Wednesday, July 1, 2026
Home Blog Page 3093

Aai Kuthe Kay Karte: अनिरुद्धच्या आयुष्यात आता तिसऱ्या व्यक्तीची एन्ट्री होणार? कथानकात ट्वीस्ट!

0
Aai Kuthe Kay Karte: अनिरुद्धच्या आयुष्यात आता तिसऱ्या व्यक्तीची एन्ट्री होणार? कथानकात ट्वीस्ट!


आपल्यासोबत ऑफिसमध्ये काम करणाऱ्या संजनाच्या प्रेमात पडल्यावर अनिरुद्धने अरुंधतीसोबतचा २५ वर्षांचा मोडून संजानाशी लग्नगाठ बांधली होती. मात्र, आता संजना आणि अनिरुद्धच्या संसारात देखील काही गोष्टी बिनसल्या आहेत. सततचे वाद आणि भांडणं यामुळे कंटाळून आता संजना आणि अनिरुद्ध यांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज देखील केला आहे. मात्र, त्या आधीच अनिरुद्धच्या आयुष्यात एका नव्या व्यक्तीची एन्ट्री झाली आहे. मात्र, ही व्यक्ती नक्की कोण हे अद्याप समोर आलेले नाही.



Source link

Jawan: ‘पठाण’नंतर पुन्हा धमाका होणार; शाहरुख खानच्या ‘जवान’मध्येही दीपिका पदुकोणची एन्ट्री!

0
Jawan: ‘पठाण’नंतर पुन्हा धमाका होणार; शाहरुख खानच्या ‘जवान’मध्येही दीपिका पदुकोणची एन्ट्री!


सध्या शाहरुख खान त्याच्या ‘जवान’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. नुकताच तो मुंबईत साऊथ अभिनेत्री नयनतारासोबत या चित्रपटातील एका गाण्याचे शूटिंग करताना दिसला. आता दीपिकासोबतचे त्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, ते दोघेही ‘जवान’च्या गाण्याचे शूटिंग करत असल्याचे बोलले जात आहे. या फोटोंमध्ये दोघे पांढरा शर्ट, काळी पँट आणि मॅचिंग ब्लॅक बूट अशा लूकमध्ये दिसले आहेत. तर, दीपिकाने हायपोनीटेलसह गळ्यात लाल रंगाचा स्कार्फ बांधला आहे.



Source link

Tu Chal Pudha: संजूची कस्टडी मिळवून देण्यासाठी अश्विनी करणार विद्युतला मदत! मालिकेत नवा ट्वीस्ट

0
Tu Chal Pudha: संजूची कस्टडी मिळवून देण्यासाठी अश्विनी करणार विद्युतला मदत! मालिकेत नवा ट्वीस्ट


अश्विनीने ‘मिसेस इंडिया’ ही स्पर्धा जिंकू नये, यासाठी शिल्पीने अनेक प्रयत्न केले होते. नात्याने शिल्पी ही अश्विनीची भावजय आणि नणंद दोन्ही आहे. मात्र, अश्विनीने कधीच आपल्या पुढे जाऊ नये, असे तिला वाटते. त्यामुळे ती शक्य ते सगळे प्रयत्न करून अश्विनीला त्रास देण्याचा प्रयत्न करत असते. तिने या कटात पती विद्युतचा मित्र विक्रम याची मदत घेतली होती. यासाठी शिल्पीने आपल्या पतीची साथ सोडून विक्रमसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. या दरम्यान तिने विद्युतचं घर सोडताना सोबत स्वतःच्या मुलाला अर्थात संजूला देखील सोबत विक्रमकडे नेलं.



Source link

Rang Maza Vegla: जीवघेणा हल्ला अन् आता किडनॅप; दीपाच्या आयुष्यात येणार मोठं संकट!

0
Rang Maza Vegla: जीवघेणा हल्ला अन् आता किडनॅप; दीपाच्या आयुष्यात येणार मोठं संकट!


‘रंग माझा वेगळा’ या मालिकेच्या येत्या भागात हा नवा ट्रॅक पाहायला मिळणार आहे. यात दीपा घरात एका कार्यक्रमाची तयरी करताना दिसणार आहे. याची सगळी तयारी सुरू असताना दीपा केक आणण्यासाठी एका व्यक्तीला फोन करते. हा व्यक्ती आपण केक घेऊन आलो आहोत, असे सांगून दीपाला घराबाहेर बोलवतो. यावेळी दीपा केकची डिलिव्हरी घेण्यासाठी बाहेर गेली असता, तिला काही लोक बेशुद्ध करून गाडीत टाकतात. यानंतर आता दीपाला एका बंदिस्त जागी ठेवण्यात येणार असून, तिला मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जाणार आहे. आता दीपाच्या जीवावर नक्की कोण उठलंय आणि ही खेळी नक्की कोण खेळतंय याचा खुलासा अद्याप झालेला नाही.



Source link

SRK Family Photos: आर्यन, सुहाना अन् अबरामचा स्वॅग.. शाहरुख खानचे फॅमिली फोटो सोशल मीडियावर व्हायरल!

0
SRK Family Photos: आर्यन, सुहाना अन् अबरामचा स्वॅग.. शाहरुख खानचे फॅमिली फोटो सोशल मीडियावर व्हायरल!


किंग खानच्या कुटुंबाचे काही न पाहिलेले फोटो सध्या इंटरनेट विश्वात व्हायरल होत आहेत. शाहरुख खानला त्याच्या कुटुंबासह, विशेषत: मुलांसोबत फोटो पोज देताना पाहणं ही चाहत्यांसाठी एक पर्वणीच आहे. नुकतेच या ‘खानदान’चे काही फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत, ज्यामध्ये संपूर्ण कुटुंब अतिशय स्टायलिश आणि सुंदर दिसत आहे. शाहरुख खान आणि त्यांच्या कुटुंबाचे काही फोटो नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता देखील या फॅमिली फोटोंमध्ये खान कुटुंबाचा स्वॅग पाहायला मिळाला आहे.



Source link

Baloch: योद्धाच्या प्रेमाची तरल भावना; बलोचमधील ‘आस खुळी’ गाणे प्रदर्शित

0
Baloch: योद्धाच्या प्रेमाची तरल भावना; बलोचमधील ‘आस खुळी’ गाणे प्रदर्शित



Baloch Movie New Song: बलोच हा चित्रपट ५ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची सर्वजण आतुरतेने वाट पाहात आहेत.



Source link

NTR 30: जान्हवी कपूर पाठोपाठ सैफ अली खाननेही सुरू केलं ‘एनटीआर ३०’चं शूटिंग! फोटो आले समोर…

0
NTR 30: जान्हवी कपूर पाठोपाठ सैफ अली खाननेही सुरू केलं ‘एनटीआर ३०’चं शूटिंग! फोटो आले समोर…


ज्युनियर एनटीआर आणि सैफ अली खान यांच्या या फोटोंमध्ये पहिल्या फोटोत दोघेही उभे राहून एकमेकांसोबत फोटो पोज देताना दिसत आहेत. तर, दुसऱ्या एका फोटोत सैफ अली खान आणि ज्युनियर एनटीआर गप्पा मारताना दिसत आहेत. तर, तिसर्‍या फोटोत दोन्ही स्टार्स चहा कॉफीचा आनंद घेताना दिसत आहेत. ‘एनटीआर ३०’ या चित्रपटात जान्हवी कपूर आणि सैफ अली खान हे बॉलिवूड कलाकार देखील दिसणार आहे. हा चित्रपट तामिळ, तेलगू आणि इतर अनेक दक्षिण भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.



Source link

Ramayan: ‘रामायण’ मालिकेत भूमिका साकारणारे असलम खान सध्या काय करतात?

0
Ramayan: ‘रामायण’ मालिकेत भूमिका साकारणारे असलम खान सध्या काय करतात?


असलम यांनी छोट्या पडद्यावरील अलिफ लैला, श्री कृष्ण, सूर्यपुत्र कर्ण, मशाल आणि हवाए या मालिकांमध्ये काम केले. तसेच रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेने त्यांना लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवले. या मालिकेत त्यांनी ११ भूमिका साकारल्या.



Source link

Bholaa OTT Release : घरबसल्या पाहता येणार अजय देवगणचा ‘भोला’; ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्म होणार रिलीज!

0
Bholaa OTT Release : घरबसल्या पाहता येणार अजय देवगणचा ‘भोला’; ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्म होणार रिलीज!


बॉलिवूड अभिनेता अजय देवगणच्या ‘भोला’ची घोषणा झाली आणि या चित्रपटाचा टीझर व्हिडीओ प्रदर्शित झाला तेव्हा, या चित्रपटाचा मोठा बझ निर्माण झाला होता. चित्रपटाची ही चर्चा पाहता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करेल, अशा अपेक्षा व्यक्त केल्या जात होत्या. मात्र, रिलीजनंतर असे झाले नाही. या चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर अद्याप १०० कोटींचा आकडाही ओलांडलेला नाही. आतापर्यंत या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर केवळ ८५ कोटींचीच कमाई केली आहे. परंतु, जगभरात या चित्रपटाने १०० कोटींची कमाई केली आहे.



Source link

Ileana D’Cruz: लग्नाआधीच अभिनेत्रीने दिली गुडन्यूज! इलियाना डिक्रूझ लवकरच होणार आई!

0
Ileana D’Cruz: लग्नाआधीच अभिनेत्रीने दिली गुडन्यूज! इलियाना डिक्रूझ लवकरच होणार आई!


इलियाना डिक्रूज हिने तिच्या इंस्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले आहेत. यातील पहिल्या फोटोत लहान मुलाचे कपडे आहेत. या छोट्याशा ड्रेसवर लिहिले आहे की, ‘आता साहसी प्रवास सुरू होणार आहे.’ तर, यातील दुसऱ्या फोटोत तिच्या गळ्यातील क्युट लॉकेट आहे, ज्यावर ‘ममा’ असे लिहिले आहे. अभिनेत्री इलियाना डिक्रूझ हिने हे फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘लवकरच येत आहे. माझ्या प्रिय बाळा, तुला भेटण्यासाठी आता मी फार काळ वाट पाहू शकत नाही.’



Source link