Friday, June 26, 2026
Home Blog Page 3153

NTR 30: वाढदिवशी जान्हवी कपूरचं चाहत्यांना सरप्राईज; नव्या चित्रपटाचं पोस्टर केलं शेअर!

0
NTR 30: वाढदिवशी जान्हवी कपूरचं चाहत्यांना सरप्राईज; नव्या चित्रपटाचं पोस्टर केलं शेअर!


गेल्या ६ महिन्यांपासून कोरटाला शिवा या चित्रपटासाठी अभिनेत्रीच्या शोधात होते. ‘एनटीआर ३०’ या चित्रपटासाठी अनेक नावांचा विचार करून, आता अखेर त्यांनी जान्हवीला साईन केले आहे. ‘एनटीआर ३०’ हा चित्रपट तेलुगुसह तमिळ, मल्याळम आणि हिंदीसह अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाची शूटिंग २३ फेब्रुवारीपासून सुरू झाली असून, हा चित्रपट २०२४ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.



Source link

Nawazuddin Siddiqui : मला बदनाम करण्यासाठी आलिया मुलांचा वापर करतेय; नवाजुद्दीनचा पत्नीवर पलटवार!

0
Nawazuddin Siddiqui : मला बदनाम करण्यासाठी आलिया मुलांचा वापर करतेय; नवाजुद्दीनचा पत्नीवर पलटवार!


पत्नीचे आरोप फेटाळून लावताना नवाज म्हणाला की, ‘मी मुलांच्या सोयीसाठी तिला अनेक लक्झरी कार दिल्या होत्या. मात्र, त्या विकून तिने पैशांची उधळपट्टी केली. मी आमच्या मुलांसाठी वर्सोवामध्ये एक सीफेसिंग घर देखील घेतले होते. मात्र, मुलं लाहान असल्याने ते घर आलियाच्या नावावर आहे. यानंतर मी मुलांना दुबईमध्ये एक लक्झरी घर घेऊन दिले. या घरात आलिया देखील आरामात राहत आहे. तिला केवळ पैसा हवा आहे, म्हणून ती असे आरोप करत आहे. माझी मुलं मुंबईत सुट्टीसाठी येतात, तेव्हा ती त्यांच्या आजीसोबतच राहतात. मुलांना कधीच घराबाहेर काढलं गेलं नाही. मी त्यावेळी घरात नव्हतो, तेव्हाच हा व्हिडीओ बनवला गेला. मला ब्लॅकमेल करण्यासाठी आणि बदनाम करण्यासाठी आलिया मुलांना या प्रकरणात ओढत आहे.’



Source link

Vaibhav Tatwawaadi: मधुर भांडारकरसोबत वैभव तत्त्ववादी करणार काम, ‘या’ दिवशी होणार चित्रपट प्रदर्शित

0
Vaibhav Tatwawaadi: मधुर भांडारकरसोबत वैभव तत्त्ववादी करणार काम, ‘या’ दिवशी होणार चित्रपट प्रदर्शित


“चांदनी बार”, “ट्रैफिक सिग्नल”, “फॅशन”, “पेज ३” , “बबली बाउन्सर”, “इंडिया लॉकडाऊन” अशा अनेक पुरस्कारप्राप्त उत्तमोत्तम चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन केलेले मधुर भांडारकर आता मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करत आहेत. त्यांच्या या पहिल्यावहिल्या चित्रपटाचे नाव ‘सर्किट’ असे असून या “सर्किट” या चित्रपटाची चांगलीच हवा झाली आहे. चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाल्यापासून अल्पावधीत या टीजरला लाखो व्ह्यूज मिळाले. या चित्रपटातील भूमिकेसाठी अभिनेता वैभव तत्त्ववादीने आपल्या बॉडीबिल्डिंगवर मेहनत घेतल्याचं दिसून येत आहे.



Source link

Sheezan Khan:ती जीवंत असती तर..; तुरुंगातून बाहेर येताच शिजानने दिली तुनिषाच्या मृत्यूवर प्रतिक्रिया

0
Sheezan Khan:ती जीवंत असती तर..; तुरुंगातून बाहेर येताच शिजानने दिली तुनिषाच्या मृत्यूवर प्रतिक्रिया



Tunisha Sharma Death: टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा मृत्यू प्रकरणात अभिनेता शिजान खान याला ६९ दिवसांनी जामीन मंजूर करण्यात आला. त्यानंतर त्याने यावर प्रतिक्रिया दिली आहे.



Source link

Hemant Dhome: हेमंत ढोमे दिसणार विनोदी भूमिकेत, फकाट चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

0
Hemant Dhome: हेमंत ढोमे दिसणार विनोदी भूमिकेत, फकाट चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला


मराठी सिनेसृष्टीला ‘बघतोस काय मुजरा कर’, ‘बस स्टॉप’, ‘बाबू बॅन्ड बाजा’, ‘ऑनलाईन बिनलाईन’,’ मी पण सचिन’ यांसारखे धमाकेदार चित्रपट दिल्यानंतर आता श्रेयश जाधव आणखी एक भन्नाट चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाले आहेत. यापूर्वी श्रेयश जाधव यांनी ‘मी पण सचिन’चे लेखन, दिग्दर्शन केले होते. आता आणखी एका नवीन चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन त्यांनी केले आहे. या चित्रपटात हेमंत ढोमे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.



Source link

RRR: ‘नाटू नाटू’ गाण्यावर BTSच्या जंगकूकने धरला ताल Video Viral

0
RRR: ‘नाटू नाटू’ गाण्यावर BTSच्या जंगकूकने धरला ताल Video Viral


येत्या १२ मार्चला रात्री सुरू होणाऱ्या ९५व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यामध्ये हे महत्त्वाचे पुरस्कार जाहीर होणार आहेत. याच सोहळ्यात ‘नाटू नाटू’ या गाण्यावर होणारे लाईव्ह सादरीकरण अवघ्या जगाला पाहायला मिळणार आहे. संपूर्ण जगाच्या नजरा ऑस्कर पुरस्कारांवर खिळल्या आहेत. जगभरातून पाहिल्या जाणाऱ्या याच मानाच्या सोहळ्यात यंदा ‘नाटू नाटू’ची धूम पाहायला मिळणार आहे. ही बातमी समोर आल्यापासून ‘आरआरआर’चे चाहते जल्लोष करत आहेत. इतकेच नाही तर, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील याच गाण्याची चर्चा सुरू असून, ‘नाटू नाटू’ ट्रेंड होत आहे. जागतिक फॅन फॉलोइंगमुळे ‘आरआरआर’ या वर्षीच्या ऑस्करमधील सर्वाधिक चर्चेत असलेला चित्रपट बनला आहे.



Source link

Chitra Gaurav 2023: कोण पटकावणार सर्वोत्कृष्ट ठरण्याचा बहुमान? ‘चित्र गौरव २०२३’ नामांकनं जाहीर!

0
Chitra Gaurav 2023: कोण पटकावणार सर्वोत्कृष्ट ठरण्याचा बहुमान? ‘चित्र गौरव २०२३’ नामांकनं जाहीर!


Chitra Gaurav 2023 Nominations : सध्या सर्वत्र पुरस्कार सोहळे सुरू आहेत. अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांची वाट कलाकारांसोबत प्रेक्षक देखील पाहत असतात.मराठी नाट्य आणि चित्रपट सृष्टी ज्याची आतुरतेने वाट पाहत असते अशा प्रतिष्ठित झी गौरव २०२३ पुरस्काराची नामांकनं जाहीर झाली आहेत. चित्रपटांसाठी या वर्षी परीक्षक म्हणून मृणाल कुलकर्णी,केदार शिंदे आणि विद्याधर पाठारे यांनी यांनी काम पहिले. झी चित्रगौरव पुरस्कार २०२३ रविवार २६ मार्च संध्याकाळी ७ वाजता पाहता येणार आहे. यावर्षी अनेक चित्रपटांना या पुरस्कार सोहळ्यात नामांकन मिळाले आहे. पाहा यादी…



Source link

Holi 2023: रंग बरसे ते बलम पिचकारी…. बॉलिवूडच्या ‘या’ गाण्यांशिवाय होळी वाटेल अधुरी!

0
Holi 2023: रंग बरसे ते बलम पिचकारी…. बॉलिवूडच्या ‘या’ गाण्यांशिवाय होळी वाटेल अधुरी!


Holi Play list 2023: होळी म्हणजे रंगांचा सण… रंगांची उधळण! या सणाच्या दिवशी सगळेच आनंदाने एकमेकांना रंग लावतात. देशभरात हा सण अतिशय जल्लोषात साजरा केला जातो. होळी आणि धुळवड जरी रंगांचा सण असला, तरी गाण्यांशिवाय मात्र अपुराचा आहे. होळी म्हटली की, वेगवेगळे रंग, खाद्यपदार्थ यांसोबतच धमाल गाणी देखील सुरू होतात. तुम्ही देखील होळीसाठी अशीच धमाल गाण्यांची प्लेलिस्ट बनवायचा विचार करत असाल, तर ही गाणी खास तुमच्यासाठीच…



Source link

सातारा : यंदा गणवेशासाठी लागणार 4 कोटींचा निधी | पुढारी

0









सातारा; पुढारी वृत्तसेवा :  समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण घेणार्‍या सर्व मुली, अनुसूचित जाती व जमाती आणि बीपीएल संवर्गातील मुलांना मोफत गणवेश देण्यात येतो. यंदा शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्याला गणवेश वाटप करण्याच्या सूचना प्राथमिक शिक्षण विभागाने दिल्या आहेत.

जिल्ह्यातील सुमारे 75 हजारहून अधिक विद्यार्थ्यांना प्रतिविद्यार्थी 600 रुपयाप्रमाणे सुमारे 4 कोटी 50 लाख रुपयांचा निधी अपेक्षित आहे.
समग्र शिक्षा अभियानांतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील पहिली ते आठवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्यात येतो. विद्यार्थ्यांना दोन गणवेशासाठी प्रति विद्यार्थी 600 रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यासाठी शिक्षण विभागाने महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक परिषदेकडे पुढील वर्षी या योजनेंतर्गत गणवेशाचा लाभ देण्यासाठी नोंदणी पूर्ण केली जात आहे. गणवेश योजनेची मंजूर तरतूद शाळा व्यवस्थापन समिती स्तरावरुन शाळा व्यवस्थापन समितीच्या मान्यतेने खर्च केला जातो. हा निधी शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यावर जिल्हा परिषदेकडून वर्ग केला जातो.

