
Kajol Love Story: आज २ एप्रिल रोजी अजय देवगणचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांची लव्हस्टोरी
Source link

Kajol Love Story: आज २ एप्रिल रोजी अजय देवगणचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांची लव्हस्टोरी
Source link
पुणे, पुढारी वृत्तसेवा: सातारा येथील कासचे पठारला युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून मान्यता दिलेली आहे. अशा पठाराजवळ बेकायदा अतिक्रमण वाढले आहे. पर्यावरणाचा हा धोका टाळण्यासाठी तसेच येथील जैवविविधतेला नष्ट होण्यापासून रोखण्याकरिता पुण्यातील राष्ट्रीय हरित न्याय प्राधिकरणात याचिका दाखल केली आहे, अशी माहिती अॅड. असीम सरोदे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
या प्रसंगी याचिकाकर्ते सुजित आंबेकर, माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे आणि अॅड. श्रेया आवळे उपस्थित होते. सरोदे म्हणाले की, फुलांच्या 850 वेगवेगळ्या प्रजाती आहेत. त्यातील 39 दुर्मीळ प्रजातीतील फुले असून, 65 हजारांहून अधिक प्रकारचे पक्षी-प्राणी व कीटक या कास पठार परिसरात आढळून येतात. या पठाराचा 2012 मध्ये युनेस्कोकडून जागतिक वारसास्थळांच्या संरक्षित यादीत समावेश करण्यात आला. मात्र, यवतेश्वर ते कास पठार अशा साधारणपणे 15 किलोमीटरच्या अंतरात मागील काही वर्षांपासून बेकायदेशीर बांधकामे झाली आहेत. त्यामध्ये फार्म हाऊस, गेस्ट हाऊस, निवासी हॉटेल आदींचा समावेश आहे.
जागतिक वारसास्थळांच्या परिसरात बांधकाम करता येत नसतानाही या गोष्टींना आळा बसत नसल्याचे दिसून येत आहे. त्यात मुख्यमंत्र्यांनी बेकायदेशीर बांधकामांना कायदेशीर करू, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो. त्यामुळे कोणत्या अधिकाराखाली ते हे अनधिकृत बांधकाम अधिकृत करणार आहेत? तसेच राज्य सरकार पर्यावरणाचा नाश करणारे आहे का? असे प्रश्न पडू लागल्याचे अॅड. असीम सरादे यांनी सांगितले.

Nayanjyoti Saikia: मास्टर शेफचा हा प्रवास ३६ स्पर्धकांपासून सुरू झाला. या सगळ्यांना मागे टाकत नयनज्योतीने ही ट्रॉफी आपल्या नावावर केली.
Source link
सातारा; मीना शिंदे : मनोरंजन क्षेत्राचा आरसा म्हणून एकेकाळी चित्रपटगृहांकडे पाहिले जात असे. टीव्ही, यु ट्यूब, नेटफ्लेक्ससारख्या सोशल माध्यमांमुळे चित्रपटगृहांकडे कलाप्रेमी रसिक प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याने जिल्ह्यातील बहुतांश चित्रपटगृहे बंद झाली असून सातारा शहरातील सध्या सातपैकी सहा थिएटर्सचा कायमचा पडदा पडला आहे.
एकेकाळी कलाकारांच्या अभिनयाला दर्दी रसिकांचे पाठबळ मिळत असे. चित्रपटगृहांबद्दल आता फक्त आठवणी उरल्याचे वास्तव आहे. पूर्वी चित्रपटगृहांवर व्यवस्थापक, तिकीट विक्रेत्यांपासून डोअर किपरपर्यंत अनेकांचा उदरनिर्वाह चालत असे. मात्र, ,एकेक करत चित्रपटगृहे बंद होत गेल्याने गेल्या काही वर्षांमध्ये या सर्वांवरच बेरोजगारीची कुर्हाड कोसळली आहे. सातारा शहरातील सात चित्रपटगृहांपैकी सहा चित्रपटगृहे बंद झाली आहेत. राजवाडा परिसरातील राधिका, समर्थ, चित्रा, शिवसागर, मार्केटयार्ड परिसरातील कृष्णा, पोवईनाक्यावरील जयविजय व राजपथावरील राजलक्ष्मी या चित्रपटगृहांनी चित्रपट व अभिनय क्षेत्राचा सुवर्णकाळ पाहिला आहे.
सकाळपासून मध्यरात्रीपर्यंत चित्रपटप्रेमींची तुफान गर्दी, हिरोहिरॉईनची झगमगती पोस्टर्स, तिकीट खिडकीवरील हाऊसफुल्लचे बोर्ड म्हणजे त्या चित्रपटगृहाचा अभिमान असे. ब्लॅकव्हाईट ते इस्टमनकलर, फ्युजीकलर, सिनेस्कोप चित्रपट म्हणजे स्वप्न व कल्पनेच्या दुनियेत तरंगत ठेवणारी सिनेमाची दुनिया..अशी सर्व सफर घडवणारी थेएटर्स जवळपास बंदच झाली आहेत. आज चित्रपटगृहांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे. चित्रपटगृहात जावून तिकीट काढून चित्रपट पाहणारा वर्ग आता कमी झाला आहे.
प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याने हल्ली चित्रपटगृहांची संख्या कमी झाली असली तरी चित्रपट पाहणारा वर्ग कायम आहे. परंतु हा प्रेक्षक वर्ग घरातच बसून चित्रपट पाहण्याचा आनंद घेत आहे. त्यासाठी ओटीटीचा नवा प्लॅटफार्म उपलब्ध झाला असून सिनेरसिकांसाठी तो सोयीचा ठरत आहे. थिएटरला न जाणारे ओटीटीला पसंती देत आहेत.
The post सातार्यातील सहा नामवंत टॉकीज बंद; प्रेक्षकच उरला नाही appeared first on पुढारी.
Ram Navami 2023 : श्रीराम नवमी निमित्त सज्जनगडावर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं समर्थांच्या पादुकांचे पूजन
Source link

सध्या टेलिव्हिजन विश्वात सुरू असणाऱ्या इतर मालिकांपेक्षा वेगळा विषय आणि हलकीफुलकी मालिका म्हणून गेले तीन महिने ‘पोस्ट ऑफीस उघडं आहे’ ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली. नव्वदीच्या दशकातलं पोस्टाचं भावविश्व उलगडणारी ही मालिका गेले तीन महिने प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करतेय. १९९७ च्या काळातलं पोस्ट ऑफीस, तिथलं कामकाज, येणाऱ्या अडचणी, विविध मानवी स्वभाव आणि त्यांतून तयार होणारे विनोद प्रेक्षकांना भावले. सुरुवातीपासून मालिकेच्या टीमकडून सांगण्यात आलं होतं की, ही मालिका ४० भागांचीच असेल आणि त्याप्रमाणे येत्या रविवारी रात्री ९ वाजता ‘पोस्ट ऑफीस उघडं आहे’ या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, त्रिपुरा विधानसभेचं अधिवेशन सध्या सुरू आहे. हे अधिवेशन सुरू असताना सभागृहात खुर्चीवर बसून आमदार जादब लाल नात हे मोबाईलवर पॉर्न पाहत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ आजचा (३० मार्च) आहे. अश्लील व्हिडिओ पाहणारे जादब लाल नाथ हे बागबासा विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. जादब लाल नाथ आपल्या सीटवर बसून मोबाइलवर व्हिडीओ पाहत असल्याचं व्हायरल व्हिडिओत दिसत आहे.

‘भोला’ या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती अजय देवगणने केली आहे. या चित्रपटात अजय देवगण आणि तब्बू महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. त्यांच्यासोबत मकरंद देशपांडे, दीपक डोबरियाल आणि गजराज राव हे कलाकार देखील दिसत आहे. हा चित्रपट ३० मार्च २०२३ रोजी प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट हिंदी सहित तमिळ भाषेत प्रदर्शित होणार आहे.

मीना कुमारी अतिशय लोकप्रिय होती. मीना कुमारीचे ‘पाकिजा’, ‘परिणीता’ , ‘शारदा’, ‘आज़ाद, ‘दायरा’, ‘दो बीघा ज़मीन’ आणि इतर काही चित्रपट तुफान हिट ठरले होते. एकदा चित्रपटाच्या सेटवर निर्मात्याने चुकीची वागणूक दिली होती. निर्मात्याने शुटिंगच्या पहिल्याच दिवशी मीना कुमारीच्या खोलीत टेबल लावून एकत्र जेवणार असल्याची घोषणा केली होती. जेवताना त्याने मीना कुमारीला चुकीची वागणूक दिली होती.

Nawazuddin Siddiqui: शीबा शमास सिद्दीकीने सोशल मीडियावर नवाजचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ तिने मुंबई पोलिसांना टॅग केला आहे.