Saturday, July 18, 2026
Home Blog Page 344

अग्रलेख : जाहल्या काही चुका…

0
अग्रलेख : जाहल्या काही चुका…



‘पाश्चात्त्यांसाठी कृष्णकृत्ये केल्याची शिक्षा’ मिळत असल्याचे म्हणण्याची वेळ पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांवर का आली, हा विचार भारतीयांनीही करावा…

पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा असीफ यांनी ‘स्काय न्यूज’ या वाहिनीस दिलेली मुलाखत काश्मिरात सध्या जे सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची ठरते. ‘‘इतिहासात पाश्चात्त्यांसाठी पाकिस्तानने अनेक कृष्णकृत्ये (डर्टी वर्क) केली; त्याची शिक्षा आम्ही आता भोगत आहोत’’, असे हे असीफ म्हणतात. त्याचा संदर्भ आहे तो अमेरिका, इंग्लंड यांच्यासाठी पाकिस्तानने दहशतवादी प्रशिक्षण केंद्रे चालवली वगैरे उद्योगांशी. त्यांचे हे विधान ही कबुली नाही की ते पापक्षालनार्थ केलेले पश्चात्तापदग्ध विधानही नाही. मुलाखतीच्या ओघात पाश्चात्त्य देशांच्या पदरात त्यांच्या पापाचे माप घालण्यासाठी असीफ असे म्हणाले. ‘‘पाकिस्तानला आता तुम्ही बोल लावत असलात तरी एकेकाळी पाकिस्तानने तुमच्यासाठी बरेच काही केले…’’, याची आठवण करून देत पाकिस्तानचे हे संरक्षणमंत्री, पाकिस्तानने जे केले ते केले नसते तर तुमची (पाश्चात्त्यांची) काय पंचाईत झाली असती याची जाणीव करून देतात. म्हणून त्यांच्या या विधानात एक प्रकारचा ‘सुनावण्याचा’ सूर दिसतो. त्यावर भाष्य करण्याआधी पाकिस्तानने इतिहासात पाश्चात्त्यांसाठी नक्की काय केले याची उजळणी करून भारत वेगळा का ठरतो हे समजून घेणे आवश्यक. कारण धोरणकर्त्यांची धारणा केवळ द्वेष या एकच एक भावनेभोवती फिरत राहिली की काय होते याचा पाकिस्तान हा नमुना.

आपल्यासमवेत १९४७ साली अस्तित्वात आल्यापासून पाकिस्तान हा अमेरिकेच्या अंकित राहिला. भारताच्या सोव्हिएत सौजन्यास पर्याय म्हणून अमेरिकेने सुरुवातीपासून पाकिस्तानला गोंजारले आणि राष्ट्र म्हणून स्वतंत्र सत्त्वनिर्मितीस महत्त्व न देता पाकिस्तान या अमेरिकी कुरवाळणीत धन्यता मानत राहिला. नंतर अफगाणिस्तानात १९७९ सालच्या डिसेंबरात सोव्हिएत रशियाचे सैन्य घुसल्यानंतर तर पाकिस्तान हा अमेरिकी लष्कराचा अघोषित तळ बनला. सोव्हिएत रशियाचा पराभव अथवा त्या देशास जमेल तितका अपशकुन करण्यासाठी अमेरिकेने जंग जंग पछाडले आणि पाकिस्तान त्या देशाच्या तालावर नाचत राहिला. पाकिस्तानचे झिया उल हक यांच्यासारखे लष्करी अध्यक्ष हे तर त्या वेळी अमेरिकी गुप्तहेर यंत्रणांचे पगारी नोकर असल्यासारखे वागले. अफगाणिस्तानात तैनात सोव्हिएत सैनिक मोठ्या प्रमाणावर अफूच्या व्यसनात गुरफटावेत यासाठी अमेरिकेने त्या काळात कुटिल योजना आखली आणि पाकिस्तानने ती आनंदाने राबवली. त्याचमुळे जनरल झिया यांच्या स्वीस बँकेतील लॉकरमधून डॉलर्स शब्दश: ओसंडून वाहात होते. या बेजबाबदार धोरणाचा फटका अखेर अमेरिका आणि पाकिस्तानलाच बसला कारण त्या देशांतही अफू व्यसनग्रस्तांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली. तरीही पाकिस्तानी नेतृत्वास अक्कल म्हणून काही आली नाही. पुढे पश्चिम आशियाच्या वाळवंटातील अस्थिरतेतही पाकिस्तानने कोणताही साधकबाधक विचार न करता सातत्याने अमेरिकेची तळी उचलली आणि त्याचवेळी धर्माच्या मुद्द्यावर तो देश ओसामा बिन लादेनसारख्यांचा आश्रयदाता बनला. या बदल्यात पाकिस्तानला काहीच मिळत नव्हते असे नाही. पण जे मिळत होते ते पाकिस्तानी नेतृत्व आणि लष्करशहांच्या खिशात जात होते. जगातील अन्य बऱ्याच लष्करांप्रमाणे पाकिस्तानी लष्करी यंत्रणा ही कमालीची भ्रष्ट असून अन्य अनेक लष्करांप्रमाणे तीही ‘राष्ट्रप्रेम’, ‘देशासाठी त्याग’ इत्यादी शब्दावरणांखाली आपले पाप लपवत आली आहे. त्यामुळे ख्वाजा असीफ म्हणतात त्याप्रमाणे इतिहासातील कृष्णकृत्यांचा काहीही फायदा देश म्हणून पाकिस्तानला झाला नाही. उलट त्यातून त्या देशाचे नुकसानच झाले. त्याचीच शिक्षा तो देश सध्या भोगत आहे. असीफ यांच्या विधानातून आपण लक्षात घ्यावे असे प्रमुख मुद्दे दोन.

