Saturday, August 22, 2026
Homeदेश-विदेशपाकिस्तानची निर्मिती करू नका... आंबेडकर असं का म्हणाले होते?

पाकिस्तानची निर्मिती करू नका… आंबेडकर असं का म्हणाले होते?

पाकिस्तानची निर्मिती करू नका… आंबेडकर असं का म्हणाले होते?

[ad_1]

Ambedkar on Partition:  भराताच्या संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर 78 वर्षांपूर्वी पाकिस्तानची निर्मिती करू नका असं म्हंटल होते.  जेव्हा देश स्वातंत्र्याकडे वाटचाल करत होता, तेव्हा फाळणीची मागणी जोर धरत होती तेव्हा पाकिस्तानची निर्मिती करू नका.. आंबेडकर यांनी हे ठाम मत मांडले होते. भविष्यात याचे काय परिणाम होऊ शकतात हे उदाहरणासहित पटवून देताना पाकिस्तानची खरचं गरजच आहे का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला होता.

 “पाकिस्तान ऑर द पार्टिशन ऑफ इंडिया” या पुस्तकात आंबेडकर यांनी पाकिस्तानची निर्मिती का नाही केली पाहिजे याविषयी लिहीले आहे.  हिंदू आणि मुस्लिम समुदायांमध्ये काही धार्मिक आणि सांस्कृतिक फरक आहेत. असले तरी, त्यांच्यात अनेक समानता देखील आहेत. यावर भर दिला गेला तर दोन राष्ट्रांची चर्चा संपेल. भारतातील सांप्रदायिकतेच्या समस्येचे निराकरण विभाजनात नाही तर समजूतदारपणा आणि सहअस्तित्वात आहे असे आंबेडकरांनी म्हंटले होते.

भारत पाकिस्तानची फाळणी का करु नये हे पटवून देण्यासाठी बाबासाहेबांनी कॅनडा, दक्षिण आफ्रिका आणि स्वित्झर्लंड सारख्या देशांची उदाहरणे दिली. या देशांमध्ये वेगवेगळ्या भाषा, धर्म आणि संस्कृतीचे लोक एकाच देशात एकत्र राहतात.  जेव्हा कॅनडामध्ये ब्रिटिश आणि फ्रेंच, दक्षिण आफ्रिकेत ब्रिटिश आणि डच आणि स्वित्झर्लंडमध्ये जर्मन, फ्रेंच आणि इटालियन समुदाय एकत्र राहू शकतात, तर भारतात असे का होऊ शकत नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. 

फाळणीचा जातीय राजकारणावर परिणाम होऊ शकतो. भारतातील मुस्लिम स्वतःला एक वेगळे राष्ट्र मानत असले तरी ते एकाच संविधानाखाली एकाच देशात राहू शकतात. जर मुस्लिम हिंदूंसोबत राहतात तर त्यांना त्यांची ओळख गमावण्याची भीती का वाटते? द्विराष्ट्र सिद्धांत स्वीकारला तरी फाळणीची गरज नाही असे आंबेडकरांनी म्हंटले होते. फाळणी हा उपाय नाही. यामुळे भविष्यात अनेक अधिकच गुंतागुंतीच्या समस्या निर्माण होऊ शकतात अशी भिती त्यांनी व्यक्त केली होती. 

 



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments