Saturday, July 18, 2026
Home Blog Page 343

…म्हणून मुंबईहून थेट काश्मीरला आलो; पहलगाममध्ये पोहोचताच अतुल कुलकर्णीने सांगितलं खरं कारण

0
…म्हणून मुंबईहून थेट काश्मीरला आलो; पहलगाममध्ये पोहोचताच अतुल कुलकर्णीने सांगितलं खरं कारण


Pahalgam Tourism Atul Kulkarni: काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 पर्यटकांचा मृत्यू झाला असून आता पर्यटक काश्मीरमध्ये परतणार की नाही याबद्दल शंका उपस्थित केली जात आहे. असं असतानाच मराठमोळा अभिनेता अतुल कुलकर्णी थेट पहलगाममध्ये पोहोचला आहे. 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याने आपल्याला फार वाईट वाटल्याचं अतुल कुलकर्णीने म्हटलं आहे. तसेच 90 टक्के पर्यटकांनी बुकिंग रद्द केल्याचं पाहून आपण फार दुखी झालो आहोत, असंही अतुल कुलर्णीने म्हटलं आहे. याच कारणामुळे आपण काश्मीरला भेट देत असल्याचं अतुल कुलर्णीने म्हटलं आहे. मुंबईमध्ये बसून केवळ चर्चा करण्यापेक्षा प्रत्यक्ष या ठिकाणी येऊन संदेश देणं मला महत्त्वाचं वाटलं, असंही अतुल कुलकर्णी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला.

…म्हणून मुंबईहून काश्मीरला आलो

“22 एप्रिल रोजी घडलेली ही घटना फारच धक्कादायक होती. हे घडायला नको होतं. संपूर्ण देश यामुळे दुखी झाला आहे. मी याबद्दल वाचलं तेव्हा मला असा प्रश्न पडला की अशावेळी आपण काय करतो? आपण सोशल मीडियावर पोस्ट करतो, लोकांबरोबर बोलतो आणि काहीतरी लिहीतो. मात्र मी प्रत्यक्षात कृती म्हणून काय करु शकतो असा विचार केला,” असं अतुलने एएनआयशी बोलताना सांगितलं.

“त्यावेळी माझ्या वाचनामध्ये असं आलं की 90 टक्के पर्यटकांनी येथील बुकींग रद्द केल्या आहेत. त्यांना (दहशतवाद्यांना) नेमका काय संदेश द्यायचा आहे याचा मी विचार करु लागलो. ते खरं तर असं म्हणत आहेत की काश्मीरमध्ये येऊ नका. मात्र याला आपण कसं उत्तर दिलं पाहिजे की, आम्ही येणार. काश्मीर आमचं आहे. मला हा संदेश मुंबईत बसून देता आला नसता. म्हणूनच मी स्वत: इथे येणं महत्त्वाचं होतं,” असं अतुल कुलकर्णी म्हणाला.

रिकाम्या सीट्स

अतुल कुलकर्णीने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन मुंबईवरुन श्रीनगरच्या प्रवासादरम्यानच्या काही पोस्ट केल्या होत्या. त्याने विमानातील बहुतांश सीट रिकाम्या असल्याचा आणि स्वत:च्या बोर्डींग पासचा फोटो पोस्ट केलेला.

पुन्हा एकदा ही विमानं भरली पाहिजेत

अतुलने विमानातील कर्मचाऱ्यांना त्याला दिलेल्या छोट्या चिठ्ठीचाही फोटो शेअर केला. “मुंबई ते श्रीनगर. विमानातील कर्मचारी सांगत आहेत की विमानं पूर्ण क्षमतेनं जात होती. आता आपल्याला पुन्हा एकदा ही विमानं भरुन जातील असं पाहिलं पाहिजे. चला, काश्मीरला जाऊ,” असं कॅप्शनमध्ये लिहिलं होतं. 

रिकाम्या पर्यटनस्थळांचे फोटोही पोस्ट केले

अतुलने पेहलगाममधील पर्यटनस्थळांचे फोटोही पोस्ट केला आहे. या फोटोंमध्ये पर्यटनस्थळं रिकामी असल्याचं त्याने दाखवलं आहे.

 

गर्दीच नाही

या ठिकाणांवर सामान्यपणे प्रचंड गर्दी असते. आता या ठिकाणी फारच मोजके लोक दिसत असल्याचं अतुलला अधोरेखित करायचं आहे.

कवितेसहीत पोस्ट

अतुलने इतरही अनेक फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट केले आहेत. एका फोटोत स्थानिक काश्मिरी लोकांनी, “आम्ही या हल्ल्याचा निषेध करतो” असा मजकूर लिहिलेला दिसतोय तर इतर लोक भारतीय झेंडे पकडून उभे आहेत. अतुलने कवितेसहीत स्वत:चे दोन फोटो पोस्ट केले आहेत.

अनेकांनी अतुलने घेतलेल्या या भूमिकेचं कौतुक केल्याचं दिसत आहे. त्याच्या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींनीही प्रतिक्रिया नोंदवली आहे.





Source link

Today Horoscope in Marathi, 28 April 2025

0
Today Horoscope in Marathi, 28 April 2025



Today Horoscope in Marathi, 28 April 2025 | आयुष्मान योग जुळून येताच ‘या’ राशींचे बदलणार भाग्य; कोणाच्या हाती येणार नवे काम तर कोणाला होणार प्रचंड धनलाभ





Source link

low response to tender for horse carousel in cooperage garden mumbai print news zws 70

0
low response to tender for horse carousel in cooperage garden mumbai print news zws 70



low response to tender for horse carousel in cooperage garden mumbai print news zws 70 | कुपरेज उद्यानातील हॉर्स करोसोलच्या निविदेला अल्प प्रतिसाद; महापालिकेने निधी उभारण्याची मकरंद नार्वेकर यांची मागणी





Source link

ncert books included mahakumbh government schemes removed mughals history zws 70

0
ncert books included mahakumbh government schemes removed mughals history zws 70



ncert books included mahakumbh government schemes removed mughals history zws 70 | ‘एनसीईआरटी’च्या पुस्तकांतून मुघल हद्दपार; महाकुंभ, सरकारी योजना समाविष्ट





Source link

भारतातील ५०९ पाकिस्तानी नागरिक माघारी

0
भारतातील ५०९ पाकिस्तानी नागरिक माघारी



नवी दिल्ली : भारतात आलेले ५०९ पाकिस्तानी नागरिक शुक्रवारपासून तीन दिवसांमध्ये अटारी-वाघा सीमेवरून पाकिस्तानात परतले आहेत अशी माहिती अधिकाऱ्यांनी रविवारी दिली. केंद्र सरकारने पाकिस्तानी नागरिकांसाठी १२ प्रवर्गातील अल्पमुदतीच्या व्हिसाधारकांना देश सोडून जाण्यासाठी दिलेली मुदत रविवारी संपली.

याबरोबरच पाकिस्तानात गेलेले ७४५ भारतीय नागरिक पंजाबमधील आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून मायदेशी परतले आहेत. त्यामध्ये १४ राजनैतिक अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. हल्ल्यानंतर सरकारने पाकिस्तानी नागरिकांना देश सोडून जायला सांगितले होते. त्यानुसार, सार्क व्हिसा असलेल्यांना २६ एप्रिलपर्यंत भारत सोडून जाण्यास सांगण्यात आले, वैद्याकीय व्हिसावरील नागरिकांना २९ एप्रिलपर्यंत परत जायचे आहे तर १२ प्रवर्गातील व्हिसाधारकांसाठी रविवारची मुदत होती. त्यात आगमनानंतर व्हिसा, व्यवसाय, चित्रपट, पत्रकार, ट्रान्झिट, परिषद, गिर्यारोहण, विद्यार्थी, अभ्यागत, गट पर्यटक, यात्रेकरू आणि गट यात्रेकरू यांचा समावेश आहे.

दीर्घ मुदतीचा व्हिसा, राजनैतिक किंवा अधिकाऱ्यांसाठी व्हिसा असणाऱ्यांना देश सोडून जाण्याच्या आदेशातून वगळण्यात आले आहे. दरम्यान, अल्पमुदतीच्या व्हिसावरील सर्वाधिक १,००० पाकिस्तानी नागरिक महाराष्ट्रात आहेत. तसेच जवळपास ५,०५० पाकिस्तानी नागरिक दीर्घमुदतीच्या व्हिसावर राज्यात राहत आहेत.



Source link

हल्ल्याच्या तपासाला वेग; पहलगामप्रकरणी ‘एनआयए’कडून गुन्हा दाखल

0
हल्ल्याच्या तपासाला वेग; पहलगामप्रकरणी ‘एनआयए’कडून गुन्हा दाखल



नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) औपचारिकपणे हाती घेतला आहे. या हल्ल्यासंबंधी पुरावे शोधण्यासाठी तपास मोहीम तीव्र करण्यात आली असून प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवले जात आहेत असे अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले. केंद्रीय गृह विभागाच्या आदेशानंतर ‘एनआयए’ने जम्मूमध्ये गुन्हा दाखल केला आहे आणि तपासासाठी अनेक पथके तयार करण्यात आली आहेत अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

हल्ल्यानंतर ‘एनआयए’ची पथके बुधवारपासून घटनास्थळी असून काही धागेदोरे सापडतात का याचा शोध घेत आहेत. ‘एनआयए’च्या पथकांचे नेतृत्व महानिरीक्षक, उपमहानिरीक्षक आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडून केले जात आहे. दहशतवाद्यांच्या कार्यपद्धतीची माहिती मिळवण्यासाठी तपास करणारी ‘एनआयए’ पथके प्रवेश आणि निर्गमन ठिकाणांची बारकाईने तपासणी करत आहेत. न्यायवैद्याक आणि अन्य तज्ज्ञांच्या मदतीने हा तपास सुरू आहे.

तपासात रशिया, चीनच्या सहभागाचा प्रस्ताव

मॉस्को : पहलगाम हल्ल्याच्या तटस्थ देशांकडून तपासात रशिया आणि चीनने सहभागी व्हावे अशी पाकिस्तानची इच्छा असल्याचे वृत्त रशियातील माध्यमांनी दिले आहे. रशियाच्या सरकारी ‘आरआयए नोव्हेस्ती’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा अहमद म्हणाले की, ‘‘रशिया किंवा चीन किंवा अगदी पाश्चात्त्य देशही या संकटात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. तसेच ते या हल्ल्याच्या तपासासाठी पथकही नेमू शकतात. भारताकडून खोटे सांगितले जात आहे का याचा तपास आंतरराष्ट्रीय पथकांना करू द्या.’’



Source link

mumbai railway police launches special campaign to increase cyber literacy zws 70

0
mumbai railway police launches special campaign to increase cyber literacy zws 70


मुंबई : सायबर साक्षरता वाढवण्यासाठी मुंबई रेल्वे पोलिसांकडून विशेष मोहीम राबवण्यात येत असून त्या अंतर्गत एक लाखाहून अधिक व्यक्तींना सायबर साक्षर करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत सायबर फसवणुकीचा प्रकार, त्यांची फसवणुकीची पद्धत, त्यापासून कसे वाचता येईल, फसवणूक झाल्यास काय करावे, या माहितीचे संकलन करून एक अभ्यासक्रम तयार करण्यात आला होता. ही परीक्षा देणाऱ्या मुंबई व परिसरातील ४० महाविद्यालयातील पाच हजार विद्यार्थ्यांचा सायबर व कायदा साक्षरता संघ स्थापन करण्यात आला होता. त्यांच्या माध्यमातून एक लाख व्यक्तींना सायबर साक्षर करण्यात आले आहेत.

माहिती तंत्रज्ञानाच्या वाढत्या विस्तारासोबत सायबर फसवणुकीच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. सायबर फसवणूक व कायद्यातीन बदलांबाबत जनजागृती करण्यासाठी रेल्वे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्या संकल्पनेतून सायबर व कायदा साक्षरता मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्या अंतर्गत सायबर व कायदा साक्षरता संघ स्थापन करण्यात आला. त्यात मुंबई व परिसरातील ४० महाविद्यालयांमधील पाच हजार विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षेचे धडे घेतले. त्यासाठी पुस्तिका तयार करण्यात आल्या आहेत.

विविध विषयांची माहिती

सायबर साक्षरतेमध्ये विविध सायबर गुन्ह्यांची माहिती देण्यात येते. त्यात लिंकद्वारे सायबर फसवणूक, केवायसी, सेक्सटॉर्शन, समाज माध्यमांवरील फसवणूक अशा विविध फसवणुकीची माहिती देण्यात आली आहे. पुस्तिकेच्या दुसऱ्या भागात त्याबाबतच्या उपायांची माहिती देण्यात आली आहे. त्यात सायबर फसवणूक कशी टाळता येईल, मोबाइल अॅप्लिकेशन सुरक्षा, फसणुकीचे बळी ठरल्यास काय करता येईल, अशी माहिती आहे.





Source link

पेंग्विनच्या जोड्यांना आणखी तीन पिल्ले; एकूण संख्या २१ वर

0
पेंग्विनच्या जोड्यांना आणखी तीन पिल्ले; एकूण संख्या २१ वर



मुंबई : भायखळा येथील राणीच्या बागेतील अर्थात वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणीसंग्रहालयातील पेंग्विनच्या जोड्यांना आणखी तीन पिले झाली आहेत. यामध्ये दोन नर आणि एक मादी आहे. राणीच्या बागेतील पेंग्विनची संख्या २१ झाली आहे.

राणीच्या बागेतील हंबोल्ट पेंग्विनच्या जोड्यांनी आणखी तीन पिलांना जन्म दिला आहे. त्यांचे नामकरणही करण्यात आले आहे. त्यात ऑलिव्ह आणि पोपॉय या जोडीने ४ मार्चला एका नर पिल्लाला जन्म दिला असून त्याचे नाव ‘नॉडी’ ठेवण्यात आले आहे. तर डोनाल्ड आणि डेझी या जोडीने दिलेल्या अंड्यातून ७ मार्चला एक पिलू जन्मले असून त्याचे नाव ‘टॉम’ ठेवण्यात आले आहे. तर ११ मार्चला एक मादी पिल्लू जन्मले असून तिचे नाव ‘पिंगु’ ठेवण्यात आले आहे.

ही तिन्ही पिले आता प्रदर्शन कक्षात आणण्यात आली आहेत. त्यामुळे राणीच्या बागेतील पेंग्विनची एकूण संख्या २१ झाली आहे. गेल्या चार वर्षात राणीच्या बागेत ११ नवीन पेंग्विन जन्माला आले आहेत. मुंबईच्या राणीबागेत २०१७ मध्ये दक्षिण आफ्रिकेतून ८ हंबोल्ट पेंग्विन आणण्यात आले. त्यामधील एका पेंग्विनचा त्याच वेळी मृत्यू झाला. त्यानंतर सात पेंग्विन होते. सध्या असलेल्या पेंग्विनपैकी ११ माद्या आणि १० नर आहेत. 



Source link

अग्रलेख : जाहल्या काही चुका…

0
अग्रलेख : जाहल्या काही चुका…



‘पाश्चात्त्यांसाठी कृष्णकृत्ये केल्याची शिक्षा’ मिळत असल्याचे म्हणण्याची वेळ पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांवर का आली, हा विचार भारतीयांनीही करावा…

पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा असीफ यांनी ‘स्काय न्यूज’ या वाहिनीस दिलेली मुलाखत काश्मिरात सध्या जे सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची ठरते. ‘‘इतिहासात पाश्चात्त्यांसाठी पाकिस्तानने अनेक कृष्णकृत्ये (डर्टी वर्क) केली; त्याची शिक्षा आम्ही आता भोगत आहोत’’, असे हे असीफ म्हणतात. त्याचा संदर्भ आहे तो अमेरिका, इंग्लंड यांच्यासाठी पाकिस्तानने दहशतवादी प्रशिक्षण केंद्रे चालवली वगैरे उद्योगांशी. त्यांचे हे विधान ही कबुली नाही की ते पापक्षालनार्थ केलेले पश्चात्तापदग्ध विधानही नाही. मुलाखतीच्या ओघात पाश्चात्त्य देशांच्या पदरात त्यांच्या पापाचे माप घालण्यासाठी असीफ असे म्हणाले. ‘‘पाकिस्तानला आता तुम्ही बोल लावत असलात तरी एकेकाळी पाकिस्तानने तुमच्यासाठी बरेच काही केले…’’, याची आठवण करून देत पाकिस्तानचे हे संरक्षणमंत्री, पाकिस्तानने जे केले ते केले नसते तर तुमची (पाश्चात्त्यांची) काय पंचाईत झाली असती याची जाणीव करून देतात. म्हणून त्यांच्या या विधानात एक प्रकारचा ‘सुनावण्याचा’ सूर दिसतो. त्यावर भाष्य करण्याआधी पाकिस्तानने इतिहासात पाश्चात्त्यांसाठी नक्की काय केले याची उजळणी करून भारत वेगळा का ठरतो हे समजून घेणे आवश्यक. कारण धोरणकर्त्यांची धारणा केवळ द्वेष या एकच एक भावनेभोवती फिरत राहिली की काय होते याचा पाकिस्तान हा नमुना.

आपल्यासमवेत १९४७ साली अस्तित्वात आल्यापासून पाकिस्तान हा अमेरिकेच्या अंकित राहिला. भारताच्या सोव्हिएत सौजन्यास पर्याय म्हणून अमेरिकेने सुरुवातीपासून पाकिस्तानला गोंजारले आणि राष्ट्र म्हणून स्वतंत्र सत्त्वनिर्मितीस महत्त्व न देता पाकिस्तान या अमेरिकी कुरवाळणीत धन्यता मानत राहिला. नंतर अफगाणिस्तानात १९७९ सालच्या डिसेंबरात सोव्हिएत रशियाचे सैन्य घुसल्यानंतर तर पाकिस्तान हा अमेरिकी लष्कराचा अघोषित तळ बनला. सोव्हिएत रशियाचा पराभव अथवा त्या देशास जमेल तितका अपशकुन करण्यासाठी अमेरिकेने जंग जंग पछाडले आणि पाकिस्तान त्या देशाच्या तालावर नाचत राहिला. पाकिस्तानचे झिया उल हक यांच्यासारखे लष्करी अध्यक्ष हे तर त्या वेळी अमेरिकी गुप्तहेर यंत्रणांचे पगारी नोकर असल्यासारखे वागले. अफगाणिस्तानात तैनात सोव्हिएत सैनिक मोठ्या प्रमाणावर अफूच्या व्यसनात गुरफटावेत यासाठी अमेरिकेने त्या काळात कुटिल योजना आखली आणि पाकिस्तानने ती आनंदाने राबवली. त्याचमुळे जनरल झिया यांच्या स्वीस बँकेतील लॉकरमधून डॉलर्स शब्दश: ओसंडून वाहात होते. या बेजबाबदार धोरणाचा फटका अखेर अमेरिका आणि पाकिस्तानलाच बसला कारण त्या देशांतही अफू व्यसनग्रस्तांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली. तरीही पाकिस्तानी नेतृत्वास अक्कल म्हणून काही आली नाही. पुढे पश्चिम आशियाच्या वाळवंटातील अस्थिरतेतही पाकिस्तानने कोणताही साधकबाधक विचार न करता सातत्याने अमेरिकेची तळी उचलली आणि त्याचवेळी धर्माच्या मुद्द्यावर तो देश ओसामा बिन लादेनसारख्यांचा आश्रयदाता बनला. या बदल्यात पाकिस्तानला काहीच मिळत नव्हते असे नाही. पण जे मिळत होते ते पाकिस्तानी नेतृत्व आणि लष्करशहांच्या खिशात जात होते. जगातील अन्य बऱ्याच लष्करांप्रमाणे पाकिस्तानी लष्करी यंत्रणा ही कमालीची भ्रष्ट असून अन्य अनेक लष्करांप्रमाणे तीही ‘राष्ट्रप्रेम’, ‘देशासाठी त्याग’ इत्यादी शब्दावरणांखाली आपले पाप लपवत आली आहे. त्यामुळे ख्वाजा असीफ म्हणतात त्याप्रमाणे इतिहासातील कृष्णकृत्यांचा काहीही फायदा देश म्हणून पाकिस्तानला झाला नाही. उलट त्यातून त्या देशाचे नुकसानच झाले. त्याचीच शिक्षा तो देश सध्या भोगत आहे. असीफ यांच्या विधानातून आपण लक्षात घ्यावे असे प्रमुख मुद्दे दोन.

पहिला म्हणजे आपल्या तत्कालीन राज्यकर्त्यांचा द्रष्टेपणा. आपल्या आजच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील सुदृढतेचे श्रेय निर्विवादपणे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांचे. पं. नेहरू यांच्या कथित सोव्हिएत प्रेमास आज अनेक खुरटे बोल लावताना दिसतात. या अर्धवटरावांस हे माहीत नसते की अमेरिकेच्या तत्कालीन नेतृत्वाच्या आडमुठेपणामुळे आपणास सोव्हिएत रशियाची मदत घेणे भाग पडले. मुंबईच्या समुद्रात ‘बॉम्बे हाय’साठी अगदी साधा तेलविहीर उभारणीस सहाय्य करण्याचा मुद्दा असो वा त्याआधी देशात पोलाद खाणी आणि कारखान्यांचा प्रश्न असो. आपणास अमेरिकेने त्यासाठी तंत्रज्ञान नाकारले. आज लक्षावधी भारतीयांसाठी अमेरिकी ग्रीनकार्ड हा मुक्तीचा मार्ग असला तरी आणि त्या देशात सुखोपभोग घेत असताना भारतमातेच्या प्रेमाने या अमेरिकावासी भारतीयांचा कंठ दाटून येत असला तरी अमेरिकेने भारतास अनेकदा कस्पटासमान वागवले, हे सत्य. परिणामी पं. नेहरू आणि त्या पश्चात लालबहादूर शास्त्री आणि इंदिरा गांधी यांनी ‘लौंदासी आणून भिडवावा दुसरा लौंद’ या समर्थ रामदासी उक्तीप्रमाणे अमेरिकी लौंदाविरोधात रशियन लौंदास जवळ केले. पण तरीही आपल्या देशाच्या परराष्ट्र धोरणातील तटस्थतेस तिलांजली देऊन आपले पूर्वसुरी ना अमेरिकेच्या कह्यात गेले ना सोव्हिएत रशियाच्या. पं. नेहरू यांनी घालून दिलेल्या मार्गानेच आपले विद्यामान सत्ताधीश मार्गक्रमण करताना दिसतात हे सत्य लक्षात घेतल्यास पहिल्या पंतप्रधानांच्या मोठेपणाची खात्री पटावी. आर्थिक पातळीवर सरकारी मालकीच्या कंपन्यांची पाठराखण ते आंतरराष्ट्रीय पातळीवरील तटस्थता यातील सर्व मुद्द्यांवर कोणी कितीही काहीही आदळआपट केली तरी पं. नेहरू यांच्या धोरणांपासून आपणास आजही फारकत घेता आलेली नाही, हे सत्य लपून राहणे अवघड. त्यामुळे पाकिस्तानच्या विद्यामान सत्ताधीशांवर जशी पूर्वसुरींच्या चुकांसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर कबुली देण्याची वेळ आली तशी आपल्या राज्यकर्त्यांवर आली नाही. यासाठी तरी विद्यामान सत्ताधीश पं. नेहरू आदींचे ऋण निश्चित मानतील. ते न मानण्याचा कोतेपणा दाखवण्याइतके ते कृतघ्न नाहीत. हा एक मुद्दा.

आणि त्याच वेळी आपल्या पूर्व नेतृत्वाने पाकिस्तानी राज्यकर्त्यांप्रमाणे धर्मवाद्यांस कधी डोक्यावर बसू दिले नाही ही बाबदेखील तितकीच कौतुकाची. आज पाकिस्तानची अशी दशा होण्यामागील प्रमुख कारण तो देश धर्मसत्ता की राजसत्ता यांतील प्राधान्यक्रम कधीच निश्चित करू शकला नाही; हे आहे. सोव्हिएत रशियाविरोधात अमेरिकेने पाकिस्तानला आपल्या बाजूने ओढण्यात धर्माचा चतुर वापर केला, हा इतिहास. ‘धर्म न मानणाऱ्या साम्यवाद्यांना’ रोखण्यासाठी आम्हास साथ द्या ही अमेरिकेने सौदी अरेबिया ते पाकिस्तान अशा अनेक इस्लामी देशांस घातलेली साद. धर्मसत्तेच्या प्रभावाखाली असलेल्या पाकिस्तानादी देशांचे नेतृत्व अमेरिकेने फेकलेल्या या धर्मजाळ्यात फसले. त्याची परिणती कशात झाली ते आज या देशांकडे पाहिल्यावर कळावे. त्यातील अनेक देशांच्या बरोबर स्वतंत्र झालेला भारत या सगळ्या वाताहतीपासून वाचला याचे एकमेव कारण आपल्या पूर्वसुरींनी धर्मवाद्यांस कधीही डोक्यावर बसू दिले नाही; हे आहे. पाकिस्तानात दहशतवादी प्रशिक्षण केंद्रे सुरू करण्यामागे त्या देशाच्या राज्यकर्त्यांचा धर्मविचार होता आणि १९९८च्या अणुचाचण्यांनंतर अमेरिकेने भारत-पाकिस्तान दोघांवरही निर्बंध लादलेले असताना सौदी अरेबियासह अनेक देशांनी पाकिस्तानला रसदपुरवठा सुरू ठेवला त्यामागेही धर्मच होता. असे काहीही आपल्याबाबत झाले नाही. कारण धर्मसत्तेस राजसत्तेपासून चार हात दूर ठेवण्याचा शहाणपणा आपल्या आधीच्या राज्यकर्त्यांनी दाखवला. हे भान सुटल्याने पाकिस्तानचे विद्यामान संरक्षणमंत्री ख्वाजा असीफ यांच्यावर इतिहासातील चुका मान्य करण्याची वेळ आली. तथापि ‘जाहल्या काही चुका…’ अशी केवळ कबुली दिल्याने भागणारे नाही. त्याचबरोबर धर्मवाद्यांनी दिलेले ‘तू दिलेले गीत माझे आवडीने गाईले…’ असे न म्हणता ते गीत त्याजण्याची तयारीही हवी. भारताने ती हिंमत दाखवली म्हणून आपला ‘पाकिस्तान’ झाला नाही; ही बाब नजरेआड न करण्याचा विवेक आपले राज्यकर्ते दाखवतील ही आशा.



Source link

IPL Points Table : आमचा नेता लय पावरफुल! विराटची आरसीबी नंबर १ स्थानी; मुंबई इंडियन्स कितव्या स्थानी?

0
IPL Points Table : आमचा नेता लय पावरफुल! विराटची आरसीबी नंबर १ स्थानी; मुंबई इंडियन्स कितव्या स्थानी?



Royal challengers bengaluru secures number 1 spot after defeating delhi capitals know IPL 2025 Latest Points Table update| आमचा नेता लय पावरफुल! विराटची आरसीबी नंबर १ स्थानी; मुंबई इंडियन्स कितव्या स्थानी?





Source link