Thursday, June 25, 2026
Home Blog Page 3162

Zwigato Trailer: कॉमेडियन कपिल शर्मा बनलाय ‘डिलिव्हरी बॉय’; ‘झ्विगॅटो’चा ट्रेलर पाहिला का?

0
Zwigato Trailer: कॉमेडियन कपिल शर्मा बनलाय ‘डिलिव्हरी बॉय’; ‘झ्विगॅटो’चा ट्रेलर पाहिला का?


‘झ्विगॅटो’ ही एक गंभीर विषयावर आधारित कथा आहे, ज्याचा लोकांवरही मोठा परिणाम होण्याची अपेक्षा आहे. या चित्रपटात कपिल शर्मा फूड डिलिव्हरी बॉयच्या भूमिकेत दिसत आहे. जो तुटपुंज्या कमाईसाठी रात्रंदिवस मोठमोठ्या सोसायट्यांच्या आणि घरांच्या पायऱ्या चढतो. या चित्रपटात एका डिलिव्हरी बॉयला सोसायटीची लिफ्ट कशी वापरू दिली जात नाही, हेही एक अतिशय भावूक दृश्य दाखवण्यात आले आहे.



Source link

Aai Kuthe Kay Karte: अरुंधतीचं तुटलेलं मंगळसूत्र पाहून आशुतोषलाही बसला मोठा धक्का!

0
Aai Kuthe Kay Karte: अरुंधतीचं तुटलेलं मंगळसूत्र पाहून आशुतोषलाही बसला मोठा धक्का!


Aai Kuthe Kay Karte Latest Update: सगळ्या संकटांना समोरं जात अरुंधती आणि आशुतोष यांनी लग्न करण्याचा ठाम निर्णय घेतला आहे.



Source link

RRR Movie: ऑस्कर आधीच अमेरिकेत होणार ‘आरआरआर’ची स्क्रिनिंग; तिकीट बुकिंगचाही विक्रम!

0
RRR Movie: ऑस्कर आधीच अमेरिकेत होणार ‘आरआरआर’ची स्क्रिनिंग; तिकीट बुकिंगचाही विक्रम!


‘आरआरआर’चे स्क्रिनिंग ज्या थिएटरमध्ये आयोजित करण्यात आले आहे त्याची क्षमता १६४७ आसनांची आहे. मात्र, हे थिएटर आताच पूर्णपणे बुक झाले आहे. अमेरिकेत ‘आरआरआर’ची क्रेझ किती आहे, हे यावरूनच समजू शकते. या स्क्रीनिंगनंतर प्रश्नोत्तरांचे सेशन होणार असून, यामध्ये राजामौली, राम चरण आणि कीरावनी प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरे देणार आहेत.



Source link

Irrfan Khan: इरफान खानच्या गर्लफ्रेंडवर भाळला होता नवाजुद्दीन सिद्दीकी; भावाचा मोठा खुलासा!

0
Irrfan Khan: इरफान खानच्या गर्लफ्रेंडवर भाळला होता नवाजुद्दीन सिद्दीकी; भावाचा मोठा खुलासा!


इरफान खान आणि नवाज यांनी ‘पान सिंह तोमर’, ‘द लंचबॉक्स’, ‘न्यूयॉर्क’ आणि ‘आजा नचले’ यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. मात्र, एकेकाळी दोघांमध्ये दुरावा निर्माण झाल्याचे बोलले जात होते. मात्र, दोघांमध्ये भांडण कशामुळे झाले, याचे कारण कधीच समोर आले नव्हते. आता नवाजचा भाऊ शमास सिद्दीकी याने याचा खुलासा केला आहे.



Source link

Billi Billi Teaser: सलमान खानच्या नव्या गाण्याचा टीझर रिलीज! ‘बिल्ली बिल्ली’ची झलक पाहिलीत?

0
Billi Billi Teaser: सलमान खानच्या नव्या गाण्याचा टीझर रिलीज! ‘बिल्ली बिल्ली’ची झलक पाहिलीत?


अभिनेत्री पूजा हेगडे या चित्रपटात सलमान खानसोबत पहिल्यांदाच ऑनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे. व्यंकटेश दग्गुबती, पूजा हेगडे, जगपती बाबू, भूमिका चावला, विजेंदर सिंग, अभिमन्यू सिंग, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल, शहनाज गिल, पलक तिवारी आणि विनाली भटनागर हे कलाकार देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट २०२३च्या ईदला प्रदर्शित होणार आहे.



Source link

Ye Na Punha: संगीताची बहरदार मैफिल घेऊन सायली संजीव आणि अभिनय बेर्डे पहिल्यांदाच एकत्र झळकणार!

0
Ye Na Punha: संगीताची बहरदार मैफिल घेऊन सायली संजीव आणि अभिनय बेर्डे पहिल्यांदाच एकत्र झळकणार!


या संगीतमय आणि रोमँटिक चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा दिग्दर्शक तेजस कुलकर्णी यांनी सांभाळली आहे. या चित्रपटात अभिनेता अभिनय बेर्डे आणि अभिनेत्री सायली संजीव यांच्या सोबत समीर धर्माधिकारी, अमोल कागणे, नितीश चव्हाण, आशय कुलकर्णी झळकणार आहेत. या चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी निर्माते लक्ष्मण कागणे, किरण कुमावत, स्वाती खोपकर, हर्षवर्धन गायकवाड, सागर पाठक आणि अमोल लक्ष्मण कागणे यांनी सांभाळली आहे.



Source link

सातारा : अमृतवाहिनी नद्या उपक्रमाचे काय झाले? .. नागरिकांचा सवाल | पुढारी

0









सातारा;  पुढारी वृत्तसेवा :  केंद्र शासनाचा महत्त्वपूर्ण उपक्रम असलेला अमृतवाहिनी नद्या कार्यक्रमाचा जल्लोषात सातारा जिल्ह्यात प्रारंभ झाला; पण नंतर काहीच उपक्रम न झाल्याने अमृतवाहिनी नद्या होणार तरी कधी? असा प्रश्न जनतेमधून उपस्थित केला जात आहे.

जलतज्ञ राजेंद्रसिंग राणा यांच्या मार्गदर्शनाने हा उपक्रम राबवला जाणार आहे. शासनाने याबाबतची रुपरेषा तयार केल्यानुसार त्याची सुरुवात सातारा जिल्ह्यातील विविध गावांत विशेषकरून कृष्णाकाठच्या गावातून झाली. याबाबतचे पहिल्या टप्प्यातील कार्यक्रम उत्साहात पार पडले. अमृतवाहिनी नद्यांसाठी झालेल्या पहिल्या कार्यक्रमाची छायाचित्रासह बातम्या प्रसारमाध्यमातून आल्या. मात्र, या गोष्टीला जवळपास महिना होत आला तरी पुढे काहीच कार्यवाही होत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे नागरिक साशंक आहेत.

अमृतवाहिनी नद्या हा उपक्रम नेमका काय आहे आणि तो कशाप्रकारे रावबला जाणार आहे? याची काहीच माहिती जनतेला नसल्यानेे या उपक्रमाबाबत ते साशंक आहेत.











Source link

Korean Drama : थ्रिलर, सस्पेन्स अन् रोमान्स; मार्च महिन्यात रिलीज होणार ‘या’ बहुप्रतीक्षित कोरियन सीरिज!

0
Korean Drama : थ्रिलर, सस्पेन्स अन् रोमान्स; मार्च महिन्यात रिलीज होणार ‘या’ बहुप्रतीक्षित कोरियन सीरिज!


Korean Drama Series releasing in March 2023: मार्च महिन्यात काही नव्या वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. के ड्रामा चाहते देखील या वेब सीरिजची बऱ्याच काळापासून वाट बघत आहेत.



Source link

सातारा : ‘महाराष्ट्र केसरी’च्या मानधनाचा आकडा ठरणार कधी? | पुढारी

0


सातारा; पुढारी वृत्तसेवा :  मातीतला रांगडा खेळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या विजेत्या मल्लाचा आजपर्यंत मानधनाचा आकडा ठरला नाही. अहमदनगर येथे महाराष्ट्र केसरी मैदान भरवण्याच्या अंतर्गत हालचाली सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्र केसरी विजेत्या पैलवानासह विविध वजनी गटासह महाराष्ट्र केसरी विजेत्याच्या मानधनाचा आकडा कधी ठरवणार? अशी विचारणा होऊ लागली आहे. संयोजकांच्या मनावर नको तर ठोस मानधन मिळावे, असा कुस्तीक्षेत्रातून सूर उमटू लागला आहे.

