Thursday, July 2, 2026
Home Blog Page 3073

Anupam- Kirron kher: पहिलं लग्न मोडल्यानंतर मिळाला एकमेकांचा आधार! किरण-अनुपम खेर यांची फिल्मी लव्हस्टोरी!

0
Anupam- Kirron kher: पहिलं लग्न मोडल्यानंतर मिळाला एकमेकांचा आधार! किरण-अनुपम खेर यांची फिल्मी लव्हस्टोरी!


अनुपम खेर आणि किरण खेर सुरुवातीला एकमेकांचे खूप चांगले मित्र होते. किरण खेर चंदिगडमध्ये ज्या थिएटर ग्रुपशी संबंधित होत्या, त्याच थिएटर ग्रुपमध्ये अनुपम खेर देखील होते. त्यावेळी किरण खेर या प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. तर, अनुपम हे संघर्ष करत होते. दोघांनी अनेक नाटकांमध्ये एकत्र काम केले. मात्र, दोघांचे आधीच लग्न झालेले होते. अनुपम खेर यांनी १९७९मध्ये अरेंज मॅरेज केले होते, पण ते या नात्यातून काहीच वर्षात वेगळे झाले होते. तर, किरण यांचे लग्न १९८०मध्ये मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती गौतम बेरी यांच्याशी झाले होते. मात्र, त्यांचा संसार अवघा पाच वर्षेच टिकला.



Source link

Zayed Khan: फराह खानने चप्पल फेकून मारली, शिवीगाळ केली! ‘मैं हूं ना’ फेम अभिनेत्याचा मोठा आरोप

0
Zayed Khan: फराह खानने चप्पल फेकून मारली, शिवीगाळ केली! ‘मैं हूं ना’ फेम अभिनेत्याचा मोठा आरोप


झायेद पुढे म्हणाला की, ‘त्यावेळी मी कट बोलल्याने फराह खानला खूप राग आला. तिने सगळ्यांसमोरच मला शिवीगाळ केली आणि चप्पलही फेकून मारली. त्यावेळी फराह माझ्यावर खूप वेळ ओरडत होती. तू माझ्या सेटवर कट म्हणू शकत नाहीस, फक्त मीच कट म्हणू शकते, असं म्हणत चिडली होती. मग, मी त्याला म्हणालो की, एक माणूस बेशुद्ध होऊन पडला असताना, तुम्ही माझ्याकडून नाचण्याची अपेक्षा कशी करू शकता? शेवटी जेव्हा युनिटच्या सदस्यांना समजले की, एक व्यक्ती बेशुद्ध झाला आहे, तव्हा ते आले आणि त्यांनी त्याला वाचवलं. तो ठीक झाल्यानंतर या गाण्याची शूटिंग व्यवस्थित पार पडली होती.’



Source link

सातारा: पाटण बाजार समितीत सत्तांतर: विक्रमसिंह पाटणकर यांना धक्का | पुढारी

0


पाटण; पुढारी वृत्तसेवा: पाटण कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत पहिल्यांदाच ऐतिहासिक सत्तांतर घडले. राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री व साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई गटाने १८ पैकी तब्बल १५ जागांवर विजय मिळवला. सत्ताधारी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर व राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांच्या गटाला अवघ्या तीन जागांवर समाधान मानावे लागले.

पाटण बाजार समितीच्या १८ जागांसाठी निवडणूक झाली. यामध्ये हमाल , तोलारी मतदारसंघातून सत्ताधारी पाटणकर गटाचे आनंदराव पवार हे यापूर्वीच बिनविरोध निवडून आले होते. रविवारी १७ जागांसाठी मतदान तर सोमवारी मतमोजणी झाली . मतमोजणीमध्ये पहिल्या निकालात व्यापारी मतदारसंघातून सत्ताधारी पाटणकर गटाचे अरविंद पाटील व बाळासो महाजन हे निवडून आले.

