Saturday, July 18, 2026
Home Blog Page 342

ज्या तरुणीवर बलात्काराच्या आरोपात झाली कैद, आरोपीने तुरुंगात तिच्याशीच केला विवाह

0
ज्या तरुणीवर बलात्काराच्या आरोपात झाली कैद, आरोपीने तुरुंगात तिच्याशीच केला विवाह


ओडिशातील गंजम जिल्ह्यात बलात्काराच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या एका २६ वर्षीय तरुणाने कारागृहाच्या आवारात पीडितेशी लग्न केले. कारागृहाच्या आवारात वधू-वरांचे कुटुंबीय, अनेक मान्यवर आणि तुरुंग अधिकारी यांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला. कोडाळा येथील उपकारागृह परिसरात जल्लोषाचे वातावरण होते. पोलासरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गोछाबारी येथे राहणाऱ्या सूर्यकांत बेहरा या कैद्याने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये कारागृहात येण्यापूर्वी एका तरुणीवर प्रेम करत होता. पोलिसांनी अटक करण्यापूर्वी बेहरा गुजरातमधील सुरत येथे काम करत होता.



Source link

Asaduddin Owaisi : असदुद्दीन ओवैसींनी सुनावले खडे बोल; “पाकिस्तानने सतत अणुबॉम्बच्या धमक्या देऊ नये, आम्ही…”

0
Asaduddin Owaisi : असदुद्दीन ओवैसींनी सुनावले खडे बोल; “पाकिस्तानने सतत अणुबॉम्बच्या धमक्या देऊ नये, आम्ही…”



Asaduddin Owaisi Statement over Pakistan and Pahalgam Terror Attack |असदुद्दीन ओवैसींनी सुनावले खडे बोल; “पाकिस्तानने सतत अणुबॉम्बच्या धमक्या देऊ नये, आम्ही…”





Source link

तुम्ही आमच्यापेक्षा अर्ध्या तासाने नव्हे तर अर्ध्या शतकाने मागे आहात, असदुद्दीन ओवैसींनी पाकिस्तानला सुनावलं

0
तुम्ही आमच्यापेक्षा अर्ध्या तासाने नव्हे तर अर्ध्या शतकाने मागे आहात, असदुद्दीन ओवैसींनी पाकिस्तानला सुनावलं


एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी पाकिस्तानवर हल्लाबोल केला आहे. आता त्यांनी शेजारच्या देशाविषयी ‘अर्धा तास नाही, अर्धा शतक मागे आहात’, असे म्हटले आहे. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर ते सातत्याने दहशतवाद आणि पाकिस्तानविरोधात उघडपणे बोलत आहेत. २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी २६ पर्यटकांची गोळ्या झाडून हत्या केली होती.



Source link

वस्रोद्योग क्षेत्रात महाराष्ट्र करणार बेलारुसला सहकार्य; बेलारूसच्या वस्त्रोद्योग मंत्र्यांची मंत्रालयात चर्चा

0
वस्रोद्योग क्षेत्रात महाराष्ट्र करणार बेलारुसला सहकार्य; बेलारूसच्या  वस्त्रोद्योग  मंत्र्यांची  मंत्रालयात चर्चा


बेलारूसच्या वस्त्रोद्योग मंत्री तात्सियाना लुहिना यांनी नुकतीच तीन दिवसाची भारताला धावती भेट दिली. आपल्या या भारत भेटीत त्यांनी जवळपास तीन वस्त्रोद्योग कंपन्यांना आणि फॅशन डिझाईन करणाऱ्या संस्थांना मुंबई आणि कोईमतूर येथे भेटी दिल्या. कोईमतूर येथे ज्या टेक्स्टाईल मिल्स आहेत आणि फॅशन डिझायनिंग शिकवणाऱ्या आणि करणाऱ्या संस्था आहेत त्यांनाही भेटी दिल्या. आपल्या या भेटीसाठी आपण अतिशय उत्सुक होतो असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्यापुढे म्हणाल्या की भारत आणि बेलारूस यांच्यात या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त सहकार्य झाले पाहिजे आणि तसे करण्याचा आमचा विचार आहे.



