Thursday, July 23, 2026
Home Blog Page 379

डिनर टेबलवर मासे खात होते माजी DGP; पत्नीने मिरची पावडरसह दोन चाकू उचलले अन्…; हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासे

0
डिनर टेबलवर मासे खात होते माजी DGP; पत्नीने मिरची पावडरसह दोन चाकू उचलले अन्…; हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासे


कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक (DGP) ओम प्रकाश यांच्या हत्या प्रकरणातील धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. त्यांच्या पत्नीने हत्येची जबाबदारी घेतली असून, यामध्ये मुलीचाही सहभाग असल्याचा आरोप होत आहे. ओम प्रकाश यांच्या मुलाने आपली आई आणि बहिणीवर वडिलांच्या हत्येचा आरोप करत एफआयआर दाखल केला आहे. तपासात समोर आलं आहे की, जेव्हा हत्या झाली तेव्हा ओम प्रकाश जेवत होते. सूत्रांच्या माहितीनुसार, ओम प्रकाश डिनर टेबलवर माशांचा आस्वाद घेत असतानाच पत्नी पल्लवीने त्यांच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली आणि अचानक चाकूने हल्ला केला. डिनर टेबलजवळ जेवणाची प्लेट पडलेली होती आणि दुसरीकडे ओम प्रकाश यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात होता. 

‘मी राक्षसाला ठार केलं आहे,’ पोलीस अधिकारी पतीची हत्या केल्यानंतर पत्नीचा शेजारणीला VIDEO कॉल, ‘मिरची पूड टाकून…’

 

घटनास्थळी ओम प्रकाश आणि पत्नी निलम यांच्यात संघर्ष झाल्याचे पुरावे सापडले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, ओम प्रकाश यांची हत्या केल्यानंतर आई आणि मुलीने स्वत:ला एका रुममध्ये बंद करुन घेतलं होतं. हल्ल्यानंतर पल्लवीने शेजारील महिलेला व्हिडीओ कॉल करुन हत्येची माहिती दिली. तिने आपल्या पोलीस पतीला सांगितल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठलं. पोलीस घरी पोहोचले असता तीन माळ्याच्या घरातील तळमजल्यावर ओम प्रकाश रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांची मुलगी कृतीने दरवाजा बंद केला होता आणि गोंधळ घालत होती. वारंवार विनंती केल्यानंतरही ती दरवाजा उघडत नव्हती. यानंतर पोलिसांना दरवाजा तोडून तिला ताब्यात घेतलं. 

पत्नीचं आत्मसमर्पण, मुलगीही ताब्यात

पल्लवीने पोलिसांकडे आत्मसमर्पण केलं असून, हत्येची कबुली दिली आहे. तिला ताब्यात घेऊन चौकशी केली जात आहे. दुसरीकडे मुलीलाही ताब्यात घेण्यात आलं आहे. माजी पोलीस महासंचालकांच्या हत्येमागे नेमकं काय कारण आहे याचा तपास सुरु आहे. 

बंगळुरुचे पोलीस आयुक्त बी दयानंद यांनी सांगितलं आहे की, धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. जास्त रक्तस्त्राव झाल्याने माजी पोलीस महासंचालकांचा मृत्यू झाला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. 

शरीरावर 8 ते 10 जखमा

पल्लवीने मडिवाला सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या उपस्थितीत तिचा जबाब नोंदवला. तथापि, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ओम प्रकाश यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना अनेक वेळा सांगितलं होतं की ते त्यांच्या पत्नीकडून होणारा छळ सहन करू शकत नाहीत. प्राथमिक तपासात ओम प्रकाश यांच्या छातीत, पोटात आणि हातावर चाकूने वार करण्यात आले होते आणि त्यांच्या शरीरावर 8 ते 10 जखमा होत्या, असं समोर आले आहे. पोटाच्या भागात 4-5 जखमा होत्या, ज्यामुळे जास्त रक्तस्त्राव झाला आणि तोच त्याच्या मृत्यूचे कारण बनला. 

डायनिंग हॉलची फरशी रक्ताने माखलेली होती, ज्यावरून असे दिसून येते की ओम प्रकाश मृत्यूपूर्वी सुमारे 15-20 मिनिटे संघर्ष करत होते. यादरम्यान, पत्नी पल्लवी पतीला वेदनेने तडफडताना पाहत राहिली असं सांगितलं जात आहे. मृत्यूनंतर, पल्लवीने एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याला फोन करून हत्येची माहिती दिली.





Source link

The new Mahindra XUV 3XO EV has been spied testing with minimal cover, revealing design details

0
The new Mahindra XUV 3XO EV has been spied testing with minimal cover, revealing design details



The new Mahindra XUV 3XO EV has been spied testing with minimal cover, revealing design details | ‘टाटा पंच’चा खेळ आता संपणार? महिंद्रा नव्या अवतारात देशात आणतेय स्वस्त कार



Source link

barshitakli police officer abused bjp mla harish Pimple incident occurred Sunday night sparking outrage

0
barshitakli police officer abused bjp mla harish Pimple incident occurred Sunday night sparking outrage



barshitakli police officer abused bjp mla harish Pimple incident occurred Sunday night sparking outrage | धक्कादायक! चक्क भाजप आमदारांना ठाणेदाराची शिवीगाळ, पोलिसाची मुजोरी; गोवंशाच्या अवैध वाहतुकीवरून…



Source link

लग्नमंडप टाकताना विद्युत तारेचा स्पर्श; काका-पुतण्याचा मृत्यू

0
लग्नमंडप टाकताना विद्युत तारेचा स्पर्श; काका-पुतण्याचा मृत्यू



Nanded: Uncle and nephew die after touching electric wire while setting up wedding pavilion. Incident at Borgaon in Hadgaon taluka नांदेड : लग्नमंडप टाकताना विद्युत तारेचा स्पर्श; काका-पुतण्याचा मृत्यू



Source link

BJP MP Nishikant Dubey and MP Dinesh Sharma Controversial Statement to Supreme Court and BJP Vs Congress Politics

0
BJP MP Nishikant Dubey and MP Dinesh Sharma Controversial Statement to Supreme Court and BJP Vs Congress Politics



BJP MP Nishikant Dubey and MP Dinesh Sharma Controversial Statement to Supreme Court and BJP Vs Congress Politics | भाजपा खासदार निशिकांत दुबेंच्या न्यायालयाबाबतच्या वक्तव्यावरून विरोधक आक्रमक; काँग्रेस एनडीए सरकारला घेरणार?



Source link

farmers in rural areas of the district get good income from vegetable farming

0
farmers in rural areas of the district get good income from vegetable farming



farmers in rural areas of the district get good income from vegetable farming | जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना भाजीपाला शेतीतून चांगले उत्पन्न



Source link

यंदाही मुंबईकरांच्या माथी खड्डेच… पण खर्च मात्र कमी

0
यंदाही मुंबईकरांच्या माथी खड्डेच… पण खर्च मात्र कमी



मुंबई : मुंबई महापालिकेने खड्डेमुक्त रस्त्यांसाठी रस्ते काँक्रीटीकरणाचा महाप्रकल्प हाती घेतला आहे. मात्र या काँक्रीटीकरणामुळे खड्डे कमी झाले का याचे उत्तर येत्या पावसाळ्यातच मिळू शकणार आहे. रस्ते काँक्रीटीकरणाच्या कामाने वेग घेतल्यामुळे येत्या पावसाळ्यात खड्डे बुजविण्याचा खर्च तब्बल ५० टक्क्यांनी कमी होईल, असा विश्वास पालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे. गेल्यावर्षी तब्बल १६ हजारांहून अधिक खड्डे बुजवण्यात आले होते व त्यासाठी दीडशे कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. यंदा खड्डे बुजविण्यासाठी ७९ कोटी रुपये खर्च प्रशासनाला अपेक्षित आहे.

कामे वेगात सुरू

मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात पडणाऱ्या खड्ड्यांमुळे मुंबई महापालिकेवर टीका होते. डांबरी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडतात. काँक्रीटच्या रस्त्यावर खड्डे पडत नाहीत. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून मुंबई महापालिकेने खड्डेमुक्त रस्त्यांसाठी रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाचा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाअंतर्गत टप्प्याटप्प्याने रस्ते काँक्रीटीकरण करण्यात येत आहे. मुंबईत आतापर्यंत १२०० किमीहून अधिक रस्त्यांचे काँक्रीटीकरण पूर्ण झाले आहे. सध्या एकाच वेळी मुंबईतील ७०१ किमी लांबीच्या रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाच्या कामाचे कार्यादेश देण्यात आले आहेत. या रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाची कामे वेगात सुरू आहेत.

खर्चात ५१ टक्के कपात

काँक्रीटीकरणाची कामे सुरू असलेल्या रस्त्यांवरील खड्डे भरण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदाराची असते. त्यामुळे यंदा पावसाळ्यात मुंबई महापालिकेला सुमारे दीडशे किमी लांबीच्या रस्त्यावरील खड्डेच बुजवावे लागणार आहेत. रस्ते काँक्रीटीकरणाची कामे जसजशी पूर्ण होत आहेत, तसतसा खड्डे भरणीचा खर्च आणि नागरिकांना होणारा त्रास कमी होईल, असा विश्वास पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. यंदा पालिकेने खड्डे भरण्यासाठी निविदा मागवण्यापूर्वी अंदाजित खर्चाचा आढावा घेतला. गेल्यावर्षी १५५ कोटी रुपये खर्च खड्डे भरण्यासाठी झाला होता. यात यावेळी सुमारे ५१ टक्के कपात होईल, असा विश्वास पालिका प्रशासने व्यक्त केला आहे.

हे खड्डे पालिकेचे

खड्डे भरण्याच्या कामासाठी ९ मीटरपेक्षा जास्त रुंद रस्ते, ६ ते ९ मीटर रुंदीचे रस्ते आणि ६ मीटरपेक्षा कमी रुंदीचे रस्ते, तसेच सिमेंट काँक्रीटीकरण केलेल्या रस्त्याच्या बाजूच्या डांबरी पट्ट्या, पूर्व आणि पश्चिम दृतगती मार्ग आणि दृतगती मार्गालगतचे सेवा रस्ते यांच्यावरील खड्डे बुजवण्याचे काम पालिका प्रशासन करते. तर ज्या रस्त्यांची कामे सुरू आहेत त्या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची जबाबदारी ही कंत्राटदाराची असते.

गेल्या पावसाळ्यात आधीच्या पावसाळ्याच्या तुलनेत ३३ टक्के कमी खर्च झाला होता. यंदा हा खर्च ५१ टक्क्यांनी कमी होईल. तर पुढच्या वर्षी हा खर्च आणखी कमी होईल. अभिजीत बांगर, मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त

अंदाजित खर्च

नऊ मीटरपेक्षा अधिक रुंद रस्ते – ४९ कोटी

नऊ मीटरपेक्षा कमी रुंद रस्ते – २७ कोटी

सहा मीटरपेक्षा लहान रस्ते – ३ कोटी

एकूण खर्च – ७९ कोटी

मुंबईत एकूण २०५० किमी लांबीचे रस्ते मुंबई महापालिकेच्या आखत्यारीत येतात. त्यापैकी गेल्या काही वर्षात एकूण १३३३ किमी म्हणजेच ६५ टक्के रस्त्याचे काँक्रिटिकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित रस्त्यांच्या काँक्रिटिकरणाची कामे पालिकेने दोन टप्प्यात हाती घेतली आहे. त्यापैकी काही कामे आता सुरु आहेत. मुंबईतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याच्या उद्देशाने पहिल्या टप्प्यात एकूण ३२४ किलोमीटर (६९८ रस्ते) तर दुसऱया टप्प्यात ३७७ किलोमीटर (१४२० रस्ते) असे एकूण मिळून ७०१ किलोमीटर रस्ते काँक्रिटीकरण्यासाठी कार्यादेश जारी करण्यात आले आहेत.



Source link

एक मंदिर, एक विहीर, एक स्मशानभूमी वापरा आणि…; मोहन भागवतांचा RSS स्वयंसेवकांना मोलाचा सल्ला

0
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशानभूमी वापरा आणि…; मोहन भागवतांचा RSS स्वयंसेवकांना मोलाचा सल्ला



RSS Chief Mohan Bhagwat Speech: सरसंघचालक मोहन भागवत हे कायमच त्यांच्या भाषणामुळे चर्चेत असतात. नुकतेच त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये दिलेलं भाषण सध्या चर्चेचा विषय ठरत असून त्यांनी हिंदू एकतेबद्दल नेमकं काय म्हटलंय जाणून घ्या.



Source link

थकबाकी १ लाख कोटी

0
थकबाकी १ लाख कोटी



मुंबई : लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून झालेल्या ‘मोफत’च्या घोषणा, याच काळात वीज थकबाकी वसुलीकडे ‘महावितरण’चे झालेले अक्षम्य दुर्लक्ष यामुळे सर्व ग्राहकांच्या वीज बिलाची थकबाकी तब्बल ९८ हजार कोटी रुपयांवर गेली आहे. धक्कादायक म्हणजे यात एकट्या कृषीपंपांच्या बिलांची थकबाकी ७५ हजार कोटींहून अधिक आहे. थकबाकीचा आकडा फुगत चालला असून, त्याने एक लाख कोटी रुपयांचा टप्पाही ओलांडला असल्याचे उच्चपदस्थांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

महायुतीने विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांना ७.५ अश्वशक्तीपर्यंत क्षमता असलेल्या कृषीपंपांसाठी मोफत वीज पुरविण्याची घोषणा केली. त्याचा लाभ राज्यातील ४४ लाख सहा हजार शेतकऱ्यांना होईल आणि त्यासाठी सुमारे १४ हजार ७६१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री

थकबाकी १ लाख कोटी

अजित पवार यांनी २८ जून २०२४ रोजी विधिमंडळात सादर केलेल्या अर्थसंकल्पात नमूद केले होते. राज्यातील कृषीपंपांची संख्या सुमारे ४८ लाख आहे. त्यापैकी ७.५ अश्वशक्तीहून अधिक क्षमतेचे पंप असलेल्या सुमारे चार लाख शेतकऱ्यांनीही वीज बिल भरणे थांबविल्याचे समोर आले आहे.

गेल्या वर्षी लोकसभा व विधानसभा निवडणुका होत्या. त्यामुळे शेतकरी, घरगुती व अन्य ग्राहकांकडूनही वीज बिल वसुलीसाठी वीजजोडण्या तोडणे व वसुलीसाठी पाठपुरावा करणे, यांवर महावितरणचा फारसा भर नव्हता. त्यामुळे ३१ मार्च २०२४ रोजी ८९ हजार ३२० कोटी रुपयांची थकबाकी ९ महिन्यांमध्ये म्हणजे ३१ मार्च २०२५ रोजी ९७ हजार ७७० कोटी रुपयांवर गेली आहे. गेल्या तीन-चार महिन्यांमध्ये थकबाकीचा आकडा प्रचंड फुगला असून तो एक लाख कोटी रुपयांवर गेला आहे, असे सूत्रांनी नमूद केले.

महावितरणने थकबाकी वसुली करणे बंधनकारक असून त्यामुळे प्रामाणिकपणे वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांवरील आर्थिक भार हलका होईल. जर महावितरणने थकबाकी वसूल केली, तर शेतकरीच नव्हे, तर सर्व ग्राहकांना किमान वर्षभर मोफत वीज पुरविता येईल किंवा पुढील पाच-सात वर्षे वीज दरवाढ करावी लागणार नाही. – अशोक पेंडसे, वीजतज्ज्ञ

थकबाकी दृष्टिक्षेप…

वर्ष । कृषीपंप । घरगुती

२०२३-२४ । ६७ हजार कोटी । १,८०० कोटी

२०२४-२५ । ७५ हजार कोटी । २,५०० कोटी

…तर दरवाढ टळेल !

महावितरणने थकबाकी वसुली केली, तर पुढील पाच-सात वर्षे वीज दरवाढ करावीच लागणार नाही, उलट सर्व वीज ग्राहकांचे दर कमी करता येतील. परंतु महावितरणकडून थकबाकी वसुलीसाठी फारसे प्रयत्न होत नसल्याने थकबाकीचा आकडा वाढत असल्याचे वीजतज्ज्ञांनी सांगितले.

‘महावितरण’च्या वीज बिल थकबाकीवर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी टप्पा दोन ही योजना सुरू केली आहे. स्वस्त वीज उपलब्ध होऊ लागल्यावर हळूहळू थकबाकी कमी होईल व महावितरणचे अर्थकारण सुधारेल. – विश्वास पाठक, स्वतंत्र संचालक, महावितरण

महावितरणने काही काळापूर्वी राज्य वीज नियामक आयोगापुढे वीज दरवाढीचा प्रस्ताव सादर केला होता. याला राज्यभरातून तीव्र विरोध झाला. तर महावितरणचा वार्षिक वित्तीय ताळेबंद सुमारे एक लाख १२ हजार कोटी रुपयांचा आहे.



Source link

sikkim chief minister Prem ingh tamang said that preparations are underway to begin mansarovar yatra soon

0
sikkim chief minister Prem ingh tamang said that preparations are underway to begin mansarovar yatra soon



sikkim chief minister Prem ingh tamang said that preparations are underway to begin mansarovar yatra soon | मानसरोवर यात्रा लवकरच सुरू होणार, सिक्किमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग यांची माहिती



Source link