हल एजन्सीद्वारेच यात्रेकरुंनी बुकिंग करावी. तसंच, पेमेंट करण्यापूर्वी त्या वेबसाईटची सत्यता पडताळावी, असं अवाहन केलं आहे. तसंच, अत्यंत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला सायबर विभागाने दिला आहे. बनावट साइट्स, सोशल मीडिया पेजेस, फेसबुक पोस्ट आणि गुगलसारख्या सर्च इंजिनवर सशुल्क जाहिरीतींद्वारे फसवणूक केली जात आहे. त्यामुळं नागरिकांनी बुकिंग करताना सावधगिरी बाळगावी, असं अवाहन करण्यात येत आहे. पर्यटकांची फसवणूक होऊ नये म्हणून फसव्या जाहिराती देणाऱ्या वेबसाइट्स बंद केल्या जात आहेत. 

केदारनाथ आणि चार धामसाठी हेलिकॉप्टर बुकिंग, यात्रेकरूंसाठी हॉटेल आरक्षण, ऑनलाइन टॅक्सी सेवा आणि धार्मिक टुर पॅकेजस अशा कमी किंमतीतील ऑफर देऊन पर्यटकांना आकर्षित केले जाते. त्यानंतर त्यांची लाखो रुपयांची फसवणूक केली जात असल्याचे समोर आले आहे. 

सायबर विभागाचे अवाहन

जर कोणत्या पर्यटकांची फसवणूक झाली असेल तर तात्काळ राष्ट्रीय सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टलवर www.cybercrime.gov.in वर किंवा 1930 वर फोन करुन तक्रार नोंद करू शकता. 

केदारनाथ आणि चारधामसाठी अधिकृत बुकिंग कुठे कराल?

केदारनाथ हेलिकॉप्टर बुकिंग https://www.heliyatra.irctc.co.in/ या द्वारे करता येते. तर, सोमनाथ ट्रस्टची अधिकृत बेवसाइट https://somnath.org/ ही आहे. याद्वारे गेस्ट हाउस बुकिंग करता येते. तसंच, चारधाम यात्रेच्या बुकिंगसाठी या https://uttarakhandtourism.gov.in/experiences/char-dham बेवसाइटचा वापर करा. 





Source link

चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्तांसाठी ४ कोटींचा निधी

0
चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्तांसाठी ४ कोटींचा निधी



लोकसत्ता प्रतिनिधी

सांगली : चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्तांना मूलभूत सोयीसुविधा पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाच्या जनवन योजनेअंतर्गत ४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्तांच्या वाळवा, शिराळा व मिरज तालुक्यातील १६ वसाहतींना प्रत्येकी २५ लाख रुपयांचा हा निधी मिळणार आहे. आ. जयंत पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असल्याचे प्रकल्पग्रस्त कार्यकर्ते राम सावंत (तुंग) यांनी दिली.

डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजनेअंतर्गत चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्त वसाहतीमध्ये मूलभूत सोयीसुविधा करण्यासाठी हा निधी मिळाला आहे. प्रकल्पग्रस्तांच्या सर्व वसाहतीमध्ये जनवन योजना समित्या स्थापन करून त्यांच्या मार्फत वन विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आले होते.

गेल्या ८-९ महिन्यांपूर्वी सर्व प्रकल्पग्रस्त वसाहतींचे जनवन योजनेचे प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरी व निधी मिळण्यासाठी पाठविण्यात आले होते. हा प्रस्ताव मंजूर होऊन त्यास निधी मिळण्यासाठी प्रकल्पग्रस्त कार्यकर्त्यांनी राज्य स्तरावर सातत्याने पाठपुरावा केल्याने चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्त कार्यकर्त्यांच्या मागणी व लढ्याला अखेर यश मिळाले आहे.

ज्ञानदेव पवार, शंकर लोखंडे, दीपक वाघमारे, लक्ष्मण सावंत, मारुती रेवले, बिरु येडगे, सुनील पाटील, चंद्रकांत सावंत, मिथुन पवार यांच्यासह चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्त कार्यकर्त्यांनी आ. पाटील यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले.



Source link

waqf amendment act mp goes outside of the lok sabha house during bill passed chandani chowkatun चांदणी चौकातून : लॉबी कुठून कुठं?

0
waqf amendment act mp goes outside of the lok sabha house during bill passed chandani chowkatun चांदणी चौकातून : लॉबी कुठून कुठं?


वक्फ दुरुस्ती विधेयकावरील चर्चा मध्यरात्र होऊन गेली तरी सुरू होती. त्यानंतर केंद्रीय अल्पसंख्याक कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी चर्चेला उत्तर दिलं. हे विधेयक सत्ताधारी आणि विरोधक दोघांसाठी प्रतिष्ठेचा मुद्दा होता. त्यामुळं विरोधकांनी विधेयकावर दुरुस्त्या सुचवणं साहजिकच होतं. मूळ विधेयकावरही आवाजी मतदानानं भागलं नाही. विरोधकांनी मतविभागणी मागितली. त्यानंतर सुचवलेल्या दुरुस्त्यांवरही मतविभागणी होणार हे उघडच होतं. मध्यरात्र उलटून गेली होती, सगळ्यांनाच विधेयक तातडीनं मंजूर होऊन मोकळं व्हावं असं वाटत होतं. रिजिजू उत्तर देत असताना त्यांच्या शेजारी, त्यांच्या मागच्या आसनावर बसलेल्या मंत्र्यांच्या आणि भाजपच्या सदस्यांच्या डोळ्यातील झोप उतू जात होती. तरीही ते बसलेले होते. पाच-सात जणांनी मतदानाला दांडी मारली होती असं सांगितलं जातंय. त्यात खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही समावेश होता. मोदी ना लोकसभेत आले ना राज्यसभेत. त्यांच्या गैरहजेरीमध्ये वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यात आलं. लोकसभेमध्ये वक्फ दुरुस्ती विधेयकावर मतविभागणी घेतली गेली पण, मतदानयंत्रामध्ये काही तरी गडबड झाली. मग, पुन्हा मतदान घेण्यात आलं. या दोन मतदानादरम्यान बराच वेळ गेला. मधल्या काळात दोन मंत्री नैसर्गिक विधींसाठी जाऊन आले. ते सभागृहातून बाहेर गेल्यामुळं गोंधळ झाला. हे मंत्री मतदानाची प्रक्रिया सुरू असताना बाहेर गेलेच कसे, असा आरडाओरडा झाला. काँग्रेसच्या नेत्यांचं म्हणणं होतं की, हे मंत्री लॉबी सोडून जाऊ शकत नाहीत. मग ते गेलेच कसे? लोकसभाध्यक्षांनी त्यांना मुभा कशी दिली? सभागृहात नियम मोडले जात आहेत, काहीही चाललेलं आहे, असा त्यांचा आरोप होता. त्यामुळं नव्या संसदेत लॉबी म्हणजे काय, असा प्रश्न निर्माण झाला. नव्या संसदेमध्ये लॉबीचा विस्तार केला गेला आहे. जुन्या संसदेमध्ये लॉबी कुठून कुठपर्यंत हे ठरलेलं होतं. जुनी संसद गोलाकार आहे, आत प्रवेश केल्यावर कोणालाही गोलाकार फिरता येऊ शकतं. हा गोलाकार मोकळा पॅसेज ओलांडून आत गेलात की, लोकसभा किंवा राज्यसभेच्या सभागृहासाठी प्रवेश करण्याचा मार्ग आहे. जुन्या संसदेची हीच ती लॉबी! विधेयकावर मतदान होण्यापूर्वी ही लॉबी मोकळी करावी लागते. या लॉबीत सदस्यांशिवाय कोणालाही प्रवेश दिला जात नाही. मतदान सुरू झाल्यावर सदस्यांनाही लॉबीत प्रवेश करता येत नाही. जुन्या संसदेतील लॉबी छोटी आहे, तिथं स्वच्छतागृहांसाठी जागा नाहीच. लॉबीतून बाहेर पडून सदस्यांना स्वच्छतागृहांकडं जावं लागतं. ही अडचण नव्या संसदेत दूर करण्यात आली आहे. सभागृहाचं प्रवेशद्वार ते लॉबीचे द्वार अशा मोकळ्या जागेला लॉबी मानलं जातं. या लॉबीमध्ये सदस्यांना बसण्यासाठी खुर्च्या आहेत. स्वच्छतागृह आहे. याच लॉबीत सदस्यांना हजेरीपत्रावर स्वाक्षरी करावी लागते ती केली तरच त्यांना भत्ता लागू होतो. नव्या संसदेत लॉबी व्यापक झाल्यामुळं दोन मतदानादरम्यान दोन मंत्र्यांना सभागृहाबाहेर जाण्याची मुभा देण्यात आली. जुन्या आणि नव्या संसदेमध्ये बरेच काही बदललेलं आहे, अगदी लॉबीदेखील!

अहमदाबादमध्ये महाराष्ट्र!

अहमदाबादला झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्येही महाराष्ट्राचा विषय निघाला. महाराष्ट्रातील मतदार याद्यांमधील कथित घोळाचा मुद्दा काँग्रेसकडून प्रत्येक ठिकाणी मांडला जातो. खरगे म्हणाले की, महाराष्ट्रात काय झालं बघा. मतदारयाद्यांमध्ये ४०-५० लाख अतिरिक्त नावं आली कुठून? हा वाद राहुल गांधींनी संसदेत आणि नंतर कॉन्स्टिटुयशन क्लबमध्ये पत्रकार परिषद घेऊन मांडला होता. महाराष्ट्रातील या घोळाबाबत शोधाशोध करण्याची जबाबदारी राहुल गांधींनी त्यांच्या एका विश्वासू नेत्याकडे दिली आहे. ते म्हणाले की, आम्ही सगळी माहिती घेऊन तत्कालीन केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना भेटलो. त्यांनी पुढं केलं काहीच नाही. पण, आम्ही दिलेली माहिती बघून ते अचंबित झाले होते. गडबड झाल्याची त्यांनी अप्रत्यक्षपणे कबुली दिलेली होती!… महाराष्ट्रातील मतदारयाद्यांमध्ये कोणतीही गडबड झाली नसल्याचा निर्वाळा निवडणूक आयागाने दिल्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांकडं राजीवकुमार यांनी खासगीमध्ये दिलेल्या कबुलीला काही अर्थ उरत नाही. काँग्रेसने ३० हून अधिक मतदारसंघांची माहिती गोळा केल्याचं या नेत्याचं म्हणणं आहे. त्यापैकी १२-१३ मतदारसंघांवर काँग्रेसने लक्ष केंद्रित केलं होतं. बोगस मतदान झालं की नाही हे आता सिद्ध करता येणार नाही. पण, लोकसभा ते विधानसभा या दोन निवडणुकांदरम्यान किती मतदार वाढले, ते कोण होते वगैरे माहिती बूथस्तरावर जाऊन घ्यावी लागणार आहे. राज्यातील काँग्रेस नेत्याच्या म्हणण्यानुसार, या मतदारसंघांमध्ये कार्यकर्ते काम करत आहेत. त्यांच्याकडून माहिती जमा केली जात आहे. त्याची शहानिशा करून अचानक समाविष्ट करण्यात आलेले मतदार काढून टाकावे लागतील. ही सगळी प्रक्रिया किचकट आहे. केंद्रीय निवडणूक आयोग मतदार याद्यांची ‘एक्सेल’मधील माहिती-विदा देत नाही तोपर्यंत खऱ्या-खोट्या मतदारांचा शोध घेणं ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. त्यामुळं महाराष्ट्रातील मतदारयाद्यांचा घोटाळा काँग्रेस नेमका कसा सिद्ध करेल हे अजून स्पष्ट झालेलं नाही. काँग्रेसकडून आत्ता फक्त घोटाळा झालाय एवढंच सांगितलं जात आहे. अहमदाबादमध्ये त्याची पुनरावृत्ती झाली इतकंच.

कॅमेरा कुठं आहे?

संसदेच्या सभागृहामध्ये सत्ताधाऱ्यांची गिमिक्स आता विरोधकांना कळायला लागली आहेत. जुन्या संसदेमध्ये देखील लबाडी चालायची. विरोधी सदस्य बोलायला लागल्यावर सभागृहातील कॅमेरे लोकसभाध्यक्षांवर खिळलेले असायचे किंवा सत्ताधाऱ्यांची बाकं दाखवली जात असत. राहुल गांधींच्या भाषणावेळी सातत्याने हे प्रकार होऊ लागल्यानं विरोधकांनी आरडाओरडा सुरू केला होता. त्यावेळी चोरी पकडली गेली होती. जुन्या संसदेमध्ये विरोधकच न दाखवण्याचे प्रकार खूप वाढले होते. मग, माइक बंद करण्याचे प्रकार झाले. हे प्रकार अधूनमधून होतात. मग, ‘माइक’वरूनही गोंधळ होतो. माइक बंद झाल्यावरून वाद रंगला तेव्हा लोकसभाध्यक्ष बिर्ला म्हणाले की, माझ्याकडं माइक बंद सुरू करण्याचं बटन नाही. मी माइक बंद करत नाही… बिर्लांचं म्हणणं बरोबर होतं. ते स्वत: माइक बंद करत नाहीत. पण, लोकसभाध्यक्षांना काय हवं हे माइक बंद-चालू करणाऱ्या सचिवालयातील कर्मचाऱ्यांना अचूक कळतं. अखेर बिर्ला म्हणाले देखील… माझ्या परवानगीशिवाय माइक सुरू होत नसतो! यावेळी विरोधकांचा दबाव वाढलेला असल्यामुळं माइक बंद ठेवता येत नाही. तसं झालं की, विरोधी बाकांवरून ‘माइक-माइक’चे आवाज यायला लागतात. हाच प्रकार कॅमेऱ्यांबाबतही होतो. विरोधी सदस्यांना आपला सदस्य सभागृहात बोलत असताना समोरच्या टीव्हीवर दिसत असतो. त्याच्यावरून कॅमेरा दूर गेलेला कळतो. त्यामुळं ‘कॅमेरा-कॅमेरा’ अशी आरोळी ऐकू येते. गेल्या लोकसभेत विरोधकांकडं आवाज नसल्यामुळं त्यांचा दबाव नव्हता. आता विरोधक लोकसभाध्यक्षांवर दबाव आणू लागले आहेत. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कॅमेऱ्याची मागणी अनेकदा होताना दिसली. खासदार बोलायला उभा राहिल्यानंतर टीव्हीवर लगेच तो दिसला नाही तर कॅमेरा कुठं आहे, अशी विचारणा होत होती. त्या खासदारावर कॅमेरा केंद्रित होईपर्यंत काही सेकंदांचा वेळ लागतो. पण, सत्ताधाऱ्यांबाबत इतकं अविश्वासाचं वातावरण निर्माण झालेलं आहे की, माइक आणि कॅमेरा हे विरोधकांच्या अस्तित्वाचे शब्द होऊन गेले आहेत.

हेही वाचा

संवादाची प्रक्रिया

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राज्यस्तरावर वा जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याची प्रक्रिया बहुधा पहिल्यांदाच केली असावी. ही संवादप्रक्रिया ज्ञानेशकुमार केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त झाल्यापासून सुरू झाली आहे. मध्यंतरी देशभरातील जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची परिषद घेण्यात आली होती. राजकीय पक्षांच्या नेत्यांना वेळ देऊन त्यांच्या तक्रारींचा निपटारा करण्यास सांगण्यात आले होते. या अधिकाऱ्यांकडून अहवालही मागितला होता. आता राज्य निवडणूक अधिकाऱ्यांना वेळोवेळी दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मुख्यालयाला भेट देण्यासही सांगण्यात आलेलं आहे. राज्य निवडणूक अधिकारी दिल्लीत येत नाहीत. तसं अपेक्षितही नसतं. पण, नव्या आयुक्तांनी आयोगाअंतर्गत संवाद वाढवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत असं दिसतं. गेल्या काही वर्षांत निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर सातत्याने शंका घेतल्या जात असल्याने नव्या आयुक्तांनी नवी कार्यपद्धती अवलंबली असावी.



Source link

संपलेल्या नात्यांची देणी आणि करआकारणी

0
संपलेल्या नात्यांची देणी आणि करआकारणी



दोन ‘सेलेब्रेटीज’मध्ये झालेल्या एका घटस्फोटाची चर्चा काही दिवसांपूर्वी माध्यमांत आणि समाजमाध्यमांत चालू होती. महाराष्ट्रातील एका राजकीय व्यक्तीच्या बाबतीत त्यांनी त्यांच्या आधीच्या नात्यापोटी द्यावयाचा निर्वाह भत्ता, या विषयातला निकालही नुकताच चर्चेत आला आहे. या चर्चांमधील एक विषय हा निव्वळ आर्थिक स्वरूपाचा असतो. हल्लीच्या/प्रचलित भाषेत बोलायचे तर तो विषय म्हणजे, घटस्फोट/नातेशेवट केवढ्या रकमेत मिळाला किंवा दिला गेला? हे शब्दप्रयोग दुर्दैवी वाटत असले तरी ते वापरले जातात, आणि अशा बहुचर्चित प्रकरणांत दिल्या-घेतल्या जाणाऱ्या रकमा या काही वेळा, सामान्यजनांना चर्चेलायक वाटाव्यात एवढ्या मोठ्याही असतात. मग त्याबाबत अजून एक मुद्दा चर्चेत येतो की ज्या व्यक्तीला, आधीच्या जोडीदाराकडून घटस्फोट/नातेसमाप्ती संबंधाने जी रक्कम मिळते, ती तिच्या हातात करपात्र असते का ? भारताच्या आयकर कायद्यात सध्या तरी या रकमांच्या करपात्रतेबद्दल विशिष्ट अशी नेमकी तरतूद केलेली दिसत नाही. मग अशा वेळी, न्यायालयांनी आणि न्यायपीठांनी (ट्रायब्युनल्सनी) आत्तापर्यंत या विषयांत जे निकाल दिलेले आहेत, त्यांची माहिती करून घेणे आवश्यक ठरते. भारतात या विषयातील न्यायनिवाड्यांचा आत्तापर्यंत जो प्रवास झालेला दिसत आहे त्यांतील काही निकालांचा, थोडक्यात ऊहापोह या लेखात केला आहे.

(१) १९७१ :- कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स विरुद्ध श्रीमती शांती मित्तल, हा निकाल अलाहाबाद उच्च न्यायालयाने १९७१ मध्ये दिला असून, तो १९६१ पर्यंत अस्तित्वात असलेल्या जुन्या आयकर कायद्याखाली दिलेला आहे. तो १९२२ मधील आयकर कायदा होता. त्या प्रकरणात शांती व त्यांचे पती यांच्यामध्ये विभक्त होण्यासंबंधात करार झाला होता व त्यानुसार त्यांना त्यांच्या आधीच्या पतीकडून दरमहा काही निर्वाह भत्ता मिळत होता. सदर रकमा या प्रासंगिक (कॅज्युअल) उत्पन्न या स्वरूपाच्या आणि म्हणून करमाफ, ठरवण्यात याव्यात हा शांती यांचा दावा होता. तो दावा अमान्य झाला आणि दरमहा/नियमित मिळणारी अशी ती रक्कम करपात्र आहे असा निकाल दिला गेला.

(२) १९८२ :- प्रिन्सेस महेश्वरी देवी विरुद्ध कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स हा मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल १९८२ मध्ये दिला गेला. तो आणि खालील परिच्छेदांमध्ये उद्धृत केलेले बाकी सर्व निकाल, हे सध्याच्या आयकर कायद्याखालील (१९६१ चा आयकर कायदा) आहेत. या प्रकरणात महेश्वरी देवी आणि त्यांचे पती यांच्यातील विवाह संपुष्टात आणणारा निकाल मिळाला होता व त्यांना त्यासंबंधांत त्यांच्या आधीच्या पतीकडून हिंदू विवाह कायद्याखाली, काही रक्कम ही एकरकमी (लम्प-सम) स्वरूपात मिळाली होती आणि काही रक्कम दरमहा अॅलीमनी (पोटगी) म्हणून मिळत होती. न्यायालयाने असा निकाल दिला की एकरकमी स्वरूपाने मिळालेली रक्कम ही भांडवली जमा (कॅपिटल रिसीट) या प्रकारची आहे व म्हणून ती करमाफ स्वरूपाची ठरते, पण दरमहा मिळणारी रक्कम मात्र करमाफ ठरत नाही.

(३) २०१३ :- सहाय्यक आयकर आयुक्त विरुद्ध मीनाक्षी खन्ना हा निकाल दिल्ली ट्रायब्युनलकडून २०१३ मध्ये दिला गेला. मीनाक्षी यांचे पती जर्मन नागरिक होते. त्या दोघांच्यात १९९० मध्ये घटस्फोटासंबंधाने करार झाला. त्यात पतीकडून काही हप्त्यांमध्ये पोटगी मिळेल असा उल्लेख होता, पण त्यांनी ती दिली नाही. मीनाक्षी यांनी त्याबाबत पाठपुरावा केला असता, आधीच्या त्या पतीने सदर थकबाकीपोटी अंतिम तडजोड म्हणून एक रक्कम २००६ मध्ये पाठवली. पण ही रक्कम मिळाली तेव्हा, कैक वर्षांपासून, सदर गृहस्थ व मीनाक्षी यांचे पतीपत्नी असे नाते राहिले नव्हते. त्यामुळे ती रक्कम पतीने पत्नीला दिलेली व म्हणून करमाफ असलेली अशी ठरत नाही व तिऱ्हाईत व्यक्तीकडून विनामोबदला मिळालेली रक्कम करपात्र ठरते, असा पवित्रा आयकर खात्याने घेतला. मात्र दिल्ली ट्रायब्युनलने असा निर्णय दिला की करारानुसार दरमहा जी रक्कम मिळाली असती, त्याबाबतचे हक्क सोडण्याच्या बदल्यातच ही रक्कम मिळाली आहे. त्यामुळे सदर रक्कम ‘कॅपिटल रिसिट’ आहे आणि म्हणून ती करमाफ ठरते.

(४) २०१५ :- प्रेमा संघवी विरुद्ध इन्कम टॅक्स ऑफिसर हा मुंबई ट्रायब्युनलचा निकाल २०१५ मध्ये देण्यात आला. याही प्रकरणात पती जर्मन नागरिक होते. प्रेमा व सदर पती हे हिंदू रीतीरिवाजांप्रमाणे विवाहबद्ध झाले होते. न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांचा १९७८ मध्ये घटस्फोट झाला होता. पण जर्मनीतला कायदा त्याला मान्यता देत नसल्याने, जर्मन न्यायालयानेही त्याबाबतचा निकाल २००१ मध्ये दिला. त्या निकालांत पोटगी/ भरपाईचा उल्लेख नव्हता. पण त्या निकालानंतर पाच वर्षांनी, आधीच्या त्या पतीने प्रेमा यांना एकरकमी स्वरूपात काही रक्कम पाठवली व ती पोटगीपोटीच दिली आहे असे लिहून दिले. या प्रकरणात ट्रायब्युनलने असा निर्णय दिला की हिंदू कायद्याप्रमाणे पत्नीला निर्वाह आणि पोटगी या संबंधित हक्क असतातच. त्यामुळे निकालांत रकमेचा उल्लेख नसला, तरीही त्या रकमेचे स्वरूप बदलत नाही. तसेच पती या शब्दाच्या अर्थात आधीचा पतीही समाविष्ट होतो आणि सदर रक्कम ही एकरकमी स्वरूपाची असल्याने ती ‘कॅपिटल रिसिट’ ठरते व म्हणून करमाफ आहे.

(५) २०१६ :- श्रीमती रमा सेनगुप्ता विरुद्ध कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स हा कलकत्ता उच्च न्यायालयाचा निकाल २०१६ मध्ये आला. त्याही निकालात असे सांगितले गेले की घटस्फोटाशी निगडित अशी एकरकमी मिळालेली रक्कम ही ‘कॅपिटल रिसिट’ या स्वरूपाची ठरते व म्हणून ती करमाफ आहे.

तात्पर्य :- उपरोक्त निकालांचे थोडक्यात निष्कर्ष असे निघतात की (अ )घटस्फोटा संबंधाने पूर्वीच्या जोडीदाराकडून दरमहा/नियमित रक्कम मिळत असेल तर ती करमाफ ठरणार नाही (ब ) परंतु एकरकमी स्वरूपाने मिळालेल्या अशा रकमा मात्र करमाफ असतील. या निकालांची योग्यता/ अयोग्यता हे या लेखाचे विषय नाहीत. तूर्तास तरी या विषयातील कोर्टनिर्मित कायदा हा वर लिहिल्याप्रमाणे दिसत आहे, हेच तात्पर्य आहे. असो.

प्रतिपक्ष / प्रतिप्रश्न – पण मग यांतून एक महत्त्वाचा प्रश्न असा निर्माण होतो की, आधीच्या जोडीदाराने घटस्फोटापोटी एकरकमी, किंवा नियमित स्वरूपाच्या, रकमा दिल्या तर त्याबाबत त्याला काही वजावट मिळेल की नाही? या प्रश्नाचे उत्तर सध्या तरी नकारार्थी आहे. आणि याबाबतचे काही निर्णय असे आहेत.

(१) कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स विरुद्ध एम. पी. पोंशाज या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाकडून १९९४ साली एक निर्णय दिला गेला आहे. त्या प्रकरणात करदाता हा घटस्फोटित पती होता. त्याचा घटस्फोट पारशी न्यायालयाच्या ‘कन्सेंट डिक्री’प्रमाणे झाला होता. सदर डिक्रीनुसार त्याच्या पगारावर कुठलाही बोजा येत नव्हता. पण त्याला त्याची आधीची पत्नी, मूल व त्याला सांभाळण्यासाठी नोकरखर्च या सर्वांसाठी मिळून दरमहा काही रक्कम द्यायची होती. त्याने ती रक्कम दरमहा त्याच्या पगारातून कापून घेऊन परस्पर द्यावी असे त्याच्या कंपनीला लिहून दिले. कंपनीही तसे करत होती. त्याने असा पवित्रा घेतला की, त्याला त्याच्या पगाराच्या उत्पन्नातून सदर रकमेची वजावट मिळावी. पण न्यायालयाने ते अमान्य केले. न्यायालयाच्या मते सदर रकमेमुळे त्याचा पगार कमी होत नाही. ती रक्कम हा कमावलेल्या पगारातून झालेला, नंतरचा विनियोग आहे.

(२) उपरोक्त, प्रिन्सेस महेश्वरी देवी या निकालातही न्यायालयाने अशा आशयाची टिप्पणी केली आहे की, दरमहा दिली जाणारी पोटगी ही देणाऱ्याच्या हातात वजावटीस पात्र नाही म्हणून ती मिळणाऱ्याच्या हातात करमाफ ठरावी, असे नाही.

तात्पर्य :- उपरोक्त निकालाचा निष्कर्ष असा दिसतो की, घटस्फोटाशी संबंधित जी रक्कम दिली जाते त्याची कुठलीही वजावट ती रक्कम देणाऱ्याला मिळत नाही. ती एकरकमी असो किंवा मासिक पद्धतीने दिलेली असो, हे तात्पर्य बदलत नाही.

जाता जाता :- येऊ घातलेल्या नवीन आयकर कायद्यात या बाबतींत नेमक्या तरतुदी केल्या गेल्या तर या विषयात स्पष्टता येईल. अन्यथा अशा न्यायालयनिर्मित कायद्यांवरच अवलंबून राहावे लागेल.

(लेखक वैधानिक लेखापरीक्षक असून कर विषयाचे अभ्यासक आहेत)

umkarve@gmail.com



Source link

कव्हर स्टोरी: ‘तामिळनाडू फाइल्स’ राजकीय वर्चस्ववादाला लगाम

0
कव्हर स्टोरी:  ‘तामिळनाडू फाइल्स’ राजकीय वर्चस्ववादाला लगाम


डॉ. प्रकाश पवार34 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

तामिळनाडूचे राज्यपाल आणि सत्ताधारी द्रमुक सरकारमध्ये विधेयकांच्या मंजुरीवरून सुरू असलेल्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल महत्त्वाचा आहे. तो जसा राष्ट्रपती, राज्यपालांना अशा प्रकरणातील निर्णयासाठीच्या कालमर्यादेची जाणीव करून देणारा आहे, तसा कायद्याच्या निर्मितीत बहुमतातील कायदेमंडळाला महत्त्व देणारा आणि राज्य सरकारांच्या प्रशासकीय स्वायत्तेवर भाष्य करणारा आहे. देशात १९५० पासून राज्यपालपदाचा उपयोग राजकीय वर्चस्वासाठी केला जात होता. या ‘तामिळनाडू फाइल्स’मधून पुढे आलेला हा निकाल त्या कुप्रथेवरही नियंत्रण आणणारा आहे.

राजकीय पक्षांनी प्रदेशातील राजकीय नकाशा बदलण्यासाठी ‘राज्यपाल’ या पदाचा उपयोग करण्याची परंपरा फार जुनी आहे. २०१४ पासून भाजपच्या राजकीय वर्चस्वाचा नकाशा घडवण्यासाठी या पक्षाचा प्रयत्न सुरू आहे, असे दिसते. अशीच प्रक्रिया १९५० – १९८९ दरम्यान काँग्रेस व्यवस्थेच्या काळातही झाली होती. अलीकडेच ८ एप्रिलला तामिळनाडू सरकारच्या १० विधेयकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे न्या. जे. बी. पारडीवाला आणि आर. महादेवन यांच्या खंडपीठाने दिलेला निकाल हा या वर्चस्वाच्या प्रक्रियेला विरोध करणारा आहे. हा निकाल केवळ तामिळनाडूपुरता मर्यादित नाही, तर तो कायदा, न्याय (वर्चस्व विरोध) आणि सत्तेवर नियंत्रण ठेवण्यासंदर्भात समग्र आणि व्यापक स्वरूपाचा पुनर्विचार करणारा आहे. विशेषतः या निकालातून मूक क्रांतीचे (Silent Revolution) सूतोवाच झाले आहे. म्हणून या निकालाचा संदर्भ घटना समितीतील चर्चेपासून तपासला पाहिजे. तसेच समकालीन सहकारी संघराज्ये, केंद्र – राज्य संबंध, राज्यांची प्रशासकीय स्वायत्तता, राज्यपालांचे अधिकार क्षेत्र अशा अनेक अर्थाने वर्चस्वाच्या विरोधात नवीन चर्चाविश्व घडवणारा असा हा निकाल आहे. एकूणच हे मुद्दे भारतीय राजकारणाला नवा आकार देणारे आहेत.

डॉ. आंबेडकर आणि पं. नेहरूंचा दृष्टिकोन

‘राज्यपाल’ या पदाला सुरूवातीपासूनच वादाची किनार लाभली आहे. ही प्रक्रिया भारतीय राज्यघटनेवरील चर्चेपासूनच सुरू झाली होती. या संदर्भातील ऐतिहासिक दृष्टिकोन राजकीय वर्चस्वाला विरोध करणारे होते.

1. राज्यपाल हे पद नियुक्त असावे की निवडून आलेले असावे, याविषयी घटना समितीमध्ये चर्चा झाली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नियुक्ती आणि निवडणूक पद्धतीद्वारे राज्यपाल पदाबद्दल भाष्य केले होते. त्यांनी बहुमत असणाऱ्या कायदेमंडळाला महत्त्व दिले होते. अशा कायदेमंडळात राज्यपाल नियुक्त केले किंवा निवडणुकीद्वारे निवडून आले ही चर्चा निरर्थक ठरते, असे त्यांचे मत होते. म्हणजेच त्यांनी बहुमत असणारे कायदेमंडळ महत्त्वाचे मानले होते. पक्षांनी राजकीय वर्चस्व निर्माण करु नये, अशी त्यांची धारणा होती.

2. डॉ. आंबेडकर यांच्याप्रमाणे पं. नेहरू यांनीही राज्यपाल पदाबद्दल विचार मांडले होते. नियुक्तीच्या ऐवजी राज्यपालांना निवडून दिले आणि त्यांनी घटक राज्यातील फुटीरतावादी शक्तींना बळ दिले, तर हे पद निरुपयोगी आहे, असे त्यांचे मत होते. म्हणजेच केंद्राचा विचार वेगळा आणि राज्याचा विचार वेगळा असा भेदभाव राज्यपालांनी करू नये, असा नेहरूंचा युक्तिवाद होता. थोडक्यात, राज्यपाल हे पद संघराज्यातील ऐक्य आणि एकात्मता जपणारे आहे, अशी घटनाकारांची अपेक्षा होती. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, राज्य विधिमंडळाच्या प्रशासकीय स्वायत्ततेला त्यांनी मान्यता दिली होती.

सहकारी संघराज्यविरोधी तक्रार

डॉ. आंबेडकर आणि पं. नेहरू यांची भूमिका म्हणजे घटनाकारांची भूमिका होती. त्यांनी राज्यपालांमार्फत आकाराला येणारा राजकीय वर्चस्वाचा मुद्दा नाकारला होता. एका अर्थाने त्यांनी राज्यपालांचे अधिकारक्षेत्र बहुमताच्या कायदेमंडळावर आणि केंद्र – राज्य यांच्यातील ऐक्य व एकात्मतेवर सोपवले होते. परंतु, भारतीय राजकारणात सहकारी संघराज्याच्या विरोधात सातत्याने तक्रारी आणि आरोप – प्रत्यारोप केले गेले आहेत. अर्थातच राज्यपालपद हा त्याचा एक नकारात्मक संदर्भबिंदू राहिला आहे. काँग्रेसी व्यवस्था अस्तित्वात असतानाही हा तक्रारीचा विषय बनला होता.

1. भारतीय राजकारणात सहकारी संघराज्य ही संकल्पना सातत्याने वापरण्यात आली आहे. २०१४ पूर्वी केंद्र आणि राज्य यांच्या संबंधांचे विवेचन करताना सहकारी संघराज्य अशी संकल्पना वापरली जात होती. परंतु, तेव्हा काँग्रेसच्या विरोधातील सरकारे असलेली राज्ये आणि केंद्रातील काँग्रेस यांच्यामध्ये अनेक वेळा वाद झाले. त्या वादात राज्यपाल हे पद केंद्रस्थानी होते. कायदेमंडळाचे बहुमत, केंद्र – राज्य यांच्यातील सत्ता विकेंद्रीकरण आणि ऐक्य व एकात्मता यापेक्षा पक्षीय, राजकीय वर्चस्वाचा विषयच जास्त घडामोडी घडवत होता.

2. नीती आयोगाने २०१४ नंतर सहकारी संघराज्य अशी अधिकृतपणे भूमिका घेतली. यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये सहकारी पद्धतीने शासन व्यवहार घडेल, अशी अपेक्षा केली गेली. परंतु, अनेक राज्यांनी (भाजपचे सरकार नसलेल्या) केंद्र सरकारवर हस्तक्षेपाचा आरोप केला. केंद्र सरकार राज्यपालांना राजकीय हस्तक्षेपाचे हत्यार म्हणून वापरत आहे, अशी भूमिका या राज्यांनी वेळोवेळी मांडली. आता न्या. पारडीवाला, न्या. महादेवन यांनी मात्र राज्यपालांच्या राज्य सरकारमधील हस्तक्षेपाला मर्यादा आहेत, म्हणजेच राज्यपाल हे पद पक्षीय वर्चस्व निर्माण करण्याचे साधन होऊ नये, हे सूचित केले आहे. त्यामुळे विशेषत्वाने हा निकाल राज्यांची प्रशासकीय स्वायत्तता वाढवतो आणि संवैधानिक संस्थांच्या कामकाजाचे नियमन करतो. तो संवैधानिक कामकाजाच्या पद्धतीचा आणि घटनात्मक दृष्टीचा आग्रह धरणारा आहे.

3. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाचे परिणाम संपूर्ण देशावर होणार आहेत. कारण तामिळनाडू राज्य विधानसभेने मंजूर केलेल्या १० विधेयकांच्या हाताळणीशी संबंधित हा निर्णय देताना, राज्यांच्या विधानसभांना अधिकार आहेत, हे खंडपीठाने मान्य केले आहे. राज्यपाल आपल्या संवैधानिक जबाबदाऱ्या कशा पार पाडतात, हे या प्रकरणात न्यायालयाने प्रभावीपणे आणि स्पष्ट शब्दात सांगितले आहे. त्यामुळे हा बदल राज्यपाल आणि राज्य विधानसभा यांच्या संदर्भात महत्त्वाचा ठरला आहे. भाजपव्यतिरिक्त अन्य पक्षांची सरकारे असलेल्या राज्यांतील राज्यपाल आणि सरकारांमधील तणाव सातत्याने वाढत आहे, तो सर्वोच्च बिंदूवर जाऊन पोहोचला आहे. अशा स्थितीत राज्यांना प्रशासकीय स्वायत्तता देणारा हा निकाल भारताच्या अर्ध्या राजकीय नकाशावर तरी दूरगामी परिणाम करणारा आहे.

4. हा निर्णय ‘अर्ध-संघराज्य’ या संकल्पनेला बळकट करणारा आहे. कारण भारतीय संघराज्य पद्धतीत सत्ता ही संकल्पना केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये विभागली आहे. प्रत्येक स्तराला संविधानाद्वारे काही अधिकार दिले आहेत. अर्ध-संघराज्य म्हणजे संघराज्य (सत्तेचे विकेंद्रीकरण – Decentralization) आणि एकात्मिक (Unitary) या दोन्ही प्रकारांचे मिश्रण. यात विकेंद्रीकरण हे तत्त्व (Principle) आणि एकात्मिकता हा खरा उद्देश (Spirit) आहे. तत्त्व आणि उद्देश यांचा एकत्रित सुमेळ न्यायालयाने या निकालात घातल्याचे दिसते. या तत्त्वाचे समर्थन करताना न्यायालयाने राज्यपालांना राज्याच्या सत्तेत हस्तक्षेप करण्यास विरोध केला आहे. राज्यपाल हे मार्गदर्शक आणि सल्लागार आहेत, अशी भूमिका घेत न्यायालयाने, राज्यपालांनी घटनात्मक चौकटीत व्यवहार करावा, असे सूचित केले आहे. यामुळे हा निर्णय अर्ध-संघराज्य पद्धतीचे समर्थन करणारा आहे.

राज्यपालांचे अधिकारक्षेत्र

बहुमतातील कायदेमंडळ आणि राज्यपाल या दोन्हींपैकी कायदेमंडळ घटनात्मकदृष्ट्या अधिक महत्त्वाचे आहे, हे न्यायालयाने अधोरेखित केले आहे. एका अर्थाने बहुमतातील कायदेमंडळाच्या तुलनेत राज्यपालांचे अधिकार मर्यादित आहेत, हेच न्यायालय सूचित करत आहे. दुसरीकडे, कलम २०० नुसार राज्यपालांना कालमर्यादा घालण्यात आल्या आहेत. राज्यपालांच्या तीनही अधिकारांना वेळेची मर्यादा आहे. (अ) राज्यपालांना विधेयक राखून ठेवण्याचा अधिकार आहे. परंतु, त्यासाठीही कालमर्यादा महत्त्वाची मानली आहे. (ब) विधेयकाला संमती देण्याच्या राज्यपालांच्या अधिकारालाही कालमर्यादेची चौकट आहे. (क) विधेयक राष्ट्रपतींच्या विचारार्थ पाठवून देण्याच्या अधिकारालाही कालमर्यादेने बांधले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी घटनात्मक चौकट म्हणून काळाची मर्यादा पाळावी, अशी अपेक्षा न्यायालयाने व्यक्त केली आहे.

तामिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी आणि सत्ताधारी द्रमुक सरकारमधील विधेयकांच्या मंजुरीवरून सुरू झालेल्या वादाचे निराकरण करणारा सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल राष्ट्रपती आणि राज्यपालांना अशा प्रकरणांत निर्णय घेण्यासाठीच्या विशिष्ट कालमर्यादेची जाणीव करुन देणारा आहे. राज्यपालांनी असंवैधानिक समजांच्या आधारावर विधेयक विचारार्थ राखून ठेवले असेल, तेव्हा राष्ट्रपतींनी त्यांचे मत मागावे. कलम १४३ अंतर्गत विधेयक सर्वोच्च न्यायालयात पाठवण्याचा पर्याय अनिवार्य नसला, तरी राष्ट्रपतींनी विवेकबुद्धी म्हणून असंवैधानिकतेच्या कारणास्तव आपल्या विचारार्थ राखीव ठेवलेल्या विधेयकांसंदर्भात सदर तरतुदीनुसार मत मागितले पाहिजे, अशी भूमिका सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे.

थोडक्यात, न्यायालयाचा हा निर्णय कायदा निर्मितीच्या प्रक्रियेत बहुमतातील कायदेमंडळाला महत्त्व देणारा तसेच गेल्या ७५ वर्षांतील राजकीय प्रक्रियेवर आणि राज्य सरकारांच्या प्रशासकीय स्वायत्तेवर भाष्य करणारा आहे. १९५० च्या दशकापासून आजपर्यंत राज्यपालपदाचा उपयोग राजकीय वर्चस्व जपण्यासाठी आणि पक्षांचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी केला जात होता. या ‘तामिळनाडू फाइल्स’मधून पुढे आलेला हा निकाल त्या कुप्रथेवरही नियंत्रण आणणारा आहे.

न्यायालयीन कृतिशीलतेचा नवा पैलू

भारतीय न्यायव्यवस्था कृतिशील आहे, असे विश्लेषण सातत्याने केले जाते. परंतु, या निकालाने न्यायालयीन कृतिशीलतेचा एक नवा पैलू समोर आला आहे. या संदर्भातील दोन महत्त्वाची तत्त्वे त्यातून अधोरेेखित होतात…

1. राज्यघटनेतील कलम १४२ सर्वोच्च न्यायालयाला कृतिशील होता येईल, अशा अर्थाचे तत्त्व स्पष्ट करणारे आहे. कारण या न्यायालयाला न्यायिक कृतिशीलतेच्या भावनेने देशातील कोणत्याही न्यायालयातील प्रकरण सोडवण्याचा अधिकार आहे. याचा अर्थ हे न्यायालय कायद्याच्या क्षेत्रात योग्य तिथे हस्तक्षेप करू शकते.

2. या निकालातून न्यायालयाने देशात प्रथमच कायदा निर्मिती प्रक्रियेत मान्यता देण्याची भूमिका घेतली आहे. तामिळनाडूच्या राज्यपालांनी अंतिम मान्यता न दिलेल्या दहा विधेयकांना न्यायालयाने मान्यता दिली, ते मंजूरही केले. कायदानिर्मितीला अंतिम मान्यता देण्यातील न्यायालयाची कृतिप्रवणता यातून दिसते. ती नागरिकांशी संबंधिक राजकीय निर्णयांना पाठबळ देणारीही ठरते.



Source link

former congress leader p Chidambaram s article on autonomy of universities समोरच्या बाकावरून : कुठे आहे विद्यापीठांची स्वायत्तता?

0
former congress leader p Chidambaram s article on autonomy of universities समोरच्या बाकावरून : कुठे आहे विद्यापीठांची स्वायत्तता?


‘‘विद्यापीठ आपल्या स्वायत्ततेचा किंवा आपल्या घटनात्मक अधिकारांचा परित्याग करणार नाही. प्रशासनाची ही अट केंद्र सरकारच्या अधिकारांपलीकडची आहे. आणि ती ज्ञानाच्या शोध, निर्मिती आणि प्रसारासाठी समर्पित असलेल्या खासगी संस्थेच्या मूल्यांना धक्का देणारी आहे. कोणतंही सरकार—कोणताही पक्ष सत्तेत असो—खासगी विद्यापीठांमध्ये काय शिकवायचं, कोणाला प्रवेश द्यायचा आणि कोणाला नेमायचं, तसेच कोणत्या विषयाचा अभ्यास आणि संशोधन करायचं, हे ठरवू शकत नाही.’’ भारतातील कोणत्याही विद्यापीठाच्या कुलगुरूंनी प्रशासनाच्या हस्तक्षेपाविरोधात असं विधान केलं आहे का? या प्रश्नाचे उत्तर आहे — ‘कोणीच नाही’. वरील ही वाक्यं आहेत हार्वर्ड विद्यापीठाचे अध्यक्ष अॅलन गार्बर यांची. हार्वर्ड हे अमेरिका या देशाच्या स्थापनेपूर्वी अस्तित्वात आलेलं विद्यापीठ आहे. अॅलन गार्बर यांनी स्वत:ला जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती समजणाऱ्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना अशा पद्धतीने विरोध केला. या गोष्टीचा बदला घेत ट्रम्प यांनी २.२ अब्ज अमेरिकी डॉलर्सचे अनुदान आणि ६० दशलक्ष अमेरिकी डॉलर्सच्या करारांची रक्कम थांबवली, तरीही हार्वर्ड विद्यापीठाने माघार घेतली नाही. याउलट गेल्या महिन्यात, कोलंबिया विद्यापीठाचा ४०० दशलक्ष अमेरिकी डॉलर्स इतका सरकारी निधी रोखण्यात आला होता. पण या विद्यापीठाने मात्र सरकारसमोर झुकण्याचा पर्याय स्वीकारला.

स्वायत्तता नाही

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) वेबसाइटनुसार, २५ जानेवारी २०२३ या दिवशीच्या आकडेवारीनुसार भारतात १०७४ विद्यापीठे आहेत आणि त्यांची संख्या अशी आहे:

राज्य विद्यापीठे – ४६०, अभिमत विद्यापीठे – १२८

केंद्रीय विद्यापीठे – ५६, खासगी विद्यापीठे – ४३०, एकूण १०७४

यामध्ये कोलकाता, चेन्नई आणि मुंबई या तीन १८५७ मध्ये म्हणजे स्वातंत्र्याच्याही बऱ्याच आधी स्थापन झालेल्या सर्वात जुन्या तीन विद्यापीठांचा समावेश आहे. यूजीसी आणि राज्यपाल-कुलगुरूंबरोबर असलेल्या मतभेदांमुळे, ऑगस्ट २०२३ पासून चेन्नई विद्यापीठाला कुलगुरू नाहीत.

भारतीय विद्यापीठांना स्वायत्तता नाही, याला संसदेने केलेले कायदे आणि विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) विद्यापीठ अनुदान आयोग कायदा, १९५६ या कायद्याचा वापर ज्या पद्धतीने केला आहे, ते कारणीभूत आहे. या कायद्याचा उद्देश ‘विद्यापीठांमध्ये समन्वय साधणे आणि दर्जा निश्चित करणे’ असा होता. कलम १२ नुसार यूजीसीला विद्यापीठांना अध्यापन, परीक्षा आणि संशोधनाच्या दर्जाच्या निश्चितीसाठी आणि देखरेखीच्या अनुषंगाने अनुदान वाटप करण्याचा अधिकार देण्यात आला होता. १९८४ मध्ये कलम १२ अ हे नव्याने घालण्यात आले आणि कलम १४ मध्ये दुरुस्ती करून यूजीसीच्या अधिकारात मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली. या आर्थिक अधिकाराच्या जोरावर यूजीसी विद्यापीठांच्या प्रत्येक कारभारात हस्तक्षेप करू लागली. या अधिकारांचा वापर करून यूजीसीने असे ‘नियम’ तयार केले, की ज्यामुळे विद्यापीठांची स्वायत्तता जवळजवळ नाहीशीच झाली आहे.

