Tuesday, June 30, 2026
Home Blog Page 3104

Rang Maza Vegla: कहानी मैं ट्वीस्ट! कार्तिक-दीपाच्या आयुष्यात परतली आयेशा; होणार मोठा धमाका!

0
Rang Maza Vegla: कहानी मैं ट्वीस्ट! कार्तिक-दीपाच्या आयुष्यात परतली आयेशा; होणार मोठा धमाका!


Rang Maza Vegla Latest Update: १४ वर्षांनंतर पुन्हा एकदा मालिकेत व्हिलन आयेशाची एन्ट्री होणार आहे. मालिकेच्या कथानकातील हा ट्वीस्ट या मालिकेला एका वेगळ्याच वळणावर घेऊन जाणार आहे.



Source link

Gautami Patil: गौतमी पाटीलला तृप्ती देसाईंचा पाठिंबा! म्हणाल्या ‘सर्वसामान्य घरातून आलेली…’

0
Gautami Patil: गौतमी पाटीलला तृप्ती देसाईंचा पाठिंबा! म्हणाल्या ‘सर्वसामान्य घरातून आलेली…’


गौतमी पाटीलच्या नृत्याचे व्हिडीओ सोशल मीडियावरही प्रचंड व्हायरल होत असतात. तर, तिच्याबद्दल नेहमीच काहीना काही चर्चा या सुरू असतातच. काहीच दिवसांपूर्वी गौतमीच्या मानधनावर टीका करत इंदुरीकर महाराज यांनी वक्तव्य केलं होतं. तर, प्रिया बेर्डे यांनी देखील गौतमी पाटीलच्या नृत्यावर भाष्य केलं होतं. मात्र, या दरम्यान आता भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाईंनी यांनी त्यांच्या एका मुलाखतीत गौतमी पाटील हिला पाठिंबा देण्याचं वक्तव्य केलं आहे.



Source link

Salman Khan: सलमान खानची जादू ओसरली? नव्या चित्रपटाच्या ट्रेलरची कुठे चर्चाच नाही!

0
Salman Khan: सलमान खानची जादू ओसरली? नव्या चित्रपटाच्या ट्रेलरची कुठे चर्चाच नाही!


मागील काही वर्षात रिलीज झालेले सलमान खान याचे चित्रपट सातत्याने बॉक्स ऑफिसवर आपटताना दिसत आहेत. ‘ट्यूबलाईट’, ‘भारत’, ‘राधे’, ‘अंतिम’ अशा चित्रपटांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली होती. मात्र, त्याच्या यंदा रिलीज होणाऱ्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाकडून प्रेक्षकांना भरपूर अपेक्षा होत्या. परंतु, एकंदरीत सध्याचं चित्र पाहता, या अपेक्षा कितपत पूर्ण होऊ शकतील यात शंकाच आहे. सलमान खानचा ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट २१ एप्रिलला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. फरहाद सामजी दिग्दर्शित या चित्रपटात सलमान खान व्यतिरिक्त पूजा हेगडे, शहनाज गिल, व्यंकटेश दग्गुबाती, सिद्धार्थ निगम, राघव जुयाल, पलक तिवारी आणि जस्सी गिल महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.



Source link

Rohini Hattangadi Birthday: मनोरंजनाच्या अवकाशातील ‘रोहिणी’ नक्षत्र! वाचा अभिनेत्रीबद्दल काही खास गोष्टी…

0
Rohini Hattangadi Birthday: मनोरंजनाच्या अवकाशातील ‘रोहिणी’ नक्षत्र! वाचा अभिनेत्रीबद्दल काही खास गोष्टी…


Happy Birthday Rohini Hattangadi: गांधी’ चित्रपटात कस्तुरबांची भूमिका अजरामर करणाऱ्या रोहिणीताईंची आणि कस्तुरबांची जन्मतारीख एकच! या भूमिकेनेच त्यांना चित्रपट जगतात ओळख मिळवून दिली.



Source link

सातारा-सांगली मार्गावरील अपघातात तरुण ठार; गोरेगाव येथील घटना | पुढारी

0









पुसेसावळी; पुढारी वृत्तसेवा : सातारा-सांगली मार्गावर खटाव तालुक्यातील गोरेगाव वांगी येथे चारचाकी व दुचाकीच्या जोरदार धडकेत तरुण जागीच ठार. प्रकाश पांडुरंग वाघमोडे (रा. देवकरवाडी,निगडी) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर त्यांच्या पत्नी छाया वाघमोडे या गंभीर जखमी झाल्या आहेत.

या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. प्रकाश वाघमोडे हे आपली पत्नी छाया हिच्या समवेत दुचाकी( एम.एच.11 बी.एन 1637 ) वरून देवकरवाडीकडे यायला निघाले होते. दरम्यान, गजानन बाळासाहेब नागजे हे चारचाकी (क्रमांक एम.एच.10 सी.ए.0804) ने सावंतपूर वसाहत पलूस किलोस्करवाडीला जात होते. रात्री आठच्या सुमारास गोरेगाव वांगी नजीक असलेल्या माने वस्तीजवळ नागजे यांच्या चारचाकीने दुचाकीला जोरदार धडक दिली त्यात प्रकाश वाघमोडे हे जागीच ठार झाले. त्यांची पत्नी छाया वाघमोडे या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना कराड येथे उपचारासाठी पाठवण्यात आले. औंध पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन गजानन नागजे याला ताब्यात घेतले आहे.याप्रकरणी दादासो विष्णू घागरे (रा.जयराम स्वामींचे वडगाव) यांनी पोलीसात तक्रार दिली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गंगाप्रसाद केंद्रे करीत आहेत.











Source link

साताऱ्यात शॉक लागून तरुणाचा मृत्यू | पुढारी

0









सातारा; पुढारी वृत्तसेवा : सातारा शहरातील समर्थ मंदिर चौकातील गॅरेजमध्ये काम करणाऱ्या तरुणाचा शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. १०) रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडली असून घटनेनंतर परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. राहूल बबन वायदंडे (वय 35, रा. मंगळवार पेठ, सातारा) असे मृत तरुणाचे नाव आहे.

याबाबत प्राथमिक माहिती अशी, समर्थ चौकातून बोगदा परिसर जाणाऱ्या रस्त्यावर गॅरेज दुकान आहे. रात्री 9 वाजण्याच्या सुमारास राहूल वायदंडे हे पाणी मारत असताना अचानक त्यांना विजेचा जोराचा धक्का बसला. या घटनेने परिसर हादरला. गॅरेज मधील आरडाओरडा ऐकून परिसरातील नागरिक जमा झाले. जोराचा विजेचा धक्का बसल्याने वायदंडे जागीच कोसळले. या घटनेची माहिती शाहूपुरी पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू होती











Source link

Salman Khan: सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’चा धमाकेदार ट्रेलर झाला प्रदर्शित

0
Salman Khan: सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’चा धमाकेदार ट्रेलर झाला प्रदर्शित


सलमान खान फिल्म्स प्रोडक्शनचा ‘किसी का भाई किसी की जान’या सिनेमाची निर्मिती सलमान खानने केली असून, फरहाद सामजी यांनी दिग्दर्शन केले आहे. तसेच, या चित्रपटात सलमान खान, वेंकटेश दग्गुबाती, पूजा हेगडे, जगपती बाबू, भूमिका चावला, विजेंदर सिंग, अभिमन्यू सिंग, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल, शहनाज गिल, पलक तिवारी आणि विनाली भटनागर यांच्या भूमिका आहेत. अशातच, अ‍ॅक्शन, कॉमेडी, ड्रामा आणि रोमान्सने भरपूर असलेला ‘किसी का भाई किसी की जान’हा चित्रपट २०२३च्या ईदला प्रदर्शित होणार असून, जगभरात झी स्टुडिओजद्वारा रिलीज करण्यात येणार आहे.



Source link

Gautami Patil: गौतमी पाटीलच्या पहिल्या मराठी चित्रपटाचा टीझर पाहिलात का?

0
Gautami Patil: गौतमी पाटीलच्या पहिल्या मराठी चित्रपटाचा टीझर पाहिलात का?


गौतमीच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तिची लावणी संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय ठरत आहे. नुकताच तिचे तेरा पता हे गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. आता ती ‘घुंगरू’ या मराठी चित्रपटात दिसणार आहे. सर्वजण तिच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत.



Source link

Rhea Chakraborty:सुशांत सिंह राजपूत केसच्या ३ वर्षांनंतर रिया चक्रवर्तीचा कमबॅक, दिसणार ‘या’ शोमध्ये

0
Rhea Chakraborty:सुशांत सिंह राजपूत केसच्या ३ वर्षांनंतर रिया चक्रवर्तीचा कमबॅक, दिसणार ‘या’ शोमध्ये


रिया ही बंटीची क्लाइंट होती. सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर जेव्हा रियाची चौकशी झाली तेव्हा बंटीला देखील बोलवण्यात आले होते. बंटी सजदेह हा सोहेल खानची पूर्वाश्रमीची पत्नी सीमाचा भाऊ आहे. तो कॉर्नरस्टोन स्पोर्ट कंपनीचा सीईओ आहे. ही कंपनी विराट कोहली, रोहित शर्मा आणि शिखर धवन, इतर काही लोकांची कामे पाहातो.



Source link

Shefali Shah: गर्दीत मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्यात आला; शेफाली शाहचा धक्कादायक खुलासा

0
Shefali Shah: गर्दीत मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्यात आला; शेफाली शाहचा धक्कादायक खुलासा



Shefali Shah: ‘दिल्ली क्राईम’ या सीरिजमधील अभिनेत्री शेफाली शाहने नुकताच एका मुलाखतीमध्ये धक्कादायक खुलासा केला आहे.



Source link