Thursday, July 23, 2026
Home Blog Page 378

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana April installment Date and Time Aditi Tatkare Information

0
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana April installment Date and Time Aditi Tatkare Information



Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana April installment Date and Time Aditi Tatkare Information | लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता कधी मिळणार? निकष बदलले का? आदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती!





Source link

Triekadash Yoga 2025: mercury and jupiter will make triekadash yoga

0
Triekadash Yoga 2025: mercury and jupiter will make triekadash yoga


Triekadash Yoga 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी संक्रमण करतात आणि लाभ दृष्टी योग निर्माण करतात, ज्याचा मानवी जीवनावर, देशावर आणि जगावर परिणाम होतो. आता ग्रहांचा राजकुमार बुध आणि गुरु ग्रह ५ मे रोजी एकमेकांपासून ६० अंशांच्या कोनीय स्थितीत असतील. ज्योतिषशास्त्रात, या कोनीय स्थितीला ‘त्रि-एकादश’ योग म्हटले जाते. तसेच याला ज्योतिषाच्या पुस्तकांमध्ये ‘लाभ दृष्टी योग’ म्हणून ओळखले जाते. अशा स्थितीत, या त्रि-एकादश योगामुळे काही राशींचे भाग्य उजळू शकते. तसेच, या राशींना करिअर आणि व्यवसायात प्रगती मिळू शकते. चला जाणून घेऊया या भाग्यवान राशी कोणत्या आहेत…

‘या’ राशींचे ‘अच्छे दिन’ येणार?

वृषभ

ज्योतिषशास्त्रानुसार, त्रि-एकादश योग या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. सध्या चालू असलेल्या पैशाशी संबंधित समस्या संपू शकतात. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात. आर्थिक स्थिती सुधारु शकते. कामाच्या ठिकाणी तुमची प्रगती होण्याची संधी आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही शुभ परिणाम मिळू शकतात. नवीन व्यवसाय किंवा कोणतंही नवीन काम सुरू करण्यासाठी हा शुभ काळ ठरु शकतो. तुमची प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकतात. आता केलेल्या कोणत्याही गुंतवणुकीतून तुम्हाला भरपूर फायदा मिळू शकतो. व्यवसायातही भरपूर नफा मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा

कर्क

ज्योतिषशास्त्रानुसार, त्रि-एकादश योग बनल्याने या राशीच्या लोकांना करिअर आणि बिझनेसमध्ये खूप फायदा होऊ शकतो. मुलांकडून आनंद मिळू शकतो. या राशीच्या लोकांना खूप फायदा होऊ शकतो. या काळात तुम्ही देश-विदेशात प्रवास करू शकता. याशिवाय उच्च स्तरावर यश मिळू शकतं. या बरोबरच तुमचा मान-सन्मान वाढू शकतो. नोकरदार लोकांना नोकरीच्या ठिकाणी काही नवीन जबाबदारी मिळू शकते. तसेच, यावेळी तुम्हाला गुंतवणुकीचा फायदा मिळू शकतो. या काळात जे लोक निर्यात आणि आयात व्यवसायात आहेत त्यांना फायदा होऊ शकतो. गेल्या एक वर्षापासून तुम्ही केलेल्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळण्याची दाट शक्यता आहे.

मकर

त्रि-एकादश योग बनल्याने मकर राशींच्या लोकांना शुभ परिणाम मिळू शकतात. व्यवसायात नफा मिळू शकतो. उत्पन्नात घसघशीत वाढ होण्याची शक्यता आहे. अचानक मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो. या काळात तुम्ही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. तुमच्या आयुष्यात तुम्हाला आनंदच आनंद मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला गुंतवणुकीतून मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी यश मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या सर्व मनोकामना या काळात पूर्ण होऊ शकतात. इतकंच नाही तर उत्पन्नाचे अनेक स्त्रोत निर्माण होऊ शकतात. शेअर मार्केटमधून तुम्हाला भरपूर धनलाभ होऊ शकतो. समाजातही तुम्हाला मान-प्रतिष्ठा मिळण्याची शक्यता आहे.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)