हेही वाचा

यूजीसी म्हणजे ‘मोठा दादा’

शिक्षकांच्या नेमणुकीपासून अभ्यासक्रमाच्या रचनेपर्यंत, संशोधनाच्या क्षेत्रांपासून परीक्षा घेण्याच्या पद्धतीपर्यंत सगळ्या गोष्टींवर यूजीसीचं (आणि यूजीसीमार्फत एका विशिष्ट विचारसरणी असलेल्या केंद्र सरकारचं) नियंत्रण आहे. यूजीसीच्या काही अति हस्तक्षेप करणाऱ्या नियमांकडे पाहा :

● सर्व शिक्षक आणि इतर अकादमिक कर्मचाऱ्यांच्या पात्रता व

नेमणुकीसंबंधीचे नियम;

● नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट (NET);

● नॅशनल एलिजिबिलिटी अँड एन्ट्रन्स एग्झॅमिनेशन (NEET);

● जॉइंट एन्ट्रन्स एग्झॅमिनेशन (JEE);

● कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स टेस्ट (CUET);

● लर्निंग आउटकम-बेस्ड करिक्युलम फ्रेमवर्क (LOCF);

● चॉइस बेस्ड क्रेडिट सिस्टम (CBCS); आणि

● नॅशनल इन्स्टिट्युशनल रँकिंग फ्रेमवर्क (NIRF).

उपकुलगुरूंना काही थोडेसे ‘शिल्लक’ अधिकार राहिले होते, ते पाहता यूजीसीने उपकुलगुरूंच्या निवड आणि नेमणुकीवरही नियंत्रण ठेवायचं ठरवलं (यासंदर्भात ‘मांजरांच्या पावलांनी ती येते आहे’, लोकसत्ता, १२ जानेवारी २०२५, पाहा). माझ्या मते, राज्य आणि खासगी विद्यापीठांमधील शिक्षक व अशैक्षणिक पदांवरील नेमणुकीत — विशेषत: उपकुलगुरूंच्या नेमणुकीत — यूजीसीचा काहीही सहभाग असता कामा नये. तसं झालं, तर हे विद्यापीठांच्या राष्ट्रीयीकरणाच्या दिशेने टाकलेले पाऊल असेल.

उच्च शिक्षणच बळी ठरत आहे

विद्यापीठांवरचा हा सर्वव्यापी नियंत्रणाचा कारभार उच्च शिक्षणाच्या उत्कर्षासाठी फायद्याचा ठरलाय का? उत्तर आहे — नाही. जगभरातील सर्वोत्तम १०० विद्यापीठांच्या (रँकिंगनुसार) यादीत एकही भारतीय विद्यापीठ नाही. सर्वाधिक स्थान मिळवलेलं भारतीय विद्यापीठ म्हणजे आयआयटी मुंबई, ते ११८व्या क्रमांकावर आहे. संसदेत एका प्रश्नाच्या उत्तरात सरकारने सांगितलं की २१ ऑक्टोबर २०२४ रोजी एकट्या केंद्रीय विद्यापीठांमध्येच ५,१८२ अध्यापन पदे रिक्त होती. संसदेच्या शिक्षणावरील स्थायी समितीच्या निरीक्षणानुसार आयआयटी पदवीधरांच्या नोकरीच्या संधींमध्ये घट झाली आहे. २०२१-२२ ते २०२३-२४ या कालावधीत नोकरी मिळण्याचे प्रमाण १० टक्क्यांहून अधिक घटले आहे. एनआयटी पदवीधरांचं नोकरी मिळण्याचं प्रमाणही १०.७७ टक्क्यांनी घसरलं आहे. १९३० साली ज्यांना विज्ञानासाठी नोबेल पारितोषिक मिळाले, ते डॉ. सी. व्ही. रमन हे एकमेव असे व्यक्ती होते, जे भारतीय विद्यापीठात शिकले आणि त्यांनी हा पुरस्कार मिळवला.

हेही वाचा

भारतीय विद्यापीठं अनेक समस्यांनी ग्रासलेली आहेत : त्यांना पुरेशा देणग्या मिळत नाहीत, माजी विद्यार्थ्यांचा पाठिंबा पुरेसा नसतो, अनुदानं आणि संशोधन करार अपुरे असतात, शैक्षणिक स्वातंत्र्याचा अभाव, यूजीसीचे अतिरेकी नियंत्रण, कुलपती (राज्यपाल) आणि प्र-कुलपती (साधारणपणे शिक्षणमंत्री) यांचा हस्तक्षेप, आणि राजकारणी तसेच नोकरशहांचा दबाव या समस्यांना ही विद्यापीठं सातत्याने तोंड देतात. शैक्षणिक स्वातंत्र्याचा अभाव दाखवण्यासाठी एक बोलकं उदाहरण आहे : आतापर्यंत विद्यापीठांनी चालवलेल्या दूरशिक्षण (डिस्टन्स एज्युकेशन) कार्यक्रमांत देशभरातील, अगदी परदेशातील विद्यार्थ्यांनाही प्रवेश देता येत असे. मात्र, नुकत्याच यूजीसीने काढलेल्या नियमांनुसार, त्या विद्यापीठाचा ‘कॅचमेंट एरिया’, फक्त ते विद्यापीठ जिथे आहे त्या राज्याच्या एक किंवा दोन जिल्ह्यांपुरता मर्यादित करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यापीठाला चांगल्या दर्जासाठी प्रयत्न करण्याची प्रेरणा राहत नाही आणि विद्यार्थ्यांनाही दूरशिक्षणासाठी विद्यापीठ निवडण्याचा पर्याय उरत नाही.

दुर्दैवाची गोष्ट म्हणजे शैक्षणिक स्वातंत्र्याचा अवकाश दिवसेंदिवस आकुंचन पावत आहे. काही असहिष्णू गटांनी अनेक विद्यापीठांवर – तसेच तेथील शिक्षक आणि विद्यार्थ्यांवर — शाब्दिक आणि शारीरिक हल्ले चढवले आहेत. यात जेएनयू, दिल्ली विद्यापीठ, जामिया मिलिया, अलिगढ मुस्लीम युनिव्हर्सिटी, जाधवपूर, सेंट्रल युनिव्हर्सिटी जम्मू आणि अनेक इतर विद्यापीठांचा समावेश आहे. जोपर्यंत आधीचा यूजीसी कायदा रद्द करून, नवा कायदा निर्माण करून तो राबवला जात नाही, तोपर्यंत विद्यापीठांची स्वायत्तता हे केवळ स्वप्नच राहील. आणि जोपर्यंत माजी विद्यार्थ्यांच्या पाठबळातून देणग्यांमधून निधी उभा राहत नाही, तोपर्यंत शैक्षणिक स्वातंत्र्य हा फक्त एक आभास ठरेल. स्वयंपूर्ण सार्वजनिक विद्यापीठांच्या जागी, काही अपवाद वगळता, श्रीमंत कुटुंबं आणि कॉर्पोरेट कंपन्यांनी चालवलेली खासगी विद्यापीठांची वाढती संख्या दिसेल. त्यांचा हेतू धर्मादाय असला, तरी प्रत्यक्ष परिणाम मात्र व्यावसायिकच असतील.

लेखक भारताचे माजी अर्थमंत्री आहेत.

संकेतस्थळ : pchidambaram.in ट्विटर : @Pchidambaram_IN



Source link

देश – परदेश: ग्रीनलँडचे काय होईल?

0
देश – परदेश:  ग्रीनलँडचे काय होईल?


ज्ञानेश्वर मुळे3 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

ग्रीनलँड हे जगातील सर्वात मोठे बेट उत्तर अटलांटिक आणि आर्क्टिक दरम्यान आहे. त्याचे राजकीय संबंध डेन्मार्कशी आहेत, कारण तो त्या देशाचा स्वायत्त भाग आहे. परंतु, अमेरिका, रशिया, चीन, नार्वे अशा शक्तिशाली देशांची या भागावरील वाढती नजर लक्षात घेता ग्रीनलँडचे पुढे काय होणार, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

ज्या पद्धतीने अमेरिकेने ग्रीनलँड हा देश घशात घालण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, तो केवळ अद्भुत म्हणावा लागेल. पण, आंतरराष्ट्रीय राजकारण हे असं असतं. ज्यांनी विविध पद्धतीने जगाचे शोषण केले आहे, ते अमेरिका, इंग्लंडसारखे देशच तिथे लोकशाहीविषयी सतत धडे देण्याचा प्रयत्न करत असतात. आता ग्रीनलँड घेण्याचा अमेरिकेचा प्रयत्न पाहण्यासारखा आहे.अमेरिकेने हा देश घेतला तर २१ लाख ६६ हजार चौरस किलोमीटरचा प्रदेश मिळाल्याने भूक्षेत्राच्या बाबतीत अमेरिका कॅनडापेक्षा महाकाय आणि जगातील दुसरे मोठे राष्ट्र बनू शकेल. अमेरिका शंभर एक वर्षे येनकेन प्रकारे ग्रीनलँड घेण्याचा प्रयत्न करत आहे. अमेरिकची अनेक वर्षांपासून ग्रीनलँडमध्ये, विशेषत: थुले एअर बेसच्या माध्यमातून लष्करी उपस्थिती आहे. २०१९ मध्ये तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची ग्रीनलँड खरेदी करण्याची इच्छा अनेकांना धक्कादायक वाटली. परंतु, ती “रिअल इस्टेट”च्या दृष्टिकोनातून नव्हे, तर भूराजकीय आणि सामरिक दृष्टिकोनातून होती. आर्क्टिक प्रदेशात चीन आणि रशियाची वाढती उपस्थिती अमेरिकेसाठी धोका असल्याचे भासवणे सुरू आहे. याच कारणामुळे ग्रीनलँडमध्ये अमेरिका दुसऱ्या महायुद्धापासून आपला लष्करी तळ ठोकून आहे.

ग्रीनलँडचे परराष्ट्र आणि संरक्षण धोरण आजही डेन्मार्कच्या नियंत्रणात आहे. एका बाजूला ग्रीनलँडला स्वायत्त भूमी मानली जाते, पण दुसरीकडे याच ग्रीनलँडवर सार्वभौमत्व मात्र डेन्मार्कचे आहे. ग्रीनलँडच्या नैसर्गिक संसाधनांमुळे डेन्मार्कसाठी हे बेट अत्यंत मौल्यवान आहे. अमेरिकेचा हस्तक्षेप डेन्मार्कला अस्वस्थ करतो. तरीही अमेरिकेशिवाय डेन्मार्क एकटा ग्रीनलँडच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे.

आर्क्टिकमध्ये बर्फ वितळल्यामुळे नवीन समुद्री मार्ग, खनिज साठे आणि इंधन स्रोत उपलब्ध होत आहेत. रशिया आणि चीन या नव्या संधींचा वापर करत आहेत. चीनने ग्रीनलँडमध्ये गुंतवणुकीचे प्रयत्न सुरू केले होते. विमानतळ बांधकाम प्रकल्पात रुची दाखवली होती. मात्र, अमेरिका आणि डेन्मार्कने हे प्रयत्न हाणून पाडले. नार्वे हे आर्क्टिक सर्कलमध्ये आधीपासून प्रभावशाली राष्ट्र आहे. त्याचे आर्थिक आणि लष्करी हितसंबंधही ग्रीनलँडशी जोडले गेले आहेत. एकेकाळी नॉर्वेनेही ग्रीनलँडची भूमी काबीज केली होती.

ट्रम्प यांच्या पहिल्या कारकिर्दीपासून त्यांनी अत्यंत आक्रमक पद्धतीने ग्रीनलँडविषयी बोलणं सुरू केले .कधी ते या विषयाला ‘रिअल इस्टेट प्रोजेक्ट’ म्हणतात, तर कधी अमेरिकेच्या संरक्षणासाठी अत्यंत आवश्यक बेट असे स्वत:च्या प्रयत्नांचे समर्थन करतात. ट्रम्प दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर आता अमेरिकी तसेच युरोपियन अधिकाऱ्यांच्या ग्रीनलँड आणि डेन्मार्क भेटींनी पुन्हा एकदा आर्क्टिकच्या भू-राजकारणाला गती आली आहे. नवीन संरक्षण करार, गुंतवणुकीचे प्रस्ताव आणि वातावरणविषयक सहकार्य यावर चर्चा झाली आहे. ट्रम्प यांच्या ‘खरेदी’च्या विधानामुळे सुरूवातीला थोडं हास्यास्पद वातावरण तयार झालं होतं, परंतु त्यामुळेच ग्रीनलँडच्या जागतिक महत्त्वावर प्रकाश पडला.

ट्रम्प यांनी ग्रीनलँडकडे ‘एक मोठे डील’ म्हणून पाहिलं. त्यांचं म्हणणं होतं की, अमेरिका हे बेट विकत घेऊ शकत असेल, तर ती एक ऐतिहासिक गुंतवणूक ठरेल. परंतु, प्रत्यक्षात ‘स्ट्रॅटेजिक रिअल इस्टेट’ म्हणजेच भू-राजकीयदृष्ट्या फायदेशीर असलेल्या जमिनीसाठीचा हा दृष्टिकोन मानता येईल. या बाबतीत भविष्यात नेमके काय होईल, याचा आत्ताच अंदाज बांधता येत नसला, तरी हे मात्र निश्चित आहे की, ट्रम्प सहजासहजी आपला अट्टाहास सोडणार नाहीत. त्यांच्या मनात एक व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा आहे, ती म्हणजे अमेरिकेच्या इतिहासात स्वत:चे नाव अजरामर राहील, अशी व्यवस्था करणे. ग्रीनलँड त्यांच्या कार्यकाळात अमेरिकेकडे आले, तर निश्चितच त्यांच्या नावाची नोंद इतिहासात झाल्याशिवाय राहणार नाही.

आर्क्टिकचे बर्फ जसजसे वितळत जाईल आणि वाहतुकीसाठी अनुकूल वातावरण होईल, तेव्हा मात्र युरोपियन देश, अमेरिका एका बाजूला आणि रशिया व चीन दुसऱ्या बाजूला आमनेसामने येण्याची, त्यातून आर्क्टिकमध्ये लढाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हवामान बदलामुळे बर्फ वितळत आहे आणि नवीन खनिज साठे, इंधन स्रोत आणि व्यापारी मार्ग खुले होत आहेत. त्यामुळे मोठ्या देशांमध्ये स्पर्धा वाढणार हे निश्चित. अलीकडच्या संशोधनानुसार, अत्यंत मौल्यवान अशा खनिजांचा प्रचंड साठा ग्रीनलँडमध्ये आहे. शिवाय, त्या ठिकाणी तेल आणि वायूंचे प्रचंड साठे दडलेले आहेत. अमेरिका ही संपत्ती स्वत:च्या सुरक्षेसाठी आवश्यक मानत असल्याने त्यांच्यासाठी या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.

ग्रीनलँडला अधिक स्वातंत्र्य हवे आहे. त्यांच्या राज्यघटनेनुसार ते स्वातंत्र्याचा निर्णय स्वत: घेऊ शकतात. अर्थातच असे स्वातंत्र्य टिकण्यासाठी त्यांना इतर देशांची मदत घेण्याशिवाय पर्याय नाही. इतक्या मोठ्या भूप्रदेशात फक्त ५५ हजार लोक राहतात. त्यांच्यासाठी हा भूप्रदेश सांभाळणे अवघड आहे. स्थानिक सरकार अधिक स्वायत्त होण्यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र, नजीकच्या काळात ग्रीनलँड संपूर्ण स्वतंत्र राष्ट्र होईल, अशी शक्यता वाटत नाही.

दूरवरच्या अंतरामुळे भारत आज तरी प्रत्यक्षात आर्टिक प्रदेशात मोठ्या प्रमाणात उपस्थित नाही. पण, भारतही आर्क्टिकविषयक धोरण ठरवत आहे. भविष्यात ग्रीनलँडसारख्या भागांमध्ये भारताचीही वैज्ञानिक, आर्थिक उपस्थिती वाढू शकते. त्यासाठी भारताला अधिक सक्रियपणे या प्रदेशात आपले अस्तित्व दाखवणे आवश्यक आहे.

निष्कर्ष

ग्रीनलँड हे आता फक्त बर्फाचे बेट राहिलेले नाही. ते जागतिक शक्तींच्या राजकारणाचा, संरक्षण धोरणाचा आणि पर्यावरणीय मुद्द्यांचा केंद्रबिंदू बनले आहे. त्यामुळे येणाऱ्या दशकांमध्ये हे बेट जागतिक घडामोडींमध्ये निर्णायक भूमिका बजावेल, हे निश्चित.

(संपर्कः dmulay58@gmail.com)



Source link