



ठाणे : गेल्या महिन्याभरापासून कापूरबावडी आणि माजिवडा चौकातील कोंडीला कारणीभूत ठरणारा कापूरबावडी चौकातील बंद उड्डाणपूल अखेर आठवड्याभरात सुरु होण्याची शक्यता आहे. या पूलावर मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरु असल्याने हा पूल वाहतुकीसाठी बंद होता. येथील वाहतुक कोंडीमुळे नागरिक अक्षरश: हैराण झाले आहेत. पुल खुला झाल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.घोडबंदर, कोलशेत, बाळकूम, ढोकाळी आणि भिवंडी या भागातील वाहतुकीसाठी कापूरबावडी चौक अत्यंत महत्त्वाचा आहे. या चौकात एक उड्डाणपूल आहे. घोडबंदर भागात वाहतुक करणाऱ्या हलक्या वाहनांसाठी हा पुल महत्त्वाचा आहे. दुसरीकडे गेल्याकाही वर्षांपासून ठाणे- घाटकोपर- वडाळा (मेट्रो चार) या मार्गिकेच्या निर्माणाचे काम शहरात सुरू आहे. या कामांसाठी शहरात रस्त्याकडेला किंवा दुभाजकांमध्ये मेट्रोचे खांब उभारले जात आहे.
सर्वाधिक रहदारीचा भाग कापूरबावडी चौक असल्याने येथील मार्गावरील मेट्रोचे खांब सर्वांत शेवटच्या टप्प्यात उभारण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने घेतला होता. त्यानुसार, मागील महिन्याभरापासून कापूरबावडी आणि माजिवडा चौकात मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाची कामे सुरू आहे. येथील चौकातील उड्डाणपूलाची वाहतुकही त्यासाठी बंद करण्यात आली आहे. त्याचा परिणाम घोडबंदर, पोखरण रोड क्रमांक दोन, कोलशेत, बाळकूम आणि भिवंडीच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या हजारो वाहन चालकांना सहन करावा लागत आहे. मागील महिन्याभरापासून सुरु असलेल्या या वाहतुक कोंडीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. अनेकदा माजिवडा ते कापूरबावडी हे जेमतेम दोन ते तीन मिनीटांचे अंतर पार करण्यासाठी वाहन चालकांना सुमारे २० ते २५ मिनीटे लागतात. अखेर येथील कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. येथील खांब उभारण्यात आले असून लवकरच तुळई (गर्डर) या मार्गावर उभारले जाणार आहेत. येत्या काही दिवसांत ही कामे देखील पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आठवड्याभरात हा उड्डाणपूल सुरु करण्याचे नियोजन असल्याचे वाहतुक पोलीस दलातील एका अधिकाऱ्याने सांगितले.



Ambedkar on Partition: भराताच्या संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर 78 वर्षांपूर्वी पाकिस्तानची निर्मिती करू नका असं म्हंटल होते. जेव्हा देश स्वातंत्र्याकडे वाटचाल करत होता, तेव्हा फाळणीची मागणी जोर धरत होती तेव्हा पाकिस्तानची निर्मिती करू नका.. आंबेडकर यांनी हे ठाम मत मांडले होते. भविष्यात याचे काय परिणाम होऊ शकतात हे उदाहरणासहित पटवून देताना पाकिस्तानची खरचं गरजच आहे का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला होता.
“पाकिस्तान ऑर द पार्टिशन ऑफ इंडिया” या पुस्तकात आंबेडकर यांनी पाकिस्तानची निर्मिती का नाही केली पाहिजे याविषयी लिहीले आहे. हिंदू आणि मुस्लिम समुदायांमध्ये काही धार्मिक आणि सांस्कृतिक फरक आहेत. असले तरी, त्यांच्यात अनेक समानता देखील आहेत. यावर भर दिला गेला तर दोन राष्ट्रांची चर्चा संपेल. भारतातील सांप्रदायिकतेच्या समस्येचे निराकरण विभाजनात नाही तर समजूतदारपणा आणि सहअस्तित्वात आहे असे आंबेडकरांनी म्हंटले होते.
भारत पाकिस्तानची फाळणी का करु नये हे पटवून देण्यासाठी बाबासाहेबांनी कॅनडा, दक्षिण आफ्रिका आणि स्वित्झर्लंड सारख्या देशांची उदाहरणे दिली. या देशांमध्ये वेगवेगळ्या भाषा, धर्म आणि संस्कृतीचे लोक एकाच देशात एकत्र राहतात. जेव्हा कॅनडामध्ये ब्रिटिश आणि फ्रेंच, दक्षिण आफ्रिकेत ब्रिटिश आणि डच आणि स्वित्झर्लंडमध्ये जर्मन, फ्रेंच आणि इटालियन समुदाय एकत्र राहू शकतात, तर भारतात असे का होऊ शकत नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता.
फाळणीचा जातीय राजकारणावर परिणाम होऊ शकतो. भारतातील मुस्लिम स्वतःला एक वेगळे राष्ट्र मानत असले तरी ते एकाच संविधानाखाली एकाच देशात राहू शकतात. जर मुस्लिम हिंदूंसोबत राहतात तर त्यांना त्यांची ओळख गमावण्याची भीती का वाटते? द्विराष्ट्र सिद्धांत स्वीकारला तरी फाळणीची गरज नाही असे आंबेडकरांनी म्हंटले होते. फाळणी हा उपाय नाही. यामुळे भविष्यात अनेक अधिकच गुंतागुंतीच्या समस्या निर्माण होऊ शकतात अशी भिती त्यांनी व्यक्त केली होती.
सातारा : साताऱ्यातील (Satara) संगम माहुली या ठिकाणी एक कलाकार पाण्यात बुडाल्याची दुर्घटना घडली आहे. अभिनेते रितेश देशमुख (Rietesh deshmukh) यांच्या राजा शिव छत्रपती या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या संगम माहुली या ठिकाणी सुरू आहे. या चित्रपटाचे दिवसभरातील शूटिंगचे काम पूर्ण झाल्यानंतर चित्रपटात काम करणारा एक कलाकार कृष्णा नदीत (River) बुडाला आहे. सौरभ शर्मा असे या कलाकाराचे नाव असून तो डान्सर असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दरम्यान, सौरभ पाण्यात बुडतानाचा व्हिडिओ समोर आला असून त्याला पोहायला येत असल्याची प्राथमिक माहिती आहे.
कृष्णा नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्याचा डोहात हा कलाकार बुडाला आहे. चित्रकरण करणाऱ्या टीमकडून स्थानिक प्रशासनाच्या मदतीने सौरभचा शोध घेण्यात आला. मात्र, अंधार पडल्याने शोधमोहिमेत अडथळा निर्माण होत होता. अखेर, अंधार पडल्याने शोध मोहीम थांबविण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी सातारा पोलीस दाखल झाले आहेत. उद्या सकाळपासून पुन्हा संगमावर सौरभ शर्माचा शोध सुरू करण्यात येणार असल्याची माहिती संबधितांकडून देण्यात आली.
दरम्यान, अभिनेता रितेश देशमुख दिग्दर्शक म्हणून त्याचा दुसरा मराठी चित्रपट ‘राजा शिवाजी’ घेऊन येत आहे. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. त्याचा चित्रपट हिंदीमध्येही प्रदर्शित होणार असून या चित्रपटासाठी अभिषेक बच्चन, संजय दत्त आणि फरदीन खान यांना त्याने साइन केलं आहे. ‘राजा शिवाजी’ चित्रपटाची घोषणा करताना रितेशने लिहिलं होतं की, ‘इतिहासाच्या गर्भात एक असं व्यक्तिमत्व जन्माला आलं ज्याचं अस्तित्व नश्वरतेच्या पलीकडे होते. छत्रपती शिवाजी महाराज… हे केवळ एक ऐतिहासिक व्यक्ती नाहीत. ही 350 वर्षांची भावना आहे, असाधारण शौर्याची ठिणगी आहे… प्रत्येकाच्या हृदयात उगवणारा आशेचा एक महान सूर्य आहे.’ सध्या या सिनेमाचे चित्रीकरण वेगाने सुरू असून सर्वांनाच सिनेमाची उत्सुकता आहे.
अधिक पाहा..

Rajeshwari Kharat : नागराज मंजुळे यांच्या फॅन्ड्री या चित्रपटामुळे महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेली शालू म्हणजेच अभिनेत्री राजेश्वरी खरात आपल्या सोशल मीडिया पोस्टमुळे नेहमी चर्चेत असते. राजेश्वरी खरात (Rajeshwari Kharat) हिने आयुष्यातील मोठा निर्णय घेतला असल्याची माहिती इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन दिलीये. म्हणजेच तिने ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला असल्याची माहिती दिली आहे.

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे. दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य केले असून यामध्ये एका पर्यटकाचा मृत्यू झाला आहे, तर १२ जण जखमी झाले आहेत. दोन पर्यटकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. यातील तिघे स्थानिक रहिवासी आहेत. सुरक्षा दल आणि वैद्यकीय पथके घटनास्थळी दाखल झाली असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. पहलगामच्या बैसरन खोऱ्यातील एका पर्यटन रिसॉर्टच्या वरच्या गवताळ प्रदेशावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला, ज्यात पर्यटक जखमी झाले. हा टार्गेट स्ट्राईक होता, ज्यात दहशतवादी लपून बसले होते, असे मानले जात आहे.
