Monday, June 29, 2026
Home Blog Page 3105

सातारा : जुनी वाहने भंगारात; फौंड्री येणार जोमात | पुढारी

0


सातारा; विशाल गुजर :  केंद्र आणि राज्य सरकारने स्क्रॅप पॉलिसी अंतर्गत 15 वर्षे पूर्ण झालेली वाहने भंगारात काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सुमारे 2 लाख 79 हजार 172 जुनी वाहने भंगारात जातील. त्यामुळे ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजला बूस्ट मिळणार आहे. या इंडस्ट्रीजला विविध स्वरूपातील वाहनांच्या सुट्या भागाच्या स्वरूपात कास्टिंग पुरवणार्‍या सातारा जिल्ह्यातील फौंड्री उद्योगातील कामाचा जोम वाढणार आहे.

जुन्या वाहनांच्या वापराने प्रदूषण वाढते. इंधन अधिक खर्च होते. ते टाळण्यासाठी केंद्र, राज्य सरकारने अशा जुन्या वाहनांसाठी स्क्रॅप पॉलिसी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. 15 वर्षे पूर्ण झालेली शासकीय वाहने भंगारामध्ये काढण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र स्क्रॅप ट्रेड कॉर्पोरेशन पोर्टल सुरू केले आहे. केंद्र सरकारने अर्थसंकल्पात त्यासाठी 150 कोटींच्या निधीची तरतूद केली आहे. साधारणतः देशातील 1 कोटी 2 लाख जुनी वाहने भंगारात जाणार असून जिल्ह्यातील 2 लाख 79 हजार 172 वाहनांचा समावेश आहे. वाहने भंगारात निघाल्यानंतर तितक्याच नव्या वाहनांची गरज निर्माण होणार आहे. त्याने वाहन निर्मिती करणार्‍या ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजच्या कामाची गती वाढणार आहे. या इंडस्ट्रीजमधील विविध मोठ्या कंपन्यांना लागणार्‍या दुचाकी, चारचाकी, माल वाहतूक ट्रक, प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहनांच्या विविध सुट्या भागांचा पुरवठा सातार्‍यातील फौंड्री उद्योगातून केला जातो. त्यामुळे वाहन निर्मितीचा वेग वाढल्याने आपोआपच या फौंड्री उद्योगातील कामाची गती वाढणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

फौंड्री उद्योगातून 50 टक्के कास्टिंगचा पुरवठा

ब्लॉक, हेड, पिस्टन, मॅनफोल्ड, वॉटरफोल्ड, लिवर आदी स्वरूपातील कास्ट आणि इतर अशा एकूण सुमारे 50 टक्के कास्टिंगचा पुरवठा फौंड्री उद्योगातून देश-परदेशातील वाहन निर्मिती करणार्‍या कंपन्या, उद्योगांना केला जातो. त्यामुळे केंद्र, राज्य सरकारने घेतलेल्या जुनी वाहने भंगारात काढण्याच्या निर्णयाचा उद्योग क्षेत्राला निश्चितपणे फायदा होणार आहे.

The post सातारा : जुनी वाहने भंगारात; फौंड्री येणार जोमात appeared first on पुढारी.



Source link

सातारा : वाईच्या कचरा डेपोत ‘ऑक्सिजन पार्क’ची निर्मिती | पुढारी

0


वाई; पुढारी वृत्तसेवा :  वाई पालिकेच्या सोनापूर कचरा डेपो येथील मैला प्रक्रिया प्रकल्पालगत वाई नगरपालिका आणि सेंटर फॉर वॉटर अँड सॅनिटेशन, सेप्ट युनिव्हर्सिटी, अहमदाबाद यांचे संयुक्त विद्यमाने एक एकर जागेमध्ये वनक्षेत्र विकसित करण्यात आले आहे. मियावाकी तंत्रज्ञानाचा वापर करून 1400 झाडे लावण्यात आली आहे. यामध्ये ऑक्सिजन देणार्‍या झाडांची मोठया प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे वाईचा कचरा डेपो परिसर हा ऑक्सिजन पार्कच झाला आहे.

कचरा डेपोमध्ये वनक्षेत्र विकसित करण्यासाठी वाई पालिकेत ठराव मंजूर करण्यात आला होता. या ठरावानुसार 2 एकर जागेत हे वनक्षेत्र विकसित करण्यास मंजुरी मिळाली आहे. मात्र, काही कारणास्तव हे काम होवू शकले नव्हते. आता हे काम मार्गी लागले आहे. हे वनक्षेत्र विकसित करण्यामागे लगतच्या मैला व्यवस्थापन प्रकल्पातील प्रक्रिया केलेले पाणी व खताचा पुनर्वापर करणे, एक ऑक्सिजन पार्क विकसित करणे हा हेतू आहे. यासाठी जास्त ऑक्सिजन देणार्‍या वनस्पतींची निवड करण्यात आली. यामध्ये तुळस, निंब, बकुळ, फिकस, पेरू, जांभुळ, फणस, कोनाकार्पस आणि बांबू अशा झाडांची लागवड करण्यात आली आहे.

या झाडांचे संगोपन करण्याचे काम महिला बचत गटांना देण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. यामुळे बचत गटानां आर्थिक स्थैर्य प्राप्त होण्यास मदत होणार आहे. सोनापूर कचरा डेपो येथे उभारण्यात आलेल्या मैला प्रक्रिया प्रकल्प, 3044 किलोवॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प, ओल्या कचर्‍यापासून खत निर्मिती प्रकल्प व वनक्षेत्र यामुळे जल, मृदा व वायू प्रदूषण कमी होऊन पर्यावरणाचे संरक्षण होण्यास चांगली मदत होणार आहे.

The post सातारा : वाईच्या कचरा डेपोत ‘ऑक्सिजन पार्क’ची निर्मिती appeared first on पुढारी.



Source link

Shah Rukh Khan: किंग ऑफ हार्ट्स… शाहरुख खानचं अ‍ॅसिड अटॅक सर्व्हायव्हर्सना खास सरप्राईज!

0
Shah Rukh Khan: किंग ऑफ हार्ट्स… शाहरुख खानचं अ‍ॅसिड अटॅक सर्व्हायव्हर्सना खास सरप्राईज!


बॉलिवूड किंग शाहरुख खानने २०२३मध्ये ‘पठान’ या चित्रपटाद्वारे बॉक्स ऑफिसवर जोरदार कमबॅक केले. शाहरुख खान त्याच्या चित्रपटासोबतच वैयक्तिक आयुष्याबाबतही खूप चर्चेत असतो. दरम्यान, शाहरुख खानचे नवे फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये शाहरुख खान अॅसिड अटॅक सर्व्हायव्हरसोबत दिसत आहे. शाहरुख खानचे हे फोटो येताच सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.



Source link

Bhagya Dile Tu Mala : ‘माहेरचा चहा’ हातून गेल्यावर कावेरी सुरू करणार नवा व्यवसाय!

0
Bhagya Dile Tu Mala : ‘माहेरचा चहा’ हातून गेल्यावर कावेरी सुरू करणार नवा व्यवसाय!


Bhagya Dile Tu Mala Latest Update: ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेचा चाहता वर्ग दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या मालिकेचं कथानक देखील अतिशय मनोरंजक वळणावर आलं आहे.



Source link

Man Dhaga Dhaga Jodte Nava: स्त्रीच्या अस्तित्वाची लढाई’; ‘मुलगी झाली हो’मधील ‘माऊ’ झळकणार नव्या मालिकेत!

0
Man Dhaga Dhaga Jodte Nava: स्त्रीच्या अस्तित्वाची लढाई’; ‘मुलगी झाली हो’मधील ‘माऊ’ झळकणार नव्या मालिकेत!


Man Dhaga Dhaga Jodte Nava New Serial: ‘मन धागा धागा जोडते नवा’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, यात ‘मुलगी झाली हो’ फेम ‘माऊ’ म्हणजेच अभिनेत्री दिव्या पुगावकर मुख्य भूमिका साकारणार आहे.



Source link

Pushpa 2: माओवाद्यांशी कनेक्शन असलेल्या ‘या’ ठिकाणी होणार अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’चं शूटिंग!

0
Pushpa 2: माओवाद्यांशी कनेक्शन असलेल्या ‘या’ ठिकाणी होणार अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’चं शूटिंग!


Pushpa 2 Shooting Update: अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ या चित्रपटाची शूटिंग सध्या सुरू असून, त्या विषयीची एक मोठी अपडेट आता समोर आली आहे.



Source link

Ayesha Takia Birthday: सुपरहिट चित्रपट देऊन बॉलिवूडमधून झाली गायब; आयेशा टाकियाबद्दल हे माहितीये?

0
Ayesha Takia Birthday: सुपरहिट चित्रपट देऊन बॉलिवूडमधून झाली गायब; आयेशा टाकियाबद्दल हे माहितीये?


आयेशाने तिच्या करिअरमध्ये ‘डोर’, ‘नो स्मोकिंग’ आणि ‘सोचा ना था’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. आयेशा लहान असल्यापासूनच तिला हिंदी चित्रपटांची नायिका व्हायचं होतं. वयाच्या अवघ्या ४थ्या वर्षी तिने पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर काम केलं. ‘कॉम्प्लेन’च्या जाहिरातीमध्ये आयेशा पहिल्यांदा झळकली होती. या जाहिरातीत आयेशासोबत शाहिद कपूरही दिसला होता. त्यानंतर तिला ‘कॉम्प्लेन गर्ल’ म्हणूनही ओळखलं जाऊ लागलं होतं. यानंतरही तिने व्हीआयपी सूटकेस, सिबाका टूथपेस्ट, गोदरेजसह ६०हून अधिक जाहिरातींमध्ये काम केले.



Source link

अदानींना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करणे चुकीचे : अजित पवार | पुढारी

0


सातारा, पुढारी वृत्तसेवा : अदानींना मी पहिल्यापासून ओळखतो. या देशात अंबानी, टाटा, बिर्ला यांनी पाया रचून मोठे काम केले आहे. यामुळे रोजगार निर्माण होऊन अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम झाला. तशाच पद्धतीचे काम अदानी यांनी केले आहे. सुप्रीम कोर्टाने समिती नेमतो असे सांगितले आहे. समिती नेमल्यानंतर वस्तुस्थिती काय आहे ते समोर येईल. परंतु, आरोप झाल्यानंतर लगेचच अदानींना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करणे चुकीचे आहे, असे परखड मत विरोधी पक्षनेते आ. अजित पवार यांनी व्यक्त केले.

दरम्यान, जाती-पंथाचा वापर फूट पाडण्यासाठी, द्वेष पसरवण्यासाठी कुणी करू नये. जुने मुद्दे उकरून काढणे ही मुख्यमंत्र्यांची फालतुगिरी आहे, अशी टीकाही त्यांनी मुख्यमंत्र्यांवर केली. सातारा तसेच जावली येथे विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने विरोधी पक्षनेते आ. पवार आले होते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पदाधिकार्‍यांसोबत बैठक झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

अदानींबाबत तुमच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत फूट पडू शकते का? असे विचारल्यावर पवार म्हणाले, महाविकास आघाडी आणि फूट पडण्याचा काय संबंध आहे? सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचे पाठीराखे आहेत. ज्यांनी मविआ निर्माण करण्यासाठी काम केले, ते सर्वजण पाठीशी असेपर्यंत काहीही होणार नाही.

सत्ताधार्‍यांच्या अयोध्या दौर्‍यावर टीका करताना अजित पवार म्हणाले, वास्तविक आम्हीही दर्शनाला जातो. पण आम्ही कधी चर्चा करत नाही. महाराष्ट्रातील महापुरुषांनी, आमच्या वडीलधार्‍यांनी सर्वांचा आदर, सन्मान ठेवायला सांगितला आहे. माणसा-माणसात फूट पाडण्यात, द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न कुणी करू नये.

दोन दिवस नॉट रिचेबल असल्याबाबत विचारले असता ते म्हणाले, स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? कितीदा सांगितले, तेच ते प्रश्न विचारलेले मला आवडत नाहीत. महागाई, बेरोजगारी कधी कमी होणार, राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला त्याचे काय, हे प्रश्न आहेत ना! कुणी कुणाला फडतुस म्हणायचं, कुणी कुणाला काडतुस म्हणायचं? काय चाललंय राज्यात? अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

अवकाळीच्या पंचनाम्याबाबत भूमिका मांडताना अजित पवार म्हणाले, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पंचनामे करत नाहीत. याबाबतच्या स्टँडिंग ऑर्डर्स असतात. सभागृहात याची चर्चा झाली होती. कर्मचार्‍यांचा संप होता. संपही मिटवून घेतो आणि पंचनामेही करायला सांगतो, असे त्यांनी सांगितले होते. जिथे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले तिथे आम्हीही विरोधी पक्षनेता म्हणून पंचनामे करायला सांगू शकतो. अवकाळी पाऊस, गारपीट किंवा नैसर्गिक संकट येते त्यावेळी शेतकर्‍याला मदत होण्याच्या दृष्टीने पंचनामे केले पाहिजेत हे बहुतेक जिल्हाधिकार्‍यांना माहिती असते, असे ते म्हणाले.



Source link

Allu Arjun: ‘पुष्पा २’ चित्रपटासाठी अल्लू अर्जुनने किती घेतले मानधन? जाणून घ्या…

0
Allu Arjun: ‘पुष्पा २’ चित्रपटासाठी अल्लू अर्जुनने किती घेतले मानधन? जाणून घ्या…



Allu Arjun fees: अल्लू अर्जुनने मानधनाच्या बाबतील तेलुगू इंडस्ट्रीमध्ये नवा रेकॉर्ड केला आहे. जाणून घ्या अल्लू अर्जुनने किती मानधन घेतले.



Source link

Preity Zinta: तू योग्य केलस; प्रिती झिंटाला मलायका आणि प्रियांकाने दिला पाठिंबा, काय आहे प्रकरण?

0
Preity Zinta: तू योग्य केलस; प्रिती झिंटाला मलायका आणि प्रियांकाने दिला पाठिंबा, काय आहे प्रकरण?


प्रितीची हो सोशल मीडिया पोस्ट पाहून अनेक कलाकारा आणि नेटकऱ्यांनी तिला पाठिंबा दिली आहे. अभिनेता हृतिक रोशनने कमेंट करत ‘तू हा अनुभव शेअर करुन योग्य केले’ असे म्हटले. तर प्रियांकाने आश्चर्यचकीत झाल्याचा इमोजी वापरला आहे. मलायका अरोराने यावर ‘तू खूप योग्य पद्धतीने सगळे सांभाळले आहेस’ असे म्हटले आहे. दुसरीकडे रामपालने ‘पुढच्या वेळी थेट मला फोन कर. दोघं म्हणून सर्वांना उत्तर देऊ’ अशी कमेंट केली आहे.



Source link