Wednesday, July 1, 2026
Home Blog Page 3094

Aai Kuthe Kay Karte: आशुतोष घेतोय अरुंधतीची काळजी; दोघांचा रोमँटिक व्हिडीओ व्हायरल

0
Aai Kuthe Kay Karte: आशुतोष घेतोय अरुंधतीची काळजी; दोघांचा रोमँटिक व्हिडीओ व्हायरल


आता पर्यंत मालिकेत काय घडले?

‘आई कुठे काय करते’ या मालिकेत सध्या नात्यांची गुंतागुंत पाहायला मिळत आहे. एकीकडे अरुंधतीने आशुतोषसोबत तिचा नवा संसार थाटला आहे. तिच्या या नव्या संसाराला सुरुवात होताच होती की, तिच्यासमोर नवी संकटं उभी राहिली आहेत. अरुंधतीच्या लग्नामुळे अनिरुद्ध आणखीनच संतापला आहे. तर, ईशाच्या वागण्यामुळे त्याचा पारा आणखी वाढला आहे. अनिरुद्ध आणि अरुंधती यांची लेक ईशा, आशुतोष केळकरचा भाचा अनिश याच्या प्रेमात पडली आहे. मात्र, त्यांचं हेच नातं अनिरुद्धला मान्य नाहीये. अशातच ईशाची परिक्षा असते आणि परिक्षेच्या ऐनवेळेस ईशा सर्व काही विसरुन जाते.



Source link

KBC: केबीसीमध्ये सहभागी व्हायचे? या दिवशी सुरु होणार रजिस्ट्रेशन

0
KBC: केबीसीमध्ये सहभागी व्हायचे? या दिवशी सुरु होणार रजिस्ट्रेशन


गेल्या वर्षी अमिताभ यांचा ८०वा वाढदिवस केबीसीच्या सेटवर साजरा करण्यात आला होता. त्यावेळी त्यांची पत्नी जया बच्चन आणि मुलगा अभिषेक बच्चन सेटवर आले होते. त्यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला होता. आता पुन्हा नवे पर्व घेऊन अमिताभ बच्चन येत आहेत.



Source link

खा. उदयनराजेंनी केले सत्यजित तांबेंचे हटके स्वागत | पुढारी

0









सातारा : पुढारी वृत्तसेवा : नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आ. सत्यजित तांबे हे कोल्हापूर दौर्‍यावर जात असताना त्यांनी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांची शासकीय विश्रामगृह येथे भेट घेतली. यावेळी खा. उदयनराजे भोसले यांनी आ. तांबे यांचे स्वागत केले त्यानंतर राजकीय वातावरणासह इतर विषयांवर चर्चा केली.

कोल्हापूरकडे जात असताना आ. तांबे यांनी शासकीय विश्रामगृह येथे खा. उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. यावेळी खा. उदयनराजे यांनी आ. तांबे यांचे स्वागत केले. तांबे यांच्या गळ्यात शाल घातली आणि मिश्किलपणे त्या शालीचा फास लावत आमदारसाहेब, तुम्हाला असा राजकीय फास लागला होता, मी नाही तर इतरांनी लावला होता, असा हटके स्टाईल खा. उदयनराजे यांनी डॉयलॉग मारल्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. त्यानंतर या दोघांमध्ये राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडीसह इतर विषयांवर चर्चा झाली. यावेळी माजी जि. प. सभापती सुनील काटकर, संग्राम बर्गे, काका धुमाळ, पंकज चव्हाण, नासिर शेख, शेखर चव्हाण उपस्थित होते.











Source link

निष्क्रिय अधिकारी लोकांच्या अपेक्षा कशा पूर्ण करणार? : खा. उदयनराजे | पुढारी

0


सातारा : पुढारी वृत्तसेवा : सातार्‍यात वाहतूक समस्या निर्माण होत असल्याने अडथळा ठरणारी अतिक्रमणे काढण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सातारा मार्केट कमिटीतील उमेदवारांना अपात्र ठरवताना कुणालाही पाठीशी घालू नये. सत्तेचा ताम्रपट कुणीही घेऊन आलेले नाही. पण निष्क्रीय व नकारात्मक द़ृष्टिकोन ठेवणार्‍या अधिकार्‍यांकडून लोकांच्या अपेक्षा कशा काय पूर्ण करणार? असा सवाल खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात विविध विभागांची खा. उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी तसेच विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना खा. उदयनराजे म्हणाले, जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न गेली 12 वर्षांपासून मार्गी लागला नाही. यासंदर्भात तातडीने प्रस्ताव तयार करून पाठवण्याबाबत जिल्हाधिकार्‍यांना सुचना केल्या होत्या. प्रकल्पग्रस्तांना जमीन दिली पण मूळ मालक त्यांना जमीन कसून देत नाहीत अशी अवस्था कुणाचीही होवू नये. शहरातील वाहतूक समस्येसंदर्भातही बैठकीत चर्चा झाली. शाळा, महाविद्यालये परिसरातील अतिक्रमणे काढण्याचे निर्देश दिल्याचे त्यांनी सांगितले.

धरण परिसरातील अतिक्रमणांबाबत विचारले असता खा. उदयनराजे म्हणाले, धरण परिसरातील अतिक्रमणांचा प्रश्न गंभीर आहे. खाणी सुरू असताना मानवी वस्ती वाढल्यावर खाणी बंद केल्या. जो नियम आम्हाला लागू होतो त्याला कुणी अपवाद होता कामा नये. यासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांना निर्देश दिल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकरी संघटनेच्या उमेदवारांना दमदाटी केली जात आहे. सत्ताधार्‍यांकडून अपात्र उमेदवारांना पात्र ठरवले जात आहे का? असे विचारले असता खा. उदयनराजे म्हणाले, सत्ता कुणाचीही असो पण सत्तेमुळे असे काही होत नाही. कुणीही ताम्रपट घेऊन येत नाही, असं वक्तव्य मागच्या आठवड्यात मेढ्यात झालेल्या सभेत झालं. सत्ता आज आहे उद्या नाही. आज सत्तेत ‘हे’ असतील उद्या ‘ते’ सत्तेत असतील. जे पात्र होवू शकत नाहीत ते अपात्र होणारच ना?

जिल्हा बँकेचे उपाध्यक्षांच्या सोसायटीत 2 कोटींचा घोटाळा झाला असून हे प्रमाण वाढले आहे, असे विचारले असता खा. उदयनराजे म्हणाले, या घोटाळ्यांबाबत त्यांनाच विचारा. जिल्हा बँकेत मी संचालक आहे. ही बँक चांगल्या पद्धतीने चालली असल्याचे सांगितले जाते, मग ईडीचे पत्र का आले? याचे कारण कळू द्या. काहीतर बेस असणारच ना. अगोदर फार मोठी व्यक्ती चेअरमन होती. बँकेत सर्व काही टॉप सिक्रेट आहे का? सहकारात पळवाटा भरपूर असतात. मार्केट कमिटी, जिल्हा बँक निवडणुकीत मर्यादित मते असतात. हे लोक मर्यादित मतांमध्ये खेळतात.

माध्यमांनी आवाज उठवला पाहिजे. जिल्हा बँकेत घोटाळे झाले नाहीत का? बँकेचे सीईओंना जेवढे बँकिंगचे ज्ञान असते तेवढे संचालक किंवा बोर्डाला नसते. तज्ज्ञ असल्यामुळेच साईओपदी नेमणूक झाली पण तेच समजून घ्या असे म्हणतात. त्यांना काय समजून घ्यायचे? लेखी उत्तर देत नाहीत, अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

जिल्हा बँकेचे आपण संचालक असताना माहिती दिली जात नाही पण अजित पवार हे बैठक बोलावून माहिती घेतात. बँक कुणाच्या आदेशाने चालते, असे विचारले असता खा. उदयनराजे म्हणाले, सहकारात या लोकांची टोळी आहे. सातारा मार्केट कमिटीत घोटाळा झाला. मनवे यांना निलंबित करण्यात आले पण पुढे काय झाले? त्याच्या बंगल्यात कोण जावून राहिले, याचा शोध माध्यमांनी घ्यावा. यावेळी साविआचे प्रतोद अ‍ॅड. डी. जी. बनकर, जि. प. चे माजी सभापती सुनील काटकर, काका धुमाळ, प्रीतम कळसकर, रॉबर्ट मोझेस, नासीर शेख, चिन्मय कुलकर्णी आदि उपस्थित होते.



Source link

Tim Cook: Appleचे सीईओ टीम कुक यांनी माधुरी दीक्षितसह मुंबईतील वडापावचा घेतला आस्वाद

0
Tim Cook: Appleचे सीईओ टीम कुक यांनी माधुरी दीक्षितसह मुंबईतील वडापावचा घेतला आस्वाद


टीम कुक मंगळवारी मुंबईत भारतातील पहिले अ‍ॅपल स्टोअरचे उद्घाटन करणार आहेत. हे अॅपल स्टोअर मुंबईतील बीकेसी वांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये सुरू होणार आहे. इतकंच नव्हे तर टीम भारत दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदींनाही भेटतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. एकूणच टीम कुक यांचा हा भारत दौरा खास असणार आहे यात काहीच शंका नाही.