महाराष्ट्राचे कुस्तीक्षेत्र महाराष्ट्र केसरी स्पर्धेने ढवळून निघते. हजारांहून अधिक कुस्तीगिरांच्या चीतपट, चिवट आणि शर्थीच्या झुंजी याच स्पर्धेत दिसून येतात. ऑलिम्पिक पदक जिंकल्याचा आनंद विजेत्याला होतोच, परंतु त्याला मिळणारा मानही कणभर ऑलिम्पिक विजेत्यापेक्षा जास्त असल्याने आपल्या कुस्ती कारकिर्दीत महाराष्ट्र केसरी होण्याच स्वप्न प्रत्येक कुस्तीगीरचे असते.
पुण्यात 1953 मध्ये महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची स्थापना होताच महाराष्ट्रातील अजिंक्य मल्ल ठरवण्यासाठी एक स्पर्धा भरवण्याचा विचार कुस्तीमहर्षी स्व. मामासाहेब मोहोळ यांच्या मनात आला. त्यावेळी महाराष्ट्रचे मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण होते. त्यांच्यासह स्व. भाऊसाहेब हिरे, स्व. बाळासाहेब देसाई हे या परिषदेच्या कार्यकारिणीवर होते. मुंबई येथे 1955 मध्ये दुसरे अधिवेशन झाले तेव्हाच महाराष्ट्र केसरी स्पर्धा सुरू करण्यात आली.

त्यानंतर आजपर्यंत महाराष्ट्र केसरीचे मैदान भरवले जाते. महाराष्ट्र केसरी मैदानाच्या संयोजकांवर मानधनाचे स्वरूप अवलंबून आहे. केवळ पदक, प्रमाणपत्रावर समाधान मानलेले ज्येष्ठ पैलवान आज पाहायला मिळतात. परंतु, काळानुरूप स्पर्धेचे बदलेले स्वरूप आणि वाढलेला राजकीय हस्तक्षेप यामुळे संयोजकांकडून मानधन देण्यास प्रारंभ झाला. परंतु, प्रत्येक स्पर्धेत मानधन समान नसते. महिन्याभरापूर्वी पुण्यात झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत विजेत्यांवर बक्षिसांचा पाऊस पडला. पुढील स्पर्धा अहमदनगर येथे घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. वाढत्या महागाईत खुराकासह प्रवास, जेवण, नाश्ताचा खर्च भागत नसल्याने ठोस मानधन असावे, अशी पैलवानांची मागणी आहे. पूर्वी मैदानात लढत जिंकल्यानंतर पाठीवर कौतुकाची थाप पडायची पण आता ते दिवस राहिले नाही. पैलवानांच्या हाती पैसा पडला तरच त्याला कुस्तीत बारकाईने सराव करता येईल. त्यामुळे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने प्रत्येक स्पर्धेत कुस्तीगिरांना ठोस मानधन मिळावे, यासाठी कार्यवाही करणे आवश्यक आहे.

1961 नंतर चांदीची गदा देण्यास प्रारंभ

महाराष्ट्र केसरीचा पहिला मान विष्णू नागराळे यांना 1955 मध्ये मिळाला असता. तरीही त्यांच्याच तालमीतील, त्यांच्याच शिष्यानेही पहिली गदा आणून त्यांची शान वाढवली होती. दह्यारीच्या केसरी पदानंतर महाराष्ट्र केसरी स्पर्धेची प्रतिष्ठा स्पर्धागणिक उंचावत गेली. 1953-60 पर्यंत विजयी मल्लांना मेडल दिले जायचे. त्यानंतर 1961 नंतर चांदीची गदा देण्यास सुरुवात झाली. ती आजही सुरूच आहे. त्यात 1961 ते 1982 पर्यंत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद चांदीची गदा देत होते. त्यानंतर स्व. मामासाहेब मोहोळ यांच्या स्मरणार्थ मोहोळ कुटुंबीय गेल्या 40 वर्षांपासून विजेत्यास चांदीची गदा देत आहे.

The post सातारा : ‘महाराष्ट्र केसरी’च्या मानधनाचा आकडा ठरणार कधी? appeared first on पुढारी.



Source link

सातारा : बोर्ड परीक्षा गुणवत्तेबाबत साशंकता | पुढारी

0









सातारा; मीना शिंदे :  बारावी बोर्ड परीक्षेवर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अवलंबून आहे. बारावी परीक्षेतील गुणवत्तेवर पुढील करिअरची दिशा ठरली जाणार आहे. विषय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विविध टप्प्यांवरील पडताळणीनंतर बोर्ड परीक्षेची प्रश्नपत्रिका तयार केली जाते. असे असतानाही परीक्षेत सलग दोन्ही पेपरमध्ये चुका आढळल्या आहेत. इंग्रजीच्या पेपरमध्ये प्रश्नाऐवजी उत्तरे छापण्यात आली. हिंदीच्या पेपरमध्ये गुणांकन चुकीचे छापण्यात आले होेते. वारंवार होणार्‍या बोर्ड परीक्षेतील चुकांमुळे परीक्षा मंडळाचा कारभार चव्हाट्यावर येत आहे. बोर्ड परीक्षेतील गुणवत्तेच्या कसोटीबाबतच विद्यार्थी व पालकांमध्ये साशंकता आहे.

बारावी बोर्ड परीक्षा विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता सिद्ध करण्याची कसोटी आहे. सध्या बोर्ड परीक्षा सुरू असून, विद्यार्थी अभ्यासासाठी रात्रीचा दिवस करत आहेत. पालकही पाल्याच्या शैक्षणिक भविष्यासाठी आरोग्य व अभ्यासाचे वेळापत्रक सांभळताना तारेवरची कसरत करत आहेत. मात्र, परीक्षा मंडळाच्या हलगर्जीपणामुळे त्यांच्या या कठोर परिश्रमावरच पाणी पडत असल्याचे वास्तव समोर आले आहे. बारावी बोर्डाच्या पहिल्या इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत गंभीर चुका आढल्या आहेत.

एक-एक गुणही अत्यंत महत्वाचा असताना तब्बल 6 गुणांचे प्रश्न चुकले आहेत. प्रश्नाच्या जागेवर उत्तरे छापल्याने विद्यार्थी गोंधळून गेले. दुसर्‍या दिवशीदेखील हिंदी विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्नांचे गुणांकन चुकीचे छापल्याने राज्य परीक्षा मंडळाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला आहे. पारंपरिक शिक्षणाबरोबरच रोजगाराभिमुख शिक्षणाला प्राधान्य दिले जाते. व्यावसायिक शिक्षण अभ्यासक्रमांसाठी राज्य सामाईक परीक्षा होणार आहे. या परीक्षेतील गुणवत्तेवरच व्यावसायिक शिक्षणाची प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. बोर्ड परीक्षेतील चुकांचा पाढा इतर परीक्षांमध्ये गिरवला गेला तर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर येणार आहे. त्यामुळे बोर्ड परीक्षेच्या गुणवत्ता कसोटीबाबत साशंकता निर्माण झाली आहे. अनेक समित्या व शिक्षण तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली काठिण्य पातळीची चाळणी लावून प्रश्नपत्रिका निश्चित केली जाते. तरीदेखील बोर्ड परीक्षेत अशा चुका होतातच कशा? असा संतप्त सवाल विद्यार्थी व पालकांमधून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, येत्या दोन दिवसांमध्ये दहावी बोर्ड परीक्षा सुरू होणार असल्याने त्या विद्यार्थी व पालकांमध्ये प्रश्नपत्रिकेतील गोंधळाची धास्ती वाढली आहे.

प्रवेश व शैक्षणिक नुकसानीचा धोका

अनेक विद्यार्थी बारावीनंतर उच्च शिक्षणासाठी सीईटी परीक्षेवर फोकस करत असल्याने बोर्ड परीक्षेतील गुणांचे निकष पूर्ण होत नाहीत. या वर्षीपासून व्यावसायिक शिक्षणाच्या प्रवेशाची गुणवत्ता यादी 50 टक्के सीईटीतील गुण व 50 टक्के बोर्ड परीक्षेतील गुण या निकषांवर तयार केली जाणार आहे. अशा प्रश्न पत्रिकेतील चुकांचा परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणांवर होणार आहे. त्यामुळे बोर्ड परीक्षेतील गोंधळाचा फटका बसून शैक्षणिक नुकसानीचा धोका संभवतो.











Source link