
Pandit Kumar Gandharva: प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय गायक आणि संगीत क्षेत्रातील ध्रुवतारा पद्मविभूषण पंडित कुमार गंधर्व यांच्या जन्मशताब्दीनिमित्त कुमार गंधर्व प्रतिष्ठानाकडून ‘कालजयी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Pandit Kumar Gandharva: प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय गायक आणि संगीत क्षेत्रातील ध्रुवतारा पद्मविभूषण पंडित कुमार गंधर्व यांच्या जन्मशताब्दीनिमित्त कुमार गंधर्व प्रतिष्ठानाकडून ‘कालजयी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सलमान खानने आपल्या ताफ्यात समाविष्ट केलेली आलिशान कार भारतात लाँच झालेली नाही. सध्या या वाहनाची किंमत काय आहे याबाबत फारशी माहिती समोर आलेली नाही. मात्र, भारतीय बाजारपेठेत तिची अंदाजे किंमत सुमारे ८० लाख ते १ कोटी रुपये असू शकते, असे म्हटले जात आहे. मात्र, सलमानची ही कार बुलेटप्रूफ असल्याने तिची किंमत जास्त असणार आहे. निसान एसयूव्ही व्यतिरिक्त, सलमान खानकडे टोयोटा लँडक्रूझर, मर्सिडीज बेंझ एस-क्लास, लेक्सस एलएक्स ४७०, ऑडी ए८, पोर्श केयेन, रेंज रोव्हर ऑटोबायोग्राफी, ऑडी आरएस७, मर्सिडीज एएमजी जीएलई ६३ एस आणि मर्सिडीज बेंझ जीएल-क्लास देखील आहेत.

चित्रपटाच्या कथेबद्दल बोलायचे झाले, तर काहींना या चित्रपटाची कथा आवडली आहे. तर, काहींना मात्र हा चित्रपट फारसा आवडलेला नाही. चित्रपटाची लांबीही इतर चित्रपटांच्या तुलनेत मोठी आहे. याशिवाय चित्रपटातील सस्पेन्सबद्दल बोलायचे झाले, तर हा सस्पेन्स मात्र काहीसा गडबडला आहे. त्यामुळे एकंदरीत ‘गुमराह’ हा एक सामान्य चित्रपट असून, याची कथाच गुमराह झाली आहे का? असे वाटत आहे. पण, जर तुम्ही अभिनेता आदित्य रॉय कपूर आणि अभिनेत्री मृणाल ठाकूरचे चाहते असाल, तर तुम्ही हा चित्रपट पाहू शकता.

लोणंद; पुढारी वृत्तसेवा : लोणंद-निरा रोडवर लोणंदपासून दोन किलोमीटर अंतरावरील रेल्वे उड्डाण पुलावर गुरुवारी रात्री एस.टी. व दुचाकीच्या धडकेत दुचाकीवरील तीन युवक जागीच ठार झाले. हा अपघात नक्की कसा झाला याची माहिती मिळू शकली नाही. या अपघातामुळे परिसरात काहीकाळ वाहनांची गर्दी झाली होती. ओंकार संजय थोपटे, पोपट अर्जुन थोपटे व अनिल नामदेव थोपटे (सर्व रा. पिंपरे खुर्द, ता. पुरंदर, जि. पुणे) अशी अपघातात ठार झालेल्या युवकांची नावे आहेत.
याबाबत घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, एस.टी. बस (एम. एच. 20 बी. एल 4158) मंगळवेढाहून पुण्याकडे निघाली होती. तर एम. एच. 12 आर. व्ही 3158 या दुचाकीवरून तिघेजण निरेकडून लोणंद बाजूला येत होते. ही दोन्ही वाहने रेल्वे उड्डाणपुलावर आल्यानंतर बस व दुचाकी समोरासमोर धडक झाली. या अपघाताचा आवाज ऐकल्यानंतर स्थानिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच पोलिसांनाही याची माहिती देण्यात आली. लोणंद पोलिस ठाण्याचे सपोनि विशाल वायकर व पोलिस कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या भीषण अपघातात दुचाकीवरील तिन्ही युवकांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून मृतदेह लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. या घटनेची रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरू होते.

या रोमँटिक गाण्याच्या संगीताची जबाबदारी संगीतकार वैभव शिरोळे याने पेलवली आहे. तर, गाण्याच्या ओळी कुणाल गायकवाड आणि वैभव शिरोळे यांनी शब्दबद्ध केल्या आहेत. प्रसिद्ध पार्श्वगायिका आनंदी जोशी आणि वैभव शिरोळे यांनी त्यांच्या सुमधुर आवाजाने या गाण्याला चारचाँद लावले आहेत. ‘टीडीएम’ चित्रपटातील नवखे चेहरे म्हणजेच अभिनेता पृथ्वीराज आणि अभिनेत्री कालिंदीने या गाण्यावर धरलेला ठेका नेत्र दिपवणारा आहे. हे नवखे कलाकार आहेत हे बोलणंच मुळात चुकीचं वाटतंय इतकी निरागसता, इतकी समज त्यांच्या भूमिकेत दिसत असून ही किमया नामवंत दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडेंची आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

महाबळेश्वर/पाचगणी; पुढारी वृत्तसेवा : जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी महाबळेश्वरमधील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आता अशी बांधकामे महसूल विभागाच्या रडावर आली आहेत. जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार तहसीलदार सुषमा पाटील यांनी बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी पहिल्याच दिवशी पाचगणी-महाबळेश्वर रस्त्यावरील मेटगुताड येथील शंभाला रिसॉर्टचा पाणी व वीजपुरवठा बंद करून इमारतीला सील ठोकण्यात आले आहे. दरम्यान, या कारवाईमुळे अनधिकृत बांधकाम करणार्यांचे धाबे दणाणले आहेत.
गेली अनेक वर्षे महाबळेश्वर तालुक्यातील विनापरवाना बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. बांधकाम पाडण्याच्या कारवाईचा खर्च पाहता केवळ कागदोपत्री आदेश निघत होते. परंतु, प्रत्यक्ष कारवाई केली जात नव्हती. त्यामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर बांधकामे वाढली. याची जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी गंभीर दखल घेत महाबळेश्वर तालुक्यातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर तहसीलदार सुषमा पाटील यांनी या कारवाईचा मास्टर प्लॅन तयार केला. त्यानुसार तालुक्यात बेकायदेशीर बांधकाम असणार्या 400 मिळकती आहेत.
मेेटगुताड येथे डोंगर उतारवर शंभाला रिसॉर्ट या इमारतीचे अनधिकृत बांधकाम झाले होते. गुरुवारी तहसीलदार सुषमा पाटील, निवासी नायब तहसीलदार चंद्रकांत पारवे यांच्या नेतृत्वाखाली महसूल, महावितरण, ग्रामपंचायत आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. प्रथम इमारतीचा वीज व पाणीपुरवठा बंद करण्यात आला. त्यानंतर रिसॉर्टमधील खोल्यांना सील ठोकले. स्वागत कक्षाला सील ठोकून कारवाईचा फलक लावण्यात आला आहे.
महाबळेश्वरमधील एकूण 4 इमारतींना गुरुवारी सील ठोकण्यात येणार होते. परंतु, कारवाई पथकामध्ये असणारे कर्मचारी व लागणारा वेळ यामुळे एकाच मिळकतीला सील ठोकण्यात आले. मोठ्या संख्येने अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी पथकातील कर्मचार्यांची संख्या वाढवणे आवश्यक आहे. वाई, खंडाळा व जावली तालुक्यांतील महसूल कर्मचार्यांचा पथकात समावेश केला जावा. संभाला रिसॉर्ट सील केल्यानंतर आता कोणत्या मिळकतींवर महसूल विभाग कारवाई करणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे.
सातारा; पुढारी वृत्तसेवा : सातारा जिल्ह्यात मोठमोठ्या कारवायांचे ढोल वाजवले जातात. माध्यमांमध्ये बातम्या पेरल्या जातात. अनधिकृत बांधकामांची, अतिक्रमणांची यादी केली जाते. एक-दोन दिवस कारवाया होतात आणि मग परस्पर सेटलमेंटच्या पेट्या जिकडे-तिकडे पोच होतात. यापूर्वी जिल्ह्यात असे घडले आहे, घडत आहे. अनधिकृत बांधकामांना अभय देणार्या महाबळेश्वर महसूल विभागानेही आता ज्यांनी बेकायदेशीर बांधकामे केली त्यांची नावे सांगण्यास टाळाटाळ केली आहे. आता कारवाई करण्यास सुरुवात केल्यानंतरही कुणाच्या मिळकती रडावर आहेत हे सांगितले जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या प्रकरणात दै. ‘पुढारी’ची करडी नजर राहणार आहे. खरोखरच बेकायदा बांधकामे पाडणार की, चार-दोनजणांना भीती घालून ‘उकळाउकळी’ होणार याकडे ‘पुढारी’चे जिल्ह्यातून लक्ष असणार आहे.
सातारा; पुढारी वृत्तसेवा : सातारा जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांच्या सोयीसाठी फलटण-सुरुर-वाई-महाडमार्गे जेएनपीटी-मुंबई असा भक्ती-शक्ती ग्रीनफिल्ड मार्गाचा प्रस्ताव केंद्रीय वाहतूक व दळणवळण मंत्री ना. नितीन गडकरी तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर केला आहे. दोघांनीही या आराखड्याला सकारात्मकता दर्शवली आहे. या ग्रीनफिल्ड मार्गाचा फायदा सातारा जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्राला होणार आहे.
सातार्यासह सांगली तसेच कोल्हापूरहून मुंबईला जाणार्या प्रवाशांना पुणे आणि पनवेलमधील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. मुंबईला जाताना हे अंतरही अधिक असल्याने प्रवासास वेळ लागतो. फलटण-सुरूर-वाई-महाडमार्गे गोवा महामार्गाने जेएनपीडी- मुंबई असा ग्रीनफिल्ड हायवे झाल्यास विक्रमी कमी वेळेत प्रवाशांना मुंबई गाठणे शक्य होणार आहे. शिवाय वेळेची आणि इंधनाचीही बचत होणार आहे.
पश्चिम महाराष्ट्र व कोकणाला जोडणारा हा मार्ग असल्याने उद्योग, व्यवसाय याशिवाय नैसर्गिक, धार्मिक पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. त्यामुळे हा मार्ग प्रस्तावित भक्ती-शक्ती ग्रीनफिल्ड महामार्ग ठरणार असून तो मार्गी लावावा, अशी मागणी सातारा जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील प्रवासी व नागरिकांतून जोर धरू लागली आहे. पुणे-बंगळूर महामार्गावरून व पुढे ‘मुंबई एक्स्प्रेस-वे’वरून मुंबईला जाताना पुण्यातील कात्रज ते वाकड यादरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनचालक आणि प्रवाशांचीही दमछाक होते. सुट्टीच्या दिवशी तर महामार्गावरील खंबाटकी, कात्रज बोगदा हमखास जाम असतो. प्रवासाच्या जवळपास निम्मा वेळ या वाहतूक कोंडीत जात असतो. दोन-तीन तास वाहतूक कोंडीत अडकून पडल्याशिवाय गत्यंतर नसते. महामार्गाचे चौपदरीकरण-सहापदरीकरण झाले असले तरी वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न मात्र काही ठिकाणी कायम असल्याचे दिसते. त्यामुळे ट्रॅफिक जॅमच्या कटकटीतून सुटका करुन घेत मुंबईला जाण्यासाठी जवळचा व पर्यायी मार्ग सध्या उपलब्ध नाही. त्यामुळे फलटण, सातारा, कोरेगाव, वाई आदि भागांतील लोकांनी एकत्र येऊन केंद्रीय जहाज बांधणी व दळणवळण मंत्री ना. नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लोकांनी निवेदन दिले आहे. दोघांनीही या ग्रीनफिल्ड महामार्गाबाबत सकारात्मकता दर्शवली असल्याची माहिती या महामार्गासाठी विविध स्तरांवर पाठपुरावा करणारे नितीन चव्हाण यांनी दिली.
हा महामार्ग झाल्यास सातारा जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांना मुंबईला ये-जा करण्यासाठीच्या वेळेत बचत होणार आहे. ग्रीनफिल्ड मार्ग झाल्यास जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासाला चालना मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांतून कोयना बॅक वॉटरवर दरे (ता. जावली) येथे नियोजित उड्डाणपूल होत आहे. या पुलाचे काम झाल्यावर रघुवीर घाट ओलांडून कोकणात जाणे आणखी सोपे होणार आहे. दुष्काळी खंडाळा- कोरेगाव उत्तर-खटाव या तालुक्यांतून एक ग्रीनफिल्ड मार्ग मंजूर झाला आहे. जिल्ह्याच्या विकासाचा समतोल राखण्यासाठी हे सर्व महामार्ग होण्याच्या दृष्टीने केंद्र व राज्य सरकारने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.
प्रस्तावित महामार्ग सध्याच्या महाड-सातारा रस्त्याला उत्तम पर्याय ठरू शकतो. सध्याचा महाबळेश्वर-महाड मार्ग हा घाटवळणांचा असल्यामुळे अवजड वाहनांना जिकिरीचा ठरतो. मात्र प्रस्तावित महाड महामार्ग समुद्रसपाटीपासून अवघ्या 800 मीटर उंचीवर असल्यामुळे इंधनाची बचत होणार आहे. मुंबईवरुन पंढरपूर या धार्मिक ठिकाणी जाण्यासाठी या ग्रीन फिल्डचा वापर होऊ शकतो. जिल्ह्यातील महाबळेश्वर, पाचगणी, कास, बामणोली, ठोसेघर तसेच रायगड जिल्ह्यातील दिघी पोर्ट, हरिहरेश्वर, श्रीवर्धन ही पर्यटनस्थळे जोडली जाऊ शकतील. महाडवरून दापोली, कर्दे, मुरूड बीच याठिकाणी जाण्यासाठीही पर्यटकांना हा मार्ग सोयीचा ठरु शकेल. थेट जेएनपीटी येथे जोडणारा हा मार्ग असल्याने पश्चिम महाराष्ट्राला व्यावसायिकदृष्ट्या फायद्याचा ठरणार आहे.
