


Senior IAS officer Ashok Khemka Retirement: आपला प्रामाणिकपणा आणि धाडसीपणासाठी ओळखले जाणारे आयएएस अधिकारी अशोक खेमका आज अखेर निवृत्त दिले आहेत. आपल्या 34 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांची 57 वेळा बदली झाली होती. रॉबर्ट वाड्रा जमीन व्यवहारात त्यांनी कठोर भूमिका घेतली होती. 1991 च्या बॅचचे अधिकारी अशोक खेमका हरियाणाच्या वाहतूक विभागात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत होते. ही त्यांची अखेरची बदली ठरली. डिसेंबर 2024 मध्ये त्यांनी या पदाचा पदभार स्विकारला होता.
हरियाणा-कॅडर अधिकारी असलेल्या खेमका 2012 मध्ये काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वड्रा यांच्याशी संबंधित गुरुग्राम जमीन व्यवहारातील उत्परिवर्तन रद्द केल्यानंतर चर्चेत आले होते. उत्परिवर्तन हे जमीन मालकी हस्तांतरण प्रक्रियेतील एक महत्त्वाचं पाऊल आहे. अशोक खेमका यांच्या कारकिर्दीत अनेक बदल्या झाल्या. तब्बल 57 म्हणजे सरासरी दर सहा महिन्यांनी एकवेळा त्यांची बदली झाली. हरियाणातील कोणत्याही आयएएस अधिकाऱ्याची झालेली ही सर्वाधिक बदली आहे.
गतवर्षी डिसेंबर महिन्यात ते वाहतूक विभागात परतले होते. हा विभाग अनिल वीज यांच्या अंतर्गत आहे. मनोहरलाल खट्टर यांच्या नेतृत्वातील भाजपा सरकारमध्ये वाहतूक आयुक्तपदी होते. यानंतर तब्बल दशकभरानंतर ते वाहतूक विभागात नियुक्त झाले होते. याआधी त्यांची बदली झाली तेव्हा फक्त 4 महिन्यांसाठी ते या पदावर होते.
गेल्या 12 वर्षात अशोक खेमका यांना पर्यायाने कमी महत्त्वाची पदं देण्यात आली होती. त्यांना चार वेळा Archives म्हणजेच अभिलेखागार विभागात नेमण्यात आलं होतं. 2013 मध्ये एकदा काँग्रेस आणि भाजपाच्या कार्यकाळात तीन वेळा त्यांची या विभागात महासंचालक आणि प्रधान सचिव म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं.
2023 मध्ये अशोक खेमका यांनी मनोहरलाल खट्टर यांनी पत्र लिहिलं होतं. या पत्रातून त्यांनी भ्रष्टाचार समूळ नष्ट करण्याची इच्छा व्यक्त करत राज्य दक्षता विभागाचे नेतृत्व करण्याची इच्छा व्यक्त केली होती. 23 जानेवारी 2023 रोजी लिहिलेल्या पत्रात त्यांनी नोकरशाहीतील कामाच्या एकांगी वाटपावर टीका केली. अधिकाऱ्यांवर खूप ताण असून त्यांच्यासह इतरांना अभिलेखागारासारख्या विभागात फारसे काम करायचे नाही.
“कामाचे एकंगी वाटप सार्वजनिक हिताचं काम करत नाही. माझ्या कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात भ्रष्टाचार समूळ नष्ट दक्षता विभागाचा प्रमुख म्हणून मी काम करु इच्छित आहे. जर संधी मिळाली तर मी तुम्हाला खात्री देतो की भ्रष्टाचाराविरुद्ध खरा लढा देईन आणि कोणीही कितीही उच्च आणि शक्तिशाली असला तरी त्याला सोडले जाणार नाही,” असं त्यांनी लिहिलं होतं.
दोन वर्षांपूर्वी, आयएएस अधिकाऱ्यांचं प्रमोशन झाल्यानंतर अशोक खेमका यांनी ट्विट केलं होतं की, “भारत सरकारमध्ये सचिव म्हणून नव्याने नियुक्त झालेल्या माझ्या बॅचमेट्सचे अभिनंदन! हा आनंदाचा प्रसंग असला तरी, स्वतःला मागे सोडल्याबद्दल तेवढीच निराशा आणते.”
“सरळ झाडे नेहमीच आधी कापली जातात. कोणताही पश्चात्ताप नाही. नव्याने संकल्प करून, मी टिकून राहीन”, असा निर्धारही त्यांनी केला होता.
1965 मध्ये कोलकाता येथे जन्मलेल्या खेमका यांनी आयआयटी खरगपूरमधून संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकीमध्ये बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी (1988), टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (टीआयएफआर) मधून संगणक विज्ञानात पीएचडी आणि व्यवसाय प्रशासन आणि वित्त या विषयात एमबीए केलं आहे. कर्तव्य बजावताना त्यांनी पंजाब विद्यापीठातून एलएलबीचं शिक्षणही घेतलं.


Gonda Damad Saasu love Story: उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातून एक अशी धक्कादायक घटना समोर आली होती. ज्याची चर्चा संपूर्ण देशभरात झाली. आणि या घटनेने सर्वांनाच आश्चर्यचकित केले. एक 44 वर्षीय महिला अचानक घरातून बेपत्ता झाली. ज्यामुळे तिचे कुटुंब चिंतेत पडले होते. विशेष म्हणजे महिलेच्या लेकीचे ज्याच्यासोबत लग्न ठरले होते, त्याच पुरुषासोबत ती पळून गेली होती. आता या कहाणीत नवा ट्विस्ट आलाय. कारण जावयासोबत पळून जाणाऱ्या सासूबद्दल नवी माहिती समोर आलीय.
ही घटना नातेसंबंध आणि भावनांच्या गुंतागुंतीचे जिवंत उदाहरण आहे. सध्या पोलिसांनी महिलेचा शोध घेतला असून ती कुटुंबात परतली आहे. खोडारे पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली गोती.
गोंडा जिल्ह्यातील खोडारे पोलीस स्टेशन परिसरातील रहिवासी 44 वर्षीय उषा बेपत्ता झाल्याने संपूर्ण कुटुंब आणि परिसर हादरून गेला. 25 एप्रिल रोजी महिला अचानक बेपत्ता झाल्यानंतर तिच्या पतीने खोडारे पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. यानंतर कुटुंब, नातेवाईकांनी आजूबाजूच्या परिसरात महिलेचा खूप शोध घेतला पण कुठेही सुगावा न लागल्याने प्रकरण गंभीर झाले.
चौकशीदरम्यान एक धक्कादायक खुलासा झाला. या प्रकरणातून प्रेमकथा समोर आली. ज्यामध्ये सासू आणि तिच्या कथित जावयामध्ये प्रेमाचे सूत जुळले होते. मिळालेल्या माहितीनुसार महिलेच्या मुलीचे लग्न बस्ती जिल्ह्यातील दुबौलिया पोलिस स्टेशन परिसरातील रहिवासी राम स्वरूप यांच्याशी ठरले होते. पण काही कारणामुळे ते लग्न मोडले. लग्न मोडल्यानंतरही उषा आणि राम स्वरूप यांच्यातील संभाषण सुरूच राहिले आणि हळूहळू या संभाषणाचे प्रेमात रूपांतर झाले. त्या महिलेचे आणि राम स्वरूपचे नाते इतके घट्ट झाले की 25 एप्रिल रोजी उषा घर सोडून राम स्वरूपसोबत गेली.
महिलेच्या बेपत्ता होण्याची बातमी कुटुंबीयांना समजताच ते काळजीत पडले. पतीने पोलिसांची मदत घेतली आणि मग तपास सुरू झाला. दुसरीकडे पोलीस त्यांचा शोध घेत असल्याची माहिती उषा आणि राम स्वरूप यांना कळाली. यानंतर दोघांनाही काळजी वाटू लागली. दोघेही बस्ती जिल्ह्यातील दुबौलिया पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले आणि पोलिसांना संपूर्ण प्रकार सांगितला.
बस्ती पोलिसांनी गोंडा पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. यानंतर खोडारे पोलीस ठाण्याच्या पथकाने महिलेला पुन्हा गोंडा येथे आणले. महिलेची पुन्हा चौकशी झाली. यावेळी महिलेने सांगितले की, ‘माझी मानसिक स्थिती ठीक नव्हती. मी स्वतःच्या इच्छेने राम स्वरूपसोबत गेली होती. असे असले तरी आता मला माझ्या पतीकडे परत जायचे आहे.’
खोडारे पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडल्याच्या वृत्ताला अतिरिक्त पोलीस अधीक्षक मनोज कुमार रावत यांनी दुजोरा दिला. यानंतर पोलिसांनी महिलेला तिच्या पतीकडे सोपवले. आता पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे. महिलेच्या मुलीचे लग्न आता पुढच्या महिन्यात दुसऱ्या कोणाशी तरी ठरलंय. ही संपूर्ण घटना कुटुंबासाठी मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या खूप वेदनादायक बनलीय.

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ला करणारी ‘द रेझिस्टन्स फोर्स’ ही दहशतवादी संघटना आणखी काही हल्ले करण्याचा प्रयत्न करू शकते, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. त्यामुळेच एजन्सींच्या माहितीच्या आधारे काश्मीरमधील जवळपास ५० पर्यटनस्थळे बंद करण्यात आली आहेत. याच मोसमात काश्मीरमध्ये पर्यटकांचा पूर आला होता. पण यावेळी हवामान थंड राहण्याची शक्यता आहे. भारताने पाकिस्तानविरोधात लष्करी कारवाई केल्यास पर्यटकांना एडव्हायझरी जारी केली जाऊ शकते. सध्या संवेदनशील भागात जलद दल तैनात करण्यात आले आहे. याशिवाय पाळत ही वाढवण्यात येत आहे.


उलट त्यांना पैसे देऊन युरोपला पाठवले आणि सांगितले की जगातले सर्व संगीत पहा, ऐक आणि त्यातून तुला नक्की काय करायचं आहे हे तुझं तूच ठरव. गुरु म्हणून ते अत्यंत कडक होते आणि त्यांनी मुलगा आहे म्हणून बहाउद्दीन साहेबांना कोणतीही सवलत दिली नाही. उलट एका कार्यक्रमाला जाताना त्यांना सांगितलं की तुझी वाद्य तुला सुरात लावता आली पाहिजेत. जर जमत नसेल तर कार्यक्रमाला जाऊ नको, घरी परत ये. तरुण बहाउद्दीन खान साहेबांना हा मोठाच धडा होता. एकदा रुद्रवीणा वादन करायचे असे ठरवल्यानंतर त्यांचे वडील, उस्ताद मोहीउद्दीनखान डागर यांनी त्यांच्याकडून अगदी कठोरपणे आवश्यक तो रियाज करून घेतला. उस्ताद श्री. मोहीउद्दीन खान यांच्या निधनानंतर त्यांचे काका उस्ताद फरिउद्दीन खान डागर, हे प्रसिद्ध ध्रुपद गायक होते, ह्यांनी त्यांना शिकविले आणि उत्तमपणे त्याला संगीतविद्या आत्मसात होईल याचे काळजी घेतली. बहाउद्दिन खान साहेबांनी देखील आपण जगभर फिरून बीटल्स, जाझ, सालसा, वेस्टर्न म्युझिक , पॉप म्युझिक हे सर्व ऐकल्यानंतरच रुद्रवीणा वाजवायचे ठरवले होते.


