Wednesday, September 30, 2026
Homeसाताराखा. उदयनराजेंनी केले सत्यजित तांबेंचे हटके स्वागत | पुढारी

खा. उदयनराजेंनी केले सत्यजित तांबेंचे हटके स्वागत | पुढारी

[ad_1]








सातारा : पुढारी वृत्तसेवा : नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आ. सत्यजित तांबे हे कोल्हापूर दौर्‍यावर जात असताना त्यांनी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांची शासकीय विश्रामगृह येथे भेट घेतली. यावेळी खा. उदयनराजे भोसले यांनी आ. तांबे यांचे स्वागत केले त्यानंतर राजकीय वातावरणासह इतर विषयांवर चर्चा केली.

कोल्हापूरकडे जात असताना आ. तांबे यांनी शासकीय विश्रामगृह येथे खा. उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. यावेळी खा. उदयनराजे यांनी आ. तांबे यांचे स्वागत केले. तांबे यांच्या गळ्यात शाल घातली आणि मिश्किलपणे त्या शालीचा फास लावत आमदारसाहेब, तुम्हाला असा राजकीय फास लागला होता, मी नाही तर इतरांनी लावला होता, असा हटके स्टाईल खा. उदयनराजे यांनी डॉयलॉग मारल्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. त्यानंतर या दोघांमध्ये राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडीसह इतर विषयांवर चर्चा झाली. यावेळी माजी जि. प. सभापती सुनील काटकर, संग्राम बर्गे, काका धुमाळ, पंकज चव्हाण, नासिर शेख, शेखर चव्हाण उपस्थित होते.









[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments