Sunday, June 28, 2026
Home Blog Page 3121

कराड: दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद; १४ पिस्टलसह १० जणांना अटक | पुढारी

0


कराड :पुढारी वृत्तसेवा : दरोडेच्या तयारीत असलेली टोळी पोलिसांनी जेरबंद केली. त्यांच्याकडून तब्बल 14 देशी बनावटीच्या पिस्टलसह 22 जिवंत काडतुसे, मिरची पूड, कोयता पोलिसांनी जप्त केला आहे. सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने राजमाची तालुका कराड गावच्या हद्दीत कराड-विटा रोडवर जानाई मंदिराजवळ सोमवारी (दि. 27) रात्री उशिरा ही कारवाई केली.

सनी उर्फ ​​गणेश शिंदे (रा. ओगलेवाडी, ता. कराड), अमित हणमंत कदम (रा.अंतवाडी ता. कराड), अखिलेश सूरज नलवाडे (रा. गजानन हाउसिंग सोसाइटी, कराड), धनंजय मारुती वाटकर (रा. सैदापूर ता. कराड) वहीद बाबासो मुल्ला (रा. विंग, कराड), रिजवान रज्जाक नदफ (रा. मलकापूर, कराड), चेतन शाम देवकुले (रा. बुधवार पेठ, कराड), बजरंग सुरेश माने (रा. बुधवार पेठ, कराड), हर्ष अनिल चंदवानी रा. मलकापूर, कराड) व तुषार पांडुरंग शिखरे (रा. हजारमाची, ता. कराड) अशी पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

याबाबत पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सांगितले की, जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना बेकायदा अग्निशस्त्रे बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. तशाच सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनाही दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची पतके तयार करून कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार कोंबिंग ऑपरेशन सुरू असतानाच सोमवारी रात्री पोलीस अरुण देवकर यांना विश्वसनीय बातमीदारामार्फत धक्कादायक माहिती समजली.

राजमाची गावच्या हद्दीत कराड-विटा जाणाऱ्या रोडवर जानाई मंदिर जवळ रस्त्याच्या बाजूला असलेल्या उसाच्या शेताजवळ काही इसम जमले असून ते दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे समजले. त्यानुसार पोलिस उपअधीक्षक अजय कोकाटे व अरुण देवकर यांनी पोलीस फौज फाटा घेऊन मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने घटनास्थळाकडे धाव घेतली. तेथे गेल्यानंतर उसाच्या शेतालगत आडोशाला आठ ते दहा जण उभे असल्याचे पोलिसांना दिसले‌. पोलीस आल्याचे समजताच संशयितांनी तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी संशयतांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ नऊ लाख 11 हजार 900 रुपये किमतीच्या 14 देशी बनावटीचे पिस्टल व 22 जिवंत काडतुसे, मिरची पूड, कोयता असा मुद्देमाल आढळून आला असून तो पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांनी संशयतांना ताब्यात घेऊन अटक केली असून कराड शहर पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलिस अधीक्षक समीर शेख,अपर पोलिस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभागाचे रणजित पाटील, प्रोबेशनरी पोलिस उपअधीक्षक अजय कोकाटे, पोनि भगवानराव पाटील, पोनि अरुण देवकर, सपोनि रमेश गजे, संतोष पवार, रविंद्र भोरे, फौजदार अमित पाटील, विश्वास शिंगाडे, पोलीस उत्तम दबडे, तानाजी माने, संतोष पवार, विजय कांबळे, संतोष सपकाळ, शरद बेबले, साबीर मुल्ला, प्रविण फडतरे, अमोल माने, मुनीर मुल्ला, निलेश काटकर, प्रविण कांबळे, रोहित निकम, विशाल पवार, सचिन ससाणे, मयुर देशमुख, मोहसिन मोमीन, संभाजी साळूंखे, पंकज बेसके, येळवे, कुलदिप कोळी, अमित वाघमारे, सज्जन जगताप, सचिन निकम, सागर बर्गे यांनी कारवाईत सहभाग घेतला. वरिष्ठांनी कारवाईत सहभागी असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

अनेक जण रेकॉर्डवरील संशयित…

दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केल्यानंतर त्यांच्याकडून 14 पिस्टल व 22 जिवंत काडतुसे तसेच मिरची पूड, कोयता आदी मुद्देमाल जप्त केला. संशयतांची अधिक चौकशी केली असता पोलिसांनी अटक केलेल्या पैकी अनेक जण रेकॉर्डवरील संशयित असल्याची माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिली. तसेच या टोळीने यापूर्वी काही गुन्हे केले आहेत का? याचा तपास पोलीस करणार आहेत? त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.

पिस्टल आणली कुठून याचा शोध घेणार…

अवैध पिस्टल बाळगणाऱ्यांवर यापूर्वी अनेक वेळेला कारवाई झालेली आहे. मात्र त्या कारवाईमध्ये पोलिसांना मुळापर्यंत जाण्यात अपयश आल्याबाबत विचारले असता पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सांगितले की या कारवाईमध्ये आम्ही संशयितांनी पिस्टल आणली कुठून? त्यांना कोणी दिली? त्याची निर्मिती कोठे केले जाते? पुरवणारे कोण आहेत? याचा संपूर्ण तपास आम्ही करणार आहोत. या संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा आमचा प्रयत्न राहील. कारवाई हाच अवैध पिस्तूल बाळगणाऱ्यांवर उपाय असू शकतो, असेही त्यांनी सांगितले.

गुन्हेगारी डोळ्यांची संशयितांचा संबंध असू शकतो..

पोलिसांचे सोशल मीडियावरती नियंत्रण असते. अनेक वेळेला स्वतःला प्रमोट करण्यासाठी गुन्हेगार सोशल मीडियाचा वापर करत असतात. त्याची माहिती मिळताच पोलीस संबंधितावर कारवाई करत असतात. याशिवाय पोलिसांनी उंच भरारी प्रकल्प सुरू केला आहे. त्या माध्यमातूनही अल्पवयीन मुलांचे प्रबोधन करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. असे संगत पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी कराड मधील गुन्हेगारी तुळशी यातील अनेकांचा संबंध असू शकतो त्याचाही आम्ही तपास करणार आहे, असे सांगितले.

अवैध स्वरूपात एखादा व्यक्ती पिस्टल बाळगत असेल तर नागरिकांनी याबाबत पोलिसांना माहिती द्यावी. तसेच एखाद्या व्यक्तीकडे कोणी पिस्टल आणून दिले किंवा एखादी व्यक्ती दुसऱ्याला विनापरवाना पिस्टल देत असल्याची माहिती मिळाली तर नागरिकांनी पोलिसांची संपर्क साधावा. समाजात दहशत माजवणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे.

– समीर शेख, पोलीस अधीक्षक, सातारा

हेही वाचा 



Source link

Maharashtrachi Hasyajatra: हास्याचा चौकार!! ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ आता चार दिवस

0
Maharashtrachi Hasyajatra: हास्याचा चौकार!! ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ आता चार दिवस


‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा मंच रसिकांना निखळ आनंद देत असून हास्यजत्रेतील एकेक व्यक्तिरेखा रसिकांना त्यांच्या घरातली वाटते. आता हे मनोरंजन ३ एप्रिलपासून प्रत्येक आठवड्यात चार दिवस होणार आहे, म्हणजेच आता प्रेक्षकांसाठी हास्याचा चौकार घेऊन येतो आहोत. आता नवनवीन प्रहसनांतून काही वेगळेपण अनुभवायला मिळणार आहे आणि यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत. निवेदिका प्राजक्ता माळी हिची उत्स्फूर्त दाद, हास्यरसिक प्रसाद ओक आणि सई ताम्हणकर यांचं मार्मिक परीक्षण तर समीर, गौरव, नम्रता, प्रसाद, चेतना, शिवली, पृथ्वीक, ओंकार, दत्तू आणि इतर कलाकार यांचे दमदार अभिनय ह्यांमुळे निखळ मनोरंजन होतं. टेन्शन विसरण्यासाठी, दुःख दूर करण्यासाठी आणि मनमुराद हसण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम पाहिला जातो.



Source link

Pathaan: पठाणच्या यशानंतर शाहरुखनं खरेदी केली रोल्स रॉइस; किंमत ऐकून चक्रावून जाल!

0
Pathaan: पठाणच्या यशानंतर शाहरुखनं खरेदी केली रोल्स रॉइस; किंमत ऐकून चक्रावून जाल!


Shahrukh Khan: शाहरुख खानचा पठाण हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. आता या चित्रपटाच्या यशानंतर शाहरुखने महागडी गाडी खरेदी केल्याचे समोर आले आहे.



Source link

Bheed: पिक्चरचं नाव ‘भीड’, पण थिएटर रिकामे… खर्चही निघण्याचे वांधे

0
Bheed: पिक्चरचं नाव ‘भीड’, पण थिएटर रिकामे… खर्चही निघण्याचे वांधे


Bheed Box Office Collection: अभिनेता राजकुमार रावचा भीड हा चित्रपट प्रदर्शित होऊन चार दिवस झाले आहे. मात्र बॉक्स ऑफिसवर चित्रपट फ्लॉप ठरताना दिसत आहे.



Source link

Sari Teaser: मृणाल कुलकर्णीच्या हृदयस्पर्शी प्रेमाच्या ‘सरी’चा टीझर प्रदर्शित

0
Sari Teaser: मृणाल कुलकर्णीच्या हृदयस्पर्शी प्रेमाच्या ‘सरी’चा टीझर प्रदर्शित


त्याच्या, तिच्या आणि त्याच्या प्रेमाची एक अकल्पित गोष्ट असलेला ‘सरी’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून, या टीझरमध्ये प्रेमाचे त्रिकुट दिसत आहे. दियाच्या( रितिका श्रोत्री)आलेल्या दोन मुलांसोबत तिची मैत्री होते, ती दोघांच्याही प्रेमात पडते, पण शेवटी असे काय होते, ज्यामुळे दिया स्वतःला दुखावून घेते? तिच्या आयुष्यात ते दोघे कसे येतात? त्या दोघांपैकी ती कोणाच्या प्रेमाचा स्वीकार करणार आणि या प्रेमकथेचा शेवट काय होणार ? हे प्रेक्षकांना येत्या ५ मे रोजी समजणार आहे.



Source link

TMKOC: तिला शोमधून काढायला घाबरत नाही पण…; दयाबेनच्या वापसीवर आसित मोदींचं मोठं विधान

0
TMKOC: तिला शोमधून काढायला घाबरत नाही पण…; दयाबेनच्या वापसीवर आसित मोदींचं मोठं विधान


Tarak Mehta Ka Oolta Chashma: गेल्या काही दिवसांपासून दया बेन ही मालिकेत दिसत नाही. तिच्या परत येण्याची सर्वजण वाट पाहात आहेत. अशातच मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.



Source link

Bai Vadyatun Ja: दिगंबर नाईक यांना बाईने केले हैराण, ‘बाई वाड्यातून जा’ नवं नाटक रंगभूमीवर

0
Bai Vadyatun Ja: दिगंबर नाईक यांना बाईने केले हैराण, ‘बाई वाड्यातून जा’ नवं नाटक रंगभूमीवर


आपल्या विनोदी टायमिंगने रसिकांना खळखळून हसायला लावणारे अभिनेते दिगंबर नाईक सध्या एका बाईमुळे त्रस्त झाले आहेत. या बाईने त्यांना हैराण करून सोडलं आहे.बाई वाड्यातून जा असं ते म्हणतायेत. ही बाई नेमकी कोण? ती वाड्यात का आली आहे? ती बाई वाड्यात राहणार ? की दिगंबर नाईक तिला घालवण्यात यशस्वी होणार का ? हे पाहायचं असेल तर अभिनेते दिगंबर नाईक आणि बिगबॉस फेम सोनाली पाटील यांचे आगमी ‘बाई वाड्यातून जा’ हे धमाल विनोदी नाटक पाहावं लागेल. येत्या बुधवारी २९ मार्चला अत्रे रंगमंदिर कल्याण येथे या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग रंगणार आहे. दिशा आणि कलारंजन प्रस्तुत या नाटकाचे निर्माते उदय साटम, प्रिया पाटील, आबा ढोले यांचे आहे. नाटकाचे लेखन दिग्दर्शन संकेत तांडेल यांचे आहे.



Source link

सातारा : बैलगाडी शर्यतींमुळे जत्रेतील अर्थकारणाला गती | पुढारी

0









सातारा; पुढारी वृत्तसेवा :  मोठ्या यात्रानंतर आता ग्रामीण भागात ग्रामदैवतांच्या यात्रांचा हंगाम बहरला आहे. या यात्रांवेळी होणार्‍या बैलगाडी शर्यतीमुळे पुन्हा जत्रेतील अर्थकारणाला गती आली आहे. यामुळे शौकिनांचा उत्साहही दुणावला आहे.

यात्रेत होणार्‍या शर्यतींमुळे आता यात्रेतील अनेक छोट्या मोठ्या व्यवसायांना गती मिळाली आहे. यात्रेतील शर्यतींच्या अड्ड्यांवर सुमारे लाखो रुपयांची उलाढाल होतेच. आता यावर्षीच्या मोठ्या यात्रा संपल्या असल्या तरी ग्रामीण भागातील अनेक गावांच्या यात्रेवेळी बैलगाडी शर्यतींचे आयोजन होेते. या शर्यतींमुळे बैलगाडी, छकाटा निर्मिती, खिल्लार, म्हैसुरी खोंडांनाही मोठी मागणी असते.

मागील काही वर्षे बैलगाडी शर्यती न झाल्यामुळे यात्रेतील आर्थिक उलाढालीला मोठा ब्रेक लागला होता. काही ठिकाणी यात्रांतील मजाच संपली होती. नंतर कोरोनाचे संकट आल्याने यात आणखी भरच पडली. पण, आता हे संकट गेले आहे. यात्रा जत्रांचा हंगाम आता बहरल्याने बैलगाडी शर्यतीही जोमात सुरू आहेत. शर्यती पाहण्याचा एक वेगळाच आनंद शौकिन घेत आहेत.

ग्रामीण यात्रांतील रंगत वाढली…

वाहतुकीमधून किमान अडीच ते तीन लाख रुपये, शर्यती प्रवेश … मधून एक ते दीड लाख रुपये, हॉटेल व्यवसाय, रसवंती गृहे, आईस्क्रीम पार्लर, चहा, पान टपर्‍यांची सुमारे 2 तेे 3 लाखांची उलाढाल शर्यतीच्या ठिकाणी होत आहे. अर्थातच यात्रांवेळी आयोजित केल्या जाणार्‍या शर्यतींमुळे यात्रांमधील आर्थिक उलाढालीला चालना मिळाली आहे.











Source link

Akash Thosar: सर्वांना आग्रहाचे निमंत्रण…; लग्नाच्या लूकमधील फोटो शेअर करत आकाश ठोसरने केली पोस्ट

0
Akash Thosar: सर्वांना आग्रहाचे निमंत्रण…; लग्नाच्या लूकमधील फोटो शेअर करत आकाश ठोसरने केली पोस्ट


Akash Thosar: अभिनेता आकाश ठोसरने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तो नवरदेवाच्या लूकमध्ये दिसत आहे.



Source link

Netflix: माधुरी दीक्षितने शोमध्ये आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्यामुळे नेटफ्लिक्सला नोटीस

0
Netflix: माधुरी दीक्षितने शोमध्ये आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्यामुळे नेटफ्लिक्सला नोटीस


Netflix Gets Legal Notice: बिग बँग थिअरी या प्रसिद्ध शोमध्ये माधुरी दीक्षितबाबत (Madhuri Dixit) आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा आरोप करत नेटफ्लिक्सला नोटीस बजावण्यात आली आहे.



Source link