पहिला म्हणजे आपल्या तत्कालीन राज्यकर्त्यांचा द्रष्टेपणा. आपल्या आजच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील सुदृढतेचे श्रेय निर्विवादपणे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांचे. पं. नेहरू यांच्या कथित सोव्हिएत प्रेमास आज अनेक खुरटे बोल लावताना दिसतात. या अर्धवटरावांस हे माहीत नसते की अमेरिकेच्या तत्कालीन नेतृत्वाच्या आडमुठेपणामुळे आपणास सोव्हिएत रशियाची मदत घेणे भाग पडले. मुंबईच्या समुद्रात ‘बॉम्बे हाय’साठी अगदी साधा तेलविहीर उभारणीस सहाय्य करण्याचा मुद्दा असो वा त्याआधी देशात पोलाद खाणी आणि कारखान्यांचा प्रश्न असो. आपणास अमेरिकेने त्यासाठी तंत्रज्ञान नाकारले. आज लक्षावधी भारतीयांसाठी अमेरिकी ग्रीनकार्ड हा मुक्तीचा मार्ग असला तरी आणि त्या देशात सुखोपभोग घेत असताना भारतमातेच्या प्रेमाने या अमेरिकावासी भारतीयांचा कंठ दाटून येत असला तरी अमेरिकेने भारतास अनेकदा कस्पटासमान वागवले, हे सत्य. परिणामी पं. नेहरू आणि त्या पश्चात लालबहादूर शास्त्री आणि इंदिरा गांधी यांनी ‘लौंदासी आणून भिडवावा दुसरा लौंद’ या समर्थ रामदासी उक्तीप्रमाणे अमेरिकी लौंदाविरोधात रशियन लौंदास जवळ केले. पण तरीही आपल्या देशाच्या परराष्ट्र धोरणातील तटस्थतेस तिलांजली देऊन आपले पूर्वसुरी ना अमेरिकेच्या कह्यात गेले ना सोव्हिएत रशियाच्या. पं. नेहरू यांनी घालून दिलेल्या मार्गानेच आपले विद्यामान सत्ताधीश मार्गक्रमण करताना दिसतात हे सत्य लक्षात घेतल्यास पहिल्या पंतप्रधानांच्या मोठेपणाची खात्री पटावी. आर्थिक पातळीवर सरकारी मालकीच्या कंपन्यांची पाठराखण ते आंतरराष्ट्रीय पातळीवरील तटस्थता यातील सर्व मुद्द्यांवर कोणी कितीही काहीही आदळआपट केली तरी पं. नेहरू यांच्या धोरणांपासून आपणास आजही फारकत घेता आलेली नाही, हे सत्य लपून राहणे अवघड. त्यामुळे पाकिस्तानच्या विद्यामान सत्ताधीशांवर जशी पूर्वसुरींच्या चुकांसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर कबुली देण्याची वेळ आली तशी आपल्या राज्यकर्त्यांवर आली नाही. यासाठी तरी विद्यामान सत्ताधीश पं. नेहरू आदींचे ऋण निश्चित मानतील. ते न मानण्याचा कोतेपणा दाखवण्याइतके ते कृतघ्न नाहीत. हा एक मुद्दा.

आणि त्याच वेळी आपल्या पूर्व नेतृत्वाने पाकिस्तानी राज्यकर्त्यांप्रमाणे धर्मवाद्यांस कधी डोक्यावर बसू दिले नाही ही बाबदेखील तितकीच कौतुकाची. आज पाकिस्तानची अशी दशा होण्यामागील प्रमुख कारण तो देश धर्मसत्ता की राजसत्ता यांतील प्राधान्यक्रम कधीच निश्चित करू शकला नाही; हे आहे. सोव्हिएत रशियाविरोधात अमेरिकेने पाकिस्तानला आपल्या बाजूने ओढण्यात धर्माचा चतुर वापर केला, हा इतिहास. ‘धर्म न मानणाऱ्या साम्यवाद्यांना’ रोखण्यासाठी आम्हास साथ द्या ही अमेरिकेने सौदी अरेबिया ते पाकिस्तान अशा अनेक इस्लामी देशांस घातलेली साद. धर्मसत्तेच्या प्रभावाखाली असलेल्या पाकिस्तानादी देशांचे नेतृत्व अमेरिकेने फेकलेल्या या धर्मजाळ्यात फसले. त्याची परिणती कशात झाली ते आज या देशांकडे पाहिल्यावर कळावे. त्यातील अनेक देशांच्या बरोबर स्वतंत्र झालेला भारत या सगळ्या वाताहतीपासून वाचला याचे एकमेव कारण आपल्या पूर्वसुरींनी धर्मवाद्यांस कधीही डोक्यावर बसू दिले नाही; हे आहे. पाकिस्तानात दहशतवादी प्रशिक्षण केंद्रे सुरू करण्यामागे त्या देशाच्या राज्यकर्त्यांचा धर्मविचार होता आणि १९९८च्या अणुचाचण्यांनंतर अमेरिकेने भारत-पाकिस्तान दोघांवरही निर्बंध लादलेले असताना सौदी अरेबियासह अनेक देशांनी पाकिस्तानला रसदपुरवठा सुरू ठेवला त्यामागेही धर्मच होता. असे काहीही आपल्याबाबत झाले नाही. कारण धर्मसत्तेस राजसत्तेपासून चार हात दूर ठेवण्याचा शहाणपणा आपल्या आधीच्या राज्यकर्त्यांनी दाखवला. हे भान सुटल्याने पाकिस्तानचे विद्यामान संरक्षणमंत्री ख्वाजा असीफ यांच्यावर इतिहासातील चुका मान्य करण्याची वेळ आली. तथापि ‘जाहल्या काही चुका…’ अशी केवळ कबुली दिल्याने भागणारे नाही. त्याचबरोबर धर्मवाद्यांनी दिलेले ‘तू दिलेले गीत माझे आवडीने गाईले…’ असे न म्हणता ते गीत त्याजण्याची तयारीही हवी. भारताने ती हिंमत दाखवली म्हणून आपला ‘पाकिस्तान’ झाला नाही; ही बाब नजरेआड न करण्याचा विवेक आपले राज्यकर्ते दाखवतील ही आशा.



Source link

IPL Points Table : आमचा नेता लय पावरफुल! विराटची आरसीबी नंबर १ स्थानी; मुंबई इंडियन्स कितव्या स्थानी?

0
IPL Points Table : आमचा नेता लय पावरफुल! विराटची आरसीबी नंबर १ स्थानी; मुंबई इंडियन्स कितव्या स्थानी?



Royal challengers bengaluru secures number 1 spot after defeating delhi capitals know IPL 2025 Latest Points Table update| आमचा नेता लय पावरफुल! विराटची आरसीबी नंबर १ स्थानी; मुंबई इंडियन्स कितव्या स्थानी?





Source link

eyes on pm narendra modi action after terrorist attack in pahalgam

0
eyes on pm narendra modi action after terrorist attack in pahalgam


मोदी हेच विश्वगुरूअसल्याचे भाजपचे नेते मानतात आणि या काही नेत्यांनी आता फक्त पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे बाकीअशीही वक्तव्ये केलेली असल्याने पहलगाम हल्ल्यानंतर प्रत्युत्तराच्या अपेक्षा वाढतात. अशा वेळी पंतप्रधान या नात्याने स्वत: सर्वपक्षीय बैठकीस मोदी उपस्थित राहिले असते, तर काहीएक फरक पडला असता..

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारताची जगभरातील प्रतिमा उंचावली असल्याचे वारंवार सांगितले जाते. मोदींनी युक्रेन-रशिया यांच्यातील युद्ध काही वेळांसाठी थांबवले असाही दावा केला जातो. भारत नजीकच्या भविष्यात तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनणार असल्याचे सांगितले जाते. भारत विकसनशील नव्हे तर विकसित देश असल्याचेही भाजपचे म्हणणे आहे. भारत बोलतो आणि जग ऐकते असेही भाजपचे नेते म्हणत असतात. भारताला जगाच्या नकाशावर बलवान आणि कणखर देश म्हणून प्रस्थापित करण्याचे श्रेय भाजप मोदींना देतो. मोदींचे जगभर मान-सन्मान होतात. मोदींइतकी लोकप्रियता देशाच्या कुठल्याही पंतप्रधानांना लाभली नाही. मोदींचे सौदी अरेबियासारख्या मुस्लीम देशातही स्वागत होते, त्यांना पुरस्काराने सन्मानित केले जाते. त्यामुळेच तर मोदी ‘विश्वगुरू’ असल्याचे भाजपचे नेते मानतात. शिवाय, मोदींनी पाकिस्तानला दोनदा धडा शिकवला आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात कारगिल युद्धात भारताने प्रत्यक्ष ताबा रेषा ओलांडली नव्हती; पण मोदींच्या काळात पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. त्यामुळे पाकिस्तानकडून कुरापत काढण्याची हिंमत होणार नाही असे मानले जात होते. काश्मीरचा विशेषाधिकार रद्द केला, पण एक थेंबदेखील रक्त सांडले नाही असे अभिमानाने सांगितले गेले. त्याच काश्मीरमध्ये पर्यटकांची खुलेआम हत्या केली जाते, हे मोदींचे कणखर नेतृत्व मान्य करणाऱ्यांना धक्का देणारे आहे.

यामुळेच, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निदान आपल्या समर्थकांसाठी तरी ‘विश्वगुरू’ असल्याचे सिद्ध करावे लागणार आहे. मोदींवर सिद्ध करण्याचा दबाव प्रचंड असेल कारण पाकिस्तानने भारताला बेसावध क्षणी पकडले असा प्रचार केला जाऊ लागला आहे. त्यामुळे मोदींना लवकरात लवकर काही तरी करून दाखवावे लागणार आहे. उरी हल्ल्यानंतर लक्ष्यभेदी मारा करून झाला. पुलवामा हल्ल्यानंतर बालाकोटमध्ये हवाईहल्ला करून झाला. पहलगाम हल्ल्यानंतर आता असे हल्ले करून भागणार नाही असे दिसते. अशा मर्यादित हल्ल्यांतून देशवासींचे मन भरेल असे वाटत नाही. वास्तविक कुठल्याही अडचणीच्या प्रसंगात प्रचाराची दिशा (नॅरेटिव्ह) मोदी-शहा आणि भाजपची यंत्रणा निश्चित करत असते. नॅरेटिव्ह एकदा हातात घेतले की, देशवासींचा मूड हवा तसा ताब्यात घेता येतो आणि त्याचा योग्य रीतीने वापरही करता येतो. म्हणून तर पुलवामा हल्ल्यानंतर बालाकोटमध्ये हवाईहल्ले करून देशवासीयांच्या मनात वेगळा अभिमान निर्माण केला गेला होता. त्या अभिमानाच्या जिवावर तर २०१९ मधील लोकसभा निवडणूक भाजपने जिंकली होती. या वेळी पहलगाम हल्ल्यानंतर भाजपला असे ‘नॅरेटिव्ह’ तयारच करता आलेले नाही. तसा प्रयत्न जरूर झाला हे खरे. परंतु आत्ताच्या घडीला दिल्लीतून केंद्र सरकारची प्रतिमा जपण्याचे होत असलेले कुठलेही प्रयत्न यशस्वी होताना दिसत नाहीत हे मान्य करावे लागते.

दिल्लीतील प्रसारमाध्यमे भाजपच्या हुकमाबाहेर नाहीत, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. त्यांच्याकरवी मोदी-शहा आणि भाजपच्या प्रचारयंत्रणेने मोदींनी सूत्रे हातात घेतली आणि आता पाकिस्तानला कसा चांगला धडा शिकवला जाईल याच्या बातम्या पेरण्याचे काम केले. सौदी अरेबियाचा दौरा मध्येच सोडून आलेल्या मोदींनी पालम विमानतळावरच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि कंपनीची आपत्कालीन चर्चा कशी केली हे सांगण्यासाठी त्या बैठकीची छायाचित्रे प्रसिद्ध केली गेली. सुरक्षाविषयक केंद्रीय समितीची तातडीने बैठक घेऊन पाकिस्तानविरोधातील निर्णयांची माहितीही जाहीर केली गेली. या निर्णयांचे स्वागत झाले, पण त्यातून मोदींच्या ‘विश्वगुरू’पणाला ताकद मिळाली नाही. लोकांची अपेक्षा होती की, मोदींकडून पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याची घोषणा केली जाईल. तसे झाले नाही. उलट, ते विरोधी पक्षांनादेखील सामोरे गेले नाहीत याची चर्चा अधिक झाली. मोदी बिहारमध्ये गेले, तिथल्या भाषणात त्यांनी पाकिस्तानचे नावदेखील घेतले नाही. खरेतर काही दिवसांपूर्वी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, अमित शहा आणि भाजपचे तमाम नेते आता फक्त पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे बाकी आहे, असे म्हणत होते. पहलगामवर हल्ला झाल्यानंतर ही हिंमत दाखवण्याची वेळ होती. मोदींनी पाकिस्तानचे नाव घेण्याचे टाळून जनमत स्वत:च्या बाजूने वळवण्याची संधी गमावली असे म्हणता येईल. हिंदूंना ठार मारले, दहशतवादाला धर्म असतो वगैरे ‘नॅरेटिव्ह’ एकीकडे भाजपच्या यंत्रणेने सुरू केले होते. पण, समाजमाध्यमांवरून लोकांनीच या भाजपवाल्यांना चपराक दिली. काश्मीरमध्ये येऊन बघा, काश्मिरी लोकांनी आमचा धर्म विचारलेला नाही, असे मोदींना मत देणारे भाजपचे सामान्य पाठीराखे म्हणू लागले. जनमत भाजपचे म्हणणे ऐकून घ्यायला तयार नसेल तर भाजपच्या समाजमाध्यम विभागाची हजारोंची फौज मोदींचे प्रतिमावर्धन करण्यात कमी पडणार, तर नवल नव्हे!

हेही वाचा

ऐकावे लागलेच असते…

खरेतर मोदींनी पंतप्रधान या नात्याने सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित राहून विरोधी पक्षांना विश्वासात घ्यायला हवे होते. भारतावर ओढवलेला प्रसंग गंभीर होता, ही बैठक म्हणजे संसदेतील चर्चा नव्हे. राष्ट्रावर संकट आले असताना पंतप्रधान देशातील जबाबदार राजकीय नेत्यांना परिस्थितीचे आकलन करून देत असतील तर देशाचे नेतृत्व कणखर असल्याचे चित्र निर्माण होण्यास मदत झाली असती. मोदींच्या नेतृत्वावर सातत्याने टीका करणाऱ्या राहुल गांधींसारख्या नेत्यांनाही पंतप्रधानांचे ऐकावे लागले असते. या बैठकीमध्ये राजकीय नेत्यांनी केंद्र सरकारवर विश्वास जरूर व्यक्त केला; पण मोदींच्या अनुपस्थितीमुळे भाजपचे हात बांधले गेले. मोदी खरोखर बैठकीला हजर असते तर भाजपची संपूर्ण यंत्रणा कशी कामाला लागली असती याची कल्पना करता येईल. प्रसारमाध्यमांवरील नियंत्रण अशा वेळी फारसे उपयोगी पडत नाही. सर्वपक्षीय बैठकीमध्ये राहुल गांधींसह अनेक विरोधी पक्षनेत्यांनी सुरक्षा यंत्रणेतील त्रुटींवरून केंद्रीय नेत्यांना धारेवर धरले. बैसरनच्या पठारावर एक पोलीसदेखील नसावा ही बाब केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना खजील करणारी होती. अनुच्छेद ३७० रद्द केल्यापासून मोदी-शहांनी जाहीर तसेच संसदेतील भाषणांमध्ये काश्मीरच्या कथित विकासाचा आणि शांततेचा उदोउदो केला नाही असे झाले नाही. ‘काश्मीरचे आम्हीच रक्षणकर्ते’, अशी प्रतिमा निर्माण केल्यानंतर सर्वपक्षीय बैठकीत, ‘आम्ही चुकलो’, अशी कबुली देणे अमित शहांसारख्या स्वाभिमानी भाजप नेत्याला जड गेले असेल. सुरक्षा यंत्रणेतील त्रुटींची सरकारकडून कबुली, ही बातमी मुख्य धारेतील प्रसारमाध्यमांनी एखादा अपवाद वगळता पहिल्या पानावर घेण्याचे धाडस दाखवले नाही. ही बातमी ‘लोकसत्ता’ने पहिल्या पानावर ठळकपणे घेतली होती, हे त्यासंदर्भात इथे प्रामुख्याने नमूद करायला हवे. सर्वपक्षीय बैठकीमध्ये केंद्र सरकारची कोंडी झाली हे वृत्त कितीही लपवण्याचा प्रयत्न झाला तरी समाजमाध्यमांवर व्हायरल झाले.

पाकिस्तानच्या हद्दीत घुसून लक्ष्यभेदी वा हवाई हल्ले करून झालेले आहेत. हा मार्ग आता निष्प्रभ झालेला आहे. असे हल्ले भारत करू शकतो, याची पाकिस्तानला कल्पना असणार. शिवाय, पहलगामनंतर सीमेवर दोन्ही बाजूंनी सैन्य तैनात केले गेले आहे. त्यामुळे मर्यादित हल्ल्यांतून केंद्र सरकारला अपेक्षित बदला घेता येणार नाही आणि लोकांचेही मानसिक समाधान होणार नाही याची मोदींना जाणीव नसेल असे नव्हे. ‘विश्वगुरू’पणावर विश्वास ठेवणारे लष्करी जाणकार आणि त्यांचे ऐकणारा नागरी समूह या सगळ्यांना आता पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याची घाई झालेली आहे. मोदींनी तसे केले तर त्यांचे प्रतिमासंवर्धन निश्चितच होईल; पण अशा योजना प्रत्यक्षात आणण्याचे पर्याय आज तरी फारसे खुले नाहीत. म्हणूनच पहलगाममधील हल्ल्यानंतर भाजपला ‘नॅरेटिव्ह’ हातातून निसटू द्यायचे नव्हते. पण या वेळी भाजपला लोकभावना नियंत्रित करण्यात हवे तसे यश आलेले नाही असे म्हणता येईल.

mahesh.sarlashkar @expressindia.com





Source link

कविता समजून घेण्यातूनच गीतांची निर्मिती, कौशल इनामदार यांची भावना

0
कविता समजून घेण्यातूनच गीतांची निर्मिती, कौशल इनामदार यांची भावना



पुणे : ‘कविता समजून घ्यायची असेल, तर तिचे गाणे केले पाहिजे या भूमिकेतून मी कविता स्वरबद्ध केल्या’, अशी भावना प्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार यांनी रविवारी व्यक्त केली. ‘प्रत्येक पिढीला ज्याचा नव्याने अन्वयार्थ लावावा, असे वाटते ते अभिजात, अशी माझी धारणा आहे. पूर्वसूरींच्या खांद्यावर बसून आम्ही पाहत असल्याने आम्हाला वेगळे दिसते,’ असेही त्यांनी सांगितले.

समाज माध्यमावर एकत्र आलेल्या तरुणांनी स्थापन केलेल्या रावसाहेब चॅरिटेबल ट्रस्टच्या वर्धापनदिन कार्यक्रमात प्रसाद ठोसर यांनी कौशल इनामदार यांची मुलाखत घेतली. त्यावेळी इनामदार बोलत होते.‘बालगंधर्व’ चित्रपटातील ‘चिन्मया सकल हृदया’ या गीतासाठी आनंद भाटे यांना गायनाचे सर्व पुरस्कार मिळाले. पण, संगीतकार म्हणून माझा नामांकनासाठी विचार झाला नाही. हे गीत बालगंधर्व यांचे नाही असे कोणाला वाटले नाही, हाच त्या गाण्याला मिळालेला पुरस्कार आहे,’ असेही इनामदार यांनी सांगितले.

‘हीच अमुची प्रार्थना अन् हेच आमुचे मागणे’, ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ यांसह विविध गीते सादर करून इनामदार यांनी या मुलाखतीमध्ये अनोखे रंग भरले. लष्करातील जवानांसमवेत दिवाळी, रक्षाबंधन आणि संक्रांत साजरी करण्याबरोबरच समर्थ रामदास स्वामी यांच्या जन्मस्थळाच्या ठिकाणी कमानीचे डागडुजीकरण असे प्रकल्प ट्रस्टने वर्षभरात पूर्णत्वास आणले आहेत,’ असे ट्रस्टचे अध्यक्ष मकरंद जोशी यांनी प्रास्ताविकात सांगितले.



Source link

बसमधून महिलांचे दागिने चोरीला पंधरा दिवसांत तीन घटना

0
बसमधून महिलांचे दागिने चोरीला पंधरा दिवसांत तीन घटना



पुणे : शहराच्या वेगवेगळ्या भागांत पीएमपी बसमध्ये प्रवासी महिलांकडील दागिने चोरून नेल्याच्या घटना उघडकीस आल्या. कात्रज ते अरण्येश्वर या मार्गावरून प्रवास करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील ७५ हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. याबाबत एका महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला कात्रज-कोंढवा रस्त्यावर राहायला आहेत. त्या शुक्रवारी (२६ एप्रिल) पीएमपी बसने कात्रज परिसरातून निघाल्या. अरण्येश्वर येथील थांब्यावर त्या उतरल्या. तेव्हा त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरीला गेल्याचे लक्षात आले. महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस फौजदार बापू खुटवड तपास करत आहेत.

निगडी ते पुणे स्टेशन या मार्गावरील बसमधून प्रवास करणाऱ्या एका ३३ वर्षीय महिलेच्या पिशवीतून एक लाख १७ हजार रुपयांचे दागिने चोरून नेण्यात आले. १८ एप्रिल रोजी ही घटना घडली. याबाबत महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला निगडीत राहायला आहेत. त्या कामानिमित्त पुणे स्टेशन परिसरात आल्या होत्या. बस प्रवासात चोरट्याने दागिने चोरल्याचा प्रकार पुणे स्टेशन स्थानकात उघडकीस आला. पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर गर्कळ तपास करत आहेत.

स्वारगेट स्थानक परिसरात ज्येष्ठ महिलेच्या हातातील ५० हजार रुपयांची सोन्याची पाटली चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला ११ एप्रिल रोजी सायंकाळी स्वारगेटहून निगडीकडे निघाल्या होत्या. बसमध्ये गर्दी होती. बसमध्ये प्रवेश करताना चोरट्यांनी कटरचा वापर करून महिलेच्या हातातील सोन्याची बांगडी कापून नेली. पोलीस उपनिरीक्षक कस्पटे तपास करत आहेत.



Source link

RCB becomes the first team in the history of IPL to win six successive away games

0
RCB becomes the first team in the history of IPL to win six successive away games


RCB 6th Successive Win in Away Games of IPL 2025: आयपीएल २०२५ मध्ये आरसीबीचा संघ उत्कृष्ट फॉर्मात आहे. संघाने सुरूवातीपासून एकापेक्षा एक कमाल कामगिरी करत विजय नोंदवले आहेत. दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियमवर झालेल्या आजच्या सामन्यात आरसीबीने महत्त्वपूर्ण विजयाची नोंद केली आहे. या विजयासह आरसीबीने आयपीएल इतिहासातील एक अनोखा विक्रम आपल्या नावे केला आहे.च

आरसीबीने विराट कोहली आणि कृणाल पंड्याच्या ११९ धावांच्या भागीदारीच्या जोरावर दिल्लीवर ६ विकेट्सने विजय मिळवला. दिल्लीच्या फलंदाजीसाठी खडतर खेळपट्टीवर सावध आणि संथ सुरूवात करत आरसीबीने १-१ धाव जोडत हा धावांचा डोंगर सर केला आणि विजय नोंदवला. यामध्ये विराट कोहली आणि कृणाल पंड्याची खेळी महत्त्वपूर्ण ठरली. तर टीम डेव्हिडने ५ चेंडूत १९ धावा करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.

आरसीबीचा संघ यंदाच्या मोसमातील १० पैकी ७ सामने जिंकत सर्वाधिक १४ गुणांसह पहिल्या स्थानी पोहोचला आहे. आरसीबीने यंदाच्या मोसमातील ३ सामने हे त्यांच्या घरच्या मैदानावर चिन्नास्वामी स्टेडिमयवर खेळताना गमावले आहेत. तर प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर खेळताना आरसीबीने सलग ६ सामने गमावले आहेत.

हेही वाचा

आयपीएल इतिहासात प्रतिस्पर्धी संघाच्या घरच्या मैदानावर खेळताना सलग ६ सामने जिंकणारा आरसीबी हा पहिलाच संघ ठरला आहे. सलग सहा सामन्यात प्रतिस्पर्ध्यांना त्यांच्या बालेकिल्ल्यात रोखायची आरसीबीची किमया दाखवली आहे. आजवरच्या इतिहासात कोणत्याच संघाला ही कामगिरी करता आलेली नाही. विराट कोहली आणि त्याच्या संपूर्ण संघाने दिल्लीविरूद्धचा सामना जिंकताच हा दुर्मिळ विक्रम आपल्या नावे केला आहे.

