Wednesday, July 1, 2026
Home Blog Page 3097

Atiq Ahmed Death: अतिक अहमदच्या मृत्यूनंतर स्वरा भास्करचे सरकारवर ताशेरे; ट्वीट करत म्हणाली…

0
Atiq Ahmed Death: अतिक अहमदच्या मृत्यूनंतर स्वरा भास्करचे सरकारवर ताशेरे; ट्वीट करत म्हणाली…


स्वरा भास्करने ट्विट करून लिहिले की, ‘अतिरिक्त न्यायालयीन हत्या किंवा चकमक, ही काही सेलिब्रेट करण्याची गोष्ट नाही.हे अराजकतेचे लक्षण आहे. राज्याच्या यंत्रणा गुन्हेगारांप्रमाणे वागत असल्याने किंवा त्यांना सक्षम करत असल्याने त्यांची विश्वासार्हता संपल्याचे लक्षण आहे. हा चांगला कारभार नाही, ही अराजकता आहे.’



Source link

Kapil Sharma Show: ‘द कपिल शर्मा शो’ लवकरच बंद होणार? कारण ऐकून व्हाल हैराण!

0
Kapil Sharma Show: ‘द कपिल शर्मा शो’ लवकरच बंद होणार? कारण ऐकून व्हाल हैराण!


मीडिया रिपोर्टनुसार, द कपिल शर्मा शोशी संबंधित एका सूत्राने सांगितले की, ‘शोमध्ये अशाप्रकारे ब्रेक घेणे शोसाठी खरोखर फायदेशीर ठरले आहे. अशा ब्रेक्समुळे कंटेंट आणि कलाकारांच्या बाबतीत काही गोष्टी सुधारण्याची संधी मिळाली. तसेच, कॉमेडी हा एक अतिशय कठीण प्रकार आहे आणि कलाकारांना ब्रेक आवश्यक आहे.’ याआधी देखील या शोने एक मोठा ब्रेक घेतला होता. मात्र, त्यांनतर नव्या ताकदीने ‘द कपिल शर्मा शो’ मोठ्या पडद्यावर परतला होता. आता हा शो पुन्हा एकदा ऑफ एअर जाणार हे ऐकून चाहते देखील नाराज झाले आहेत.



Source link

Lara Dutta Birthday: ‘मिस युनिव्हर्स’चा ताज मिळवणाऱ्या लारा दत्ताबद्दल ‘या’ गोष्टी ऐकल्यात का?

0
Lara Dutta Birthday: ‘मिस युनिव्हर्स’चा ताज मिळवणाऱ्या लारा दत्ताबद्दल ‘या’ गोष्टी ऐकल्यात का?


Happy Birthday Lara Dutta: लारा दत्ता आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली, तरी एकेकाळी तिने एकामागून एक सुपरहिट ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत.



Source link

Rang Maza Vegla: दीपा आणि आयेशा समोरासमोर येणार? ‘रंग माझा वेगळा’मध्ये मोठा ट्वीस्ट!

0
Rang Maza Vegla: दीपा आणि आयेशा समोरासमोर येणार? ‘रंग माझा वेगळा’मध्ये मोठा ट्वीस्ट!


आयेशाच्या अचानक झालेल्या एन्ट्रीमुळे आर्यनच्या कटावरून पडदा उघडला आहे. आर्यन हा आयेशाच्या बहिणीचा मुलगा असून, तो इनामदार कुटुंबावर सूड उगवण्यासाठी आला आहे. मात्र, तो आयेशाला कार्तिक आणि दीपापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे तिला होणारा त्रास कमी होईल, असे त्याला वाटत आहे. मात्र, आता आयेशा आणि दीपाची भेट होणार आहे. दोघी एकाचवेळी एकाच ठिकाणी आल्याने आता त्यांची भेट होणारच आहे. या भेटीमुळे मात्र दीपा आणि कार्तिकच्या आयुष्यात पुन्हा वादळ येणार आहे.



Source link

Apurva Nemlekar: अपूर्वा नेमळेकरवर कोसळला दुःखाचा डोंगर; ‘या’ जवळच्या व्यक्तीचे अकाली निधन

0
Apurva Nemlekar: अपूर्वा नेमळेकरवर कोसळला दुःखाचा डोंगर; ‘या’ जवळच्या व्यक्तीचे अकाली निधन


Apurva Nemlekar Bother Death: मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिच्यावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्रीच्या धाकट्या भावाचे नुकतेच निधन झाले.



Source link

Get Together: तुम्हालाही येईल पहिल्या प्रेमाची आठवण! ‘गेट टुगेदर’ चित्रपटाचा धमाकेदार टीझर बघाच!

0
Get Together: तुम्हालाही येईल पहिल्या प्रेमाची आठवण! ‘गेट टुगेदर’ चित्रपटाचा धमाकेदार टीझर बघाच!


Get Together Marathi Movie Teaser: शालेय जीवनात करिअर आणि प्रेम या दोन गोष्टीत महत्त्वाचं काय यात अडकून पडणाऱ्या तरुण मुलांची कथा यात पाहायला मिळणार आहे.



Source link

सातारा : वळवाने झोडपले, गारांचा खच; जिल्ह्याच्या काही भागांत जोरदार सरी | पुढारी

0









सातारा; पुढारी वृत्तसेवा :  गेल्या आठवड्यापासून वळवाचा पाऊस जिल्ह्यात ठिकठिकाणी बरसत आहे. शुक्रवारी वळवाने सातारा शहरासह जिल्ह्याला झोडपले. विजांचा लखलखाट, ढगांच्या कडकडाटासह दुपारी 4 च्या सुमारास वळीव पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. नागरिकांसह भाजी व फळ विक्रेत्यांची तारांबळ उडाली. वादळी वार्‍यामुळे काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली, काही ठिकाणी झाडांच्या फांद्या रस्त्यावर पडल्याने वाहतूकही ठप्प झाली. ग्रामीण भागातही अनेक ठिकाणी वादळी वारा व गारांसह पाऊस पडल्याने सुगीची कामे खोळंबली.

गेल्या काही दिवसांपासून वळवाच्या पावसाचे सावट जिल्ह्यावर घोंगावत आहे. ढगाळ हवामान, कधी कडक ऊन, कधी पावसाची भुरभूर, उकाडा अशा विचित्र हवामानाचा सामना जिल्हावासीय करत आहेत. शुक्रवारी दिवसभर कडक ऊन व आभाळ निरभ्र होते. दुपारनंतर अचानक वातावरणाचा नूर पालटला. अचानक आभाळ भरून आले. ढगांचा गडगडाट व विजांचा लखलखाट सुरु होता. दु. 4 च्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. वादळी वार्‍यासह सुमारे अर्धा तास जोरदार सरी कोसळल्या. या पावसात काही प्रमाणात गाराही पडल्या. जोरदार पावसामुळे वाहनधारकांनाही पुढचे काही दिसेनासे झाल्याने वाहने जागेवरच थांबावली होती. त्यामुळे पावसाचा जोर आसरेपर्यंत रस्त्यावरील वाहतूकी रोडावली होती. संगमनगर परिसरात वादळी वार्‍यामुळे झाडे उन्मळून पडली. कैलास स्मशानभूमीमध्ये वार्‍याने झाड पडले. काही ठिकाणी झाडांच्या फांद्या रस्त्यावर पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. गेल्या काही दिवसांमध्ये झाडांवर वीज पडण्याच्या घटनांमुळे वीजांच्या कडकडाटाने नागरिक भयभित झाले होते. बाजारपेठेत नागरिकांसह फिरते विक्रेते, भाजी व फळ विक्रेत्यांची तारांबळ उडाली. अनेक विक्रेत्यांनी आपले साहित्य आहे तिथेच प्लास्टिकने झाकून सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला. वार्‍यामुळे काही ठिकाणी प्लास्टिक आवरणच उडाल्याने भाजी भिजल्याने विक्रेत्यांचे नुकसान झाले. पावसामुळे रस्ते व बाजारपेठेत शुकशुकाट झाला होता.

दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सातारा शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी मिरवणुका, रॅलींसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अचानक आलेल्या पावसामुळे या कार्यक्रमांच्या आयोजनामध्ये काहीसा विस्कळीतपणा आला. मात्र थोड्याच वेळात वातावरण पूर्ववत झाल्याने भीमप्रेमींनी सुटकेचा निश्वास सोडत मिरवणुका काढल्या.

ग्रामीण भागात सध्या रब्बी हंगामातील सुगी अंतिम टप्प्यात आली आहे. शेतशिवारामध्ये पिकांची काढणी, कापणी, मळणीची कामे युध्दपातळीवर सुरु आहेत. या सुगीवर अवकाळीचे सावट घोंगावत आहे. शुक्रवारी दुपारी अचानक सुरु झालेल्या अवकाळी पावसामुळे सुगीच्या कामांचा खोळंबा झाला. ज्वारीची काटणी केलेली कणसे झाकण्याचीही उसंत न मिळाल्याने ती भिजली. तर काहींची मळणी केलेले धान्य झाकण्यासाठी त्रेधा उडाली. सातारा तालुक्यातील काही भागात गारांसह पाऊस पडल्याने फळबागांचे नुकसान झाले. सध्या हंगामी आंबा तयार होत असून वादळी वार्‍यामुळे बहुतांश फळे गळून पडत आहेत. तर वाचलेल्या फळांना गारांच्या मार्‍यामुळे नुकसान होणार आहे. आंबा उत्पादनाला गारांचा फटका बसणार आहे.











