Saturday, July 18, 2026
Home Blog Page 340

फलटण पोलीस अधिकारी; राहुल धस यांना पोलीस महासंचालक पदक जाहीर

0
फलटण पोलीस अधिकारी; राहुल धस यांना पोलीस महासंचालक पदक जाहीर

फलटण : फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) राहुल रावसाहेब धस यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील उत्कृष्ट सेवेसाठी त्यांना पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या हस्ते “पोलीस महासंचालक पदक” जाहीर करण्यात आले आहे. सोमवारी (२८ एप्रिल) अधिकृत यादी प्रसिद्ध झाली.

याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस महासंचालक कार्यालय, मुंबई यांच्या वतीने राज्यातील ८०० पोलिसांना हे गौरवपदक जाहीर करण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यातून फलटण उपविभागाचे राहुल रावसाहेब धस यांच्यासह बाळासाहेब यशवंत भालचीम, संभाजी कल्याणराव काटकर, सुजीत पांडुरंग भोसले, अजित नामदेव कर्णे, रुपाली संतोष वाघ, अंकुश रामराव यादव, आणि शशिकांत गंगाराम काळे यांचाही समावेश आहे.

विशेष म्हणजे, याआधी २०२४ मध्ये राहुल धस यांना केंद्र सरकारकडून “केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक” बहाल करण्यात आले होते. भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिले जाणारे हे पदक, पोलिस दलातील उत्कृष्ट तपास कार्याबद्दल दिले जाते.

पोलीस महासंचालक पदक जाहीर होताच जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर तसेच फलटण उपविभागातील सर्व अधिकारी व पोलिसांनी राहुल धस यांचे विशेष अभिनंदन केले.

कधी पाहिलाय का असा गवळी! बँकेतील नोकरी सोडून आधी लाखोची बाइक आणि आता ऑडीतून पोहोचवतो दूध

0
कधी पाहिलाय का असा गवळी! बँकेतील नोकरी सोडून आधी लाखोची बाइक आणि आता ऑडीतून पोहोचवतो दूध


तुम्ही अनेक दूधवाले पाहिले असतील, पण लोकांच्या घरी दूध पोहोचवण्यासाठी १ कोटी रुपयांच्या अलिशान कारचा वापर करणारा दूधवाला क्वचितच पाहिला असेल. आम्ही बोलत आहोत हरियाणातील फरिदाबाद येथील अमित भडाना या दूधविक्रेत्याबद्दल. आपली आवड पूर्ण करण्यासाठी अमितने बँकेची चांगली नोकरी सोडली आणि लोकांपर्यंत दूध पोहोचवायला सुरुवात केली.



Source link

मुंबईतील ED कार्यालयात आग; फायली तर जळाल्या आता पुढील सुनावण्या व तपास कसा होणार? अधिकाऱ्यांनी सांगितलं..

0
मुंबईतील ED कार्यालयात आग; फायली तर जळाल्या आता पुढील सुनावण्या व तपास कसा होणार? अधिकाऱ्यांनी सांगितलं..


सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) मुंबईतील कार्यालयाला लागलेल्या भीषण आगीत काही कागदपत्रे आणि फर्निचर जळून खाक झाले असले तरी फायली डिजिटल सुरक्षित असल्याने तपासात किंवा सुनावणीत कोणताही अडथळा येण्याची शक्यता नाही. बॅलार्ड इस्टेट येथील कैसर-ए-हिंद इमारतीत असलेल्या मुंबई विभागीय कार्यालय-१ च्या चौथ्या मजल्यावर रविवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारास लागलेल्या आगीबाबत एजन्सीने निवेदन जारी केले. चौथ्या मजल्यावरील विजेच्या डब्यात शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. प्रत्यक्ष नुकसानीचा अंदाज घेतला जात असल्याचे एजन्सीने सांगितले. आगीच्या घटनेत काही कागदपत्रे/कागदपत्रे व फर्निचर आदी जळून खाक झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे.



Source link

‘काहीतरी करा, OTT अश्लीलता…’, सुप्रीम कोर्टाने कडक शब्दांत सुनावलं, सॉलिसिटर तुषार मेहता म्हणाले ‘काही नियम…’

0
‘काहीतरी करा, OTT अश्लीलता…’, सुप्रीम कोर्टाने कडक शब्दांत सुनावलं, सॉलिसिटर तुषार मेहता म्हणाले ‘काही नियम…’



ओटीटी प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडियावरील अश्लीलतेच्या मुद्द्यावर काही नियम लागू आहेत आणि काही विचाराधीन आहेत अशी माहिती सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी दिली आहे. 
 



Source link

व्यंगचित्रांच्या अद्भुत दुनियेची अनोखी सफर

0
व्यंगचित्रांच्या अद्भुत दुनियेची अनोखी सफर


लोकसत्ता वार्ताहर

नांदेड : वर्तमानपत्रे आणि नियतकालिकांमुळे व्यंगचित्रं ही सर्वसामान्यांच्या तशी परिचयाचीच झाली आहेत. चित्र आणि शब्दांचा वापर करीत व्यंगचित्रं ही आजूबाजूच्या घटना-घडामोडींवर भाष्य करतात. ती पाहून आपण हसतो आणि पुढे जातो. पण त्यांच्यातील बारकावे आणि सौंदर्यस्थळे ही आपल्या नजरेतून सुटतात. असे होण्याचे मुख्य कारण म्हणजे व्यंगचित्रांकडे पाहाण्याची आपली दृष्टी आपल्याकडे नसते. नेमकी हीच दृष्टी विकसित करण्याचा प्रयत्न प्रसिद्ध चित्रकार प्रा. गणेश बोबडे (नागपूर) आणि व्यंगचित्रांचे संग्राहक-अभ्यासक आणि ज्येष्ठ लेखक मधुकर धर्मापुरीकर यांनी एका अनोख्या दृकश्राव्य कार्यक्रमाद्वारे केला.

नरहर कुरुंदकर प्रगत अध्ययन व संशोधन केंद्राच्या वतीने ‘व्यंगचित्रकलेतील विनोद आणि चित्रकला’या विषयावर या दोन्ही मान्यवरांनी निवडक व्यंगचित्रांच्या आधारे भाष्य केले. नॉर्मन थेलवेल, अँद्रे फ्रान्स्वा, ब्रूस वॉकर या परदेशी आणि आर.के. लक्ष्मण, सुधीर दर, आणि वसंत सरवटे या भारतातील नामवंत व्यंगचित्रकारांच्यासह इतर नामांकित मंडळींच्या प्रत्येकी एक व्यंगचित्राच्या सहाय्याने त्यांनी आपले विवेचन सादर केले. या दोघांनी व्यंगचित्रांकडे कसे पहायचे एवढेच सांगितले नाही, तर व्यंगचित्रांमध्ये काय पहायचे हे देखील उपस्थितांच्या निदर्शनास आणून दिले. त्यांच्या या प्रयत्नाला धर्मापुरीकर यांनी व्यंगचित्र साक्षरता असे समर्पक नाव दिले.

प्रा. बोबडे यांनी शास्त्रोक्त संगीतात जशी घराणी असतात तशी व्यंगचित्रकलेत रेषांची देखील घराणी असतात ही बाब नमूद केली. कोणी रेषांचा मुबलक वापर करतो तर कोणी सूचक वापर करतो. कोणी रंगाच्या आधारे व्यंगचित्र फुलवतो तर कोणी परिणामकारकता साधण्यासाठी रंगाचा वापर टाळतो. काहींच्या व्यंगचित्रांमध्ये तपशीलांची रेलचेल असते तर काही ते टाळतात. असे अनेक बारकावे त्यांनी या वेळी उलगडून दाखविले. विविध व्यंगचित्रांमध्ये माणसे आणि प्राणी यांचे हावभाव कसे अचूक टिपले आहेत हे त्यांनी दाखवून दिले. यासाठी चित्रकाराला शरीरशास्त्राची उत्तम जाण हवी ही बाब प्रा. बोबडे यांनी अधोरेखित केली.

या वेळी बोलताना धर्मापुरीकर यांनी व्यंगचित्रांकडे समाज केवळ करमणुकीचे साधन पाहातो अशी खंत व्यक्त केली. त्यांनी हसविलेच पाहिजे असा आग्रह धरणे हा व्यंगचित्रकलेवर आणि व्यंगचित्रकारावर अन्याय करणे होय असे त्यांनी ठामपणे सांगितले. उलट ती पाहिल्यावर आपण विचारात पडलो पाहिजे असे ते म्हणाले. चांगले व्यंगचित्र कोणते हे कसे ठरवायचे याबद्दल देखील श्री. धर्मापुरीकर यांनी चर्चा केली. शारीरिक व्यंगांची थट्टा करणाऱ्या व्यंगचित्राला चांगले म्हणता येत नाही आणि जे परिणामकारता साधते तेच उत्तम व्यंगचित्र होय असे त्यांनी सांगितले. उत्तम व्यंगचित्रकार हा मूलतः एक चांगला कथाकार असतो कारण त्याला त्याच्या कलाकृतीतून काहीतरी सांगायचे असते ही बाब देखील त्यांनी यावेळी नोंदविली.

सादरीकरणात दाखविलेल्या प्रत्येक व्यंगचित्रांमधून सकृतदर्शी जे दिसते त्यापेक्षा वेगळा आणि खोल असा अर्थ दोन्ही मान्यवरांनी उलगडून दाखविला. आपण आणि प्रा. बोबडे हे कधीकाळी व्यंगचित्र काढत असू पण देशातील आणि परदेशातील उत्तम व्यंगचित्र पाहिल्यानंतर आपला हा प्रांत नाही हे दोघांच्याही लक्षात आले आणि दोघांनीही तो नाद सोडला अशी मिश्किल टिप्पण्णी धर्मापुरीकर यांनी यावेळी केली. त्याच बरोबर परदेशात व्यंगचित्रकारांना चांगला मोबदला मिळतो पण आपल्याकडे परिस्थिती विपरीत आहे असे त्यांनी सांगितले. इतकेच नाही तर परदेशातील व्यंगचित्रकलेच्या तुलनेत आपण किमान शंभर वर्ष मागे आहोत याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. डॉ. श्रीनिवास पांडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तसेच प्रा. बोबडे आणि धर्मापुरीकर यांचा परिचय करुन दिला. दीपनाथ पत्की यांनी स्वागत केले तर डॉ. अभय दातार यांनी आभार मानले.



Source link

शेकडो शिक्षकांवर अटकेची टांगती तलवार, जबाब नोंदवण्यासाठी सायबर पोलिसांची नोटीस

0
शेकडो शिक्षकांवर अटकेची टांगती तलवार, जबाब नोंदवण्यासाठी सायबर पोलिसांची नोटीस



शेकडो शिक्षकांवर अटकेची टांगती तलवार, जबाब नोंदवण्यासाठी सायबर पोलिसांची नोटीस nagpur cyber police issued a notice to teachers for registered staments in recruitment scam issue





Source link

In Katol, BJP was defeated in the purchase and sale society election, and Mahavikas Aghadi came to power

0
In Katol, BJP was defeated in the purchase and sale society election, and Mahavikas Aghadi came to power



In Katol, BJP was defeated in the purchase and sale society election, and Mahavikas Aghadi came to power | काटोलमध्ये खरेदी विक्री संस्थेत भाजप पराभूत, महाविकास आघाडीची सत्ता





Source link

बोपदेव घाट बलात्कार प्रकरणातील फरार सूरज गोसावी अखेर अकलूज येथून गजाआड!

0
बोपदेव घाट बलात्कार प्रकरणातील फरार सूरज गोसावी अखेर अकलूज येथून गजाआड!

पुणे : संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या बोपदेव घाटातील महाविद्यालयीन तरुणीवरील सामूहिक बलात्कार प्रकरणात फरार असलेला सूरज उर्फ बापू गोसावी (रा. भवानीनगर, ता. इंदापूर, जि. पुणे) अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. शनिवारी दुपारी अकलूज येथील एसटी स्थानक परिसरातून त्याला ताब्यात घेण्यात आले असून, काल रात्री उशीरा त्याचा ताबा पुणे पोलिसांकडे सोपवण्यात आला आहे.

३ ऑक्टोबर २०२४ रोजी बोपदेव घाटातील टेबल पॉईंट परिसरात फिरायला गेलेल्या तरुणीसह तिच्या मित्रावर कोयत्याचा धाक दाखवत हल्ला करून तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. या अमानुष घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. या प्रकरणात रवींद्रकुमार कनोजिया आणि अख्तर अली शेख या दोघांना तत्काळ अटक करण्यात पोलिसांना यश आले होते, मात्र सूरज गोसावी हा घटनेनंतर फरार झाला होता.

