


Shani Dev Vakri In Meen: प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रह गोचरसोबत वक्री आणि मार्ग्रस्थ देखील होतात. शनि प्रत्येक राशीत खूप संथ गतीने प्रवास करतो, तो एका राशीत किमान अडीच वर्षं राहतो. एका राशीत परत येण्यासाठी साधारण ३० वर्षांचा कालावधी लागतो. ज्योतिषशास्त्रानुसार, शनिने २९ मार्च २०२५ रोजी मीन राशीत प्रवेश केला. शनि ग्रह आता गुरुच्या मीन राशीत आहे. आता जुलैमध्ये शनि वक्री होणार आहे. कर्मदाता शनि १३ जुलै २०२५ पासून वक्री होणार आहे आणि उलट दिशेने फिरणार आहे. शनि १३८ दिवस वक्री अवस्थेत राहील, अशा स्थितीत, शनिदेवाच्या वक्री गतीचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर होईल. पण अशा ३ राशी आहेत ज्यांच्यासाठी यावेळी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. याशिवाय, या राशींना अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊया या भाग्यशाली कोणत्या राशी आहेत…
शनिदेवाची वक्री चाल कर्क राशींच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. या काळात नोकरी आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. या राशीच्या लोकांना करिअरच्या क्षेत्रातही फायदा होऊ शकतो. यावेळी प्रमोशनसह पगार वाढू शकतो. व्यावसायिकांना अडकलेले पैसे मिळू शकतात. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. तुम्हाला परदेशात जाण्याची संधीही मिळू शकते.उत्पन्नात घसघशीत वाढ होण्याची शक्यता आहे. अचानक मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो.
शनिदेवाची वक्री चालीमुळे कुंभ राशीच्या लोकांना सुखाचे दिवस पाहायला मिळू शकतात. नोकरदार लोकांना या काळात वेतनवाढ आणि पदोन्नती मिळू शकते. व्यवसायात प्रचंड यश आणि नफा देखील मिळू शकतो. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या काळात सकारात्मक परिणाम मिळू शकतात. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. तुम्हाला मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. तुमच्या सर्व मनोकामना या काळात पूर्ण होऊ शकतात.
शनिदेवाच्या वक्री काळात मिथुन राशीच्या लोकांना अपार धनलाभ होण्याची शक्यता आहे. जे काम हाती घ्याल त्यात यश मिळू शकतो. या काळात नोकरी-व्यवसायात चांगली प्रगती होऊ शकते. यावेळी नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात. या काळात या राशीतील लोकांना व्यवसायात फायदा होण्याची शक्यता आहे. पैशाची बचत करण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता. तुम्हाला गुंतवणुकीतून मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी यश मिळण्याची शक्यता आहे.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)

