Wednesday, August 19, 2026
Homeदेश-विदेशहोणाऱ्या जावयासोबत पळून गेलेल्या सासूने पोलिसांना सांगितलं 'असं' काही; तुम्हीही डोक्यावर हात...

होणाऱ्या जावयासोबत पळून गेलेल्या सासूने पोलिसांना सांगितलं ‘असं’ काही; तुम्हीही डोक्यावर हात मारुन घ्याल!

होणाऱ्या जावयासोबत पळून गेलेल्या सासूने पोलिसांना सांगितलं ‘असं’ काही; तुम्हीही डोक्यावर हात मारुन घ्याल!

[ad_1]

Gonda Damad Saasu love Story: उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातून एक अशी धक्कादायक घटना समोर आली होती.  ज्याची चर्चा संपूर्ण देशभरात झाली. आणि या घटनेने सर्वांनाच आश्चर्यचकित केले. एक 44 वर्षीय महिला अचानक घरातून बेपत्ता झाली. ज्यामुळे तिचे कुटुंब चिंतेत पडले होते. विशेष म्हणजे महिलेच्या लेकीचे ज्याच्यासोबत लग्न ठरले होते, त्याच पुरुषासोबत ती पळून गेली होती. आता या कहाणीत नवा ट्विस्ट आलाय. कारण जावयासोबत पळून जाणाऱ्या सासूबद्दल नवी माहिती समोर आलीय. 

ही घटना नातेसंबंध आणि भावनांच्या गुंतागुंतीचे जिवंत उदाहरण आहे. सध्या पोलिसांनी महिलेचा शोध घेतला असून ती कुटुंबात परतली आहे. खोडारे पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली गोती.

काय आहे नेमंक प्रकरण? 

गोंडा जिल्ह्यातील खोडारे पोलीस स्टेशन परिसरातील रहिवासी 44 वर्षीय उषा बेपत्ता झाल्याने संपूर्ण कुटुंब आणि परिसर हादरून गेला. 25 एप्रिल रोजी महिला अचानक बेपत्ता झाल्यानंतर तिच्या पतीने खोडारे पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. यानंतर कुटुंब, नातेवाईकांनी आजूबाजूच्या परिसरात महिलेचा खूप शोध घेतला पण कुठेही सुगावा न लागल्याने प्रकरण गंभीर झाले.

तपासात धक्कादायक माहिती उघड 

चौकशीदरम्यान एक धक्कादायक खुलासा झाला. या प्रकरणातून प्रेमकथा समोर आली. ज्यामध्ये सासू आणि तिच्या कथित जावयामध्ये प्रेमाचे सूत जुळले होते. मिळालेल्या माहितीनुसार महिलेच्या मुलीचे लग्न बस्ती जिल्ह्यातील दुबौलिया पोलिस स्टेशन परिसरातील रहिवासी राम स्वरूप यांच्याशी ठरले होते. पण काही कारणामुळे ते लग्न मोडले. लग्न मोडल्यानंतरही उषा आणि राम स्वरूप यांच्यातील संभाषण सुरूच राहिले आणि हळूहळू या संभाषणाचे प्रेमात रूपांतर झाले. त्या महिलेचे आणि राम स्वरूपचे नाते इतके घट्ट झाले की 25 एप्रिल रोजी उषा घर सोडून राम स्वरूपसोबत गेली.

उषा आणि राम स्वरूपने पोलसांना काय सांगितलं?

महिलेच्या बेपत्ता होण्याची बातमी कुटुंबीयांना समजताच ते काळजीत पडले. पतीने पोलिसांची मदत घेतली आणि मग तपास सुरू झाला. दुसरीकडे पोलीस त्यांचा शोध घेत असल्याची माहिती उषा आणि राम स्वरूप यांना कळाली. यानंतर दोघांनाही काळजी वाटू लागली. दोघेही बस्ती जिल्ह्यातील दुबौलिया पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले आणि पोलिसांना संपूर्ण प्रकार सांगितला. 

माझी मानसिक स्थिती ठीक नाही- उषा

बस्ती पोलिसांनी गोंडा पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. यानंतर खोडारे पोलीस ठाण्याच्या पथकाने महिलेला पुन्हा गोंडा येथे आणले. महिलेची पुन्हा चौकशी झाली. यावेळी महिलेने सांगितले की, ‘माझी मानसिक स्थिती ठीक नव्हती. मी स्वतःच्या इच्छेने राम स्वरूपसोबत गेली होती. असे असले तरी आता मला माझ्या पतीकडे परत जायचे आहे.’

पोलीस काय म्हणाले? 

खोडारे पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडल्याच्या वृत्ताला अतिरिक्त पोलीस अधीक्षक मनोज कुमार रावत यांनी दुजोरा दिला. यानंतर पोलिसांनी महिलेला तिच्या पतीकडे सोपवले. आता पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे. महिलेच्या मुलीचे लग्न आता पुढच्या महिन्यात दुसऱ्या कोणाशी तरी ठरलंय. ही संपूर्ण घटना कुटुंबासाठी मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या खूप वेदनादायक बनलीय.



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments