Monday, June 29, 2026
Home Blog Page 3116

Varun Dhawan: भर स्टेजवर वरुण धवनने मॉडेल जीजी हदीदला केले किस Video Viral

0
Varun Dhawan: भर स्टेजवर वरुण धवनने मॉडेल जीजी हदीदला केले किस Video Viral


नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचे (NMACC) नुकताच उद्घाटन झाले. या उद्घाटन सोहळ्याचे मुंबईत आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला बॉलिवूड कलाकारांनी देखील हजेरी लावली. तसेच अनेक कलाकारांनी या उद्घाटन सोहळ्यात परफॉर्मन्स देखील दिले. दरम्यान, अभिनेता वरुण धवनने डान्स करता करता एका मॉडेलला किस केले.



Source link

Indian Idol 13: फिनाले आधीच ‘इंडियन आयडल १३’चा विजेता घोषीत?

0
Indian Idol 13: फिनाले आधीच ‘इंडियन आयडल १३’चा विजेता घोषीत?


इंडियन आयडल १३च्या टॉप सहा स्पर्धकांमध्ये शिवम सिंह, ऋषी सिंह, बिडीप्ता चक्रवर्ती, चिराह कोटवाल, देबोशिता रॉय आणि सोनाक्षी कर यांनी स्थान पटकावले आहे. तर यंदाचे सिझनमध्ये नेहा कक्कर, हिमेश रेशमीया आणि विशाल दादलानी हे परिक्षक म्हणून काम करत होते. आता इंडियन आयडल १३च्या विजेते पदावर कोणता स्पर्धक नाव कोरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले. आज प्रेक्षकांना त्यांच्या या प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे.



Source link

NMACC: ‘झुमे जो पठाण’वर शाहरुचा रणवीर आणि वरुणसोबत भन्नाट डान्स Video Viral

0
NMACC: ‘झुमे जो पठाण’वर शाहरुचा रणवीर आणि वरुणसोबत भन्नाट डान्स Video Viral



Pathaan: नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचे (NMACC) नुकताच उद्घाटन झाले. या उद्घाटन सोहळ्याचे मुंबईत आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला बॉलिवूड कलाकारांनी देखील हजेरी लावली. दरम्यान, शाहरुख खानने त्याचा सुपरहिट चित्रपट ‘पठाण’मधील झुमे जो पठाण या गाण्यावर ठेका धरला. शाहरुखसोबत वरुण धवन आणि रणवीर सिंहदेखील डान्स करताना दिसले.



Source link

Amol Kolhe: अमृता खानविलकरबरोबर अडकणार लग्नबंधनात?; ‘त्या’ वृत्तावर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया

0
Amol Kolhe: अमृता खानविलकरबरोबर अडकणार लग्नबंधनात?; ‘त्या’ वृत्तावर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया


खासदार आणि अभिनेते डॉ.अमोल कोल्हे हे सतत चर्चेत असतात. कधी त्यांच्या चित्रपटांमुळे तर कधी राजकीय भूमिकांमुळे ते चर्चेचा विषय ठरतात. अमोल कोल्ह सध्या ‘शिवपुत्र संभाजी’ या नाटकाचे महाराष्ट्रात अनेक प्रयोग करताना दिसत आहेत. दरम्यान, त्यांनी शेअर केलेल्या एका पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या पोस्टमध्ये “अमोल कोल्हे अमृता खानविलकरबरोबर अडकणार लग्नबंधनात?” असे म्हटले गेले आहे.



Source link

Kapil Sharma: PCO बुथवर काम ते प्रसिद्ध कॉमेडीयन, जाणून घ्या कपिल शर्माचा खडतर प्रवास

0
Kapil Sharma: PCO बुथवर काम ते प्रसिद्ध कॉमेडीयन, जाणून घ्या कपिल शर्माचा खडतर प्रवास


सध्या अतिशय लोकप्रिय कॉमेडीयन म्हणून कपिल शर्मा ओळखला जातोय. त्याने त्याच्या विनोदबुद्धीने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तसेच छोट्या पडद्यावरील त्याच्या ‘द कपिल शर्मा शो’ने तर प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. पण, कपिलचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. आज २ एप्रिल रोजी कपिल शर्माचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया कपिलचा प्रवास…



Source link

Bholaa: अजय देवगणच्या ‘भोला’ची जादू फिकी, कमाईत घसरण

0
Bholaa: अजय देवगणच्या ‘भोला’ची जादू फिकी, कमाईत घसरण


‘भोला’ या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती अजय देवगणने केली आहे. या चित्रपटात अजय देवगण आणि तब्बू महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. त्यांच्यासोबत मकरंद देशपांडे, दीपक डोबरियाल आणि गजराज राव हे कलाकार देखील दिसत आहे. हा चित्रपट ३० मार्च २०२३ रोजी प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट हिंदी सहित तमिळ भाषेत प्रदर्शित होणार आहे.



Source link

Satara : हर हर महादेव! शिखर शिंगणापुरात शंभु महादेव यात्रेचा उत्साह

0



Satara : हर हर महादेव! शिखर शिंगणापुरात शंभु महादेव यात्रेचा उत्साह



Source link

Filmfare Marathi Award 2022: ‘या’ कलाकारांनी पटकावला फिल्मफेअर अवॉर्ड्स मराठी २०२२

0
Filmfare Marathi Award 2022: ‘या’ कलाकारांनी पटकावला फिल्मफेअर अवॉर्ड्स मराठी २०२२


फिल्मफेअर अवॉर्ड्स २०२२ या कार्यक्रमाचे अमेय वाघ आणि सिद्धार्थ जाधव यांनी सूत्रसंचालन केले. वैदेही परशुरामी, संस्कृती बालगुडे आणि अमृता खानविलकर यांनी आपल्या मनमोहक नृत्याविष्काराने रंगमंचावर धुमाकूळ घातला. श्रेयस तळपदेनेही एक पॉवरपॅक परफॉर्मन्स दिला, त्यानंतर सोनाली कुलकर्णी आणि पुष्कर जोग यांच्या अभिनयासह इतर काही कलाकारांनी पुरस्कार सोहळ्याला चार चाँद लावले. चला पाहूया विजेत्यांची यादी…



Source link

Satara Shikhar Shinganapur Yatra : शिखर शिंगणापूर यात्रेचा आजचा मुख्य दिवस, भाविकांचा महापूर

0



<p>Satara Shikhar Shinganapur Yatra : शिखर शिंगणापूर यात्रेचा आजचा मुख्य दिवस, भाविकांचा महापूर</p>



Source link

हर हर महादेव! शिखर शिंगणापुरात शंभु महादेव यात्रेचा उत्साह; हजारो कावडी गडावर 

0


Shikhar Shinganapur Yatra : लाखो भविकांचं श्रद्धास्थान असलेल्या शिखर शिंगणापूर (Shikhar Shinganapur) येथील शंभु महादेव यात्रेचा (Yatra) आज मुख्य दिवस आहे. हर हर महादेवच्या जयघोषात हजारो भाविक गडावर दाखल झाले आहेत. हजारोंच्या संख्येने कावडी गडावर दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. शंकराची पत्नी पार्वती यांचा पुनर्विवाह याचं गडावर झाला. या गडाच्या पायथ्याशी असलेल्या गावाच्या नावानं म्हणजेच शिखर शिंगणापूर या नावानं हा डोंगर प्रचलित झाला आहे.

डोंगरावर कावडी चढवण्याचा मोठा थरार 

शंभु महादेव यात्रेचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे लहानात लहान कावड आणि मोठ्यात मोठी कावड मुंगी घाटातील डोंगरावर थरारकपणे वर चढवल्या जातात. हा थरार म्हणजे अंगावर शहारे आणणारा असतो. या कावडीमध्ये महत्वाची कावड मानली जाते ती म्हणजे तेल्या भुत्याची कावड. गडावर कावडी नाचवत मंदिरच्या दरवाज्याला टेकवल्या जातात. कावडीला बांधलेल्या हंड्यातून आणलेलं पाणी मंदिरात असलेल्या शिवपार्वतीवर वाहिले जाते. दोन लिंग असलेलं महाराष्ट्रातील हे एकमेव मंदिरं मानले जाते.

आंध्र प्रदेशह कर्नाटकातील भाविकांचे श्रद्धास्थान 

या यात्रेसाठी दरवर्षी लाखो भाविक शिखर शिंगणापूरमध्ये दाखल होतात. शंभु महादेव हे महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातील कोट्यवधी भाविकांचं श्रद्धास्थान आहे. त्यामुळं या राज्यातून भाविक याठिकाणी दाखल होत असतात. दरवर्षीप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला सुरु झालेली ही यात्रा पौर्णिमेपर्यंत चालणार आहे. पहिल्या दिवसापासून यात्रेसाठी भाविकांची गर्दी वाढतच आहे. वर्षभर येथे विविध प्रकारचे उत्सव साजरे केले जातात. परंतू, चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून ते पौणिमापर्यंत विविध कार्यक्रम मंदिरात होत असतात. चैत्र शुद्ध पंचमीला देवाला हळद लावली जाते. तर अष्टमीला रात्री बारा वाजता शिव-पार्वती विवाह सोहळा पार पडतो.

शिखर शिंगणापूर येथील शंभु महादेव मंदिर

शिखर शिंगणापूर हे फलटण पासून 36 किमी अंतरावर तर नातेपुतेपासून 18 किमी अंतरावर आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे 3200 फूट उंचीवर असलेल्या पर्वत रागांवर हे अतिप्राचीन आणि भव्य असे हेमांडपंथी शिवालय मंदिर अतिशय सुंदर आणि मजबूत अशा तटबंदीसह बांधण्यात आले आहे. देवालयासमोर 4 दगडी अतिउंच अशा दीपमाळा आहेत. मंदिरात जाण्याकरिता तळापासून असलेल्या दगडी पायऱ्या वर दगडी कमानी असून पहिला 16 मीटरचा भव्य दरवाजा शेंडगे दरवाजा म्हणून ओळखला जातो. देवालयाच्या मुख्य दरवाज्याला ‘जिजाऊ दरवाजा’ असे म्हणतात. शहाजीराजांनी या दरवाजाचे बांधकाम करून घेतले आहे. दरवाजाच्या एका बाजूला गणपती व दुसऱ्या बाजूला हनुमानाची मूर्ती आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

Kamada Ekadashi: आज चैत्र शुद्ध एकादशी, अर्थात कामदा एकादशी; हरिहरा भेद नाही सांगणारी यात्रा

 



Source link