गोसावी याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी ६० विशेष पथके तयार केली होती आणि सुमारे ४५० सराईत गुन्हेगारांची चौकशी केली होती. विविध ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजचीही बारकाईने तपासणी करण्यात आली होती. सूरज गोसावी हा सतत ठिकाणं आणि नाव बदलत असल्याने पोलिसांना त्याचा माग काढण्यात मोठ्या अडचणी येत होत्या.

दरम्यान, वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजकुमार डुणगे यांना गोपनीय माहिती मिळाली की, सूरज गोसावी अकलूज येथे येणार आहे. त्यांनी तत्काळ सापळा रचून त्याला ताब्यात घेतले आणि पुढील कारवाईसाठी पुणे पोलिसांच्या हवाली केले.

या कारवाईमुळे पोलिस दलाने एक मोठा दिलासा घेतला आहे तर या प्रकरणात न्याय मिळवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे.

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत निर्घृण हत्या; मृतदेह १५० फूट खोल दरीत फेकला!

0
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत निर्घृण हत्या; मृतदेह १५० फूट खोल दरीत फेकला!

इंदापूर (जि. पुणे) : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने तिची निर्घृण हत्या करून मृतदेह तब्बल ३०० किलोमीटर दूर नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील परधाडी घाटातील १५० फूट खोल दरीत फेकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

प्रियंका शिवाजी चितळकर (विवाहोत्तर प्रियंका ज्योतीराम करे, रा. कळाशी, ता. इंदापूर) हिचा २०१३ साली ज्योतीराम आबा करे याच्याशी विवाह झाला होता. त्यांना दोन अपत्यं आहेत. काही महिन्यांपासून पती ज्योतीराम याला पत्नीच्या वागणुकीवर संशय होता. सततचे वाद व कुरबुरी यामुळे दुरावा वाढला होता.

२९ जानेवारी २०२५ रोजी ज्योतीरामने पत्नी हरवल्याची तक्रार इंदापूर पोलिसात दाखल केली होती. मात्र तपासादरम्यान पोलिसांना संशय वाटू लागला. तीन महिन्यांच्या कसून तपासानंतर ज्योतीराम यानेच पत्नीचा खून केल्याची कबुली दिली.

त्याने सांगितले की, २७ जानेवारी २०२५ रोजी रात्री दहा वाजता कळाशी येथील घरी, वादाच्या पार्श्वभूमीवर पत्नीचा गळा दाबून खून केला. नंतर २८ जानेवारीला पहाटे मित्र दत्तात्रय शिवाजी गोलांडे (रा. गोलांडेवस्ती, इंदापूर) याच्या मदतीने मृतदेह चारचाकी गाडीतून नांदगाव तालुक्यातील ढेकूगाव-परधाडी घाटात फेकला.

पोलिसांनी ज्योतीरामकडून मिळालेल्या कबुलीवरून सदर ठिकाणी शोधमोहीम राबवून मृतदेहाचा सापळा हाती लावला आहे. या प्रकरणी पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय लेंडवे तपास करीत आहेत.

Maharashtrachi Hasyajatra New Episode Update : New Entry in Maharashtrachi Hasyajatra : Sachin Goswami as Mamanji in Maharashtrachi Hasyajatra latest episode : सचिन गोस्वामी मामंजी म्हणून महाराष्ट्राची हास्यजत्रेत येणार : महाराष्ट्राची हास्यजत्रा अपडेट

0
Maharashtrachi Hasyajatra New Episode Update : New Entry in Maharashtrachi Hasyajatra : Sachin Goswami as Mamanji in Maharashtrachi Hasyajatra latest episode : सचिन गोस्वामी मामंजी म्हणून महाराष्ट्राची हास्यजत्रेत येणार : महाराष्ट्राची हास्यजत्रा अपडेट



Maharashtrachi Hasyajatra New Episode Update : New Entry in Maharashtrachi Hasyajatra : Sachin Goswami as Mamanji in Maharashtrachi Hasyajatra latest episode : सचिन गोस्वामी मामंजी म्हणून महाराष्ट्राची हास्यजत्रेत येणार : महाराष्ट्राची हास्यजत्रा अपडेट





Source link