Thursday, July 23, 2026
Home Blog Page 384

पोलीस असल्याच्या बतावणीने ज्येष्ठांना लुटणारा गजाआड

0
पोलीस असल्याच्या बतावणीने ज्येष्ठांना लुटणारा गजाआड



लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : पोलीस असल्याच्या बतावणी ज्येष्ठांना लुटणारा चोरट्याला गुन्हे शाखेच्या युनिट सहाने अटक केली. चोरट्याकडून आठ गुन्हे उघडकीस आले आहे. त्याने शहराच्या वेगवेगळ्या भागासह सासवड परिसरात गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. चोरट्याकडून साडेसात लाख रुपयांचे दागिने आणि दुचाकी जप्त करण्यात आले आहेत.

हमीद अफसर खान (वय ३०, रा. पठारे वस्ती, लोणी काळभोर, पुणे-सोलापूर रस्ता) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. पुणे शहर, तसेच परिसरात पादचारी ज्येष्ठ नागरिकांकडे पोलीस असल्याची बतावणी करुन त्यांना लुटण्याचे गुन्हे घडले होते. पोलीस असल्याची बतावणी करुन खान याने ज्येष्ठांकडील दागिने चोरुन नेले होते. या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखेच्या युनिट सहाकडून करण्यात येत होता. ज्येष्ठांना लूटणारा चोरटा हमीद खान हा लोणी काळभोर परिसरातील स्मशानभुमीजवळ येणार असल्याची माहिती गस्त घालणारे पोलीस कर्मचारी नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला संशयावरुन ताब्यात घेतले.

चौकशीत खान आणि त्याच्याबरोबर असलेल्या साथीदाराने पोलीस असल्याची बतावणी करुन ज्येष्ठ नागरिकांना लुटल्याची कबुली दिली. खान आणि साथीदाराने पर्वती, कोथरूड, कोंढवा, सिंहगड रस्ता, भारती विद्यापीठ, तसेच सासवड परिसरात लुटमारीचे गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्याच्याकडून सात लाख ६८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि दुचाकी असा आठ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त राजेद्र पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट सहाचे पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहायक निरीक्षक मदन कांबळे, उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, बाळासाहेब सकटे, रमेश मेमाणे, सुहास तांबेकर, सचिन पवार, ऋषीकेश ताकवणे, ऋषीकेश व्यवहारे, बाळासाहेब तनपुरे, गणेश डोंगरे, नितीन घाडगे, शेखर काटे, प्रतिक्षा पानसरे, कीर्ती नरवडे यांनी ही कामगिरी केली.

बतावणीला बळी पडू नका

पादचारी ज्येष्ठ नागरिकांकडे बतावणी करुन त्यांच्याकडील ऐवज चोरण्याच्या घटनांमध्ये ‌वाढ झाली आहे. चोरट्यांच्या बतावणीकडे दुर्लक्ष करा. बतावणी करणारा चोरटा आढळून आल्यास त्वरीत पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. पोलीस असल्याची बतावणी, तसेच ‘मालकाला मुलगा झाला आहे. ज्येष्ठांना धान्य वाटप, कपडे वाटप करण्यात येत आहे’, अशी बतावणी करुन चोरटे फसवणूक करत असल्याचे उघडकीस आले आहे.



Source link

तीन वर्षांपूर्वी ५५ बोगस मान्यता झाल्या होत्या रद्द; एका आमदाराने केली होती कारवाईची मागणी; मात्र…

0
तीन वर्षांपूर्वी ५५ बोगस मान्यता झाल्या होत्या रद्द; एका आमदाराने केली होती कारवाईची मागणी; मात्र…



nago ganar submitted memo on june 15 2022 over bogus education appointments issue || तीन वर्षांपूर्वी ५५ बोगस मान्यता झाल्या होत्या रद्द; एका आमदाराने केली होती कारवाईची मागणी; मात्र…



Source link

nagpur in shalarth id scam cyber police raided dhantoli office seized files and computers Saturday

0
nagpur in shalarth id scam cyber police raided dhantoli office seized files and computers Saturday



nagpur in shalarth id scam cyber police raided dhantoli office seized files and computers Saturday | शिक्षण उपसंचालक कार्यालयात पोलिसांचा छापा, उल्हास नरडसह दोन तास तपासणी; नव्याने होणार तीन आरोपी



Source link

Madhugandha Kulkarni and parsh mokashi Farmhouse video viral

0
Madhugandha Kulkarni and parsh mokashi Farmhouse video viral



Madhugandha Kulkarni and parsh mokashi Farmhouse video viral | Video: लोकप्रिय मराठी जोडप्यानं १२-१५ वर्ष कष्ट करून बांधलं फार्महाऊस, आता उभं करतायत स्वप्नातलं वन, पाहा व्हिडीओ



Source link

कडक आहे, पण योग्य कारणासाठीच!” अजित पवार

0
कडक आहे, पण योग्य कारणासाठीच!” अजित पवार

सातारा | प्रतिनिधी :-  “जर मी कडक असतो, वेडा असतो, तर बारामतीकरांनी मला आठ वेळा निवडून दिलं असतं का?” असा रोखठोक सवाल करत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी साताऱ्यातील सभेत विरोधकांना चपखल उत्तर दिलं. कडकपणा ही कमजोरी नाही, ती शिस्तीची आणि जबाबदारीची निशाणी आहे, असं स्पष्ट करत त्यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली.

साताऱ्यातील एका कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी पुन्हा एकदा त्यांच्या मिश्किल शैलीत विरोधकांना सुनावलं. ते म्हणाले, “हो, मी कडक आहे. पण कोणासाठी? जे चुकीचं वागतात त्यांच्या साठीच. जे योग्य वागतात, त्यांना मी कायम साथ दिली आहे आणि देईन.”

ते पुढे म्हणाले, “सकाळी लवकर उठून काम करणारी माणसं आम्ही आहोत. आमच्यात आळस नाही. आज राज्याचा साडेसात लाख कोटींचा अर्थसंकल्प आहे, त्यातील निम्मे उत्पन्न पगार, पेन्शन आणि कर्जाच्या व्याजात जातं. उरलेल्या निधीतून आम्ही राज्याचा सर्वांगीण विकास साधत आहोत. याच अनुभवाच्या बळावर मी अकराव्यांदा अर्थसंकल्प सादर केला आहे.”

“या बोटाचा थुका त्याला, त्याचा याला… असं नको!”
लोकांनी दिशाभूल करू नये, लोकांना फसवू नये, अशा शब्दांत अजित पवारांनी कार्यकर्त्यांना आणि स्थानिक नेत्यांना स्पष्ट संदेश दिला. “जे शक्य आहे तेच सांगा. जे शक्य नाही, त्याबद्दल लोकांना विश्वासात घ्या,” असं सांगताना त्यांनी पारदर्शक कारभारावर भर दिला.

nagpurs first private driver training centre under new central policy inaugurated on april 19

0
nagpurs first private driver training centre under new central policy inaugurated on april 19



nagpurs first private driver training centre under new central policy inaugurated on april 19 | ‘लायसन्स’साठी आरटीओकडे पायपीट थांबणार, चालक प्रशिक्षण केंद्र नागपुरात



Source link

फलटण एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर पतसंस्थेच्या चेअरमनपदी प्रा. सुनील खरात तर व्हॉइस चेअरमनपदी कविता सस्ते यांची बिनविरोध निवड

0
फलटण एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर पतसंस्थेच्या चेअरमनपदी प्रा. सुनील खरात तर व्हॉइस चेअरमनपदी कविता सस्ते यांची बिनविरोध निवड

फलटण (साहस टाइम्स) – फलटण एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर पतसंस्थेच्या निवडणुकीत यंदा सर्व संचालक बिनविरोध निवडून आले असून, यानंतर झालेल्या विशेष बैठकीत चेअरमनपदी प्राध्यापक सुनील खरात आणि व्हॉइस चेअरमनपदी कविता सस्ते यांची एकमताने निवड करण्यात आली.

नवीन संचालक मंडळाच्या उपस्थितीत पार पडलेल्या या निवडणूक प्रक्रियेत चेअरमन आणि व्हॉइस चेअरमन पदाच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. यावेळी प्रशालेचे प्राचार्य संजय वेदपाठक, संचालक प्राचार्य सागर दत्तात्रय निंबाळकर, राहुल वसंतराव भोसले, राजेंद्र दशरथ कदम, प्राचार्य अमोल विलास सावंत, मनोज अशोकराव कदम, प्राचार्य जालिंदर सोपान माने, उत्तम जगन्नाथ घोरपडे, सुजित बाळासाहेब जाधव, सोमनाथ श्रीकांत माने, अमित अरविंद कदम, हरिभाऊ रामचंद्र मोरे, प्राचार्य मिनल सुनील दिक्षित, माधुरी विजय पवार तसेच उपप्राचार्य बाळकृष्ण काळे, सचिव संजय निंबाळकर, किशोर मांढरे उपस्थित होते.