फलटण-वाठार स्टेशन-सुरूर-वाई-धोम धरणमार्गे-ढवळे-महाडपर्यंत सुमारे 100 कि.मी. आणि त्यापुढे महाड ते जेएनपीटी सुमारे 120 कि.मीचा हा प्रस्तावित ग्रीनफिल्ड मार्ग असेल. हा मार्ग आठ रस्त्यांना जोडणारा असेल. त्यामध्ये आळंदी-पंढरपूर पालखी महामार्ग, बारामती-संकेश्वर, पुणे-बंगळूरला पर्यायी मार्ग, नवीन रेवास-रेड्डी कोस्टल मार्ग, मुंबई-गोवा महामार्ग, अलिबाग-विरार, मुंबई-चिर्ले हा ट्रान्स हर्बल लिंक, महाड-पेण मार्ग या मार्गाचा समावेश आहे.

ईशा आणि अनिशच्या नात्याला अनिरुद्धचा विरोध आहे. मात्र, ईशाने यावेळी हट्टच केला आहे. तिने अनिशशी लग्न करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी ती काहीही करण्यास तयार आहे. ‘माझं अनिशवर प्रेम आणि मी त्याच्याशीच लग्न करणार’ असं ईशा अनिरुद्धला ठणकावून सांगितले आहे. हे ऐकून अनिरुद्ध आणखी संतापला आहे. जर, अनिशसोबत भविष्याचा विचार करत असशील तर, आताच सोडून दे, अन्यथा परिणाम वेगळे दिसतील, असा धमकीवजा इशारा अनिरुद्ध ईशाला दिला होता. यानंतर आता ईशाने घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला होता.
पुढारी ऑनलाईन : चक्रीय वार्याची स्थिती सक्रिय झाल्याने देशातील काही राज्यांसह महाराष्ट्रात देखील अवकाळीचे सावट निर्माण झाले आहे. दरम्यान, आज (दि. ७) पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर, नांदेडला आज ऑरेंज अलर्ट (Weather Forecast देण्यात आला असून, मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर मुंबई, ठाणे, नाशिक, धुळे, नंदुरबार जिल्हयात ढगाळ वातावरण असल्याची माहिती देखील भारतीय हवामान विभागाने दिली आहे.
७ एप्रिल, ७.३० am.
जिल्हे नांदेड, लातूर, उस्मानाबाद … TSRA🌩🌩
मेघगर्जनेसह पावसाची शक्यता पुढच्या २,३ तासात.
– IMD
मुंबई, ठाणे, नाशिक, धुळे, नंदुरबार ढगा़ळ आकाश .. pic.twitter.com/YTXNAQSwiT— K S Hosalikar (@Hosalikar_KS) April 7, 2023
राज्यात उत्तर कोकण, मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड वगळता उर्वरित राज्यात ८ एप्रिलला अवकाळी पाऊस पडणार आहे. तर ९ एप्रिलला पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात देखील काही प्रमाणात अवकाळीचा इशारा (Weather Forecast) हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
बांगलादेशच्या ईशान्य भागात आणि राजस्थानच्या नैऋत्येकडील भागात चक्रीय वादळी वार्याची स्थिती सक्रिय झाली आहे. त्यामुळे मध्य छत्तीसगडच्या प्रदेशातून दक्षिण तमिळनाडूकडे सातत्याने वारे वाहत आहेत. या स्थितीमुळे राज्यात अवकाळी पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. चक्रीय वार्याची स्थिती सक्रिय झाल्याने देशातील पूर्व, ईशान्य, पश्चिम आणि दक्षिण भारतासह राज्यांमधील अनेक जिल्ह्यांत अवकाळी पाऊस (Weather Forecast) पडेल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

Warrant Issued Against Actress Ameesha Patel: एकीकडे अभिनेत्री तिच्या आगामी ‘गदर २’ या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. तर, याच दरम्यान आता तिच्या विरोधात वॉरंट जारी झाल्याने ती चर्चेत आली आहे.