Monday, June 29, 2026
Home Blog Page 3106

सातारा : सुमारे ३ लाख जुन्या वाहनांचे होणार काय? | पुढारी

0









सातारा; पुढारी वृत्तसेवा :  वाढते अपघात व प्रदूषण रोखण्यासाठी राज्य शासनाने १५ आणि २० वर्षे पूर्ण झालेली वाहने स्क्रॅपमध्ये काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जुन्या वाहनधारकांचे धाबे दणाणले आहेत. जिल्ह्यात भंगारात जाणारी २ लाख ७९ हजार १७२ वाहने आहेत. ही सर्व वाहने नव्या नियमानुसार भंगारात घालावी लागणार आहेत. दरम्यान, याबाबत कोणताही आदेश उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाला मिळाला नसल्याने सध्या वेट अँण्ड वॉच अशी भूमिका अधिकाऱ्यांनी घेतली आहे.

दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत आहे. विशेषतः अपघाताला जुनी वाहने कारणीभूत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. सुस्थितीत वाहने नसल्यामुळे ब्रेक फेल, स्टेअरिंग लॉक, इंजिन नादुरूस्त अशा विविध प्रकारच्या तक्रारी येतात. त्यातच प्रदूषणही मोठ्या प्रमाणात होत असते. या सर्व बाबी विचारात घेऊन राज्य शासनाने जुनी वाहने स्क्रॅपमध्ये घालण्याचा निर्णय घेतला आहे.

वरिष्ठ पातळीवर हा निर्णय झाला असला, तरी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात अद्याप याबाबत कोणत्याही सूचना अथवा आदेश आलेला नाही. परंतु १५ वर्षे पूर्ण झालेली वाहने ज्यांच्याकडे आहेत, अशा लोकांना आता हुरहूर लागली आहे. या वाहनांचे पासिंग पुन्हा होणार का? असे विचारले जात आहे. अनेक गाड्या ३० ते ३५ वर्षे सलग वापरात आहेत. या वाहनांवर कोणी कारवाई करत नाही असा वाहनचालकांचा समज झाल्यामुळे ते जुनीच वाहने चालवत असल्याचे दिसून येत आहे.

सध्याच्या घडीला जिल्ह्यात ८ लाख ६४ हजार इतकी वाहने असून २ लाख ७९ हजार १७२ इतकी स्क्रॅपला जाणाऱ्या वाहनांची संख्या आहे. १५ वर्षांपर्यंत नवीन वाहन रस्त्यावरून चालवण्यास परवानगी असते. १५ वर्षांनंतर पासिंग केल्यास संबंधित गाडीला आणखी पाच वर्षांचा कालावधी वाढवून दिला जातो. त्यानंतर मात्र गाडी कोणतीही असो, ती रस्त्यावर चालवणे गुन्हा आहे. अशा गाड्या स्क्रॅप होतात आणि नंतर भंगारात घालाव्या लागतात.











Source link

सातार्‍यात पिस्टल दाखवून दीड लाखांची रोकड लुटली | पुढारी

0









सातारा; पुढारी वृत्तसेवा : सातारा शहरात शनिवारी रात्री पिस्टलचा धाक दाखवून कपड्याच्या दुकानातून रोख दीड लाख रुपये लुटल्याची घटना घडली. अजंठा चौकात ही घटना घडली असून सातार्‍यातील व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, अजंठा चौक येथे कपड्यांचे दुकान आहे. रात्री दुकान बंद करण्याची तयारी सुरू असताना तेथे दोघेजण आले. त्यांनी पिस्टलसारखी बंदूक काढून थेट दुकानदाराला धमकावले. या घटनेने मालक, कर्मचारी हादरून गेले. संशयित चोरटे दोघे होते. त्यांनी बंदुकीचा धाक दाखवत पैशांची मागणी केली. दुकानदाराने गल्ला मोकळा करत सर्व कॅश चोरट्यांना दिली. सुमारे 10 मिनिटे चोरट्यांनी धुमाकूळ घालत पैसे घेऊन दुचाकीवरून रहिमतपूर दिशेने पोबारा केला. चोरटे गेल्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जिल्ह्यात रात्री नाकाबंदी करून चोरट्यांची माहिती घेण्यास सुरुवात झाली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. प्राथमिक माहिती नुसार सीसीटीव्हीमध्ये दिसत असलेली बंदूक खरी की खोटी याबाबत पोलीस साशंक आहेत. मात्र चोरट्यांनी केलेले या लुटमारीमुळे सातारकर हादरून गेले आहेत.











Source link

Apurva Nemlekar: ‘शेवंता’ दिसणार अनोख्या भूमिकेत, नव्या चित्रपटातील लूक व्हायरल

0
Apurva Nemlekar: ‘शेवंता’ दिसणार अनोख्या भूमिकेत, नव्या चित्रपटातील लूक व्हायरल



Apurva Nemlekar: अपूर्वा नेमळेकर लवकरच रावरंभा या ऐतिहासिक चित्रपटात दिसणार आहे. तिचा या चित्रपटातील लूक समोर आला आहे.



Source link

Jacqueline Fernandez: माय बेबी…; तुरुंगातून सुकेशने पुन्हा लिहिले जॅकलिन फर्नांडिसला पत्र

0
Jacqueline Fernandez: माय बेबी…; तुरुंगातून सुकेशने पुन्हा लिहिले जॅकलिन फर्नांडिसला पत्र


२०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात सुकेश चंद्रशेखर सध्या दिल्लीच्या मंडोली कारागृहात बंद आहे. अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिससोबत सुकेशचे संबंध होते. मात्र, जॅकलिनशिवाय नोरा फतेही आणि इतर अनेक अभिनेत्रींची नावेही त्याच्यासोबत जोडली गेली आहेत. अंमलबजावणी संचालनालयाच्या म्हणण्यानुसार, सुकेशने जॅकलिन आणि तिच्या कुटुंबावर तब्बल १० कोटी रुपये खर्च केले आहेत आणि जॅकलिनला देखील महागडे गिफ्ट्स दिले आहेत. सुकेश जॅकलिनला मुंबईहून चेन्नईला बोलावण्यासाठी चार्टर्ड विमान पाठवत असे, ज्यावर सुमारे ८ कोटी रुपये खर्च झाले आहेत. तुरुंगात गेल्यानंतरही सुकेश बॉलिवूड अभिनेत्रींना महागड्या भेटवस्तू पाठवत होता.



Source link

सांगली : वडिलांना अग्नी देऊन गेलेल्या जवानाचा अपघातात मृत्यू | पुढारी

0









कोरेगाव/पळशी; पुढारी वृत्तसेवा :  कोरेगाव तालुक्यातील भाडळे खोर्‍यात असणार्‍या नागेवाडी (भाडळे) गावातील अंकुश संपतराव मारकर (वय 39) हे वडिलांना अग्नी देवून सैन्यदलात रूजू झाले होते. मात्र, त्यानंतर पंधरा दिवसांतच अंकुश मारकर यांचा दि. 5 एप्रिल रोजी राजस्थान येथे मृत्यू झाला. सेवानिवृत्तीसाठी 4 महिने शिल्लक असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. दरम्यान, रेल्वे अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती नातेवाईकांकडून देण्यात आली.

अंकुश मारकर हे जम्मू काश्मीर येथे बॉम्बे इंजिनिअर युनिट नंबर 106 मध्ये कार्यरत होते. पंधरा दिवसांपूर्वी त्यांचे वडील संपतराव मारकर यांचे निधन झाले होते. त्यांना अग्नी देण्यासाठी अंकुश हे गावी आले होते. अंत्यविधी उरकल्यानंतर ते पुन्हा नोकरीच्या ठिकाणी रूजू झाले होते. मात्र, रेल्वेमधून पडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. वडिलांनंतर काही दिवसांतच अंकुश यांनाही वीरमरण आले. अंकुश यांनी 19 वर्षांच्या सेवा कालावधीमध्ये पुणे, सिक्कीम, कालूचक, लेह, लडाख, चंदीगढ, राजुरी, श्रीनगर या ठिकाणी सेवा बजावली आहे.

अवघ्या 4 महिन्यांनंतर ते सेवानिवृत्त होणार होते. मात्र, त्यापूर्वीच त्यांच्यावर काळाने घाला घातला. काही दिवसांच्या अंतरातच वडील व मुलाचा मृत्यू झाल्याने मारकर कुटुंबासह नागेवाडी परिसरावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, अंकुश मारकर यांचे रविवारी सायंकाळी पार्थिव येणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. अंकुश यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, दोन भाऊ असा परिवार आहे.