हेही वाचा

आरसीबीने प्रतिस्पर्धी संघाच्या घरच्या मैदानावर जिंकलेल्या सामन्यांचा आढावा

केकेआर वि. आरसीबी – ७ विकेट्स आणि २२ चेंडू राखून विजय
सीएसके वि. आरसीबी – ५० धावांनी विजय
एम आय वि. आरसीबी – १२ धावांनी विजय
आरआर वि. आरसीबी – ९ धावा आणि १५ चेंडू राखून विजय
पीबीकेएस वि. आरसीबी – ७ विकेट्स आणि ८ चेंडू राखून विजय
डीसी वि. आरसीबी – ६ विकेट्स आणि ९ चेंडू राखून विजय





Source link

भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झाले तर कोणता देश कोणाला साथ देईल? दोन देशांची नाव जाणून धक्का बसेल

0
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झाले तर कोणता देश कोणाला साथ देईल? दोन देशांची नाव जाणून धक्का बसेल


Pahalgam Terror Attack: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये  मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. यात 26 भारतीयांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट निर्माण झाली आहे. भारत सरकार कठोर पावले उचलली आहेत. भारत सरकाने सिंधू पाणी करारावर बंदी घालण्याची घोषणा केली. तसेच, आता पाकिस्तानच्या कोणत्याही नागरिकाला भारतात प्रवेश मिळणार नाही. दुसरीकडे, या निर्णयानंतर पाकिस्तानकडूनही अनेक प्रक्षोभक विधाने केली जात आहेत. भारत पाकिस्तान यांच्यातील तणाव खूपच वाढला आहे.  जर भविष्यात भारत आणि पाकिस्तान पुन्हा लढले किंवा युद्ध झाले तर जगातील कोणते देश कोणत्या बाजूने असतील जाणून घेऊया. 

भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाची परिस्थिती निर्माण झाली तर भारताला दोन आघाड्यांवर लढावे लागू शकते. याचे कारण म्हणजे चीन सतत पाकिस्तानकडे मैत्रीचा हात पुढे करत आहे. जर असे झाले तर भारतासाठी काहीशी कठिण स्थिती निर्माण होऊ शकते. मात्र, चीन नेमकी या भूमिका घ्यायची याचा निर्णय शेवटच्या क्षणी घेऊ शकते.  कारण आता भारत एक मोठी शक्ती बनला आहे. 1962 पासून परिस्थिती खूप बदलली आहे. 

इतिहासावर नजर टाकल्यास  चीनला कधीही पाकिस्तानला भारताशी लढणे योग्य वाटले नाही. 1965 आणि 1971 च्या युद्धांमध्ये सर्वांना असे वाटत होते की  चीन दुसऱ्या बाजूने हल्ला करेल, पण तसे झाले नाही. चीनने या दोन्ही युद्धांमध्ये स्वतःला दूर ठेवले तसेच थेट सहभागी घेतला नाही. चीनने आपली भूमिका उघडपणे स्पष्ट केली नसली तरी चीन आणि पाकिस्तानमधील मैत्री अधिकच घट्ट झाली आहे. 

कोणते देश भारताला पाठिंबा देतील?

भारताची गिणती जगातील जगातील शक्तीशाली देशांमध्ये होते.  जगात एक बलवान देश म्हणून भारताने स्वतःचा दबदबा निर्माण केला आहे. भारताचे बहुतेक मोठ्या देशांशी खूप चांगले संबंध आहेत. यामध्ये सर्वात मोठा देश अमेरिका आहे. ज्याला महाशक्ती म्हटले जाते. अमेरिकेशी भारताचे खूप चांगले संबंध आहेत. दोन्ही देश एकमेकांशी विविध प्रकारचे व्यापार करतात. 

गेल्या काही वर्षांत पाकिस्ताननेही अमेरिकेशी संबंध सुधारण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु दहशतवाद आणि इतर गोष्टींमुळे अमेरिका पाकिस्तानला फारसे महत्त्व देत नाही. अमेरिकेचा सर्वात मोठा शत्रू ओसामा बिन लादेन देखील अनेक वर्षे पाकिस्तानात लपून बसला होता. यामुळे अमेरिका पाकिस्तान कधीच जवळ करणार नाही. 

रशिया आणि इस्रायलचा पाठिंबा 

रशिया आणि इस्रायल या दोन देशांच्या भूमिकेकडे संपूर्ण जगाचे लक्ष राहील. अमेरिकेनंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी शक्ती असलेल्या रशियाकडूनही भारताला पाठिंबा मिळू शकतो. गेल्या अनेक वर्षांपासून रशिया आणि भारताचे संबंध खूप चांगले आहेत, भारताने रशियाकडून अनेक मोठी शस्त्रे खरेदी केली आहेत.  भविष्यातही असे करार सुरू राहतील. पाकिस्तानसोबतच्या युद्धादरम्यान, रशियाने उघडपणे भारताला पाठिंबा दिला आणि अमेरिकन नौदलाच्या ताफ्याला परत पाठवण्यास भाग पाडले. 

मागील अनेक वर्षांपासून इस्रायल आणि भारत यांच्यातील संबंधही मजबूत आहेत.  कारगिल युद्धादरम्यान इस्रायलने भारताला खूप मदत केली होती. या दरम्यान, इस्रायलने नाईट व्हिजन कॅमेरे, ड्रोन आणि इतर तांत्रिक गोष्टी पुरवल्या. 
पाकिस्तानला एकटा पडू शकतो.

एकंदरीत, अशा परिस्थितीत, चीन वगळता, दुसरा कोणताही मोठा देश भारतासाठी धोका ठरु शकत नाही. जर पाकिस्तानने भारताशी पंगा घेतला तर त्याला फक्त चीनवर अवलंबून राहावे लागेल. पाकिस्तान मुस्लिम देशांकडूनही मदत मागू शकतो, परंतु कोणताही इस्लामिक देश भारताविरुद्ध युद्धसदृश परिस्थिती निर्माण करेल अशी शक्यता खूपच कमी आहे. दुसरीकडे, जर चीनने भारताला पाठिंबा दिला नाही, तर युद्धात पाकिस्तानच्या बलुचिस्तानपासून पीओकेपर्यंतचा भाग भारत अगदी सहज काबीज करु शकतो. 





Source link

supriya sule urged Civil Valor awards for six Pahalgam attack victims on maharashtra Day

0
supriya sule urged Civil Valor awards for six Pahalgam attack victims on maharashtra Day



supriya sule urged Civil Valor awards for six Pahalgam attack victims on maharashtra Day | सहा जणांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्यावा, खासदार सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी





Source link

काश्मीरमध्ये लष्कराकडून मोठं कोंबिंग ऑपरेशन; 446हून अधिक दहशतवाद्यांना घेतलं ताब्यात

0
काश्मीरमध्ये लष्कराकडून मोठं कोंबिंग ऑपरेशन; 446हून अधिक दहशतवाद्यांना घेतलं ताब्यात


पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने आता दहशतवाद्यांना अद्दल घडवायला सुरूवात केलीय. दहशतवाद्यांनी घरं उद्ध्वस्थ केल्यानंतर सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांच्या छुप्प्या अड्ड्यावर छापे टाकायला सुरूवात केलीय. तर घातपात कारवायांसाठी मदत करणाऱ्या शेकडो जणांना लष्कराने ताब्यात घेतलाय. (Army conducts major combing operation in Kashmir More than 446 terrorists arrested)

काश्मीरमध्ये लष्कराकडून मोठं कोंबिंग ऑपरेश

446हून अधिक जण ताब्यात

गेल्या 2 दशकातील मोठी कारवाई

काश्मीरमधील पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर लष्कराने मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू केलीय.  दहशतवाद्यांची घरे पाडण्यात आली असून त्यांच्या छुप्या अड्ड्यांवर छापे मारण्यात आलेत. हल्ल्याचा तपास NIA ने आपल्या हातात घेतलाय. तसंच घातपाती कारवायांसाठी मदत करणाऱ्या शेकडो लोकांना ताब्यात घेण्यात आलंय. या कारवाईत आतापर्यंत 446 पेक्षा जास्त लोकांना ताब्यात घेतलंय. एनआयए ने तब्बल 19 ठिकाणी छापे टाकत पुरावे जमा करायला सुरूवात केलीय. यासोबतच जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानला मदत करणारे स्थानिक दहशतवादी सक्रीय असल्याची माहितीही मिळालीय.अशा 14 स्थानिक दहशतवाद्यांची ओळख पटलीय. कश्मीरमधील गेल्या दोन दशकांतील ही सर्वांत मोठी कारवाई मानली जातेय. त्यामुळे या दहशतवाद्यांभोवती फास आवळला जाणाराय. 

दहशतवाद्यांचं कोम्बिंग ऑपरेशन 

– पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर लष्कर अॅक्शन मोडवर

– दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त केल्यानंतर मोठं कोम्बिंग ऑपरेशन

– 446हून अधिक संशयित ताब्यात

– दहशतवाद्यांना मदत केल्याच्या आरोपावरुन कारवाई

– गेल्या 2 दशकातील सर्वात मोठी कारवाई

– दहशतवाद्यांना मदत करणा-या 14 जणांची ओळख पटली

– तपास काश्मीरपूरता मर्यादित नाही तर दिल्ली पंजाब आणि गुजरातपर्यंत तपास पोहचू शकतो

– संशयास्पद हालचालींवर लष्कराचं बारीक लक्ष आहे

दहशतवाद्यांचं जाळं नष्ट करणं, तसंच भविष्यातील हल्ल्यांना रोखण्यासाठी वेळीच पावले उचलणं हा या कारवाईमागचा मुख्य उद्देश आहे. आणखी काही दिवस ही कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती मिळतेय.





Source link

mumbais best bus fares to increase as municipal corporation approves fare hike proposal

0
mumbais best bus fares to increase as municipal corporation approves fare hike proposal



mumbais best bus fares to increase as municipal corporation approves fare hike proposal | बेस्ट बसचे भाडे दुप्पट होणार, भाडेवाढीला मुंबई महापालिकेची मंजरी





Source link