Thursday, July 23, 2026
Home Blog Page 376

४० वर्षांपूर्वी पडले प्रेमात अन् ८० व्या वर्षी केलं लग्न… एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडालेल्या वृद्ध प्रेमी जोडप्याच्या लग्नाचा PHOTO होतोय व्हायरल

0
४० वर्षांपूर्वी पडले प्रेमात अन् ८० व्या वर्षी केलं लग्न… एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडालेल्या वृद्ध प्रेमी जोडप्याच्या लग्नाचा PHOTO होतोय व्हायरल



80-year-old man from Rajasthan marry with his 78-year-old lover l ४० वर्षांपूर्वी पडले प्रेमात अन् ८० व्या वर्षी केलं लग्न… एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडालेल्या वृद्ध प्रेमी जोडप्याच्या लग्नाचा PHOTO होतोय व्हायरल





Source link

UPSC CSE result 2024 : यूपीएससीचा अंतिम निकाल जाहीर, शक्ती दुबे टॉपर तर महाराष्ट्राचा अर्चित डोंगरे देशात तिसरा

0
UPSC CSE result 2024 : यूपीएससीचा अंतिम निकाल जाहीर, शक्ती दुबे टॉपर तर महाराष्ट्राचा अर्चित डोंगरे देशात तिसरा


UPSC CSE 2024 Final Result Declared: यूपीएससी नागरी सेवा (यूपीएससी) परीक्षेचा अंतिम निकाल आज जाहीर झाला आहे. शक्ती दुबे यांनी त्यात अव्वल स्थान पटकावले आहे. यंदा टॉप १० मध्ये ३ मुलींचा समावेश आहे. तर महराष्ट्राचा अर्चित डोंगरे तिसरा आला आहे तर तिसऱ्या क्रमांकावर हर्षिता गोयल उत्तीर्ण झाली आहे.



Source link

उद्धव आणि राज यांच्यानंतर पवार कुटुंबात ऐक्याची चर्चा, राऊत म्हणाले.. आधीपासून दोघे एकच आहेत

0
उद्धव आणि राज यांच्यानंतर पवार कुटुंबात ऐक्याची चर्चा, राऊत म्हणाले.. आधीपासून दोघे एकच आहेत


गेल्या १५ दिवसांत शरद पवार आणि अजित पवार यांची तीन वेळा भेट झाली आणि त्यांनी स्टेज शेअर केले. दोन्ही नेत्यांमध्ये पूर्वीसारखा तणाव नव्हता. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात हे दोन्ही नेते एकत्र येऊ शकतात, अशी अटकळ पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे नेते राज ठाकरे हे देखील एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच ही चर्चा सुरू झाली आहे. अशा तऱ्हेने पवार घराण्यातील सत्तेची लढाई कमी होऊन एकजूट प्रस्थापित झाली, तर ती मोठी उलथापालथ ठरेल. आपण राजकीयदृष्ट्या वेगळा मार्ग स्वीकारला असला तरी कुटुंब म्हणून आमचे नाते कधीच वाईट राहिले नाही, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. सुप्रिया सुळे यांनी चांगल्या संबंधांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे एकजूटीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.



Source link

UPSC चा निकाल जाहीर, शक्ती दुबे देशात पहिली; पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा; वाचा टॉपर्सची संपूर्ण यादी

0
UPSC चा निकाल जाहीर, शक्ती दुबे देशात पहिली; पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा; वाचा टॉपर्सची संपूर्ण यादी


UPSC CSE Final Result 2024 Topper List in Marathi: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा परीक्षा 2024 चा अंतिम निकाल (UPSC Civil Services Result 2024) जाहीर केला आहे. उमेदवार युपीएससीची अधिकृत बेवसाईट upsc.gov.in वर जाऊन आपला निकाल पाहू शकतात. उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथील शक्ती दुबेने युपीएससी परीक्षेत देशात अव्वल स्थान पटकावलं आहे. तर पुण्याचा अर्चिंत डोंगरे देशात तिसरा आला आहे. 

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) आज नागरी सेवा परीक्षा 2024 चा निकाल जाहीर केला. या वर्षी शक्ती दुबेने अव्वल स्थान पटकावलं असून तिच्या पाठोपाठ हर्षिता गोयलचा क्रमांक आहे. सरकारच्या अधिसूचनेनुसार, या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 1129 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) 180 पदं, भारतीय परराष्ट्र सेवेतील (IFS) 55 पदं आणि भारतीय पोलिस सेवेतील (IPS) 147 पदं समाविष्ट आहेत.

याव्यतिरिक्त, केंद्रीय सेवा गट ‘अ’ मध्ये 605 आणि गट ‘ब’ सेवांमध्ये 142 पदे रिक्त आहेत. निकाल जाहीर झाल्यापासून 15 दिवसांच्या आत वेबसाइटवर गुण उपलब्ध होतील.

यूपीएससी टॉपर्सची यादी 2024- 

1) शक्ती दुबे
2) हर्षिता गोयल
3) डोंगरे अर्चित पराग
4) शहा मार्गी चिराग
5) आकाश गर्ग
6) कोमल पुनिया
7) आयुषी बन्सल
8) राज कृष्ण झा
9) आदित्य विक्रम अग्रवाल
10) मयांक त्रिपाठी
11) एट्टाबोयना साई शिवानी
12) आशी शर्मा
13) हेमंत
14) अभिषेक वशिष्ठ
15) बन्ना व्यंकटेश
16) माधव अग्रवाल
17) संस्कृती त्रिवेदी
18) सौम्या मिश्रा
19) विभोर भारद्वाज
20) त्रिलोक सिंग

 

नागरी सेवा परीक्षा नियम 2024 च्या नियम 20 (4) आणि (5) नुसार, यूपीएससी खालीलप्रमाणे उमेदवारांची एकत्रित राखीव यादी तयार करत आहे. ज्यामध्ये सामान्य श्रेणीतील 115, ईडब्ल्यूएस (आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक) 35, ओबीसी (इतर मागासवर्गीय) 59, एससी (अनुसूचित जाती) 14, एसटी (अनुसूचित जमाती) 6 आणि पीडब्ल्यूबीडी-1 (बेंचमार्क अपंगत्व असलेले व्यक्ती) 1 असे एकूण 230 उमेदवार आहेत. 

परीक्षा नियमांमध्ये समाविष्ट असलेल्या तरतुदींचा योग्य विचार करून, उपलब्ध रिक्त पदांच्या संख्येनुसार विविध सेवांमध्ये नियुक्ती केली जाईल. 

–भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) साठी, 180 रिक्त पदे आहेत, ज्यामध्ये सामान्य श्रेणीतील 73, ईडब्ल्यूएससाठी 18, ओबीसीसाठी 52, एससीसाठी 24 आणि एसटीसाठी 13 आहेत.

– भारतीय परराष्ट्र सेवा (IFS) साठी, 55 रिक्त जागा आहेत, ज्यामध्ये सामान्यसाठी 23, ईडब्ल्यूएससाठी 5, ओबीसीसाठी 13, एससीसाठी 9 आणि एसटीसाठी 5 जागा आहेत.

– भारतीय पोलिस सेवेसाठी (IPS) एकूण 147 रिक्त जागा आहेत, ज्यामध्ये सामान्यांसाठी 60, ईडब्ल्यूएससाठी 14, ओबीसीसाठी 41, एससीसाठी 22 आणि एसटीसाठी 10 जागा आहेत.

– केंद्रीय सेवा गट ‘अ’ मध्ये 605 रिक्त जागा आहेत: सामान्यसाठी 244, ईडब्ल्यूएससाठी 57, ओबीसीसाठी 168, एससीसाठी 90 आणि एसटीसाठी 46.

– गट ‘ब’ सेवांमध्ये 142 रिक्त जागा आहेत: सामान्यसाठी 55, EWS साठी 15, OBC साठी 44, SC साठी 15 आणि ST साठी 13.

सर्व सेवांमध्ये एकूण 1129 रिक्त जागा आहेत, ज्यामध्ये 50  रिक्त जागा पीडब्ल्यूबीडी उमेदवारांसाठी राखीव आहेत (पीडब्ल्यूबीडी-1 साठी 12, पीडब्ल्यूबीडी-2 साठी 8, पीडब्ल्यूबीडी-3 साठी 16 आणि पीडब्ल्यूबीडी-5 साठी 14). शिफारस केलेल्या 241 उमेदवारांची उमेदवारी तात्पुरती ठेवण्यात आली आहे. एका उमेदवाराची यूपीएससी सीएसई राखून ठेवण्यात आली आहे.





