
Aai Kuthe Kay Karte: अरुंधतीने नुकताच दुसरे लग्न केले आहे. तिच्या नव्या संसाराला सुरुवात झाली असतनाच गौरीने यशसोबतचे नाते तोडल्याने मालिकेत मोठा ट्वीस्ट आला आहे. आता यश स्वत:ला कसा सांभाळणार याची चिंता अरुंधतीला सतावते आहे.

Aai Kuthe Kay Karte: अरुंधतीने नुकताच दुसरे लग्न केले आहे. तिच्या नव्या संसाराला सुरुवात झाली असतनाच गौरीने यशसोबतचे नाते तोडल्याने मालिकेत मोठा ट्वीस्ट आला आहे. आता यश स्वत:ला कसा सांभाळणार याची चिंता अरुंधतीला सतावते आहे.

प्रेक्षकांना आपलीशी वाटणाऱ्या अश्विनीचा ग्लॅमरस प्रवास सुरु झाला आणि मालिकेतील अश्विनीच्या भूमिकेला प्रेक्षकांनी उचलून धरलं. या स्पर्धेदरम्यान तिला अनेक अडथळ्यांमधून जावं लागलं. पण अखेरीस अश्विनीने या स्पर्धेत पुन्हा कमबॅक केलं. अश्विनीची हि भूमिका सर्वसमावेशक आहे. कुटुंबातील सदस्य त्यांचे स्वभाव, तिचं घराप्रती कर्तव्य ह्या सर्व गोष्टींची सांगड घालून समंजसपणे घरातील नाती सांभाळून घेणाऱ्या अश्विनीचा मिसेस इंडिया २०२३ ग्रॅन्ड फिनालेचा प्रवास सुरु झालाय. आता अश्विनीला गरज आहे तुमच्या आशिर्वादाची, कारण ही स्पर्धा सोपी नाही आणि शिल्पी तिच्या ह्या प्रवासात अडथळे आणणार हे नक्की.

‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या मराठी चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटातून इतिहासातील एक सुवर्णपान उलगडलं जाणार आहे. मात्र, या चित्रपटाच्या सेटवरून आता एक वाईट बातमी समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी शुटिंगदरम्यान दरीत कोसळलेल्या १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे.

राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्रा हे एकमेकांचे खूप जुने मित्र आहेत. यूकेमध्ये शिक्षण घेत असताना दोघांची ओळख झाली होती. नुकतीच दोघांच्या कुटुंबीयांचीही भेट झाली होती, असं सांगितलं जातं. दोघांचाही लवकरच साखरपुडा होणार असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या घरी परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा एकत्र आले होते. याशिवाय डिनरसाठीही ते एकत्र आलेले दिसले होते. तेव्हापासून त्यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे. परिणीती लग्नासाठी कपडे डिझाईन करण्यासाठी आली होती का, असे अनेक प्रश्न सोशल मीडियातून उपस्थित केले जात होते.

नागा चैतन्य आणि समंथा रुथ प्रभू दोघेही साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार आहेत. दोघांची भेट २०१०मध्ये एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झाली होती. याच चित्रपटाच्या सेटवर त्यांची मैत्री झाली आणि हळहळू दोघांमध्ये प्रेम फुलू लागले. दोघांनी एकमेकांना डेट केले आणि तब्बल ७ वर्षांनी २०१७मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली होती. गोव्यात मोठ्या थाटामाटात त्यांचा लग्नसोहळा पार पडला होता. मात्र, लग्नाच्या अवघ्या ४ वर्षांनी दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.

पाटण : गणेशचंद्र पिसाळ : पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक यावेळीही दुरंगी होणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई विरुद्ध राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर असा सहकारातील राजकीय सामना यावेळीही रंगतदार होण्याच्या दाट शक्यता वर्तविण्यात येत आहेत.
आजवर या बाजार समितीची एकहाती सत्ता टिकवण्यात पाटणकर गट कायमच यशस्वी झाला आहे. देसाई गटाकडून प्रत्येक वेळेस कडवी झुंज देण्यात आली मात्र त्यात ते अपयशी ठरले आहेत. यावेळी सोसायटीसह ग्रामपंचायतींमध्ये आपलेच बहुमत असल्याचा दावा देसाई गटाकडून केला जात असतानाच दुसरीकडे मंत्रीपद या पार्श्वभूमीवर देसाई गटाकडून निश्चितच कडवे आव्हान उभे केले जाऊ शकते.
पाटण तालुक्यात प्रामुख्याने देसाई साखर कारखान्याची एकहाती सत्ता कायमच देसाई गटाकडे तर बहुतांशी सहकारी संस्थांची सत्ता ही पाटणकर गटाकडे अबाधित राहत आली आहे. आजवर अपवाद वगळता अनेकदा पाटणकरांनी साखर कारखान्याला आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला मात्र देसाईंनी तो मोडीत काढला. तर दुसरीकडे पाटणकरांच्या अन्य सहकारी संस्थांच्या नादाला न लागता केवळ कृषी बाजार समितीतच देसाई गटाने कडवे आव्हान दिले. मात्र कायमच ते पाटणकरांकडून मोडीत काढण्यात आले आहे. सध्या राज्यासह जिल्हा व तालुक्यातील राजकीय समीकरणे लक्षात घेता शिवसेना शिंदे गट व दुसरीकडे महाविकास आघाडी असे राजकारण सुरू असले तरी तालुकास्तरावर मात्र सेन, राष्ट्रवादीपेक्षा देसाई – पाटणकर अशीच खरी लढत होणार आहे.
विधानसभेची निवडणूक 2024 ला म्हणजेच पुढच्या वर्षी होईल. विधानसभेच्या दृष्टीने देखील देसाई, पाटणकर गटाकडून मागील वर्षापासूनच अंतर्गत मोर्चेबांधणी सुरू आहे. त्यामुळे विधानसभेची रंगीत तालीम म्हणून देखील दोन्ही गटांकडून या बाजार समितीची निवडणूक ऐनवेळी अत्यंत प्रतिष्ठेची केली जाणार यातही शंका नाही.
कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी एकूण 18जागा निवडून द्यायच्या आहेत. त्यामध्ये सोसायटी मतदारसंघातून सर्वसाधारण 7, महिला प्रतिनिधी 2, इतर मागासवर्गीय प्रतिनिधी 1, भटक्या भटक्या व विमुक्त जाती 1 अशा एकूण 11 जागा असून त्यासाठी 1325 मतदान आहे. ग्रामपंचायत सदस्यांमधून सर्वसाधारण 2, अनुसूचित जाती जमाती 1, आर्थिक दृष्ट्या दुर्बल 1 अशा 4 जागा निवडून द्यायच्या असून त्यासाठी 1898 मतदान आहे. अनुज्ञप्ती धारक व्यापारी व अडते प्रतिनिधी मधून 1 सदस्य निवडून द्यायचा असून त्यासाठी 1037 मतदान आहे तर हमाल व तोलारी प्रतिनिधी मधून 1 सदस्य निवडून द्यायचा असून त्यासाठी 9 मतदार असे कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी 4260 इतके एकूण मतदार मतदान करणार आहेत.
सातारा : पुढारी वृत्तसेवा : सातार्यातील गुरूकुल स्कूल शिक्षण संस्थेप्रकरणी सातारा एलसीबीचे तत्कालीन पोनि व सध्याचे डीवायएसपी पद्माकर घनवट व सहाय्यक फौजदार (एएसआय) विजय शिर्के यांच्यावर खंडणी, जबरी चोरीसह विविध कलमान्वये सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
राजेंद्र चोरगे यांनी याप्रकरणी तक्रार दिली असून सातारा जिल्हा न्यायालयात धाव घेतल्यानंतर सोमवारी याबाबत हालचालींना वेग आला. याबाबत राजेंद्र चोरगे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, 2017 साली चोरगे कुटुंबीय व शाळा प्रशासनाला सातारा एलसीबी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पोलिसांची ही कारवाई चुकीची असल्याचा आरोप करत चोरगे यांनी कायदेशीर सोपस्कार केले. यानंतर डिसेंबर 2018 मध्ये तत्कालीन एसपी पंकज देशुमख यांच्याकडे चोरगे यांनी घनवट व शिर्के यांच्या विरुद्ध तक्रार अर्ज केला. या अर्जासोबत चोरगे यांनी पोलिसांनी कशा पद्धतीने त्रास देऊन पैसे मागितले आहेत याचे पुरावे दिले. यामध्ये पोलिस 25 लाख रुपयांची मागणी करून त्यातील 12 लाख 30 हजार रुपये घेतल्याचेही म्हटले आहे.
एसपी पंकज देशमुख यांनी याची गंभीर दखल घेवून दोन्ही पोलिस अधिकार्यांची प्राथमिक चौकशी त्यावेळचे सहाय्यक पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्याकडे लावण्यात आली. पुढे एकूण पाच अधिकार्यांनी दोघांची चौकशी केली. यातूनच शिर्के यांच्यावर खात्यांतर्गत कारवाई देखील करण्यात आली. मात्र दोन्ही पोलिसांविरुध्द भक्कम पुरावे असल्याने सर्वसामान्यांप्रमाणे त्या पोलिसांवर योग्य तो गुन्हा दाखल करावा, अशी मागणी चोरगे तत्कालीन पोलिस अधीक्षकांकडे करत होते. मात्र नेमक्या कारवाईची प्रक्रिया होत नव्हती. अखेर चोरगे यांनी जानेवारी 2023 मध्ये सातारा न्यायालयात प्रायव्हेट तक्रार दाखल केली. कोर्टाने ही तक्रार पाहून सीआरपीसी 1973 चे कलम 156 (3) प्रमाणे या प्रकरणाचा तपास करुन न्यायालयात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. सातारा शहर पोलिसांना कोर्टाची ऑर्डर मिळाल्यानंतर सोमवारी व मंगळवारी गतीमान हालचाली झाल्या. अखेर मंगळवारी सातारा शहर पोलिस ठाण्यात डीवायएसपी पद्माकर घनवट व एएसआय विजय शिर्के यांच्यावर खंडणी, जबरी चोरी यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला.
सातारा: पुढारी वृत्तसेवा : सातार्यातील जयभवानी नागरी पतसंस्थेतील कारभाराप्रकरणी पतसंस्थेचे सभासद शंकर माळवदे यांनी आर्थिक गैरव्यवहाराबाबत सहकार विभागाकडे तक्रार अर्ज केला होता. याचा राग मनात धरून पतसंस्थेच्या पदाधिकार्यांनी माळवदे यांचे सभासदत्व रद्द केले. याबाबतचे पुरावे घेऊन ते सातारा शहर पोलिस ठाण्याचे पोनि भगवान निंबाळकर व सपोनि राजेश माने या पोलिसांना भेटले असता त्यांनी गुन्हा दाखल केला नाही. यामुळे माळवदे सातारा जिल्हा न्यायालयात गेले असता पतसंस्थेच्या पदाधिकार्यांसह पोलिसांवरही गुन्हा दाखल (एफआयआर) करण्याचा आदेेश कोर्टाने केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, जयभवानी पतसंस्थेचे माळवदे यांचे सभासदत्व पतसंस्थेच्या पदाधिकार्यांनी आपापसात संगनमत करून, कट रचून त्यांचे सभासदत्व रद्द केले. सभासदत्व रद्द करताना संबंधितांनी खोटी कागदपत्रे तयार करून त्यावर बोगस सह्या करण्यात आल्या होत्या. याचे इतिवृत्त तयार करून ते दस्ताऐवज शासकीय कामात खरे असल्याचेही भासवण्यात आले. हे सर्व पुरावे एकत्र तयार करुन सातारा शहर पोलिस ठाण्यात माळवदे यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
सातारा शहर पोलिसांना सर्व कागदपत्रे देवून अदखलपात्र गुन्हा करण्याची विनंती केली असतानाही त्यांनी टोलवाटोलवी करत प्रकरण धुडकावून लावले. पोलिसांकडून दखलपात्र गुन्हा दाखल होत नसल्याने अखेर शंकर माळवदे यांनी सातारा जिल्हा न्यायालयात धाव घेतली. नुकतेच याबाबत न्यायाधीशांनी सीआरपीसी 156 (3) याप्रमाणे पोलिसांसह पतसंस्थेच्या संबंधित एकूण 13 पदाधिकार्यांवर प्रथम खबरी अहवाल नोंदवून (एफआयआर) पुढील कार्यवाही करण्याचे आदेश दिले.
दरम्यान याबाबत प्रतिक्रिया देताना शंकर माळवदे म्हणाले, पोलिसांकडे वारंवार पाठपुरावा करुन आयते पुरावे देवूनही त्यांना गुन्ह्यातील गंभीरता समजली नाही. यामुळेच आपण सातारा जिल्हा न्यायालयात गेलो. याठिकाणी गेल्या आठवड्यात ऑर्डर झाल्याचे वास्तव असताना अद्याप शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही. याप्रकरणी आपण न्यायालयीन स्तरावर पाठपुरावा करत आहे.
सातारा : पुढारी वृत्तसेवा : सातारच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील क्लार्कने मोटार वाहन निरीक्षक प्रकाश खटावकर व एजंट संतोष शिंदे या दोघांविरुद्ध कागदपत्रे चोरल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
सागर शिवाजी लाळगे (वय 35, रा. दौलतनगर, सातारा) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून ते आरटीओ कार्यालयातील क्लार्क आहेत. त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, संशयित दोघांनी गैरसमज करून घेऊन त्यांच्या विरोधात भूमिका घेतली. त्यातूनच ‘तुला कामाला लावतो’, अशा धमक्या दिल्या. संबंधित दोघांनी गेल्या एक वर्षापासून वेळोवेळी त्रास दिला. यातूनच तक्रारदार यांच्यासंबंधी कामकाजाची असलेली कागदपत्रे गहाळ झाली. कागदपत्रे गहाळ होण्याचे प्रमाण वाढले व त्या कागदपत्रांसंबंधी माहिती अधिकाराखाली माहिती मागवण्याचे उद्योग अन्य मार्गाने राबवले. याबाबतची सर्व माहिती घेतल्यानंतर संशयित दोघांनी तक्रारदार यांची कागदपत्रे चोरल्याची तक्रार शहर पोलिस ठाण्यात जाऊन दिली. त्यानुसार पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला.
The post सातारा जिल्ह्यातील 5 अधिकार्यांवर गुन्हे appeared first on पुढारी.

Priyanka Chopra Controversial Ad : बॉलिवूडमध्ये आल्यानंतर सुरुवातीच्या काळात केलेल्या एका जाहिरातीचा अजूनही पश्चात्ताप होत असल्याचं प्रियांका चोप्रा हिनं म्हटलं आहे.
कराड : पुढारी वृत्तसेवा नुकत्याच अमेरिकेतील एरिझोना राज्याच्यातील फिनिक्स येथे पार पडलेल्या अल्ट्रामॅन स्पर्धेत कराडच्या वेदांत अभय नांगरे (वय 22) याने सहभाग घेत ही स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केली. सर्वात कमी वयाचा अल्ट्रामॅन म्हणून त्याला सन्मानित करण्यात आले. सात देशातील 21 स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. त्यापैकी 16 स्पर्धकांनी ही स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केली. यावेळी स्पर्धेत वेदांत हा एकटाच भारताचे प्रतिनिधित्व करत होता. अमेरिकेतील अल्ट्रामॅन स्पर्धेत तरुण भारतीय अल्ट्रामॅन बनण्याचा मान वेदांतला मिळाला आहे.
ही तीन दिवसांची खडतर अशी ट्रायथलॉन स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवशी 10 किलोमीटर पोहणे व 150 किलोमीटर सायकलिंग करायचे असते. दुसऱ्या दिवशी 275 किलोमीटर सायकलिंग करायचे असते. तिसऱ्या दिवशी 84 किलोमीटर रनिंग करायचे असते. प्रत्येक दिवसाचे अंतर स्पर्धकाला 12 तासांच्या आत पूर्ण करायचे असते. वेदांतला हे अंतर पार करण्यासाठी तीन दिवसांत एकूण 33 तास 46 मिनिटे लागली.
दहा डिग्री अंश थंड तापमानातही सलग साडेचार तास त्याला पोहावे लागले. तसेच सायकलिंग व रनिंगसाठी थंड वातावरणातून, बोचऱ्या वाऱ्यातून तसेच कठीण अशा चढ – उताराच्या मार्गावरून त्याला अंतर पूर्ण करावे लागले.
या स्पर्धेत स्पर्धकाला सपोर्टसाठी त्याच्या पुढे अथवा मागे कारसह क्रू मेंबरची गरज असते, जे आपल्या स्पर्धकाला योग्य कॅलरीचे खाणे देणे, रस्ता दाखविणे याकरता मदत करीत असतात. यावेळी वेदांत बरोबर त्याची आई सौ. कल्याणी नांगरे व वडील अभय नांगरे हे क्रू मेंबर्स होते. याखेरीज अमेरिकेतील हवाई येथील या स्पर्धेचा अनेक वर्षाचा अनुभव असलेले क्रू म्हणून बिली रिकार्ड्स हे होते. त्यांचे विशेष सहाय्य वेदांतला ही रेस पूर्ण करण्यासाठी झाले.
अल्ट्रामॅन म्हणून सन्मानित झाल्यावर खासदार श्रीनिवास पाटील, सारंग पाटील यांनी वेदांतचे फोनवरून अभिनंदन केले तसेच अनेक भारतातील मित्र, नातेवाईक तसेच अमेरिकेतील अनेक भारतीयांनी वेदांतचे विशेष कौतुक केले.
अमेरिकेतील फिनिक्स मराठी मंडळाने त्याची विशेष मुलाखत घेवून त्याचा गौरव केला. भारतामधून अमेरिकेत येवून ही कठीण स्पर्धा यशस्वी केल्याने आम्हाला भारतीय म्हणून वेदांतचा खूप अभिमान आहे अशा भावना येथे अनेकांनी व्यक्त केल्या.
स्वित्झर्लंडमध्ये आयर्नमॅन
या अगोदर वेदांतने जुलै 2022 मध्ये आयर्नमॅन ही स्पर्धा स्वित्झर्लंड येथे यशस्वीपणे पूर्ण केली आहे. अल्ट्रामॅन स्पर्धा अतिशय कठीण स्पर्धा समजली जाते. जिद्द, चिकाटी, नियोजन, परिश्रम, त्याग, योग्य गुरूंचे मार्गदर्शन तसेच इच्छाशक्तीच्या जोरावर वेदांतने या स्पर्धेत यश संपादन केले.
हेही वाचा :
उंब्रज; पुढारी वृत्तसेवा : भुयाचीवाडी (ता. कराड) येथे सेवानिवृत्त पोलिसाच्या बंद असलेल्या बंगल्याच्या दरवाजाचे कुलूप तोडून कपाटातील रोख रक्कमेसह सुमारे ३० तोळे सोन्याचे दागिने असा लाखो रूपयांचा ऐवज चोरांनी लंपास केला. ही घटना सोमवारी ( दि.२७) उघडकीस आली आहे. सदर घटनेची नोंद रात्री उशिरा उंब्रज पोलिस ठाण्यात झाली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत सेवानिवृत्त पोलिस सुरेश धोंडीराम कदम मुळ गांव भुयाचीवाडी (ता.कराड, सध्या रा.कल्याण भिवंडी (ठाणे)) यांनी उंब्रज पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, जानुगडेवाडी ता.पाटण येथे फिर्यादी हे नाईकबा यात्रे निमित्त गेले होते. जाताना त्यांनी बंगल्याचा सेप्टी दरवाजा बंद करून त्यास कुलप लावले होते. सोमवार दिनांक २७ मार्च रोजी फिर्यादी यांचे बंधू यांनी फोन करून सांगितले की, बंगल्याचा सेफ्टी दरवाजाचे कुलुप तोडून बंगल्यात चोरी झालेली आहे. चोरट्यानी बंगल्याच्या मुख्य दरवाज्याचा कोयंडा तोडुन बंगल्यात प्रवेश करून बेडरूम मध्ये असलेले लोखंडी कपाट कटावणीने उचकटून त्यामध्ये असणारे लाखो रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून लंपास केली.
चोरीला गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांची सध्य परिस्थितीच्या बाजारभावाने चोरीला गेलेल्या ३० तोळे सोन्याची किंमत १८ लाख रुपयांच्या आसपास होत आहे. याबाबत अज्ञात चोरट्यांच्या विरोधात रात्री उशिरा उंब्रज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, अधिक तपास सपोनि अजय गोरड करीत आहेत.
भुयाचीवाडी नविन गावठाण येथे याच दिवशी मध्यरात्री सुदाम लोहार हे घराच्या पुढील बाजूला असलेल्या शेडमध्ये झोपले होते. अज्ञात चोरट्यानी त्यांच्या पत्नी च्या गळ्यातील दिड तोळ्याचे गंठण हिसकावून पोबारा केला. यावेळी सुदाम लोहार यांनी चोरट्याचा पाठलाग केला मात्र अंधाराचा फायदा घेऊन चोरटे पसार झाले.
सध्या रात्रीची बंद घरे फोडणारी चोरट्यांची टोळी सक्रिय झालेली असून, नागरिकांनी योग्य ती दक्षता घ्यावी तसेच गावांमध्ये येणारे फिरस्ते व अनोळखी व्यक्ती बाबतची माहिती तात्काळ गावातील पोलीस पाटील व पोलीस स्टेशनला द्यावी.
अजय गोरड, सहाय्यक पोलीस निरीक्षक उंब्रज
हेही वाचा;