Thursday, August 20, 2026
Homeमनोरंजनमुरुम तस्करांकडून महिला वनरक्षकाला धक्काबुक्की

मुरुम तस्करांकडून महिला वनरक्षकाला धक्काबुक्की

मुरुम तस्करांकडून महिला वनरक्षकाला धक्काबुक्की

[ad_1]

अहिल्यानगर : वन विभागातून बेकायदा मुरुम उत्खनन करण्यास प्रतिबंध करणाऱ्या महिला वनरक्षकाला शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याची घटना देहरे (ता. अहिल्यानगर) येथे घडली. या संदर्भात एमआयडीसी पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

देहरे वन परिक्षेत्र कार्यालयातील वनरक्षक राजश्री जगन्नाथ राऊत यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. त्यानुसार हर्षल शिंदे (पूर्ण नाव नाही, रा. शिंगवे नाईक, अहिल्यानगर), अंकुश जाधव (पूर्ण नाव नाही, देहरे, अहिल्यानगर) व इतर दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काल, रविवारी दुपारी देहरे वन परिक्षेत्रात कार्यरत असलेल्या वनरक्षक राजश्री राऊत गस्त घालत होत्या. त्या वेळी त्यांना काही व्यक्ती बेकायदारीत्या मुरुम उत्खनन करताना आढळल्या. त्यांनी त्यांच्याकडे उत्खनन परवाना आहे का, याची विचारणा केली तेव्हा त्यांनी राऊत यांना शिवीगाळ व धक्काबुक्की केली; तसेच सरकारी कामात अडथळा आणला. बेकायदा उत्खनन करण्यासाठी क्रमांक नसलेला डंपर व क्रमांक नसलेल्या जेसीबीचा वापर करण्यात आला. ही दोन्ही वाहने घेऊन संशयितांनी घटनास्थळावरून पळ काढला.

हेही वाचा
हेही वाचा

माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी, उपनिरीक्षक भालेराव यांनी घटनास्थळी भेट दिली. वनरक्षक राजश्री राऊत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक भालेराव करत आहेत.



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments