Sunday, June 28, 2026
Home Blog Page 3122

Gautami Patil: भाजपच्या आमदाराच्या वाढदिवसाला गौतमी पाटीलचा कार्यक्रम

0
Gautami Patil: भाजपच्या आमदाराच्या वाढदिवसाला गौतमी पाटीलचा कार्यक्रम


गौतमीच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तिची लावणी संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय ठरत आहे. नुकताच तिचे तेरा पता हे गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. आता ती ‘घुंगरू’ या मराठी चित्रपटात दिसणार आहे. सर्वजण तिच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत.



Source link

Akshaye Khanna: अक्षय खन्ना लग्न का केले नाही? जाणून घ्या कारण

0
Akshaye Khanna: अक्षय खन्ना लग्न का केले नाही? जाणून घ्या कारण


एकेकाळी अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकणारा अभिनेता म्हणजे अक्षय खन्ना. त्याने ‘ताल’, ‘हलचल’, ‘दिल चाहता है’, ‘रेस’, ‘हंगामा’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. गेल्या काही वर्षांपासून तो क्वचितच चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याचे दिसत आहे. आज २८ मार्च रोजी त्याचा वाढदिवस आहे. वयाची ४० ओलांडून गेल्यानंतरही अक्षय अविवाहित का आहे? असा प्रश्न अनेकांना पडला होता. त्याच्या वाढदिवशी चला जाणून घेऊया त्यामागचे कारण…



Source link

Mahavitaran Scheme : 31 मार्चपर्यंत थकीत वीज बिल भरल्यास शेतकऱ्यांना 30 टक्के सवलत

0



<p>कृषीपंपधारकांसाठी महावितरणची सवलत योजना. ३१ मार्चपर्यंत शेतकऱ्यांनी ७० टक्के थकबाकी भरल्यास, ३० टक्के रक्कम होणार माफ.&nbsp;</p>
<p>&nbsp;</p>



Source link

Amol Kolhe: अमोल कोल्हेंचा ‘शिवप्रताप गरुडझेप’ चित्रपट पाहायचा आहे? पाहा ‘इथे’

0
Amol Kolhe: अमोल कोल्हेंचा ‘शिवप्रताप गरुडझेप’ चित्रपट पाहायचा आहे? पाहा ‘इथे’


छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कारकिदीर्तील लक्षणीय ठरलेली घटना म्हणजे औरंगजेबाच्या बलाढ्य मुघल सत्तेचा पोलादी पहारा भेदून आग्र्याहून केलेली सुटका. अमोल कोल्हेंच्या शिवप्रताप गरुडझेप सिनेमातून ही ऐतिहासिक घटना पुन्हा एकदा जिवंत करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेबाच्या आग्रा भेटीचा थरार येत्या ९ एप्रिलला दुपारी १ वाजता प्रवाह पिक्चर वाहिनीवरुन अनुभवायला मिळणार आहे. वाघ आणि मराठे सहसा कोणाच्या वाटेला जात नाहीत, पण जर कोणी डिवचलं तर फाडल्याशिवाय रहात नाहीत. सिनेमातला हा संवाद अंगावर रोमांचं आणल्याशिवाय रहात नाही. उर अभिमानाने भरुन येईल असे अनेक संवाद या सिनेमाचं बलस्थान आहे.



Source link

World Theatre Day: ‘जागतिक रंगभूमी दिनी’ संकर्षण कऱ्हाडेची खास पोस्ट

0
World Theatre Day: ‘जागतिक रंगभूमी दिनी’ संकर्षण कऱ्हाडेची खास पोस्ट


जागतिक रंगभूमी दिन हा आज २७ मार्च रोजी साजरा केला जातो. रंगकर्मी, या क्षेत्रात काम करणाऱ्या अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक व रंगभूमीशी नातं असलेले सर्वजण या दिनाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत. दरम्यान, नाटावर भरभरुन प्रेम करणारा अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने देखील खास पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्याने शेअर केलेल्या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधले आहे.



Source link

सातारा : जिल्ह्यातील 73 शाळांचा होणार कायापालट | पुढारी

0


सातारा; पुढारी वृत्तसेवा :  प्रधानमंत्री स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया अर्थात पीएमश्री योजनेतून जिल्हा परिषदेच्या शाळांचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. गुणवत्तापूर्ण व भविष्यवेधी शिक्षण देण्यासाठी सातारा जिल्ह्यातील 73 शाळांचा पीएमश्री योजनेमधून कायापालट होणार आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात 22 शाळा घेण्यात आल्या आहेत.
पीएमश्री योजना सप्टेंबर 2022 पासून कार्यान्वीत झाली आहे. या योजनेद्वारे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मधील विविध तरतुदींची अंमलबजावणी करणे, खासगी शाळांशी स्पर्धा करताना विद्यार्थ्यांना उत्कृष्ट पायाभूत व भौतिक सुविधा देणे, योग्य संसाधने देणे, आनंददायी शैक्षणिक वातावरण निर्माण करणे, यासाठी भरीव तरतूद केली आहे.

जिल्हा परिषदेच्या शाळा गुणवत्तेत पुढे आहेत. मात्र भौतिक सुविधांची कमतरता असल्याने पालकांचा खासगी शाळांकडे कल असल्याचे निदर्शनास आले. शासनाने याचा गांभीर्याने विचार करताना या योजनेतून शाळांमध्ये भौतिक सुविधा देण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी केंद्र शासनाचा 60 टक्के तर राज्य शासनाचा 40 टक्के निधी वापरला जाणार आहे. संबंधित शाळांमध्ये गुणवत्तावाढीसह भौतिक सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. यामध्ये संगणक कक्ष, विज्ञान प्रयोगशाळा, सांस्कृतिक कक्ष, स्वच्छतागृह, स्विमिंग टँक आदींची उभारणी केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात पीएमश्रीतून 37 शाळांचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. यापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेतून जिल्ह्यातील शाळांची मॉडेल स्कूल बनवण्यासाठी निवड करण्यात आली होती.

अशी होणार शाळांची निवड

शाळेची पटसंख्या जास्त असावी. शाळेची स्वत:ची पक्की इमारत व मोकळी जागा असावी. मुलामुलींसाठी हात धुण्याची सोय असावी. क्रीडा साहित्य, प्रयोगशाळा, ग्रंथालय आदी सुविधा उपलब्ध असाव्यात. शिक्षकांनी निष्ठा प्रशिक्षण पूर्ण केलेले पाहिजे.आरटीईनुसार विद्यार्थी शिक्षक प्रमाण असावे. शाळा व्यवस्थापन समिती गठीत असावी आदी निकष पूर्ण करणार्‍या शाळांची पीएमश्रीसाठी निवड केली जाते.

या शाळा होणार आदर्श

कोरेगाव तालुक्यातील जि.प. शाळा चिमणगाव, पिंपोडे बु., फलटण तालुक्यातील बरड, निरगुडी. खंडाळा तालुक्यातील लोणंद मुले 2, अहिरे. जावली तालुक्यातील सोनगाव, सायगाव. कराड तालुक्यातील कोळे (मुले), कासार शिरंबे. वाई तालुक्यातील ओझर्डे, खानापूर. पाटण तालुक्यातील विहे नं1, पाटण (मुले). खटाव तालुक्यातील दरूज, अंबवडे. सातारा तालुक्यातील देगाव, नागठाणे. माण तालुक्यातील जांभुळणी, पळशी. महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी नगरपालिका शाळा क्रमांक 2, जि.प. शाळा गोडवली या शाळांची निवड पीएमश्री स्कूलसाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने केली आहे.



Source link

LGBTQ विषयावर पहिल्यांदाच मराठीमध्ये चित्रपट, ‘या’ ओटीटीवर होणार प्रदर्शित

0
LGBTQ विषयावर पहिल्यांदाच मराठीमध्ये चित्रपट, ‘या’ ओटीटीवर होणार प्रदर्शित


या चित्रपटाचे नाव ‘न आवडती गोष्ट’ असे आहे. चित्रपटाच्या माध्यमातून मराठीत पहिल्यांदाच LGBTQ या संवेदनशील विषयावर भाष्य करण्यात आले आहे. यात एका कुटुंबातील दोन बहिणींतील नात्याच्या प्रवासाची गोष्ट दिसणार आहे. समलैंगिक संबंधांवर भाष्य करणारा हा चित्रपट, अक्षय विलास बर्दापूरकर आणि प्लॅनेट मराठी प्रस्तुत, इएस प्रोडक्शन अंतर्गत, अमित मल्होत्रा, कपिल मल्होत्रा आणि प्रशांत सुराणा निर्मित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन सई देवधर यांनी केले असून यात मृण्मयी देशपांडे, सुव्रत जोशी, रेशम श्रीवर्धन आणि सायली संजीव, उदय टिकेकर, उषा नाईक, स्नेहा रायकर, वर्षा घातपांडे, निखिल रत्नपारखी, सक्षम कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
वाचा: ‘आप’च्या राघव चड्ढाला डेट करतेय परिणिती चोप्रा? Video Viral



Source link

Aai Kuthe Kay Karte:गौरीने कायमचं तोडलं यशसोबतचं नातं, अरुंधती कशी सांभाळणार लेकाला

0
Aai Kuthe Kay Karte:गौरीने कायमचं तोडलं यशसोबतचं नातं, अरुंधती कशी सांभाळणार लेकाला


गेल्या काही दिवसांपासून यश आणि गौरी यांच्यामध्ये भांडणे सुरु असल्याचे दिसत आहे. त्यात गौरी अचनाक अमेरिकेला निघून गेली होती. ती अरुंधतीच्या लग्नासाठी अचानक मुंबईत येते. दोघांचं बोलणं होतं आणि यश तिला तुझा निर्णय झाल्याशिवाय तोंड दाखवू नको सांगतो. त्यानंतर अचानक गौरी यशला सोडून अमेरिकेला निघून जाते.



Source link

सातार्‍यात ‘राहीबाई पोपेरे देशी वाणांचे मॉडेल’; 150 प्रजातींचे जतन | पुढारी

0









सातारा; विठ्ठल हेंद्रे :  केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलेल्या राहीबाई पोपेरे देशी वाणांचे मॉडेल सातार्‍यात रूजू लागले आहे. आहारातील खाणं कसदार असाव अन् आरोग्य चांगले रहावे, यासाठी सातारा तालुक्यातील 4 गावांमध्ये 8 शेतकर्‍यांनी ‘देशी बियाणाच्या वाणांची बँक’ तयार केली आहे. हे शेतकरी एकमेकांना पैशांची देवाण-घेवाण करत नसून त्या बदल्यात एकमेकांना देशी बियाणांच्या वाणांचे अदान-प्रदान करत आहेत. दरम्यान, यामुळे दुर्मीळ होत चाललेल्या 150 वाणांचे जतन झाले आहे.

सातारा तालुक्यातील कुसवडे, मापरवाडी, आटाळी व राजापुरी या गावात अवघ्या 8 महिन्यांपूर्वी देशी बियाणांच्या वाणांची बँक उभारण्यात आली आहे. यासाठी सातार्‍यातील ‘अ‍ॅवॉर्ड’ या सामाजिक संस्थेने पुढाकार घेत 8 शेतकर्‍यांना थेट राहीबाई पोपेरे यांच्या गावात नेवून अभ्यास सहल पूर्ण केली. शेतकर्‍यांना तेथील प्रोजेक्ट दाखवून बीज बँकेचे संकलन, संवर्धन आणि वृद्धी कशी करायची? याचे ट्रेनिंग देण्यात आले आहे. हायब्रीड बियाणांऐवजी देशी बियाणे हे कसे किफायतशीर व रोगप्रतिबंधक आहे हे पटवून देण्यात आले आहे. आशाबाई कदम, शेवंता सराटे, निर्मला चव्हाण, शोभा पवार, तानाजी आटाळे, नारायण जाधव, विठ्ठल साळुंखे व लक्ष्मण साळुंखे या शेतकर्‍यांनी एकूण चार देशी बियाणांची बँक तयार केली आहे.

कणगी… गाडगं-मडकं… वाणावळा..

देशी वाण सापडल्यानंतर ते मिळाल्यानंतर कसे ठेवावे? याच्या घरगुती सोप्या पद्धती आहेत. पारंपरिक पद्धतीमध्ये कणगीमध्येही ही बियाणे सुस्थितीत राहतात. गावाकडे गाडगी-मडकी वापरली जातात. त्यामध्येही ही बियाणे राहू शकतात. याशिवाय लाकडाचे कपाट करुन लहान डब्यांमध्येही त्या ठेवल्या जाऊ शकतात. यासंबंधी या 8 शेतकर्‍यांची वेळोवेळी बैठक घेण्यात आली. प्रत्यक्ष बियाणांची साठवणूक झाल्यानंतर ज्या पद्धतीने ‘वाण लुटण्याचा’ कार्यक्रम होतो त्याच पद्धतीने 8 शेतकर्‍यांना बोलावून त्यांना एकमेकांकडे असलेले देशी वाण लुटण्यास सांगितले. अशा पद्धतीने दर तीन महिन्यांनी अशा वाणवळ्यांचा कार्यक्रम शेतकर्‍यांमध्ये घेतला जाणार आहे. यामुळे या शेतकर्‍यांच्या देशी वाणांच्या बँकेत नव्या वाणांची भर पडत जाणार आहे.

सातारचं देशी वाण दोन जिल्ह्यात…

सातार्‍यात सुरू झालेल्या या देशी बियाणे वाण बँकेची भुरळ नंदूरबार व अमरावती जिल्ह्यातील शेतकर्‍यांनाही पडली असून त्यांनी देशी वाणांची मागणी केली आहे. याशिवाय सद्यस्थितीला गावांच्या माध्यमातून तालुका, जिल्हा व नंतर जिल्ह्याबाहेर देशी वाण बँकेचा पसारा वाढवला जाण्याचे प्रयोजन आहे. अर्थात हे सर्व करत असताना यामध्ये आवड असणार्‍या शेतकर्‍यांनाच प्राधान्य दिले जाणार आहे. कारण यामाध्यमातून आर्थिक फायदा नगण्य आहे मात्र दूरद़ृष्टी मोठी आहे.











Source link

सातारा : वेण्णालेक परिसरात हिमकण; ऐन उन्हाळी हंगामात हिमकणांचा नजराणा | पुढारी

0









महाबळेश्वर पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राचे मिनी काश्मीर,थंडीचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या महाबळेश्वर पर्यटनस्थळी गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल झाला आहे.  थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. शहरासह तालुक्यात थंडी सोबतच गार वारे वाहत आहे. स्थानिकांसह पर्यटक एन उन्हाळी हंगामात महाबळेश्वरमध्ये ”काश्मीर” चाच जणू अनुभव घेत आहेत.

या बदललेल्या वातावरणाने सोमवारी (दि.२७) पहाटे वेण्णालेक सह लगतच्या परिसरात दवबिंदू हिमकणात रूपांतरण झाल्याचे दृश्य पाहावयास मिळाले. वेण्णालेक जेट्टीसह वेण्णालेक परिसरातील वाहनांच्या टपांवर देखील मोठ्या प्रमाणावर हिमकण जमा झाल्याचे पाहावयास मिळाले. शहरासह तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढले आहे. वेण्णालेक सह परिसरातील रेस्टॉरंट हॉटेल्सबाहेर सायंकाळी थंडीपासून बचावासाठी शेकोटीचा आधार अनेकजण घेत असल्याचे पाहावयास मिळत आहेत. महाबळेश्वरच्या या कडाक्याच्या थंडीमुळे मुख्य बाजारपेठेत सायंकाळी येथील मुख्य बाजारामध्ये फिरताना पर्यटक शाल, स्वेटर, कानटोपी परिधान करून फेरफटका मारताना दिसून येत आहेत. शहरातील तापमानामध्ये सतत चढ उतार होत असून गेल्या काही दिवसांपासून थंडीमध्ये मोठी वाढ झाली आहे.

हेही वाचा 











Source link