Monday, August 31, 2026
Homeदेश-विदेशकाश्मीरमधील 'अंबानी' तुम्हाला माहितीये का? दहशतवादाच्या छायेत उभारला अब्जावधींचा उद्योग

काश्मीरमधील ‘अंबानी’ तुम्हाला माहितीये का? दहशतवादाच्या छायेत उभारला अब्जावधींचा उद्योग

काश्मीरमधील ‘अंबानी’ तुम्हाला माहितीये का? दहशतवादाच्या छायेत उभारला अब्जावधींचा उद्योग

[ad_1]

Grand Mumtaz Hotel : आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण असं विचारल्या तर लहान मुलादेखील सांगतो मुकेश अंबानी. धीरूभाई अंबानी यांच्या निधनानंतर मुकेश अंबानी यांनी उद्योगाला नवीन उंचीवर नेलं. वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी आपलं उद्योग विस्तारला आहे. जेव्हा आपण काश्मीरबद्दल बोलतो तेव्हा तुमच्या डोळ्यासमोर दहशवादी हल्ला आठवतो. काही दिवसांपूर्वी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 27 जणांचा नाहक बळी गेला. जम्मू – काश्मीरमध्ये अशी घटना घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. काश्मीर हे कायम दहशतवादीखाली वावरत असतं. पाकिस्तानच्या नापाक कारवायामुळे इथे एक प्रकारची अशांतता पसरली आहे. अशा या काश्मीरमध्ये एका उद्योगपतीने आपलं नाव मोठं केलंय. या व्यक्तीला काश्मीरमधील अंबानी म्हणून ओळखलं जातं. 

कोण आहेत काश्मीरमधील अंबानी?

आम्ही बोलत आहोत, काश्मीरच्या मुश्ताक अहमद छाया यांनी धैर्याने “ग्रँड मुमताज” ही हॉटेल साखळी स्थापन केली असून त्यांनी हे साम्राज्य काश्मीरपासून दिल्लीपर्यंत उभारलंय. मुश्ताक अहमद छाया यांनी 1984 मध्ये गुलमर्गमधील एका छोट्या हॉटेलपासून सुरुवात केली आणि पर्यटन क्षेत्रात प्रवेश केला. सध्या त्यांच्याकडे जम्मू-काश्मीर आणि दिल्लीमध्ये एकूण 14 हॉटेल्स आणि 450 हून अधिक खोल्या आहेत. आज त्यांचा मुश्ताक हॉटेल ग्रुप काश्मीर, जम्मू आणि दिल्लीमध्ये पसरलेला आहे. ज्याची रेडिसन, एलटीएच आणि ब्लूम सारख्या प्रतिष्ठित ब्रँडसोबत भागीदारी आहे. (Ambani of Kashmir mushtaq ahmad chaya He built a multi billion dollar industry under the shadow of terrorism)

काश्मीरच्या खोऱ्यांपासून ते देशाच्या राजधानीपर्यंत, मुश्ताक हॉटेल ग्रुप भारतीय हॉटेल उद्योगात एक प्रतिष्ठित नाव म्हणून उदयास आले आहे. नवी दिल्लीत ग्रँड मुमताज (काश्मीर), जेहलम रिसॉर्ट्स (जम्मू) आणि राणी कॅसल आणि पी-51 सारख्या हॉटेल्ससह, हा समूह देशाच्या विविध भागात उत्कृष्ट सेवांसाठी ओळखला जातो. मुश्ताक ग्रुपची हॉटेल्स नैसर्गिक सौंदर्यासोबतच अत्याधुनिक डिझाइनचे प्रदर्शन करतात. ही हॉटेल्स काश्मीरच्या टेकड्या, वाहत्या नद्या, बर्फाच्छादित लँडस्केप्स आणि गोल्फ कोर्सच्या विहंगम दृश्यांमध्ये वसलेली आहेत.

या हॉटेलमधील पदार्थ खूप प्रसिद्ध!

मुश्ताक ग्रुपच्या रेस्टॉरंट्समध्ये चायनीज, कॉन्टिनेंटल, इंडियन, मुघलाई, काश्मिरी वझवान आणि थाई असे विविध पदार्थ मिळतात. शाकाहारी जेवणाचीही विशेष व्यवस्था आहे. याशिवाय, मुश्ताक हॉटेल ग्रुप पर्यटकांसाठी परवडणारे आणि वैयक्तिकृत टूर पॅकेजेस देखील प्रदान करते. मुश्ताक अहमद छाया यांनी हे सिद्ध केले आहे की, जर इच्छाशक्ती प्रबळ असेल तर दहशतवादाच्या सावलीतही व्यवसायाला नवीन उंचीवर नेता येते.



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments