Friday, July 17, 2026
Home Blog Page 329

ITR फाइल केल्यानंतरही टॅक्स रिफंडला लागतो उशीर? तुम्ही कुठे चुकता? सर्वकाही जाणून घ्या!

0
ITR फाइल केल्यानंतरही टॅक्स रिफंडला लागतो उशीर? तुम्ही कुठे चुकता? सर्वकाही जाणून घ्या!


ITR Filing: रिफंड लवकर मिळावा म्हणून इन्कम टॅक्स रिटर्न लवकर भरणारे अनेकजण असतात. पण तुमचा आयटीआर दाखल केल्यानंतर किती दिवसांनी परतफेड प्रक्रिया केली जाते? याची तुम्हाला कल्पना आहे का? प्रत्यक्षात टॅक्स पेयर्सनी आयटीआर दाखल केल्यानंतर त्यांचे रिटर्न ई-व्हेरिफाय केले की रिफंड प्रक्रिया सुरू होते. यानंतर साधारण 4 ते 5 आठवड्यांत रिफंड येतो. पण जर इतका वेळ होऊनही तुमचा रिफंड मिळाला नाही तर कुठेतरी काहीतरी गडबड असू शकते. हे एकदा तपासून बघायला हवे. आयटीआर रिफंड स्टेटस तपासण्याची पद्धत आणि रिफंड अडकण्याचे कारण समजून घेऊया.

अशा प्रकारे तापासा स्टेटस 

सर्वप्रथम आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइट https://www.incometax.gov.in/iec/foportal/ वर जा.
युजर आयडी, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉग इन करा.
आता तुम्हाला स्क्रीनवर इन्कम टॅक्स रिटर्न फॉर्म दिसेल.
यानंतर फॉर्मच्या खाली असलेल्या ड्रॉप-डाउन लिस्टमधील पर्यायावर क्लिक करा आणि ITR निवडा.
आता तुम्हाला असेसटमेंट इयर भरुन सबमिट करावे लागेल.
यानंतर रिफंडचा स्टेटस तपासण्यासाठी तुम्हाला आयटीआर पावती क्रमांकावर क्लिक करावे लागेल.
यानंतर स्क्रीनवर आयटीआर रिफंडचे स्टेटस दिसून येईल.

दुसरा पर्याय काय?

सर्वप्रथम https://tin.tin.nsdl.com/oltas/refundstatuslogin.html वर जा.
पेज खाली स्क्रोल केल्यावर तुम्हाला 2 प्रकारची माहिती विचारली जाईल. एक पॅन क्रमांक आणि रिफंड बाकी असलेले वर्षे. ही माहिती भरा.
आता तुम्हाला कॅप्चा कोड भरा.
यानंतर Proceed वर क्लिक करा. स्टेटस तुमच्या समोर असेल.
एसएमएसद्वारेही माहिती उपलब्ध होईल.

आयकर विभाग तुम्हाला तुमच्या रिटर्नच्या स्टेट्सबद्दल तुमच्या ईमेल आणि एसएमएसद्वारे माहिती देतो. जर तुमचा रिटर्न प्रोसेसमध्ये असेल तर तुम्हाला त्याबद्दल एसएमएस किंवा ईमेलद्वारे माहिती मिळू शकते. रिटर्नबाबत काही समस्या किंवा त्रुटी असल्यास विभागाकडून त्यासंदर्भातील माहिती तुम्हाला दिली जाते.

कोणत्या चुकांमुळे अडकतो रिटर्न्स 

रिफंड मिळविण्यासाठी तुम्हाला तुमचे आयकर रिटर्न तर भरावे लागेलच. सोबत ते ई-व्हेरिफाय देखील करावे लागेल. जोपर्यंत तुम्ही तुमचा आयटीआर ई-व्हेरिफाय करत नाही तोपर्यंत तुमचा रिटर्न प्रोसेस केला जाणार नाही. ई-व्हेरिफिकेशननंतर रिफंड येण्यासाठी 4 ते 5 आठवडे लागू शकतात. म्हणून हे काम करायला विसरू नका. ई-व्हेरिफिकेशन व्यतिरिक्त आधार पॅनशी लिंक न होणे, आयकर विभागाने पाठवलेल्या ई-मेलला उत्तर न देणे, टीडीएस न जुळणे, तुमचा खाते क्रमांक किंवा आयएफएससी कोड चुकीचा असणे इत्यादी काही चुकांमुळेही रिटर्न्स अडकू शकते.





Source link

Downfall of Canadas once kingmaker Jagmeet Singh

0
Downfall of Canadas once kingmaker Jagmeet Singh



Downfall of Canadas once kingmaker Jagmeet Singh | Canada Election: खलिस्तान समर्थक अन् भारतविरोधी भूमिका घेणाऱ्या नेत्याचा मोठा पराभव, कोण आहेत जगमीत सिंग?





Source link

Collector to facilitate encouragement to emerging sports डॉ. इंदूराणी जाखड

0
Collector to facilitate encouragement to emerging sports डॉ. इंदूराणी जाखड


पालघर :जिल्ह्यातील तरुण खेळाडूंना वाव मिळावा तसेच या खेळाडूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक कमवावा यासाठी जिल्हा प्रशासन विशेष प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांनी प्रतिपादन केले. जिल्हा क्रीडा संकुलाची उभारणी लवकरात लवकर पूर्ण व्हावी, आदिवासी भागातील खेळाडूंसाठी आश्रम शाळेत विशेष प्रशिक्षणाची व्यवस्था व्हावी तसेच खेळाडूंना विविध स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी आर्थिक पाठबळ मिळावे या दृष्टीने वेगवेगळ्या योजना तयार करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पालघर व जिल्हा क्रीडा परिषद यांच्याद्वारे उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन २५ एप्रिल ते १० मे दरम्यान करण्यात आले आहे. या शिबिराला भेट देऊन जिल्हाधिकारी यांनी प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांशी संवाद साधत मार्गदर्शन केले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक पणे चर्चा केली.

दोन सत्रामध्ये पालघर येथील आगरी पाडा मैदान व डॉ. पांडुरंग वामन अमृते शिक्षण संस्थेच्या पटांगणावर आयोजित केल्या जाणाऱ्या या शिबिरामध्ये ॲथलेटिक्स, फुटबॉल, कबड्डी, जिम्नॅस्टिक्स, पावरलिफ्टिंग, वेटलिफ्टिंग, सॉफ्टबॉल, बेसबॉल, खो खो, बॅडमिंटन, वॉलीबॉल, शूटिंग व आर्चरी अशा ११ खेळांचा समावेश करण्यात आला असून तज्ञामार्फत मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले जात आहे.

हेही वाचा

क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे व सरावाची गरज काय असा सवाल जिल्हाधिकारी यांनी प्रशिक्षणार्थींना विचारून लठ्ठपणा व त्या संबंधित आजार दूर ठेवण्यासाठी क्रीडा प्रकार खेळणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. खेळ खेळल्यामुळे शरीराच्या तंदुरुस्ती सोबत शरीरातील ऊर्जा पातळी वाढून वयस्कर होईपर्यंत शरीरातील हालचाली चांगल्या राहत असल्याचे त्यांनी नमूद केले. खेळ खेळल्यामुळे तंदुरुस्ती सोबत बुद्धिमत्तेत वाढ, मानसिक स्वास्थ सुदृढ राहणे, एकाग्रता वाढणे तसेच संघ भावना व नेतृत्व गुण विकसित होण्यात मदत होत असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी प्रत्येक वर्षी नवीन क्रीडा प्रकार बघून अभ्यासावा असेही सल्ला त्यांनी दिला.

पालघर येथे उभारण्यात येणाऱ्या जिल्हा क्रीडा संकुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, जिल्हा क्रीडा संकुलाचा दैनंदिन व देखभाल दुरुस्तीचा खर्चाची तरतूद करण्यासाठी काही भागाचा वाणिज्य वापर करण्यावर योजना बनवणे यासाठी आपण प्रयत्न करू असे सांगितले. जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना आश्रमशाळा स्तरावर प्रशिक्षण मिळण्यासाठी क्रीडा शिक्षकांची नेमणूक करणे व जिल्हास्तरावरून प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन मिळण्यासाठी योजना तयार करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर खेळाडूंना विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी आर्थिक पाठबळ मिळावे यासाठी उद्योगांकडून सहकार्य मिळण्यासाठी प्रयत्नशील राहून असेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यात होणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये सुमारे ७० हजार विद्यार्थी सहभागी होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

विद्यार्थ्यांना शालेय जीवनात खेळातील प्राथमिक ज्ञान व कौशल्य होण्याच्या दृष्टीने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व एम स्पोर्ट्स फाऊडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका निहाय आदिवासी शाळांतील १० ते १४ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी क्रीडा कौशल्य शोध स्पोर्ट्स टॅलेंट हंट उपक्रम राबविण्यात आला आंतरराष्ट्रीय क्रीडा मार्गदर्शक अजित कुलकर्णी व त्यांच्या सहाय्यक संघ यांच्या माध्यमातून मोखाडा, विक्रमगड, जव्हार, वाडा, तलासरी, पालघर, वसई येथील २०० आदिवासी शाळांमधील सहा हजार विद्यार्थी सहभागी झाले होते.





Source link

Wedding groom dances on aaj se teri song for bride funny video viral on social Media

0
Wedding groom dances on aaj se teri song for bride funny video viral on social Media



Wedding groom dances on aaj se teri song for bride funny video viral on social Media | बायकोसाठी काहीही! नवरदेवानं होणाऱ्या बायकोसाठी पहिल्यांदाच केला खतरनाक डान्स; VIDEO पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल





Source link

मोठी बातमी..! मोदी सरकार करणार जातनिहाय जनगणना, कोणत्या समाजाची किती लोकसंख्या? समोर येणार संपूर्ण आकडा

0
मोठी बातमी..! मोदी सरकार करणार जातनिहाय जनगणना, कोणत्या समाजाची किती लोकसंख्या? समोर येणार संपूर्ण आकडा



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची (सीसीएस) बैठक पार पडली. याशिवाय त्यांनी आज मंत्रिमंडळाची बैठक घेतली आणि कॅबिनेट कमिटी ऑन पॉलिटिकल अफेअर्सची बैठकही घेतली. इतकंच नाही तर नरेंद्र मोदी यांनी आर्थिक व्यवहार समितीची बैठकही बोलावली होती.



Source link

देशात जातनिहाय जनगणना होणार! मोदी सरकारचा आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय

0
देशात जातनिहाय जनगणना होणार! मोदी सरकारचा आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय


पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) अध्यतेखाली बुधवारी सुपर कॅबिनेट बैठक पार पडली. या बैठकीत काही महत्त्वाचे मंत्री उपस्थित होते. या बैठकीत जातनिहाय जनगणनेसह अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषद घेत सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. तसंच यापुढील जनगणनेत जातींचीही गणना केली जाईल असं सांगितलं. 

राजकीय घडामोडींवरील केंद्रीय मंत्रिमंडळाची समिती म्हणजेच सीसीपीएला ‘सुपर कॅबिनेट’ म्हणून ओळखलं जाते. या केंद्रीय मंत्रिमंडळात उच्चपदस्थ मंत्र्यांचा समावेश असतो. सीसीपीएच्या सध्याच्या सदस्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समावेश आहे. नरेंद्र मोदी समितीची अध्यक्ष आहेत. यासोबतच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचाही त्यात समावेश आहे.

अश्विनी वैष्णव यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितलं की, “केंद्र सरकारने शिलाँग आणि सिलचरदरम्यान नवीन महामार्ग बांधण्यास मंजुरी दिली आहे, ज्याचा एकूण खर्च 22 हजार 864 कोटी असेल. यासोबतच शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णयही घेण्यात आला आहे.  2025-26 च्या ऊस हंगामासाठी शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 355 रुपये किमान आधारभूत किंमत (MSP) मंजूर करण्यात आली आहे”.

पुढे ते म्हणाले, “आज झालेल्या बैठकीत पुढील जनगणनेत जातीय जनगणनेचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे एक ऐतिहासिक पाऊल मानलं जात आहे. याचं कारण आतापर्यंत जातीय जनगणना मुलभूत जनगणनेचा भाग नव्हती”. 

“काही राज्यांनी त्यांच्या पातळीवर जातीसंबंधी सर्वेक्षण केलं आहे. परंतु सामाजिक रचनेला समजून घेण्यासाठी एक समग्र दृष्टिकोन आवश्यक आहे. सीसीपीएने निर्णय घेतला आहे की आता जातींची गणना पुढील जनगणनेत केली जाईल, कोणत्याही वेगळ्या सर्वेक्षणात नाही,” अशी माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. 





Source link

विद्यार्थ्यांना अमेरिकी व्हिसाबाबत मार्गदर्शन; मुंबईतील अमेरिकी वाणिज्य दूतावासातर्फे ८ मेला मार्गदर्शन

0
विद्यार्थ्यांना अमेरिकी व्हिसाबाबत मार्गदर्शन; मुंबईतील अमेरिकी वाणिज्य दूतावासातर्फे ८ मेला मार्गदर्शन



US Consulate Mumbai Guidance for students on US visas on 8th May विद्यार्थ्यांना अमेरिकी व्हिसाबाबत मार्गदर्शन; मुंबईतील अमेरिकी वाणिज्य दूतावासातर्फे ८ मेला मार्गदर्शन





Source link

Marathi actor Kushal Badrike wish to wife sunayana for wedding anniversary

0
Marathi actor Kushal Badrike wish to wife sunayana for wedding anniversary



Marathi actor Kushal Badrike wish to wife sunayana for wedding anniversary | “आधी मला कायम माझ्या दिसण्यावर न्यूनगंड होता, पण सुनयनाने…”, कुशल बद्रिकेने बायकोसाठी लिहिली खास पोस्ट, म्हणाला…





Source link

$160 Million Gold Treasure Found After 50 Years Hidden Underground

0
0 Million Gold Treasure Found After 50 Years Hidden Underground


$160 Million Gold Treasure Found After 50 Years Underground: ‘द ट्रॅव्हेलर कलेक्शन’ (The Traveller Collection) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या खजिन्यामध्ये ५० वर्षांहून अधिक काळ जमिनीत गाडलेली दुर्मीळ सोन्याची नाणी आढळून आली असून त्यांची सध्याची भारतीय रुपयांतील किमंत सुमारे दीड अब्ज रुपयांच्या घरात आहे. या खजिन्यामुळे दुर्मीळ नाण्यांच्या संशोधनाच्या क्षेत्रात क्रांती होणार असल्याचं मानलं जातं. तज्ज्ञांनी या संपूर्ण संग्रहाला इतिहासातील सर्वात मौल्यवान न्युमिस्मॅटिक (नाणेसंग्रह) कलेक्शन असं संबोधलं आहे. या नाण्यांइतकंच त्यामागचं कथानकही तितकंच थक्क करणारं आहे.

युद्धाच्या गोंधळात गुप्तपणे दडवलेला खजिना

१९२९ साली वॉल स्ट्रीटचा शेअर बाजार कोसळल्यानंतर युरोपमधील एका संग्राहकाने आणि त्यांच्या पत्नीने दुर्मिळ आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची नाणी जमा करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी युरोप आणि अमेरिका फिरून सुंदर, दुर्मीळ आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या नाण्यांचा संग्रह सुरू केला. प्रत्येक नाण्याची नोंद करून त्यांनी एक खास आर्काइव्ह तयार केले. मात्र, दुसऱ्या महायुद्धाची चाहूल लागल्यानंतर आणि नाझी सैन्य युरोपभर फैलावत असताना, या संग्राहकाने एक निर्णायक पाऊल उचललं. त्यांनी नाणी सिगारेट बॉक्स आणि अ‍ॅल्युमिनियमच्या डब्यांमध्ये भरली आणि ती जमिनीत गाडून ठेवली. त्यानंतर ते इतिहासातून अदृश्य झाले. पुढील अनेक दशकं या खजिन्याचा पत्ता लागत नव्हता.

हेही वाचा

पुन्हा उजेडात आलेले ‘ट्रॅव्हेलर कलेक्शन’

५० वर्षांहून अधिक काळानंतर त्या संग्राहकांच्या वारसांनी हा खजिना पुन्हा शोधून काढला. त्यांनी नाणी एका बँकेच्या लॉकरमध्ये हलवली आणि आता ती जगासमोर मांडली जात आहेत. या कलेक्शनचा लिलाव नुमिस्माटिका आर्स क्लासिका (NAC) या लिलाव संस्थेमार्फत २० मे २०२५ पासून सुरू होणार असून, पुढील तीन वर्षांच्या कालावधीत त्याचा टप्प्याटप्प्याने लिलाव होईल. पहिल्या टप्प्यात चार्ल्स दुसरा ते जॉर्ज सहावा या इंग्लिश राजघराण्यांची यंत्राद्वारे तयार केलेली नाणी लिलावात मांडली जातील. एप्रिल महिन्यात ही नाणी NAC च्या लंडन कार्यालयात सार्वजनिक प्रदर्शनात असतील. NAC चे संचालक आर्टुरो रुसो यांच्या मते, “या संग्रहातील अनेक नाणी गेल्या ८० वर्षांत कुठेही पाहायला मिळाली नव्हती, तर काहींचा तर सरकारी नोंदीतही समावेश नाही.”

सोन्याची मौल्यवान आणि ऐतिहासिक नाणी

या संग्रहामधील विशेष नाण्यांपैकी एक म्हणजे १६२९ साली हॅब्सबर्गच्या फर्डिनँड तिसऱ्यासाठी तयार केलेलं १०० डुकॅटचं सोन्याचं नाणं. याचे वजन तब्बल ३४८.५ ग्रॅम असून, त्याची किंमत सुमारे १.३५ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स आहे. तसेच, १६२१ साली पोलंडच्या राजा सिगिस्मुंड तिसऱ्यासाठी तयार केलेलं ७० डुकॅटचं सोन्याचं नाणं सुद्धा महत्त्वाचं असून, त्याचे वजन २४३ ग्रॅम आहे आणि त्याची किंमत अंदाजे ४७१,७०० डॉलर्स आहे. या संग्रहात इराणच्या तेहरान आणि इस्फहानमध्ये अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकात आग्हा मोहम्मद खान काजारच्या कारकिर्दीत तयार केलेली पाच टोमान्सची दुर्मिळ नाणी आहेत. असे केवळ पाच संपूर्ण सेट्स जगभरात अस्तित्वात आहेत. त्यातील एक ऑक्सफर्डच्या अ‍ॅश्मोलियन म्युझियममध्ये ठेवलेलं आहे.

हेही वाचा

संग्राहकाच्या दुर्मिळ नाण्यांची प्रेमगाथा

‘ट्रॅव्हलर कलेक्शन’ मध्ये १०० हून अधिक भौगोलिक क्षेत्रांतील नाणी आहेत. या संग्रहात प्राचीन संस्कृतींपासून ते आधुनिक काळापर्यंतच्या अनेक नाण्यांचा समावेश आहे. या नाण्यांची सुंदर जपणूक, दर्जा आणि इतिहासातील समृद्धी यामुळे हा संग्रह अद्वितीय ठरतो. NAC च्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे की, “अनेक नाणी ही सार्वजनिक लिलावात कधीच झळकलेली नाहीत,” आणि त्यामुळेच ही नाणी अत्यंत दुर्मीळ मानली जात आहेत. मूळ संग्राहकाने तयार केलेल्या तपशीलवार नोंदींमुळे संशोधकांना अनेक नाण्यांच्या उगम स्थळांपर्यंत पोहोचता आले. ‘डेविड गेस्ट नुमिस्मॅटिक्स’चे संचालक आणि कलेक्शनचे सल्लागार डेविड गेस्ट यांनी सांगितले की, “जेव्हा मी ट्रॅव्हेलर कलेक्शनमधील ब्रिटिश नाणी वर्गीकृत करत होतो, तेंव्हा मला हे सर्व स्वप्नवत वाटत होते.”

खरा इतिहास टिकतो

‘ट्रॅव्हलर कलेक्शन’ हा केवळ दुर्मिळ नाण्यांचा संग्रह नाही, तर तो एका संग्राहकाच्या दृष्टिकोनाची, इतिहासप्रेमाची आणि संकटातही संस्कृती जपण्याच्या निश्चयाची साक्ष आहे. जमिनीखाली लपलेलं हे सोनं म्हणजे काळाच्या गर्भात गमावलेला इतिहास पुन्हा नव्यानं जगासमोर उभा राहिल्याचा क्षण आहे. हे संग्रह दाखवून देतात की, अगदी काळाच्या धुळीत गडप झाल्यावरही कलाकृती, खऱ्या आठवणी आणि खरा इतिहास कायमच टिकून राहतो.





Source link

देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त

0
देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त


Deven Bharti : मुंबई पोलिसांना नवा पोलीस आयुक्त मिळाला आहे. भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) अधिकारी देवेन भारती यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विवेक फणसाळकर यांच्या जागी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जाणारे देवेन भारती यांची निवड करण्यात आली आहे. फणसाळकर आज म्हणजेच बुधवारी निवृत्त होत आहेत. देवेन भारती यांनी २६/११ च्या हल्ल्याच्या तपासाचे नेतृत्व केले होते.



Source link