
Tv Serial: आपल्या अनोख्या गायनशैलीने प्रेक्षकांची मनं जिंकणारी गायिका सुनिधी चौहाननेएका मराठी मालिकेचे शीर्षकगीत गायले आहे. आता ही मालिका कोणती? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

Tv Serial: आपल्या अनोख्या गायनशैलीने प्रेक्षकांची मनं जिंकणारी गायिका सुनिधी चौहाननेएका मराठी मालिकेचे शीर्षकगीत गायले आहे. आता ही मालिका कोणती? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

पुढे ती म्हणाली, ज्या प्रकारे सर्व काही घडले ते पूर्णपणे संशयास्पद आहे. त्या जिथे गेल्या त्या ठिकाणी वर्दळ नाही. संपूर्ण सोसायटीमध्ये एकही सीसीटीव्ही नाही. माझ्या बहिणीने खोली भाड्याने घेतली होती आणि व्यवसायासाठी तिचे ते एक आरक्षित कार्यालय होते. आर्थिक मदतीसाठी तिने प्रथम कार्यशाळेची ऑर्डर घेतली होती. इतके दिवस आणि इतके स्पष्ट पुरावे मिळूनही याप्रकरणी कारवाई का झाली नाही हे मला स्पष्टपणे समजत नाही. दिशाभूल करणारी आणि चुकीचे माहिती पसरली आहे. मला कोणतेही स्पष्ट उत्तरे मिळत नाहीत. मी माझ्या बहिणीसाठी न्याय मागते.

पुढे या पत्रकात इनोसंट यांच्या घशात संसर्ग झाला होता, त्यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र इनोसंट यांच्या जाण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटाचा ट्रेलर पाहताना या बटालियनने खूप मजा केली असून, टाळ्या आणि शिट्यांच्या गजरात रांगडा पोलीस ऑफिसर नागराज पोपटराव मंजुळे आणि सदाबहार सयाजी शिंदे यांचे स्वागत केले. या चित्रपटात नागराज पोपटराव मंजुळे यांनी अस्सल मातीतला, तडफदार पोलीस ऑफिसर अशी जबरदस्त भूमिका साकारली आहे. नागराज पोपटराव मंजुळे प्रस्तुत, आटपाट निर्मित, हेमंत जंगल अवताडे दिग्दर्शित ‘घर बंदूक बिरयानी’ हा चित्रपट येत्या ७ एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे.

लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता रामचरण टॉलिवूडसह बॉलीवूडमध्येही तगडी फॉलोविंग आहे. मुली तर त्याच्यावर जीव ओवाळून टाकताना दिसतात. परंतु, मुलींची मनं तर तुटली होती जेव्हा त्याने १० वर्षांपूर्वी उपासना कामिनेनी (Upasana Kamineni) सोबत लग्नगाठ बांधली. आज २७ मार्च रोजी रामचरणचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया राम चरण एका साधारण मुलीच्या प्रेमात कसा पडला? त्यांची भेट कशी झाली.

आशुतोष यांनी फोनवर एक कविता ऐकवत रेणुकाला प्रपोज केलं. त्यानंतर क्षणाचाही वेळ न दवडता रेणुकाने त्यांना होकार दिला. तीन वर्षांनंतर त्यांनी रेणुकाला लग्नाबद्दल विचारलं. मात्र आशुतोष गावाकडचे असल्याने आणि त्यांचं कुटुंब मोठं असल्याने रेणुकाला थोडी भीती वाटत होती. शिवाय रेणुका तेव्हा घटस्फोटित होती. रेणुकाचा मराठी अभिनेते विजय केंकरे यांच्यासोबत घटस्फोट झाला होता. मात्र या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत आशुतोष यांनी रेणुकासोबत लग्नगाठ बांधली. आता त्यांचा सुखाचा संसार सुरू आहे. त्यांना शौर्यमन आणि सत्येंद्र अशी दोन मुलं देखील आहे.

