Wednesday, July 1, 2026
Home Blog Page 3095

Tu Chal Pudha: अश्विनीचा बदला घेण्यासाठी शिल्पी देणार संजूला त्रास; ‘तू चाल पुढं’मध्ये मोठा ट्वीस्ट

0
Tu Chal Pudha: अश्विनीचा बदला घेण्यासाठी शिल्पी देणार संजूला त्रास; ‘तू चाल पुढं’मध्ये मोठा ट्वीस्ट

अश्विनी स्पर्धेत उतरू नये आणि उतरलीच तर, ती जिंकू नये यासाठी शिल्पीने अनेक प्रयत्न केले. मात्र, तिचे सगळेच डाव नेहमी फोल ठरले. प्रत्येक वेळी आपल्या पत्नीची म्हणजेच अश्विनीची साथ न देता, श्रेयसने नेहमीच आपल्या बहिणीची शिल्पीची बाजू घेतली. याचाच फायदा शिल्पीने घेतला होता. तिने नेहमीच श्रेयसचा वापर करून अश्विनीला अडकवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आता शिल्पीचा खरा चेहरा श्रेयसच्या समोर आला आहे. त्यामुळे त्याने आता अश्विनीची साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.

Source link

Shehnaaz Gill: आयुष्यभर एकटीच राहणार का? ‘सिडनाज’ म्हणणाऱ्या चाहत्यांवर सलमान खान भडकला!

0
Shehnaaz Gill: आयुष्यभर एकटीच राहणार का? ‘सिडनाज’ म्हणणाऱ्या चाहत्यांवर सलमान खान भडकला!

यावेळी सलमानने नेटकऱ्यांना विचारले की, शहनाजला तिच्या आयुष्यात पुढे जाण्याचा अधिकार नाही का? ती नेहमीच एकटी राहील का? असे म्हणत सलमान यावेळी संतापला होता. कपिल शर्माच्या शोमध्ये सलमान खानने चित्रपटाच्या संपूर्ण स्टारकास्टची ओळख करून दिली. यावेळी सलमान म्हणाला की, सिद्धार्थच्या मृत्यूनंतर शहनाजला पुढे जाण्याचा पूर्ण अधिकार आहे. नेटिझन्सनी तिचे नाव सिद्धार्थसोबत जोडण्याऐवजी तिला तिच्या करिअरमध्ये नेहमीच पाठिंबा द्यावा. सलमान जेव्हा या गोष्टी बोलत होता, तेव्हा शहनाज आणि कपिल खूपच गंभीर झालेले दिसत होते.

Source link

Namashi Chakraborty: मिथुन चक्रवर्तीच्या मुलाचे बॉलिवूडमध्ये पदार्पण, आगामी सिनेमाचा ट्रेलर पाहिलात

0
Namashi Chakraborty: मिथुन चक्रवर्तीच्या मुलाचे बॉलिवूडमध्ये पदार्पण, आगामी सिनेमाचा ट्रेलर पाहिलात

Namashi Chakraborty: मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा नमाशी चक्रवर्ती लवकरच ‘बॅड बॉय’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर तुम्ही पाहिलात का?

Source link

Palak Tiwari: बाबा सिद्दिकीच्या इफ्तार पार्टीत पलक तिवारीचा अवतार पाहून चाहते संतापले! म्हणाले…

0
Palak Tiwari: बाबा सिद्दिकीच्या इफ्तार पार्टीत पलक तिवारीचा अवतार पाहून चाहते संतापले! म्हणाले…

या पार्टीत सहभागी होण्यासाठी पलक तिवारी हिने मिरर वर्क केलेला ग्रे रंगाचा लेहेंगा चोली परिधान केला होता. या लेहेंग्यासोबतच तिने डीप नेकलाइन असलेला ब्लाऊज कॅरी केला होता. तर, हा लूक पूर्ण करण्यासाठी केस कर्ल करून मोकळे सोडले होते. पलक या लूकमध्ये सुंदर दिसत होती. या पार्टीत प्रवेश करताच तिने बाबा सिद्दीकीसोबत पापाराझींना फोटो पोजही दिल्या. बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीतील पलक तिवारीचा हा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. तिचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अभिनेत्रीला ट्रोल करण्यास सुरुवात झाली आहे. या व्हिडीओवर आता नेटकरी कमेंट्स करून तिला ट्रोल करत आहेत. काही युझर्सनी कमेंट करत तिला विचारले की, ‘तू इफ्तार पार्टीसाठी की, आयटम साँग करण्यासाठी असे उघड कपडे घातले आहेत?’

Source link

Aai Kuthe Kay Kartey: अरुंधतीने घातली इशाला समजूत, मालिका रंजक वळणावर

0
Aai Kuthe Kay Kartey: अरुंधतीने घातली इशाला समजूत, मालिका रंजक वळणावर

Aai Kuthe Kay Karte Latest Update: अनिरुद्ध आणि अरुंधती यांची लेक ईशा, आशुतोष केळकरचा भाचा अनिश याच्या प्रेमात पडली आहे. त्यातच ती परिक्षेला जाऊन सर्वकाही विसरते. 

Source link

Amrish Puri: ‘मोगॅम्बो’ अमरीश पुरी होते आसारामबापूंचे भक्त; व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल!

0
Amrish Puri: ‘मोगॅम्बो’ अमरीश पुरी होते आसारामबापूंचे भक्त; व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल!

यानंतर आसाराम बापू म्हणतात की, ‘बघा हा दबंग अभिनेता, जेव्हा अभिनय करत असतात तेव्हा ते अगदीच वेगळे असतात.’ यानंतर पुन्हा एकदा अमरीश पुरी बोलताना दिसतात ते म्हणतात की, ‘बापूजींना वाटतेय की मी तुमच्याशी बोलावे. बापूजी जे देतात, आपण सगळे जे घेतोय त्यावर मोगॅम्बो खुश झाला आहे.’ त्यांचा हा व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे.

Source link

Urfi Javed: उर्फी जावेदला दिग्दर्शकाने दिली जीवे मारण्याची धमकी?

0
Urfi Javed: उर्फी जावेदला दिग्दर्शकाने दिली जीवे मारण्याची धमकी?

उर्फीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने म्हटले की, ‘मला कोणी तरी नीरज पांडेच्या ऑफिसमधून फोन केला. समोरच्या व्यक्तीने मला दिग्दर्शकाच्या असिस्टंट असल्याचे सांगितले आणि सरांनी मला भेटायला बोलावले आहे असे म्हटले. त्यावर मी उत्तर देते कोणालाही भेटण्यापूर्वी मला त्या प्रोजेक्टविषयी जाणून घ्यायला आवडेल. ते ऐकून त्या व्यक्तीला राग आला. तुझी नीरज पांडेचा अपमान करण्याची हिंमत कशी झाली?’

Source link

R Madhavan: आर माधवनच्या लेकाची कमाल; ५ सुवर्ण पदकं पटकावत वाढवला देशाचा मान!

0
R Madhavan: आर माधवनच्या लेकाची कमाल; ५ सुवर्ण पदकं पटकावत वाढवला देशाचा मान!

आर माधवनने हे फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘देवाच्या कृपेने आणि तुमच्या सर्व शुभेच्छांसह वेदांतने भारतासाठी ५ गोल्ड मेडल पटकावले. (५० मी, १०० मी, २०० मी, ४०० मी आणि १५०० मी) मलेशियन वयोगट चॅम्पियनशिप २०२३ या आठवड्याच्या शेवटी आयोजित करण्यात आली होते. आर माधवनच्या या पोस्टवर, त्याचे कुटुंब आणि मित्र परिवार शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

Source link

Shaakuntalam Collection: समंथाची जादू ओसरली? ‘शाकुंतलम’कडे प्रेक्षकांनी फिरवली पाठ!

0
Shaakuntalam Collection: समंथाची जादू ओसरली? ‘शाकुंतलम’कडे प्रेक्षकांनी फिरवली पाठ!

Shaakuntalam Box Office Collection: अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हिचा ‘शाकुंतलम’ हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मात्र, या चित्रपटाला म्हणवा तसा प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळालेला नाही.

Source link

Mohan Joshi: ‘गाढवाचं लग्न’ नाटकानंतर मोहन जोशी आणि सविता मालपेकर पुन्हा गाजवणार रंगमंच

0
Mohan Joshi: ‘गाढवाचं लग्न’ नाटकानंतर मोहन जोशी आणि सविता मालपेकर पुन्हा गाजवणार रंगमंच

सुमी आणि आम्ही फॅमिली ड्रामा असलेलं दोन अंकी नाटक आहे. तरुण मुलगी गाठू पाहणारं एक वेगळंच ध्येय आणि त्यावेळचे तिचे आई- वडिलांशी संबंध असं खेळकर कुटुंब या नाटकातून पाहायला मिळेल या नाटकात मोहन जोशी, सविता मालपेकर या दोघांसोबत श्रद्धा पोखरणकर, उदय लागू, राजेश चिटणीस, प्रदीप जोशी, चंद्रशेखर भागवत कलाकार काम करणार आहेत. प्रकाशयोजना शीतल तळपदे यांची असून सूत्रधार सुनील महाजन, संदीप विचारे आहेत.

Source link