कोरोनाच्या काळात दोन वर्ष ऑनलाईन वर्ग भरल्याने गणवेश देण्यात आले नव्हते. मात्र मागील वर्षी कोव्हिडचा संसर्ग कमी झाल्याने शाळा सुरु झाल्यानंतर गणवेश वाटप करण्यात आले होते. गतवर्षी जिल्ह्यातील सर्व शाळांमधील 83 हजार 249 विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचे वाटप करण्यात आले होते. यासाठी सुमारे 5 कोटी निधी खर्च झाला होता. यावर्षी सुमारे 75 हजारहून अधिक विद्यार्थी पात्र असल्याने त्यासाठी सुमारे 4 कोटी 50 लाखांहून अधिक निधीची गरज शिक्षण विभागाला लागणार आहे.

गणवेशाची मापे घेण्याची कार्यवाही

नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेश देण्याचे नियोजन जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने केले आहे. त्यासाठी उन्हाळ्याच्या सुट्टीच्या पूर्वी जिल्हा परिषद व नगरपालिका शाळांमधील पात्र विद्यार्थ्यांची गणवेशाची मापे शिलाई कारागिरांकडून घेण्यात यावीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या मापाचे गणवेश पुरवणे सोयीचे होईल, अशा सूचना समग्र शिक्षा प्राथमिक शिक्षण परिषदेच्या उपसंचालक डॉ. वैशाली वीर यांनी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकार्‍यांना दिल्या आहेत.











Source link

सातारा : प्रोत्साहनपर अनुदानाच्या तिसर्‍या यादीची प्रतीक्षा | पुढारी

0









उंडाळे; वैभव पाटील :  नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांना शासनाने महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहन लाभ योजनेतून पन्नास हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. या गोष्टीनंतर दोनदा वेगवेगळ्या याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. मात्र अजूनही लाखो शेतकरी या योजनेपासून वंचित असून, या योजनेंतर्गत तिसरी यादी केव्हा जाहीर होणार? याकडे लक्ष लागले आहे.

पहिली यादी जाहीर होताच तातडीने शेतकर्‍याच्या खात्यात पैसे जमा झाले; परंतु दुसरी यादी जाहीर झाल्यानंतर आधार प्रमाणीकरण करून तब्बल एक महिना ते दीड महिना उलटून गेला आहे. मात्र असे असूनही, शेतकर्‍यांच्या खात्यावर टप्प्याटप्प्याने पैसे जमा होऊ लागले असून आजअखेर ही प्रक्रिया सुरूच आहे. दुसर्‍या यादीतील शेतकर्‍यांचे पैसे अद्याप जमा होत असून या यादीतील शेतकर्‍यांचे संपूर्ण पैसे जमा झाल्याशिवाय तिसरी यादी जाहीर होणार नाही असेच काही चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे तिसरी यादी नेमकी केव्हा जाहीर होणार? याकडे शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येताच राज्यातील शेतकर्‍यांना पीक कर्जमाफी केली होती. पण नियमित कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांना यामध्ये काहीच लाभ नसल्याने या सरकारने महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत नियमित कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर लाभ योजना जाहीर केली होती. या योजनेची पहिली यादी दिवाळीपूर्वी जाहीर करण्यात आली. मात्र त्यानंतर ही योजना संथ गतीने राबवली जात असल्याने शेतकर्‍यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. अजूनही दुसर्‍या यादीतील सर्व शेतकर्‍यांना रक्कम मिळाली नाही. त्यामुळे शासनाकडून तिसरी यादी केव्हा जाहीर होणार? या यादीत आपले नाव असणार का? याकडे राज्यातील शेतकर्‍यांचे डोळे लागून राहिले आहेत. सातारा जिल्ह्यासह कराड तालुक्यातील शेतकरी याला अपवाद नाही. त्यामुळे राज्य शासनाने गतीने या योजनेची अंमलबजावणी करून संकटात असणार्‍या बळीराजाला मदत करावी, असे मत व्यक्त होत आहे.

अजूनही लाखभर शेतकरी वंचितच…

सातारा जिल्ह्यात तीन लाख 87 हजार 265 लाभार्थी आहेत. पहिल्या यादीत 84 हजार 902 शेतकर्‍यांना अनुदान मिळाले. या यादीनंतर 1 लाख 23 हजार 135 शेतकर्‍यांची दुसरी यादी जाहीर झाली. यातील शेतकर्‍यांचे अद्याप अनुदान वाटप सुरू आहे. त्यामुळे तिसर्‍या यादीतील 1 लाख शेतकर्‍यांना अनुदानापासून वंचित रहावे लागत आहे.











Source link