




भंडारा : काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ मंगळवारी २९ एप्रिल रोजी भंडारा बंदचे आवाहन करण्यात आले . शहरात निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. सायंकाळी ६ वाजता जलाराम मंगल कार्यालय चौक येथून या निषेध मोर्चाला सुरवात होत गांधी चौक, पोस्ट ऑफिस चौक, मुस्लिम लायब्ररी चौक ते नगर परिषद समोर गांधी चौक येथे पोहचेल. गांधी चौक येथे पोहचताच मोर्चाचे रूपांतर श्रद्धांजली सभेत करण्यात येईल.
पहलगाम येथील दहशतवादी हल्यात शाहिद झालेल्या २७ पर्यटकांना श्रद्धांजली अर्पित कण्यात येईल. या मोर्चात सामील झालेल्या नागरिकांद्वारे आपल्या मोबाइलचे टॉर्च सुरू करून निषेध व्यक्त केला जाईल. जास्तीत जास्त संख्येत या निषेध मोर्चात नागरिकांनी सहभागी व्हावे तसेच भंडाऱ्यातील व्यापाऱ्यांनी ४ वाजता नंतर दुकाने बंद करुन मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन सकल हिंदू समाज भंडारा व आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या यांच्या वतीने करण्यात आले आहे.



Pahalgam Terrorists in Anantnag: पहलगाममध्य दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात २६ पर्यंटकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे देशभर खळबळ उडाली आहे. या घटनेला सात दिवस उलटले असून यादरम्यान भारत व पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. दोन्ही देशांमध्ये युद्ध होण्याची शक्यता एकीकडे बोलून दाखवली जात असताना दुसरीकडे लष्कर, काश्मीर पोलीस, एनआयए यांची शोधपथकं हल्लेखोर दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी काश्मीर पिंजून काढत आहेत. हे दहशतवादी अनंतनागमध्ये लपल्याची बोललं जात असून तिथे ही पथकं शोध घेत आहेत. अशातच, हे दहशतवादी दीड वर्षापूर्वीच भारतात दाखल झाल्याचं समोर आलं आहे!
इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, पहलगाम हल्ल्यातील संशयित दहशतवाद्यांपैकी दोन दहशतवादी दीड वर्षापूर्वीच पाकिस्तानमधून भारतात दाखल झाल्याचं सांगितलं जात आह. त्यांच्यासह इतरही काही घुसखोर भारतीय हद्दीत दाखल झाले होते. सीमेवरील सांबा-कथुआ भागात तारांचं कुंपण तोडून हे सर्व दहशतवादी भारतीय हद्दीत आले होते. तेव्हापासून भारतात झालेल्या दहशतवादी कारवायांमध्येही त्यांचा सहभाग असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, दीड वर्षांपूर्वी झालेल्या या घुसखोरीची चौकशीही झाली होती आणि त्यासंदर्भात सीमा सुरक्षा दल अर्थात बीएसएफच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांचं केंद्रीय गृह मंत्रालयाशी बोलणंही झाल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने इंडियन एक्स्प्रेसनं दिली आहे.
दरम्यान, पहलगाममध्ये हल्ला केलेले दहशतवादी अनंतनागमध्ये लपल्याचा संशय तपास पथकांना आहे. अनंतनागच्या वरच्या भागात हे दहशतवादी लपले असून त्यांचा शोध घेण्यासाठी लष्कर, राष्ट्रीय रायफल्स व निमलष्करी दलाकडून स्थानिकांची मदत घेतली जात आहे. शिवाय, जम्मू-काश्मीर पोलिसांकडून यासाठी तंत्रज्ञानाचीही मजत घेतली जात आहे.
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दोन दहशतवाद्यांची नावं अली भाई उर्फ तल्हा आणि हाशीम मुसा उर्फ सुलेमान अशी आहेत. पोलिसांनी त्यांची रेखाटने जारी केली असून त्यांच्यासोबत लष्कर ए तैय्यबाचा दहशतवादी आदिल हुसेन ठोकर याचंही रेखाटन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. शिवाय, त्यांची माहिती देणाऱ्यास २० लाखांचा इनामही पोलिसांनी जाहीर केला आहे. यापैकी मुसा हा गेल्या वर्षी २० ऑक्टोबर रोजी सोनमर्गमध्ये झालेल्या झेड-मोर्ह भुयार स्फोट प्रकरणातील संशयित आहे.
दरम्यान, पहलगाम येथे हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी अनेक बाबींचा वापर केला. त्यात प्रत्यक्षदर्शींनी दिलेली माहिती, पर्यटकांनी व स्थानिक गाईडनी काढलेले घटनेचे व्हिडीओ आणि सुरक्षा पथकांकडे खोऱ्यातील दहशतवाद्यांची असलेली माहिती, यांची सांगड घातल्यानंतर या हल्ल्यातील सहभागी दहशतवाद्यांची ओळख पटवण्यात आली.
“पहलगाम घटनेच्या प्रत्यक्षदर्शींना दहशतवाद्यांचे अनेक फोटो दाखवण्यात आले. त्यातल्या एका फोटोमध्ये त्यांनी मुसाला ओळखलं. तिथून इतर दहशतवाद्यांची ओळखदेखील पटली”, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. मुसाचा फोटो तपास पथकांना दहशतवादी जुनैद अहमद भटच्या मोबाईल फोनमध्ये सापडला होता. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये दाचीगम जंगलात झालेल्या चकमकीत भट मारला गेला होता. त्याच्याकडे सापडलेल्या वस्तू व फोटोंच्या आधारे पोलिसांनी इतर दहशतवाद्यांची माहिती जमा केली.


RBI On 100-200 Rupee Notes: नोटबंदी आणि त्यानंतर 2000 रुपयांच्या नोटेसंदर्भातील निर्णयानंतर आता आरबीआयनं 100 आणि 200 रुपयांच्या नोटांसंदर्भातही एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनं देशातील बहुतांश बँका आणि व्हाईट लेबल एटीएम ऑपरेटरना निर्देश देत महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.
एखाद्या बँकेच्या एटीएममध्ये गेलं असता तिथं बऱ्याचदा अपेक्षित रक्कम काढत असताना कमी मूल्य असणाऱ्या नोटा न येता 500 रुपयांच्याच नोटा सरसकट येतात आणि अनेकांचीच पंचाईत होते. हीच गरज आणि सामान्यांच्या अडचणी लक्षात घेता आरबीआयनं एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जिथं बँकांना निर्देश देत एटीएममधून 100 आणि 200 रुपयांच्या नोटासुद्धा काढता येतील याची काळजी घेण्याच्या सूचना केल्या आहेत.
नुकतंच या केंद्रीय बँकेनं देशातील सर्व बँकांना सूचित करत सर्वसामान्य जनतेच्या गरजांनुसार या नोटांची उपलब्धता वाढवण्याची गरज असल्याची बाब अधोरेखित केली. ज्यासाठी एटीएममध्ये या किमतीच्या नोटासुद्धा काढता याव्यात याकडे बँकांनी लक्ष देणं अपेक्षित असल्याचं आरबीआयनं सूचित केलं. यासाठी आरबीआयनं एक परिपत्रक जारी करत त्यामध्ये बँका आणि व्हाईट लेबल एटीएम ऑपरेटरना हे निर्देश टप्प्याटप्प्य़ानं लागू करणं बंधनकारक असल्याचं स्पष्ट केलं.
व्हाईट लेबल एटीएम सरकारी आणि खासगी बँकांच्या एटीमसारखं काम करतात. याचा वापर बँकांऐवजी एखाद्या खासगी किंवा बिगर आर्थिक संस्थांकडून (NBFC) केला जातो. याच्या सहाय्यानं डेबिट (debit) आणि (Credit Card) च्यामदतीनं कॅश विथड्रॉअल, बॅलेन्स चेक किंवा तत्सम सुविधांचा उपभोग घेता येतो ज्या सुविधा इतरही एटीएममध्ये मिळतात.
आरबीआयच्या परिपत्रकाचा आढावा घेतल्यास त्यामध्ये किमान मूल्याच्या नोटा सामान्यांपर्यंत सहजगत्या पोहोचवण्यासाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत सर्व एटीएम मशिनमपैकी 75 टक्के एटीएममध्ये किमान एक कॅसेटपासून 100 आणि 200 रुपयांच्या नोटा निघणं अपेक्षित असेल. यानंतर पुढे 31 मार्च 2026 पर्यंत 90 टक्के बँक एटीएमसाठी हा नियम लागू होईल.

Entertainment Live News Today, 29 April 2025 : मल्याळम सिनेसृष्टीतील एक दिग्गज दिग्दर्शक, चित्रपट निर्माते शाजी एन करुण (Shaji N Karun passed away) यांचे निधन झाले आहे. ते ७३ वर्षांचे होते. ते कॅन्सरशी लढा देत होते. तिरुअनंतपुरम येथील घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शाजी एन करुण यांनी सुमारे ४० चित्रपटांमध्ये सिनेमॅटोग्राफर म्हणून काम केलं होतं. पिरावी, स्वाहम, वानप्रस्थम, निषाद, कुट्टी श्रंकू आणि स्वप्नम यासह अनेक मल्याळम चित्रपटांसाठी ते ओळखले जातात.
Live Updates
Shaji N Karun passed away – दिग्गज दिग्दर्शक, चित्रपट निर्माते शाजी एन करुण (Shaji N Karun passed away) यांचे निधन झाले आहे. ते ७३ वर्षांचे होते. ते कॅन्सरशी लढा देत होते. तिरुअनंतपुरम येथील घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
शाजी एन करूण यांचे निधन (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
शाजी एन करुण कॅन्सरशी झुंज देत होते. त्यांनी तिरुअनंतपुरम येथील त्यांच्या घरी अखेरचा श्वास घेतला.