Friday, July 17, 2026
Home Blog Page 318

कर्जतच्या नगराध्यक्षपदी रोहिणी घुले यांची निवड जाहीर

0
कर्जतच्या नगराध्यक्षपदी रोहिणी घुले यांची निवड जाहीर



कर्जतः नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदी रोहिणी घुले यांची आज, शुक्रवारी अधिकृत निवड जाहीर करण्यात आली. नागरी प्रश्न व समस्या सोडवण्यासाठी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्राधान्य देणार असल्याचे नगराध्यक्ष रोहिणी घुले यांनी निवडीनंतर बोलताना सांगितले.

नगराध्यक्षपदी रोहिणी घुले यांची आज बिनविरोध निवड झाल्याची घोषणा प्रांताधिकारी नितीन पाटील यांनी केली. यावेळी मुख्याधिकारी अक्षय जायभाय, गटनेते संतोष मेहत्रे, सचिन घुले, महेश तनपुरे, विनोद दळवी व सर्व नगरसेवक उपस्थित होते.

सभापती राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी (शरद पवार गट) व काँग्रेसच्या ११ नगरसेवकांनी केलेल्या बंडात, काँग्रेसच्या रोहिणी सचिन घुले यांनी महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता तर प्रतिभा नंदकिशोर भैलूमे यांनी आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. घुले यांच्याकडे भाजपच्या दोघांसह एकूण १३ तर भैलुमे यांच्याकडे राष्ट्रवादीचे ४ नगरसेवक होते. राष्ट्रवादीचे गटनेते अमृत काळदाते यांच्या निवडीसंदर्भात याचिका दाखल करण्यात आली होती. त्याचा निकालावर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचा परिणाम होणार होता. मात्र, दि. २९ रोजी निकाल न लागल्यामुळे भैलूमे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे रोहिणी घुले यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिला. रोहिणी घुले यांच्या निवडीची घोषणा आजच्या विशेष सभेमध्ये करण्यात आली.

नागरी समस्या सोडवू- रोहिणी घुले

नगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना रोहिणी घुले यांनी सांगितले की, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, आपण कर्जतमधील नागरी समस्या सोडवू. स्वच्छता, पिण्याचे पाणी, रस्ते, वीज यासह प्राथमिक गरजांना प्राधान्य देऊ. आपल्या निवडीसाठी सर्व नगरसेवकांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आभार.

माजी आमदार अरुण जगताप यांच्या निधनामुळे शांतता

रोहिणी घुले यांची निवड झाल्यानंतर त्यांच्या गटाच्या सर्व नगरसेवकांनी ग्रामदैवत गोधड महाराज मंदिरात जाऊन दर्शन घेतले. निवडीनंतर कुठलाही जल्लोष समर्थकांनी केला नाही. फटाके वाजवले नाहीत. माजी आमदार अरुण जगताप यांच्या निधनामुळे शांततेने निवड साजरी करण्यात आली. जल्लोष टाळला.

उपनगराध्यक्ष निवडीकडे लक्ष

आता उपनगराध्यक्ष निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जिल्हाधिकारी यांनी अमृत काळदाते यांच्या गटनेते पदाच्या निवडीच्या अर्जावर दिलेला निकाल स्थगित केला. तीन आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांनी यावर पुन्हा निर्णय द्यावा, असा आदेश दिला आहे. यामुळे आता जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



Source link

वाहने जप्त होणार; थकीत मिळकतकर वसुलीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेचा निर्णय

0
वाहने जप्त होणार; थकीत मिळकतकर वसुलीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेचा निर्णय



पिंपरी : मिळकतकर थकबाकीदारांच्या सदनिकेच्या भाग दाखल्यावर (शेअर सर्टिफिकेट) थकबाकी नोंदीची प्रक्रिया सुरू केली असताना आता पिंपरी-चिंचवड महापालिकेने थकबाकीदारांचा गृहनिर्माण सोसायटीतील वाहनतळ क्रमांक मागविला आहे. सोसायटीच्या अध्यक्ष, सचिवांना पत्र लिहून ही माहिती मागविली आहे. माहिती मिळताच थकबाकीदारांची वाहने जप्त करण्याचा निर्णय कर संकलन विभागाने घेतला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात सहा लाख ३३ हजार ६६४ निवासी, औद्याेगिक, मिश्र, माेकळ्या जमिनी, औद्योगिक अशा मिळकती आहेत. यांपैकी २०२४-२५ या आर्थिक वर्षात पाच लाख ४७ हजार ६२९ हजार, तर नव्याने नोंदणी झालेल्या ६० हजार ७२ मिळकतधारकांनी ९६६ काेटी रुपयांचा करभरणा केला, तर पाच हजारांपेक्षा अधिक रुपयांची थकबाकी असलेले एक लाख तीन हजार ६७ मिळकतधारक आहेत. त्यांच्याकडे ४५८ कोटी रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये सर्वाधिक ८२ हजार २५६ मिळकती निवासी आहेत.

या थकबाकीदारांच्या सदनिकेच्या भाग दाखल्यावर थकबाकीची नोंदणी केली जात आहे. सभासदांनी मिळकतीची संपूर्ण रक्कम भरल्याशिवाय कोणतेही ना-हरकत प्रमाणपत्र देऊ नये. मिळकतकराची थकबाकी नसल्याचा करसंकलन विभागाचा दाखला सादर केल्यानंतरच भाग दाखल्यावरील नोंदी रद्द कराव्यात, असे पत्र महापालिकेने साेसायटीचे अध्यक्ष आणि सचिवांना दिले आहे.

चालू आर्थिक वर्षाच्या देयकांबरोबरच थकबाकीदारांना मिळकती जप्त करण्याच्या नोटिसाही देण्यात येत आहेत. त्याशिवाय थकबाकीदारांच्या वाहन क्रमाकांचीही माहिती मागविण्यात येत आहे. सोसायटीचे अध्यक्ष, सचिवांनी आठ दिवसांत ई-मेल, व्हॉट्सॲपच्या माध्यमातून माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

वाहनांच्या आरसी बुकवर नोंद

थकबाकीदारांच्या वाहनांचा क्रमांक टाकून मालकाचा शोध घेण्यात येणार आहे. थकबाकीदार असलेल्या वाहन मालकांच्या वाहनाचे नूतनीकरण करू नये, ‘आरसी’ बुकवर थकबाकीची नोंद करावी. त्या संदर्भात पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाशी करारनामा करण्याचे विचाराधीन असल्याचे कर संकलन विभागाने सांगितले.

जप्त मालमत्तांचा जूनमध्ये लिलाव

गेल्या आर्थिक वर्षात १०७५ मालमत्ता महापालिकेने लाखबंद (सील) केल्या होत्या. पहिली, दुसरी नोटीस दिल्यानंतर ६२५ मिळकतधारकांनी कराचा भरणा केला. वारंवार आवाहन करूनही ४५० मिळकतधारकांनी अद्याप कर भरला नाही. त्यामुळे या मिळकती लाखबंदच आहेत. या मिळकतींच्या लिलावाची प्रक्रिया सुरू आहे. मिळकतीचे मूल्य काढण्यात येत असून, जूनमध्ये या मिळकतींचा लिलाव करण्यात येणार आहे.

निवासी थकबाकीदारांच्या वाहन क्रमांकांची माहिती मागविण्यात आली आहे. ही माहिती मिळताच वाहने जप्त केली जाणार आहेत. बिगरनिवासी, औद्योगिक, मिश्र या मिळकती लाखबंद करण्यात येणार आहेत.- अविनाश शिंदे,सहायक आयुक्त, करसंकलन विभाग,पिंपरी-चिंचवड महापालिका



Source link

Miraj 2000: सर्जिकल स्ट्राईकचा हिरो पुन्हा सज्ज, फायटर जेट ठरणार दहशतवाद्यांचा कर्दनकाळ!

0
Miraj 2000: सर्जिकल स्ट्राईकचा हिरो पुन्हा सज्ज, फायटर जेट ठरणार दहशतवाद्यांचा कर्दनकाळ!


Miraj 2000 fighter jet: भारताच्या लष्करी सामर्थ्याच्या दर्शनाने पाकिस्तानची अक्षरक्षा बोबडी वळलीय. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सर्जिकल स्ट्राईक करत पाकिस्तानी दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करत अनेक दहशतवाद्यांना खात्मा केलाय. एअर स्ट्राईक करणारं आपलं तेज मिराज विमान सज्ज झालंय. त्यामुळे पाकिस्तान आणि दहशतवाद्यांची काही खैर नाही.

सर्जिकल स्ट्राईकचा हिरो मिराज 2000 ची पुन्हा चर्चा सुरु झालीय. याच मिराजने केलेल्या बालाकोट सर्जिकल स्ट्राईकने तुम्ही पोसलेल्या दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला करत त्यांचा खात्मा केला होता. आता सर्जिकल स्ट्राईकचा भारताचा हिरो पुन्हा एकदा सज्ज झालाय. मिराज भारतीय वायुसेनेसाठी एक शक्तिशाली आणि बहुमुखी लढाऊ विमान आहे.

त्यामुळे पाकिस्तान्यांनो तुमची काही खैर नाही.. पाक आणि दहशतवाद्यांचा निकाल लावण्यासाठी मिराज 2000 पुन्हा एकदा सज्ज झालंय. 1999 कागरिल युद्धातही याच मिराजने पाकिस्तान्यांवर लेझर-गाइडेड बॉम्ब्सचा अचूक मारा केला होता. तर 2019 च्या हवाई हल्ल्यातही दहशतवाद्यांची राख केली होती.

सर्जिकल स्ट्राईकचा हिरो पुन्हा सज्ज

‘मिराज 2000’ 1985 साली भारतीय वायुदलात सामील झाला.  कारगिल युद्ध आणि बालाकोट हवाई हल्ल्यात मोठी कामगिरी बजावली होती. भारतीय वायुसेनेत ‘वज्र’ नावानं ओळखलं जातं. गुप्तचर आणि सामरिक अण्वस्त्र वाहक म्हणून कार्यक्षम असून  मिराज 6,300 किलो शस्त्रे वाहू शकते, ज्यात नऊ हार्डपॉइंट्स असतात. 

थालेस RDY रडार आहे, जे 100 किमी अंतरावर टार्गेट्स ओळखू शकतं. मिराज 2000 लो-लेव्हल उड्डाणासाठी उत्कृष्ट, शत्रूच्या रडारला चकवण्यास सक्षम आहे. मिराज फायटर जेटने 1999 च्या कारगिल युद्धात लेझर-गाइडेड बॉम्ब्ससह अचूक हल्ले करते. 2019 च्या बालाकोट हवाई हल्ल्यात स्पाइस-2000 बॉम्ब्स टाकून दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. भारतीय वायुदलाच्या ताफ्यात 50 मिराज विमानं आहे. मिराज भारतीय वायुसेनेसाठी अत्यंत विश्वासार्ह मानले जाते.  

हेच भारताचं लढाऊ विमान मिराज आता सज्ज झालंय. त्यामुळे पाकिस्तान्यांचे धाबे दणाणलेत. भारताचं हे फायटर जेट दहशतवाद्यांना पाणी पाजायला सज्जा झालंय. त्यामुळे पाकिस्तानची गाळण उडालीय.





Source link

काश्मीरमधील ‘अंबानी’ तुम्हाला माहितीये का? दहशतवादाच्या छायेत उभारला अब्जावधींचा उद्योग

0
काश्मीरमधील ‘अंबानी’ तुम्हाला माहितीये का? दहशतवादाच्या छायेत उभारला अब्जावधींचा उद्योग


Grand Mumtaz Hotel : आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण असं विचारल्या तर लहान मुलादेखील सांगतो मुकेश अंबानी. धीरूभाई अंबानी यांच्या निधनानंतर मुकेश अंबानी यांनी उद्योगाला नवीन उंचीवर नेलं. वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी आपलं उद्योग विस्तारला आहे. जेव्हा आपण काश्मीरबद्दल बोलतो तेव्हा तुमच्या डोळ्यासमोर दहशवादी हल्ला आठवतो. काही दिवसांपूर्वी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 27 जणांचा नाहक बळी गेला. जम्मू – काश्मीरमध्ये अशी घटना घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. काश्मीर हे कायम दहशतवादीखाली वावरत असतं. पाकिस्तानच्या नापाक कारवायामुळे इथे एक प्रकारची अशांतता पसरली आहे. अशा या काश्मीरमध्ये एका उद्योगपतीने आपलं नाव मोठं केलंय. या व्यक्तीला काश्मीरमधील अंबानी म्हणून ओळखलं जातं. 

कोण आहेत काश्मीरमधील अंबानी?

आम्ही बोलत आहोत, काश्मीरच्या मुश्ताक अहमद छाया यांनी धैर्याने “ग्रँड मुमताज” ही हॉटेल साखळी स्थापन केली असून त्यांनी हे साम्राज्य काश्मीरपासून दिल्लीपर्यंत उभारलंय. मुश्ताक अहमद छाया यांनी 1984 मध्ये गुलमर्गमधील एका छोट्या हॉटेलपासून सुरुवात केली आणि पर्यटन क्षेत्रात प्रवेश केला. सध्या त्यांच्याकडे जम्मू-काश्मीर आणि दिल्लीमध्ये एकूण 14 हॉटेल्स आणि 450 हून अधिक खोल्या आहेत. आज त्यांचा मुश्ताक हॉटेल ग्रुप काश्मीर, जम्मू आणि दिल्लीमध्ये पसरलेला आहे. ज्याची रेडिसन, एलटीएच आणि ब्लूम सारख्या प्रतिष्ठित ब्रँडसोबत भागीदारी आहे. (Ambani of Kashmir mushtaq ahmad chaya He built a multi billion dollar industry under the shadow of terrorism)

काश्मीरच्या खोऱ्यांपासून ते देशाच्या राजधानीपर्यंत, मुश्ताक हॉटेल ग्रुप भारतीय हॉटेल उद्योगात एक प्रतिष्ठित नाव म्हणून उदयास आले आहे. नवी दिल्लीत ग्रँड मुमताज (काश्मीर), जेहलम रिसॉर्ट्स (जम्मू) आणि राणी कॅसल आणि पी-51 सारख्या हॉटेल्ससह, हा समूह देशाच्या विविध भागात उत्कृष्ट सेवांसाठी ओळखला जातो. मुश्ताक ग्रुपची हॉटेल्स नैसर्गिक सौंदर्यासोबतच अत्याधुनिक डिझाइनचे प्रदर्शन करतात. ही हॉटेल्स काश्मीरच्या टेकड्या, वाहत्या नद्या, बर्फाच्छादित लँडस्केप्स आणि गोल्फ कोर्सच्या विहंगम दृश्यांमध्ये वसलेली आहेत.

या हॉटेलमधील पदार्थ खूप प्रसिद्ध!

मुश्ताक ग्रुपच्या रेस्टॉरंट्समध्ये चायनीज, कॉन्टिनेंटल, इंडियन, मुघलाई, काश्मिरी वझवान आणि थाई असे विविध पदार्थ मिळतात. शाकाहारी जेवणाचीही विशेष व्यवस्था आहे. याशिवाय, मुश्ताक हॉटेल ग्रुप पर्यटकांसाठी परवडणारे आणि वैयक्तिकृत टूर पॅकेजेस देखील प्रदान करते. मुश्ताक अहमद छाया यांनी हे सिद्ध केले आहे की, जर इच्छाशक्ती प्रबळ असेल तर दहशतवादाच्या सावलीतही व्यवसायाला नवीन उंचीवर नेता येते.





Source link

भारताच्या भीतीने लाहोरच्या बिळात लपला हाफिज सईद, भारताला सापडला ठावठिकाणा!

0
भारताच्या भीतीने लाहोरच्या बिळात लपला हाफिज सईद, भारताला सापडला ठावठिकाणा!


Hafiz Saeed: पहलगाम हल्ल्यानंतर भारताने दहशतवाद्यांचा बिमोड करण्याचा इरादा पक्का केलाय. त्यामुळे दहशतवाद्यांचे आणि पाकिस्तानचे धाबे दणाणलेत. भारतावर दहशतवादी कारवाया करणारा लष्कर ए तोयबाचा संस्थापक हाफिज सईदही लाहोरमध्ये लपल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळालीय. दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानने मोस्ट वॉन्टेड दहशतवादी हाफिज सईदला सुरक्षाही पुरवलीय. मात्र भारतीय लष्करालाही हाफिज सईदचा पाकिस्तानातील ठावठिकाणा सापडलाय.

दहशतवाद्यांचा पोशिंदा असलेल्या पाकिस्तानचं कंबरडं मोडण्याचा निश्चय भारत सरकारने केल्यानंतर पाकिस्तानची त्रेधा तिरपीट उडालीय. 26/11 सह अनेक दहशतवादी हल्ल्यांचा मास्टरमाईंड असलेला हाफिज सईदही पाकिस्तानातच लपल्याचं आता समोर आलंय. दहशतवादाशी आपला संबंध नसल्याचं सांगणाऱ्या पाकनेच मोस्ट वॉन्टेड क्रूरकर्मा दहशतवादी हाफिस सईदला पाकिस्तानातच लपवलाय. 

हाफिज सईदचा पाकिस्तानातील ठावठिकाणा आता सापडलाय. हाफिज सईदच्या घराचे सॅटेलाईट फोटो समोर आलेत. लाहोरच्या जोहर टाऊनमध्ये हाफिज सईदचं आलिशान घर आहे. लाहोरमध्ये हाफिज सईदचं भलं मोठं घरं, त्याच्यासाठी स्वतंत्र मशिद आणि खासगी पार्क असल्याचं समोर आलंय.

तर हाफिज सईद पाकिस्तानात नाही असा कांगावा करणाऱ्या पाकिस्तानने पहलगाम हल्ल्यानंतर हाफिजच्या सुरक्षेत मोठी वाढ केलीय.हाफिज सईदला आता पाकिस्तानने चार स्तरीय सुरक्षा देण्यात आलीय. त्याच्या घराच्या चारही बाजुंनी पाक लष्कराचे जवान सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेत. तर सीसीटीव्हीच्या निगरानी खाली त्याचं घरं आहे. जगभरातील अनेक दहशतवादी कारवायांमध्ये हाफिज सईद हा सुत्रधार आहे.

कोण आहे हाफिज सईद?

हाफिज सईद हा जमात-उद-दवा आणि लष्कर-ए-तोयबा या अतिरेकी संघटनेचा संस्थापक आहे. तो मुंबईमधील 26/11 च्या हल्ल्याचा मास्टरमाईंड आहे. संयुक्त राष्ट्र संघाकडून त्याला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आलंय. काश्मीर खोऱ्यातील दहशतवादामध्ये हाफिज सईदचा हात आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेतलीय. दहशतवादी हल्ल्यांनंतर तो मी नव्हेच असा कांगावा करणाऱ्या पाकिस्तानने मात्र दहशतवाद्याला शरण दिलीय.आणि दहशतवादी हाफिज सईदला लपवत त्याला सुरक्षा पुरवलीय. मात्र भारत या क्रूरकर्म्याला सोडणार नाही हेही तेवढंच खरंय.





Source link

Earthquake News Powerful earthquake hits Argentina and Chile magnitude 7 4 tremors felt

0
Earthquake News Powerful earthquake hits Argentina and Chile magnitude 7 4 tremors felt



Earthquake News Powerful earthquake hits Argentina and Chile magnitude 7 4 tremors felt | अर्जेंटिना आणि चिलीमध्ये ७.४ तीव्रतेचा भूकंप, त्सुनामीचाही इशारा; लोकांमध्ये भीतीचे वातावरण, समुद्रकिनारेही रिकामे करण्याचे निर्देश



Source link

A son killed his father then filed missing complaint against his father in gadchiroli

0
A son killed his father then filed missing complaint against his father in gadchiroli


गडचिरोली: वडिलांची हत्या करुन मुलाने मित्राच्या मदतीने मृतदेह जंगलात फेकला. त्यानंतर वडील बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली.

१५ दिवसांनी मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी चौकशी सुरु केली, त्यामुळे भंडाफोड होण्याच्या भीतीने हादरलेल्या मुलाने चिचडोह बॅरेजमध्ये उडी घेतली. मात्र, सुदैवाने तो वाचला. पोलिसांनी सखोल चौकशी केल्यावर अखेर त्याने वडिलांच्या हत्येची कबुली दिली.

चामोर्शी तालुक्यातील मार्कंडादेव येथील मर्डर मिस्ट्रीच्या थरारपटाचा २ मे रोजी उलगडा झाला. पोलिसांनी मुलासह त्याच्या मित्राला अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, रेवनाथ लक्ष्मण कोडापे(५५ , रा. मार्कंडादेव, ता. चामोर्शी असे मयताचे नाव आहे. मुलगा आकाश रेवनाथ कोडापे ( २९ ) व त्याचा मित्र लखन मडावी (२५ , रा. गडचिरोली) यांचा आरोपींमध्ये समावेश आहे.

रेवनाथ हे मार्कंडादेव येथील देवस्थानच्या यात्री निवासमध्ये मजुरी काम करत. मुलगा आकाश हा देखील मजुरीकाम करायचा. पिता- पुत्रांमध्ये सतत वाद होत. वडील सतत शिवीगाळ करतात, त्यामुळे आकाशच्या मनात राग होता. त्यातच आकाशने पैसे मागितल्यामुळे देखील वडिलांसोबत त्याचा वाद झाला होता. १५ एप्रिल रोजी पिता- पुत्रात वादाची ठिणगी पडली. हा वाद विकोपाला गेला. या वादात मुलगा आकाशने ओढणीने गळा आवळून वडिलांची हत्या केली. त्यानंतर मित्र लखन मडावीला जीप घेऊन बोलावले व त्यात मृतदेह टाकून दोघांनी बामनपेठ जंगलात मृतदेह फेकून दिला.

हेही वाचा

दुसऱ्या दिवशी आकाशने वडील बेपत्ता असल्याची तक्रार चामोर्शी ठाण्यात दिली. याच दरम्यान, ३० एप्रिल रोजी एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह बामनपेठ जंगलात आढळला. ही माहिती आकाशला झाली. त्यामुळे आपला भंडाफोड होईल, हातात बेड्या पडतील, यामुळे तो भयभीत झाला, यातून त्याने १ मे रोजी चिचडाेह बॅरेजमध्ये उडी घेतली. त्यानंतर आष्टी पोलिसांनी आकाशची चौकशी केली. यावेळी त्याने वडिलांच्या हत्येची कबुली दिली. त्याच्यासह मित्र लखन मडावी यास पोलिसांनी ताब्यात घेतले. प्रभारी पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस निरीक्षक विशाल काळे करत आहेत.

नातेवाईकाला फोन करुन पाण्यात उडी

१ मे रेाजी सकाळी साडेसात वाजता दुचाकीवरुन आकाश चिचडोह बॅरेजवर पोहोचला. यावेळी त्याने आपल्याएका नातेवाईकाला फोन करुन वडील गेले, आता माझ्या भावाला सांभाळा, असे म्हणत मी चिचडोह बॅरेजमध्ये उडी घेत असल्याचे कळविले. त्यानंतर त्याने बॅरेजमध्ये उडी घेतली, पण तो तरंगत पाण्यावर आला. याचवेळी एक लोखंडी गज त्याच्या हाती लागला. त्यास पकडून तो तरंगत राहिला. याचदरम्यान कुटुंबीय व नातेवाईकांनी तेथे धाव घेतली व त्यास सुखरुप बाहेर काढले.

वर्षभरापूर्वीच झाला होता आकाशचा विवाह

रेवनाथ कोडापे यांच्या पत्नीचे निधन झाले होते. दोन मुलांसह ते राहत. वर्षभरापूर्वी आकाशचा विवाह झाला होता. कौटुंबीक कलहातून आकाशने वडिलांचा जीव घेतला, खुनाच्या आरोपात तो स्वत: तुरुंगात गेला. घरात केवळ आकाशची पत्नी व त्याचा धाकटा भाऊ हे दोघेच राहिले आहेत. वादविवादातून संपूर्ण परिवार उध्दवस्थ झाला.

ओढणीमुळे संशय, चौकशीत गडबडला

घटनास्थळी रेवनाथ यांच्या मृतदेहाजवळ ओढणी आढळून आली. पुरुष ओढणी वापरत नाहीत, त्यामुळे पोलिसांना घातपाताचा संशय होताच, नंतर आकाशचा आत्महत्येचा प्रयत्न, चौकशीत त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, शिवाय तो घाबरूनही गेला होता. त्याच्या एकूण हालचालींमुळे संशयाची सूई त्याच्या दिशेने वळाली अन् त्याचा पर्दाफाश झाला.



Source link

आरटीईच्या प्रवेशाकडे पालकांनी फिरवली पाठ , जिल्ह्यात २५७ तर रत्नागिरी तालुक्यात १२६ जागा रिक्तच

0
आरटीईच्या प्रवेशाकडे पालकांनी फिरवली पाठ , जिल्ह्यात २५७ तर रत्नागिरी तालुक्यात १२६ जागा रिक्तच



in Ratnagiri district 257 seats remain vacant in RTE admission आरटीईच्या प्रवेशाकडे पालकांनी फिरवली पाठ , जिल्ह्यात २५७ तर रत्नागिरी तालुक्यात १२६ जागा रिक्तच



Source link

Eknath Shinde Satara | महापर्यटन उत्सवाच्या उद्घाटनासाठी, शिंदेंचं हेलिकॉप्टर महाबळेश्वरमध्ये लँड

0


ABP Majha Batmya

22 Apr, 07:55 PM (IST)

Narhari Zirwal Video : झिरवळांची बालमित्राला घट्ट मिठी,हेलिकॉप्टर दाखवलं, पायलटलाही भेटवलं



Source link

malti marie has started going to kindergarten karate classes dad nick jonas gives cute updates

0
malti marie has started going to kindergarten karate classes dad nick jonas gives cute updates



malti marie has started going to kindergarten karate classes dad nick jonas gives cute updates | प्रियांका चोप्राची तीन वर्षांची मुलगी मालती शिकतेय कराटे, पहिला बेल्टही मिळाला अन्…; निकने लेकीबद्दल सांगितल्या ‘या’ गोष्टी



Source link