‘हिप्पीं’नी भारतात येणे ही १९६५ नंतरच्या काळात नित्याची बाब ठरली; पण त्याआधीच – सन १९५९ मध्ये वयाच्या पंचविशीत स्कॉटलंडहून विल्यम (ऊर्फ बिल) लिआम मॅकके एटकेन हा तरुण खिशात अवघे ५० पौंड घेऊन निघाला आणि भारतात आला. इथेच राहून, १९७२ मध्ये भारतीय नागरिकत्वही मिळवून हिमालयाबद्दलची तसेच भारताच्या आध्यात्मिक परंपरांचा ठाव घेणारी डझनभर पुस्तके या बिल एटकेन यांनी लिहिली आणि १७ एप्रिल रोजी अखेरचा श्वास घेतला. भारतात झालेला त्यांचा जीवनप्रवास सांगणारे अखेरचे पुस्तक तयार असूनही, त्यांच्या इच्छेनुसार ते अप्रकाशितच राहील. बिल यांनी भारतात येण्याचे कारण आध्यात्मिकच, पण लीड्स विद्यापीठातून ‘तौलनिक धर्म-अभ्यास’ या विषयात पदवी घेताना महात्मा गांधींच्या आध्यात्मिक कल्पनांबद्दलचा विशेष अभ्यास, कठोपनिषदावरील भाष्याचे वाचन, यांमधून भारताबद्दलची एटकेन यांची जाण निश्चितपणे वाढली होती. पहिला मुक्काम त्यांनी कोलकात्यात (तेव्हाचे कलकत्ता) केला. जवळचे ५० पौंड – म्हणजे त्या वेळच्या विनिमयदरानुसार सुमारे ६६७ रुपये – संपले आणि परतीच्या प्रवासासाठी तिथल्या एका हिंदी शाळेत इंग्रजी शिक्षक म्हणून काम मिळवावे लागले. कोलकात्यालाच त्यांनी ठरवले- इथून कौसानीला सरलाबहन किंवा मित्रोला इथे गुरू कृष्णप्रेम यांचा आश्रम आहे तिथे जायचे. गांधीजींच्या तत्त्वज्ञानाने प्रभावित होऊन कॅथरीन मेरी हाइलमान भारतात आल्या आणि सरलाबहन झाल्या; तर पहिल्या महायुद्धात लढलेले रोनाल्ड हेन्री निक्सन हे पुढे लखनऊ विद्यापीठात शिकवण्यासाठी आले आणि कृष्णभक्तीतून वैष्णवपंथाकडे वळले. या दोघांच्याही आश्रमांत एकंदर सुमारे आठ वर्षे बिल एटकेन राहिले.
मग जिन्द या भूतपूर्व संस्थानाच्या महाराणींकडे सेक्रेटरी म्हणून ते राहिले, तेव्हा बरीच वर्षे त्यांचा मुक्काम दिल्लीतही झाला. पण कौसानीच्या आश्रमात असतानाच ‘नंदादेवी’ या शिखराने त्यांना वेड लावले होते… पार्वतीचा अवतार मानल्या जाणाऱ्या या शिखराबद्दलच्या आध्यात्मिक आणि साहसी कथांचा धांडोळा त्यांच्या ‘द नंदादेवी अफेअर’ या पुस्तकात आहे. त्याआधी, तसेच पुढे वयाच्या ऐंशीव्या वर्षानंतरही नंदादेवी शिखराचे दर्शन आणि चिंतन हा क्रम त्यांनी सोडला नाही. नंदादेवी शिखरातूनच आध्यात्मिक ऊर्जा मिळवू पाहाणारे बिल एटकेन, इतर आध्यात्मिक परंपरांचा शोध घेताना प्रसंगी श्रद्धांचीही तपासणी करत. त्यामुळे स्वत:ची ओळख अध्यात्मवादी लेखक अशी न सांगता ‘प्रवासलेखक’ अशीच ते सांगत. मात्र ‘बाकीचे लेखक हे आधी लेखक आणि मग प्रवासी असतात- मी तसा नसून आधी प्रवासी आणि मग लेखक आहे’ अशा शब्दांत, लिखाणापेक्षा प्रवासच आपण महत्त्वाचा मानतो, असे ते आवर्जून सांगत. कशासाठी फिरायचे हे ठरवूनच मी फिरतो, नोंदीही करतो, पण हे असे बऱ्याचदा केल्यानंतरच मी लिहितो- असे स्वत:च्या लेखनपद्धतीचे वर्णन त्यांनी एका मुलाखतीत केले होते. या पद्धतीमुळे काळ जणू गळून पडतो आणि प्रवास चिरंतन भासू लागतो, ही किमया ‘सेव्हन सॅक्रेड रिव्हर्स’ किंवा ‘फूटलूज इन द हिमालयाज’ या त्यांच्या पुस्तकांमध्ये पुरेपूर उतरली आहे. यापैकी सात नद्यांबद्दलचे पुस्तक विशेष गाजले. एटकेन यांच्या निधनाने केवळ एक प्रवासलेखकच नव्हे, तर भारतीय अध्यात्माचा डोळस अभ्यासकही आपण गमावला आहे.





Rohit Sharma Statement After Winning POTM Award MI vs CSK IPL 2025: रोहित शर्मा आयपीएल २०२५ च्या सुरूवातीपासून खराब फॉर्मात होता. मुंबई इंडियन्स संघासाठी रोहितचा फॉर्म खूपच महत्त्वाचा होता. पण अखेरीस चेन्नई सुपर किंग्सविरूद्ध सामन्यात रोहित शर्मा आपल्या फॉर्मात परतला आणि मुंबईसाठी मॅचविनिंग खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. रोहितने या सामन्यात ४५ चेंडूत ४ चौकार आणि ६ षटकारांसह ७६ नाबाद धावा केल्या. यासह रोहित सामन्याचा सामनावीरदेखील ठरला. यानंतर रोहित शर्मा नेमकं काय म्हणाला, जाणून घेऊया.
रोहित शर्माला त्याच्या वादळी खेळीसाठी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. सामनावीर म्हणून रोहित शर्माचं नाव घोषित होताच वानखेडे स्टेडियममध्ये रोहित रोहित नावाचा जयजयकार दुमदुमला. फक्त मुंबई इंडियन्स नव्हे तर सीएसकेचे पिवळ्या जर्सीमधील चाहतेदेखील रोहितच्या नावाचा जयजयकार करताना दिसले.
रोहित चर्चा करण्यासाठी आला तेव्हा हर्षा भोगलेंनी रोहितला सांगितले की, सीएसकेचे चाहतेही त्याच्या नावाचा जयघोष करताना दिसत आहेत, यावर रोहित शर्मा म्हणाला, “हे क्रिकेटवर प्रेम करणारे चाहते आहेत आणि हिच वानखेडेची खासियत आहे. चाहत्यांना चांगल्या क्रिकेटचा आनंद घ्यायचा असतो आणि आमच्यासाठी आजचा सामना खूपच चांगला होता.”
रोहित शर्मा त्याच्या फॉर्मबद्दल बोलताना म्हणाला, “गेल्या कित्येक वर्षापासून क्रिकेट खेळत आहे. त्यामुळे फॉर्मात नसताना स्वत:वर शंका घेणं आणि अविश्वास दाखवत वेगळं काहीतरी ट्राय करणं ही खूप साधी गोष्ट आहे. पण माझ्यासाठी साध्या गोष्टी समजून घेत आणि योग्य विचार करणं महत्त्वाचं होतं. आपल्याला कसं खेळायचं आहे आणि खेळी कशी पुढे न्यायची आहे याचा विचार करणं खूप महत्त्वाचं असत.”
इम्पॅक्ट प्लेअर म्हणून रोहित शर्मा १५व्या किंवा १७व्या षटकात येतो, पण चेन्नईविरूद्ध सामन्यात तो थेट फलंदाजीला उतरला, याबद्दल रोहित म्हणाला, “आम्ही याबद्दल चर्चा केली, पण २-३ षटकांसाठी मैदानात येण्याने फारसा काही फरक पडत नाही. पण तुम्ही १७ षटकं फिल्डिंग केलेली नसते आणि अचानक मैदानावर येऊन फिल्डिंग करता हे सोपं नसतं. पण जर संघ व्यवस्थापनाला मी थेट फलंदाजीला यावं अशी इच्छा असेल तरीही मला चालेल.”
रोहित शर्माच्या नावाचं स्टॅन्ड वानखेडेच्या मैदानावर तयार होणार आहे. याबाबत रोहितने वक्तव्य केली आहेत. पण सामनावीर ठरल्यानंतर रोहित शर्माल पुन्हा याबाबत विचारण्यात आला, तेव्हा रोहित म्हणाला, “माझ्यासाठी ही खूप सन्मानाची गोष्ट आहे. मी याआधी सांगितलं की, लहान असताना एका वेळ अशी होती की, या स्टेडियममध्ये आम्हाला येण्याची परवानगीदेखील नव्हती. इतकी वर्ष या मैदानावर खेळल्यानंतर आता माझ्या नावाचं स्टॅन्ड इथे होणार आहे ही खरंच भावूक करणारी आणि सन्मानाची गोष्ट आहे. ते स्टॅन्ड तयार झाल्यावर मी पाहताना माझी प्रतिक्रिया काय असेल मला खरंच माहित नाही.”

