Wednesday, July 1, 2026
Home Blog Page 3098

चित्रपट प्रेमींसाठी खास पर्वणी! ड्रामा, थ्रिल, रोमान्स, अ‍ॅक्शन आणि इमोशन्स अनुभवता येणार केवळ १ रुपयांत!

0
चित्रपट प्रेमींसाठी खास पर्वणी! ड्रामा, थ्रिल, रोमान्स, अ‍ॅक्शन आणि इमोशन्स अनुभवता येणार केवळ १ रुपयांत!


या नव्या संकल्पनेबद्दल बोलताना पीव्हीआर आयनॉक्सचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी गौतम दत्ता म्हणाले की, अत्यंत उच्च दर्जाची ध्वनी व्यवस्था आणि दृकश्राव्य अनुभवामुळे मोठ्या पडद्यावर ट्रेलर पाहण्याचा अनुभव रोमांचकारी बनतो आणि चित्रपटाविषयीच्या उत्सुकतेत आणि चित्रपट पाहण्याच्या उत्कंठेत मोलाची भर पाडणारा असतो. या ३० मिनिटांच्या ट्रेलर स्क्रीनिंग शोच्या माध्यमातून आम्ही आमच्या प्रेक्षकांसाठी मोठ्या पडद्यावर आटोपशीर, उत्कृष्ट अनुभव देणारे मनोरंजन आणि ते सुद्धा केवळ एक रुपया इतक्या कमी किंमतीत देऊन खस सरप्राईज देत आहोत. आपल्या आवडत्या आगामी चित्रपटाच्या ट्रेलरचा आनंद आरामदायी आसनांवर आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थांसह प्रेक्षक घेऊ शकणार आहेत.



Source link

Hemant Kher : ‘स्कॅम १९९२’ फेम अभिनेत्याला इंडस्ट्रीत काम मिळेना; ट्वीट करत म्हणाला…

0
Hemant Kher : ‘स्कॅम १९९२’ फेम अभिनेत्याला इंडस्ट्रीत काम मिळेना; ट्वीट करत म्हणाला…


Hemant Kher Viral Post: ‘स्कॅम १९९२’सारख्या गाजलेल्या वेब सीरिजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारून देखील हेमंतला आज इंडस्ट्रीत काम मिळेनास झालं आहे.



Source link

Mandira Bedi Birthday: डीडी नॅशनलची ‘शांती’ ते क्रिकेटची स्टार अँकर; मंदिरा बेदीचा फिल्मी प्रवास!

0
Mandira Bedi Birthday: डीडी नॅशनलची ‘शांती’ ते क्रिकेटची स्टार अँकर; मंदिरा बेदीचा फिल्मी प्रवास!


मुंबईतून शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभिनेत्रीने अभिनय विश्वात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता. आपलं स्वप्न पूर्ण करत मंदिरा बेदीने १९९४मध्ये आपल्या करिअरला सुरुवात केली. मंदिराने डीडी नॅशनलची लोकप्रिय मालिका ‘शांती’ मध्ये काम केले. या मालिकेतील तिची भूमिका चांगलीच गाजली. यानंतर ती ‘औरत’ आणि ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’, ‘इंडियन आयडॉल’, ‘फेम गुरुकुल’, ‘डील या नो डील’सारख्या काही मालिकांमध्येही झळकली.



Source link

Mahabaleshwar Rain Update : महाबळेश्वरात तुफान गारांसह पाऊस, शेतकऱ्यांचे नुकसान

0



<p>ऐन उन्हाळ्यात आलेल्या पावसामुळे पर्यटक आनंदीत झालाय मात्र शेतकरी बांधव हताश झालाय.. अवकाळी पावसामुळे स्ट्रॉबेरी, बलबेरी पिकांचं मोठं नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल झालाय.. अवकाळीमुळे पिकवायचं काय आणि विकायचं काय असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिलाय.&nbsp;</p>



Source link

पंजाब येथे सैन्य तळावर झालेल्या गोळीबारात करंदोशी येथील जवानाचा संशयास्पद मृत्यू | पुढारी

0









पाचगणी, पुढारी वृत्तसेवा : पंजाबच्या बठिंडा जिल्ह्यातील सैन्य तळावर १२ एप्रिल बुधवारी गोळीबाराचा प्रकार घडला यात दुर्दैवाने चार जवानांना प्राण गमवावे लागले यातच जावळी तालुक्यातील करंदोशी ता.जावळी येथील जवान तेजस मानकर याचा या गोळीबारात संशयास्पद मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे.