Source link

मोदींनी माझं कौतुक केलं हा त्यांचा मोठेपणा, कौतुकाला संधी कसं मानायचं? : अमोल कोल्हे

0


Amol Kolhe On BJP Offer : “देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी माझं कौतुक केलं हा त्यांचा मोठेपणा आहे. त्यांनी माझं कौतुक केलं म्हणून मी त्यांच्याकडे जावं असं नाही,” असं राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी स्पष्ट केलं. डॉ. अमोल कोल्हे यांची प्रमुख भूमिका असलेला ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्याचा (Shivputra Sambhaji) प्रयोग साताऱ्यात (Satara) होणार आहे. त्या अनुषंगाने त्यांनी साताऱ्यातील कराड इथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यात त्यांनी महानाट्यासह राजकीय आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आपलं मत व्यक्त केलं.

कौतुकाला संधी कसं मानायचं? : अमोल कोल्हे

अलिकडेच लोकसभेत तुम्ही केलेल्या एका भाषणाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांसमोर कौतुक केलं. तुम्हाला आता भारतीय जनता पार्टीकडून काही ऑफर आहे का? आम्हाला राष्ट्रवादीचे खासदार म्हणून बघायला मिळणार की भाजपचे खासदार? असा प्रश्न अमोल कोल्हे यांना विचारण्यात आला. या प्रश्न ऐकल्यावर अमोल कोल्हे आधी हसले आणि मग आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, “माननीय पंतप्रधानांनी कौतुक केलं ही आनंदाची गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट आहे. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. तुम्ही एका पेपरमध्ये काम करत असताना, तुमच्या बातमीचं दुसऱ्या पेपरच्या संपादकांनी कौतुक केलं तर मी तुम्हाला विचारायचं का की तुम्ही नोकरी सोडताय? कौतुकाला संधी कसं मानायचं? आधी ऑफर तर यायला हवी. सध्या ऑफर एकच आहे, ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्य बघायला या, ते जास्त महत्त्वाचं आहे. राजकारण, पद हे होतच असतं, ते फक्त पाच वर्ष असतं.”

भाजपात प्रवेश करणार का? अमोल कोल्हे स्पष्टच म्हणाले

दरम्यान याआधीही अमोल कोल्हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. दोन महिन्यांपूर्वी त्यांनी यावर स्पष्ट भूमिका मांडली होती. ते म्हणाले होते की, “माझ्या भाजप प्रवेशाच्या चर्चा अकारण घडवल्या जाता. जे लोक या चर्चा घडवतात त्यांना प्रश्न विचारणं संयुक्तिक ठरेल. संसदेच्या अधिवेशनात पार्लमेंटच्या फ्लोअरवर उभं राहून मी जी भूमिका मांडतो, मी जे भाषण करतो ते जास्त बोलतं, कोणीतरी कोणाच्या तरी कानात सांगतं, त्या कानगोष्टींना उत्तर देण्यापेक्षा मी संसदेत जे बोलतो ती भूमिका जास्त अधिक मानली पाहिजे. मी पार्लमेंटच्या फ्लोअरवर उभं राहून मी जी भूमिका मांडतो ती नजरेआड करुन जेव्हा असे प्रश्न विचारले जातात, तेव्हा संशयाला जागा निर्माण होते की हे प्रश्न मुद्दाम विचारायला सांगतात का?”

हेही वाचा

Sansad Ratna Award 2023: संसदरत्न पुरस्काराची घोषणा; गोपाळ शेट्टी, अमोल कोल्हे, हिना गावित आणि फौजिया खान यांचा सन्मान



Source link

KGF 3: रॉकीभाई मोठ्या पडद्यावर परतणार; मेकर्सकडून ‘केजीएफ ३’ची नवी अपडेट समोर!

0
KGF 3: रॉकीभाई मोठ्या पडद्यावर परतणार; मेकर्सकडून ‘केजीएफ ३’ची नवी अपडेट समोर!


Yash KGF 3 New Update: चित्रपटाच्या निर्मात्यांनी ‘केजीएफ ३’ची झलक प्रेक्षकांना दाखवली आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज करण्यात आला आहे.



Source link

Shaakuntalam Review: मोठ्या पडद्यावर दिसली शकुंतला आणि दुष्यंतची प्रेमकहाणी! कसा आहे ‘शाकुंतलम’?

0
Shaakuntalam Review: मोठ्या पडद्यावर दिसली शकुंतला आणि दुष्यंतची प्रेमकहाणी! कसा आहे ‘शाकुंतलम’?


Shaakuntalam Review: राजा दुष्यंत आणि शकुंतला यांची प्रेमकथा ‘शाकुंतलम’ या चित्रपटाच्या निमित्ताने मोठ्या पडद्यावर पाहायला मिळाली आहे.



Source link