Source link

सातारा : तलावात बुडून गवडीतील दोघा चिमुरड्यांचा मृत्यू | पुढारी

0









कण्हेर; पुढारी वृत्तसेवा :  गवडी (ता. सातारा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील दोन चिमुकल्यांचा सारखळच्या तलावात बुडून मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेने परिसर गलबलला. पोहता येत नसतानाही तलावात पोहण्याचा प्रयत्न चिमुकल्यांच्या जीवावर बेतला आहे. स्वराज सतीश घोरपडे (वय 11) व सोहम संतोष घाडगे (10) अशी मृत चिमुकल्यांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, गवडीच्या प्राथमिक शाळेत स्वराज घोरपडे हा इयत्ता पाचवीत, तर सोहम घाडगे हा चौथीत शिक्षण घेत होेता. शनिवारी दुपारी शाळा सुटल्यावर हे दोघे तसेच संग्राम सोनवणे हे तिघेही चिमुरडे नजीकच्या सारखळ तलावामध्ये पोहण्यासाठी गेले. त्यातील स्वराज व सोहम पोहण्यासाठी तलावामध्ये उतरले. मात्र, त्यांना पोहता येत नसल्याने ते बुडू लागले. मदतीसाठी त्यांनी टाहो फोडला; मात्र तिघांशिवाय जवळपास कोणीही नव्हते. पाण्यात न उतरलेला संग्राम या प्रकाराने भेदरून गेला. त्याने पळत घरी जाऊन कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. तोपर्यंत या परिसरात शेतीची कामे करत असलेल्या शेतकर्‍यांना ही घटना समजली. त्यांनी तलावाकडे धाव घेत सोहम व स्वराज यांचा पाण्यात शोध घेतला. पाण्यातून दोघांचेही मृतदेह बाहेर काढले. ग्रामस्थांनीही घटनास्थळी गर्दी केली होती. चिमुकल्यांच्या या दुर्दैवी मृत्यूने कुटुंबीयांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. गवडी गाव शोकसागरात बुडाले असून, सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.











Source link

Gautami Patil: नवरा कसा हवा?; गौतमी पाटील म्हणाली “मला पैसे, बंगला, प्रतिष्ठा…”

0
Gautami Patil: नवरा कसा हवा?; गौतमी पाटील म्हणाली “मला पैसे, बंगला, प्रतिष्ठा…”



Gautami Patil: गौतमी पाटीलने नुकताच एका यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिला खासगी प्रश्न विचारण्यात आले होते.



Source link

Aishwarya Rai: अंबानींच्या पार्टीत ऐश्वर्या आणि दीपिकाचा धिंगाणा, Video Viral

0
Aishwarya Rai: अंबानींच्या पार्टीत ऐश्वर्या आणि दीपिकाचा धिंगाणा, Video Viral


सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओ २०१८मधील आहे. हा व्हिडीओ ईशा अंबानीच्या वेडिंग फंक्शनमधील आहे. या पार्टीला दीपिका, प्रियांका, ऐश्वर्या, रणवीर, आलिया, अभिषेक आणि इतर काही बड्या स्टार्सने हजेरी लावली होती. आता जवळपास पाच वर्षांनंतर या पार्टीतील व्हिडीओ पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.



Source link

Swara Bhaskar: १४ वर्षांच्या करिअरमध्ये ९ फ्लॉप चित्रपट, जाणून घ्या स्वरा भास्करची एकूण संपत्ती

0
Swara Bhaskar: १४ वर्षांच्या करिअरमध्ये ९ फ्लॉप चित्रपट, जाणून घ्या स्वरा भास्करची एकूण संपत्ती


९ एप्रिल १९८८ साली स्वराचा दिल्लीतील एका आर्मी कुटुंबात जन्म झाला. तिचे वडील इंडियन नेवीमध्ये ऑफिसर होते आणि आई जेएनयूची प्रोफेसर. करिअरच्या सुरुवातीला स्वराने छोट्या पडद्यावरील मालिकेत काम केले. त्यानंतर ती चित्रपटांकडे वळली. आज स्वराकडे ४० कोटी रुपयांची संपत्ती आहे. ती एका चित्रपटासाठी ४ ते ५ कोटी रुपये मानधन घेते. तसेच ती काही जाहिरांतीची ब्राँड एम्बेसिडर आहे.



Source link

‘जोपर्यंत बघणारे…’, गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमावर अभिनेत्री प्रिया बेर्डे यांची प्रतिक्रिया

0
‘जोपर्यंत बघणारे…’, गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमावर अभिनेत्री प्रिया बेर्डे यांची प्रतिक्रिया



Gautami Patil: गौतमी पाटीलने महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी लावणी करत प्रेक्षकांना वेड लावले आहे.



Source link