सैन्य दलाचे अधिकारी मेजर भट्टाचार्य यांनी जावळी तालुक्याचे तहसीलदार राजेंद्र पोळ यांना केलेल्या मेलनुसार, जवान तेजस मानकर यांचे पार्थिव शनिवारी संध्याकाळी किंवा रविवारी दुपारपर्यंत गावी आणण्यात येणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीय यांनी सांगितले आहे.
सैन्य दलातील परस्परातील मतभेदामुळे गोळीबार झाल्याचा पंजाब पोलिसांचा व सैन्य दलातील पोलिसांचा संशय आहे. एशियन न्यूज वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार संबंधित गोळीबार हा दहशतवादी घटना नसल्याचे स्थानिक पोलिसांनी स्पष्ट केले. सध्या या घटनेवर हेलिकॉप्टर आणि ड्रोन च्या मदतीने निगराणी केली जात आहे.

याप्रकरणी काही संशयीतांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे सांगितले जात आहे. संबंधित सैन्य तळावर बाहेरून आलेल्या व्यक्तीने हा हल्ला केला असल्याचे बोलले जात आहे. परस्परांमधील मतभेदामुळे जवान मरण पावले असल्याचे काही वृत्तामध्ये प्रसिद्ध झाले आहे. याप्रकरणी काही संशयीतांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतली आहे.  याबाबत अतिरिक्त पोलीस महानिर्देशक एडीजी सुरेंद्र पाल सिंह परमार यांनी कोणताही अतिरेकी हमला नसल्याचा दुजोरा दिला आहे.

हेही वाचंलत का?











Source link

सातारा : महाराष्ट्राच्या मिनी काश्मीरमध्ये गारांचा पाऊस | पुढारी

0









सातारा : इम्तियाज मुजावर महाबळेश्वर तालुक्यात महाबळेश्वर व पाचगणीत अवकाळी पावसाने गुरूवारी धुमाकूळ घातला. महाबळेश्वर मध्ये गारपीट पडल्याने जमिनीवर गारांचा खच पडल्‍याचे दिसून आले.

गेल्या दोन दिवसांपासून महाबळेश्वर परिसरातील वातावरण ढगाळ असून, सोसाट्यांचा वारा विजांचा कडकडाट ढगांचा मोठमोठाला आवाज यामुळे संपूर्ण वातावरण ढवळून निघाले होते.

यातच गुरूवारी दुपारी अचानक वातावरणात बदल होऊन मुसळधार पाऊस पडला. या पावसाबरोबरच गारपीट मोठ्या प्रमाणात झाली. या गारपिटीने स्ट्रॉबेरी पिकाचं नुकसान झालं, तर महाबळेश्वर मध्ये अशा पद्धतीने गारांचा खच दिसून आला.

हेही वाचा : 











Source link

Babasaheb Ambedkar: एका महानायकाची गाथा, उलगडणार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनपट

0
Babasaheb Ambedkar: एका महानायकाची गाथा, उलगडणार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनपट


दलित समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणणारे, राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे, स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री असलेले, सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभी करणारे, संविधानातील मुलभूत हक्कांचा अधिकार देणारे, बौध्द धर्माला पुनरूज्जीवन देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट पाहण्याची पर्वणी प्रेक्षकांना नव्याने मिळणार आहे.



Source link

सातारा : एमआयडीसीतील उद्योजक परराज्यात जाण्याच्या तयारीत | पुढारी

0









कुपवाड; पुढारी वृत्तसेवा :  कुपवाड एमआयडीसीतील सूक्ष्म लघुउद्योजकांनी २५ ते १०० अश्वशक्तीच्या वाढीव विजेची मागणी महावितरणकडे केली आहे. मात्र यासाठी आर्थिक तरतूद नसल्याचे कारण सांगून महावितरण टाळाटाळ करीत आहे. शेजारील राज्यांपेक्षा महाराष्ट्रात विजेचे दर भरमसाठ आहेत. त्यामुळे काही उद्योग परराज्यात गेले आहेत. महावितरणने उद्योगांना वाढीव विजेचा पुरवठा न केल्यास काही उद्योग परराज्यात जाण्याच्या तयारीत आहेत.

कुपवाड एमआयडीसीतील सूक्ष्म व लघुउद्योजकांना वाढीव विजेचा पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी कृष्णा व्हॅली चेंबरच्यावतीने ऊर्जामंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री सुरेश खाडे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

राज्य शासनाने उद्योजकांना २१० अश्वशक्तीपर्यंत विजेचा पुरवठा करण्याचे धोरण अवलंबले आहे. यानुसार कुपवाड एमआयडीसीतील अनेक उद्योजकांनी महावितरणकडे वाढीव विजेची मागणी केली आहे. मात्र महावितरणने आर्थिक तरतूद नसल्याने वाढीव विजेस नकार दिला आहे. वाढीव वीज हवी असल्यास त्या-त्या उद्योजकांनी नवीन रोहित्र संच उभारणीचा खर्च करून घ्यावा. त्यानंतर वीज जोडणी करून देण्याचा विचार करणार असल्याचे महावितरण अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते.

कुपवाड एमआयडीसीतील उद्योजकांची वाढीव विजेच्या मागणीचा विचार करून कृष्णा व्हॅली चेंबरचे अध्यक्ष सतीश मालू व इतर संचालकांनी कुपवाड एमआयडीसीत नवीन सबस्टेशनसाठी शासनाकडे भूखंडांची मागणी केली होती. एमआयडीसीने भूखंड देण्यास सहमती दर्शविली आहे. परंतु, महावितरणने योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही. महावितरण कंपनीने भूखंड ताब्यात घेतल्यास कुपवाड एमआयडीसीत नवीन सब स्टेशन उभे राहील व सूक्ष्म व लघु उद्योजकांना वाढीव विजेचा पुरवठा होईल, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

अन्य राज्यापेक्षा महाराष्ट्रात वीज दर भरमसाठ

एमआयडीसीतील उद्योजकांच्या वीज बिलातून वीज वहन गळतीची वसुली महावितरण कंपनी करीत आहे. वीज वहन गळतीची रक्कम फार मोठी आहे. तसेच १ एप्रिलपासून वीज दरवाढ झाली आहे. शेजारील राज्यांपेक्षा महाराष्ट्रातील विजेचे दर भरमसाठ असूनही उद्योजक केवळ उद्योग टिकावेत यासाठी प्रयत्न करीत आहेत. महावितरण कंपनीने वाढीव विजेचा पुरवठा करण्यास नकार दिल्यास भविष्यात कुपवाड एमआयडीसीतील काही उद्योग परराज्यात जाण्याच्या तयारीत असल्याचा इशारा उद्योजकांनी दिला आहे.











Source link

TDM Trailer: जब जिंदगी झंड होती है तब पुना बंबई याद आती है; ‘टीडीएम’चा ट्रेलर चर्चेत

0
TDM Trailer: जब जिंदगी झंड होती है तब पुना बंबई याद आती है; ‘टीडीएम’चा ट्रेलर चर्चेत


‘ख्वाडा’, ‘बबन’ चित्रपटाच्या यशस्वी निर्मितीनंतर भाऊराव कऱ्हाडे एक नवीन कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन आले आहेत. अर्थात या कलाकृतीलाही प्रेक्षक, चाहते नक्कीच प्रतिसाद देतील हे ट्रेलर गाण्यांवरून कळतंय, यांत वादच नाही.



Source link

Sharmila Tagore: एका रात्रीतून मुंबईतील शर्मिला यांचे बिकिनी पोस्टर आले उतरवण्यात, काय होते कारण?

0
Sharmila Tagore: एका रात्रीतून मुंबईतील शर्मिला यांचे बिकिनी पोस्टर आले उतरवण्यात, काय होते कारण?


शर्मिला यांनी चित्रपट निर्मात्यांना फोन करुन एका रात्रीतून मुंबईत ज्या ज्या ठिकाणी बिकिनी पोस्टर लावण्यात आले त्या त्या ठिकाणाहून ते हटवण्यास सांगितले. शाही कुटुंबाचा असणारा रुबाब आणि मोठ्यांच्या समजुती लक्षात घेतच त्यांनी हे पोस्टर हटवण्यास सांगितले होते. शर्मिला यांनी मन्सूर यांच्या आईची भेट घेतली. त्यानंतर काही दिवसांमध्ये शर्मिला आणि मन्सूर अली खान पतौडी यांचे लग्न झाले.



Source link