



कोल्हापूर : खरेदी कोणाकडून करायची याविषयीचे वादग्रस्त फलक आज कोल्हापूरमध्ये झळकले. हिंदू व्यापाऱ्यांकडून आवर्जून खरेदी करावी असा संदेश देणाऱ्या या फलकावर अल्पसंख्यांकांना लक्ष्य केल्याचे दिसते. नाव विचारूनच बाजारात खरेदी करा , अशा आशयाच्या फलकाची कोल्हापुरात चर्चा रंगली आहे.
जम्मू आणि काश्मीर राज्यातील पेहलगाम येथे २७ पर्यटकांवर गोळीबार करून अतिरेक्यांनी जीव मारले. या घटनेचा सर्वत्र निषेध केला जात आहे. कोल्हापूर शहरात हिंदुत्ववादी संघटना, शिवसेना ठाकरे गट, मुस्लिम समाज , इंडिया आघाडी, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस अशा विविध पक्ष -संघटनांकडून या हल्ल्याच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. तर दुसरीकडे हिंदूंवरील या हल्ल्यावरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागले आहेत. आज कोल्हापुरात सकल हिंदू समाजाने लावलेल्या फलकावरून चर्चेला वेगळा संदेश पेरण्याचा प्रयत्न झाला आहे.
‘ धर्म विचारूनच मारले. त्यामुळे आता यापुढं तुम्ही किमान नाव विचारूनच मार्केट मध्ये सुद्धा खरेदी करा ,’ अशा आशयाछा फलक कोल्हापूरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात झळकले आहे. सकल हिंदू समाजाकडून हा फलक लावण्यात आला आहे. ज्यामध्ये ‘ छत्रपती संभाजी महाराजांना धर्म बदलला नाही म्हणून मारलं.. आणि आता सुद्धा आपल्या २७ हिंदू बांधवांना धर्म विचारून मारले गेले. त्यामुळे मार्केटमध्ये खरेदी करताना नाव विचारूनच करा , असा आशय असणारा हा फलक मध्यवर्ती जागेवर लावण्यात आला आहे. शंभर टक्के आर्थिक बहिष्कार टाका असाही संदेश याद्वारे देण्यात आला आहे. अशा या फलकाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.





पुणे : महापालिकेच्या सेवेतील अधिकाऱ्यांमधून पदोन्नतीने भरण्यात येणाऱ्या अतिरिक्त आयुक्तांच्या पदावर राज्य सरकारच्या सेवेतील अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. अतिरिक्त आयुक्त म्हणून इचलकरंजी महापालिकेचे तत्कालीन आयुक्त, तसेच मुख्याधिकारी श्रेणीतील ओमप्रकाश दिवटे यांची राज्य सरकारने नियुक्ती केली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे महापालिकेच्या अधिकाऱ्यांमधून अतिरिक्त आयुक्त म्हणून जाण्याचा महापालिकेतील अधिकाऱ्यांचा मार्ग बंद झाला आहे.
महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी दिवटे यांची नियुक्ती केल्याचा आदेश सोमवारी नगरविकास विभागाने काढला. दिवटे तीन महिन्यांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते. या नियुक्तीमुळे महसूल विभागाकडून अपर आयुक्त म्हणून बढती मिळालेले महेश पाटील यांचे अतिरिक्त आयुक्त म्हणून काम करण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे. नगरविकास विभागाने काढलेले आदेश ग्राह्य धरावेत, इतर विभागांनी काढलेल्या आदेशानुसार अधिकाऱ्यांना महापालिकेच्या सेवेत रुजू करून घेऊ नये, असा स्पष्ट आदेश नगरविकास विभागाने महापालिका आयुक्तांना दिल्याने महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी पाटील यांना अतिरिक्त आयुक्त या पदावर रुजू करून घेतले नव्हते.