आकांक्षा दुबेने अल्पावधीतच तिने खूप मोठा पल्ला गाठला. आकांक्षाला लहानपणापासूनच मॉडेलिंग, डान्स आणि अभिनयाची आवड होती. पण आपल्या लेकीने आयपीएस अधिकारी व्हावं, असं तिच्या वडिलांचं स्वप्न होतं.
पुढारी ऑनलाईन: आशियातील पहिली महिला लोको पायलट सुरेखा यादव हिने आणखी एक विक्रम केला आहे. सुरेखा यांनी सोलापूर ते सीएसएमटी दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस यशस्वीपणे चालवत, भारताची पहिली महिला लोको पायलट बनली. यासाठी पीएम मोदी यांनी त्यांचे कौतुक केले. गेल्या काही दिवसातील सुरेखा यांच्या यशस्वी कारकिर्दीमुळे पीएम नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या कन्या सुरेखा यादव यांचे मन की बात मध्ये कौतुक केले आहे. मन की बातचा आज (दि.२६) ९९ वा भाग प्रसारित करण्यात आला. यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला संबोधित केले.
Asia’s first woman loco pilot Surekha Yadav set another record. She has also become the first woman loco pilot of Vande Bharat: PM Modi during #MannKiBaat pic.twitter.com/0Zo7SJmGZq
— ANI (@ANI) March 26, 2023
मन की बात मध्ये महिला सक्षमीकरणविषयी बोलताना पीएम मोदी म्हणाले, सध्या भारताची नारी शक्ती आघाडीवर आहे. तसेच भारतीय लघुपट ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ या (The Elephant Whisperers ) लघूपटाने ऑस्कर पुरस्कारावर आपली मोहर उमटवली. या फिल्मने बेस्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्मचा ऑस्कर पुरस्कार मिळाला. यामध्ये महत्त्वाचे योगदान असलेल्या महिला निर्माता गुनीत मोंगा आणि दिग्दर्शक कार्तिकी गोंजालविस यांचे देखील मन की बात दरम्यान पीएम मोदी यांनी कौतुक केले.
India’s Nari Shakti is leading from the front. #MannKiBaat pic.twitter.com/5KGge9MbCx
— PMO India (@PMOIndia) March 26, 2023
महाराष्ट्रातील साताऱ्याच्या सुरेखा यादव या आशियातील पहिल्या महिला लोको पायलट आहेत. त्यांनी मागच्या आठवड्यात सोमवारी (दि. 13) सोलापूर ते सीएसएमटी दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस यशस्वीपणे चालवली. मेक इन इंडियाअंतर्गत तयार केलेली वंदे भारत एक्स्प्रेस चालवून त्यांनी मध्य रेल्वेचे नाव एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. महाराष्ट्रातील सातारा येथील सुरेखा यादव या 1988 मध्ये भारतातील पहिल्या महिला रेल्वेचालक बनल्या. त्यांच्या या क्षेत्रातील कामगिरीसाठी त्यांना राज्य आणि राष्ट्रीयस्तरावर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
सातारा; पुढारी वृत्तसेवा : ऑईलचा टँकर देण्याच्या बहाण्याने तब्बल 17 लाख 64 हजार 560 रुपयांची एमआयडीसीतील एका व्यवसायाची फसवणूक झाली आहे. ही घटना दि. 13 मार्च ते दि. 23 मार्च या कालावधीत घडली असून, सातारा शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
या प्रकरणी युवराज किसन कांबळे (रा. मुंबई), अल्लाबक्षी फखरुसाब चपाती (पत्ता माहित नाही) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत ट्रेडिंग कंपनीचे व्यावसायिक नीलेश मधुकर पवार (वय 47, रा. आशीर्वाद कॉलनी, देगाव रस्ता, एमआयडीसी, सातारा) यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, संशयित आरोपींनी ऑईलचा टँकर देतो, असे सांगून मोकळ्या आईल टँकरची व त्यानंतर भरलेल्या ऑईल टँकरची खोटी बनावट पावती व्हॉटस्अॅपवर पाठवली. त्यानंतर 17 लाख 64,560 रुपये खात्यावर घेवून ऑईलचा टँकर न पाठवताच फसवणूक केली. पोलीस उपनिरीक्षक वाघमोडे तपास करत आहेत.