या निवडीबाबत महाराष्ट्र राज्याचे माजी सभापती व विद्यमान विधान परिषद सदस्य श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासनाधिकारी अरविंद निकम, प्राचार्य संजय वेदपाठक, उपप्राचार्य बाळकृष्ण काळे यांनी नूतन चेअरमन सुनील खरात व व्हॉइस चेअरमन कविता सस्ते यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Dharmaveer Child artist Atharva Vagal writes to Deputy cm Eknath Shinde regarding traffic congestion in Thane

0
Dharmaveer Child artist Atharva Vagal writes to Deputy cm Eknath Shinde regarding traffic congestion in Thane



Dharmaveer Child artist Atharva Vagal writes to Deputy cm Eknath Shinde regarding traffic congestion in Thane | ठाण्यातील वाहतुक कोंडीवरुन धर्मवीर चित्रपटातील बालकलाकाराचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र



Source link

Supriya Sule : “उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार असतील तर…”; सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?

0
Supriya Sule : “उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार असतील तर…”; सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?



Supriya Sule Said If Uddhav and Raj Thackeray come together it is Pleasure For All of Us |”उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार असतील तर…”; सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?



Source link

There is no clarity regarding local body elections Neelam Gorhe | ‘स्थानिक स्वराज्य’बाबत अस्पष्टता

0
There is no clarity regarding local body elections Neelam Gorhe | ‘स्थानिक स्वराज्य’बाबत अस्पष्टता


लोकसत्ता वार्ताहर

कराड: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नेमक्या कधी याची अजून नीट स्पष्टता नाही. ‘महायुती’चे नेते निवडणूक एकत्रिक की स्वतंत्र लढवायच्या याचा निर्णय घेतील, आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमच्या पक्षाची भूमिका जाहीर करतील असे विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. हिंदी भाषेबाबत सरकार शिक्षण तज्ज्ञांशी चर्चा करून निर्णय घेईल, असे त्या म्हणाल्या.

कराडमध्ये खासगी कार्यक्रमासाठी त्या आल्या होत्या. या वेळी माध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधला. ‘पहिलीपासून हिंदी अनिवार्य’ यासंदर्भातील प्रश्नावर गोऱ्हे म्हणाल्या, राज्य सरकारने नवीन शैक्षणिक धोरण स्वीकारले असून, पहिलीपासून हिंदी शिकवण्यात येणार आहे. यावर अनेक मतमतांतरे आहेत. मात्र, सरकार शिक्षण तज्ज्ञ, लेखक व अभ्यासकांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेईल.

शेतकरी कर्जमाफीवरून नाराज असल्याच्या प्रश्नावर गोऱ्हे म्हणाल्या, खरेतर महाविकास आघाडीला लोकसभेमध्ये चांगले यश मिळाल्याने आघाडीच्या नेत्यांच्या अपेक्षा वाढल्या. पण, विधानसभेला त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. परिणामी सध्या आघाडीचे नेते अस्वस्थ असून, रोज एका ठिकाणी आंदोलन करीत आहेत. सरकार व जनतेमधील संवाद बिघडवण्याचे काम करत असल्याची टीका त्यांनी केली.

हेही वाचा

लाडक्या बहिणींची नावे लाभार्थी यादीतून कमी केली गेल्याबाबत विचारले असता त्या म्हणाल्या, लाडक्या बहिणींनी कागदपत्रांच्या पडताळणीवरून नाराज होऊ नये. कागदपत्रांच्या पडताळणीत त्रुटी आढळल्यानेच लाडक्या बहिणींची काही अपवादात्मक नावे कमी झाली असतील, तरीही त्यांना शासन प्रत्येकस्तरावर आणि प्रत्येक समाजासाठी विविध महामंडळे स्थापन करून न्याय देण्याचे काम करीत आहे. आम्ही अनेक लाडक्या बहिणींशी बोललो आहोत. पण, त्या नाराज नसल्याचे या वेळी दिसून आल्याचा निर्वाळा नीलम गोऱ्हे यांनी दिला.



Source link