Sunday, June 28, 2026
Home Blog Page 3124

महाबळेश्वर तालुक्यातील अवैध बांधकामांवर कारवाई; जिल्हाधिकार्‍यांचे आदेश | पुढारी

0









पाचगणी : पुढारी वृत्तसेवा : महाबळेश्वर तालुक्यात अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट झाल्याचे वृत्त दै. ‘पुढारी’ने प्रसिद्ध केले होते. त्याची गंभीर दखल घेऊन जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी अनधिकृत बांधकामांवर थेट कारवाई करण्याचे तसेच या बांधकामांची वीज व पाणी पुरवठाही तत्काळ बंद करून मिळकती सील करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशामुळे अवैध बांधकाम करणार्‍यांचे आता धाबे दणाणले आहेत.

महाबळेश्वरच्या पर्यावरणाचे महत्त्व लक्षात घेऊन केंद्र शासनाने 2001 मध्ये संपूर्ण महाबळेश्वर तालुका हा पर्यावरणाच्या द़ृष्टीने अतिसंवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करून बांधकामाबाबत अनेक निर्बंध घातले आहेत. असे असताना देखिल सर्व नियम धाब्यावर बसवून ठिकठिकाणी धनदांडग्यांनी मोठया प्रमाणावर शेत जमिनी खरेदी करत तेथे बेकायदेशीर विनापरवाना बांधकामे केली आहेत. याबाबत अनेकदा तक्रारीही झाल्या आहेत. त्यामुळे पाचगणी, भिलारसह महाबळेश्वर तालुक्यातील अनधिकृत बांधकामे वाढल्याचे वृत्त दै. ‘पुढारी’ने प्रसिद्ध केले होते. बेकायदा बांधकाम व उत्खननाबाबत दै. ‘पुढारी’ने वारंवार आवाज उठवला होता. दै. ‘पुढारी’च्या वृत्ताची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे.

बेकायदा बांधकामांचा सर्व्हे यापूर्वी झाला आहे. अनेक बांधकामांना नोटिसा देखील बजावण्यात आल्या आहेत. अशा सर्व बांधकामांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत. कार्यकारी अभियंता महावितरण सातारा, उपविभागीय पोलिस अधिकारी वाई, महाबळेश्वर तहसीलदार , महाबळेश्वर व पाचगणी गिरीस्थान नगरपरिषेदेचे मुख्याधिकारी, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व उप अभियंता, जीवन प्राधिकरण उपविभाग पाचगणी या सर्व विभागांना बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. अवैध बांधकामांचे पाणी व वीज कनेक्शन तसेच बेकायदेशीर बांधकामे तोडण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर आत्तापर्यंत झालेल्या सर्व अनधिकृत बांधकामांची चौकशी करण्याबाबतही आदेशात म्हटले आहे. अशी बांधकामे सील करा तसेच महाबळेश्वर तालुक्यातील ग्रामीण भागातील ज्या गावांमध्ये अनाधिकृत बांधकाम केल्याच्या ठिकाणचे पाणी कनेक्शन संबंधित गावचे ग्रामसेवक यांच्यामार्फत तात्काळ बंद करण्यात यावे. महाबळेश्वर व पाचगणी नगरपालिका हद्दीमध्ये अनाधिकृत बांधकाम केलेल्या ठिकाणचे पाणी कनेक्शनही तात्काळ बंद व सील करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महाबळेश्वरच्या तहसीलदार सपना चौधरी यांच्यासह महाबळेश्वर व पाचगणीच्या सर्व प्रशासकीय कार्यालयांना हे आदेश दिले आहेत.

दरम्यान, यासंदर्भात महाबळेश्वरच्या तहसिलदार सपना चौधरी यांना विचारले असता कारवाई करण्याबाबतचा आदेश प्राप्त झाला असून तात्काळ त्याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे सांगितले. दरम्यान, तालुक्यात काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्खनन झाले असून भिलार, भोसे, पाचगणी, गुताड, क्षेत्र महाबळेश्वर, पांगरी, कासवंड, खिंगर, राजपुरी तसेच तालुक्यातील सर्वच झोन क्षेत्रात मोठी बांधकामे उभारली गेली आहेत. पैकी अनाधिकृत बांधकामावर थेट कारवाई करावी, असे आदेश दिल्यामुळे अवैध बांधकामांना आळा बसणार आहे.











Source link

माझ्याजवळची ती पुडी ‘मसाला इलायची’ची; शंभूराज देसाईंनी तंबाखू खात नसल्याची दिली माहिती | पुढारी

0









कराड : पुढारी वृत्तसेवा : अर्थसंकल्पीय अधिवेशनात काहींना काही अशा घटना घडतात की त्यामुळे काही नेते चर्चेत येतात. यावर्षी अधिवेशनात राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई एका व्हायरल व्हिडीओमुळे चांगलेच चर्चेत आले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विधानसभा सभागृहात बोलत असताना मंत्री देसाई यांनी मागच्या बाकावरील आ. भरत गोगावलेंना खिशातून काढून एक पुडी दिली. भरत गोगावलेंनी ती ‘पुडी’ घेतली, हे दृश्य कॅमेरात कैद झाले. या व्हिडीओवर मंत्री देसाई स्पष्टीकरण दिले.
ना. शंभूराज देसाई म्हणाले, मी तंबाखू खात नाही, ना भरतशेठ खातात. माझाकडे मसाला इलायची होती. जी मी घसा कोरडा होतो, म्हणून खातो. ती भरतशेठ यांनी मागितली आणि मी दिली. सभागृहाचे नियमही मला माहिती आहेत. विधानसभा सभागृहात मी १५ वर्ष काम करत आहे. मी काहीही चूक केलेली नाही, असे मंत्री देसाई यांनी सांगितले आहे.

नेमका काय घडला प्रकार ?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका प्रकल्पाबाबत महत्त्वपूर्ण माहिती सभागृहाला देत होते. यावेळी मागच्या बाकावर बसलेले मंत्री शंभूराज देसाई यांनी खिशातील पुडी काढत पाठीमागे बसलेल्या आमदार भरत गोगावले यांना दिली. या पुडीतील ‘खाद्य’ भरत गोगावले यांनी तोंडात टाकले. त्यानंतर पुन्हा एकदा ही पुडी शंभूराज देसाई यांना त्यांनी परत केली होती. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर गैरसमज टाळण्यासाठी मंत्री देसाई यांनी स्पष्टीकरण दिले.











Source link

TMKOC : ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेवर चित्रपट येणार

0
TMKOC : ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेवर चित्रपट येणार


‘या मालिकेतील पात्रांच्या बाबतीत काहीतरी वेगळं करावं असं मला वाटलं. आजघडीला जेठालाल, बबिता जी, दयाबेन, सोधी आणि अशी सर्व पात्रे घरोघरी परिचयाची झाली आहेत. जणू लोकांच्या कुटुंबातील एक सदस्यच झाली आहेत. त्यामुळंच ‘टीएमकेओसी’चं विश्व निर्माण करण्याचा माझा विचार आहे, असं आसित मोदी म्हणाले.



Source link

सातारा : गोळीबार करत दोघा भावांचा पाठलाग | पुढारी

0









कराड : पुढारी वृत्तसेवा : पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून दोघा भावांचा पाठलाग करत त्यांना कोयता, तलवारीचा धाक दाखवला. तसेच त्यांच्या दिशेने पिस्तुलातून गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. चचेगाव, ता. कराड हद्दीत 12 मार्च रोजी ही घटना घडली होती. याबाबत शुक्रवारी कराड तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल झाली आहे. त्यानुसार सोळाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक वगरे, रोहन वगरे, विकास घारे, ओमकार वगरे, कुमार वगरे, महेश माने, शिवाजी माने, आबा घारे (सर्वजण रा. घारेवाडी, ता. कराड) यांच्यासह अनोळखी सात ते आठजणांचा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे.
याबाबत श्रीधर राजेंद्र घारे (रा. घारेवाडी) या युवकाने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घारेवाडी येथील श्रीधर घारे याच्या कुटुंबियांचा जमिनीच्या कारणावरून अशोक वगरे याच्याशी वाद झाला होता. त्यामध्ये श्रीधरची आई जखमी झाली होती. तिच्यावर कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. 12 मार्च रोजी जखमी आईला पाहण्यासाठी श्रीधर घारे व त्याचा भाऊ रितेश घारे हे दोघेजण दुचाकीवरून घारेवाडीहून कराडला येत होते. ते दोघे चचेगाव गावच्या हद्दीत आलेले असताना एक जीप व दुचाकीवरून काहीजण आडवे आले. त्यांच्या हातात लाकडी दांडके, कोयता आणि तलवार होती. ते मारहाण करण्याच्या उद्देशाने आल्याचे निदर्शनास आल्यामुळे श्रीधर व त्याचा भाऊ रितेश हे दुचाकी त्याचठिकाणी सोडून नजीकच्या उसाच्या शेतात पळाले. त्यावेळी संशयित आरोपींनी त्यांच्या गाड्या त्याचठिकाणी सोडून दोघांचा पाठलाग सुरू केला. श्रीधर व रितेश हे उसातून पळून जाऊन एका ओढ्याकडेला गेले. त्यावेळी पिस्तुलातून तीनवेळा गोळीबार केला. या प्रकारानंतर घाबरलेल्या श्रीधर व रितेश यांनी गावाच्या दिशेने पळ काढला. तसेच गावातील एका घरात त्यांनी आसरा घेतला. संबंधित कुटुंबियांनी त्या दोघांना धीर देत आपल्या घरात लपवून ठेवले. काहीवेळाने त्यांचा पाठलाग करणारे संशयित आरोपी तेथून निघून गेले. या घटनेबाबत श्रीधर घारे याने शुक्रवारी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सोळाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.











Source link

Tu Jhoothi Main Makkaar: ‘तू झूठी मैं मक्कार’ची बॉक्स ऑफिसवर हवा, जाणून घ्या कमाई

0
Tu Jhoothi Main Makkaar: ‘तू झूठी मैं मक्कार’ची बॉक्स ऑफिसवर हवा, जाणून घ्या कमाई


TJMM Box Office Collection: अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांच्या ‘तू झुठी मैं मक्कार’ चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.



Source link

सातारा : शिंपडून रक्ताचं पाणी; शिवारा-शिवारात कष्टाची कहाणी | पुढारी

0









कण्हेर; बाळू मोरे :  कण्हेर परिसरासह सातारा तालुक्यात सध्या रब्बी हंगामातील पिके काढणी बरोबर मळणीची लगबग सुरू आहे. काही शिवारात ही कामे पूर्णत्वाला गेली आहेत तर काही ठिकाणी अद्याप ही कामे सुरूच आहेत. भर उन्हात शेतकरी काबाडकष्ट करून अन्नधान्याची तजबीज करून ठेवण्यासाठी धडपडताना दिसत आहे. कुठे कडब्याच्या पेंढ्या बांधण्यात येत आहेत तर कुठे मळणी करून धान्याची रास लावली जात आहे. त्यामुळे शिवारा-शिवारात सकाळी व सायंकाळच्या सुमारास ही कष्टाची कामे सुरूच आहेत.

पैरेवारी करून काढला जातोय गहू

ठिकठिकाणच्या शिवारात गहू काढणीस आला आहे. त्यासाठी शेतकर्‍याला मनुष्यबळ कमी पडत आहे. त्यामुळे पैरेवारी करून गहू काढला जात आहे. या कामात कुटुंबातील सर्वच सदस्य सहभागी होत असून एकमेकाला मदत केली जात आहे. गव्हाच्या पेंड्या तयार करून मशीनद्वारे मळणी केली जात आहे. मळणीला पोत्यामागे 400 रुपये मोजावे लागत आहेत.

उसाच्या फडात अखेरची धांदल

उसाचा गाळप हंगाम आता अखेरीला गेला आहे. काही ठिकाणी ऊसतोडणीची धांदल अंतिम टप्प्यात आहे. त्यासाठी कष्टकरी मजूर चिमुकल्यांना खोपटात ठेवून घाम गाळत आहेत. ऊसतोड टोळ्या आता थोड्याच उरल्या आहेत. काहींनी परतीचा रस्ता धरला आहे. त्यामुळे उसाची शिवारेही मोकळी होत असल्याचे चित्र आहे.

वर्षभराच्या धान्याचे केले जातेय नियोजन

शेतकरी ज्वारीची पोती घरी नेऊन सुमारे तीन ते चार दिवस ज्वारी धान्य वाळवत आहेत. शेतकरी कुटुंब वाळलेली ज्वारी त्यातील कूस व पालापाचोळा बाजूला होण्यासाठी वार्‍याला देऊन ज्वारी वाढवली जात आहे. ग्रामीण भागात ज्वारीला महत्त्व असल्याने ती ज्वारी वर्षभर पुरेल इतकी जपून कणगीमध्ये साठवणूक करून ठेवली जात आहे.

पडलेली ज्वारी काढताना शेतकरी मेटाकुटीला…

सध्या उष्णतेच्या लाटेचा फटका दिवसभर उन्हात काम करणार्‍या शेतकरी वर्गाला अधिक बसत आहे. त्यामुळे सकाळ व संध्याकाळच्या वेळी शेतातील कामांना प्राधान्य दिले जात आहे. सध्या रब्बी पिकांची काढणी अंतिम टप्प्यात आली असताना अशा कडक उन्हात शेतकरी राजा शेतात कामे उरकत आहे. मध्यंतरी वातावरणात झालेल्या बदलामुळे पिकांवर अवकाळीच्या संकटाचे ढग जमा होवून पावसानेही तडाखा दिला. त्यामुळे काही ठिकाणी नुकसानही झाले. ज्या ठिकाणी ज्वारी भुईसपाट झाली तिथे काढणीच्यावेळी शेतकर्‍यांना बराच त्रास सहन करावा लागत आहे.

गहू, हरभरा मळणीची धांदल

रब्बी हंगामातील ज्वारी पिकाबरोबरच ऊस, गहू, हरबरा ही पिकेही मोठ्या प्रमाणात घेतली जात आहेत. मजुरांच्या साहाय्याने गहू, हरभरा काढला जात आहे. उन्हाचा चटका सोसत गहू, हरभरा पीक काढले जात आहे. या कामामध्ये वेळ काढून शेतकरी व मजूरवर्ग मध्यभोजन एकत्रित करताना दिसत आहेत.











Source link

Riteish Deshmukh: अन् भर स्टेजवर रितेश देशमुख पडला जिनिलियाचा पाया Video Viral

0
Riteish Deshmukh: अन् भर स्टेजवर रितेश देशमुख पडला जिनिलियाचा पाया Video Viral


झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात जिनिलियालाल ‘वेड’ या चित्रपटासाठी पुरस्कार देण्यात आला आहे. वेड हा चित्रपट ३० डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात जिनिलिया आणि रितेश सोबत ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, विद्याधर जोशी, सिद्धार्थ जाधव आणि जितेंद्र जोशी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तसेच बॉलिवूडचा भाईजान सलमान खानहा एका गाण्यात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसत आहे. रितेशचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट आहे. तर जिनिलियाने देखील या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन ४५ दिवस झाले आहेत तरी देखील चित्रपटाची कमाई सुरुच आहे.



Source link

Parineeti Chopra: ‘आप’च्या राघव चड्ढाला डेट करतेय परिणिती चोप्रा? एकत्र फिरतानाचा व्हिडीओ व्हायरल

0
Parineeti Chopra: ‘आप’च्या राघव चड्ढाला डेट करतेय परिणिती चोप्रा? एकत्र फिरतानाचा व्हिडीओ व्हायरल


Parineeti Chopra: बॉलिवूड अभिनेत्री परिणिती चोप्रा ही आम आदमी पार्टीचे प्रसिद्ध नेते आणि पंजाबचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांच्यासोबत डिनर डेटला जाताना दिसली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ती लंचसाठी गेली होती. त्यांचे एकत्र व्हिडीओ पाहून ते दोघे एकमेकांना डेट करत असल्याचे म्हटले जात आहे.



Source link

Sari: प्रेमाचा त्रिकोण! ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार मृणाल कुलकर्णीचा सिनेमा

0
Sari: प्रेमाचा त्रिकोण! ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार मृणाल कुलकर्णीचा सिनेमा


Upcoming marathi movie: सरी या चित्रपटात अजिंक्य राऊत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.



Source link

सातारा : पुलाच्या भिंतीवर दुचाकी धडकून दोघे ठार | पुढारी

0









भुईंज; पुढारी वृत्तसेवा :  राष्ट्रीय महामार्गावरील वेळे गावातून गुळुंब गावाकडे जाणार्‍या रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात दोघा दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला. वेळे गावच्या स्मशानभूमीलगत असलेल्या ओढ्यावरील पुलाचे नवीन काम सुरू आहे. या कामासाठी लावलेल्या पत्र्यावर दुचाकी धडकून ही दुर्घटना घडली. प्रमोद गंगाराम यादव (वय 20, रा. यशवंतनगर वाई) व प्रथमेश संतोष खैरे (वय 21, रा. ब्राम्हणशाही वाई) अशी मृत युवकांची नावे आहेत.

याबाबत भुईंज पोलिसांनी दिलेली माहिती अशी, प्रमोद व प्रथमेश हे दुचाकीवरून बुधवारी रात्री 8च्या दरम्यान गुळुंबकडे निघाले होते. वेळे येथील स्मशानभूमीजवळील पुलाजवळ ते आले होते. याठिकाणी पुलाचे काम सुरू होते. त्यासाठी पुलाच्या बांधकामाला पत्रे लावण्यात आले होते. हे पत्रे त्यांना रात्रीच्या अंधारात दिसले नाहीत. त्यामुळे या पत्र्याला दुचाकी धडकून दोघेही समोरच्या भिंतीवर आदळले व नजिकच्या ओढ्यात जावून पडले. त्यामुळे दोघांनाही गंभीर इजा झाली होती. दुर्घटनेच्या आवाजाने स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी धावले. त्यांनी तातडीने जखमी प्रमोद व प्रथमेश यांना पाण्यातून बाहेर काढले व कवठे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. याचदरम्यान पेट्रोलिंगवर असणारे सपोनि रमेश गर्जे व पीएसआय रत्नदीप भंडारे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना तातडीने उपचार होण्यासाठी प्रयत्न केले. मात्र उपचारापुर्वीच दोघेही मृत झाल्याचे सांगण्यात आले. अपघाताची नोंद भुईंज पोलिस ठाण्यात झाली आहे. दरम्यान, या अपघाताची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी वेळे ग्रामस्थांनी केली आहे.











Source link