त्यानंतर ग्रामपंचायत व सोसायटी अशा एकूण १५ जागांवर देसाई गटाच्या उमेदवारांचा विजय झाला आहे. यामध्ये ग्रामपंचायत सर्वसाधारणमधून जोतीराम काळे, समीर भोसले, आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातून सुधाकर देसाई, अनुसूचित जाती गटातून सिद्धार्थ गायकवाड,

सोसायटी सर्वसाधारण गटामधून संग्राम मोकाशी, मानसिंग कदम, विलास गोडांबे, राजेंद्र पाटील, सिताराम सूर्यवंशी, बाळकृष्ण पाटील, दादासो जाधव, महिलांमधून वैशाली शिंदे, जयश्री पवार, भटक्या जातींमधून धनाजी गुजर, इतर मागासवर्गीय गटातून नितीन यादव हे उमेदवार निवडून आले.

या निवडणुकीत सत्ताधारी पाटणकर गटाला अनपेक्षितरित्या मोठा राजकीय धक्का बसला आहे . पाटणकर गटाला व्यापारी मतदारसंघात अपेक्षित मताधिक्य मिळाले. तर ग्रामपंचायतमध्ये देसाई गटाचे वर्चस्व होते. त्यानुसार तेथे देसाई गटाला अपेक्षित मताधिक्य मिळाले आहे. सोसायटी मतदार संघातील तब्बल ११ जागांसाठी येथे अक्षरश : काटे की टक्कर पहायला मिळाली.

शंभूराज देसाई गटाच्या उमेदवारांना काठावरचे परंतु अनपेक्षित मताधिक्य मिळाले. यात त्यांचे सर्व उमेदवार निवडून आले. आतापर्यंत कायमच या बाजार समितीची सत्ता पाटणकर गटाकडे होती. याहीवेळी ग्रामपंचायत वगळता अन्य मतदारसंघात पाटणकर गटाचे उमेदवार विजयी होतील, अशा अपेक्षा होत्या. मात्र, ऐनवेळी सोसायटी मतदारसंघात अनपेक्षित बदल घडला आणि वर्षानुवर्षे सत्ता प्रस्थापित असलेल्या सत्ताधारी पाटणकर गटाला अनपेक्षितरित्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

हेही वाचा 



Source link

Tu Chal Pudha: शिल्पी स्वतःच्याच घरात करणार चोरी? अश्विनीला त्रास देण्यासाठी रचणार नवा डाव!

0
Tu Chal Pudha: शिल्पी स्वतःच्याच घरात करणार चोरी? अश्विनीला त्रास देण्यासाठी रचणार नवा डाव!


Tu Chal Pudha Latest Update:तू चाल पुढं’ या मालिकेची खलनायिका अर्थात शिल्पी वाघमारे आता अश्विनीला बेघर करण्यासाठी नवे डाव खेळताना दिसत आहे. अश्विनीला स्वतःपेक्षा पुढे जाऊ द्यायचं नाही, असा विडाच शिल्पीने उचलला आहे. आता अश्विनीला काहीही करून त्रास द्यायचा असं ठरवून शिल्पी स्वतःच्याच घरात चोरी करणार आहे. मात्र, ही चोरी पैशांची नसून, घराच्या कागदपत्रांची असणार आहे. शिल्पी वाघमारेंच्या घराचे कागद चोरून, हे घर स्वतःच्या नावावर करून घेण्याचा डाव रचत आहे. अश्विनीला आणि तिच्या कुटुंबाला घराबाहेर काढणे हा एकच मनसुबा सध्या तिच्या अग्रक्रमी आहे.



Source link

TDM Movie: थिएटर मिळत नसल्यानं TDM च्या अभिनेत्याच्या डोळ्यात पाणी, Video Viral

0
TDM Movie: थिएटर मिळत नसल्यानं TDM च्या अभिनेत्याच्या डोळ्यात पाणी, Video Viral


ग्रामीण, वास्तविक जीवनातील समस्येवर भाष्य करणारा TDM हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. हा चित्रपट २८ एप्रिल २०२३ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. IMDbने चित्रपटाला चांगले रेटिंग देखील दिले आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असतानाही चित्रपटगृहांमध्ये स्क्रीन मिळत नसल्याचे समोर आले आहे. सध्या सोशल मीडियावर या चित्रपटाच्या स्क्रीनचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये चित्रपटाला स्क्रीन मिळत नसल्यामुळे अभिनेत्याच्या डोळ्यात पाणी आल्याचे दिसत आहे.



Source link

Satara APMC Election: कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादीची बाजी; पाटणमध्ये सत्तांतर | पुढारी

0


सातारा : पुढारी वृत्तसेवा : सातारा जिल्ह्यातील आठ बाजार समित्यांसाठी (Satara APMC Election) आज (दि.१)  मतमोजणी झाली. या मतमोजणी मध्ये पाटण मध्ये सत्तांतर झाले आहे. राष्ट्रवादीने महाविकास आघाडीला फाट्यावर मारत वाई, लोणंद, फलटण आणि कोरेगाव या बाजार समित्यांवरील आपली सत्ता अबाधित ठेवली. वडूज मध्ये माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी राष्ट्रवादीला चारी मुंड्या चीत केले. तर साताऱ्यात आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी पुन्हा एकदा बाजार समिती ताब्यात घेत भाजपचा झेंडा फडकवला. कराडात चुरशीने झालेल्या लढतीमध्ये आ. पृथ्वीराज चव्हाण आणि उदयसिंह उंडाळकर गटाने राष्ट्रवादीचे आ. बाळासाहेब पाटील व भाजपचे अतुल भोसले यांच्या गटाचा पराभव केला.

सातारा बाजार समितीमध्ये आ. शिवेंद्रराजे गटाची बाजी

सातारा बाजार समितीमध्ये (Satara APMC Election) आमदार शिवेंद्रराजे यांच्या नेतृत्वाखालील अजिंक्य विकास पॅनल आणि स्वाभिमानी विकास आघाडीमध्ये लढाई झाली. यामध्ये आ. शिवेंद्रराजे गटाने बाजार समितीच्या सर्वच्या सर्व 18 जागांवर विजय मिळवत आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले. या निवडणुकीत स्वाभिमानी विकास आघाडीला खा. उदयनराजे भोसले यांनी पाठिंबा दिल्याने चुरशीची निवडणूक होणार अशी शक्यता होती. मात्र आमदार गटाच्या उमेदवारांनी तब्बल 800 ते 900 मतांच्या फरकाने विजय मिळवला. साताऱ्याची बाजार समिती पूर्वी राष्ट्रवादीच्या ताब्यात होती आता ती भाजपच्या ताब्यात आली आहे.

Satara APMC Election : वाई बाजार समितीमध्ये आ. मकरंद पाटील यांचा डंका

वाई बाजार समितीमध्ये आ. मकरंद पाटील यांनी आपला डंका वाजवला आहे. बाजार समितीच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पॅनलने सर्वच्या सर्व जागांवर विजय मिळवला. राष्ट्रवादी विरोधात भाजप शिवसेना आणि काँग्रेसच्या बंडखोर गटाने पूर्ण ताकद पणाला लावली. मात्र त्याचा फारसा काही परिणाम दिसून आला नाही. यापूर्वीच राष्ट्रवादीच्या सहा जागा बिनविरोध झाल्या असून एक जागा विरोधकांकडे गेली आहे.

लोणंद बाजार समितीमध्ये राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलचा एकहाती विजय

लोणंद बाजार समितीमध्ये राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलने 18 पैकी 17 जागांवर विजय मिळवला. तर विरोधी भाजप शिवसेना आघाडीला एका जागेवर समाधान मानावे लागले. या ठिकाणी राष्ट्रवादीला बंडखोरीचा सामना करावा लागला. हा मकरंद पाटील यांनी बंडखोरी शमावली असली तरी मतदानातून अनेकांनी आपली नाराजी दर्शवली. त्यामुळेच मागील निवडणुकीत असलेली २०० मतांची आघाडी यावेळी केवळ ५० मतांवर आली होती.

कोरेगाव बाजार समितीमध्ये राष्ट्रवादीने सत्ता अबाधित ठेवली

कोरेगाव बाजार समितीमध्ये राष्ट्रवादीने आपली सत्ता अबाधित ठेवली आहे. बाजार समितीच्या मतमोजणी मध्ये राष्ट्रवादीला 16 आणि आ. महेश शिंदे यांच्या गटाला एक जागा मिळाली. तर एका जागेवर अपक्षाने विजय मिळवला. आ. महेश शिंदे यांनी जिल्हा बँकेवेळी राष्ट्रवादीचे मतदार फोडून आपल्या समर्थकाला संचालक केले होते. मात्र हा चमत्कार त्यांना पुन्हा करता आला नाही. त्यामुळे कोरेगावात झालेल्या दोन आमदारांच्या फाईट मध्ये आ. शशिकांत शिंदे यांनी विजय मिळवला. एका मागोमाग एक संस्था गेल्यानंतर बाजार समितीतील मिळालेला विजय हा राष्ट्रवादीसाठी बूस्टर डोस ठरणार आहे.

Satara APMC Election : फलटण बाजार समिती राष्ट्रवादीच्या ताब्यात

फलटण बाजार समितीमधून खासदार गटाने माघार घेतल्याने राजे गटांमध्येच द्वंद्व झाले होते. अर्ज माघारी वेळी चार जागा बिनविरोध होऊन 14 जागांसाठी रविवारी मतदान झाले. सर्व जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले आहेत. यामध्ये राजे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये लढत झाल्याने फलटण बाजार समिती राष्ट्रवादीच्या ताब्यात गेली आहे.

वडूज बाजार समितीमध्ये राष्ट्रवादीचा पराभव

वडूज बाजार समितीमध्ये माजी आ. प्रभाकर घार्गे यांच्या नेतृत्वाखालील खटाव विकास आघाडीने राष्ट्रवादीचा एकतर्फी पराभव केला. बाजार समिती निवडणुकीसाठी प्रभाकर घार्गे यांना आ. जयकुमार गोरे, दिलीप येळगावकर यांच्यासह अन्य नेत्यांनी साथ दिली. तर राष्ट्रवादीने नंदकुमार मोरे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढली मात्र राष्ट्रवादी या निवडणुकीत सपशेल फेल ठरली.

Satara APMC Election :  कराड बाजार समितीवर पुन्हा काँग्रेसचा झेंडा

कराड बाजार समितीमध्ये काँग्रेसने राष्ट्रवादीचा पराभव केला आहे. या निवडणुकीत भाजपच्या एका गटाने काँग्रेसला तर दुसऱ्या गटाने राष्ट्रवादीला पाठिंबा दिला होता. आ. पृथ्वीराज चव्हाण आणि स्व. विलासराव उंडाळकर पाटील यांचे चिरंजीव उदयसिंह उंडाळकर पाटील यांच्या रयत पॅनल ला 12 तर माजी सहकार मंत्री राष्ट्रवादीचे आ. बाळासाहेब पाटील व भाजपचे अतुल भोसले यांच्या गटाला ६ जागा मिळाल्या. कराड  बाजार समिती पुन्हा काँग्रेसच्या ताब्यात गेली असून काँग्रेसने बाजार समितीवरील सत्ता अबाधित राखली आहे.

पाटण बाजार समितीमध्ये सत्तांतर: शिवसेनेचा भगवा फडकला

पाटण बाजार समितीमध्ये ऐतिहासिक असे सत्तांतर झाले असून पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी राष्ट्रवादीचा १५ विरुद्ध ३ असा धक्कादायक पराभव केला. बाजार समिती इतिहासातील हे पहिलेच सत्तांतर असून यामुळे जिल्हा बँकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर व राष्ट्रवादीला धक्का बसला आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी ग्रामपंचायत वगळता इतर मतदारसंघांवर विजय मिळवून असा अंदाज होता. मात्र ना. शंभुराज देसाई यांनी राजकीय सूत्रे आपल्या हातात घेऊन चक्रे फिरवली होती. त्यामुळेच या मतदारसंघांमध्ये देसाई गटाने बाजी मारली. त्यामुळे आता राष्ट्रवादीकडे असणारी बाजार समिती शिवसेनेकडे गेली आहे.

हेही वाचा 



Source link

Makarand Anaspure: अभिनेते मकरंद अनासपुरे बनले एसटी महामंडळाचे सदिच्छा दूत! म्हणाले…

0
Makarand Anaspure: अभिनेते मकरंद अनासपुरे बनले एसटी महामंडळाचे सदिच्छा दूत! म्हणाले…


मकरंद अनासपुरे हे मराठी मनोरंजन विश्वातील मोठे नाव आहे. गंभीर भूमिका असो वा विनोदी, मकरंद अनासपुरे यांनी आपल्या अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर गारुड केले आहे. त्यांचा चाहता वर्ग हा संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेला आहे. ‘एसटी जशी ग्रामीण भागाचं प्रतिनिधीत्व करते, त्याचप्रमाणे नवीन सदिच्छा दूत मकरंद अनासपुरे यांची ओळख देखील ग्रामीण भागापर्यंत आहे. त्यांचं सामाजिक काम देखील मोठ्या प्रमाणावर आहे, त्याचा फायदा एसटीला होईल’, असेही मुख्यमंत्री म्हणाले.



Source link

Satara : पाटण बाजार समितीचा निकाल जाहीर, 45 वर्षानंतर सत्तांतर

0



<p>पाटण बाजार समितीचा निकाल जाहीर, पाटण बाजार समितीत ४५ वर्षानंतर सत्तांतर. शंभूराज देसाईंकडे १५ जागा, &nbsp;४५ वर्षांनंतर सत्तांतर</p>



Source link

Satara APMC Election : बाजार समिती निवडणुकीत शिवेंद्रराजे गटाकडून उदयनराजे प्रणित स्वाभिमानी विकास आघाडीचा धुव्वा | पुढारी

0









सातारा; पुढारी वृत्तसेवा : सातारा बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वाखालील अजिंक्य विकास पॅनेलने खासदार उदयनराजे भोसले यांचा पाठिंबा असलेल्या स्वाभिमानी विकास आघाडीचा १८-० असा धुव्वा उडवला. त्यामुळे सातारा तालुक्यातील सहकारातील वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

सातारा बाजार समितीसाठी रविवारी तब्बल ९४ टक्के मतदान झाले होते. सोमवारी सकाळी दहा वाजता जरंडेश्वर नाका येथील नागरी सहकारी बँक असोसिएशनच्या सभागृहात मतमोजणी सुरुवात झाली. पहिल्या तासाभरामध्ये व्यापारी आणि हमाल मापाडी मतदारसंघाचा निकाल जाहीर झाला. यामध्ये व्यापारी मतदारसंघांमध्ये क्रॉस वोटिंग झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र त्याचा फारसा काही परिणाम आमदार गटाच्या विजयी उमेदवारांवर झाला नाही.

यानंतर सोसायटी आणि ग्रामपंचायत मतदार संघाचा निकाल जाहीर करण्यात आला. बाजार समितीच्या सर्वच्या सर्व १८ जागांवर आमदार गटाने सरशी करत स्वाभिमानी विकास आघाडीचा धुव्वा उडवला. आमदार गटाचे सर्व उमेदवार हे ८०० ते ९०० मतांच्या फरकाने निवडून आले.

या निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पाठिंबा दिला होता. तसेच राष्ट्रवादीनेही याच आघाडीत सहभागी होत आपले उमेदवार दिले होते. स्वाभिमानी विकास आघाडी निवडणुकीच्या रिंगणात असली तरी आमदार गटविरुद्ध खासदार गट अशीच ही लढत पहायला मिळाली. यामध्ये आ. शिवेंद्रराजे यांनी खा. उदयनराजे यांच्यावर मात केली.

हेही वाचा











Source link

Kangana Ranaut: सलमानला मिळालेल्या धमकीवर कंगनाची प्रतिक्रिया; म्हणाली ‘घाबरू नकोस…’

0
Kangana Ranaut: सलमानला मिळालेल्या धमकीवर कंगनाची प्रतिक्रिया; म्हणाली ‘घाबरू नकोस…’


Kangana Ranaut on Salman Khan Death Threat : अभिनेत्री कंगना रनौत नुकतीच तिच्या हरिद्वार भेटीमुळे चर्चेत आली आहे. यादरम्यान सलमान खानला मिळालेल्या धमक्यांवर देखील तिने आपली प्रतिक्रिया दिली आहे.



Source link