Source link

‘आई आणि बहीण रोज वडिलांबरोबर…’, DGP हत्या प्रकरणात मुलाने सगळंच सांगितलं; जबाब आला समोर

0
‘आई आणि बहीण रोज वडिलांबरोबर…’, DGP हत्या प्रकरणात मुलाने सगळंच सांगितलं; जबाब आला समोर


Karnataka DGP Om Prakash Murder Case: कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक ओम प्रकाश यांच्या हत्येच्या बातमीनं देश हादरुन गेला आहे. रविवारी बंगळुरुमधील निवासस्थानी ओम प्रकाश यांचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आल्यानंतर त्यांची पत्नी पल्लवीला ताब्यात घेण्यात आलं आहे. पल्लवी यांनीच मुलीच्या मदतीने पतीला संपवल्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच या प्रकरणामध्ये रोज नवीन खुलासे समोर येत आहे. असं असतानाच आता ओम प्रकाश यांच्या मुलाचा जबाब समोर आला आहे. 

मुलगा कार्तिकेशचा धक्कादायक जबाब

ओम प्रकाश यांचा मुलगा कार्तिकेशने त्याची आई पल्लवी आणि बहीण कृतीबद्दल धक्कादायक माहिती दिली आहे. ओम प्रकाश हे डायनिंग टेबलवर बसून माशांचा आस्वाद घेत असतानाच अचानक त्यांच्यावर प्राण घातक हल्ला करण्यात आल्याचं प्राथमिक तपासात समोर आला आहे. मागील काही दिवसांपासून ओम प्रकाश हे त्यांच्या कुटुंबियाकडून मिळणाऱ्या वागणुकीमुळे फार त्रासलेले होते. त्यांची पत्नी पल्लवी आणि मुलगी कृती त्यांच्याशी सतत वाद घालायचे.  बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार कार्तिकेशने, “आई आणि बहिणीने दोघींही डिप्रेशनमध्ये होत्या. त्या रोज वडिलांबरोबर वाद घालायच्या. मला पूर्ण खात्री आहे की या दोघांनीच माझ्या वडिलांची हत्या केली आहे,” असा जबाब नोंदवला आहे. कार्तिकेशने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारेच या प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

जीव घेईन अशा धमक्या देत होती

ओम प्रकाश यांच्या मुलाने तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणात पोलिसांनी तपास सुरु केला आहे. कार्तिकेशने मागील एका आठवड्यापासून माझी आई माझ्या वडिलांचा जीव घेईन अशा धमक्या देत होती. माझे वडील माझ्या आत्याच्या घरी म्हणजेच सरिता यांच्याकडे राहत होते असंही कार्तिकेशने पोलिसांना सांगितलं आहे. या प्रकरणामध्ये कार्तिकेशचा हा जबाब अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

डोळ्यात मिरची पावडर फेकली आणि चाकूने हल्ला

पल्लवीला स्किझोफ्रेनिया आणि इतर मानसिक आरोग्याच्या समस्या होत्या. प्राथमिक तपासात दिसून आलं आहे की ओम प्रकाश आणि पल्लवी यांचं कुटुंबातील एका सदस्याला हस्तांतरित केलेल्या स्थावर मालमत्तेवरून वाद झाला. त्यानंतर पत्नीने आधी ओम प्रकाश यांच्या डोळ्यात मिरची पावडर फेकली. त्यांनंतर त्यांना बांधून ठेवत त्यांच्यावर चाकूने वार करुन त्यांची हत्या केली. 68 वर्षीय पोलीस आयुक्तांची हत्या करण्यासाठी पत्नीने ग्लास बॉटलचाही वापर केल्याचं सांगितलं जात आहे. 

व्हिडीओ कॉल करुन गुन्ह्याची कबुली

हत्या केल्यानंतर पल्लवीने एका माजी पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीला फोन करुन आपण पतीची हत्या केल्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे. ‘मी राक्षसाला ठार केलं आहे’, असं तिने व्हिडीओ कॉल करुन या महिलेला सांगितलं. या महिलेने तातडीने पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर पल्लवी यांना अटक करण्यात आली असून त्यांची मुलगी कृतीही पोलिसांच्या ताब्यात आहे.





Source link

पत्नीवर झोपेतच कुऱ्हाडीने वार, चारित्र्यावरील संशयातून पतीचे राक्षसी कृत्य

0
पत्नीवर झोपेतच कुऱ्हाडीने वार, चारित्र्यावरील संशयातून पतीचे राक्षसी कृत्य



यवतमाळ : घाटंजी शहरात पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने झोपेत असलेल्या पत्नीवर कुऱ्हाडीने सपासप वार केले. ही घटना नेहरूनगर घाटंजी येथे घडली. काजल प्रफुल टिपले (२५) असे या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे, तर प्रफुल गौतम टिपले (४०, नेहरु नगर, घाटंजी) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रफुल पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेवून तिच्याशी वाद घालत होता.  रविवारी मध्यरात्री  काजल घरात झोपून असताना पती प्रफुलने तिच्या गळ्यावर कुऱ्हाडीने वार केले. तिच्या ओरडण्यामुळे परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. महिलेला तातडीने घाटंजी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.  प्रकृती चिंताजनक असल्याने यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आले.

या प्रकरणी दुर्गेष कुंभारे रा. खापरी घाटंजी याने घाटंजी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी आरोपी पतीविरूद्ध गुन्हा दाखल केला.

महिला कर्मचारी मृतावस्थेत आढळली

प्रकृती ठीक नसल्याचे कारण देत नातेवाईकाच्या लग्नाला न जाता घरीच थांबलेल्या महिलेचा मृतदेह घरातच झोपलेल्या अवस्थेत आढळला. प्रीती सचिन डाखरे (२८), रा. इस्तारी नगर, खापरी, घाटंजी असे मृत महिलेचे नाव आहे. ती महावितरणमध्ये कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करीत असल्याचे सांगण्यात येते.

प्रीतीच्या पतीचे नऊ वर्षांपूर्वी निधन झाले. तिला अंश नावाचा मुलगा आहे. ती आणि अंश हे दोघे इस्तारी नगरात सरला मडावी यांच्या घरी भाड्याने राहत होते. प्रीती सहा महिन्यांपासून घरीच असल्याचे माहिती तिच्या कुटुंबियांनी दिली. प्रीतीने रविवारी वडिलांना फोन करून आपली प्रकृती ठीक नसल्याने नातेवाईकाच्या लग्नाला येवू शकत नसल्याचा निरोप दिला होता. त्यानंतर सोमवारी सकाळी ती नेहमीप्रमाणे उठली नाही, त्यामुळे घरमालकीन सरला मडावी यांनी तिच्या खोलीत डोकावून पाहिले असता ती झोपून असल्याचे आढळले. मडावी यांनी प्रीतीच्या वडिलांना फोनवरून माहिती दिली. तेव्हा तिचे वडील, बहीण आणि जावई ईस्तारी नगरात तिच्या घरी पोहोचले. तेव्हा प्रीती पलंगावरच मृतावस्थेत आढळली. तिचे वडील हनुमान गोविंदराव बदकी (५८) रा.  वासरी, ता. घाटंजी यांनी याबाबत घाटंजी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यावरून घाटंजी पोलिसांनी मर्ग नोंद केला. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल खंडागळे करीत आहे. हा अपघात आहे की घातपात याबाबत विविध चर्चा सुरू आहे



Source link

bandra versova sea link access to the western express highway will be easier from bridge mumbai print news zws 70 | वांद्रे

0
bandra versova sea link access to the western express highway will be easier from bridge mumbai print news zws 70 | वांद्रे



bandra versova sea link access to the western express highway will be easier from bridge mumbai print news zws 70 | वांद्रे – वर्सोवा सागरी सेतू : सेतूवरून पश्चिम द्रुतगती महामार्गावर येणे होणार सोपे, जुहूतील दोन आंतरबदल मार्गाच्या लांबीत अखेर वाढ





Source link

Mumbai’s Inspiring Delivery Boy Video : Handicapped but Unstoppable A Story of Courage & Determination

0
Mumbai’s Inspiring Delivery Boy Video : Handicapped but Unstoppable A Story of Courage & Determination



Mumbai’s Inspiring Delivery Boy Video : Handicapped but Unstoppable A Story of Courage & Determination | VIDEO: आयुष्य कुणाचंच सोपं नाही! डिलिव्हरी बॉयनी सांगितला संघर्ष, “२०१२ मध्ये बसचा अपघात झाला अन् मला अपंगत्व आलं..” व्हिडीओ होतोय व्हायरल





Source link

Maharashtra Heatwave Updates| Gold Silver Price Today Live Updates in Marathi| Maharashtra Crime News Today in Marathi

