Saturday, July 18, 2026
Home Blog Page 341

Bigg Boss 16 fame Ankit Gupta Buys New Range Rover Worth 2.4 Crore

0
Bigg Boss 16 fame Ankit Gupta Buys New Range Rover Worth 2.4 Crore



Bigg Boss 16 fame Ankit Gupta Buys New Range Rover Worth 2.4 Crore | ब्रेकअपच्या चर्चेदरम्यान ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्याने घेतली रेंज रोव्हर, जाणून घ्या किंमत





Source link

Ajit Pawar group Mangal Kalash Yatra will arrive in Nashik district on Tuesday

0
Ajit Pawar group Mangal Kalash Yatra will arrive in Nashik district on Tuesday



Ajit Pawar group Mangal Kalash Yatra will arrive in Nashik district on Tuesday | अजित पवार गटाच्या मंगल कलश यात्रेचे मंगळवारी नाशिक जिल्ह्यात आगमन





Source link

Viral Video : Elderly Women Selling Avocado In Mumbai Local

0
Viral Video : Elderly Women Selling Avocado In Mumbai Local



Viral Video : Elderly Women Selling Avocado In Mumbai Local | वेळेबरोबर बदलण्याची खरी गरज हा व्हिडीओ सांगेल; ट्रेनमध्ये करवंद, बोरं विकणारी आजी आता टोपलीतून काय विकते ते पाहून डोळ्यांत पाणी येईल





Source link

ऐन उन्हाळ्यात तरुणाईचा हिरमोड; जम्मू काश्मीर सरकारचा मोठा निर्णय

0
ऐन उन्हाळ्यात तरुणाईचा हिरमोड; जम्मू काश्मीर सरकारचा मोठा निर्णय


Jammu and Kashmir Treks : उन्हाळ्याच्या ऋतूला देशभरात सुरुवात होताच अतीव उत्तरेकडे असणाऱ्या बहुतांश पर्वतीय भागांवर असणारी बर्फाची चादर नाहीशी होते आणि डोंगररांगा एका नव्या आणि भारावणाऱ्या रुपात पर्तारोहिंच्या, ट्रेकिंगची आवड असणाऱ्यांच्या स्वागतासाठी सज्ज होतात. जम्मू काश्मीरमध्येही असे अनेक ट्रेक आहेत, जिथं दरवर्षी या मोसमामध्ये बरीच मंडळी ट्रेकिंगसाठी जातात. 

यंदाच्या वर्षीसुद्धा अनेकांनीच जम्मू काश्मीरच्या दिशेनं जात नवे ट्रेक अनुभवण्याची तयारी केली होती. मात्र पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यानं साऱ्यांचाच अपेक्षाभंग केला. साऱ्या देशाला हादरवणाऱ्या या हल्ल्यानंतर केंद्र शासनासह जम्मू काश्मीर सरकारनंही काही महत्त्वाचे निर्णय घेत इथं निर्बंध लागू केले. त्यापैकीच एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे, जम्मू काश्मीरमधील सर्व ट्रेकिंगच्या ठिकाणांवर प्रवेशबंदी लागू करण्याचा.  

जम्मू काश्मीरमध्ये बऱ्याच ट्रेकच्या वाटा घनदाट जंगलातून आणि पर्वतांतून पुढे जातात. मागील तीन वर्षांमध्ये प्रामुख्यानं या भागात स्थानिक आणि इतर राज्यांतून येणाऱ्यांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढला होता. आता मात्र ही परवणी पाहण्यापासून ट्रेकर मुकणार आहेत. ‘आम्ही जम्मू काश्मीरमधील सर्व ट्रेक बंद केले आहेत’, असं जम्मू काश्मीरच्या वन विभागातील अधिकाऱ्यांनी गोपनीयतेच्या अटीवर सांगितलं. ट्रेक पुन्हा सुरू करण्यासंदर्भातील निर्णय सदरील भागातील परिस्थितीचा आढावा घेऊन घेण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. 

दरम्यान, जम्मू काश्मीरमधील सर्व जिल्ह्यांमधील पोलिसांना ट्रेकिंगच्या वाटांची यादी देण्यास सांगण्यात आलं असून, सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. 

जम्मू काश्मीरमध्ये कुठेकुठे आहेत ट्रेकिंगच्या वाटा? 

श्रीनगर दक्षिण, उत्तर, पूर्व आणि पश्चिमेसह चिनाब क्षेत्रात प्रत्येकी 10 हून अधिक ट्रेकिंगच्या वाटा आहेत. यामध्ये उत्तरेकडील क्षेत्रात बारामुल्ला आणि कुपवाडा क्षेत्रांचा समावेश आहे. तर, काही वाटा या कठुआ, राजौरी, पूंछ, उधमपूर, किश्तवार इथूनही पुढे जातात. 

जम्मू काश्मीरमधील महत्त्वाचे ट्रेक 

काश्मीर ग्रेट लेक्स (Kashmir Great Lakes Trek)
तारसर मारसर (Tarsar Marsar Trek)
तुलियन लेक (Tulian Lake Trek)
नाफरान व्हॅली (Nafran Valley Trek)
वारवान व्हॅली (Warwan Valley Trek)
पिरपंजाल ट्रेक रेंज (Pir Panjal Lakes Trek)





Source link

5421 child marriages stopped in six years 401 cases registered appeals continue on akshaya tritiya

0
5421 child marriages stopped in six years 401 cases registered appeals continue on akshaya tritiya



5421 child marriages stopped in six years 401 cases registered appeals continue on akshaya tritiya | बालविवाह कुप्रथेचे संकट कायम, अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर…





Source link

हास्यतरंग : मला पाठवलं…

0
हास्यतरंग : मला पाठवलं…



बायको : मला पाठवलं का नाही? 

पाठवलं असतं, तर बरं झालं असतं.

नवरा : काय म्हणालीस? हेच हिंदीत बोल बरं!

बायको : मुझे भेजा नही| भेजा होता तो अच्छा होता|

नवरा : भेजा नही|



Source link

काश्मीरमध्ये थांबलेले पर्यटक नाशिकमध्ये परतण्यास सुरुवात

0
काश्मीरमध्ये थांबलेले पर्यटक नाशिकमध्ये परतण्यास सुरुवात



लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये थांबून राहिलेले पर्यटक नाशिकमध्ये परतण्यास सुरुवात झाली आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर अनेकांनी काश्मीरमध्ये फिरण्याऐवजी हॉटेलमध्ये सुरक्षित थांबण्यास प्राधान्य दिले होते. काहींनी गुलमर्ग व सोनमर्गसह इतरत्र भेट दिली. बहुतेक जण पूर्वनोंदणी केलेल्या विमान तिकीटावर माघारी आले. परतलेल्या काहींनी पुन्हा पर्यटनासाठी काश्मीरमध्ये जाण्याचा मनोदय व्यक्त केला. तर, काहींनी मात्र जाणार नसल्याचे म्हटले आहे.

उन्हाळी सुट्टीत प्रवासी कंपन्या वा वैयक्तिक नियोजन करून अनेक पर्यटक जम्मू-काश्मीरमध्ये फिरण्यासाठी गेले होते. पहलगावमधील दहशतवादी हल्यामुळे सर्वांना आपली सहल थांबवून सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा लागला. जिल्ह्यातील प्रवासी कंपन्यामार्फत गेलेले ५० आणि वैयक्तिक नियोजन करून जाणारे २६ असे एकूण ७६ पर्यटक काश्मीरमध्ये सुरक्षितस्थळी थांबले होते. काहींची परतीच्या विमानांची तिकीटे नंतरची होती. त्यांच्या नातेवाईकांनी संबंधितांना लवकर आणण्याचा आग्रह धरला. अशा पर्यटकांची यादी प्रशासनाने सरकारकडे पाठविली होती. परंतु, दोन-तीन दिवसांत त्यांची परतीच्या प्रवासाची नोंदणी असल्याने त्यानुसार हे प्रवासी परतले.