Source link

मुंबईतून धावणार अमृत भारत एक्स्प्रेस; राज्यात कुठे असेल थांबा? तिकीटाचे दरही जाणून घ्या

0
मुंबईतून धावणार अमृत भारत एक्स्प्रेस; राज्यात कुठे असेल थांबा? तिकीटाचे दरही जाणून घ्या


Amrit Bharat Train: सहरसा ते मुंबईदरम्यान लवकरच अमृत भारत एक्स्प्रेस धावणार आहे. मध्य रेल्वेकडून लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) ते सहरसा (बिहार) दरम्यान शुक्रवारपासून म्हणजेच 2 मेपासून नियमित स्वरुपात धावणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस येथे नवीन अमृत भारत ट्रेन दाखल झाली असून दर आठवड्याला ही गाडी चालवण्यात येणार आहे. रविवारपासून या गाडीचे आरक्षण आज तिकिट आरक्षण केंद्र आणि रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर सुरू आहे. 

अमृत भारत एक्सप्रेस महाराष्ट्रात किती स्थानकांवर थांबणार, तिकिट आणि रूट कसे असेल याची सविस्तर माहिती जाणून घेऊयात. अमृत भारत एक्स्प्रेस महाराष्ट्र ते बिहारदरम्यान धावणार आहे. दर शुक्रवारी दुपारी 12 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसहून रवाना होईल. त्यानंतर ठाणे, कल्याण, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, मानिकपूर, प्रयागराज, खगडिया, समस्तीपूर, हाजीपूर, पाटलीपुत्र आणि पंडित दीनद्याल उपाध्याय,बक्सर, आरा, आरा, दानापूर, सोनपरू, हाजीपूर, मुजफ्फरपूर, हसनपूर रोड, सलौना येथे थांबा देण्यात आला आहे. 

दुपारी 12 वाजता मुंबईहून निघालेली अमृत भारत ट्रेन रविवारी सकाळी 4.20 वाजता सहरसा येथे पोहोचणार आहे. त्यानंतर 38 तासांचा प्रवास करुन सोमवारी दुपारी 3.45 वाजता मुंबईत पोहोचेल. नाशिकरोड येथे सोमवारी दुपारी 12.30 ला येईल. मुंबई (लोकमान्य टिळक टर्मिनस) ते सहरसा या 19000 किलोमीटर अंतरासाठी अमृत भारत ट्रेन सुरू करण्यात येणार आहे. 

रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ही ट्रेन पूर्णपणे अत्याधुनिकरित्या सुसज्य आहे. या गाडीला 22 बोगी राहणार असून यामध्ये स्लिपर कोच, चेअरकार असणार आहे. या गाडीमध्ये तिकीट दर कमी राहणार असल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले. 11095 आणि 11016 या क्रमांकाची अमृत भारत ट्रेन राहाणार असून ती आठवड्यातून एकदा धावणार आहे. सहरसा ते मुंबईकडे येण्यासाठी ३५ तास लागणार आहे, तर मुंबईकडून सहरसाकडे जाण्यासाठी ३८ तास लागणार आहेत.

तिकीट दर कसे असतील?

या ट्रेनमुळं नागरिकांचा प्रवास आरामदायी होणार आहे. सहरसा ते मुंबई दरम्यान स्लीपर कोचचे तिकीट 1045 आहे तर पाटलिपूत्र ते मुंबई 945 रुपये तिकीट असणार आहे. 





Source link

Shani Budh Yuti 2025: 3 Zodiac Signs to Get Rich & Wealthy |Ashtadash Yog News In Marathi

0
Shani Budh Yuti 2025: 3 Zodiac Signs to Get Rich & Wealthy |Ashtadash Yog News In Marathi



Shani Budh Yuti 2025: 3 Zodiac Signs to Get Rich & Wealthy |Ashtadash Yog News In Marathi | १ मे पासून पैसाच पैसा! बुध आणि शनि बनवणार पावरफुल अष्टादश योग, ‘या’ तीन राशींना मिळणार धन संपत्तीसह अपार श्रीमंती





Source link

march salaries for nearly two lakh anganwadi workers in state have been delayed leaving many facing hunger

0
march salaries for nearly two lakh anganwadi workers in state have been delayed leaving many facing hunger



march salaries for nearly two lakh anganwadi workers in state have been delayed leaving many facing hunger | अंगणवाडी सेविकांचे मानधन थकले, कर्मचाऱ्यांच्या कुटूंबावर उपासमारीची वेळ !





Source link

pahalgam terror attack Pakistani leaving india crossed attari border live updates

0
pahalgam terror attack Pakistani leaving india crossed attari border live updates


Pakistani People Leaving India Live Update: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतातून संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. भारत सरकारनं या हल्ल्यानंतर घेतलेल्या कठोर भूमिकेनंतर भारतातून पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांत देश सोडून जाण्यास सांगण्यात आलं. या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येनं पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडल्याचं दिसून आलं. दुसरीकडे सीमेवर दोन्ही बाजूंनी लष्करी हालचाली वाढल्यामुळे भारत व पाकिस्तान यांच्यात युद्ध होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Live Updates

India Pakistan Latest News Update : भारत व पाकिस्तान खरंच युद्धाच्या उंबरठ्यावर? दोन्ही देशांत नेमकं घडतंय काय?

08:10 (IST) 28 Apr 2025

Pakistan Fire Small Arms Across LOC: एलओसीवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन

रविवारी मध्यरात्री पाकिस्तानकडून एलओसी अर्थात प्रत्यक्ष सीमारेषेवर कोणतीही सूचना न देता दारूगोळा फेकण्यात आला. कुपवाडा आणि पूँछ भागातील सीमेवर हा प्रकार घडला. पाकिस्तानच्या या भ्याड कृत्याला चोख प्रत्युत्तर देण्यात आलं आहे, अशी माहिती भारतीय लष्कराकडून देण्यात आल्याचं वृत्त एएनआयनं दिलं आहे.

http://twitter.com/ANI/status/1916668381098635623

07:59 (IST) 28 Apr 2025

Indians Back from Pakistan: ८५० भारतीय परतले!

दरम्यान, एकीकडे ५३७ पाकिस्तानी भारतातून परत गेले असताना दुसरीकडे ८५० भारतीय मायदेशी परतले आहेत. यात पाकिस्तानातील भारतीय दूतावासातल्या १४ उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.

07:58 (IST) 28 Apr 2025

Pakistani People Leaving India: १२ श्रेणींमधील व्हिसाधारक पाकिस्तानी नागरिक मायदेशी

२४ एप्रिलपासून २७ एप्रिलपर्यंत भारतातून अटारी वाघा सीमेवरून पाकिस्तानमध्ये परतलेल्या ५३७ नागरिकांमध्ये १२ श्रेणींमधील अल्पकाळ व्हिसाधारकांचा समावेश आहे.

07:55 (IST) 28 Apr 2025

Pakistani Leaving India: पाकिस्तानी नागरिकांनी गाठली अटारी बॉर्डर!

पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारनं दिलेल्या निर्देशांनुसार भारतातील पाकिस्तानी नागरिकांनी थेट अटारी सीमा गाठली आहे. गेल्या चार दिवसांत तब्बल ५३७ पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडल्याची आकडेवारी समोर आली आहे.

 

India Pakistan Latest News Update : पाकिस्तानविरोधात भारताची आक्रमक भूमिका, पाकिस्तानची आर्थिक नाकेबंदी





Source link

Today’s Gold Rate in Maharashtra, 22 & 24 Carat Price

0
Today’s Gold Rate in Maharashtra, 22 & 24 Carat Price



Today’s Gold Rate in Maharashtra, 22 & 24 Carat Price | सर्वसामान्यांना दिलासा! सोन्याचे दर घसरले; मुंबई-पुण्यात १० ग्रॅमची किंमत किती?





Source link

पहलगाम दहशतवादी हल्यानंतरची आव्हाने

0
पहलगाम दहशतवादी हल्यानंतरची आव्हाने



डॉ. मुंकुंद इंगळे

जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछूट गोळीबार करून जवळपास २६ निरपराध पर्यटकांचा बळी घेतला. या हल्ल्याचा सारा देश तीव्र निषेध व संताप व्यक्त करत असून या हल्ल्याचा बदला घेण्याची मागणी करत आहे. या क्रूर व अमानुष हल्ल्यामुळे समस्त भारतीयांचा संताप साहजिकच अनावर झाला आहे. म्हणून आतातरी सरकारने आपला विवेक जागा ठेवून कडक कारवाई करून अशा दहशतवादावर प्रभावी उपाययोजना करणे काळाची गरज आहे. पुलवामा हल्ला झाला तेव्हा ४० च्या वर जवान शहीद झाले. तेव्हाही देशात संतापाची लाट होती. पण देशवासीयांमध्ये त्याची तीव्रता तेवढी दिसून आली नव्हती. आता मात्र ही तीव्रता फार टोकाची झाल्याचे विविध वाहिन्यांवरून प्रसारित होणाऱ्या बातम्यांवरून दिसते. कारण काय तर या वेळेला दहशतवाद्यांनी नाव व धर्म विचारून फक्त हिंदू पर्यटकांना गोळ्या घातल्या असे म्हणतात. या आशयाचे वृत्त सर्व चित्रवाणी वृत्तवाहिन्यांवरून प्रसारित केले गेले आणि तसाच सूर कायम राहावा यासाठी पद्धतशीर प्रयत्न केले जात आहेत असे दिसते. पण सत्य काय आहे याची लवकरच लोकांना जाणीव होईल ही अपेक्षा.

खरे म्हणजे असा दहशतवादी हल्ला हा निषेधार्ह आहेच – मग तो कोणावरही होवो. कारण आम्ही समस्त भारतीय आहोत. पण देशात सध्या भारतीयत्वाची भावना कमी होत चालली असून जात आणि धर्म जास्त महत्त्वाचा होत आहे. त्यामुळे एखाद्या घटनेचा निषेध किती व कसा करावा हे त्या घटनेतील आरोपी आणि बळी जाणाऱ्या लोकांची जात व धर्म पाहून ठरविले जाते. ही संकुचित मानसिकता भारताच्या एकता आणि अखंडतेला फार मोठा धक्का देणारी ठरणार हे निश्चित.

देशात गेल्या १० वर्षांपासून भाजप सत्तेत आहे आणि ‘देश आता खऱ्या अर्थाने सुरक्षित व मजबूत हातात आहे. देशाला कणखर नेतृत्व लाभले आहे’; ‘आम्ही आता खऱ्या अर्थाने स्वतंत्र झालो’; ‘आम्ही देशाला महासत्ता बनवत आहो’; ‘आम्ही जगात भारताचा दरारा निर्माण केला आहे’; ‘आम्ही दहशतवाद कमी केला असून तो मुळासकट उखडून फेकण्याची ताकद आता भारतात निर्माण झाली आहे. त्यामुळे आता देश दहशतवाद मुक्त होईल’ असे दावे सरकार व अंधभक्त सतत करत असतात. पण वास्तव काय आहे याची प्रचीती आपण सगळ्या भारतीयांनी घेतली आहे.

पहलगाम येथील हल्ल्यानंतर देशात निर्माण झालेल्या संतापाच्या लाटेने सरकार खडबडून जागे झाले आणि ‘ॲक्शन मोड’वर आले असून बदला घेण्यासाठी सज्ज झाले आहे अशाही बातम्या येत आहेत. ही फार चांगली गोष्ट आहे. पण सरकारने आजपर्यंत काय केले? जम्मू काश्मीर धगधगता आहे याची जाणीव असूनही पर्यटन स्थळी सुरक्षेची व्यवस्था का नव्हती? आमच्या सक्षम व तत्पर असलेल्या गुप्तचर यंत्रणा काय करत होत्या? देशात कुठेही १०-१५ लोकांची जरी बैठक होत असेल तर त्याची माहिती गोळा करणारे गुप्तचर विभाग कुठे गेला होता? असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. कारण दहशतवादी महिन्याभरापासून पूर्वपाहाणी (रेकी) करत होते आणि अंतिमतः पर्यटन स्थळी येऊन बेछूट गोळीबार करून निघून गेले. याबाबत सुरक्षा यंत्रणेला आणि गुप्तवार्ता विभागाला काहीही कळू नये याचे आश्चर्य वाटते.

आपल्या देशात हिंदू मुस्लिम वाद मुद्दाम पेटविला जात असल्याचे चित्र सध्या मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळत आहे. कारण याच वादातून हिंदू धर्म धोक्यात आहे. हिंदू माणूस सुरक्षित नाही असा आभास निर्माण करून सत्तेची पोळी शेकणाऱ्या निर्लज्ज, खोटारडे, जुमलेबाज आणि राजेशाही थाटात जगणाऱ्या राजकारण्यांचा आजच्या राजकारणात सुळसुळाट झाला आहे. म्हणून आता या देशात कोणत्याही घटनेचा वापर राजकीय हेतूने प्रेरित होऊन केला जातो. ही या देशाची, लोकशाहीची आणि लोकांची फार मोठी शोकांतिका आहे.

भारतात जातीवाद, धर्मवाद, प्रांतवाद, भाषावाद आणि दहशतवाद ही राजकारण्यांची सत्ता प्राप्त करण्याची साधने झाली आहेत असेच म्हणावे लागेल. कारण राजकारण्यांची बेताल, चिथावणीखोर, दंगे भडकवणारी वक्तव्ये हे त्याचेच द्योतक आहे. त्यांनी आपल्या अंधभक्तांच्या फौजा उभ्या केल्या आहेत. या फौजा देशात जातीय आणि धार्मिक दहशतवाद पेटवत आहेत. हे सत्य आणि वास्तव आहे. पण ते कळायला उशीर लागतो. तोपर्यंत देश पेटवला जातो आणि लोकशाही व संविधान पायदळी तुडवून ‘हम करे सो कायदा’ या न्यायाने नंगानाच सुरू राहतो. परिणामी लोकांना दहशतीखाली जगण्याशिवाय पर्याय उरत नाही. खरं पाहाल तर धर्म हा माणसाला जोडतो. तो प्रेम, शांती, मानवता, करुणा, मैत्री, दया, क्षमा, शांती आणि सहिष्णुता शिकवतो. त्यामुळे कोणताही धर्म दहशतवादी असूच शकत नाही. ‘दहशतवादाला धर्म नसतो’ हे मात्र आम्ही चुकीचे ठरवत आहो, कारण आम्ही धर्मालाच दहशतवादी ठरवू लागलो. इथेच धर्मातील मानवतेचा घात झाला. वास्तविक धर्म नव्हे तर माणूस दहशतवादी व अधम आहे.

खरं म्हणजे कोणत्याही प्रकारचा दहशतवाद फोफावणार नाही याची काळजी व खबरदारी घेण्याची जबाबदारी सरकारची असते, ती त्यांनी चोखपणे पार पाडली पाहिजे. अन्यथा मोठ्या कष्टाने उभा केलेला लोकशाहीचा डोलारा आणि भारतीय संविधानाने निर्माण केलेला एकसंघ भारत कोसळून पुन्हा एकदा आमचे स्वातंत्र्य धोक्यात येईल आणि त्यासाठी स्वतः आम्ही भारतीय लोक जबाबदार असू दुसरा कोणी नाही.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या २५ नोव्हेंबर, १९४९ रोजी संविधान सभेत केलेल्या समारोपीय भाषणात याबाबतचा स्पष्ट इशारा दिला होता. त्यांनी असे म्हटले होते की, “जर येथून पुढे चुका झाल्या तर त्याबद्दल आपल्याशिवाय दुसऱ्या कोणालाही दोष देता येणार नाही.” म्हणून देशात घडणाऱ्या सर्व घटनांसाठी आम्ही, आमचे सरकार, आमची न्यायव्यवस्था, आमचे प्रशासन, आमची संरक्षण व गुप्तचर यंत्रणा आणि वृत्तपत्रे व मीडिया हेच जबाबदार असतात हे आपण लक्षात घेतले पाहिजे आणि बंधुभाव जोपासला पाहिजे… ते आज होत नाही, पण या स्थिती बदल घडवण्याचे काम आपण भारतीयांनी आव्हान म्हणून स्वीकारले पाहिजे. ही आव्हाने पेलण्याची गरज पहलगाम हल्ल्याने अधोरेखित केलेली आहे!

लेखक सेवानिवृत्त प्रोफेसर आणि संविधान प्रचारक, तसेच ‘डाटा’ या अध्यापक संघटनेचे अकोला विभागीय सचिव आहेत. drmukundingle@rediffmail.com



Source link