Monday, June 29, 2026
Home Blog Page 3107

Jaya Bachchan : लंडनला फिरायला जाण्यासाठी अमिताभ यांनी केले होते जयाशी लग्न, जाणून घ्या लव्हस्टोरी

0
Jaya Bachchan : लंडनला फिरायला जाण्यासाठी अमिताभ यांनी केले होते जयाशी लग्न, जाणून घ्या लव्हस्टोरी


अमिताभ यांनी किस्सा सांगताना म्हटले की, “मी आणि जया त्यावेळी जंजीर चित्रपटात एकत्र काम करत होतो. त्यावर्षी चित्रपट हिट झाला तर परदेशात फिरायला जाण्याचा बेत आम्ही आखला होता. मी आणि जयाने लंडन कधीच पाहिले नव्हते. त्यामुळे काही झाले तरी लंडनला फिरायला जायचे आम्ही ठरवले होते. त्यानंतर मी माझ्या वडिलांना मित्रांबरोबर लंडनला जाणार असल्याचे सांगितले. वडिलांनी मी कोणाबरोबर चाललो आहे असे विचारले. मी मित्रांची यादी दिल्यानंतर त्यात जयाचे नाव ऐकल्यावर त्यांनी जायचे असेल तर लग्न करून जा, असे सांगितले आणि वडिलांची आज्ञा प्रमाण मानून दुसऱ्याच दिवशी लग्नाचा निर्णय घेत आम्ही लंडन गाठले”



Source link

साताऱ्यात पिस्तुल दाखवून दीड लाखांची रोकड पळवली | पुढारी

0









सातारा; पुढारी वृत्तसेवा : सातारा शहरात शनिवारी (दि. ८) रात्री पिस्तुलचा धाक दाखवून कपड्याच्या दुकानातून रोख दीड लाख रुपये लुटल्याची घटना घडली. अजंठा चौकात ही घटना घडली असून साताऱ्यातील व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, अजंठा चौक येथे कपड्यांचे दुकान आहे. रात्री दुकान बंद करण्याची तयारी सुरू असताना तेथे दोघेजण आले. त्यांनी पिस्तुल दाखवून दुकानदाराला धमकावले. या घटनेने दुकानातील मालक, कर्मचारी हादरून गेले. संशयित दोघांनी बंदुकीचा धाक दाखवत पैशांची मागणी केली. दुकानदाराने गल्ला मोकळा करत सर्व कॅश चोरट्यांना दिली. सुमारे १० मिनिटे चोरट्यांनी धुमाकूळ घालत पैसे घेऊन दुचाकीवरून रहिमतपूर दिशेने पोबारा केला.

चोरटे गेल्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जिल्ह्यात रात्री नाकाबंदी करून चोरट्यांची माहिती घेण्यास सुरुवात झाली. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. प्राथमिक माहिती नुसार मधील दिसत असलेली बंदूक खरी की खोटी याबाबत पोलीस साशंक आहेत. मात्र चोरट्यांनी केलेल्या या लुटमारीमुळे सातारकर हादरून गेले आहेत.











Source link

Aai Kuthe Kay Karte: इशाने अनिरुद्धसमोर कबुल केलं अनिशवर असलेलं प्रेम, मालिकेत नवे वळण

0
Aai Kuthe Kay Karte: इशाने अनिरुद्धसमोर कबुल केलं अनिशवर असलेलं प्रेम, मालिकेत नवे वळण


‘माझे अनिशवर प्रेम आणि मी त्याच्याशीच लग्न करणार’ असे ईशा अनिरुद्धला ठणकावून सांगते. अनिशसोबत भविष्याचा विचार करत असशील तर, आताच सोडून दे, अन्यथा परिणाम वेगळे दिसतील, असा धमकीवजा इशारा अनिरुद्धने दिला आहे. त्यानंतर इशा पळून जाण्याचा निर्णय घेते.



Source link

Pushpa 2: ‘पुष्पा २’चा टीझर पाहिलात का? अल्लू अर्जुनने जिंकली चाहत्याची मने

0
Pushpa 2: ‘पुष्पा २’चा टीझर पाहिलात का? अल्लू अर्जुनने जिंकली चाहत्याची मने



Allu Arjun: गेल्या काही दिवसांपासून अल्लू अर्जुनचा पुष्पा २ हा चित्रपट येणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता या चित्रपटाचा टीझर समोर आला आहे.



Source link

Gayatri Datar: ‘तुला पाहते रे २’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला? गायत्री दातारने मौन

0
Gayatri Datar: ‘तुला पाहते रे २’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला? गायत्री दातारने मौन


चाहते सतत सोशल मीडियाच्या माध्यमातून सुबोध आणि गायत्रीला या मालिकेच्या दुसऱ्या भागाबाबत विचारत असतात. नुकताच गायत्रीने आपल्या चाहत्यांशी गप्पा मारण्यासाठी इन्स्टाग्राम अकाऊंटवरील ‘Ask Me anything’ सेशन घेतले होते. या,यामध्ये तिला अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. सोबतच गायत्रीने नवीन काहीतरी घडणार असल्याची हिंटसुद्धा दिली आहे.



Source link

Varun Dhawan: वरुण धवनने का फरवल्या क्रिती सेनॉन आणि प्रभासच्या अफेअरच्या अफवा? कारण आले समोर

0
Varun Dhawan: वरुण धवनने का फरवल्या क्रिती सेनॉन आणि प्रभासच्या अफेअरच्या अफवा? कारण आले समोर


काही दिवसांपूर्वी वरुणने झलक दिखला जा शोच्या सेटवर करण जोहरला म्हटले होते की, ‘क्रितीवर कोणीतरी प्रचंड प्रेम करतं आणि तो अभिनेता मुंबईमधील नाही. तो हैदराबादमधील आहे. सध्या दीपिकासोबत शूट करत आहे.’ त्यावेळी प्रभास हा दीपिकासोबत हैदराबाद येथी शुटिंग करत होता. त्यामुळे प्रभास हा क्रितीला डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.



Source link

Adnan Sami: पत्नीचे पॉर्न व्हिडीओ बनवले; अदनान सामीवर भावाने केले गंभीर आरोप

0
Adnan Sami: पत्नीचे पॉर्न व्हिडीओ बनवले; अदनान सामीवर भावाने केले गंभीर आरोप


पुढे तो म्हणाला, “अदनानला भीती होती की मी त्याच्यापेक्षा चागलं काम करेन. आता मी घरी बसून काही करत नाही. माझ्याकडे काम नाही याला अदनान जबाबदार आहे. अदनानने भारताचे नागरिकत्व घेतले कारण त्याला मोबदल्यात चांगले पैसे दिले गेले होते. हे पैसे पाकिस्तान देऊ शकला नाही म्हणून त्याने भारतीय नागरिकत्व स्विकारले. आपली आई भारतीय होती, असे अदनान म्हणतो, पण त्याचा हा दावाही खोटा आहे. तो कॅनडाच्या तुरुंगातही होता.”



Source link

Pushpa 2: गळ्यात लिंबाची माळ, हातात बंदुक; पुष्पा-२ मधील अल्लू अर्जुनचा लूक आला समोर

0
Pushpa 2: गळ्यात लिंबाची माळ, हातात बंदुक; पुष्पा-२ मधील अल्लू अर्जुनचा लूक आला समोर


पुष्पा २ या चित्रपटाचा काही दिवसांपूर्वी एक टीझर शेअर करण्यात आला होता. या टीझरमध्ये अल्लू अर्जुन तुरुंगातून पळून गेल्याचे पाहायला मिळाले होते. पुष्पा जंगलात कुठे तरी जाऊन बसल्याचे टीझरमध्ये दाखवण्यात आले होते. चित्रपटामधील अभिनेत्री रश्मिका मंदानाचा लूक रिव्हिल करण्यात आला होता. रश्मिकानं पुष्पा चित्रपटाच्या पहिल्या भागात श्रीवल्ली ही भूमिका साकारली होती.



Source link

Allu Arjun: कुटुंबीयांनी दिला होता लग्नाला नकार पण…; जाणून घ्या अल्लू अर्जुनची लव्हस्टोरी

0
Allu Arjun: कुटुंबीयांनी दिला होता लग्नाला नकार पण…; जाणून घ्या अल्लू अर्जुनची लव्हस्टोरी


दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन हा कायमच चर्चेत असतो. कधी त्याच्या आगामी चित्रपटांमुळे तर कधी त्याच्या खासगी आयुष्यामुळे. अभिनयाच्या जोरावर अल्लू अर्जुनने अनेकांची मने जिंकली आहेत. त्याचा चाहता वर्ग केवळ भारतातच नसून सातासमुद्रापार असल्याचे पाहायला मिळते. विशेष म्हणजे तरुणींमध्ये त्याची कमालीची क्रेझ आहे. मात्र, अनेक तरुणींच्या मनावर राज्य करणारा हा अभिनेता एका लग्नात मुलीच्या प्रेमात पडला आणि तिच्याशीच त्याने लग्नगाठ बांधली. आज ८ एप्रिल रोजी अल्लू अर्जुनचा वाढदिवस. त्यानिमित्ताने चला जाणून घेऊया अल्लू अर्जुनच्या खासगी आयुष्याविषयी.



Source link

सातारा : सलग सुट्ट्यांमुळे महाबळेश्वर पर्यटकांनी फुलले | पुढारी

0


महाबळेश्वर: पुढारी वृत्तसेवा : गुड फ्रायडेसह शनिवार व रविवार अशा सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांच्या पसंतीचे महाबळेश्वर पर्यटन स्थळी पर्यटकांची रेलचेल पाहावयास मिळत आहे. एकीकडे ऐन उन्हाळ्यात पावसाची भुरभुर धुकं, थंडी, ढगाळ वातावरण असे पावसाळी व हिवाळी वातावरण पर्यटकांना अनुभवायास मिळत आहे.

शुक्रवारी सकाळ पासूनच महाबळेश्वर व पाचगणी पर्यटनस्थळी पर्यटकांची इनकमिंग सुरु झाली आहे. सलग सुट्ट्या अन महाबळेश्वर हे जणू समीकरणच झाले असून मुंबई, पुणेसह विविध ठिकाणांहून पर्यटक आपल्या कुटुंबियांसह मित्रमैत्रणींसह येथे दाखल होतात. धकाधकीच्या वेळापत्रकातून निवांत वेळ काढून येथील निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. उन्हाळी हंगामात पर्यटकांना अधूनमधून पावसाची बरसात धुकं, थंडी अन् ढगाळ असे वातावरण अनुभवायास मिळत आहे.

महाबळेश्वर पर्यटन स्थळाचा मुख्य आकर्षण वेण्णालेक चौपाटीवर मका कणीस, मका फ्रँकी अशा गरमागरम पदार्थांवर ताव मारण्यासोबतच आलेदार चहा, भेळ, पाणीपुरी तसेच आईसगोला स्ट्रॉबेरी विथ क्रीम सारख्या थंडगार पदार्थांची पर्यटक चव चाखताना दिसत आहेत. हौशी पर्यटक वेण्णा लेकवर घोडेसवारीचा आनंद लुटताना दिसत आहेत. बालचमूसाठी विविध गेम्सची धूम आहे. येथील प्रसिद्ध केट्स पॉईंट, महाबळेश्वरची शान असलेला ऑर्थरसीट पॉईंट, शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणारे किल्ले प्रतापगड, श्री क्षेत्र महाबळेश्वर मंदिर, निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केलेला लॉडवीक पॉइंट शहरानजीकचा सूर्योदयासाठीचा प्रसिद्ध विल्सन पॉइंट, सुर्यास्तासाठी प्रसिद्ध मुंबई पॉइंटसह अशा पर्यटनस्थळांवर पर्यटकांना फेरफटका मारण्या सोबतच येथील निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद लुटताना पाहावयास मिळत आहेत.

महाबळेश्वर मुख्य बाजारपेठेत देखील सायंकाळी पर्यटकांची खरेदीसाठी गर्दी होत असून बाजारपेठेतील प्रसिद्ध आकर्षक अशी लाकडी काठी, विविध आकर्षक वस्तू, प्रसिद्ध चप्पल खरेदीसह चणा चिक्की, फज अशा महाबळेश्वरी पदार्थ खरेदीसाठी पर्यटकांचा कल आहे. बदललेल्या या वातावरणामुळे अनेक पर्यटक स्वेटर, शाल परिधान करून फेरफटका मारताना दिसत आहेत.

हेही वाचा 



Source link