यामध्ये संगणक अभियंता सिद्धी मुसळे आणि सोहम मुसळे या भावंडांचा समावेश आहे. बलविंदर सिंग चौधरी यांच्यासह सात जण रविवारी मुंबईत दाखल झाले. तर हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमधील तीन अधिकारी हे कुटुंबातील आठ सदस्यांसह सायंकाळी विमानाने मुंबईकडे निघाले.

दहशतवादी हल्ल्यामुळे काहींना सहल अर्ध्यावर सोडून द्यावी लागली. दहशतवादी हल्ला झाला, त्या दिवशी बलविंदर सिंह चौधरी हे कुटुंबियातील सात जणांसह दुपारी पहलगामला पोहोचले होते. हल्ल्याच्या घटनेनंतर त्यांनी दोन दिवस पहलगाममधील हॉटेलमध्ये वास्तव्य केले. कुटुंबियांतील सदस्यांमध्ये तीन मुली होत्या. हल्ल्याच्या घटनेमुळे त्या घाबरल्या होत्या. श्रीनगरहून पहलगामला जाताना मार्गावर फारसे सुरक्षारक्षक दिसले नव्हते. परंतु, परतीच्यावेळी मार्गात सर्वत्र सुरक्षारक्षक होते. परतीच्या प्रवासात आम्ही गुलमर्ग आणि सोनमर्गला भेट दिली. पहलगामला कडेकोट सुरक्षा व्यवस्था असल्यास त्या ठिकाणी कुटुंबियांसह पुन्हा जाण्यास निश्चितपणे आवडेल, असे बलविंदर सिंग चौधरी यांनी सांगितले. अनेकांना जम्मू-काश्मीरचे निसर्ग सौंदर्य पूर्णत: अनुभवता आले नाही. त्यामुळे परतणाऱ्या काहींची पुन्हा काश्मीरमध्ये भ्रमंतीसाठी जाण्याची इच्छा आहे. काही पर्यटक मात्र पुन्हा काश्मीर सहलीवर जाण्यास इच्छुक नसल्याचे त्यांच्या प्रतिक्रियांमधून उघड झाले.



Source link

“डोक्यावर १ कोटी २० लाखांचं भलंमोठं कर्ज…”, केदार शिंदेंनी सांगितला ‘तो’ प्रसंग; लेक सनाला दिलाय ‘हा’ सल्ला, म्हणाले…

0
“डोक्यावर १ कोटी २० लाखांचं भलंमोठं कर्ज…”, केदार शिंदेंनी सांगितला ‘तो’ प्रसंग; लेक सनाला दिलाय ‘हा’ सल्ला, म्हणाले…



kedar shinde recalls difficult times of 2005 after that gives this advice to daughter sana “डोक्यावर १ कोटी २० लाखांचं भलंमोठं कर्ज…”, केदार शिंदेंनी सांगितला ‘तो’ प्रसंग; लेक सनाला दिलाय ‘हा’ सल्ला, म्हणाले…





Source link

Malaika Arora asks Farah Khan dilip to eat with them at dinning table netizens impressed and appreciate actress

0
Malaika Arora asks Farah Khan dilip to eat with them at dinning table netizens impressed and appreciate actress



Malaika Arora asks Farah Khan dilip to eat with them at dinning table netizens impressed and appreciate actress | मलायका अरोराने फराह खानचा कूक दिलीपबरोबर केलं असं काही की होतंय कौतुक; नेटकरी म्हणाले, “ही खूप चांगली व्यक्ती आहे, तिनं…”





Source link

The rise of sleep divorce in India

0
The rise of sleep divorce in India


Rise of sleep divorce निरोगी आरोग्यासाठी झोप सर्वांत महत्त्वाची आहे. शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी सात ते आठ तासांची झोप महत्त्वाची असते. प्रत्येक व्यक्तीच्या झोपण्याची पद्धत वेगवेगळी असते. काहींना घोरण्याची सवय असते, तर काहींना शांततेतच झोप येते. अनेकांना आवाजामुळे झोप येत नसल्याने त्यांची झोप पूर्ण होत नाही. जोडीदारांमध्येही झोपण्याच्या सवयी एकमेकांच्या विरोधात असू शकतात. त्यामुळे सध्या जोडप्यांमध्ये स्लीप डिव्होर्स म्हणजेच झोपेच्या घटस्फोटाचा ट्रेंड वाढत आहे. परंतु, ही स्थिती पती-पत्नी यांना वेगळे करत नसून, त्यांच्यात आणखी जवळीक निर्माण करते. काय आहे स्लीप डिव्होर्स? जोडप्यांमध्ये हा ट्रेंड वाढण्याचे कारण काय? याचा नात्यांवर काय परिणाम होतो? त्याविषयी जाणून घेऊ.

नवीन अभ्यास काय सांगतो?

आता झोपेचे महत्त्व लोकांना कळू लागले आहे. अपुऱ्या झोपेचा आरोग्यावर होणारा दुष्परिणाम याबद्दल लोकांमधील जागरूकता वाढताना दिसत आहे. नवीन अभ्यासात असे दिसून आले आहे की, ७० टक्क्यांपेक्षा अधिक भारतीय जोडपी झोपेचा घटस्फोट घेत आहेत. झोप पूर्ण होण्यासाठी आणि झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी लोक हा पर्याय निवडताना दिसत आहेत. ‘ResMed’च्या २०२५ च्या ग्लोबल स्लीप सर्वेक्षणानुसार, स्लीप डिव्होर्स घेणाऱ्यांमध्ये भारत आघाडीवर आहे.

आतापर्यंत भारतात ७८ टक्के जोडप्यांनी स्लीप डिव्होर्स घेतला आहे. (प्रातिनिधिक छायाचित्र-लोकसत्ता संग्रहीत)
हेही वाचा

आतापर्यंत भारतात ७८ टक्के जोडप्यांनी स्लीप डिव्होर्स घेतला आहे. भारतानंतर चीन (६७ टक्के) व दक्षिण कोरिया (६५ टक्के) यांचा क्रमांक लागतो. या अभ्यासात १३ देशांतील ३०,००० हून अधिक लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले. या अभ्यासातून अशी बाब समोर आली की, जागतिक झोपेचे संकट वाढत चालले आहे. ब्रिटन आणि अमेरिकेतील ५० टक्के जोडपीही या पद्धतीचा अवलंब करताना दिसत आहेत.

स्लीप डिव्होर्सचा अर्थ काय?

स्लीप डिव्होर्स म्हणजे आपल्या जोडीदारापासून वेगळे झोपणे. या ट्रेंडमध्ये लोक एकाच घरात राहतात; परंतु वेगवेगळ्या पलंगावर किंवा वेगवेगळ्या खोलीत झोपतात. लग्न झालेली जोडपी एकत्र झोपल्याने संबंध अधिक मजबूत होतात, असा लोकांचा विश्वास आहे. मात्र, स्लीप डिव्होर्स याच्या अगदी विरुद्ध आहे. स्लीप डिव्होर्समुळे नात्यात अंतर येत नाही; तर त्यांच्या झोपेची गुणवत्ता सुधारते आणि परिणामी त्यांचे संबंधही अधिक मजबूत होत जातात.

जोडप्याने वेगवेगळे झोपणे कदाचित अनेकांना विचित्र किंवा चुकीचे वाटू शकते. परंतु, अनेक जण झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी, नातेसंबंध सुधारण्यासाठी याचा अवलंब करीत आहेत. झोपेत व्यत्यय येण्याची प्रमुख कारणे म्हणजे जोडीदाराचे घोरणे, जोरात श्वास घेणे, अस्वस्थता, दोघांच्याही झोपेचे वेळापत्रक न जुळणे किंवा अंथरुणावर असताना मोबाईलचा वापर करणे.

हेही वाचा

ज्या जोडप्यांनी वेगळ्या झोपण्याच्या व्यवस्थेचा पर्याय निवडला आहे, त्यांनी आपल्या झोपेची गुणवत्ता सुधारली असल्याचे मत नोंदवले आहे. तज्ज्ञ असा सल्ला देतात की, एकमेकांबरोबर झोपण्याचे अनेक फायदे आहेत. जोडीदाराबरोबर झोपल्याने शरीरातऑक्सिटोसिन म्हणजेच ‘प्रेम संप्रेरके’ तयार होतात आणि त्यामुळे नैराश्य, चिंता व तणाव कमी होऊ शकतो. ‘स्लीप’मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे आढळून आले की, एकत्र झोपल्याने अनेक भावनिक फायदे होतात.

भारतीयांमध्ये स्लीप डिव्होर्सचे वाढते प्रमाण

आजच्या धकाधकीच्या जीवनात काम, कुटुंब व सामाजिक अपेक्षांमध्ये संतुलन राखत असताना लोक स्वतःकडे दुर्लक्ष करतात, ज्याचा परिणाम त्यांच्या झोपेवरदेखील होतो. ताणतणाव, चिंता, आर्थिक ताण, मानसिक आरोग्याच्या समस्या व नातेसंबंधातील समस्या ही झोपेच्या कमतरतेची प्रमुख कारणे असल्याचे एका अभ्यासात आढळून आले आहे. मुख्य म्हणजे ६९ टक्के भारतीयांमध्ये तणाव हा एक महत्त्वाचा घटक असल्याची नोंद त्यात करण्यात आली आहे. त्यानंतर यात दक्षिण कोरिया (६७ टक्के), थायलंड (६५ टक्के), सिंगापूर (६५ टक्के) व जर्मनी (६१ टक्के) यांचा क्रमांक लागतो.

कमी झोप होत असल्याचे लक्षात आल्यानंतरही लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. परंतु, याचा एकूणच परिणाम शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होतो. त्यामुळे चिडचिड वाढते, एकाग्रता कमी होते, संबंधांमध्ये तणाव निर्माण होतो आणि कामाच्या ठिकाणी उत्पादकता कमी होते. ‘यूएस इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिन कमिटी ऑन स्लीप मेडिसिन अँड रिसर्च’ने म्हटले आहे की, रात्री सहा तासांपेक्षा कमी झोप घेतल्याने उत्पादकतेत लक्षणीय घट होते. आपल्या संज्ञांनात्मक विकासासाठी झोप महत्त्वाची भूमिका बजावते.

भारतात पुरुषांपेक्षा महिलांमध्ये झोपेचे प्रमाण कमी

भारतातील महिलांमध्ये पुरुषांपेक्षा झोपेची गुणवत्ता कमी असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे. हार्मोनल बदल हा घटक यात महत्त्वाची भूमिका बाजवतो. कामाच्या ठिकाणी झोपेच्या कमतरतेचा परिणाम महिलांमध्येही अधिक दिसून येतो. झोपेअभावी १२% पुरुषांनी, तर १७ टक्के भारतीय महिलांनी आजारी पडल्यास रजा घेतल्याचे समोर आले आहे. स्लीप डिव्होर्सच्या वाढत्या ट्रेंडमुळे झोपेच्या आरोग्याला प्राधान्य देण्याचे महत्त्व अधोरेखित होते. अनेक जोडप्यांसाठी वेगळे झोपणे हा एक उपाय असू शकतो. परंतु झोपेमध्ये अडथळा येण्याची कारणे, जसे की ताण, जीवनशैली व वैद्यकीय परिस्थिती यांवर लक्ष देणेदेखील महत्वाचे आहे. त्याबरोबरच झोपेच्या फायद्यांबद्दल जागरूकता वाढवणेही महत्त्वाचे आहे.

हेही वाचा

कमी झोपेचा आरोग्य आणि कामाच्या ठिकाणी होणारा परिणाम

झोपेचा अभाव गंभीर आरोग्य धोक्यांशी जोडलेला आहे, ज्यामध्ये मानसिक त्रास, धोकादायक ड्रायव्हिंग व दीर्घकालीन आजार यांचा समावेश आहे. ‘रेसमेड’चे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. कार्लोस नुनेज इशारा देतात की, दीर्घकाळ झोपेचा अभाव संज्ञानात्मक घट, मूड विकार, चिंता व नैराश्याचा धोका वाढवतो. स्लीप अॅप्नियावर उपचार न घेतलेल्या व्यक्तींना हृदयविकार, मधुमेह व स्ट्रोक होण्याचा आणखी जास्त प्रमाणात धोका असतो.





Source link