Friday, July 17, 2026
Home Blog Page 337

City News Updates : गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पाऊस, झाडे कोसळली; वाहतुकीला फटका

0
City News Updates : गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पाऊस, झाडे कोसळली; वाहतुकीला फटका



Nagpur Pune Mumbai Latest Marathi News : नागपूर जिल्ह्यातील उमरेडचे काँग्रेस आमदार डॉ. संजय मेश्राम त्याला अपवाद ठरले. त्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित सेवा हक्क दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोकळ्या मनाने स्तुती केली.

वसई येथील सिमेंटचे ब्लॉक बनविण्याच्या कंपनीतून सुरू असलेला मेफेड्रॉन (एमडी) बनविण्याचा कारखाना साकीनाका पोलिसांनी उद्ध्वस्त केला. या कारवाईत चार किलो ५३ ग्रॅम एमडी हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. मुंबई,पुणेसह महाराष्ट्रातील प्रमुख शहरांच्या ताज्या घडामोडी या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या…



Source link

Woman influencer harassed in her own building takes proof to man parents who said mental Viral Video

0
Woman influencer harassed in her own building takes proof to man parents who said mental Viral Video



Woman influencer harassed in her own building takes proof to man parents who said mental Viral Video | जिन्यातून जाताना तरुणीला हात लावण्याचा प्रयत्न करत होता तरुण, जाब विचारत तरुणीने तिथेच लागवली कानाखाली, Video Viral





Source link

Western countries medical research in developing countries

0
Western countries medical research in developing countries



Western countries medical research in developing countries | पाश्चात्त्य देशांच्या कुबड्यांविना विकसनशील देशांमध्ये वैद्यकीय संशोधन!





Source link

India-Pak War: काहीतरी मोठं घडण्याचे संकेत? दोन मिनिटांत सज्ज व्हा! वायुदलाला केंद्र सरकारचे आदेश

0
India-Pak War: काहीतरी मोठं घडण्याचे संकेत? दोन मिनिटांत सज्ज व्हा! वायुदलाला केंद्र सरकारचे आदेश


India-Pak War: जम्मू काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांच्या तणावपूर्ण नात्यात आणखी दुरावा आल्याचं पाहायला मिळालं. भारताच्या नंदनवनात घडवून आणलेल्या या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ मोदी सरकारनं धोरणात्मक आणि आता लष्करी पद्धतीनं शेजारी राष्ट्राच्या कुरघोड्यांना उत्तर देण्याची भूमिका स्वीकारली आहे. 

एकिकडून धोरणात्मक तत्त्वांनी पाकची कोंडी करत असतानाच दुसरीकडे देशाच्या सीमानाभागात वारंवार होणारं शस्त्रसंधीचं उल्लंघनही भारतानं परतवून लागवल्याचं पाहायला मिळत आहे. पीओकेमध्ये 42हून अधिक दहशतवादी तळ सक्रीय असल्याचा अहवाल गुप्तचर यंत्रणांनी  दिल्यानंतर आता कारवाईबाबत हालचाली सुरू झाल्याची माहिती आहे. उच्चस्तरीय पातळीवर याबाबत विचारविनिमय सुरू असल्याचं समजतंय. (PM Modi) पंतप्रधान मोदींनीही दहशतवाद्यांचं कंबरडं मोडणार असल्याचं सांगत कठोर कारवाईचा इशारा दिलाय. त्यामुळे या भागात लवकरच लष्करी कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. 

सज्ज व्हा! वायुदलाला केंद्राचे आदेश 

सीमेपलिकडून अर्थात पाकिस्तानच्या दिशेनं सीमाभागात लष्करी कारवायांमध्ये वाढ होत असताना आणि शेजारी राष्ट्रानं मोठ्या प्रमाणात नियंत्रण रेषेनजीक फौजफाटा आणलेला असतानाच भारतीय सैन्यातील तिन्ही तुकड्यांनासुद्धा सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. प्रामुख्यानं वायुदलाला केंद्राकडून कोणत्याही परिस्थितीत सतर्क राहण्याच्या सूचना करत आदेश येताच पुढच्या दोन मिनिटांत सज्ज होण्याचे आदेश दिले आहेत. भारत- पाक युद्धाचे संभाव्य ढग घोंगावत असतानाच सावधगिरी म्हणून भारत सरकारनं हे पाऊल उचलल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळं पुढील काही दिवसांच भारतीय लष्कराकडून पाकसोबतच्या या तणावात काहीतरी मोठं घडण्याचे संकेत मिळत आहेत. 

पाकिस्तानची घाबरगुंडी 

इथं भारताकडूनही कोणत्याही युद्धजन्य परिस्थितीसाठी यंत्रणा सज्ज केल्या जात असतानाच तिथं पाकिस्तानची घाबरगुंडी उडाल्याचं पाहायला मिळत आहे. पाक सैन्यानंही सीमा भागात अधिक फौजफाटा आणि तोफा तैनात केल्या आहेत. तर, सीमाभागात एअरस्ट्राईकचा धोका असल्यामुळं पाकनं काही ठिकाणी असणारे लाँच पॅडही रिकामे केल्याचं म्हटलं जात आहे. 

भारतात घुसखोरी घडवून आणण्याचा पाकचा कट 

भारताच्या पुंछ आणि काश्मीरच्या इतर भागांमध्ये पाकिस्तानकडून अधूनमधून गोळीबार सुरूच असून पाकच्या बाजूनं सीमाभागांत असणाकी गावं रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पाकिस्तानकडून सातत्यानं शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात येत असून, डोंगराळ वनक्षेत्रातून भारतात पुन्हा एकदा दहशतवाद्यांची घुसखोरी घडवून आणण्यासाठी पाकिस्तान कटकारस्थानं रचत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून मिळाली आहे. 





Source link

समृद्धी महामार्गावर नवे औद्योगिक केंद्र

0
समृद्धी महामार्गावर नवे औद्योगिक केंद्र



मुंबई : समृद्धी महामार्गावरील कल्याण- आमणे-भिवंडी क्षेत्राचा मुंबईतील वांद्रे- कुर्ला संकुलाच्या धर्तीवर विकास करण्यात येणार असून या परिसरात नवे औद्योगिक केंद्र उभारले जाणार आहे़ या रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत या भागातून होणारी वाहतूक लक्षात घेता जवाहरलाल नेहरू बंदर आणि अहमदाबादकडे जाणाऱ्या मार्गासाठी पर्याय शोधण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी येथे दिले.

सह्याद्री अतिथिगृह येथे शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समृद्धी महामार्गावरील आमने नोड कामाचा आढावा बैठक पार पडली. शिक्षणमंत्री दादा भुसे, मृद व जलसंधारणमंत्री संजय राठोड, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीन सोना, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड आदी या वेळी उपस्थित होते.

ठाणे, रायगड, पालघर या भागाला आमने नोड जोडला जाणार असून भविष्यातील औद्याोगिक क्षेत्र म्हणून ते विकसित होणार आहे. या भागाचे विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून एमएसआरडीएची नियुक्ती करण्यात आली आहे. आमने नोड १० हजार ७९१ हेक्टर क्षेत्र असून त्या ठिकाणी इंडस्ट्री पार्क, लॉजिस्टिक हब, कृषी हब, फूड प्रोसेसिंग पार्क आदी विकासकामे प्रस्तावित आहेत. आमने नोडमुळे भविष्यातील वाढणारी वाहतूक लक्षात घेता नियोजन करण्याचे आदेश शिंदे यांनी या वेळी दिले. या भागातून जाणाऱ्या नाशिक महामार्गाचे काम वेळेत आणि पावसाळ्यापूर्वी करण्याच्या सूचना देतानाच वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता घेण्याचे त्यांनी सांगितले.

मिसिंग लिंकचे काम ९५ टक्के पूर्ण

मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंकचे काम शेवटच्या टप्प्यात असून या प्रकल्पातील सर्वाधिक उंचीवरील पुलाचे काम कुठलीही तडजोड न करता काळजीपूर्वक करावी, अशा सूचना शिंदे यांनी दिल्या. सुमारे १३.३० किलोमीटर लांबीच्या मिसिंग लिंकच्या दोन टप्प्यांचे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. शेवटचा टप्पा म्हणून सर्वाधिक उंचीच्या पुलाचे काम सध्या सुरू आहे. मिसिंग लिंकमुळे मुंबई-पुणे प्रवासात अजून २० ते २५ मिनिटांची बचत होणार असून त्याचे काम करताना कुठलीही तडजोड करू नका. उंचीवरील काम करताना अधिक काळजीपूर्वक करा. कामाची प्रत्येक पातळीवर चाचणी करण्याच्या सूचना शिंदे यांनी दिल्या.



Source link

mumbai police to get new commissioner as vivek phansalkar to retire on april 30 zws 70

0
mumbai police to get new commissioner as vivek phansalkar to retire on april 30 zws 70



mumbai police to get new commissioner as vivek phansalkar to retire on april 30 zws 70 | मुंबईचे नवे पोलीस आयुक्त कोण?विवेक फणसळकर यांची उद्या निवृत्ती





Source link

वसईत एमडीचा कारखाना उद्ध्वस्त; ८ कोटींचे अमली पदार्थ जप्त

0
वसईत एमडीचा कारखाना उद्ध्वस्त; ८ कोटींचे अमली पदार्थ जप्त



मुंबई : वसई येथील सिमेंटचे ब्लॉक बनविण्याच्या कंपनीतून सुरू असलेला मेफेड्रॉन (एमडी) बनविण्याचा कारखाना साकीनाका पोलिसांनी उद्ध्वस्त केला. या कारवाईत चार किलो ५३ ग्रॅम एमडी हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. त्याची किंमत आठ कोटी चार लाख रुपये आहे. पोलिसांनी या कारवाईत सादिक सलीम शेख (२८) आणि सिराज सुलतान पंजवानी (५७) यांना अटक केली आहे.

साकीनाका पोलिसांचे अमली पदार्थविरोधी पथक २४ एप्रिल रोजी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना येथील काजुपाडा परिसरातील रेतीवाला कंपाऊंडमध्ये सार्वजनिक शौचालयाजवळ सादिक हा संशयास्पदरीत्या फिरताना सापडला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याजवळ १० लाख सात हजार रुपये किमतीचे ५३ ग्रॅम एमडी सापडले.

पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून सादिकला अटक केली. त्याच्या चौकशीत त्याने एका व्यक्तीकडे एमडी विक्रीचे काम करत असल्याचे आणि त्याला मिरा रोडमधील रहिवासी सिराज पंजवानी हा अमली पदार्थ पुरवत असल्याची महत्त्वपूर्ण माहिती दिली. साकीनाका पोलिसांनी आरोपी पंजवानी याचा मिरा रोडमध्ये शोध घेऊन त्याला २६ एप्रिल रोजी अटक केली.

वसईतील कामण गावातील काळुराम चौधरी हा एमडी बनवून विकत असल्याचे त्याने सांगितले. त्यानुसार, साकीनाका पोलिसांनी चौधरी चालवत असलेल्या एम. के. ग्रीन एएसी ब्लॉक कंपनीवर छापा टाकला. सिमेंटचे ब्लॉक बनविणाऱ्या या कंपनीत चौधरी सापडला नाही. पण पोलिसांना येथील एका शेडमध्ये एमडी अमली पदार्थ बनवले जात असल्याचे दिसले. या शेडमधून चार किलो एमडी आणि एमडी बनवण्याचे साहित्य जप्त केले.



Source link

पोलीस अधीक्षक कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न

0
पोलीस अधीक्षक कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न


अहिल्यानगरः जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात मध्यरात्रीच्या सुमारास एकाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांच्या प्रयत्नातून तो हाणून पाडण्यात आला. काल, रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास हा प्रकार घडला.

किसन दादा शिंदे (वय ३८, रा. भेंडा, पाटबंधारे कार्यालयाजवळ, रस्तापूर रस्ता, नेवासा) असे आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. भिंगार कँप पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काल रात्री उशिरा शिंदे हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात आला व त्याने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने तेथे रात्र ड्यूटीवर असलेल्या पोलिसांमध्ये चांगलाच गोंधळ उडाला. याप्रकरणी शिंदे विरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार अनिल झरेकर यांनी फिर्याद दिली आहे. किसन शिंदे व त्याच्या नातेवाईकांमध्ये भूखंडासंबंधी वाद आहे. त्यांना याबाबत संबंधित सरकारी कार्यालयातून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्यांनी रविवारी रात्री पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले. स्वतःच्या अंगावर पेट्रोलसदृश पदार्थ ओतून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. यावेळी त्याला तेथील ड्यूटीवर असलेल्या पोलिसांनी वेळीच रोखले, यामुळे पुढील अनर्थ टळला. भिंगार कॅम्प पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव घेतली. शिंदे याला ताब्यात घेतले व गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार रवींद्र टकले करीत आहेत.





Source link

मुरुम तस्करांकडून महिला वनरक्षकाला धक्काबुक्की

0
मुरुम तस्करांकडून महिला वनरक्षकाला धक्काबुक्की


अहिल्यानगर : वन विभागातून बेकायदा मुरुम उत्खनन करण्यास प्रतिबंध करणाऱ्या महिला वनरक्षकाला शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याची घटना देहरे (ता. अहिल्यानगर) येथे घडली. या संदर्भात एमआयडीसी पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

देहरे वन परिक्षेत्र कार्यालयातील वनरक्षक राजश्री जगन्नाथ राऊत यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. त्यानुसार हर्षल शिंदे (पूर्ण नाव नाही, रा. शिंगवे नाईक, अहिल्यानगर), अंकुश जाधव (पूर्ण नाव नाही, देहरे, अहिल्यानगर) व इतर दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काल, रविवारी दुपारी देहरे वन परिक्षेत्रात कार्यरत असलेल्या वनरक्षक राजश्री राऊत गस्त घालत होत्या. त्या वेळी त्यांना काही व्यक्ती बेकायदारीत्या मुरुम उत्खनन करताना आढळल्या. त्यांनी त्यांच्याकडे उत्खनन परवाना आहे का, याची विचारणा केली तेव्हा त्यांनी राऊत यांना शिवीगाळ व धक्काबुक्की केली; तसेच सरकारी कामात अडथळा आणला. बेकायदा उत्खनन करण्यासाठी क्रमांक नसलेला डंपर व क्रमांक नसलेल्या जेसीबीचा वापर करण्यात आला. ही दोन्ही वाहने घेऊन संशयितांनी घटनास्थळावरून पळ काढला.

हेही वाचा
हेही वाचा

माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी, उपनिरीक्षक भालेराव यांनी घटनास्थळी भेट दिली. वनरक्षक राजश्री राऊत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक भालेराव करत आहेत.





Source link

military incursion by india is imminent claims pakistan defence minister zws 70

0
military incursion by india is imminent claims pakistan defence minister zws 70



military incursion by india is imminent claims pakistan defence minister zws 70 | भारताकडून लष्करी घुसखोरी अटळ! पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचा दावा





Source link