Source link

‘तू आहेस कोण? आम्हाला बाहेर भेट, घरी जिवंत…,’ कोर्टात आरोपीची थेट महिला न्यायाधीशाला धमकी, पुढे काय झालं पाहा

0
‘तू आहेस कोण? आम्हाला बाहेर भेट, घरी जिवंत…,’ कोर्टात आरोपीची थेट महिला न्यायाधीशाला धमकी, पुढे काय झालं पाहा


दिल्ली कोर्टात चक्क न्यायमूर्तींना आरोपीने जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. सहा वर्षे जुन्या चेक बाउन्स प्रकरणात शिक्षा सुनावल्यानंतर दिल्लीतील एका न्यायालयात दोषी आणि त्याच्या वकिलाने अलीकडेच एका महिला न्यायाधीशाला धमकावलं आणि शिवीगाळ केली. “तू है क्या चीज, की तू बहार मिल देखते है कैसे जिंदा घर जाती है (तू कोण आहेस? आम्हाला बाहेर भेट, तू जिवंत घरी कशी जातेस ते पाहतो),” अशा शब्दांत महिला न्यायाधीशाला धमकावण्यात आलं. 2 एप्रिल रोजी हा प्रकार घडला असून, द्वारका न्यायालयाच्या न्यायिक दंडाधिकारी प्रथम श्रेणी (एनआय कायदा) शिवांगी मंगला यांनी आदेशात ही माहिती दिली आहे. 

न्यायमूर्तींनी आरोपीला निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स अॅक्टच्या कलम 138 (चेकचा अपमान) अंतर्गत दोषी ठरवलं. न्यायाधीश मंगला यांनी त्यांच्या आदेशात असंही म्हटलं आहे की, त्यांनी त्यांच्या हातात एक वस्तू धरली होती, जी त्यांनी दोषी ठरवल्याचा आदेश दिल्यानंतर त्यांच्यावर फेकण्याचा प्रयत्न केला.

निकाल आपल्या बाजूने नसल्याचं समजल्यानंतर खुल्या न्यायालयात न्यायाधीशांवर आरोपी संतापला. दोषसिद्धीचा निकाल आपल्या विरोधात कसा देता येईल, असा त्याचा संताप होता. न्यायमूर्तींनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी अनधिकृत हिंदी भाषेत आणि न्यायाधीशांच्या आईचा उल्लेख करत  भाष्य करण्यास सुरुवात केली. 

“नंतर त्यांनी (दोषी आणि वकील) पुन्हा एकदा मला राजीनामा देण्यासाठी मानसिक आणि शारीरिक त्रास दिला. तसंच आरोपीला निर्दोष सोडण्यासाठीही त्यांनी त्रास दिला. अन्यथा माझ्याविरुद्ध तक्रार दाखल करतील आणि जबरदस्तीने माझा राजीनामा देण्याची व्यवस्था करतील असं धमकावलं,” असं न्यायाधीशांनी त्यांच्या आदेशात म्हटलं आहे.

न्यायाधीशांनी आदेशात सांगितलं आहे की, धमकी दिल्याबद्दल आणि छळ केल्याबद्दल दोषीविरुद्ध राष्ट्रीय महिला आयोगासमोर योग्य कारवाई सुरू करावी. त्यांनी वकील अतुल कुमार यांना त्यांच्या वर्तनाचे लेखी स्पष्टीकरण देण्यासाठी आणि गैरवर्तनासाठी फौजदारी अवमानना ​​कारवाई सुरू करण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात का पाठवू नये यासाठी कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत.

तीन दिवसांनंतर, 5 एप्रिलला न्यायाधीशांनी दोषीला 22 महिन्यांची कारावासाची शिक्षा सुनावली आणि चेक प्रकरणात 6.65 लाखांचा दंड भरण्याचे निर्देश दिले. दोषीच्या वकिलांनी शिक्षा सौम्य करण्याची विनंती केली. कारण त्यांचा आशील 63 वर्षीय निवृत्त सरकारी शिक्षक असून त्यांचे तीन बेरोजगार मुलगे आहेत.

5 एप्रिल रोजीच्या आदेशात, न्यायमूर्तींनी 2 एप्रिलच्या आदेशाबाबत योग्य कार्यवाही करण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयाकडे पाठवण्यासाठी हे प्रकरण द्वारका येथील दक्षिण पश्चिम जिल्ह्याच्या प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीशांकडे पाठवलं असल्याची माहिती दिली आहे.





Source link

ते देवेंद्र फडणवीसांच्या पाया पडले, आम्हाला वाचवा म्हणाले, पण…; जयकुमार गोरेंचा विरोधकांना थे

0


Jaykumar Gore : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी बिदाल येथील नागरी सत्कार कार्यक्रमात विरोधकांना थेट इशाराच दिला आहे. “आता मी बोलायचे नाही ठरवले आहे. पण, कार्यक्रम करायचं ठरवले आहे. अनेक जण मला आता सांगत आहेत की, माझा संबंध नाही. पण कोणी काय-काय केलं आहे? त्याचा सगळा हिशोब माझ्याकडे आहे. माझ्या विरोधात अनेक षडयंत्र झाले. ते सगळे सहन केले. पण, शेवटचे षडयंत्र माझ्या विरोधात झाले, त्याचा पुरावा माझ्याकडे आहे. त्यामुळे कोणाचा कार्यक्रम कधी लागतोय एवढाच विषय आहे. अनेक जण देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या जाऊन पाया पडले, आम्हाला वाचवा म्हणाले. त्यामुळे आजपर्यंतचा इतिहास आहे की, षडयंत्र करणारा कधीही जिंकलेला नाही,” असा इशारा गोरे यांनी विरोधकांना दिला आहे. 

बिदाल येथील नागरी सत्कार कार्यक्रमात जयकुमार गोरे म्हणाले की, आता माझ्यासमोर एकच उद्दिष्ट आहे. मला परमेश्वराने नवीन जीवन दिले. इतका मोठा अपघात झाला. त्यातून पुन्हा उभा राहिलो. तेव्हाही काही जण म्हणत होते की, हा आता नीट चालेल का नाही? नीट बोलेल का नाही? आता पहिल्यासारखे काम जमेल का नाही? त्यातूनही देवाने मला पुन्हा उभे केले. आज ताकदीने मी तुमच्या सर्वांसमोर उभा आहे. इतक्या संकटातून जयकुमार येतो तेव्हा देवाने देखील माझ्याकडून काही अपेक्षा ठेवलेल्या आहेत. देवाला पण माझ्याकडून काही करून घ्यायचे आहे. ते करून घेण्यासाठी परमेश्वर माझ्या पाठीशी उभा आहे. कोणी कितीही देव पाण्यात घालू द्या, जे उद्दिष्ट मला परमेश्वराने, माझ्या पक्षाने, माझे नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहे ते उद्दिष्ट पूर्ण झाल्याशिवाय जयकुमार गोरे थांबणार नाही, असे त्यांनी म्हटले. 

आता कार्यक्रम करायचा

जयकुमार गोरे पुढे म्हणाले की,  आता मी बोलायचे नाही असे ठरवले आहे. आता कार्यक्रम करायचा ठरवले आहे. त्यामुळे जे काही घडणार आहे ते घडणारच आहे. अनेक लोक सांगतात की, त्यात मी नव्हतो,  त्यात माझा काही संबंध नाही, परवा काही गडी देवेंद्र फडणवीस यांच्या पाया पडले. माझा काही संबंध नाही, म्हणाले. पण, कुणी काय-काय केले आहे? याचा सगळा हिशोब माझ्याकडे आहे. दहा षडयंत्र माझ्या विरोधात केली. प्रत्येक वेळी मी सहन केलं. पण, अकरावे आणि शेवटचे षड्यंत्र जेव्हा माझ्या विरोधात झाले, त्याचा प्रत्येक हिशोब माझ्याकडे आहे. कोण कुठे बोलला? कोण कुठे बसला? कोणी काय षड्यंत्र केलं? कोणाला किती पैसे द्यायचे ठरले? या सगळ्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. आता आम्ही वाट बघतोय की कुणाचा कार्यक्रम कधी लागतो.

षडयंत्र करणारा कधीही युद्ध जिंकू शकला नाही

अनेक गडी जाऊन देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पाया पडले. आम्हाला वाचवा म्हणून सांगितले. जयकुमार गोरेमध्ये सगळं सहन करायचा दम आहे. जयकुमार गोरेने जितकं सहन केलं त्यातला एक टक्का सहन करून दाखवा. आयुष्यभर संघर्ष केला आहे. संघर्ष करूनही जयकुमार गोरे उभा आहे. एकदा मैदानात येऊन लढवून दाखवा. किती दिवस षडयंत्र करणार? आजपर्यंतचा इतिहास आहे की षडयंत्र करणारा कधीही युद्ध जिंकू शकला नाही. आजवर सत्य कायम जिंकलेले आहे, असा इशारा जयकुमार गोरे यांनी विरोधकांना दिला आहे.  

आणखी वाचा 

Jaykumar Gore: माझं राजकारण संपलं तरी चालेल पण मी पवारांच्या पुढे झुकणार नाही; मंत्री जयकुमार गोरेंचा शरद पवारांवर हल्लाबोल

अधिक पाहा..



Source link

अटकेची भीती दाखवून ग्राफीक डिझायनरची सायबर फसवणूक

0
अटकेची भीती दाखवून ग्राफीक डिझायनरची सायबर फसवणूक


मुंबई : तैवानला पाठवण्यात येणाऱ्या पार्सलमध्ये अमली पदार्थ सापडले असून त्याप्रकरणी अटकेची भीती दाखवून अंधेरीमधील ४८ वर्षीय ग्राफिक डिझायनरची १५ लाख रुपयांची सायबर फसवणूक करण्यात आली आहेत. फसवणूक करण्यासाठी आरोपींनी विविध पोलीस, सीमाशुल्क अधिकाऱ्यांच्या नावाने तक्रारादाराशी संपर्क साधला. याप्रकरणी पश्चिम प्रादेशिक सायबर पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलीस बँक व्यवहारांच्या माध्यमातून अधिक तपास करीत आहेत.

तक्रारदार ग्राफिक डिझायरन असून एका ऑनलाइन मार्केटिंग कंपनीत कार्यरत आहे. आरोपींनी फसवणूक करण्यासाठी उपायुक्त दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर केला. तक्रारीनुसार १७ मार्च रोजी तक्रारदाराला कुरियर कंपनीच्या नावाने दूरध्वनी आला होता. तुमच्या नावाने तैवानला जाणारे पार्सल सीमाशुल्क विभागाने पकडले असून त्यात पारपत्र, क्रेडिट कार्ड, लॅपटॉप व ५०० ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) अमली पदार्थ सापडल्याचे दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने सांगितले. ते पार्सल आपण पाठवले नसल्याचे तक्रारदाराने सांगितले. याप्रकरणी सायबर क्राईम विभागाला तक्रार करावी लागले, असेल समोरच्या व्यक्तीने तक्रारदारांना सांगितले. त्यानंतर संबंधित दूरध्वनी दुसऱ्या व्यक्तीकडे वळवण्यात आला. त्याने आपण सायबर क्राईम विभागाचे उपायुक्त बालसिंह राजपूत बोलत असल्याचे सांगितले. आरोपीने तुमच्या आधार कार्डच्या माध्यमातून तुमची ओळख चोरली आहे. हा आयडेंटिटी थेफ्टचा प्रकार असून त्याबाबत तक्रार करावी लागेल असे सांगितले. त्यानंतर तपासणी करून संबंधित अधिकाऱ्याने तुमच्या आधार कार्डद्वारे विविध राज्यांमध्ये फसवणूक करण्यात आल्याचे सांगितले. तक्रारदाराला स्काईपवरून व्हिडिओ कॉल आला. त्यावेळी तेथे असलेल्या व्यक्तीच्या मागे मुंबई सायबर क्राईम डिपार्टमेंट असा लोगो होता. त्याने केंद्रीय अन्वेषण विभागाकडील (सीबीआय) अमलीपदार्थ तस्करी व आर्थिक गैरव्यवहारात तुमचा सहभाग असल्याचे सांगितले.

तक्रारदारांना आर्थिक गैरव्यवहार हाताळणारे पोलीस अधिकारी जॉर्ज मॅथ्यू यांच्या स्काईपवरून व्हिडिओ कॉल आला. त्याने तुमच्याविरोधात विविध गुन्हे दाखल असून त्याप्रकरणी अटकेची भीती दाखवली. तसेच अटक टाळायची असेल, तर तुमच्या बँक खात्यात शिल्लक असलेल्या रकमेपैकी ८८ टक्के रक्कम जमा करावी लागले, असे सांगितले. त्यानुसार तक्रारदाराने चार विविध व्यवहारांद्वारे एकूण १५ लाख रुपये चार बँक खात्यात जमा केले. त्या रकमेची पडताळणी करून पुन्हा संपर्क साधण्याचे आश्वासन तक्रारदारांना देण्यात आले होते. पण त्यानंतर तक्रारदाराला दूरध्वनी आला नाही. अखेर तक्रारदाराने याप्रकरणी सायबर पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी याप्रकरणी माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे.





Source link

अल्पवयीन मुलीचे विरारमधून अपहरण करून अत्याचार, आरोपी अटकेत

0
अल्पवयीन मुलीचे विरारमधून अपहरण करून अत्याचार, आरोपी अटकेत



मुंबई : विरार येथून १५ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मालवणी पोलिसांनी अपहरण, बलात्कार व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून २० वर्षीय तरूणाला अटक केली. आपण तुझ्या वडिलांना ओळखत असून त्यांच्याकडे जायचे आहे, असे सांगून आरोपी पीडित मुलीला मालाड येथे घेऊन गेला, असा आरोप आहे. याप्रकरणी मालवणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

पीडित मुलगी शिक्षण घेत असून ती शनिवारी घराजवळीत दुकानात जात होती. त्यावेळी आरोपी पीडित मुलीला भेटला होता. आपण तुझ्या वडिलांना ओळखत असून त्यांच्याकडे घेऊन जातो, असे त्याने पीडित मुलीला सांगितले. त्यानंतर आरोपीने पीडित मुलीला मालवणी येथील घरी आणले आणि तिच्यावर अत्याचार केला. पीडित मुलीला वेदना होऊ लागताच त्याने तिला घरी सोडतो, असे आश्वासन दिले आणि दुचाकीवरून तो तिला जंगलात घेऊन गेला.

तेथे निर्जनस्थळी आरोपीने पुन्हा मुलीवर अत्याचार केला. या प्रकरणानंतर आरोपीने पीडित मुलीला धमकावण्यास सुरुवात केली. घडलेला प्रकार कोणालाही सांगू नको, असेही त्याने तिला धमकावले. तसेच घडलेल्या प्रकाराचे मोबाइलने चित्रीकरण केले आहे. त्यामुळे घडलेल्या प्रकाराची वाच्यता केल्यास समाज माध्यमांवर व्हीडीओ अपलोड करण्याची आणि कुटुंबियांना ठार मारण्याची धमकी त्याने दिली.

पीडित मुलीने याप्रकरणी मालवणी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी अपहरण, बलात्कार व पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून रविवारी आरोपीला अटक केली. आरोपीसोबत आपली ओळख नसल्याचा दावा पीडित मुलीने केला आहे. आरोपीने वडिलांचा मित्र असून वडिलांकडे सोडण्याचे आश्वासन देऊन आपल्याला मालाड परिसरात आणल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

अल्पवयीन मुलांविरोधात घडलेल्या गुन्ह्यांमध्ये वाढ

मुंबईत अल्पवयीन मुले व मुली यांच्याविरोधात घडलेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. मुंबईत २०२४ मध्ये बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) कायद्याअंतर्गत १३४१ गुन्ह्यांची नोंद झाली होती. पोक्सो कायद्याअंतर्गत २०२३ मध्ये ११०८ गुन्ह्यांची नोंद झाली होती. मुंबईत २०२४ मध्ये पोक्सो कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये ६०९ बलात्कार, ६६७ विनयभंग व ३५ छेडछाड-अश्लील शेरेबाजी केल्याच्या घटनांचा समावेश आहे.

अल्पवयीन मुलींवरील गुन्ह्यांतील ९९ टक्के गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना २०२३ मध्ये यश आले होते. गुन्ह्यांची उकल करण्याच्या प्रमाणात २०२४ मध्ये घट झाली असून २०२४ मध्ये हे प्रमाण ९६ टक्के होते. याशिवाय विनयभंग व छेडछाड-अश्लील शेरेबाजी या गुन्ह्यांची उकल होण्याचे प्रमाणही अनुक्रमे १०० टक्क्यांवरून ९७ टक्के व ९६ टक्क्यांवरून ९१ टक्क्यांपर्यंत घटले आहे. अल्पवयीन मुलांविरोधातील अत्याचाराच्या घटनांमध्ये बहुसंख्य आरोपी परिचित व्यक्ती आहेत.



Source link

म्हाडाच्या बृहतसूचीवरील घरांसाठी गुरुवारी सोडत, १०० अर्जदार होणार सोडतीत सहभागी

0
म्हाडाच्या बृहतसूचीवरील घरांसाठी गुरुवारी सोडत, १०० अर्जदार होणार सोडतीत सहभागी



MHADA lottery houses Thursday, 100 applicants participate lottery म्हाडाच्या बृहतसूचीवरील घरांसाठी गुरुवारी सोडत, १०० अर्जदार होणार सोडतीत सहभागी



Source link

How to keep kitchen cool in summer while cooking easy tips and tricks

0
How to keep kitchen cool in summer while cooking easy tips and tricks



How to keep kitchen cool in summer while cooking easy tips and tricks | उन्हाळ्याच्या गरमीत किचन ठेवा अगदी गारेगार! ‘या’ सोप्या टिप्स करा फॉलो, किचनमध्ये अजिबात गरम होणार नाही



Source link

अभ्युदयनगरवासियांना अखेर २५ हजार रुपये घरभाडे, म्हाडाच्या मुंबई मंडळाने केली घरभाड्यात वाढ

0
अभ्युदयनगरवासियांना अखेर २५ हजार रुपये घरभाडे, म्हाडाच्या मुंबई मंडळाने केली घरभाड्यात वाढ



Abhyudaya Nagar residents finally get Rs 25,000 in rent, MHADA’s Mumbai board increases rent अभ्युदयनगरवासियांना अखेर २५ हजार रुपये घरभाडे, म्हाडाच्या मुंबई मंडळाने केली घरभाड्यात वाढ



Source link

how many times you can update address mobile number name age gender in your aadhar card

0
how many times you can update address mobile number name age gender in your aadhar card



how many times you can update address mobile number name age gender in your aadhar card | आधार कार्डमध्ये नाव, पत्ता, मोबाईल नंबर, वय आणि लिंग तुम्ही किती वेळा अपडेट करू शकता? जाणून घ्या…



Source link