Wednesday, July 1, 2026
Home Blog Page 3099

Karan Kundrra: हद्दच झाली! डान्स करता करता तेजस्वी आणि करणने असे काही केले की चाहत्यांना बसला धक्का

0
Karan Kundrra: हद्दच झाली! डान्स करता करता तेजस्वी आणि करणने असे काही केले की चाहत्यांना बसला धक्का


सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश एका गाण्यावर डान्स करत रोमान्स करताना दिसत आहेत. मात्र, व्हिडीओच्या शेवटी त्यांनी असे काही धक्कादायक केले की, हे पाहून तिथे उपस्थित असलेल्यांना मोठा धक्का बसला.



Source link

Shehnaaz Gill: सिद्धार्थ शुक्लानंतर ‘या’ अभिनेत्यासोबत शहनाज गिल आहे लिव इन रिलेशनशीपमध्ये?

0
Shehnaaz Gill: सिद्धार्थ शुक्लानंतर ‘या’ अभिनेत्यासोबत शहनाज गिल आहे लिव इन रिलेशनशीपमध्ये?


सोशल मीडियावर राघव आणि शहनाजचा एक फोटो व्हायरल होत आहे. त्यानंतर ते दोघे लिव इनमध्ये राहात असल्याचे म्हटले जात आहे. ‘बॉलिवूड लाइफ’ने दिलेल्या रिपोर्ट्सनुसार, काही दिवसांपूर्वी राघव आणि शहनाजचा एक व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओमध्ये राघव आणि शहनाज भारती सिंहच्या मुलाला भेटण्यासाठी गेल्याचे दिसत होते. शहनाज आणि राघवला एकत्र पाहून चाहत्यांना आनंद होत आहे. सोशल मीडियावर #RagNaaz हा हॅशटॅग ट्रेंड होताना दिसत आहे.



Source link

Gautami Patil: गौतमीच्या कार्यक्रम महिलांनी हातात घेतल्या काठ्या, पुढे काय झाले जाणून घ्या

0
Gautami Patil: गौतमीच्या कार्यक्रम महिलांनी हातात घेतल्या काठ्या, पुढे काय झाले जाणून घ्या



Gautami Patil: असे पहिल्यांदाच झाले असेल की गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला आलेल्या माहिलांनी हातात काठ्या घेतल्या आहेत. या कार्यक्रमात पुढे काय झाले जाणून घ्या



Source link

Kunal Ganjawala: २० मिनिटात रेकॉर्ड केलं ‘भीगे होठ तेरे..’ गाणं, कुणाल गांजावालाने सांगितला अनुभव

0
Kunal Ganjawala: २० मिनिटात रेकॉर्ड केलं ‘भीगे होठ तेरे..’ गाणं, कुणाल गांजावालाने सांगितला अनुभव


“ज्यावेळी मला या गाण्याची विचारणा करण्यात आली. त्यावेळी मी गाण्याचे बोल ऐकून दोन मिनीटं शॉक झालो होतो. मला त्यावेळी गाण्यातील शब्दांची खरच भीती वाटली होती. या चित्रपटात नेमकं कोण काम करतंय हेदेखील मला माहित नव्हतं. तसंच या गाण्याची तयारी करण्यासाठीदेखील मला वेळ मिळाला नाही, मला फक्त इतकंच सांगण्यात आलं की हे गाणं अत्यंत रोमॅण्टीक अंदाजात गायला हवं. त्यामुळे जेव्हा मी खऱ्या अर्थाने हे गाणं हातात घेतलं तेव्हा नर्व्हस झालो होतो” असे कुणाला म्हणाला.



Source link

Bhau Kadam: भाऊ कदम आणि ओंकार भोजने यांचा विनोदी षटकार, पुन्हा नव्याने रंगभूमीवर

0
Bhau Kadam: भाऊ कदम आणि ओंकार भोजने यांचा विनोदी षटकार, पुन्हा नव्याने रंगभूमीवर


राजेश देशपांडे लिखित आणि दिग्दर्शित प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करणार्‍या या नाटकाची थीम तीच असली तरी काळानुसार सध्याच्या घडामोडीवर आधारीत थोडेफार बदल करण्यात आले आहेत. कॉमेडीचे बादशाहा भाऊ कदम चला हवा येऊ द्या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात आता नाटकातून देखील भाऊ कदम आपल्या विनोदाची आणि अभिनयाची जादू दाखवून देणार आहेत.



Source link

सातारा : कुशल मनुष्यबळाअभावी लघु उद्योग संकटात | पुढारी

0


सातारा; पुढारी वृत्तसेवा :  सातारा जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्राला कुशल मनुष्यबळ मिळत नसल्याने सूक्ष्म आणि लघू उद्योजकांची स्वतःला सावरण्याची धडपड व्यर्थ ठरत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने विकसित यंत्र सामग्रीसाठी लागणारी मोठी गुंतवणूक सूक्ष्म आणि लघू उद्योगांना न पेलणारी आहे. कामातील अनिश्चिततेमुळे काही उद्योगांमध्ये काम असते तेव्हा कामगार नसतात आणि कामगार असतात तेव्हा काम नसते, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे स्वतः काम करूनही आर्थिक घडी अधिकच विस्कळीत होत असल्याने हे उद्योजक आर्थिक चक्रव्यूहात सापडले आहेत.

जिल्ह्यात सातारा, खंडाळा, शिरवळ, लोणंद, वाई, फलटण, कराड याठिकाणी औद्योगिक वसाहती आहेत. कुशल मनुष्यबळाच्या सहकार्यातून गुणवत्तापुर्ण निर्मिती आणि वेळेत पुरवठा हे जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाचे मॉडेल राहिले. बदलेल्या औद्योगिक धोरणात ऑटोमायझेशनमुळे कुशल आणि अकुशल एकाच मेजरमेंटवर आले. पूर्वीचा कुशल कामगार दोन चार मशिन घेऊन उद्योजकांच्या पंक्तीत आला. येथूनच सूक्ष्म-लघू उद्योग आणि मध्यम – मोठे उद्योग यांच्यामध्ये अंतर निर्माण झाले. या प्रवासात सूक्ष्म – लघू उद्योगाने महिनाच्या शेवटी किती मिळवायचे हे मध्यम-मोठे उद्योग ठरवत आहेत. अवजड व्यावसायिक वाहन उद्योगासाठी लागणार्‍या विविध स्पेअर पार्ट निर्मितीमध्ये देशात सातारा जिल्ह्याची महत्त्वाची भूमिका आहे. वाढत्या उत्पादन क्षमतेला पुरेसे कुशल मनुष्यबळ मिळत नसल्याने उद्योग अडचणीत येत आहेत. लेबर चार्जेसवर काम करणार्‍या सूक्ष्म आणि लघू उद्योगात समाविष्ट उपठेकेदारांची संख्या सर्वाधिक आहे.

मध्यम आणि मोठ्या उद्योगात सर्व सेवा सुविधा व चांगले वेतन मिळत असल्याने स्थानिक कुशल मनुष्यबळ तेथे गुंतले आहे. परिणामी सूक्ष्म आणि लघू उद्योगाला ग्रामीण भागातील तरुणांना प्रशिक्षित करून काम करून घ्यावे लागते. हे तरुणही सहा महिने ते वर्षभर अनुभवानंतर मध्यम व मोठ्या उद्योगात संधी मिळताच काम बदलतात. 90 टक्के सूक्ष्म उद्योगात स्वतः मालक काम करतात. अशा परिस्थितीत वेळेत गुणवत्तापूर्ण पुरवठा देऊ शकत नसल्याने अनेकांना काम टिकवणेही अवघड बनले आहे.

शिफ्ट बंद राहण्याचे प्रमाण वाढले

लेथ मशिन हे इंजिनिअरिंग उद्योगातील मातृ मशिन म्हणून ओळखले जाते. पण कुशल मनुष्यबळाचा अभाव आणि कामातील त्रुटी टाळण्यासाठी लेथऐवजी सीएनसी, व्हीएमसी व एचएमसी यासारखी अत्याधुनिक यंत्रे आली. त्यामुळे लेथ आणि टर्नर कालबाह्य झाले. सीएनसी, व्हीएमसी व एचएमसी मशिनवर काम करण्यासाठी किमान वेतनावर कुशल ऑपरेटर मिळत नसल्याने अनेक मशिनरींची शिफ्ट बंद राहत आहे. मोठ्या उद्योगांनी यासाठी रोबोटिक तंत्रज्ञान स्वीकारले आहे. पण त्यालाही स्वतःच्या काही मर्यादा आहेत आणि सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योगाला सध्यातरी हे तंत्रज्ञान परवडणारे नाही.

उद्योग धोकादायक वळणावर

मनुष्यबळाचा अभाव, न परवडणारे वीज दर, गरज नसताना कर्ज काढून भरावी लागणारी जीएसटी रक्कम, थकीत कर्जासाठी बँका व फायनान्स कंपन्यांचा तगादा, वाहतूक खर्चात झालेली वाढ आणि मोठ्या कंपन्यांकडून लहान उद्योगांची सुरू असणारी पिळवणूक अशा विविध आव्हानांचा सामना करत सुरू असणारी सूक्ष्म व लघु उद्योगाची वाटचाल अतिशय धोकादायक वळणार आहे.