0
Maharashtra Heatwave Updates| Gold Silver Price Today Live Updates in Marathi| Maharashtra Crime News Today in Marathi


Today’s Breaking News LIVE Updates : राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळ पडला आहे. कित्येक गावांमध्ये पिण्यासाठी पाणी नसल्यामुळे लोकांना पाण्यासाठी वणवण भटकावं लागतंय. अनेक नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. परिणामी राज्यातील शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण वाढलं आहे. मात्र, राज्य सरकारकडून याबाबत कोणीही भाष्य केलेलं नाही. दुसऱ्या बाजूला, राज्याच्या राजकारणात सध्या केवळ मनसे अध्यक्ष राज ठाकरे व शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची चर्चा आहे. हे दोन्ही भाऊ मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येण्याची शक्यता आहे. दोन्ही नेत्यांनी यावर अनुकूल वक्तव्ये केली आहेत. याबाबत वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. तसेच, राज्य सरकारने महाराष्ट्रातील मराठी माध्यमांच्या प्राथमिक शाळांमधील चिमुकल्या मुलांनी हिंदी भाषा शिकणं सक्तीचं केलं आहे. या निर्णयाला विरोध होत आहे. सर्व बातम्यांचा आढावा आपण या लाइव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत.

Live Updates

Mumbai-Pune News Live Today 22 April 2025 : राज्यातील महत्त्वाच्या बातम्या.

11:41 (IST) 22 Apr 2025

Adani Realty: नवी मुंबईत गुजरातपेक्षा दुप्पट मोठ्या टाउनशिपची अदाणींची योजना, विमानतळ सुरू होताच प्रकल्पाची होणार घोषणा!

Adani Project in Navi Mumbai Panvel: अदाणी रिअॅल्टीकडून लवकरच नवी मुंबईत तब्बल १ हजार एकरवरील १० हजार कोटींच्या प्रकल्पाची सुरुवात केली जाणार आहे. …वाचा सविस्तर

11:40 (IST) 22 Apr 2025

संग्राम थोपटेंचा रवींद्र चव्हण व बावनकुळेंच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

काँग्रेसचे नेते तथा भोर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली असून त्यांनी आज भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला आहे. थोपटे यांनी दोन दिवसांपूर्वी काँग्रेसच्या प्राथमिक सभासदत्वाचा राजीनामा दिला. पाठोपाठ आज त्यांनी भाजपा नेते रवींद्र चव्हाण व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे.

https://twitter.com/cbawankule/status/1914558497275928877

11:15 (IST) 22 Apr 2025

माजी आमदार झिशान सिद्दीकी यांना धमकीचा ई-मेल

माजी आमदार झिशान सिद्दीकी यांना यापूर्वीही ऑक्टोबर महिन्यात धमकीसाठी दूरध्वनी आला होता. …सविस्तर बातमी

11:04 (IST) 22 Apr 2025

उद्धव व राज ठाकरेंमधील युतीचा निर्णय २९ एप्रिलनंतरच; मनसे नेते म्हणाले, “पक्षनेतृत्वाने आम्हाला…”

Uddhav and Raj Thackeray : राज्यातील शाळांमधील हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात राज व उद्धव ठाकरे यांनी दंड थोपटले आहेत. …अधिक वाचा

11:01 (IST) 22 Apr 2025

पुण्यात जैन समाजाचा आक्रोश मोर्चा, विलेपार्लेतील मंदिरावरील कारवाईविरोधात आक्रमक

विलेपार्ले पूर्व येथील कांबळीवाडी परिसरातील जैन मंदिरावर करण्यात आलेल्या कारवाईवरून मुंबई महापालिका राजकीय पक्षांच्या रडारवर आहे. तसेच जैन धर्मियांनी नुकताच मुंबईत एक मोठा मोर्चादेखील काढला होता. आता पुण्यातील जैन धर्मियांनी आक्रोश मोर्चा काढला आहे. जैन धर्मियांनी काही वेळापूर्वी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला. शेकडो जैन धर्मीय लोक या आंदोलनात सहभागी झाले होते.





Source link

china developed advanced hydrogen bomb print exp zws 70

0
china developed advanced hydrogen bomb print exp zws 70



china developed advanced hydrogen bomb print exp zws 70 | चीनने विकसित केला विध्वंसक अत्याधुनिक हायड्रोजन बॉम्ब! युद्धाचे तंत्र बदलविणारा आविष्कार?





Source link