Source link

Mahima Chaudhry Mother: महिमा चौधरीच्या आईचे निधन

0
Mahima Chaudhry Mother: महिमा चौधरीच्या आईचे निधन


महिमा विषयी बोलायचे झाले तरे काही दिवसांपूर्वी महिमाला कर्करोग झाल्याचे समोर आले. तिने त्यावर मात देखील केली. अभिनेते अनुपम खेर यांनी महिमाचा व्हिडीओ शेअर करत याबाबत माहिती दिली होती. त्यांनी महिमाचा व्हिडीओ शेअर करत, ”मी एक महिन्या आधी महिमा चौधरीला फोन केला. तेव्हा मी यूएसमध्ये होतो. माझ्या ५२५ व्या चित्रपटामधील एका महत्त्वाच्या भूमिकेबाबत मला महिमा यांच्यासोबत चर्चा करायची होती. त्यानंतर आमचे बोलणे झाले. तेव्हा मला कळाले की, महिमाला ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे. तिची जगण्याची पद्धत आणि तिचा दृष्टिकोन जगभरातील महिलांना जीवन जगण्याची नवी प्रेरणा देऊ शकतो” या आशयाचे कॅप्शन दिले होते. तेव्हा महिमाला कर्करोग झाला आहे याची माहिती समोर आली.



Source link

Hemant Dhome: ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार हेमंत ढोमेचा ‘फकाट’ सिनेमा

0
Hemant Dhome: ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार हेमंत ढोमेचा ‘फकाट’ सिनेमा



Phakaat Movie:पोस्टरमध्ये चित्रपटातील सगळे कलाकार दिसत असून एलओसी सिक्रेटची फाईल दिसत आहे आणि आजूबाजूला पैसेही दिसत आहेत. त्यामुळे आता हा नेमका काय प्रकार आहे? हे चित्रपट पाहिल्यावर कळेल.



Source link

Shaakuntalam Collection: सोमवारी समांथाच्या ‘शाकुंतलम’कडे चाहत्यांची पाठ, सर्वात कमी कमाई

0
Shaakuntalam Collection: सोमवारी समांथाच्या ‘शाकुंतलम’कडे चाहत्यांची पाठ, सर्वात कमी कमाई



Shaakuntalam Box Office Collection: अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हिचा ‘शाकुंतलम’ हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मात्र, या चित्रपटाकडे चाहत्यांनी पाठ फिरवल्याचे पाहायला मिळते.



Source link

Viral Video: इतकी महागाई! विमानतळावरील इडलीच्या किंमती ऐकून राखी सावंतचे डोळे झाले पांढरे

0
Viral Video: इतकी महागाई! विमानतळावरील इडलीच्या किंमती ऐकून राखी सावंतचे डोळे झाले पांढरे


राखीचा हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर अनेक युजर्स तिच्यावर टीका करत आहेत. या व्हिडीओवर प्रत्येकाच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. यात एका युझरने लिहिले की, ‘ही अशिक्षित महिला रमझानची थट्टा करत आहे.’ दुसऱ्या एका युझरने लिहिले की, ‘किमान रमजानचा तरी आदर करा, राखी… कृपया आमची अशी चेष्टा करू नका.’ आणखीएकाने लिहिले की, ‘हाकाय मूर्खपणा आहे. तिने जरइस्लाम स्वीकारला असेल, तरहे असे वागणे चालणार नाही.’ राखीच्या या व्हिडीओवर अशा अनेक कमेंट येत आहेत.



Source link

Sana Khan: भर पार्टीत प्रेग्नंट सनाला पतीने खेचलं? अखेर अभिनेत्रीने स्वतः दिलं स्पष्टीकरण! म्हणाली…

0
Sana Khan: भर पार्टीत प्रेग्नंट सनाला पतीने खेचलं? अखेर अभिनेत्रीने स्वतः दिलं स्पष्टीकरण! म्हणाली…


सोशल मीडियावर झालेल्या ट्रोलिंगनंतर आता अभिनेत्री यावर स्पष्टीकरण दिले आहे. सना खान म्हणाली की, ‘मला माहित आहे की, हा व्हिडीओ पाहून अनेकांना विचित्र वाटलं असेल. पण, असं काही नाही. त्यावेळी आम्ही पार्टीतून बाहेर पडत होतो आणि आमचा आमच्या चालकाशी संपर्क होत नव्हता. गाडीचाही पत्ता नव्हता. आम्ही बराच वेळ वाट पाहिली. बराच वेळ उभं राहून आम्ही थकलो होतो. त्यावेळी मी देखील खूप अस्वस्थ झाले होते. त्यामुळे ते मला एखाद्या आरामदायी ठिकाणी घेऊन जात होते, जिथे मी पाणी पिऊ शकेन आणि मोकळ्या हवेत श्वास घेऊ शकेन. त्यावेळी पापाराझींमुळे आम्हाला फार उशीर होऊ नये यासाठी मीच त्यांना घाई करायला सांगत होते.’



Source link