Source link

Sanjay Dutt: संजय दत्तने ‘केडी’च्या सेटवरील दुखापतीचे वृत्त फेटाळले

0
Sanjay Dutt: संजय दत्तने ‘केडी’च्या सेटवरील दुखापतीचे वृत्त फेटाळले


‘केडी: द डेविल’ या चित्रपटाचे सध्या बंगळूरु येथे जोरदार शुटिंग सुरु आहे. चित्रपटातील एका सीनमध्ये विस्फोट झाल्याचे दाखवण्यात येणार आहे. या ब्लास्टमध्ये संजय दत्त जखमी झाला आहे. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. संजय दत्तच्या हाताचा कोपरा, हात आणि चेहऱ्याला जखम झाली आहे. या घटनेनंतर सध्या चित्रपटाचे चित्रीकरण थांबवण्यात आले आहे अशी माहिती समोर आली होती. मात्र आता असे काही झालेले नाही असे संजय दत्त म्हणाला आहे.



Source link

Appi Amchi Collector: मेहेनत फळास आली, अप्पी आमची कलेक्टर झाली!

0
Appi Amchi Collector: मेहेनत फळास आली, अप्पी आमची कलेक्टर झाली!


अप्पीने तिला येणा-या आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक अडचणींवर मात करुन ती कलेक्टर झाली आणि या संघर्षात तिला खरी साथ मिळाली ती म्हणजे तिचे बापू, नवरा अर्जुन, भाऊ दिप्या यांची.



Source link

Sundari: मालिका देणार पारंपारिक सामाजिक रुढींना धक्का; स्त्री करणार अंत्यसंस्कार

0
Sundari: मालिका देणार पारंपारिक सामाजिक रुढींना धक्का; स्त्री करणार अंत्यसंस्कार


कोणताही देश तेव्हाच प्रगतीपथावर पोहोचतो जेव्हा देशातील महिला पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून चालतात. गेल्या कित्येक वर्षात स्त्रीविषयी समाजाच्या दृष्टिकोनात निश्चितच फरक पडला आहे. स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने समान हक्क मिळावे यासाठी अनेकांनी लढा दिला आणि त्याला बहुतांश प्रमाणात यशही आले आहे. पण नीट विचार करता, असं वाटत नाही का की ‘समान हक्क’ या शब्दांना अजूनही पूर्णपणे न्याय मिळालेला नाही? मान्य आहे की, स्त्रिला शिक्षणाचा हक्क आहे, वेगवेगळ्या क्षेत्रात स्त्रिया अग्रेसर आहेत, मतदानाचा हक्क, वडिलोपार्जित संपत्तीत समान अधिकार, कोणत्या वयात लग्न करावे हे ठरवण्याचा हक्क, मूलाला जन्म देणे किंवा न देणे या बाबतीत निर्णय घेण्याचा हक्क हे सगळं मान्य आहे… पण अजूनही एका गोष्टीत मात्र स्त्रिला अधिकार देण्यात आलेला नाही आणि तो अधिकार म्हणजे कुटुंबातील व्यक्तीच्या अंत्यसंस्काराचा हक्क.



Source link

Salman Khan: सलमानच्या सिनेमाच्या सेटवर मुलींसाठी आहेत नियम; पलक तिवारीचा खुलासा

0
Salman Khan: सलमानच्या सिनेमाच्या सेटवर मुलींसाठी आहेत नियम; पलक तिवारीचा खुलासा


सलमान खान फिल्म्स प्रोडक्शनचा ‘किसी का भाई किसी की जान’या सिनेमाची निर्मिती सलमान खानने केली असून, फरहाद सामजी यांनी दिग्दर्शन केले आहे. तसेच, या चित्रपटात सलमान खान, वेंकटेश दग्गुबाती, पूजा हेगडे, जगपती बाबू, भूमिका चावला, विजेंदर सिंग, अभिमन्यू सिंग, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल, शहनाज गिल, पलक तिवारी आणि विनाली भटनागर यांच्या भूमिका आहेत. अशातच, अ‍ॅक्शन, कॉमेडी, ड्रामा आणि रोमान्सने भरपूर असलेला ‘किसी का भाई किसी की जान’हा चित्रपट २०२३च्या ईदला प्रदर्शित होणार असून, जगभरात झी स्टुडिओजद्वारा रिलीज करण्यात येणार आहे.



Source link